Skip to main content

फिफा विश्वचषक २०२६ / FIFA World Cup 2026

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 13/06/2026 11:58 या दिवशी प्रकाशित केले.

फुटबॉलचं महायुद्ध दि. ११ पासून सुरू झालं. एकूण ४८ संघांचा सहभाग असलेले फुटबॉलचे सामने पुढे रंगत जातील. सध्या सामन्यांच्या वेळा आपल्या भारतीयांच्या अजिबात सोयीच्या नसतात. हायलाइट्सची व्यवस्था उरली नाही, त्यामुळे सामन्यांचा आनंद घेणे जिकिरीचे झाले आहे. अडतीस वर्षांचा मेस्सी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देतो का, ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तिकडे, एक्केचाळीस वर्षांच्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होते का, तेही पाहता येईल. आपण भारतीय फुटबॉलमध्ये कुठेच नसलो म्हणून काय झालं, आपण कोणत्या तरी संघाचे फॉलोअर्स असतोच.

mipa
 छायाचित्र फिफाच्या संस्थळावरुन. 

मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने सामन्याला सुरुवात झाली. मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला दोन-शून्याने हरवले. बाकी, तिकिटांचा घोळ, युद्ध, आंदोलने जगभर चालू आहेत, तरीही हा सोहळा १९ जुलैपर्यंत रंगणार आहे. अर्थात, भारतीय चाहत्यांना आपल्या लाडक्या मेस्सी, रोनाल्डो, नेमार, किलियन एम्बाप्पे, लामिन यमाल यांना खेळताना बघण्याची संधी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या लढती मध्यरात्री, भल्या पहाटे किंवा अगदी सकाळी असणार आहेत.

एक मिपाकर आणि भारतीय चाहता म्हणून आपलं प्रेम कायम ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल या संघांवर राहिलं आहे. जागतिक फुटबॉलमध्ये ब्राझीलइतके यश इतर कोणत्याही देशाला मिळालेले नाही. पाच वेळा विजेता असलेला ब्राझील संघ सध्या मागे पडला आहे. यामुळे ब्राझीलचे चाहते अजूनही आपल्या संघाच्या सुवर्णकाळाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. स्पेन नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीने फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतो. अनेक उत्कृष्ट तरुण खेळाडू तयार करून आणि युरोपमध्ये एक मजबूत संघ म्हणून टिकून राहूनही, त्यांना दुसरा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ब्राझील आणि स्पेन भूतकाळातील आठवणींचा मागोवा घेत असतील, तर अर्जेंटिनाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या दक्षिण अमेरिकन देशाने २०२२ मध्ये कतार येथे मेस्सीच्या फुटबॉल इतिहासातील एका अत्यंत संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवून वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. आता, अर्जेंटिनाचे ध्येय जेतेपद राखण्याचे असेल. विजेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, हॉलंड, नॉर्वे, बेल्जियम हे संघदेखील असतील. यावेळी कुठला संघ बाजी मारणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आता जास्त उमटत आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इराणच्या तिन्ही साखळी लढती अमेरिकेत होणार आहेत. त्या लढतींच्या दिवशीच इराणचा संघ अमेरिकेत येईल, असे सुरुवातीस अमेरिकेने सांगितले होते. परवानगी देणे-न देणे, तात्यांची हुकूमशाही आणि सद्यस्थिती पाहता खेळापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींची चर्चा जास्त असेल.

फुटबॉलचे सामने जमेल तसे पाहत राहू. सध्या फुटबॉल सामन्यांच्या हायलाइट्सची व्यवस्था नाही, म्हणून सर्वत्र बोंब आहे; तरीही आपण मिपाकर जमेल तसे सामन्यांवर, सामन्यांतील घटनांवर लिहीत-बोलत राहू. (धागा अपडेट करत राहीन)

फिफा विश्वचषक २०२६ - GROUP STAGE

GROUP A
Mexico • South Africa • Korea Republic • Czechia
GROUP B
Canada • Bosnia and Herzegovina • Qatar • Switzerland
GROUP C
Brazil • Morocco • Haiti • Scotland
GROUP D
USA • Paraguay • Australia • Türkiye
GROUP E
Germany • Curaçao • Côte d'Ivoire • Ecuador
GROUP F
Netherlands • Japan • Sweden • Tunisia
GROUP G
Belgium • Egypt • IR Iran • New Zealand
GROUP H
Spain • Cabo Verde • Saudi Arabia • Uruguay
GROUP I
France • Senegal • Iraq • Norway
GROUP J
Argentina • Algeria • Austria • Jordan
GROUP K
Portugal • Congo DR • Uzbekistan • Colombia
GROUP L
England • Croatia • Ghana • Panama

वाचने 3111
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

मी सुचवणार होतेच, कोणीतरी फिफा2026 धागा सुरू करा👍

 घरात दोन संघ झाले आहेत,मी मेसी तर लेक रोनाल्डोची चाहती आहे.

बाकी स्पर्धेतले सर्व विशेष फुटबॉल पाकिस्तानमधल्या सियालकोट फॅक्टरीत बनवले आहेत हे एक रील मधू  नव्याने समजले.


गावात क्रिकेट ते पण कामट्यांचे स्टंप लावून खेळलो आहे, फुटबॉल वगैरे शहरात येऊन बघितले त्यात पण झुळझुळीत ड्राय फिट कपडे, मागे नाव छापलेले, पायात spikes वगैरे घातलेली पोरे पाहून हा नाद श्रीमंतांचा असल्याचे मनाने घेतले ते आजवर घेतलेच आहे. फुटबॉल पाहताना सगळ्यात जास्त एकेकाळी आवडलेला खेळाडू म्हणजे डेव्हिड बेकहॅम, तो फुटबॉल पेक्षा त्याचा उमदा स्वभाव आमच्यासारखेच रॉयल एनफिल्ड किंवा तत्सम दुचाक्यांवर बोंबलत फिरायची हौस व्हिक्टोरिया प्रति त्याचे निस्सिम समर्पण आणि त्या दोघांनी उभे केलेलं स्वतःचं साम्राज्य ह्यासाठीच जास्त लक्षात राहिला.


हैती आणि स्कॉटलैंडचा मॅच सुरु आहे आणि पाहतोही आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्कॉटलॅंडने हाइड्रेशन ब्रेकच्या नंतर 28 व्या मिनिटाला गोल गेला.

1-0

 

-दिलीप बिरुटे


In reply to by श्रीगुरुजी

आज संपूर्ण सामना मोबाइलवर फॉक्स 26 वर बघितला.   झीच्या स्पोर्ट्स वाहिनीवर आणि Z5 वरही आहे.

 

हैती संघाला शेवटपर्यन्त सुर गवसला नाही. स्कॉटलॅंड बरे खेळले आणि विजय मिळवला.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद!

 

Unite8 Sports 2 HD या वाहिनीवर सामने पाहता येतात. आता ऑस्ट्रेलिया - टर्की सामना सुरू आहे. साारणपणे २० मिनिटांंनंतर  ०-० बरोबरी आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

74 व्या मिनिटाला दुसरा गोल.  ऑस्ट्रेलिया 2 - 0 टर्की

 

-दिलीप बिरुटे


फिफा विश्वचषक २०२६ - संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार - IST)

गट फेरीचे सर्व ७२ सामने (GROUP STAGE)
११ जून: मेक्सिको वि. द.आफ्रिका (रात्री ९:३०) • कॅनडा वि. बोस्निया (रात्री १२:३०)
१२ जून: कोरिया वि. चेकिया (पहाटे ३:३०) • कतार वि. स्वित्झर्लंड (सकाळी ६:३०) • ब्राझील वि. मोरोक्को (रात्री ९:३०) • हैती वि. स्कॉटलंड (रात्री १२:३०)
१३ जून: अमेरिका वि. पॅराग्वे (पहाटे ३:३०) • ऑस्ट्रेलिया वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • जर्मनी वि. कुराकाओ (रात्री ९:३०) • आयव्हरी कोस्ट वि. इक्वाडोर (रात्री १२:३०)
१४ जून: नेदरलँड्स वि. जपान (पहाटे ३:३०) • स्वीडन वि. ट्युनिशिया (सकाळी ६:३०) • बेल्जियम वि. इजिप्त (रात्री ९:३०) • इराण वि. न्यूझीलंड (रात्री १२:३०)
१५ जून: स्पेन वि. केप वर्दे (पहाटे ३:३०) • सौदी अरेबिया वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. सेनेगल (रात्री ९:३०) • इराक वि. नॉर्वे (रात्री १२:३०)
१६ जून: अर्जेंटिना वि. अल्जेरिया (पहाटे ३:३०) • ऑस्ट्रिया वि. जॉर्डन (सकाळी ६:३०) • पोर्तुगाल वि. काँगो (रात्री ९:३०) • उझबेकिस्तान वि. कोलंबिया (रात्री १२:३०)
१७ जून: इंग्लंड वि. क्रोएशिया (पहाटे ३:३०) • घाना वि. पनामा (सकाळी ६:३०) • मेक्सिको वि. कोरिया (रात्री ९:३०) • द.आफ्रिका वि. चेकिया (रात्री १२:३०)
१८ जून: कॅनडा वि. कतार (पहाटे ३:३०) • बोस्निया वि. स्वित्झर्लंड (सकाळी ६:३०) • ब्राझील वि. हैती (रात्री ९:३०) • मोरोक्को वि. स्कॉटलंड (रात्री १२:३०)
१९ जून: अमेरिका वि. ऑस्ट्रेलिया (पहाटे ३:३०) • पॅराग्वे वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • जर्मनी वि. आयव्हरी कोस्ट (रात्री ९:३०) • कुराकाओ वि. इक्वाडोर (रात्री १२:३०)
२० जून: नेदरलँड्स वि. स्वीडन (पहाटे ३:३०) • जपान वि. ट्युनिशिया (सकाळी ६:३०) • बेल्जियम वि. इराण (रात्री ९:३०) • इजिप्त वि. न्यूझीलंड (रात्री १२:३०)
२१ जून: स्पेन वि. सौदी अरेबिया (पहाटे ३:३०) • केप वर्दे वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. इराक (रात्री ९:३०) • सेनेगल वि. नॉर्वे (रात्री १२:३०)
२२ जून: अर्जेंटिना वि. ऑस्ट्रिया (पहाटे ३:३०) • अल्जेरिया वि. जॉर्डन (सकाळी ६:३०) • पोर्तुगाल वि. उझबेकिस्तान (रात्री ९:३०) • काँगो वि. कोलंबिया (रात्री १२:३०)
२३ जून: इंग्लंड वि. घाना (पहाटे ३:३०) • क्रोएशिया वि. पनामा (सकाळी ६:३०) • मेक्सिको वि. चेकिया (रात्री ९:३०) • द.आफ्रिका वि. कोरिया (रात्री ९:३०) • कॅनडा वि. स्वित्झर्लंड (रात्री १२:३०)
२४ जून: बोस्निया वि. कतार (रात्री १२:३०) • ब्राझील वि. स्कॉटलंड (पहाटे ३:३०) • मोरोक्को वि. हैती (पहाटे ३:३०) • अमेरिका वि. तुर्कस्तान (सकाळी ६:३०) • पॅराग्वे वि. ऑस्ट्रेलिया (सकाळी ६:३०)
२५ जून: जर्मनी वि. इक्वाडोर (रात्री ९:३०) • कुराकाओ वि. आयव्हरी कोस्ट (रात्री ९:३०) • नेदरलँड्स वि. ट्युनिशिया (रात्री १२:३०) • जपान वि. स्वीडन (रात्री १२:३०) • बेल्जियम वि. न्यूझीलंड (पहाटे ३:३०)
२६ जून: इजिप्त वि. इराण (पहाटे ३:३०) • स्पेन वि. उरुग्वे (सकाळी ६:३०) • केप वर्दे वि. सौदी अरेबिया (सकाळी ६:३०) • फ्रान्स वि. नॉर्वे (रात्री ९:३०) • सेनेगल वि. इराक (रात्री ९:३०)
२७ जून: अर्जेंटिना वि. जॉर्डन (रात्री १२:३०) • अल्जेरिया वि. ऑस्ट्रिया (रात्री १२:३०) • पोर्तुगाल वि. कोलंबिया (पहाटे ३:३०) • काँगो वि. उझबेकिस्तान (पहाटे ३:३०) • इंग्लंड वि. पनामा (सकाळी ६:३०) • क्रोएशिया वि. घाना (सकाळी ६:३०)
राऊंड ऑफ ३२ (३२ संघांची फेरी)
२८ जून ते ३ जुलै २०२६
(एकूण १६ सामने: वेळ रात्री ९:३०, १२:३० व पहाटे)
राऊंड ऑफ १६ (उपांत्यपूर्व आधीची फेरी)
४ जुलै ते ७ जुलै २०२६
(एकूण ८ सामने)
उपांत्यपूर्व फेरी (QUARTER-FINALS)
९ जुलै ते ११ जुलै २०२६
(एकूण ४ सामने)
उपांत्य फेरी (SEMI-FINALS)
१४ व १५ जुलै २०२६
(एकूण २ सामने: पहाटे ५:३०)
तिसऱ्या स्थानासाठी सामना
१८ जुलै २०२६
महाअंतिम सामना (GRAND FINAL)
२० जुलै २०२६ (भारतीय वेळेनुसार)
न्यू यॉर्क (मेटलाइफ स्टेडियम)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळापत्रक तर धाग्यात अपडेट करतो. 

 

-दिलीप बिरुटे


इतिहास घडला. 

 

पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या कुराकाओने जर्मनीविरूद्ध २४ व्या मिनिटाला गोल करून १-१ बरोबरी केली.


In reply to by श्रीगुरुजी

जर्मनी च्या संघात तेथील बायर्न म्युनिच संघातले अनेक खेळाडू आहेत. जे ८० व्या मिनिटा नंतर २-३ गोल करण्यात पारंगत आहेत. 

जर्मनी सहज जिंकेल. पण बाद फेरीत जर्मनी टिकेल असे वाटत नाही. 


 स्पेन वि. केप वर्डे -

९० टक्के खेळ केप वर्डेच्या गोलाजवळ झाला. 

अंतिम गोलफलक ०-०.

केप वर्डेच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट बचाव करून किमान ५ होणारे गोल वाचविले.


 

उझबेकीस्तान आणि कोलंबियाचा सामना सुरु आहे 40 व्या मिनिटाला कोलंबियाने गोल केला. 1-0

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलंबियाचं खेळावर पूर्ण वर्चस्व होतं. 03-01 ने उझबेकीस्तानला हरवले.

 

-दिलीप बिरुटे


१. सामन्याचे हायलाइट्स    पाहण्यासाठीचा चानेल UNITE8 बेकार आहे. मला पूर्ण लाइव दोन तासांचे चित्रीकरण नको असते. अर्धा पाऊण तासांचे संक्षिप्त नंतर दाखवतात ते आवडते.( अंतिम सामना पाहतो पूर्ण). 

पण हा कॉपीराईट मिळालेला UNITE8 चानेल( डिशटिवी) एडिटिंग करून हायलाईट्स बरोबर दाखवत नाही. गचाळ एडिटिंग आहे.

 

२. यूट्यूबवरचा फिफा चानेलसुद्धा हायलाइट्स चांगले दाखवत नाही. टांग मारली आहे. 

३. जे लोक म्हणजे यूट्यूबर content creator आहेत त्यांनाही अमेरिकेने तंबी दिली आहे की टुरिस्ट विसावर खेळ / सामने पाहून विडिओ टाकले तर विसा रद्द करण्यात येईल( बातमी). शिवाय यूट्यूबवर कुणी टाकलेले विडिओ  फिफा काढून टाकायला भाग पाडत आहे.

[ टीवीवर unite8 वर संपूर्ण सामना लाईव बघण्यात काही अडचण नाहीये.]

डिशटीवीवर रेकॉर्डिंग सोय आहे, रात्री रेकॉर्डिंग करून नंतर सकाळी फास्ट फारवर्ड करून पाहता येतेच. 


In reply to by कंजूस

>>>  गचाळ एडिटिंग आहे.

हजार वेळा सहमत.... बाकी वाहिन्यांवर सामने न दाखवने, हायलाइट्स न दाखवणे अजिबात आनंद घेऊ देत नाहीत. 

 

 

 

-दिलीप बिरुटे


फिफाच्या वेब्साईटवर २-३ मिनिटांचे हायलाइट्स आहेत. बऱ्यापैकी गोल झालेले आणि प्रयत्न केलेले सगळे भर भर दाखवतात. 


सामना सुरु आहे, पहिल्या पंधरा मिनिट ब्राझीलचंच वर्चस्व दिसत आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझीलला 21 व्या मिनिटाला भारी संधी होती फक्त गोलकिपरला हूलकावणी द्यायची होती पण बॉल पोष्टच्या बाहेर गेला. 22 व्या मिनिटाला उत्तम पास देत गोल केला.

 

ब्राझील 01 - हैती -00

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझीलचे बहारदार पास खेळातील चपळाई यामुळे हैती चांगले खेळुनही त्यांचा खेळ झाकाळुन गेला आहे.

 

ब्राझील 02- हैती 0 असे लिहायला आलो होती की ब्राझीलने तीसरा गोल गेला. ब्राझील 03 - 00

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 


च्यायला  उझबेकिस्तान काय, कुरीकाओ काय, मोरोक्को काय? जगातल्या इतक्या टिमा फुटबॉल खेळतात एक भारतालाच काय धाड भरलीय? साधे क्वालिफाय होत नाहीत! ह्या क्रिकेटविकृतांमुळे इतर खेळ पुढे येत नाहीये, क्रिकेटविकृताना चपलेने बडवावे वाटते. असो धाग्याचा हा विषय नाही. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

चीन ही  खेळत नाही आहे.  भारतीय एकच खेळ खेळतात किंवा पाहतात तो म्हणजे गुलामांचा क्रिकेट.  जो पर्यन्त खेळातून सरकारी अनुदान संपत नाही. सरकारी नौकरी देणे संपत नाही तो पर्यन्त खेळ म्हणजे करियर राहणार.  चॅम्पियन बनण्याची इच्छा कमीच राहणार. 


In reply to by विवेकपटाईत

अन् तिथे ही जर क्रिकेटचा उद्धार केल्याशिवाय भागत नसेल तर अवघड आहे अन् उत्तर पण त्यातच लपलेले आहे. क्रिकेट गुलामीचा खेळ भारताला असला तर फुटबॉल पण लॅटिन अमेरिकेत गुलामीत असतानाच आलेला आहे फक्त आपल्याला अर्जेंटिना, ब्राझील इत्यादी देशातील फुटबॉल रसिक गुलामांचा खेळ वगैरे मल्लिनाथी करताना दिसत नाहीत. रबरचा एक क्रिकेट बॉल ५ रुपयांना विकत मिळत असे आमच्या लहानपणी, फारच कॉस्को इत्यादी घेतला टेनिस बॉल तर पंचवीस, त्याकाळी फुटबॉल घ्यायला किमान ३०० रुपये लागत ! कुठून रुजणार फुटबॉल ग्रासरूट वर ? उपलब्धता, सुलभता आणि किफायतशीर असणे ह्यामुळे क्रिकेट पुढे गेले सिंपल ! आणि फील्ड ॲथलेटिक्स किंवा इतर खेळात पैसे नाहीत म्हणावे तर ते एकवेळ ऐकून घेता येईल पण भारतात फुटबॉल मधे पैसा नाही हे मात्र पोराची महिना २५००/- फक्त फुटबॉल क्लास फी भरून मला तरी पटणे शक्य नाही.


५६ व्या  मिनिटाला दोघेही ०२ -०२  असे बरोबरीत आहे.  सामना रंगला आहे. सुटीचा आनंद धन्यवाद. 

 

-दिलीप बिरुटे


आज एका अन्य सामन्यात इक्वेडोर आणि जर्मनी यांच्या सामन्यात इक्वेडोरच्या भन्नाट खेळापुढे जर्मनीने नांगी टाकली. इक्वेडोरने दोन गोल केले तर, जर्मनीचा एक गोल झाला. 

 

-दिलीप बिरुटे 


अर्जेंटीना Vs जॉर्डन यांचा सामना सुरु आहे मध्यांतरापर्यन्त अर्जेंटीनाची दोन गोलची आघाडी आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्जेंटीनाचा तीसरा गोल मेस्सीने केला. निव्वळ अफलातून किक.... ग्रेट.

 

-दिलीप बिरुटे


अर्जेंटीना वि काबो चा मॅच अधिकच्या वेळात दोन दोन गोलवर आला आहे, 

 

रंगतदार मॅच सुरुच आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेस्सीच्या कॉर्नवर तीसरा गोल अर्जेन्टीना 03-काबो 02 

लैच भारी मॅच... 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काबोची जिवतोडून भयंकर आक्रमण सुरूच आहेत अर्जेंटीना थकुन गेले आहे. भन्नाट

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण मन मात्र काबोने जिंकले.  वाह मजा आगया.. धन्यवाद.

 

-दिलीप बिरुटे


रग्बी की फुटबॉल....  फ्रान्स वि पॅराग्वे. 

या वर्ल्ड कप मधली पहिली मॅच बघायचा योग आला.. पहाटे चार पर्यंत डोळे कसेबसे ताणून बघितली. हाफ टाईमला म्हणलं एम्बाप्पे काही सुटत नाही या शाओलीन सॉकर मधून. रेड सोडा, पिवळं कार्ड पण नाही पॅराग्वेला. आपण कशाला आणखी जागरण करा.

 

..नंतर कळलं फ्रान्स जिंकलं आणि एम्बाप्पे पण हाती पायी धड दिसतोय. जरा बरं वाटलं....

गो फ्रान्स!!


चेंडूवर राखता न आलेले वर्चस्व, प्रतिस्पर्ध्यावर आणता न आलेले दडपण आणि मोक्याच्या क्षणी भरवशाच्या खेळाडूंनी केलेली निराशा याचा एकत्रित परिणाम ब्राझीलच्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होण्यात झाला. रविवारी नॉर्वेविरुद्ध झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत १-२ अशा पराभवाला ब्राझील संघाला सामोरे जावे लागले. सलग सहाव्यांदा ब्राझीलने वर्ल्ड कप स्पर्धेतून लवकर 'एग्झिट' घेतली आहे.

 

-दिलीप बिरुटे


काल स्पेनबरोबरच्या  महत्वाच्या सामन्यात  पोर्तूगल बाहेर पडले.  क्रिस्टियानो रोनाल्डोच्या  पोर्तुगल संघांचे  या विश्वचषकातील आव्हान संपूष्टात आले. सामन्याच्या  अगदी शेवटच्या मिनिटाला  स्पेनच्या मिकेल  मेरिनो याने गोल करुन स्पेनला विजय मिळवून दिला. 

आता भारतीय प्रमाण  वेळेनुसार रात्री साडेनऊला म्हणजे अजून पंधरा मिनिटांनी  अर्जेंटीना आणि इजीप्तचा सामना सुरु होतोय. या सामन्याचा निकाल धक्कादायक लागू नये म्हणजे झालं. नाही, तर या स्पर्धेतील प्रबळ दावेदार म्हणून असलेला हा शेवटचा संघ म्हणावा लागेल, असे वाटते. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इजिप्तने पहिला गोल 14 व्या मिनिटाला हेडरने केला. धक्कादायक निकाल सुरु. अर्जेंटीना आक्रमण करतेय पण गोल मधे रूपांतर करायला यश मिळत  नै ये.

मेस्सीकडून अपेक्षा आहेत बघूया...

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेस्सीची 19 व्या मिनिटाला पेनल्टी किक इजिप्तच्या गोलकीपरने रोखली आणि अर्जेन्टीनाची बरोबरीची संधी गेली.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज बरे दिसत नाहीत... काही नवल घडले तर येईन इकडे...

 

आज मेस्सीचा संघ झगड़तोय. आक्रमण आहेत पण गोल होत नै ये. इजिप्त वरचढ ठरतोय.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला हाफ संपला अजूनही इजिप्तची  1-0 ची आघाडी आहे 

 

आता दुस-या हाफ मधे मेस्सीचा संघ चमत्कार करु  शकला तर  फिफा 2026 मधे अर्जेंटीनाचा संघ पुढील सामन्यात दिसेल... 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

58 व्या मिनिटाला इजिप्तचा दुसरा गोल पण तो दिला नाही.. चुकीच्या पद्धतीने खेलाडूला अडवले अर्जेंटीना वाचले..

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

66 व्या मिनिटाला इजिप्तचा दुसरा गोल. मेस्सीच्या संघाची दुर्दशा पाहवत नाही. :(

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

78 व्या मिनिटाला अर्जेंटीनाचा पहिला गोल झाला. रंगतदार सामना अजून 12 मिनिट खेळ बाकी

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

83 व्या मिनिटाला अर्जेन्टीनाचा दुसरा मेस्सीचा गोल.  अप्रतिम सामना. सगळ्यात खतरनाक सामना.

 

6 मिनिट बाकी.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

90 व्या मिनिटातला तीसरा अर्जेंटीनाचा गोल. अर्जेंटीना हार ते जीत असा जबरा मॅच... गोल तपासला जात आहे.

 

-दिलीप बिरुटे

 

 


अर्जेंटीना अशा पद्धतीने जबरदस्त खेळ करुन जिंकेल असे वाटले नव्हते जबरदस्त मॅच मेस्सीची टीम जिंकली आनंद वाटला. इजिप्त जिंकलेला मॅच हरली.  अर्जेंटीना 03- इजिप्त  02 

मजा आली.

-दिलीप बिरुटे


आधिचे खूप सामने बघितले नैत. पण आजचा सामना खतरनाक झाला. पहिली जवळ जवळ सत्तर मिनिटेे बॉल इजिप्त गोलपोस्ट जवळ अर्जेंटिनाने ताब्यात ठेवला होता. पण तो हातातून, आपलं पायातून गेला की इजिप्तने नेत्रदीपक ३ गोल केले (एकात फाउल झाला). नंतर मात्र अर्जेंटिनाने बाजी मारली. हातातली मॅच गेल्यामुळे इजिप्तची खूपच चिडचिड झाली.


२०१०, २०१८ आणि २०२२ मध्ये ज्या देशाने जपान ला नॉकआऊट मध्ये हरवले आहे, त्याला ज्याने हरवले, त्याचा कप झाला. 

अपवाद २०१४ चा. त्यावेळी जपान नॉक आऊट मध्ये आलाच नाही.


कालच्या अर्जेंटीना विरुद्ध इजिप्तचा सामना अजूनही मनातून जात नाही, बरेच दिवस जाणारही नाही.  पिछाडीवर पडल्यानंतरही जिद्दीने खेळ करून गतविजेत्या अर्जेंटिनाने इजिप्तवर ३-२ अशी मात केली आणि फुटबॉल वर्ल्ड कपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोन्ही संघाचा लौकिक पाहता  अर्जेंटिनाचेच पारडे जड  होते. पण, इजिप्तने धडाक्यात सुरुवात केली पाहता, इजिप्तला हलक्यात  घेणे धोकादायक आहे हे अर्जेंटीनाला समजले असावे. पंधराव्या मिनिटालाच  इब्राहिमने संधीचे सोने केले,  त्याने हेडरद्वारे अप्रतिम गोल करून इजिप्तचे खाते उघडलं.  

इजिप्तकडून धुसमुसळेपणा चालूच असल्यामुळे  २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल करण्यात आली होती. मात्र, या संधीचे सोने करण्यात लिओनेल मेस्सीला यश आले नाही. इथं आता काही खरं नाही, अशी मनाची तयारी नाही. मेस्सी इतके गोल करतो आणि इथे जमेना. शीट.  इजिप्तचा गोलरक्षक मुस्तफा शोबीरने मेस्सीने मारलेला चेंडू अडवला, कमाल गोलरक्षण त्याने केलं.  अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी सातत्याने आक्रमक चाली रचल्या. इजिप्तच्या डी क्षेत्रात  संपूऱ्ण अर्जेंटीना संघ खेळताना दिसत होता.  अ‍लेक्सीस मॅक ऑलिस्र्टर, एन्झो फर्नांडेझ यांचे प्रयत्नही इजिप्तचा गोलरक्षक मुस्तफाने हाणून पाडले.  त्यानंतर, ३९व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने सुरेख प्रयत्न केला होता. मात्र, या वेळीही मुस्तफाने कमाल केली आणि अर्जेंटिनाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मध्यंतराला इजिप्तने आघाडी कायम ठेवली. 
इजिप्तचे आक्रमण सुरुच होते त्यात एका 'रिव्ह्यू'मध्ये  मरवान आित्तियाकडून फाउल झाल्याचे निदर्शनास आले आणि इजिप्तचा एक  गोल नाकारला गेला. मात्र, त्यानंतर नऊच मिनिटांनी इजिप्तने जोरदार प्रतिआक्रमण रचले आणि  हैसम हसनच्या अप्रतिम पासवर मुस्तफा झिकोने पुन्हा एकदा चेंडू गोलजाळ्यात मारला आणि एकच जल्लोष झाला.  आता  येथून अर्जेंटीनाचे परतणे अशक्यच वाटत होते. 

अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्यासाठी जीवाचे रान केले.  आपल्याच खेळाडूंकडे बॉल राहील यात प्रयत्न करीत,  अखेरीस ७९व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या पासवर क्रिस्टियन रोमेरोने हेडरद्वारे अप्रतिम गोल केला आणि अर्जेंटिनाच्या जीवात जीव आला.  त्यानंतर चारच मिनिटांनी मेस्सीने बचावफळी मोडून अप्रतिम शॉटने  जबरदस्त गोल नोंदवून अर्जेंटिनाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर, अधिकच्या वेळेत दुसऱ्याच मिनिटाला लॉटेरो मार्टिनेझच्या पासवर एन्झो फर्नांडेझने हेडरद्वारे जबरदस्त गोल नोंदवून अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत ३-२ अशी आघाडी कायम राखली, शेवटी  इजिप्तच्या खेळाडुंची चीडचीड होणे साहजिक होते.  विजयी घास अर्जेंटिनाने हिसकावून घेतला, एक भन्नाट विजय  मेस्सीच्या डोळ्यातून पाझरत होता आणि  रोमहर्षक सामन्यात अर्जेंटीनाने  विजयावर शिक्कामोर्तब केले. 

कालचा सामन्यातून एक लक्षात आले तो नुसता सामना नव्हता, जिंदगी बदल जाती है,  बस पेशन्स जरुरी है, आखीरतक लढते रहो. बाजी पलट सकती है, हा धडा कालच्या मॅचने दिला.  मजा आगया. 

 

-दिलीप बिरुटे

 


आज उद्या रात्री कोणती मॅच आहे का? किती वाजता आहे? कुठे पहायची?  कोणती फेरी आहे? हे माहीत झाल्यास मॅच पाहता येईल!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी, आता उपउपांत्य फेरीचे सामने बाकी  आहेत. आता. वेळापत्रक खाली दिले आहे. 
डीश टीव्हीच्या  'युनाटेड ८' वर हे सामने मी पाहतो.  मजा येत आहे.  वेळा आपल्या सोयीच्या नाहीत. :(

-दिलीप बिरुटे
 


फ्रान्स विरुद्ध मोरोक्को,  १० जुलै,  शुक्रवार,रात्री १. ३० वा. 
स्पेन विरुद्ध बेल्जियम,  ११ जुलै, शनिवार, रात्री. १२. ३० वा. 
नॉर्वे विरुद्ध इंग्लंड,  रविवार, १२ जुलै, पहाटे ०२.३० वा. 
अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड,  १२ जुलै, सकाळी ०६. ३० वा.  
( सर्व भारतीय प्रमाणवेळा )
सर्व सामने असेच रंगतदार होतील अशी अपेक्षा करुया.....! 

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोरोक्को हा कायम आक्रमणास पसंती देणारा संघ. मात्र, फ्रान्सची वाढती ताकद त्यांनीही सामन्यापूर्वी मान्य केली. मोरोक्कोने बचावास प्राधान्य दिले. त्यानंतरही फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील फ्रान्सच्या वेगवान, योजनाबद्ध आक्रमणासमोर लढतीपूर्वीच हार पत्करली. फ्रान्सने या स्पर्धेत प्रभावी खेळ केलेल्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे संपवून फ्रान्स ने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

-दिलीप बिरुटे


काल इजिप्त हरले त्यांच्या खेळाडूंच्या काही  शॉर्ट व्हीडीयो मधे फीफा पंच यांनी आमच्यावर अन्याय केला, अर्जेंटीनालाच जर जिंकवायचे होते तर आम्हाला कशाला बोलावले वगैरे सुरु झालं.

अरे देवा...!

 

-दिलीप बिरुटे

 


किंवा सुधारणा करायला हवी. 

तसेच कुणाच्या पासवर डोक्याने मारलेल्या चेंडूवर गोल बाद ठरवला तर मजा येईल. पायानेच खेळा. डोक्याने चेंडू अडवता आला तर ठीक. पण गोल बाद.


बर त्या नॉर्वे संघाची, त्यांच्या बोट वलव्हण्याची  खुप हवा आहे सध्या!!!

अंतिम सामना अर्जेंटिना वि. नॉर्वे पाहिजे, मजा येईल 😅


In reply to by Bhakti

जुन्या काळी जेव्हा वायकिंग योद्धे मोहिमांवर निघत तेव्हा आपल्या लाँग शिप अशाच प्रकारे हाकत खुल्या समुद्रात, ड्रम आणि तुतारी (व्हायकिंग हॉर्न) फुंकत त्याच्या तालावर

Odins-Treasures-how-the-viking-smade-their-ships वायकिंग लाँग शिप 61-Ms-PTDpuu-L-AC-UF1000-1000-QL80 वायकिंग रणशिंग


रंगतदार मॅच सुरु आहे. सामन्याचा निर्धारित वेळ संपला आहे 1-1 अशी बरोबरी आहे आता दोन्ही संघाकडून धूसमुसळेपणा सुरु आहे.

कोण जिंकेल त्याचा निकाल  थोड्या वेळात येइल...

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिकच्या वेळात इंग्लण्डने नॉर्वे विरुद्ध आघाडी घेतली आहे 02-01

 

-दिलीप बिरुटे

 

 


ह्या फिफाचा माझा पहिला सामना नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आता पाहिला, ऑनलाईन पाहायला फार जुगाड करावे लागले, २:३० वाजल्यापासून ३:३० पर्यंत प्रयत्न केले तेव्हा कोला टीवी ह्या व्हिएतनामी चॅनल वर मैच पाहता आली पण १ तास उलटला होता नी १-१ बरोबरी झाली होती तिथून व्हिएतनामी भाषेतील कॉममँट्री झेलत मैच पाहने सुरू केले,  इंग्लंडचा दुसरा गोल अफलातून होता, अचानक थेट गोलपोस्टवर अनपेक्षितपणे बॉल झाडला नी तितक्याच वेगवान पद्धतीने गोल केला गेला, नंतर अनेक संध्या येऊनही नॉर्वेला अटॅक करता आला नाही. इंग्लंडचे अनेक हल्ले नॉर्वेच्या गोलकीपरच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वाचले. नॉर्वेने एक चांगला हल्ला चढवला असता तर कदाचित गोल झाला असता, इंग्लंडचे पासेस अतिशय स्मूथ होते. शेवटच्या ४५ मिनिटात तर साधा गोलपोस्ट पर्यंतही बॉल नेता आला नाही नॉर्वेला. आता switz विरुद्ध अर्जेंटीना मैच पाहायला मी नसेन. झोपावे लागेल. उठल्यावर निकाल कळेलच. तो पर्यंत कुणाला इंग्रजी कॉमँट्री सह ऑnlain मैच पहायचा चकटफू जुगाड माहीत असेल तर सांगा. 


फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यात फ्रान्स जिंकले. 
स्पेन विरुद्ध बेल्जियम,  स्पेन जिंकले. 
नॉर्वे विरुद्ध इंग्लंड,  इग्लंड  जिंकले. 
अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड आज अर्जेंटीना जिंकले. 

 

फ्रान्स विरुद्ध स्पेन, दि. १५ जुलै,  बुधवारी रात्री  १२;३० वाजता. 
इग्लंड विरुद्ध अर्जेंटीना, १६ जुलै, गुरुवारी रात्री १२:३० वाजता. 

-दिलीप बिरुटे

 


 


In reply to by खिलजि

ज्यांचा राग आहे क्रिकेट वर गुलामांचा खेळ इत्यादी इत्यादी कारणांनी. त्यांना चालेल का इंग्लंड जिंकलेलं ? आपल्याला गुलाम करणाऱ्यांनी मुक्त खेळ इत्यादी जिंकलेला वगैरे वगैरे ? 😂😂😂😂


In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पेनचा फायनल प्रवेश दिसत आहे, अजून वीस मिनिट खेळ बाकी...

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रान्सचं जीव् तोडून आक्रमण करीत आहे, एम्बापेवर सर्व भरवसा पण स्पेनचा बचाव आणि आक्रमण यापुढे फ्रान्स फीका पडत चालला आहे. 85 मिनिटाचा खेळ झाला आहे प्रचंड वेगवान खेळ धूसमुसळेपणाचाही वेग वाढलाय शेवटचे काही मिनिट बाकी

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिंकला स्पेन! फ्रान्स ने एकही हल्ला केला नाही, अगदी नावकही टीम खेळतेय असे वाटले. स्पेन चा खेळ प्रचंड म्हणजे प्रचंड चांगला होता. फ्रांसचे पासेसही धड नव्हते, अलगद बॉल काढून न्यायचे स्पॅनिश खेळाडू! स्पेनची जागा पक्की झाली आहे फायनलला! आता इंग्लंड अर्जेंटिनात इंग्लंड जिंकावा अशी फार ईच्छा आहे!


अंतिम फेरी अर्थात फायनलला पोहोचले.. सविस्तर गप्पा सकाळी करुया...

 

-दिलीप बिरुटे


ह्यावेळी इंग्लंड विश्व चषक जिंकेल असे गट फिलिंग आहे ! अर्थात गट फिलिंग बऱ्याच बाबतीत निरर्थक असते !


काल १२:३० ची अलार्म लावून झोपलो पण काय उठल्या गेले नाही, अर्जेंटीना फायनएलटी मधे धडकला! इंग्रज जिंकावेत आही फार ईच्छा होती,  पण गळपटले! कशी झाली मैच?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आदल्या दिवशी मध्यरात्रीचा मॅच संपवून नंतर झोंपेचं खोबरं झालेलं सकाळीच उठून पुन्हा कामेही होती दिवस सर्व पांगुन गेला होता.

 

काल इच्छा असूनही इंग्लण्ड आणि अर्जेंटीना पाहिला नाही. सकाळी डोळे उघडल्यावर स्कोर बघितला अर्जेंटीना 02- इंग्लण्ड 01 असा निकाल पाहुन आनंद झाला. आज दिवसभरात क्षणचित्रांचा आनंद घेतला.  इंग्लण्ड 01 गोलची आघाडी होती शेवटच्या  दहा मिनिटात  अर्जेंटीनाने हरलेला मॅच दोन गोल करुन जिंकला.

 

आता स्पेन आणि अर्जेंटीचा फायनल मॅच दुस-या दिवशी सुटी घेऊन बघणे आले.

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम सेम! पहाटे २:३० पर्यंत स्पेन फ्रान्स पाहीली नी नंतर रात्रभर झोप आली नाही डिपसिक सोबत रात्रभर गप्पामारून सकाळी सात वाजता कामावर सुटलो, अख्खा दिवस पेंगत गेला रात्री ९ वाजता १२:३० ची अलार्म लाऊन गाढ झोपी गेलो नंतर १२:३० ला अलार्मच्या आवाजाने जागलो पण बंद करून पुन्हा आडवा झालो नी सकाळी ऊट्या उठल्या स्कोर पाहिला नि श्या हे उद्गार आले. मागच्या फायनला अर्जेंटीना जिंकावा अशी दार इच्छा होती पण ह्यावेळी अर्जेंटीना फायनललाच पोहोचू नये अशी फार ईच्छा होती.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अर्जेंटिना जिंकली म्हणण्यापेक्षा इंग्लड हरले ....

आता स्पेन - अर्जेंटिना फायनल कशी होते बघूया ...

(फ्रान्स ला सपोर्ट होता पण त्यांनी निराशा केली )


In reply to by Bhakti

😅😅 कमाल आहे.

४ वर्षांपूर्वी मेसीचा संघ जिंकला तो आनंद अजूनही आठवतो, परत इतिहास रिपीट होणार का??


In reply to by Bhakti

फायनल अर्जेंटिनाच जिंकणार आहे, कुणीही पैंज लावा!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

हो तर मेस्सीकडून अंबानीने मोठी पूजा करून घेतली तर 😅

मेस्सी आणि अंबानी कनेक्शन 😂

नक्की पहा रील 

https://www.instagram.com/reel/Dajv-JAyg6w/?igsh=M2VoNjh5c2k1Y3d1


In reply to by Bhakti

१९ नंबर कॉन्स्पिरेयांसी इन फिफा😂तुफान हसतेय. नक्की पहा.

https://www.instagram.com/reel/Da4UGbbOlFa/?igsh=MTB1ZTFld3V5bGVzMw==


मी मेस्सी टीम कडून अर्थात अर्जेंटीना. अर्जेंटीना जिंकली तरी, अंपायर व्हिडिओ फॉल्स सगळं दुर्लक्ष करून अर्जेंटीना पक्षपात करून जिंकला एवढं ऐकले की मित्रो म्हणून डोळे मिटायला मोकळा... ;)

 

-दिलीप बिरुटे

 

 


अर्जेंटीना जिंकेल हे मला माहितीय पण मला स्पेन जिंकावा असे वाटतेय. स्पेन जिंकला तर तो चमत्कारच असेल! बाकी फ्रान्स स्पेन मैच मधे एकही बॉल डोक्यावरून गोलपोस्ट जवळ मारण्यात फ्रान्स अपयशी ठरला हे कसे शक्य झाले?


फायनल सुरू झालीय, स्पेनने जोरदार हल्ले चढवले सुरुवातीला पण यश आले नाही! नंतर ढकलाढकली सुरू झाली, त्यातूनही कुणाला काही मिळाले नाही, तात्या सुध्दा आलेत मॅच पाहायला!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

26 मिनिट्स झाले. दोन्ही कडून जोरदार आक्रमण सुरु 0- 0 बरोबरी आहे.

 

बघू कोण जिंकते.

 

_दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पेंन भारी खेळतोय अर्जेन्टीनाच्या तुलनेत.

अजुनही कोणाचा गोल नाही


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत! स्पेन सहज बॉल काढून नेतोय, स्पेनने असंच खेळ सुरू ठेवला नी एखादा झोतात हल्ला चढवला तर गोल दूर नाही. अर्जेंटिनाला स्पेनची भक्कम फळी भेदावी लागणारे जी फार कठीण आहे. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

0-0  आज स्पेन विश्वकप नेतो असे वाटत आहे. खेळ पाहता.

अर्जेण्टीना शेवटी आक्रमण आणि चमत्कार करतो.  बघूया दुस-या हाफ मधे...

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पेन वाल्यांचा खेळ जबरा आहे.  अजेंटिनाच्या गोल कीपर कौतुक करावे तेवढे कमी. अजुन खेळ बाकी.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच लिहायला आलो होतो, आर्जेंटीनाच्या गोलकीपरच्या भरवशावरच गोल वाचले, नाहीतर स्पेनचे ४ गोल तरी झाले असते. पण मला वाटतय आता मैच अर्जेंटिनाच्या बाजूने झुकेल, पेनल्टी शुटाउट मधे गेली मॅच तर मग अर्जेंटिना जिंकेल. आता उरलेल्या खेळात मजा येणारे.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पेन कडून गोल कड़े आक्रमण वेग अर्जेन्टीनाच्या तुलनेत खुप आहे. अर्जेंटीनाला शेवटी जाग येते तरीही स्पेन आज भारी

0 - 0

 

-दिलीप बिरुटे


+१ स्पेनचे तोफगोळ्यासारखे येणारे हिट निधड्या छातीने अडवणाऱ्या अर्जेंटिनाच्या गोलकीपरचे मनापासून कौतुक! शेवटची यमाल ची हिट तार काय वाचवली त्याने. जबरजस्त!


90 मिनिट्स खेळ संपला. दोन्ही हाफ मधे स्पेन वरचढ़ होता. अर्जेंटीनाच्या गोलकीपरने अफ्लातुन गोलकिपरिंग केले. किमान सहां सात गोल वाचवले.

अधिकच्या वेळात निर्णय लागतो की पेनल्टी शूटवर मॅच जातो. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो गोल द्यायला हवा होता स्पेनला असे वाटते! बाकी अर्जेंटिना कडे १ तर स्पेनकडे ११ मेस्सी आहेत. अर्जे गोलकीपरने एकूण ११ गोल वाचवले.  आता पेनल्टी शुटाउट आहे बहुतेक. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिकच्या वेळात स्पेनचा पहिला गोल खरं तर स्पेनला आज विजयी घोषित करून टाकावे इतका अप्रतिम खेळ त्यांनी केला आहे. 

 

मेस्सी मैदानात दिसत नाही त्याच खेळही दिसत नाही सर्व बचाव स्पेनने भेदुन काढला आहे.

 

-दिलीप बिरुटे


स्पेन 1 - अर्जेंटीना 0  अशा त-हेने अप्रतिम खेळ करणरा संघ स्पेन विश्वविजेता ठरला. अर्जेंटीना आजच्या सामन्यात कुठेच् नव्हता गोल कीपर केवळ गोल वाचवत होता. अर्जेन्टीनाच्या गोलकीपरने कमाल गोलकिपरिंग केली. मेस्सी अजिबात जाणवला नाही.

 

स्पेनचं अभिनंदन.

 

-दिलीप बिरुटे 


मला शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती की अर्जेंटीना गोल करणार, मैच १-१ बरोबरीत जाणार नी पेनल्टी शुटाउट मधे अर्जेंटीना जिंकणार. पण १ गोल होऊनही स्पेनने आजीबात सामन्यावरून पकड ढिली केली नाही.


अरे रे, ऐन फुटबॉल worl cu  मध्ये हा धागा पाहता आला नाही.. तेव्हडीच मज्जा..

 

बाकी मेस्सी आणि अर्जेंटीना मला आवडायचा आधी परंतु इजिप्त पासूनच्या match पासून मात्र मला सा संघ आवडेनासा झाला... आणि त्या पुढील प्रत्येक सामान्यात त्यांचा धसमुसळा खेळ, पंचांचे निर्णय याने वाईट वाटले...

 

आणि शेवटच्य  सामन्यात स्पेन ला सपोर्ट करत असल्याने खुप्पच मज्जा आली..

आणि धसमुसळा खेळ करणारा अर्जेंटीना हरला त्याचा आनंद झाला...

 

स्पेन इतकी भारी खेळेल आणि त्यांचा defense अर्जेंटीना भेदू शकणार नाही ह्याची बेट मी जिंकली...

 

आणि स्पेन ने चिडक्या लोकांना तोंड दाखवायला पण जागा दिली नाही या बद्दल स्पेनचं कौतुक...

 

कॉलेजला मी गोलकीपर असल्याने अर्जेंटीना च्या गोळकिपरचे तरी हि मला कौतुक वाटले... तो एकटाच काय तो स्पेन चा विरोध करू शकला...

 

असो...