Skip to main content

वगैरे वगैरे

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/04/2026 21:47 या दिवशी प्रकाशित केले.

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे

करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 16/03/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला !