मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले
कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले
बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले
सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले
दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------
अवांतर :
याहो पवारदादा, इकडे अभय जरासे
चिक्कार घाम जाता --णे कठीण झाले
------------------------------------------------------
वाचने
10552
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर...
सुंदर
In reply to सुंदर... by मदनबाण
भयाण परिस्थितीचे हुबेहुब वर्णन..
-
छान..
छान, पण
मनपूर्वक धन्यवाद.
आपले लिखाण खरोखर दर्जेदार व प्रचंड वास्तववादी असते.
स्पर्धा विजेती गझल
अभिनंदन! आवडली गझल...
In reply to स्पर्धा विजेती गझल by गंगाधर मुटे
अभिनंदन !
"तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार"
- सरकारे येतात आणि जातात.
In reply to "तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार" by आयुर्हित
"कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश"
- मी तुम्हाला मतीमंद किंवा
In reply to "कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश" by आयुर्हित
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
In reply to - मी तुम्हाला मतीमंद किंवा by गंगाधर मुटे
कुर्हाडीचा दांडा
In reply to तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार by आयुर्हित
गुजरात विकासाचे मृगजळ..
In reply to कुर्हाडीचा दांडा by गंगाधर मुटे
- गुजरातचा शेतकरी FIVE STAR
In reply to गुजरात विकासाचे मृगजळ.. by आयुर्हित
"भाव दृढ करा"
In reply to - गुजरातचा शेतकरी FIVE STAR by गंगाधर मुटे
आत्महत्या करण्याची पाळी
In reply to "भाव दृढ करा" by आयुर्हित
तोट्यात कास्तकारी
In reply to गुजरात विकासाचे मृगजळ.. by आयुर्हित
परत एक तोडका मोडका प्रयत्न...
"कोथींबीर महागली,अन
In reply to परत एक तोडका मोडका प्रयत्न... by मदनबाण
ओक्के. अजुन एक चूक झाली, २
In reply to "कोथींबीर महागली,अन by गंगाधर मुटे
अभिनंदन! गझल आवडली.
छान !
तेव्हाही परिस्थीती बिकट होती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]