Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 01/10/2026 09:53 या दिवशी प्रकाशित केले.

गणेशाने,पप्पांच्या आठवणी लिहिल्या त्या वाचून मन हळुवार झाले. मलाही माझ्या आईची आठवण झाली. वडिलांनी लवकर एक्झीट मारल्यामुळे आमचे घर  एक खांबी तंबू  मधे बदलले. आता ,रथाचे एक चाक निसटल्यावर जी फरपट होते त्याचे काय वर्णन करू. परंतू आई ने तो शकट नेटाने चालवला आणी आम्हांला घाटातून पार केले. जास्त  काय लिहू तर खालील शब्द सुचले. ..........

 

या आगोदर  असाच भावूक  झालेला असताना दोन मुक्तके लिहून आपल्या बरोबर मन हलक केले.

 

 https://www.misalpav.com/story/52183

https://www.misalpav.com/story/50553

 

बहिणाबाई म्हणू का झाशीची राणी!

आठव तुझी आणी डोळ्यांमधे पाणी

 

देव गेले देवासनी आणी उंबरा सोडला

जग जिंकल्याव  तुझा वारू ग थांबला

 

फाटक्या पदरी झाकले आभाळ

निगुतीने केला तू माझा सांभाळ

 

कमी पडलो, नाही फेडू शकलो ग पांग

ऋणातून तूझ्या कशी उतराई सांग

 

धन्य तुझी कोख धन्य तुझी माया

पडती कमी जरी गेले सात जन्म वाया

 

ऋणी तुझ्या धन्य, ऋणीच मान्यता

बाकी सारी ऋणं वाटती अन्यथा......

 

झाली अक्षरे धुसरं डोळा आले पाणी 

किती सांगू आठवणी थकते ग ,वाणी...... -

 

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 73
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

शब्दांत वर्णन करता न येणाऱ्या गोष्टी आहेत काही. तुम्ही साधलंय.

[ गणेशाशी फोनवर बोललो आहे मागे दोनदा. त्याचेही बोल आवडतात.]