सहज मात्र (त्याच्या दृष्टीतून)
प्रेरणा: सहज मात्र
सहज लिहून पाठवतो मी
जे सुचतं माझ्या मनात
तुझ्या मौनाचा अर्थ कळत नाही
शब्द शोधत राहतो मी मात्र...
सहज विचारतो तुला कधी
अन् म्हणतो, "येशील का?"
तू येशील या आशेवरती
वाट पाहत राहतो मी मात्र...
सहज गातो गाणे
कधी तुझ्यासाठी सूर छेडतो
तुझ्या डोळ्यांत दडलेलं
गाणं वाचत राहतो मी मात्र...
सहज येऊन बसतो समोर
अन् बोलतो असंच काही
तुझ्या नजरेत हरवून जातो
बोलायचं राहून जातं मात्र...
अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असतील
तुझ्या मनात काय उमटलं
जाणू शकलो नाही मात्र...
तुझ्या मौनाला मौन समजलो
भाव तुझे वाचलेच नाही
तुला सहज वाटणाऱ्या क्षणांनी
माझंही जग बदललं मात्र...!!
- कांदा लिंबू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
60
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! कांदा लिंबू जी
प्रेरणा जरी माझ्या कवितेची असली तरी मी तुमची कविता वेगळी रचना म्हणूनच वाचली आणि खरंच आवडली. मस्तच
अप्रतिम!
अप्रतिम!
आरे वा आज मस्त वातावरण…
आरे वा आज मस्त वातावरण जमलंय कवितेचे
तुझ्यासाठी लिहून पाठवतो…
तुझ्यासाठी लिहून पाठवतो
आठवून साठवून माझ्या मनात
तू मात्र मौन राहतेस
समजून वाचलेलं सहज मात्र...
साथ हवी म्हणून विचारतो तुला
अन् म्हणतो, "येशील का?"
तू मात्र घुटमळत राहतेस
समजून विचारलेलं सहज मात्र...
तू आहेस तर गाणे आहे
तुझ्या अस्तित्वानेच ताल सूर
तुला मात्र वाटत राहते
गाणेही माझे सहज मात्र...
खूप बोलायचं असतं
पण बोलून जातो वेगळंच काही
तू हसण्यावारी नेतेस
बोलणंही माझं सहज मात्र...
माझं सहज नाहीच काही
पण दाखवतो सहज आहे जसं
सहजा सहजी दोघांचंही
जगणं बदलून गेलंय मात्र...
अजून एक नवीन सुंदर काव्य!
In reply to तुझ्यासाठी लिहून पाठवतो… by श्वेता व्यास
अजून एक नवीन सुंदर काव्य!
वा! श्वेता
In reply to तुझ्यासाठी लिहून पाठवतो… by श्वेता व्यास
ही पण रचना आवडली...
छान!!
भारी...
In reply to तुझ्यासाठी लिहून पाठवतो… by श्वेता व्यास
मस्त..
पैजारबुवा,
मस्त आहे. विडंबन नसून नवीन…
मस्त आहे. विडंबन नसून नवीन काव्य आहे.
अगदी सहज....
सगळ काही सहज असतं
तर संशोधन केलं नसतं
कांदेपोहे खाऊन मात्र....
वजन वाढवलं नसतं🤣
मस्त...
आज वाचत राहतो मात्र....
पैजारबुवा,