Skip to main content

राहणीमान

या साड्यांचं काय करायचं?

लेखक नूतन यांनी बुधवार, 21/01/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात. तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं? घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात.

सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 23/08/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे... आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?