या साड्यांचं काय करायचं?
नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.
तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं?
घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात. कारण अशा साड्यांना मागणी नाही. रोजच्या वापराचे कपडे त्यातल्या त्यात कुणाला हवे असतात. निदान आपण ते खूप वापरतो तरी!
स्त्रियांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांशी मी संपर्क साधला पण त्यांची उत्तरं अशी होती...
१. आम्ही फक्त पैशात देणगी स्विकारतो
२. आम्ही आदिवासींसाठी काम करतो. त्यांना सुती आणि नऊवारी साड्या लागतात. शक्यतो नवीन द्या किंवा रोख रक्कम द्या.
३. आता आमच्या कडील मुली साड्या नेसत नाहीत.
इत्यादी इत्यादी...
पुनर्वापर करणाऱ्यांना संपर्क केला. अशा साड्यांपासून ते सुंदर, सुंदर पिशव्या,पर्सेस, पडदे,कुशन कव्हर, रजया वगैरे बनवून देतात. म्हणजे त्यासाठी दक्षिणा देऊन वेगळ्या स्वरूपातील ढीग घरातच ठेवायचा.
जरीसाठी साड्या घेणारे असतात पण अलीकडे पैठणीत तरी कुठे खरी जर असते? ( अर्थात खऱ्या जरीची आपण कशाला टाकू?)
अशा अनेक कारणांमुळे मी भंडावून जाते. उघड्या डोळ्यांनी साड्या फेकून द्यायला मन धजावत नाही. पुन्हा एकदा एक अंगावर एक दांडीवर असं जगणं जमेल का हा विचार डोक्यात घोळू लागतो.
तर मंडळी, याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? आणि हो, यावर तुम्ही काय उपाय करता ते जाणून घेण्यासाठी हा धागा.
वाचने
4124
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
१.पन्नाशीच्या पुढच्या
जुन्या बाजारात
ह्म्म...सगळया कपड्यांची हीच समस्या आहे!!
श्री. रितेश देशमूख व सौ.
बायकी विषयावर पुरुषी प्रतिसाद. गम्मत आहे.
साड्यांपासून टू पीस पंजाबी
In reply to साड्यांपासून टू पीस पंजाबी by कंजूस
एक ही मारा
In reply to साड्यांपासून टू पीस पंजाबी by कंजूस
साड्यांचे सदरे ?
In reply to साड्यांचे सदरे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारीच.
बोहारिणी हा प्रकार संपला का ?
In reply to बोहारिणी हा प्रकार संपला का ? by सौन्दर्य
बोहारिणी प्रकार संपलेल्यात
In reply to बोहारिणी प्रकार संपलेल्यात by कंजूस
सोलापूरला काशीकापडी म्हणून एक
पाट टब इत्यादी वस्तू
circular fashion चा अवलम्ब करावा
ढीग न जमावा यासाठी ....
साड्यांची लायब्ररी सुरू करा.
साड्यांचं ठीक आहे
In reply to साड्यांचं ठीक आहे by अकिलिज
ह्यो वायलं आन त्यो वायलं
आमच्या सासूबाई १० वर्षा
In reply to आमच्या सासूबाई १० वर्षा by सुबोध खरे
छान विचार! तुमच्या वडिलांचे
उपाय हा जीवघेणा
या गहन प्रश्नावर उपाय निघायचा तेव्हा निघो
साड्यांचे कपडे
एक किस्सा
In reply to एक किस्सा by हणमंतअण्णा शंक…
अरे वा! माझे लग्न झाले तेव्हा
In reply to अरे वा! माझे लग्न झाले तेव्हा by अमरेंद्र बाहुबली
अरे वाह! क्या बात है!
In reply to एक किस्सा by हणमंतअण्णा शंक…
वाह वाह , प्लीज या ड्रेसचा
In reply to एक किस्सा by हणमंतअण्णा शंक…
जुनी साडी रिपर्पज करून केलेला माझा लग्नाचा पोषाख
In reply to जुनी साडी रिपर्पज करून केलेला माझा लग्नाचा पोषाख by हणमंतअण्णा शंक…
वाह ,काठही सुबक निवडले आहेत
हा एक जुना लेख सापडला.
पुर्वी साड्यांच्या गोधड्या
नमस्कार
महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल
संवेदना की वेदना
In reply to संवेदना की वेदना by सर्वसाक्षी
चटका बसल्यावर वेदना होणारच!
In reply to चटका बसल्यावर वेदना होणारच! by धर्मराजमुटके
असहमत
In reply to संवेदना की वेदना by सर्वसाक्षी
ये खत्म क्यु नही होता
ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं.स्टोरी इथेच थांबत नाही. हे सगळे तर तमाम नवरोबांनी "अगदी अगदी" म्हणायलाच पाहिजे अशी घोषणा अहे पण पुढे .... "बघ की क्रीती सॅनॉन कसली भारी नेसती" "एकदा येवला/इंदूर/वाराणसी/म्हैसूर्/कोची/चेन्नै ला गेले की................" "बघा तुमच्या मित्राने सेपेरेट वॉकिन वॉर्डरोब करुन घेतलाय बायकोसाठी...." "कपाटातल्या काही आईला/बहिणीला देते मग जागा रिकामी झाली की....." "एखादी तरी पैठणी किंवा सिल्क पाहिजेच सुनेला द्यायला वारसा म्हणून......." "शेवटी साडीचा ग्रेस साडीलाच....." . हे अगली बार..... असतेच.......