Skip to main content

शिवराज्याभिषेक दिन -

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 04/06/2009 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !! यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. शिवराज्याभिषेक दिनाचे डेरवण येथील हे एक सुंदर शिल्प यानिमित्याने बालगंधर्व पुणे येथे आजपासून ७ तारखेपर्यंत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले आहे. यात सह्याद्रीतील दुर्गम आणि अपरिचित दुर्गवैभव पहावयास मिळेल. पुणेकर मिपा सभासद नक्कीच याचा लाभ घेतील आणि नंतर सचित्र वृत्तांत देतील. (शिवप्रेमी ) अमोल केळकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7127
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अरे प्रेषक म्हणून माझे नाव कुठे गेले? [( असो नावात काय आहे ? जय भवानी, जय शिवाजी ! -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

In reply to by अमोल केळकर

असा नावबदल इतर बाबींमध्येही होतोय काय? म्हणजे एकाची खरड दुसऱ्याच्या नावावर, एकाचा व्य.नि. तिसऱ्यालाच वगैरे? धमाल येईल नाही असे झाल्यावर... ;) नीलकांता, लगेच पहा, नाही तर खरोखरीच धमाल उडून डोक्याला खुराक व्हायचा.

राजांना आमचाही मानाचा मुजरा ! यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. ++++++१ सहमत शेवटचे छायाचित्र सुंदर. अशी काही डेरवण येथे पाहिल्याचे आठवते.

In reply to by दिपक

सहमत

In reply to by दिपक

+१ सहमत. रेवती

राजांना दंडवत.. (शिवभक्त) तात्या.

यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
सहमती आहे.आमची ही हीच इच्छा आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छ्त्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा... अश्विनि ....

थोरल्या आबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

राजांना मुजरा !!! --अवलिया

मराठी तेतुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा. समस्त मराठी जनानी वाद विसरुन एकत्र यावी . हिच श्री चरणी मागणी आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी

या सर्वर च्या भानगडीत हा लेख चुकून माझ्या नावावर आलेला दिसतो. हे थोडेसे रोचक आहे. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरे. हा लेख अमोल यांचाच आहे.

In reply to by मुक्तसुनीत

कदाचीत हा लेख तुमच्या नावे यावा ही 'महाराजांचीच इच्छा असावी ' तुमच्या नावामुळे जरा प्रतिसादही जास्त आले असावेत असे वाटते ;) (कृ. ह. घ्या ) -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा