Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 11/10/2026 09:02 या दिवशी प्रकाशित केले.

डिस्क्लेमर-:

सणासुदीच्या काळात अन्न पदार्थातली भेसळ, अस्वच्छता आणी ग्राहकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्या साठी जो स्वच्छता अभियान FDA ने चालू केलेला आहे त्यामधून प्रेरणा मिळाली आणी काही ओळी सुचल्या.

कृपया राजकारण शोधू नये.

कुणाला मिर्ची लागली तर कवी जबाबदार नाही.

FDA कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणी मनपूर्वक आभार.

 

दाटला तिमिर घोर अंधार
उंदीर-झुरळे पाली,
निशाचरांची मांदियाळी 
सांदीकोपऱ्यात झाली.

थांबला चकचकाट होता,
घमघमाट सुटला होता.
पाहून त्या उदंड राशी,
जिव्हां लपलपत होत्या.

वल्गना अन् पोकळ गप्पांत,
नवी सत्ता फुलली होती.
जणू,निर्बंध सत्ता मिळाली.​
तशी निशाचरे उद्दंड झाली;

तेव्हढ्यात एक साप आला,
तो निघाला त्यांचा बाप .
माजली एकच भगदड,
मैदान जाहले साफ.

गोठल्या वल्गना कंठी
गर्जना विरून गेल्या.
पाहून बेतुक्याची सेना,
निशाचरे गर्भगळित झाली

उद्दंड निशाचरांच्या,
झुंडी सैरभैर झाल्या,
उचलून चंबुगबाळे सारे,
बेतुक्याच्या सेना निघून गेल्या!

--बेतुक्या भडभुंजा. 


वाचने 274
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

ज्येष्ठ मिपाकर म्हणून  आपण आमच्या अभिव्यक्तीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.  

 

बाकी, 

ज्या की रही भावना जैसी | तीन मूरत देखी तैसी ||

 

मुळ उद्देश FDA च्या कार्याचे कौतुक करणे हाच होता. 

 

बाकी, आता डिस्क्लेमर मधे एक आणखीन कलम जोडावे लागणार असे वाटते.

नवे कलम.....

लेख,कवितेच्य  विषयवस्तू मधे अन्य  गोष्टीशी साधर्म्य भासले तर तो निव्वळ  योगायोगच  समजावा ही विनंती.


बेतुक्याची भडभुंजेगिरी आवडली.  

जणू, निर्बंध सत्ता मिळाली.​

इथे 'अनिर्बंध' सत्ता मिळाली, असे हवे ना ?


In reply to by चित्रगुप्त

प्याद्याला कुठे अनिर्बंध  सत्ता असते त्याचा बोलविता धनी वेगळाच असतो. 

 

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.