Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 11/10/2026 09:02 या दिवशी प्रकाशित केले.

डिस्क्लेमर-:

सणासुदीच्या काळात अन्न पदार्थातली भेसळ, अस्वच्छता आणी ग्राहकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्या साठी जो स्वच्छता अभियान FDA ने चालू केलेला आहे त्यामधून प्रेरणा मिळाली आणी काही ओळी सुचल्या.

कृपया राजकारण शोधू नये.

कुणाला मिर्ची लागली तर कवी जबाबदार नाही.

FDA कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणी मनपूर्वक आभार.

 

दाटला तिमिर घोर अंधार
उंदीर-झुरळे पाली,
निशाचरांची मांदियाळी 
सांदीकोपऱ्यात झाली.

थांबला चकचकाट होता,
घमघमाट सुटला होता.
पाहून त्या उदंड राशी,
जिव्हां लपलपत होत्या.

वल्गना अन् पोकळ गप्पांत,
नवी सत्ता फुलली होती.
जणू,निर्बंध सत्ता मिळाली.​
तशी निशाचरे उद्दंड झाली;

तेव्हढ्यात एक साप आला,
तो निघाला त्यांचा बाप .
माजली एकच भगदड,
मैदान जाहले साफ.

गोठल्या वल्गना कंठी
गर्जना विरून गेल्या.
पाहून बेतुक्याची सेना,
निशाचरे गर्भगळित झाली

उद्दंड निशाचरांच्या,
झुंडी सैरभैर झाल्या,
उचलून चंबुगबाळे सारे,
बेतुक्याच्या सेना निघून गेल्या!

--बेतुक्या भडभुंजा. 


वाचने 19
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया