Skip to main content

प्राजक्त

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/06/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
झुकली पापणी अन एकवटला देह सारा मौन बरसला प्राजक्त ...........मी वेचलाच नाही! चुंबितो मातीस काळ्या धुंद आषाढ हिरवा मुग्ध मोहरला प्राजक्त ...........मी ऐकलाच नाही! भेदुन गंधाळ धरती डोकावी हिरवी पाती ओघळला सवे प्राजक्त ...........मी पेललाच नाही! संन्यस्त माळ लावतो ध्यान उन्ह सावल्यांचे मुक कोसळला प्राजक्त ...........मी झेललाच नाही! दंवबिंदुंचे हळवे स्पंदन पालवीचे हिरवे रुदन रेंगाळला स्तब्ध प्राजक्त ...........मी माळलाच नाही! विशाल...
लेखनविषय:

वाचने 1663
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085