मग्रूर, स्वमग्न | "ऐसी" ज्यांची ख्याती
पडीक असती | ऐ x वर ||१||
कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
लोटले सगळे | मा x वरी ||२||
उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||
आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||४||
(दगडफोड्यांनी | केली सूुरूवात
तयाचा शेवट | अनिश्चित ||५||) :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
217
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली हो आवडली! कविता आवडली…
आवडली हो आवडली! कविता आवडली.
आता कुणी म्हणत असेल, हा तर अभंग आहे मग "अभंग आवडला" असे म्हणा तर ते होणार नाही.
मला straight forward पणे "आवडली" असे म्हणायला आवडते, "आवडला" असे म्हणायला आवडत नाही!
हा हा हा.....
आम्ही भटक्या जमातीचे ,वडारी
उर्वरित गुण- | -दोषांनी…
उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||
अगदी अगदी. मिपावरचे लोक दूष्ट दूष्ट वैट्ट वैट्ट आहेत.
इश्श्य SSSSS आम्ही नाही जा SSSSSS
आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||४||
इश्श्य SSSSS आम्ही नाही जा SSSSS
उखाण्यात नाव घ्या.. ;-)
In reply to इश्श्य SSSSS आम्ही नाही जा SSSSSS by चित्रगुप्त
उखाण्यात नाव घ्या.. ;-)
लाजू नका, लाजू नका, लाजू नका.. तुम्हा
In reply to इश्श्य SSSSS आम्ही नाही जा SSSSSS by चित्रगुप्त
लागली कुणाची उचकी ssss
हा घ्या सचित्र उखाणा.
संस्थळ कोणते आवडते, यात्रींनी केली पृच्छा,
मिपामंचकी पडीक रहावे, हीच माझी इच्छा.
Censor!
In reply to हा घ्या सचित्र उखाणा. by चित्रगुप्त
Censor!
Censor! मग हे घ्या.
In reply to Censor! by अनन्त्_यात्री
ते मधले भांडे रसभंग करत होते ना ? आता बघा:
(या निमित्ताने बोर्घीज गॅलरीची आठवण करून देण्याबादल आभार)
माझे ऐसिमिसळबोली .कॉम
माझे ऐसिमिसळबोली .कॉम
प्रतिसादात सगळेच सुटलेत आता…
प्रतिसादात सगळेच सुटलेत आता. एकापेक्षा एक.
मिसळपाव करी
ऐसी माय बोली
मराठीचा उपास
येथेची सोडी
येथेची सोडीअश्लिल अश्लिल…
येथेची सोडी
अश्लिल अश्लिल अश्लिल