Skip to main content

फिफा विश्वचषक २०२६ / FIFA World Cup 2026

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 13/06/2026 11:58 या दिवशी प्रकाशित केले.

फुटबॉलचं महायुद्ध दि. ११ पासून सुरू झालं. एकूण ४८ संघांचा सहभाग असलेले फुटबॉलचे सामने पुढे रंगत जातील. सध्या सामन्यांच्या वेळा आपल्या भारतीयांच्या अजिबात सोयीच्या नसतात. हायलाइट्सची व्यवस्था उरली नाही, त्यामुळे सामन्यांचा आनंद घेणे जिकिरीचे झाले आहे. अडतीस वर्षांचा मेस्सी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देतो का, ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तिकडे, एक्केचाळीस वर्षांच्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होते का, तेही पाहता येईल. आपण भारतीय फुटबॉलमध्ये कुठेच नसलो म्हणून काय झालं, आपण कोणत्या तरी संघाचे फॉलोअर्स असतोच.

mipa
 छायाचित्र फिफाच्या संस्थळावरुन. 

मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने सामन्याला सुरुवात झाली. मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला दोन-शून्याने हरवले. बाकी, तिकिटांचा घोळ, युद्ध, आंदोलने जगभर चालू आहेत, तरीही हा सोहळा १९ जुलैपर्यंत रंगणार आहे. अर्थात, भारतीय चाहत्यांना आपल्या लाडक्या मेस्सी, रोनाल्डो, नेमार, किलियन एम्बाप्पे, लामिन यमाल यांना खेळताना बघण्याची संधी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या लढती मध्यरात्री, भल्या पहाटे किंवा अगदी सकाळी असणार आहेत.

एक मिपाकर आणि भारतीय चाहता म्हणून आपलं प्रेम कायम ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल या संघांवर राहिलं आहे. जागतिक फुटबॉलमध्ये ब्राझीलइतके यश इतर कोणत्याही देशाला मिळालेले नाही. पाच वेळा विजेता असलेला ब्राझील संघ सध्या मागे पडला आहे. यामुळे ब्राझीलचे चाहते अजूनही आपल्या संघाच्या सुवर्णकाळाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. स्पेन नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. अनेक उत्कृष्ट तरुण खेळाडू तयार करून आणि युरोपमध्ये एक मजबूत संघ म्हणून टिकून राहूनही, त्यांना दुसरा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ब्राझील आणि स्पेन भूतकाळातील आठवणींचा मागोवा घेत असतील, तर अर्जेंटिनाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या दक्षिण अमेरिकन देशाने २०२२ मध्ये कतार येथे मेस्सीच्या फुटबॉल इतिहासातील एका अत्यंत संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवून वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. आता, अर्जेंटिनाचे ध्येय जेतेपद राखण्याचे असेल. विजेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, हॉलंड, नॉर्वे, बेल्जियम हे संघदेखील असतील. यावेळी कुठला संघ बाजी मारणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आता जास्त उमटत आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इराणच्या तिन्ही साखळी लढती अमेरिकेत होणार आहेत. त्या लढतींच्या दिवशीच इराणचा संघ अमेरिकेत येईल, असे सुरुवातीस अमेरिकेने सांगितले होते. परवानगी देणे-न देणे, तात्यांची हुकूमशाही आणि सद्यस्थिती पाहता खेळापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींची चर्चा जास्त असेल.

फुटबॉलचे सामने जमेल तसे पाहत राहू. सध्या फुटबॉल सामन्यांच्या हायलाइट्सची व्यवस्था नाही, म्हणून सर्वत्र बोंब आहे; तरीही आपण मिपाकर जमेल तसे सामन्यांवर, सामन्यांतील घटनांवर लिहीत-बोलत राहू. (धागा अपडेट करत राहीन)

फिफा विश्वचषक २०२६ - GROUP STAGE

GROUP A
Mexico • South Africa • Korea Republic • Czechia
GROUP B
Canada • Bosnia and Herzegovina • Qatar • Switzerland
GROUP C
Brazil • Morocco • Haiti • Scotland
GROUP D
USA • Paraguay • Australia • Türkiye
GROUP E
Germany • Curaçao • Côte d'Ivoire • Ecuador
GROUP F
Netherlands • Japan • Sweden • Tunisia
GROUP G
Belgium • Egypt • IR Iran • New Zealand
GROUP H
Spain • Cabo Verde • Saudi Arabia • Uruguay
GROUP I
France • Senegal • Iraq • Norway
GROUP J
Argentina • Algeria • Austria • Jordan
GROUP K
Portugal • Congo DR • Uzbekistan • Colombia
GROUP L
England • Croatia • Ghana • Panama

वाचने 978
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

मी सुचवणार होतेच, कोणीतरी फिफा2026 धागा सुरू करा👍

 घरात दोन संघ झाले आहेत,मी मेसी तर लेक रोनाल्डोची चाहती आहे.

बाकी स्पर्धेतले सर्व विशेष फुटबॉल पाकिस्तानमधल्या सियालकोट फॅक्टरीत बनवले आहेत हे एक रील मधू  नव्याने समजले.


गावात क्रिकेट ते पण कामट्यांचे स्टंप लावून खेळलो आहे, फुटबॉल वगैरे शहरात येऊन बघितले त्यात पण झुळझुळीत ड्राय फिट कपडे, मागे नाव छापलेले, पायात spikes वगैरे घातलेली पोरे पाहून हा नाद श्रीमंतांचा असल्याचे मनाने घेतले ते आजवर घेतलेच आहे. फुटबॉल पाहताना सगळ्यात जास्त एकेकाळी आवडलेला खेळाडू म्हणजे डेव्हिड बेकहॅम, तो फुटबॉल पेक्षा त्याचा उमदा स्वभाव आमच्यासारखेच रॉयल एनफिल्ड किंवा तत्सम दुचाक्यांवर बोंबलत फिरायची हौस व्हिक्टोरिया प्रति त्याचे निस्सिम समर्पण आणि त्या दोघांनी उभे केलेलं स्वतःचं साम्राज्य ह्यासाठीच जास्त लक्षात राहिला.


हैती आणि स्कॉटलैंडचा मॅच सुरु आहे आणि पाहतोही आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्कॉटलॅंडने हाइड्रेशन ब्रेकच्या नंतर 28 व्या मिनिटाला गोल गेला.

1-0

 

-दिलीप बिरुटे


In reply to by श्रीगुरुजी

आज संपूर्ण सामना मोबाइलवर फॉक्स 26 वर बघितला.   झीच्या स्पोर्ट्स वाहिनीवर आणि Z5 वरही आहे.

 

हैती संघाला शेवटपर्यन्त सुर गवसला नाही. स्कॉटलॅंड बरे खेळले आणि विजय मिळवला.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद!

 

Unite8 Sports 2 HD या वाहिनीवर सामने पाहता येतात. आता ऑस्ट्रेलिया - टर्की सामना सुरू आहे. साारणपणे २० मिनिटांंनंतर  ०-० बरोबरी आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

74 व्या मिनिटाला दुसरा गोल.  ऑस्ट्रेलिया 2 - 0 टर्की

 

-दिलीप बिरुटे


फिफा विश्वचषक २०२६ - संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार - IST)

गट फेरीचे सर्व ७२ सामने (GROUP STAGE)
११ जून: मेक्सिको वि. द.आफ्रिका (रात्री ९:३०) • कॅनडा वि. बोस्निया (रात्री १२:३०)
१२ जून: कोरिया वि. चेकिया (पहाटे ३:३०) • कतार वि. स्वित्झर्लंड (सकाळी ६:३०) • ब्राझील वि. मोरोक्को (रात्री ९:३०) • हैती वि. स्कॉटलंड (रात्री १२:३०)
१३ जून: अमेरिका वि. पॅराग्वे (पहाटे ३:३०) • ऑस्ट्रेलिया वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • जर्मनी वि. कुराकाओ (रात्री ९:३०) • आयव्हरी कोस्ट वि. इक्वाडोर (रात्री १२:३०)
१४ जून: नेदरलँड्स वि. जपान (पहाटे ३:३०) • स्वीडन वि. ट्युनिशिया (सकाळी ६:३०) • बेल्जियम वि. इजिप्त (रात्री ९:३०) • इराण वि. न्यूझीलंड (रात्री १२:३०)
१५ जून: स्पेन वि. केप वर्दे (पहाटे ३:३०) • सौदी अरेबिया वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. सेनेगल (रात्री ९:३०) • इराक वि. नॉर्वे (रात्री १२:३०)
१६ जून: अर्जेंटिना वि. अल्जेरिया (पहाटे ३:३०) • ऑस्ट्रिया वि. जॉर्डन (सकाळी ६:३०) • पोर्तुगाल वि. काँगो (रात्री ९:३०) • उझबेकिस्तान वि. कोलंबिया (रात्री १२:३०)
१७ जून: इंग्लंड वि. क्रोएशिया (पहाटे ३:३०) • घाना वि. पनामा (सकाळी ६:३०) • मेक्सिको वि. कोरिया (रात्री ९:३०) • द.आफ्रिका वि. चेकिया (रात्री १२:३०)
१८ जून: कॅनडा वि. कतार (पहाटे ३:३०) • बोस्निया वि. स्वित्झर्लंड (सकाळी ६:३०) • ब्राझील वि. हैती (रात्री ९:३०) • मोरोक्को वि. स्कॉटलंड (रात्री १२:३०)
१९ जून: अमेरिका वि. ऑस्ट्रेलिया (पहाटे ३:३०) • पॅराग्वे वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • जर्मनी वि. आयव्हरी कोस्ट (रात्री ९:३०) • कुराकाओ वि. इक्वाडोर (रात्री १२:३०)
२० जून: नेदरलँड्स वि. स्वीडन (पहाटे ३:३०) • जपान वि. ट्युनिशिया (सकाळी ६:३०) • बेल्जियम वि. इराण (रात्री ९:३०) • इजिप्त वि. न्यूझीलंड (रात्री १२:३०)
२१ जून: स्पेन वि. सौदी अरेबिया (पहाटे ३:३०) • केप वर्दे वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. इराक (रात्री ९:३०) • सेनेगल वि. नॉर्वे (रात्री १२:३०)
२२ जून: अर्जेंटिना वि. ऑस्ट्रिया (पहाटे ३:३०) • अल्जेरिया वि. जॉर्डन (सकाळी ६:३०) • पोर्तुगाल वि. उझबेकिस्तान (रात्री ९:३०) • काँगो वि. कोलंबिया (रात्री १२:३०)
२३ जून: इंग्लंड वि. घाना (पहाटे ३:३०) • क्रोएशिया वि. पनामा (सकाळी ६:३०) • मेक्सिको वि. चेकिया (रात्री ९:३०) • द.आफ्रिका वि. कोरिया (रात्री ९:३०) • कॅनडा वि. स्वित्झर्लंड (रात्री १२:३०)
२४ जून: बोस्निया वि. कतार (रात्री १२:३०) • ब्राझील वि. स्कॉटलंड (पहाटे ३:३०) • मोरोक्को वि. हैती (पहाटे ३:३०) • अमेरिका वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • पॅराग्वे वि. ऑस्ट्रेलिया (सकाळी ६:३०)
२५ जून: जर्मनी वि. इक्वाडोर (रात्री ९:३०) • कुराकाओ वि. आयव्हरी कोस्ट (रात्री ९:३०) • नेदरलँड्स वि. ट्युनिशिया (रात्री १२:३०) • जपान वि. स्वीडन (रात्री १२:३०) • बेल्जियम वि. न्यूझीलंड (पहाटे ३:३०)
२६ जून: इजिप्त वि. इराण (पहाटे ३:३०) • स्पेन वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • केप वर्दे वि. सौदी अरेबिया (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. नॉर्वे (रात्री ९:३०) • सेनेगल वि. इराक (रात्री ९:३०)
२७ जून: अर्जेंटिना वि. जॉर्डन (रात्री १२:३०) • अल्जेरिया वि. ऑस्ट्रिया (रात्री १२:३०) • पोर्तुगाल वि. कोलंबिया (पहाटे ३:३०) • काँगो वि. उझबेकिस्तान (पहाटे ३:३०) • इंग्लंड वि. पनामा (सकाळी ६:३०) • क्रोएशिया वि. घाना (सकाळी ६:३०)
राऊंड ऑफ ३२ (३२ संघांची फेरी)
२८ जून ते ३ जुलै २०२६
(एकूण १६ सामने: वेळ रात्री ९:३०, १२:३० व पहाटे)
राऊंड ऑफ १६ (उपांत्यपूर्व आधीची फेरी)
४ जुलै ते ७ जुलै २०२६
(एकूण ८ सामने)
उपांत्यपूर्व फेरी (QUARTER-FINALS)
९ जुलै ते ११ जुलै २०२६
(एकूण ४ सामने)
उपांत्य फेरी (SEMI-FINALS)
१४ व १५ जुलै २०२६
(एकूण २ सामने: पहाटे ५:३०)
तिसऱ्या स्थानासाठी सामना
१८ जुलै २०२६
महाअंतिम सामना (GRAND FINAL)
२० जुलै २०२६ (भारतीय वेळेनुसार)
न्यू यॉर्क (मेटलाइफ स्टेडियम)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळापत्रक तर धाग्यात अपडेट करतो. 

 

-दिलीप बिरुटे


इतिहास घडला. 

 

पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या कुराकाओने जर्मनीविरूद्ध २४ व्या मिनिटाला गोल करून १-१ बरोबरी केली.


In reply to by श्रीगुरुजी

जर्मनी च्या संघात तेथील बायर्न म्युनिच संघातले अनेक खेळाडू आहेत. जे ८० व्या मिनिटा नंतर २-३ गोल करण्यात पारंगत आहेत. 

जर्मनी सहज जिंकेल. पण बाद फेरीत जर्मनी टिकेल असे वाटत नाही. 


 स्पेन वि. केप वर्डे -

९० टक्के खेळ केप वर्डेच्या गोलाजवळ झाला. 

अंतिम गोलफलक ०-०.

केप वर्डेच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट बचाव करून किमान ५ होणारे गोल वाचविले.


 

उझबेकीस्तान आणि कोलंबियाचा सामना सुरु आहे 40 व्या मिनिटाला कोलंबियाने गोल केला. 1-0

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलंबियाचं खेळावर पूर्ण वर्चस्व होतं. 03-01 ने उझबेकीस्तानला हरवले.

 

-दिलीप बिरुटे


१. सामन्याचे हायलाइट्स    पाहण्यासाठीचा चानेल UNITE8 बेकार आहे. मला पूर्ण लाइव दोन तासांचे चित्रीकरण नको असते. अर्धा पाऊण तासांचे संक्षिप्त नंतर दाखवतात ते आवडते.( अंतिम सामना पाहतो पूर्ण). 

पण हा कॉपीराईट मिळालेला UNITE8 चानेल( डिशटिवी) एडिटिंग करून हायलाईट्स बरोबर दाखवत नाही. गचाळ एडिटिंग आहे.

 

२. यूट्यूबवरचा फिफा चानेलसुद्धा हायलाइट्स चांगले दाखवत नाही. टांग मारली आहे. 

३. जे लोक म्हणजे यूट्यूबर content creator आहेत त्यांनाही अमेरिकेने तंबी दिली आहे की टुरिस्ट विसावर खेळ / सामने पाहून विडिओ टाकले तर विसा रद्द करण्यात येईल( बातमी). शिवाय यूट्यूबवर कुणी टाकलेले विडिओ  फिफा काढून टाकायला भाग पाडत आहे.

[ टीवीवर unite8 वर संपूर्ण सामना लाईव बघण्यात काही अडचण नाहीये.]

डिशटीवीवर रेकॉर्डिंग सोय आहे, रात्री रेकॉर्डिंग करून नंतर सकाळी फास्ट फारवर्ड करून पाहता येतेच. 


In reply to by कंजूस

>>>  गचाळ एडिटिंग आहे.

हजार वेळा सहमत.... बाकी वाहिन्यांवर सामने न दाखवने, हायलाइट्स न दाखवणे अजिबात आनंद घेऊ देत नाहीत. 

 

 

 

-दिलीप बिरुटे


फिफाच्या वेब्साईटवर २-३ मिनिटांचे हायलाइट्स आहेत. बऱ्यापैकी गोल झालेले आणि प्रयत्न केलेले सगळे भर भर दाखवतात. 


सामना सुरु आहे, पहिल्या पंधरा मिनिट ब्राझीलचंच वर्चस्व दिसत आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझीलला 21 व्या मिनिटाला भारी संधी होती फक्त गोलकिपरला हूलकावणी द्यायची होती पण बॉल पोष्टच्या बाहेर गेला. 22 व्या मिनिटाला उत्तम पास देत गोल केला.

 

ब्राझील 01 - हैती -00

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझीलचे बहारदार पास खेळातील चपळाई यामुळे हैती चांगले खेळुनही त्यांचा खेळ झाकाळुन गेला आहे.

 

ब्राझील 02- हैती 0 असे लिहायला आलो होती की ब्राझीलने तीसरा गोल गेला. ब्राझील 03 - 00

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 


च्यायला  उझबेकिस्तान काय, कुरीकाओ काय, मोरोक्को काय? जगातल्या इतक्या टिमा फुटबॉल खेळतात एक भारतालाच काय धाड भरलीय? साधे क्वालिफाय होत नाहीत! ह्या क्रिकेटविकृतांमुळे इतर खेळ पुढे येत नाहीये, क्रिकेटविकृताना चपलेने बडवावे वाटते. असो धाग्याचा हा विषय नाही. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

चीन ही  खेळत नाही आहे.  भारतीय एकच खेळ खेळतात किंवा पाहतात तो म्हणजे गुलामांचा क्रिकेट.  जो पर्यन्त खेळातून सरकारी अनुदान संपत नाही. सरकारी नौकरी देणे संपत नाही तो पर्यन्त खेळ म्हणजे करियर राहणार.  चॅम्पियन बनण्याची इच्छा कमीच राहणार. 


५६ व्या  मिनिटाला दोघेही ०२ -०२  असे बरोबरीत आहे.  सामना रंगला आहे. सुटीचा आनंद धन्यवाद. 

 

-दिलीप बिरुटे


आज एका अन्य सामन्यात इक्वेडोर आणि जर्मनी यांच्या सामन्यात इक्वेडोरच्या भन्नाट खेळापुढे जर्मनीने नांगी टाकली. इक्वेडोरने दोन गोल केले तर, जर्मनीचा एक गोल झाला. 

 

-दिलीप बिरुटे 


अर्जेंटीना Vs जॉर्डन यांचा सामना सुरु आहे मध्यांतरापर्यन्त अर्जेंटीनाची दोन गोलची आघाडी आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्जेंटीनाचा तीसरा गोल मेस्सीने केला. निव्वळ अफलातून किक.... ग्रेट.

 

-दिलीप बिरुटे