Skip to main content

फिफा विश्वचषक २०२६ / FIFA World Cup 2026

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 13/06/2026 11:58 या दिवशी प्रकाशित केले.

फुटबॉलचं महायुद्ध दि. ११ पासून सुरू झालं. एकूण ४८ संघांचा सहभाग असलेले फुटबॉलचे सामने पुढे रंगत जातील. सध्या सामन्यांच्या वेळा आपल्या भारतीयांच्या अजिबात सोयीच्या नसतात. हायलाइट्सची व्यवस्था उरली नाही, त्यामुळे सामन्यांचा आनंद घेणे जिकिरीचे झाले आहे. अडतीस वर्षांचा मेस्सी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देतो का, ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तिकडे, एक्केचाळीस वर्षांच्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होते का, तेही पाहता येईल. आपण भारतीय फुटबॉलमध्ये कुठेच नसलो म्हणून काय झालं, आपण कोणत्या तरी संघाचे फॉलोअर्स असतोच.

mipa
 छायाचित्र फिफाच्या संस्थळावरुन. 

मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने सामन्याला सुरुवात झाली. मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला दोन-शून्याने हरवले. बाकी, तिकिटांचा घोळ, युद्ध, आंदोलने जगभर चालू आहेत, तरीही हा सोहळा १९ जुलैपर्यंत रंगणार आहे. अर्थात, भारतीय चाहत्यांना आपल्या लाडक्या मेस्सी, रोनाल्डो, नेमार, किलियन एम्बाप्पे, लामिन यमाल यांना खेळताना बघण्याची संधी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या लढती मध्यरात्री, भल्या पहाटे किंवा अगदी सकाळी असणार आहेत.

एक मिपाकर आणि भारतीय चाहता म्हणून आपलं प्रेम कायम ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल या संघांवर राहिलं आहे. जागतिक फुटबॉलमध्ये ब्राझीलइतके यश इतर कोणत्याही देशाला मिळालेले नाही. पाच वेळा विजेता असलेला ब्राझील संघ सध्या मागे पडला आहे. यामुळे ब्राझीलचे चाहते अजूनही आपल्या संघाच्या सुवर्णकाळाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. स्पेन नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. अनेक उत्कृष्ट तरुण खेळाडू तयार करून आणि युरोपमध्ये एक मजबूत संघ म्हणून टिकून राहूनही, त्यांना दुसरा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ब्राझील आणि स्पेन भूतकाळातील आठवणींचा मागोवा घेत असतील, तर अर्जेंटिनाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या दक्षिण अमेरिकन देशाने २०२२ मध्ये कतार येथे मेस्सीच्या फुटबॉल इतिहासातील एका अत्यंत संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवून वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. आता, अर्जेंटिनाचे ध्येय जेतेपद राखण्याचे असेल. विजेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, हॉलंड, नॉर्वे, बेल्जियम हे संघदेखील असतील. यावेळी कुठला संघ बाजी मारणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आता जास्त उमटत आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इराणच्या तिन्ही साखळी लढती अमेरिकेत होणार आहेत. त्या लढतींच्या दिवशीच इराणचा संघ अमेरिकेत येईल, असे सुरुवातीस अमेरिकेने सांगितले होते. परवानगी देणे-न देणे, तात्यांची हुकूमशाही आणि सद्यस्थिती पाहता खेळापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींची चर्चा जास्त असेल.

फुटबॉलचे सामने जमेल तसे पाहत राहू. सध्या फुटबॉल सामन्यांच्या हायलाइट्सची व्यवस्था नाही, म्हणून सर्वत्र बोंब आहे; तरीही आपण मिपाकर जमेल तसे सामन्यांवर, सामन्यांतील घटनांवर लिहीत-बोलत राहू. (धागा अपडेट करत राहीन)

फिफा विश्वचषक २०२६ - GROUP STAGE

GROUP A
Mexico • South Africa • Korea Republic • Czechia
GROUP B
Canada • Bosnia and Herzegovina • Qatar • Switzerland
GROUP C
Brazil • Morocco • Haiti • Scotland
GROUP D
USA • Paraguay • Australia • Türkiye
GROUP E
Germany • Curaçao • Côte d'Ivoire • Ecuador
GROUP F
Netherlands • Japan • Sweden • Tunisia
GROUP G
Belgium • Egypt • IR Iran • New Zealand
GROUP H
Spain • Cabo Verde • Saudi Arabia • Uruguay
GROUP I
France • Senegal • Iraq • Norway
GROUP J
Argentina • Algeria • Austria • Jordan
GROUP K
Portugal • Congo DR • Uzbekistan • Colombia
GROUP L
England • Croatia • Ghana • Panama

वाचने 1639
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

काल इजिप्त हरले त्यांच्या खेळाडूंच्या काही  शॉर्ट व्हीडीयो मधे फीफा पंच यांनी आमच्यावर अन्याय केला, अर्जेंटीनालाच जर जिंकवायचे होते तर आम्हाला कशाला बोलावले वगैरे सुरु झालं.

अरे देवा...!

 

-दिलीप बिरुटे

 


किंवा सुधारणा करायला हवी. 

तसेच कुणाच्या पासवर डोक्याने मारलेल्या चेंडूवर गोल बाद ठरवला तर मजा येईल. पायानेच खेळा. डोक्याने चेंडू अडवता आला तर ठीक. पण गोल बाद.


बर त्या नॉर्वे संघाची, त्यांच्या बोट वलव्हण्याची  खुप हवा आहे सध्या!!!

अंतिम सामना अर्जेंटिना वि. नॉर्वे पाहिजे, मजा येईल 😅


In reply to by Bhakti

जुन्या काळी जेव्हा वायकिंग योद्धे मोहिमांवर निघत तेव्हा आपल्या लाँग शिप अशाच प्रकारे हाकत खुल्या समुद्रात, ड्रम आणि तुतारी (व्हायकिंग हॉर्न) फुंकत त्याच्या तालावर

Odins-Treasures-how-the-viking-smade-their-ships वायकिंग लाँग शिप 61-Ms-PTDpuu-L-AC-UF1000-1000-QL80 वायकिंग रणशिंग