Skip to main content

प्रश्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 08/06/2026 20:54 या दिवशी प्रकाशित केले.

लिहिशील एखादी कविता? जी मुळांपासूनी मला-
-गदागदा हलवून विचारील प्रश्न जुना, विसरला

ज्या प्रश्नाचे उत्तर शोधित सैरभैर फिरलो
निरुत्तराच्या उंबरठ्यावर कितिदा अडखळलो

आठवून ते पुन्हा एकदा विकल, व्यथित झालो
शब्दांचे ओलांडून कुंपण मग इथवर आलो

अस्तित्वाची काच तडकते- त्यावरती पारा
अचपळ शब्दांचा, प्रतिबिंबी तोच प्रश्न बोचरा

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 45
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया