झुकली पापणी अन
एकवटला देह सारा
मौन बरसला प्राजक्त
...........मी वेचलाच नाही!
चुंबितो मातीस काळ्या
धुंद आषाढ हिरवा
मुग्ध मोहरला प्राजक्त
...........मी ऐकलाच नाही!
भेदुन गंधाळ धरती
डोकावी हिरवी पाती
ओघळला सवे प्राजक्त
...........मी पेललाच नाही!
संन्यस्त माळ लावतो
ध्यान उन्ह सावल्यांचे
मुक कोसळला प्राजक्त
...........मी झेललाच नाही!
दंवबिंदुंचे हळवे स्पंदन
पालवीचे हिरवे रुदन
रेंगाळला स्तब्ध प्राजक्त
...........मी माळलाच नाही!
विशाल...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1674
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता,
अन त्यातले भाव.
छानच.
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
सुरेख कविता..
गंधभारलेला प्राजक्त ....सुंदर !
मस्तच!! सुर
मस्तच!!
सुरेख!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
सुंदर
कविता आवडली.
आभार
आभार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: https://www.misalpav.com/node/8059
भाग २: https://www.misalpav.com/node/8085