Skip to main content

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 01/06/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे. त्याची आई जेव्हा त्याला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते तेव्हा हा चिमुरडा स्वतःला शिवाजी समजून काल्पनिक घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या कडे-कपारीतून दुश्मनांचा नायनाट करून विजयश्री खेचून आणतो. तेव्हा त्या निरागस चेहर्‍यावरचा आवेशपूर्ण भाव मनाला स्पर्शून जातो. चित्रपटात जेव्हा शिवाजी महाराज विषण्ण होऊन "वेडात मराठे वीर दौडले सात...फक्त सातच? बाकीचे कुठे गेले?" असा खडा सवाल करतात तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना टोचते. मोगलांना धूळ चारून एकसंध राज्य स्थापन करण्याच्या महाराजांच्या बुलंद इराद्याची आणि अतुलनीय पराक्रमाची कथा आपल्या थंड झालेल्या रक्ताला जिवंत करणारी एक स्फूर्तीगाथा आहे असे मी मानतो. मी ब्राह्मण आहे हे सत्य या सगळ्या भावना माझ्या किंवा माझ्या पुतण्याच्या मनात उचंबळून आणण्यात अडथळा ठरत नाहीत. मी मराठी आहे; महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि माझ्या मातीने आणि माझ्या संस्कारांनी मला शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा आणि त्यांच्या पराक्रमातून बोध घेण्याचा हक्क दिलेला आहे. माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व किंबहुना भारतातील सर्व जनतेला तो अधिकार आहे. ज्याच्या मनात स्वतःच्या मातीविषयी, आईविषयी, अस्मितेविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम आणि पराकोटीचा आदर आहे त्यांना सगळ्यांना तो अधिकार आहे असे मी मानतो. स्वत:च्या संस्कृतीविषयी प्रेम असणे; आदर असणे म्हणजे इतरांच्या श्रद्धांना, आदरस्थानांना लाथा-बुक्क्यांनी बदडून काढणे आणि हाणामारी करून "तुम्ही आमच्यातले नाहीत" असे ठणकावून सांगणे म्हणजे गुंडगिरीखेरीज दुसरे काहीच नसून खुद्द शिवाजी महाराजांनी कधी अशा रानटी प्रेमाचे समर्थन केले नाही हे सर्वश्रुत आहे. 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' च्या पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे, प्रवीण गायकवाड या मराठी मनात दुहीची विषवल्ली पेरणार्‍या शिवाजी महाराजांच्या ठेकेदारांनी जो अश्लाघ्य प्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुठल्याश्या समितीवरील निवडीच्या वादावरून सुरु केला आहे आणि त्याला सुसंस्कृतपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून रस्त्यावर उतरून बाबासाहेबांसारख्या वयोवृद्ध आणि सगळे आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेल्या 'सभ्य' अभ्यासकावर भ्याड हल्ले करण्याची भाषा वापरून हिडीस स्वरूप दिलेले आहे ते अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. गुंडगिरी हे एकमेव धोरण असणार्‍या या संघटनांना शिवाजी महाराज किती माहित आहेत? ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिले; ज्या व्यक्तीने आजच्या तरूण पिढीला 'जाणता राजा' सारख्या महानाट्यातून शिवाजी महाराजांच्या अभेद्य इराद्यांचे बाळकडू पाजले त्या व्यक्तीवर तुम्ही हल्ला करण्याच्या गोष्टी करता? शिवाजी महाराज हे काय या संघटनांची आणि त्यांच्या या उद्दाम नेत्यांची 'रजिस्टर्ड ट्रेडमार्क' असलेली मालमत्ता आहेत? "वेडात मराठे वीर दौडले सात" यातले मराठे म्हणजे काय फक्त जातीने मराठा असलेले मराठेच आहेत काय? मी ब्राह्मण असून महाराष्ट्रात जन्मलो, मराठी बोलतो आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेतो म्हणून मी स्वतःला मराठा समजतो. जे मराठी आहेत, ज्यांना महाराष्ट्रधर्माची चाड आहे ते सगळे मराठे आहेत असे मी मानतो. कुठल्यातरी क्षुल्लक कारणांवरून एवढे वादंग उभे करण्यात कसले आले आहे शिवाजी प्रेम? खुद्द बाबासाहेब पुरंदरे या सगळ्या वादावर मौन ठेवून आहेत. हा त्यांचा सुसंस्कृतपणाच म्हणावा लागेल. वाद आणखी चिघळू नये म्हणून त्यांचे हे मौन खरच प्रशंसनीय आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत घेतलेली भूमिका देखील समंजसपणाची आहे. कदाचित बाबासाहेब या दोन संघटनांच्या आवेशाला घाबरून गप्प बसले आहेत असे उद्दामपणे म्हणायला देखील हे शिवाजी महाराजांचे ठेकेदार कमी करणार नाहीत. ते कदचित खरे असेल देखील आणि त्यात वावगे काहीच नाही. रात्री रस्त्यावरून एकटे जातांना ५-७ माथेफिरू गुंडांनी अडवले तर कुठली ही व्यक्ती घाबरून सगळा ऐवज त्यांच्या स्वाधीन करेल. पण म्हणून त्या गुंडांच्या पराक्रमाचे कौतुक होणार नाही; त्यांच्या शौर्याला कुणी सलाम करणार नाही. त्याचप्रमाणे 'मराठा सेवा संघा'च्या किंवा 'संभाजी ब्रिगेड'च्या शिवाजी महाराजांचे चरित्र अगदी मुखोद्गत असणार्‍या विद्वान कार्यकर्त्यांनी उद्या खरेच त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक फक्त पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनाच असणार आहे. कुठलाच सुसंस्कृत माणूस गुंडप्रवृत्तीने एका वयोवृद्ध अभ्यासकावर केलेल्या हल्ल्याचे कौतुक करणार नाही. मराठे-ब्राह्मण हा वाद खूप जुना आहे आणि तो मुख्यत्वेकरून मराठी ब्राह्मणांच्या बुद्धीचा कस लागणार्‍या तथाकथित क्षेत्रांतील वर्चस्वातून जन्मलेला आहे असे म्हटले जाते. तसं पाहिलं तर ब्राह्मण ही जात शांतताप्रिय (सहसा हाणामारी, गुंडगिरी, गुन्हेगारी यात न गुंतणारी) आणि थोडीशी संकोचप्रिय आहे. नाकाच्या सरळ रेषेत आयुष्याचा प्रवास करायचा, कुणाला लुबाडायचे नाही, फसवायचे नाही, कुणाच्या भांडणात पडायचे नाही, प्रत्यक्ष मारामार्‍या, गुंडगिरी यापासून शक्य तेवढे लांब रहायचे आणि शांत जीवन जगायचे आणि मुख्य म्हणजे जगू द्यायचे असा मराठी ब्राह्मणांचा जगण्याचा मध्यममार्ग आहे. आकाराने लहान असलेला हा वर्ग संस्कांरानी देखील बांधलेला असतो. शिवाय अंतर्गत दुहीमुळे 'एकीचे बळ' ही संकल्पना फक्त पुस्तकातच वाचलेली असल्याने 'आपला कुणी वाली नाही' या रास्त भावनेमुळे हा वर्ग समाजात वावरतांना थोडा घाबरूनच असतो. मराठ्यांच्या अंतर्गत दुहीचा पण स्वतंत्र असा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टींचा राजकारणात येथेच्छ वापर करण्यात येतो आणि राजकारणी आपल्या स्वर्थाची पोळी सुखेनैव भाजून घेत असतात हे देखील सर्वश्रुत आहे. ब्राह्मणांना जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, ना. गोखले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, राजगुरु, सेनापती बापट, संत ज्ञानेश्वर प्रिय आहेत तेवढेच शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील (हे जैन होते), संत गाडगेबाबा, संत तुकाराम प्रिय आहेत हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या घरी संपूर्ण तुकाराम गाथा आहे, शिवचरित्र देखील आहे आणि पुतण्याला सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या गोष्टी अजून तरी नसून शिवाजी महाराजांच्या आहेत. ब्राह्मण हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर सगळ्या धर्मांविषयी सारखाच सलोख्याचा दृष्टीकोन बाळगून असतात. भगवान बुद्धांची तर मी कित्येकदा प्रार्थना म्हणतो आणि भगवान महावीरांची "णमो अरिहंताणम..." ही प्रार्थना देखील मी बर्‍याचदा म्हणतो. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेलं "खुदा से करता हूं मैं ये दुआ मदिने में..." हे नितांत सुंदर मुस्लिमधर्मीयांचं भजन ऐकून सगळी मानवजात कशी एक आहे याची खात्री पटते. या पार्श्वभूमीवर 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' यांनी एकाच मार्गाने निष्कारण पोसलेलं हे जातीयवादाचं भूत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे हे निश्चित. 'मी शिवाजीराजे...' मध्ये चर्चिले गेलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत हे या सतत हाणामारीची भाषा करून हिरो ठरू पाहणार्‍या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठी माणूस का मागे पडतो? मराठी माणसाला उत्तर भारतीयांच्या खमक्या दुनियेत का अजिबात स्थान नसते? मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो? मराठी माणूस का मोठ्या हुद्द्यांवर नसतो? मराठी माणसाचे उद्योग क्षेत्रातले स्थान का नेहमीच हास्यास्पद विषय ठरतो? मराठी माणूस का नाही मल्होत्रा, खन्ना, अगरवाल, ओबेरॉय असल्या दमदार नावांच्या यादीत स्थान पटकावू शकत? फॅशन, मॉडेलिंग, अभिनय, मीडिया या व अशा ग्लॅमरस क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचा कुठेच मागमूस का नसतो? मुंबईतला मराठी माणूस का नेहमी बदलापूर, खारघर ला जीवन कंठण्याच्या गोष्टी करत असतो? इथे मराठी माणूस म्हणजे समस्त महाराष्ट्रवासी अभिप्रेत आहेत. मराठा, ब्राह्मण, वाणी, शिंपी, चांभार, न्हावी, माळी असे सगळे मराठी या समाविष्ट आहेत कारण या सगळ्याच मराठी जनांची अवस्था वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. कुठल्याच जातीत जन्म घेणे हे कुणाच्या हातात नसते आणि तो दोष तर अजिबातच नसतो. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला माझा आक्षेप आहे. ते म्हणतात की बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण म्हणून जन्मले हा त्यांचा दोष नाही. त्यांच्या समंजस भूमिकेतले हे विधान खटकले. मी ब्राह्मण कुटुंबात जन्मलो, माझ्या शिक्षक आई-वडिलांनी हजारो मुलांसारखेच मला ही चांगले संस्कार दिले आणि मान ताठ ठेवून सचोटीने जगण्याचे बळ माझ्या मनगटांमध्ये भरले याचा मला रास्त अभिमान आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणे हा दोष कसा असू शकतो? किंबहुना कुठल्याही जातीत जन्माला येणे हा दोष कसा काय असू शकतो? पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून विनाकारण जातीद्वेषाची ही बीजे रुजविण्याचे निंदनीय प्रकार ताबडतोब बंद करावेत असे मला वाटते. आपण जर काही विधायक कार्य करून महाराष्ट्रधर्म पुढे नेऊ शकत नसू तर निदान निव्वळ गुंडगिरी करून आणि आढ्यताखोरपणा करून जातीयतेची विषवल्ली तरी पेरू नये. या स्वतःला मराठ्यांचे स्वयंघोषित नेते म्हणवणार्‍या नेत्यांना शिवाजी महाराज किती कळले आहेत? साहित्य, समाजसेवा, कला, वैद्यकक्षेत्र आदि कुठल्या क्षेत्रात यांनी जनतेची निस्वार्थ सेवा केलेली आहे? बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातले जाणते शिव-अभ्यासक आहेत आणि त्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे संशोधन आणि ज्ञान हे खचितच इतर कुणाही लुंग्या-सुंग्यापेक्षा जास्त आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र घेऊन पुढे जाणे हे सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे हे ही न कळण्याइतपत या संघटना जात्यांध झालेल्या आहेत? असे जर असेल तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. आधीच महाराष्ट्रात परप्रांतियांच्या आक्रमणाचे संकट तोंडाशी येऊन ठेपलेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माणसाचा आवाज आणि मराठीची हाक क्षीण होत चालली आहे. परप्रांतीयांचे हे आक्रमण नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर सारख्या शहरांमधूनही जोमाने फोफावते आहे. ५-१० वर्षात या सगळ्या शहरांची आणि आपल्या अस्सल मराठी गावांची अवस्था मुंबईप्रमाणे झाली तर कदाचित शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याच मराठी भूमीत पोरके होईल. बाहेर सगळीकडे हिंदी बोलावे लागेल आणि या लोकांच्या दंडेलीला आपल्याच घरात सहन करत बसावे लागेल. परंपरेप्रमाणे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून पुन्हा महाराष्ट्रधर्म बुडवू नये अशी विनंती मी त्यांना करतो. त्यापेक्षा काहीतरी विधायक कार्यात जर ही शक्ती आणि ऊर्जा वापरली तर त्याचा महाराष्ट्राला आणि मराठी जनतेला नक्कीच फायदा होईल. उगीच गुंडगिरी आणि दंडेलशाही करून काहीही साध्य होणार नाही. कदाचित बाबासाहेब कुठल्या त्या समितीवर नेमले जाणारही नाहीत पण त्यामुळे मराठीची आणि महाराष्ट्राची यत्किंचितही प्रगती होणार नाही. नेहमीसारखे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून या संघटना आणि त्यांचे भेदभाव पाळणारे दूरदृष्टीहीन नेते महाराष्ट्राची आणि मराठीची आणि तमाम मराठी जनतेची कवडीचीही मदत करत नाही आहेत. उलट सामान्य जीवन ढवळून काढण्याचे आणि शांतता आणि सलोखा भंग करण्याचे कार्य मात्र ही मंडळी अगदी मनापासून करत आहेत हे नक्की. सामान्य जनता या गुंडगिरीच्या प्रवृत्तीला आणि दुहीच्या विषवल्लीला अजिबात भीक घालणार नाही हीच अपेक्षा आणि आशा!! जय महाराष्ट्र!!! --समीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 54916
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by आम्हाघरीधन

अनेक वाक्यांचा धडधडीत चुकीचा अर्थ लावला आहे हे उपरोल्लेखित लिंक्सवरून दिसत आहेच. उदा: दुसरी लिंकः 'शिष्यादिच्छेत पराजयम' याचा अर्थ लावताना गुरूपेक्षा शिष्य वरचढ निघाल्याचा गुरूला आनंद होतो असं आहे. यात शिष्याला कमी लेखण्याचा लवलेशही नाही. अनेक वेळा हेच वाक्य शिष्य गुरूपेक्षा वरचढ निघाला की वापरतात! "पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही. उपरोल्लेखित लिखाण अतिशय पूर्वग्रहदूषित नजरेनेच लिहिलं आहे यात तीळमात्र शंका नाही.

तुमचे हे इतिहासकार (अ)ज्ञानी कोण आहेत? खाली फक्त सभाजी ब्रिगेड अस लिहिल आहे. त्याना जाउन इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक वाचायला सान्गा.

अशा विषयांना निवडणुकीच्याच तोंडावर उत येत असतो. राजकारण्यांना लोकांच्याच सहभागातून त्यांना फॅसिझम निर्माण करायचा असतो. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. अशा पद्धतीने जनतेची कोंडी करुन त्याला मार्ग दाखवल्याचा आभास निर्माण केला जातो. इथे ऐतहासिक विश्लेषणाच्या नावाखाली जातीय अस्मितेच्या विषवल्ली पसरवायचा उद्योग पुर्वीपासुन चालु आहे. इतिहासाची मढी उकरुन किती काळ तथाकथित अस्मितेच्या नशेत जगणार? अहो आपल्या खापरपणजोबांचे नाव तरी आपल्याला माहित आहे का? इतिहासात काय घडले असेल याचे उपलब्ध / अनुपलब्ध गोष्टीवरुन याचे तर्क कुतर्क करत बसणार? देशासमोरील आजचे प्रश्न काय आहेत याला प्राधान्य द्या. हेच गुर्‍हाळ किती काळ चालवत रहाणार? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अगदी बरोबर बोललात घाटपांडे साहेब. अतिशय क्षुल्लक गोष्टींवरून वाद उकरून काढायचे आणि त्यांवर भांडत बसायचे ही खोडच आहे 'संभाजे ब्रिगेड' आणि 'मराठा सेवा संघ' या संस्थांना. आता वितंडवाद घालून इतिहास बदलणार आहे का? किंवा कुणाचीही सरशी झाली तरी त्याने आपल्या आताच्या समस्यांवर उत्तरे मिळणार आहेत का? वर्तमानातल्या समस्या आणि भविष्यातली स्वप्ने लाथाडून भूतकाळाची भूते जिवंत करून काहीही उपयोग होणार नाही हे देखील कळत नाही या बिनडोक नेत्यांना आणि खोट्या अस्मितेची नशा चढवणार्‍या त्यांच्या निर्बुद्ध अनुयायांना. या संघटनांमधल्या ९९% लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास ओ की ठो माहित नाही आणि चालले दंडेलशाही करायला. आमच्या गावातही एका ब्राह्मण प्राचार्यावर असाच हल्ला केला होता 'संभाजी ब्रिगेड' च्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी. कारण अतिशय क्षुल्लक होते किंबहुना कारण नव्हतेच पण उगाच तमाशा करून दहशत निर्माण करायची या हेतूने तो हल्ला करण्यात आला होता. त्या मद्यधुंद रेड्यांमध्ये कित्येक त्या प्राचार्यांचे माजी विद्यार्थी होते. त्यांना 'शिवाजी' हा शब्द तरी व्यवस्थित लिहिता येईल की नाही इतपत त्यांच्या दिव्य ज्ञानाविषयी शंका होती. स्वतः शिवाजी महाराजांइतके नसू द्या पण काही तरी भव्य करायचे अशी स्वप्न नाही पडत या कार्यकर्त्यांना. कुठल्याही थोर व्यक्तींवर केवळ ती ब्राह्मण आहेत म्हणून अतिशय अश्लाघ्य पद्धतीने टीका करायची, मारहाण करायची आणि स्वतः शोध लावलेल्या सत्याची भलावण करायची एवढेच ते काय यांचे कतृत्व! खर तर खेडेकर, प्रवीण गायकवाड, अनंत चोंदे आणि विनायक मेटे यांच्यावर कायद्याने जमावबंदी आणि भाषणबंदी आणली पाहिजे. लोकांच्या मनात निष्कारण एकमेकांविषयी द्वेष पसरविण्याखेरीज हे नग दुसरं काहीच करत नाहीयेत. अतिशय घातक आणि विध्वंसक अशा प्रकारचे कार्य चालवले आहे या लोकांनी. असो. कधीतरी त्यांना आपण वाट चुकलेलो आहोत हे नक्की कळेल आणि त्यांच्या राजकारणातल्या आकांक्षा तर खचितच पूर्ण होणार नाहीत. शरद पवारांसारख्या पैशाने गबर (आणि सगळा मराठा समाज आपल्याच पाठीशी आहे असा फाजील आत्मविश्वास बाळगणार्‍या) राजकारण्याच्या इच्छा फलद्रूप नाही झाल्यात तिथे या बुजगावण्यांची काय कथा!! शरद पवार स्वतःला आणि त्यांचे समर्थक त्यांना खूप धूर्त आणि हुषार राजकारणी समजायचे. सोनिया गांधी शरदरावांपेक्षा १००० पटीने जास्त हुषार, मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणी सिद्ध झाल्या. आता या जन्मात तरी त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे सत्य आहे. त्याला कारण त्यांची राजकारणाची कुचकामी आणि गुळमुळीत शैली हेच होते. शिवाय जमीन, पैसा, गुंतवणूक इत्यादी बाबींवरून त्यांचे तसे नाव ही खराब झालेले आहेच. मागे एका प्रतिसादात मी वर्तवलेले सगळे अंदाज खरे ठरले आणि त्यातले एक शरदरावांविषयी होते. सोनिया गांधींनी कृतीचे राजकारण करून सत्ता पटकावली तर शरदरावांनी केवळ गुळमुळीत, दुटप्पी आणि बिनबूडाचे राजकारण केले म्हणून त्यांना आपटी खावी लागली. पुन्हा कृषीमंत्री पद देऊन खरं तर सोनियाने शरदरावांना भीक घालून गप्प केले आहे पण काही लोकांना त्यातही समाधान वाटते. त्यांना मत्स्योत्पादन मंत्रीच करतील की काय अशी मला शंका येत होती पण बाई हुषार आहेत हे खरे. आता शरदरावांचा आणि राष्ट्रवादीचा आवाज अधिकाधिक क्षीण होत जाणार हे नक्की. असो. त्यांना धडा मिळाला आणि तसाच या सगळ्यांना मिळेल आणि तो मिळावाच. तेच सर्व समाजाच्या दृष्टीने चांगले आहे. --समीर

"पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही. जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

In reply to by आम्हाघरीधन

जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे.
पंत गुरू नाहीतच याचे काही पुरावे देणार आहात का, पुन्हा कोणी, दोन-चार वर्षांत जे काही लिहिलं आहे तेच 'ऐतिहासिक दस्तऐवज' आहेत असं सांगणार आहात? संशोधकांनी (बाबासाहेब, निनाद बेडेकर इ.) यांनी पुरावे तपासून विधानं केली आहेत. आपल्याला कुठल्या कागदपत्रांमधे सापडलं हे सगळं? आणि आपण म्हणता हे खरं आहे तर एवढी वर्ष कुठे लपले होते हे पुरावे? एखाद्या माणसाने त्याचा गुणी शिष्य मोठा व्हावा यासाठी झटून प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची कोणी प्रशंसा केली तर ती चूक? उद्या सचिन मोठा फलंदाज आहे हे म्हणताना काय रमाकांत आचरेकरांना वाईट ठरवणार आहात का, का आचरेकरांनी काही शिकवलंच नाही सचिनला? डून स्कूलमधे काल जल्लोष झाला कारण तिथले चार माजी विद्यार्थी मंत्री झाले. त्या चौघांनी आपल्या कार्यकालात अनेक चांगली कामं केली तर काय डून स्कूल खराब आहे असा आरडाओरडा करायचा का, का या लोकांच्या चांगल्या कामात डून स्कूलचा काय वाटा असा प्रश्न विचारणार आहात? प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं! शिवाय 'असे मानायला जागा आहे' असं आपण म्हणता; खात्रीपूर्वक असं विधान आपण करू शकत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं! व्वा ! क्या बात कही !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम ! अवांतर :- पण या लोकांना कळेल तर ना ? :B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रति, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब, प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं! जर दादोजी खरोखरच गुरु असते तर आमची काहीही हरकत नव्हती. मात्र ते गुरु नसतांना त्यांना गुरुपदी बसविण्याचा जो अट्टाहास केला गेला त्याला हरकत आहे आमची. कुणाला जर पुरावे हा प्रकार कळतच नसेल तर व्यर्थ आहे हा वाद. असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तुमचे तथाकथित शिवशाहिर त्याला उपस्थित राहिले नाहित. काही उत्तर देवु शकले नाहीत. 'पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण?'. जय जिजाऊ

In reply to by आम्हाघरीधन

१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय? २. इतकी वर्षे दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु होते हा इतिहास महाराष्ट्राला (आणि मराठ्यांना) चालत होता; आता अचानक काही वर्षात तो खोटा कसा काय वाटायला लागला. ज्यांनी हे संशोधन केले त्यांच्या संशोधनाच्या सत्यतेची आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांची सत्यता काय? ती कुणी पडताळून पाहिली? ३. आणि दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असे क्षणभर मानले तरी त्याने आपल्या आत्ताच्या जगण्यात काय फरक पडतो? त्याने शिवाजी महाराजांची राजा म्हणून योग्यता १०० पटींनी वाढते काय? ४. आणि दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हटले (जे खरे आहे) तर त्यामुळे शिवाजी महाराजांची एक धडाडीचा राजा म्हणून योग्यता लगेच कमी होते का? ५. इतिहास हा इतिहास असतो; त्याला बदलता येत नसते. त्यातून उपयुक्त धडे घेऊन पुढे जायचे असते. असं असतांना 'मराठा विकास मंचा'ला "दादोजी कोण होते" असे चर्चासत्र आयोजित करण्याचा रिकामटेकडा उद्योग कुणी सांगीतला होता? त्या चर्चासत्रातून काय साध्य होणार होते? असल्या चर्चासत्रांकडे तसल्याच संघटनांच्या लोकांखेरीज कुणी ढुंकूनही बघत नसतांना फक्त जातीय द्वेष पसरविणे या उद्देशाखेरीज दुसरा कोणता उद्देश या चर्चासत्रांमुळे साध्य होतो? ६. असल्या निरुद्योगी आणि निरुपयोगी चर्चासत्रात भाग घेऊन वाद आणखी वाढवणे योग्य वाटले नसावे म्हणूनही कदाचित बाबासाहेबांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे आणि ते योग्यच आहे. शिवाय पुन्हा कुणी हल्ला-बिल्ला केला तर काय करावे अशी भीती देखील त्यांना वाटले असावी जे की रास्तच आहे. शेवटी असल्या फालतू चर्चासत्रांपेक्षा कुणालाही जीव प्यारा असतो. ते तर काही मद्यधुंद कार्यकर्त्यांना हाणामारी आणि गुंडगिरी करण्यासाठी घेऊन येऊ शकले नसते आणि ते त्यांच्या शिवसंस्कृतीमध्ये कधीच बसले ही नसते. ७. ब्राह्मणांना जर ब्राह्मणेतर थोर पुरुषांविषयी अभिमान आणि आदर वाटू शकतो तर या संघटनांच्या लोकांना थोडी सभ्यता दाखवणे एवढे जड का जावे? इतकी संकुचित मनोवृत्ती का आहे यांची? आयुष्यभर शिवरायांच्या चरणी आपल्या बुद्धीची आणि श्रमांची सेवा अर्पण करणारे बाबासाहेबच आहेत; खेडेकर, मेटे, गायकवाड किंवा चोंदे नाहीयेत. बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास आणि विचार जेवढा जागता ठेवला आणि त्याचा जेवढा प्रचार आणि प्रसार केला त्याच्या अर्धा टक्का तरी या सगळ्या मुजोर लोकांनी केला आहे काय? भांडणांखेरीज आणि गुंडगिरीखेरीज या लोकांनी काय दिवे लावले आहेत? --समीर

In reply to by आम्हाघरीधन

असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते हा मराठा विकासमंच म्हणजे काय सरकार आहे काय? आलेत मोठे मराठा विकास मंचवाले. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by आम्हाघरीधन

मिपावर मागे दादाजी कोंडदेव गुरु आहेत का यावर चर्चा झाली होती तो धागा मला प्रयत्न करुनही सापडेना. 'शिवाजी राजांचे गुरु कोण' या उपक्रमवरील चर्चेत मागेच आमचे मत मांडले आहे. असो, इतिहासातील अपूर्‍या दस्तऐवजांचा स्वतःच्या फायद्यासाठी अर्थ काढण्याचा सध्याचा काळ आहे. केवळ जातीचे चूकीचे संदर्भ अर्थ लावून आपण ऐतिहासिक व्यक्तींना आपल्या खूज्या विचारांनी खूजे करतोय. असे मला तरी वाटते. बाकी चालू द्या ! -दिलीप बिरुटे

शिवाजी महाराज कुणाचे? माझेत. :) ___________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय? अहो महाशय, भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही. साळुंके किस झाड की पत्ती.... कुठल्या तरी सत्य कि असत्य नारायणाची पुजा केल्याने बुडालेले जहाज वर येते असे ऐकले आहे..... खरे किती छान कथा आहे...... टायटानिक वर आणायला किती घालावे लागतील सत्य नारायण? दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

In reply to by आम्हाघरीधन

महाशय, तुमच्या या प्रतिसादातल्या भाषेवरूनच तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी किती अनाठायी द्वेष आहे हे दिसून येते. भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही. इथे कुणीच जातीवरून बोलत नाहीये. माझा स्वतःचा आक्षेप आहे तो खेडेकर वगैरेंसारख्या निरुद्योगी लोकांवर आणि त्यांनी पोसलेल्या ब्राह्मणद्वेषावर. माझ्या लिखाणात मी कुठेही मराठा जातीला काहीही बोललेलो नाही कारण मला माहिती आहे हा सगळा प्रकार दोन-चार निरुद्योगी लोकांमुळे घडून येत आहे. मराठा जातीचा यात काहीही संबंध नाही. किंबहुना माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे मी स्वतःला देखील मराठा समजतो हे तुम्हाला ठाऊक असेलच. शिवाय माझ्या लेखात मी ब्राह्मणांचे दोष देखील दाखवलेले आहेत. माझे स्वतःचे कित्येक मित्र अस्सल ९६ कुळी मराठा आहेत आणि त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आचार-विचारांविषयी मला खूप आदर आहे. हे जर सगळे असे आहे तर हे तुमच्या लक्षात येऊन तुम्ही असली बिनबुडाची सरळ-सरळ जातीवरची विधाने टाळली पाहिजेत. बरं, तुम्ही जे लिहिता त्यासाठी तुमच्याकडे पुरावे नसतातच. मी मांडलेल्या एकाही मुद्यावर तुमचा एक ही तर्कशुद्ध प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना कुणाच्याच बिनतोड मुद्यांवर तुम्ही भाष्य करत नाहीत. केवळ काहीतरी लिहून खर्‍या मुद्यांकडे दुर्लक्ष करता. याला चर्चा नाही म्हणत; रडीचा डाव म्हणतात. ब्राह्मणांनी असे कुठले लिखाण केले आहे सांगा बरे? उलटपक्षी साळुंकेंसारख्या अतिविद्वान लेखकांनीच असले फालतू लिखाण करून वादाला तोंड फोडले आहे. काय संशोधन आहे त्यांचे? बाबासाहेबांच्या अर्धा टक्का तरी व्यासंग आहे का त्यांचा? बाबासाहेबांप्रमाणे त्यांनी आयुष्य शिवचरणी वाहिलेले आहे काय? ब्राह्मणांनी कधीच असे फूट पाडणारे आणि समाजाची वीण सैल करणारे, समाजात जाती-जातींविषयी विष पेरणारे लेखन केलेले नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. नुसते सरसकट विधान केले म्हणून ते खरे ठरत नाही. एवढी चर्चासत्रे घडवून आणता; निदान एका मुद्यावर तरी तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक मत द्या. तसे होणार नसेल तर मग या चर्चेला काहीही अर्थ नाही आणि यातून एकच निष्कर्ष काढता येईल की या संघटनांचा आणि त्यांच्या विघ्नसंतोषी नेत्यांचा ब्राह्मणांना त्रास देणे याखेरीज दुसरा कुठलाही हेतू नाही. विनाकारण गुंडगिरी करून समाजाची शांतता भंग करणे; सरळमार्गी ब्राह्मणांना धमकावून, मारून-धोपटून खाली दाबणे आणि स्वतःची शून्य कर्तबगारी असतांना, अर्धवट ज्ञान असतांना आरडा-ओरडा करून लक्ष वेधून घेणे हेच यांचे उद्दिष्ट आहे असे सिद्ध होते. काहीतरी विधायक काम करून सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन पुढे जाणे जमत नसेल तर असल्या बाष्कळ विषयांवरून निदान आपल्या राज्यातली शांतता तरी भंग करू नका. --समीर

छत्रपती शाहु महाराजांनी विश्वासाने राज्यकारभार एका ब्राम्हणाच्या हातात दिला. आणि तो पेशव्यांनी (ब्राम्हणांनी) जवळ्पास १०० वर्ष चालवला हा इतिहास मेट्यांना माहीत नाही काय? मराठयांपेक्षा ब्राम्हणांनी महाराष्ट्राचा जास्त वर्ष कारभार सांभाळला (छत्रपतींना योग्य तो मान देऊन) हे मेटे सोयिस्कर विसरतात.

आता ब्राम्हण श्रेष्ठ की मराठा श्रेष्ठ ह्यावर आली आहे. संपादक जागे असतील तर ती इथेच थांबवावी. जातपाती मुळे महाराष्ट्राचे अगोदरच खुप नुकसान झाले आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

चर्चा इथेच थांबवावी. अन्यथा धागा अप्रकशित केला जाईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपल्याला खुप आवडली. इतका गहनपणे चर्चा केल्याबद्दल सर्वांचे आभार.संपादक मंडळाला कळकळीची विनंती आहे की हा धागा अप्रकशित करू नये उलट वाढवावा यातून चांगले ज्ञान मिळेल आणि आमच्यासारख्या अभ्यासू वाचकांना चिकित्सा करण्यात अधिक मदत होईल तेव्हा अजुन चालू धावे.

व्हॉल्टेअरचं एक वाक्य............History is fables agreed upon.

मी लिहिलेला शेवटचा प्रतिसाद नाहीसा झाला म्हणून हा प्रतिसाद पुन्हा देत आहे. माझ्यापुरता हा विषय मी इथे संपवला आहे. या लेखाचा उद्देश जातींवर घसरून जातीवाचक द्वेष ओकण्याचा नव्हता. मी स्वतः कुठेच (लेखात आणि माझ्या प्रतिसादांमध्ये) मराठा जातीवर कुठलीच टीका केलेली नाही. 'संभाजी ब्रिगेड' आणि 'मराठा सेवा संघ' किंवा तत्सम संघटनांनी गुंडगिरीद्वारे जी दडपशाही चालवलेली आहे त्याला आणि तसल्या वृत्तीला माझा विरोध आहे. त्यांच्या नेत्यांना (खेडेकर, मेटे वगैरे) थोडी तरी समज यावी हाच या लेखाचा हेतू. सगळ्याच जातींमध्ये काही गुण असतात आणि काही दोष असतात. ब्राह्मण जात देखील याला अपवाद नाही. असे असेल तर सगळ्यांनी सामोपचाराने एकत्र येऊन आणि एकदिलाने आपला महाराष्ट्रधर्म वाढवणे आणि एका उत्तुंग पातळीवर नेण्यासाठी धडपड करणे हे सगळ्या मराठीजनांचे आद्य कर्तव्य आहे. जातींसारख्या क्षुल्लक गोष्टींवरून आपल्या आजच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि सगळ्यांचे जीवन अधिकाधिक सुसह्य करण्याच्या विधायक प्रयत्नांमध्ये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच! इतिहासातील्या आणि कालौघातील विखुरलेल्या सुवर्णक्षणांना हातात पकडून त्यांची झळाळी कमी करण्याच्या प्रयत्न करणे म्हणजे कालांतराने हात भाजून घेण्यासारखे आहे. क्षुल्लक गोष्टींवरून वितंडवाद घालणे, गुंडगिरी करणे, स्वतःला शून्य ज्ञान असतांना काही सन्माननीय लोकांना केवळ जातीच्या आधारावर नालायक ठरवून अकारण त्रास देणे, कसली तरी बिनबूडाची चर्चासत्रे घडवून त्यातून द्वेषाची भावना अधिक भडकावणे इत्यादी गोष्टींनी समाजाची शांतता भंग पावते आणि अकारण जातीजातींमध्ये फूट पडते जे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अजिबात चांगले नाही. काल-परवाच्या दैनिक सकाळ (पुणे आवृत्ती) मध्ये पहिल्या पानावर महाराष्ट्रातील घटलेल्या मराठी टक्क्याची बातमी आलेली आहे. महाराष्ट्रातला मराठी टक्का ७५% वरून ६८.८% वर आलेला आहे आणि हिंदीभाषिक परप्रांतीयांचा टक्का ५% वरून ११% वर गेलेला आहे. ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आज कित्येक भाग असे आहेत जिथे हिंदी बोलल्याशिवाय काम होत नाही. औंध, बाणेर, पिंपळे सौदागर, विश्रांतवाडी, वानवडी, फातिमानगर, कोंढवा, औंधगाव, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, चांदणी चौक, वाकड, हिंजवडी आदी नुकतीच हिंदीप्रभावित झालेली ठिकाणे एके काळी अस्सल मराठी गांवे होती. ही परिस्थिती नक्कीच भीतीदायक आहे आणि याचा आत्ताच काहीतरी नायनाट करायला हवा. उद्या सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ इथेही हिंदी बोलावे लागेल आणि पुण्याचे अलगद मुंबई होईल. कुठल्याच स्वतःला मराठी म्हणविणार्‍या माणसाला हे रुचणार नाही. काही वर्षांनंतर पुण्यातली मराठी कुटुंबे फक्त घरातच मुंबई धरतीचे ओबडधोबड मराठी बोलतील आणि बाहेर मुंबई धरतीचेच अशुद्ध आणि लाचारीमिश्रित हिंदी बोलतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांनी एकत्र राहून मराठीची शान वाढवली पाहिजे हीच आशा आणि अपेक्षा! जय शिवाजी, जय महाराष्ट्र!! --समीर

आम्हा घरी धन कडे कुठलेच कनव्हिंसिंग मुद्दे नाहियेत. त्यामुळे तोंडाला येईल ते तो बरळ्तोय. मला वाटतय त्याच्या प्रतिसादाला आता कोणीच उत्तर देऊ नये म्हणजे तो गप्प बसेल. समीर सूर चा लेख छान वाटला. धन्यवाद.

रामदास आणि दादो़जी ह्याना जोपर्यन्त शिवरायान्च्या गुरुपदी बसविण्याचा उद्योग काही वर्णवर्चस्ववादी (म्हणजे ब्राह्मण नव्हे..) करत राहतिल....तोपर्यन्त ही लढाई वाढतच जाईल....

मक्या राव , तुमच्या कोल्हे कुईत सामिल झालो म्हणजेच कनव्हिंसिंग मुद्दे मांडले आहेत असे होत असेल तर ठिक आहे चालु द्यात तुमची कोल्हे कुई.... खाली दिलेली लिन्क जरा बघा आणि मग प्रतिक्रिया द्या. http://epaper.dnaindia.com/epaperimages/04062009/d31434594-3Pune%20Main… तुम्ही स्वतः वर्ण वर्चस्व जातियवादी पणा दाखवायचा अन आम्हाला जातियवादी म्हणायचे हे मात्र ठिक नाही. खरे बोललं की बरं वाटत नाही अन बरं बोललं की खरं वाटत नाही. मी खरं बोललो ते तुम्हाला काही बरं वाटलेलं दिसलं नाही. या पुढे या विषयावर कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं संपादकांनी बजावलेलं असतांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे विशेष.

मक्या राव , तुमच्या कोल्हे कुईत सामिल झालो म्हणजेच कनव्हिंसिंग मुद्दे मांडले आहेत असे होत असेल तर ठिक आहे चालु द्यात तुमची कोल्हे कुई.... खाली दिलेली लिन्क जरा बघा आणि मग प्रतिक्रिया द्या. http://epaper.dnaindia.com/epaperimages/04062009/d31434594-3Pune%20Main… तुम्ही स्वतः वर्ण वर्चस्व जातियवादी पणा दाखवायचा अन आम्हाला जातियवादी म्हणायचे हे मात्र ठिक नाही. खरे बोललं की बरं वाटत नाही अन बरं बोललं की खरं वाटत नाही. मी खरं बोललो ते तुम्हाला काही बरं वाटलेलं दिसलं नाही. या पुढे या विषयावर कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं संपादकांनी बजावलेलं असतांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे विशेष.

In reply to by आम्हाघरीधन

च्यामारी एकच प्रतिसाद तीन वेळा पोस्टवला म्हणजे खरे वाटेल लोकांना असे वाटते की काय तुम्हाला? सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085

In reply to by विशाल कुलकर्णी

आता.... सर्व्हर ची चुक असेल तर त्याला मी काय करणार.... दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

मक्या राव , तुमच्या कोल्हे कुईत सामिल झालो म्हणजेच कनव्हिंसिंग मुद्दे मांडले आहेत असे होत असेल तर ठिक आहे चालु द्यात तुमची कोल्हे कुई.... खाली दिलेली लिन्क जरा बघा आणि मग प्रतिक्रिया द्या. http://epaper.dnaindia.com/epaperimages/04062009/d31434594-3Pune%20Main… तुम्ही स्वतः वर्ण वर्चस्व जातियवादी पणा दाखवायचा अन आम्हाला जातियवादी म्हणायचे हे मात्र ठिक नाही. खरे बोललं की बरं वाटत नाही अन बरं बोललं की खरं वाटत नाही. मी खरं बोललो ते तुम्हाला काही बरं वाटलेलं दिसलं नाही. या पुढे या विषयावर कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं संपादकांनी बजावलेलं असतांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे विशेष.