Skip to main content

तुमचे प्रिय म आं जा संस्थळ कोणते आहे?

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 23/06/2026 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

मग्रूर, स्वमग्न  | "ऐसी" ज्यांची ख्याती 
पडीक असती | ऐ x वर ||१||

कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
लोटले सगळे | मा x वरी ||२||

उर्वरित गुण-  | -दोषांनी भरले 
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||

आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||४||

(दगडफोड्यांनी | केली सूुरूवात 

तयाचा शेवट |  अनिश्चित ||५||) :)

लेखनविषय:

वाचने 521
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आवडली हो आवडली! कविता आवडली.

आता कुणी म्हणत असेल, हा तर अभंग आहे मग "अभंग आवडला" असे म्हणा तर ते होणार नाही.

मला straight forward पणे "आवडली" असे म्हणायला आवडते, "आवडला" असे म्हणायला आवडत नाही!

 


उर्वरित गुण-  | -दोषांनी भरले 

तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||

 

  अगदी अगदी. मिपावरचे लोक दूष्ट दूष्ट वैट्ट वैट्ट आहेत.


In reply to by अनन्त्_यात्री

ते मधले भांडे रसभंग करत होते ना ? आता बघा: 

(या निमित्ताने बोर्घीज गॅलरीची आठवण करून देण्याबादल आभार)


In reply to by चित्रगुप्त

लपविलेत जरी भांडे तुम्ही 
(वि/अ)शुद्ध हेतू लपेल का?
मिपाकरांना रुचेल का? :)


In reply to by अनन्त्_यात्री

"भांडे का लपविता" ह्या नावाची एक गाजलेली मिपाकविता आठवली.


प्रतिसादात सगळेच सुटलेत आता. एकापेक्षा एक.

 

मिसळपाव करी 

ऐसी माय बोली

मराठीचा उपास

येथेची सोडी


अरेरे आम्ही गुण दो्षांनी भरलेले आहोत काय 😔

अनंत् यात्री तुम्हीपण या प्रश्नमंजुषा मालिकेत सामील झाला?? 🙄😂


In reply to by Bhakti

या प्रश्नमंजुषा मालिकेत सामील व्हावे लागले 

https://www.misalpav.com/poem/53723

:)


राजाला एकाहून अधिक राण्या असल्यावर त्याची आवडती राणी कोणती असा प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे?  तो जेव्हा जिच्या महालात असेल त्यावेळी तीच राणी त्याची आवडती असणार ना?