Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 16/10/2026 13:21 या दिवशी प्रकाशित केले.

पेरणा-  https://www.misalpav.com/poem/54130

 

रूतते कोपरखळी सहज

सुट्टिच्या धुंद पहाटे

फुलतो वसंत मनात.

चहा कर ना गडे! कानी येते  मात्र.... !!

 

सहज करून जातेस,

सुग्रास,सुंगध दरवळतो

सहज उदर भरण होते !

उरतो  लोभी मनाचा ,धुसफुसता हिशोब मात्र...!!

 

सहज फिरावया नेतेस 

किती छान पोत,पदर आहे!

विचारतेस सहज,रंग कसा दिसतो?

कातरी खिशाला,काही हजार मात्र....!!

 

सहज, जागल्या आशा मनात 

जागवू कोजागिरीची रात.

देऊन केशरी दुधाचा प्याला

तू बघतेस "बिग बाॅस",मात्र.....!!

 

अशा अनेक सहज गोष्टी

सहजपणेच केल्या असशील

त्यानंतर जागणे माझे

सहज राहिले नाही मात्र...!!

 

 

ता.क.- स्वप्नात पाहिलेले,

            सत्यात का उतरावे?

             स्वप्नातल्या कळ्यांना,

              फळ का म्हणून यावे.........!!

लेखनविषय:

वाचने 139
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सहज फिरावया नेतेस 

किती छान पोत,पदर आहे!

विचारतेस सहज,रंग कसा दिसतो?

कातरी खिशाला,काही हजार मात्र....!!

 

सहज, जागल्या आशा मनात 

जागवू कोजागिरीची रात.

देऊन केशरी दुधाचा प्याला

तू बघतेस "बिग बाॅस",मात्र.....!!

 

😂

 

 


लैच भारी जमलंय विडंबन.

स्वप्नातल्या कळ्यांना,

              फळ का म्हणून यावे.........!!

आणि काटे तरी  कसे, 

 गादीत का रुतावे.


रूतते कोपरखळी सहज

सुट्टिच्या धुंद पहाटे

फुलतो वसंत मनात.

चहा कर ना गडे! कानी येते  मात्र.... !!

 

लैच बुवा अरसिक तुम्ही कर्नलसाहेब....

 

रूतते कोपरखळी सहज

सुट्टिच्या धुंद पहाटे

फुलतो वसंत मनात.

अन कृतार्थ होती गात्र...

मी बुवा असे लिहीले असते...

 

पैजारबुवा, 

 


पैजारबुवा, उम्र का तकाजा है....

 

गए दिन समझने परखने के 'साज़'

ये मौसम तो बस मान जाने का है

 


पहिल्या तीन ओळींत वाचकाला स्वप्नील कल्पनाविश्वाची रमणीय सफर घडवत असतानाच चौथ्या ओळीत त्याला एकदम रुक्ष वास्तवात आणून आदळणाऱ्या या चार-चार ओळींची रचना आवडली. 

 

शेवटचा ता क मात्र अगदी #FeelingPhilosophical अनुभव देऊन गेला!