आजचा सुधारक

आजचा सुधारक हे विवेक वादाला वाहिलेले मासिक, गेली १८ वर्षे नागपुरहून प्रकाशित होणारं. लोकांना माहित असण्यापेक्षा माहित नसण्याचीच अधिक शक्यता. यातले लेख व संदर्भ चिंतनशील असतात. आगरकरांच्या ध्येयवादाचा पाठपुरावा करणारं,बरचसं गंभीर स्वरुपाच पण तरीदेखील रुचणारं, हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही.




वावडं नाही..
>>हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही.
मिसळीला कशाचंच वावडं नसतं. त्यात फरसाणाच्या सोबतीला चटकदार चिवडाही छान लागतो,
त्यातल्या दाणे आणि भाजलेल्या सुक्या खोबर्याचे तुकडेही मिसळीला विशेष चव आणतात. सोबत दही असेल
तर काही वेळेला दहीमिसळही छान लागते!
सबब, मिसळपाववर रुचिपालटाचे स्वागतच होईल असे वाटते!
आपला,
(मिसळपावचा एक सभासद!) तात्या.
थोडीशी भर
प्रकाशराव,

तात्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. पण त्यात थोडीशी भर घालू इच्छितो...
"मिसळपाव"वर हे मासिक रुचिपालट म्हणून ठेवण्यापेक्षा मिसळीतच मिसळून टाकले तर कसे?
आणि अशा साहित्याचे दुवे असतील तर कृपया देत जा.
म्हणजे चातकाचा दृष्टिकोन बाळगणार्या आम्हा तृषार्तांना मिसळ-पावच्या वेगवेगळया चवी चाखता येतील.
धन्यवाद
(मिसळ-पाव भक्त) सागर
मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ठीक आहे पण
घाटपांडेकाका तुमची सगळी वेगवेगळ्या संस्थांची जसे साधना इ. जुने अंक एकत्र सगळे काढू नका किंवा नीट आवरुन ठेवा नाहीतर काकू ओरडायच्या अजून एक नवीन वेबसाइट मिळाली म्हणून अजून जास्त पसारा करू नका.
ह. घ्या.
ठीक आहे ??
कोपि राइट म्हनुन काय तरी अस्त.
कदि ऐकल का वो.
टिकाकार
टिकाकार
हं
कॉपीराइट मधे बहूतेक २०% वापरले तर हरकत नाही असे काहीतरी वाचल्याचे आठवते. एकदा परत विचारायला पाहीजे, कायदा नविन आहे बदलला पण असेल. तर एखाद, दुसरे पान व असेल तर मूळ संकेतस्थळाचा दुवा दिला की ????
प्र्काशन हक्क
बहुतांशी वेळेस "प्रकाशन हक्क" अथवा "कॉपी राईट"चा संबंध हा जर त्यातून कुठलाही लाभ होणार असेल "आर्थीक" / शैक्षणीक (पेपर पब्लिकेशन) / संशोधनात्मक / पेटंट वगैरे तर असतो. जर जालावर कॉपीराईट मटेरीयल हे संदर्भासहीत अशा चर्चात्मक/विरंगुळा ठरतील अशा ठिकाणी वापरले तर विशेष प्रश्न नाही. न्यू यॉर्क टाईम्सची गंमत बघा. त्यातील एखादा लेख आवडला आणि तो काही दिवसांनी त्या दिवशीच्या (लेख प्रसिद्ध झालेला दिवस) दुवा वापरून पाहीला तर मिळत नाही, कारण तो विकत घ्यावा अशी अपेक्षा असते. पण त्याच लेखाची, प्रसिद्ध झालेल्या दिवशी , "परमनंट लिंक" फुकट मिळते जी वापरून तोच लेख आपल्या ब्लॉगवर चढवता येतो!
थोडक्यात प्रकाशरावांची काही चूक नाही.. असल्यास त्वरीत काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोलीस खात्यात ओळखी असतीलच
याबाबत अजून माहूती हवी असल्यास हा कॉर्नेल विद्यापिठाचा दुवा पहा.
पसारा
<<जास्त पसारा करू नका>>
यावेळच्या ( सप्टेंबर २००७) च्या अनुभवच्या अंकात हरिशंकर परसाई यांची मूळ हिंदी कथा "बुद्धिवादी' ही उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे. यात या बुद्धिजीवी पसार्याचे गमक मांडले आहे. जालावरील आवृत्तीत त्याचा समावेश नसल्याने त्याचा दुवा देणे कष्टप्रद आहे. छापील आवृत्तीत वाचावे. तेव्हापासून मला घरात बुद्धिवादी (बुवा) असे हिणवले / चिडवले जाते
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हा ... हा...
हा ... हा... हा...(हास्य)
टिकाकार
टिकाकार
अत्यंत
अत्यंत वाचनीय असे नियतकालिक आहे. माझ्याकडून विवेकवादी चिंतन फारसे होत नसले तरी मी वर्गणीदार आहे.
चांगली माहिती
चांगली माहिती
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
_________
मालकांची कृपा॥