मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतात अनागोंदी माजू शकेल का?

शाम भागवत · · काथ्याकूट
https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1 काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. :) ०:०० ते १२:५१ १.पूर्वी आपण नोटा छापायचं काम करण्यासाठी प्रिंटिंग प्लेट्स वापरायचो. विशीष्ट प्रकारचा कागद बाहेरून मागवून तो वापरायचो. या प्रकाराला प्लैट बेड पध्दत म्हटले जायचे. पाकिस्तानला हा कागद मिळवता आला आणि त्या प्रिंटिंग प्लेटस् बनवता आल्या की पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं अगदी सहज शक्य होते असे. नोटबंदीनंतर पाकिस्तानने उभारलेला हा उद्योग बंद पडला. पण हा तात्पुरता फायदा होता. नविन डिझाईन नवीन प्रकारचा कागद इपोर्ट करून नवीन नोटा छापून हा प्रश्न आपण काही काळासाठी सोडवला तरी पाकिस्तान यावर तोडगा काढणार हे आपल्याला माहीत होतं. कारण कागद बाहेरून मागवला होता व त्याची माहिती पाकिस्तानला मिळवणं अशक्य नव्हतं पण अवघड होतं. त्यामुळे काही काळ उसंत मिळणार होती. मात्र आता आपण नवीन तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. त्याला सिलींडरिक मोल्ड पध्दत म्हणतात. या सिलिंडरमधे नोटांचे सर्व सुरक्षीततेचे तपशील भरलेले/खोदलेले असतात. कागद बनवायचा लगद्यामधे हा सिलिंडर टाकला जातो व त्यांत फिरवला जातो. म्हणजे लगदा त्या सिलिंडरवर जमा होऊन कागद तयार होतो. त्यामुळे कागद तयार होणे व त्यावर नोटेचे सगळे तपशील उमटणे एकदमच होते. हे आधुनिक तंत्रज्ञान फक्त चार ठिकाणीच वापरलं जातंय. इतकं ते नवीन आहे. त्यामुळे पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं सहज सोपं राहिलेलं नाही. शिवाय नोट छापायचा खर्च आता खूपच कमी झालाय. वेग प्रचंड वाढलाय. तसेच खोट्या नोटा शोधणं फारच सोपं झालंय. एकवेळ पाकिस्तानला भरपूर प्रयत्नाअंती कागद तयार करणं जमू शकेल पण सिलिंडर बनवायला अतिशयच अवघडं आहे. कारण तो सिलिंडर आपण बनवला आहे व त्याचे डिझाईन आपल्याकडेच आहे. १६:०५ ते १७:५८ २. देशांत अतिरेकी तयार होणे, आंदोलने, त्यात जाळपोळ, हिंसाचरा होऊन देशांत अंधाधुंदी माजणं ह्या गोष्टी अर्थव्यवस्था ठीक नसल्यामुळे होतं असतं. नजीकच्या इतिहासात बघता हेच दिसतंय. प्रथम श्रीलंका, मग बांगला त्यानंतर नेपाळ मधे असंच घडलंय. इराणमधे तर आपण सध्या अनुभवतच आहोत. भारताताही विरोधी पक्ष असं काही व्हावं म्हणून प्रयत्न करत असूनही, काहीही होत नाहीये, कारण भारतातली अर्थव्यवस्था एकदम ठीक आहे. सतत वाढतीय. रोजगार वाढतोय. परदेशी गुंतवणूक येत राहतीय. तंत्रज्ञान येत राहीलंय. जेन जी ला मुद्रा लोन मिळतंय. मुख्य म्हणजे मुद्रा लोनमधे बुडीत खात्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. मुद्रा लोनमधील सरकारी बॅंकांचे पैसै बुडण्याचं प्रमाण ३-४ टक्के इतकच आहे. तर खाजगी बॅंकांत ०.९५ टक्के इतकंच आहे. आणि २०१५ ते २०२५ या कालावधीत एकूण ३३ लाख कोटी एवढं कर्ज दिलं गेलंय. निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय. गंमत म्हणजे राहूल गांधींना वाटतंय की हे जेनजी उठाव करतील. मोदींना पळवून लावतील. पण तसं काहीच होत नाहीये. आंदोलने होताहेत. पदयात्रा निघताहेत. आरोप होताहेत. पण वावटळ जाओ साधा वाराही वाहात नाहीये. १९:०९ ते २१:३८ ३. चीन बॉर्डरकडे आपण दुर्लक्ष केलं. का? तर चीन नाराज होईल. भारताचे माजी संरक्षण मंत्रीॲटंनी म्हणतात की, आमच्या काळात चीनने सिमेवर कुरबुरी केल्या नाहीत. आता मात्र चीन कुरबुरी करतोय. कारण एकच. मोदींचं धोरण चुकतंय. पण चीनने बॉर्डरपर्यंत सहा लेनचे रस्ते बनवले. रेल्वे आणली तरी आपण काहीच करायचं नाही? ते एका दिवसांत बॉर्डरवर येणार. आपल्याला पोहोचायला ३ आठवडे लागणार. कुमक पोहोचेपर्यंत सिमेवरील सगळे सैनिक गारद झालेले असणार. गलवान झालं. डोकलाम झालं. पण का झालं? आपण सिमेवर रस्ते व पूल उभारायला लागलो म्हणूनच झालं ना? जर शत्रूला आपलं वागणं योग्य वाटत नसेल तर आपण योग्य तेच करतोय असंच समजायला पाहिजे. आता आपणही एक दिवसात मोठी कुमक सिमेवर पाठवू शकतो. काही ठिकाणी तर सहा तासात पोहोचू शकतो. रणगाडे नेणारी विमाने उतरवू शकतो. तशा सोयी झाल्या आहेत. सिमेवरच्या सैनिकांचे मनोधैर्य आता किती उंचावले असेल याची कल्पना करून पहा. ही सैन्यशक्ती भारतात अराजक माजले तर मोदींना सोडून राहूल गांधीच्या बाजूला वळेल? २२:०८ ते २४:१७ ४. २०१४ च्या अगोदर गरीब लोकांकडे बॅंकखाती नव्हती. असा समज होता की खात्यात पैसे ठेवायला त्यांच्याकडे पैसे कसे असतील? २०२५ पर्यंत ५६ कोटी गरीबांची झीरो बॅलन्स खाती उघडली गेली आहेत. २०२५ च्या शेवटी त्यांत २.६७ लाख कोटी रूपये शिल्लक होती. ह्या खातेदारातील ६७ टक्के ग्रामीण/ निमशहरी भागातील आहेत. पूर्वी एखाद्या गावातील कोणाला एखाद्या स्कीममधून पैसे मिळायचे असतील तर प्रधानमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे, मग चीफ सेक्रेटरीकडून अर्थखात्याच्या सेक्रेटरीकडे, मग डिव्हीजिनल कमीशनर, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्टेट म्हणजे कलेक्टर, मग तिथून सीडीओ, जिल्हा परिषद मग गावप्रमुख व ग्रामसेवक अशी उतरंड असे. प्रचंड वेळ खाऊ पध्दत होती ती. शिवाय प्रत्येक टप्यावर भ्रष्टाचार होत असे. राजीव गांधींनी तर सांगितले होते की, केंद्रातून एक रूपया ग्रामिण लाभार्थीसाठी दिला गेला तर त्यातले १४ पैसे लाभार्थ्याला मिळतात. उरलेले ८६ पैसे मधल्यामधे गडप होतात. आता पूर्ण रुपया लाभार्थीला मिळतो व तो ही तात्काळ. पूर्वीची पध्दत व आत्ताच्या पध्दतीमधील फरक कळणारा आंदोलने करून मोदींना सत्तेवरून खाली खेचायला मदत करेल ? ‌ २४:२५ ते शेवट ५. असं म्हटलं जातं की, मोदी सरकार इडीचा खूप वापर करते. पण लक्षात घ्या युपीएने जरी इडीचा कायदा केला असला तरी ते त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडले. युपीआय पेमेंट सिस्टिम आल्यावर कॅशमधे मोठे व्यवहारच होत नाही. जर झाले तर तात्काळ ते नजरेस येतात. डिजीटायझेशनमुळे आर्थिक व्यवहारांचे ट्रेस शोधणे खूप सोपे झाले आहे. घोटाळे झटकन उघडकीस येतात. बेनामी कंपन्यांचे जाळे उभे करून भुलभुलैय्या निर्माण करणे आता इतके सोपे राहिलेले नाही. याचा फायदा मोदींना होतो हे कोणी लक्षातच घेत नाहीये. तेलगी घोटाळे आता होऊच शकत नाहीत. लपवाछपवी आता करताच येत नाही. आता अर्थव्यवस्थेचे जाळे तुकड्या तुकड्यात विणले जात नाही. ते आता एकसंध झालंय. कागदी नोटा, डिजिटल करन्सा,स्टँप पेपर, सेंट्रल बँक, इतर सरकारी व खाजगी बँका, सरकारी मुद्रणालय, सरकारी प्रेस सगळे एकत्र काम करतात. पण हे सगळं मोदींनीच केलंय ना मग त्यांना गुन्हेगार अगोदरच्या सरकारपेक्षा भरभर सापडतात हा दोष त्यांचा कसा काय ? https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1

वाचने 6413 वाचनखूण प्रतिक्रिया 80

कपिलमुनी Wed, 01/14/2026 - 17:21
बॅट का ग्रीप.. फक्त आरोपी म्हणा आणि ईडी ने शाबीत केलेले गुन्ह्याची टक्केवारी शोधा. गुन्हा शाबित झाल्याशिवाय गुन्हेगार नसतो.

In reply to by कपिलमुनी

शाम भागवत Wed, 01/14/2026 - 18:05
गुन्हेगार शब्दप्रयोग चुकलाय. “घोटाळे“ हा शब्द योग्य वाटतो. पण हे सगळं मोदींनीच केलंय ना मग त्यांना घोटाळे अगोदरच्या सरकारपेक्षा भरभर सापडतात हा दोष त्यांचा कसा काय ?

चौथा कोनाडा Wed, 01/14/2026 - 17:27
रोचक लेख... सकारात्मक मुद्द्यांमुळे छान वाटले... भारतात अनागोंदी माजू शकण्याची शक्यता सध्यातरी नाही हा विचारांने दिलासा मिळाल्या सारखे वाटले. आणि अवांतर सांगायचं म्हंजे आपण म्हन्जे मी सामान्यजन असल्याने अनागोंदी साठी कुठं काय कटकारस्थानं होत आहेत याची कल्पना येणं कठीण आहे....

In reply to by शाम भागवत

कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 03:36
तेल महागले की अर्थव्यवस्था ढासळू लागेल. मग फक्त राजकीय सत्ता मिळवणे ही चढाओढ लागेल. जी कायम चालूच असते. परंतू देश चालवणे मात्र कुणालाच जमणार नाही. अनागोंदी सुरू होईल. हल्लीच काही इतर देशांत ही अनागोंदी सुरू झालेली दिसत आहे. त्या देशांकडे नाहीत विशेष उद्योग किंवा विशेष खनिज साठे. केवळ पर्यटनावर पैसे मिळत होते तेही बंद पडू लागले. आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आपले अन्नधान्य आपणच पिकवणे हे मोठा मूलभूत उद्दिष्ट आहे. तेलाच्या किंमती वाढल्या तर ते अन्नधान्य देशातच वितरित करणेसुद्धा परवडणार नाही. बाहेरून मागवणेही महागच पडेल. कोणतीही राजकीय सत्ता आली तरीही यातून मार्ग काढू शकणार नाही. आमच्याकडे पूर्वीची सत्ता चांगली होती आणि तीच आता तारेल असं काही होणार नाही.

In reply to by कंजूस

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 04:44
युक्रेन रशिया युध्द सुरू झाल्यावर तुम्ही म्हणताय तसं तेल आयातीवर अवलंबून असलेल्या सर्व देशांत झालंय. युरोपचं तर कंबरडं मोडलंय. महागाई या सर्व देशात वाढलीय. जीडीपीचा दर घसरलाय. परकीय चलनाची गंगाजळी आटत चाललीय. फ्रान्स सारखे देश तर आयएमएफ कडे लोन मागायला लागले आहेत. युध्द सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनंतरची स्थिती आहे ही. अपवाद भारताचा आहे. या सगळ्या आघाड्यावर भारताची स्थिती भक्कमच राहिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तेलाच्या ३ वर्षाच्या राजकारणांत भारताने पैसे कमावले आहेत. गमावलेले नाहीत. रशियाला कोंडीत पकडायची अमेरिकेचे धोरण साफ फसलंय. युक्रेन हरत चाललंय. रशिया जिंकतच चाललंय, मला तरी कुठेच निराशा वाटावी असं तेलाचं संकट दिसत नाही आहे. मागील ३ वर्षात १. सलग घट: थोडक्यात सांगायचे तर २०२२-२५ या काळात महागाई नियंत्रणात आणण्यात यश आले असून, २०२५ मध्ये त्यात लक्षणीय घट झाली आहे. २. सलग वाढ: भारत सलग तिसऱ्या वर्षी ७% पेक्षा जास्त जीडीपी वाढ नोंदवण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान मजबूत झाले आहे. २०२६ मधे म्हणजे चौथ्या वर्षात ७.४ टक्के वाढेल असा अंदाज आहे. ३. सलग सातत्य: परकीय चलन साठ्यासंबंधात भारत सतत पहिल्या पाच देशांमधे राहीला आहे. आजचा नंबर चौथा आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड फक्त पुढे आहेत. ११ महिन्याची गरज भागेल एवढा साठा भारताकडे आहे. मला वाटते १९९१-९२ ची स्थिती असल्यासारखे घाबरून जाण्याची स्थिती नक्कीच नाही. आज भारत सोन व चांदी विकणारा नव्हे तर विकत घेणारा देश बनला आहे.. तसेच यापुढेही गरज भासेल त्याप्रमाणे भारत रशियाकडून तेल घेतच राहील. त्यामुळे पुढेही भारत तेल संकटाला यशस्वीपणे तोंड देत राहील असे वाटते. मी तरी भारताविषयी सकारात्मक आहे. :)

In reply to by शाम भागवत

कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 08:21
>>भारत रशियाकडून तेल घेतच राहील.>> इराणकडूनही घेतो आपण. आता इराणचं अमेरिकेशी बिघडलंय. रशियाशी बिघडलं तर काही अडचण नाही.

In reply to by कंजूस

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 09:09
भारत जवळपास ४० देशांकडून तेल घेत असतो. त्यातील ९ टक्के तेल इराणकडून घेतो. त्यामुळे खूप मोठा अडचणीचा सामना भारताला करावा लागेल व त्यातून अनागोंदी निर्माण होईल असे वाटत नाही. भारताची सप्लाय चेन खूप मोठी आहे.

In reply to by शाम भागवत

कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 11:11
आकडेवारी कळली. धन्यवाद. आपली अर्थव्यवस्था विविध उद्योगांवर आधारित आहे त्यामुळे तीव्र धक्का बसत नाही. नोकरीसाठी परदेशी असणारे लोकही पैसे पाठवतात. पण तेल महाग झाल्यास व्यवस्था नक्कीच ढासळेल. शिवाय अमेरिका फारच ढवळाढवळ करत आहे.

In reply to by शाम भागवत

कपिलमुनी गुरुवार, 01/15/2026 - 11:21
मनमोहन सिंग यांनी दबून ठेवलेला डॉलर रुपया दर सुद्धा मोदी साहेबांच्या प्रयत्नाने ५०- ६० वरून १०० वर पोचला आहे. ग्रोथ असावी तर अशी !

टर्मीनेटर Wed, 01/14/2026 - 21:21
निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय.
१४० की १५० कोटी लोकसंख्येतला जवळपास प्रत्येक 'तिसरा' माणूस आज उद्यमी झालाय हे वाचुन डोळे पाणावले...

In reply to by टर्मीनेटर

शाम भागवत Wed, 01/14/2026 - 22:33
इथं गणित उपयोगी पडणार नाही. १. एक व्यक्ति वेगवेगळ्या उद्योगासाठी एकापेक्षा जास्त कर्जे घेऊ शकतो. २. एक व्यक्ति तोच धंदा आणखी वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकतो. ३. एक व्यक्ति शिशु, किशोर, तरुण, तरुण+ या चार श्रेण्यांमधे आपली श्रेणी अपग्रेड करून परत कर्ज मिळवू शकतो. पण असं काही करता येत नाही असं तुमचं मत असल्यास, तुमचा मुद्दा बरोबर असल्याचं तुम्ही गृहित धरायला माझी काहीच हरकत नाही. :)

In reply to by आग्या१९९०

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/15/2026 - 09:01
गुंड, मवाली, सत्तेच्या उच्च पदावर बसले आणि प्रशासकीय गुंडगीरीच्या बळावर लोकांना जेलात घालणे, गुन्हे दाखल करणे, आवाज दाबणे यामुळे तरी शक्यता नाही. बाय द वे, देशात अनागोंदी माजू शकते अशी शक्यता फक्त देशद्रोह्यांनाच वाटू शकते याच्याशी सहमत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत Wed, 01/14/2026 - 22:37
मोदी सतत ट्रंपचा उपयोगच करून घेत आले आहेत. ट्रंपच्या प्रत्येक खेळीत भारत सशक्त होताना मला दिसतो आहे. टॅरिफ प्रकराणतही ट्रॅफ फसतोय असं माझं मत आहे. पण ते लक्षात यायला अजून थोडा अवकाश आहे.

स्वधर्म Wed, 01/14/2026 - 23:12
शाम सर, जरा हलकेच घ्या हं. मुळात असा तद्दन डाव्या पुरोगामी लोकांना पडणारा प्रश्न तुंम्हाला पडला हे वाचून तुमचेही अर्नबायझेशन झाले की काय अशी शंका आली होती. पण कर्ज घेणार्‍या लोकांची तुंम्ही दिलेली आकडेवारी पाहिली आणि जीव भांड्यात पडला. त्यावर टर्मिनेटर साहेबांचा प्रश्न व तुंम्ही दिलेले उत्तर (इथे गणित उपयोगाचे नाही..) वाचून तुमची खुंटी अजून बळकट असल्याची खात्री पटली. असो. भारतात अनागोंदी माजू शकेल का? याचे उत्तर आत्ता मग अनागोंदी नाही तर काय आहे? असे असू शकेल. अनेक डेटा पॉईंट्स दाखवता येतील उदा. सुप्रीम कोर्टात निकाल द्यायला ३२४ वर्षे लागतील इतके खटले पडून आहेत संदर्भः (https://en.wikipedia.org/wiki/Pendency_of_court_cases_in_India). गुगल जेमीनी: December 2024: Data from the National Judicial Data Grid showed 82,972 pending cases. आता यालाच सुव्यवस्था म्हटले की झाले. किंवा भारतात अनागोंदी माजू शकेल का? याचे उत्तर कधीही नाही असे असू शकेल. बेडकाला एकदम उकळत्या पाण्यात टाकले तर तो जीवाच्या आकांताने बाहेर उडी मारतो. पण सर्वसाधारण तापमान असलेल्या पाण्यात टाकले व हळू हळू तापमान वाढवत नेले तर तो उडी न मारता मरून जातो पण उडी मारत नाही. हा सिध्दांत बहुधा आपल्या समाजाचा अभ्यास करूनच काढला गेला असावा असे वाटते. पानीपतचे युध्द खूप महिने चालले होते पण त्याच्या शेजारीच तिथले स्थानिक लोक रोज आपआपले शेत कसत असत म्हणे. आत्ताच्या काळात मणीपूरमध्ये इतकी जाळपोळ, अत्याचार, दंगे उद्रेक झाले. आपल्या राज्यकर्त्यांनी त्या राज्याला भेट द्यायला सुध्दा अनेक महिने लावले तरी बहुसंख्य लोकांनी ना कसला जाब विचारला न मतपेटीतून काही उत्तर दिले. त्यामुळे भारतात कधीही अनागोंदी माजू शकत नाही.

In reply to by स्वधर्म

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 04:54
मोदी असोत की राहूल गांधी, कोर्ट केसेसचा मुद्दा बदलणारा नाही. :) तसेच पेंडिंग कोर्ट केसेसमुळे आंदोलने होऊन मोदींना सत्तेवरून खेचून राहूल गांधींना सर्वेसर्वा केल जाईल असं मला तरी वाटत नाही. तसेच भारताला तुम्ही बेडूक म्हणा की काही अन्य. पण भारतात अनागोंदी माजणार नाही हे तुम्ही मत मांडल्याबद्दल धन्यवाद. :)

युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 11:19
भारतीयांचे मानसिक स्वास्थ्य वेगाने ढासळत आहे. त्याची अनेक कारणे देता येतात. लेखकाने हा मुद्दा अजिबात विचारात घेतला नाही याची गम्मत वाटली.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० गुरुवार, 01/15/2026 - 11:43
काहींना आपल्या लाडक्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते बाहेरून आलेल्या बलात्कारी, भ्रष्ट आणि गुंडांसाठी सतरंज्या टाकत आहेत, उचलत आहेत ह्यातच आनंद मानत आहेत.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 16:03
श्री० शाम भागवत ० हवामानबदलाने उभी केलेली आह्वाने ० काही देशात वाढत असलेला भारतद्वेष आणि त्यामुळे परत फिरणार्‍या भारतीयांची कुतरओढ ० लोकसंख्येच्या ताणाने वाढलेल्या मोठ्या शहरातील समस्या ० वाढता धार्मिक उन्माद (कल्पकतेला घातक ठरतो) हे सर्व घटक मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे आपणास ठाऊक असणे अपेक्षित आहे.

In reply to by युयुत्सु

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 16:48
आता यामुळे भारतातील अनागोंदी वाढून भारतातले लोकनियुक्त सरकार कसे खाली खेचले जाईल ते समजावून सांगाल का?

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/15/2026 - 11:52
AI म्हणतोय लेखक असे सांगत आहेत की: भारताने अर्थव्यवस्था, सुरक्षा, तंत्रज्ञान व गरीबांच्या कल्याणासाठी अनेक मजबूत पावले उचलली आहेत. ही सुधारणा देशाची प्रगती सुनिश्चित करणारी व भविष्याला सुरक्षित करणारी आहे. त्यामुळे विरोधकांना कोणत्याही प्रकारचे अराजक निर्माण करणे कठीण झाले आहे. लेख प्रचारकी आहे,एम! :)

कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 13:13
कधी एकदा अनागोंदी येतेय आणि दूध का दूध पानी का पानी होतंय याची ओढ लागली असेल तर होऊन जाऊ द्या एकदा अनागोंदी. इतकी आक्रमणं आली, हे आणखी एक.

In reply to by कंजूस

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 14:02
तो सगळा इतिहास झाला. त्याची पुनरावृत्ती होणार नाही एवढे बहुसंख्य लोक सुजाण झाले आहेत व त्यांची संख्या वाढतच चालली आहे.

मदनबाण गुरुवार, 01/15/2026 - 14:59
रायसीनचा वापर हा मास टेररसाठी केला जाणार होता, हा केमिकल वॉरफेअर चा जीवघेणा प्रकार! केवळ दैव बलवत्तर आणि सुरक्षा यंत्रणांना योग्य वेळी सुगावा लागला म्हणुन मोठा अनर्थ टळला.इतका भयानक प्रकार उघडकीस येऊन देखील जर कोणी देशात सामान्य स्थिती असल्याचे समजत असेल तर मग हे असचं घडतं राहणार! देशात लोक तर आता पाणी पिऊन देखील मरत आहे, कोणाला फरक पडतो, मोदी है तो कुछ भी मुमकीन है. गोदी मिडिया हा शब्द प्रयोग आता सर्वांना माहित आहे, त्यामुळे मिडीया जो लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो तोच सरकारी सेवेत राहुन मेवा खाण्यात व्यस्त आहे. सर्व प्रकारचे कर इतके झाले आहेत की सामान्य मध्यम वर्गीय माणसाचे जगणे कठीण होऊन बसले आहे, यात वीज, पेट्रॉल आणि गॅस देखील महाग. जगण्यासाठी लागणारा अर्थाजनाचा कणा मोडुन कढाण्यात सरकारी व्यवस्थेला यश आले आहे. यात आर्थिक काळ कठीण असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे, तसेच काही कंपन्यांनी पगार वाढ केलीच नाही किंवा केल्यास तो तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असतो. जरी तुमच्याकडे आरोग्य विमा असला तरी तुमचे आर्थीक स्वास्थ बिघणार नाही याची खात्री आजच्या घडीला नाही. Amit Shah Promises Free Gas Cylinders for Eid and Muharram During Jammu and Kashmir Election Rally How middle class pays more taxes than corporates, and gets ignored too India’s Unequal Tax Structure: The Rich Pay Less, The Rest Get Less The Hidden Disparity: How 3% of India’s Middle-Class Pays More in Direct Taxes Than All Corporates Combined LPG price hike: Commercial cylinder becomes Rs 111 costlier—check new prices for major cities Ayushman Bharat and the False Promise of Universal Healthcare Haryana to Manipur—private hospitals struggle with Ayushman Bharat. Govt owes Rs 1.2 lakh cr TCS to keep firing employees if needed, in 6 months has let go of 30,000 TCS cuts down jobs of more than 30,000 employees, has significantly reduced its workforce हे कमी आहे की काय म्हणुन देशात दर वर्षी लाखो स्त्रिया गायब होत आहेत! पण कोणाला पडली आहे त्याची? 13.13 lakh girls, women went missing between 2019 and 2021: Govt data 61% Of Delhi's Missing People In 2025 Are Women: Police 4.5 Crore Missing Women in India: The Silent Emergency No One Sees देशात तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत, बेरोजगारीचा मोठा प्रश्न देशा समोर उभा आहे आणि जेव्हा कुठल्या पदासाठी इंटरव्हू होतात तेव्हा अजुन विदारक चित्र पहायला मिळते. Thousands have to write exam on a runway 8,000 applicants for 187 home guard posts, exam held on airstrip in Odisha जाता जाता: तुमचा पंतप्रधान जर अजैविक असेल आणि विविध प्रकारचे फोटो सेशनसाठी सात्यत्याने विविध प्रकारची वेशभुषा परिधान करुन कधी गुहेत तर कधी चर्च मध्ये दिसत असेल, मदर तेरेसा सारख्या विखारी आणि मरणासन्न व्यक्तीचे देखील धर्मातर करणार्‍या अश्या राक्षसी महिलचे कौतुक करत असतील तर, अश्या व्यक्तीचा उदोउदो करुन तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांनी चांगली कामे केलीत त्याचे कौतुक आहे पण मुस्लिम तुष्टीकरणाचा रेकॉर्ड देखील त्यांनीच कायम केला आहे. वक्फ कायदा आणि बोर्ड हा राष्ट्र विरोधी आणि हिंदू विरोधी असुन देखील त्याला फंडिंग केले व हा कायदा पुर्णपणे नष्ट करण्याच्या जागी त्यात दुरुस्ती आणली गेली.मुंबई बांग्लादेशी मुसलमानांनी भरुन चालली आहे व राजकारण्यांना त्याची काहीही पडलेली नाही. देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |

In reply to by युयुत्सु

मदनबाण गुरुवार, 01/15/2026 - 17:37
हा प्रतिसाद वाचून मदनबाण म्हणजेच माई कुरसुंदीकर का असा प्रश्न पडला. हा,हा,हा... मला माई कुरसुंदीकर हा नाना [ नाना चेंगट ] असल्याचे वाटते! माई खरयं का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |

In reply to by मदनबाण

कांदा लिंबू गुरुवार, 01/15/2026 - 16:14
देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल! विसाव्या शतकात हिंदूंना गांधींची नशा चढली होती, एकवीसाव्या शतकात हिंदूंना मोदींची नशा चढली आहे. दोघांनीही अंतिमतः हिंदूंचे पार वाटोळे केले आहे.

In reply to by मदनबाण

कांदा लिंबू गुरुवार, 01/15/2026 - 16:14
देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल! विसाव्या शतकात हिंदूंना गांधींची नशा चढली होती, एकवीसाव्या शतकात हिंदूंना मोदींची नशा चढली आहे. दोघांनीही अंतिमतः हिंदूंचे पार वाटोळे केले आहे.

In reply to by मदनबाण

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 17:36
मला वाटते मी तुम्हाला इथे उत्तर दिलेले आहे. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतो. जनमत अनुकूल करावे लागते. तसे ते झाले की मग कार्यवाही करायची असते. त्यामुळे हे पेशन्सचे वेळखाऊ काम आहे. असो.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 18:14
तसेच माझ्या प्रतिसादाला चंसूकु यांनीही प्रतिसाद इथे दिलेला आहे. तोही वाचनीय आहे. पण माझ्या एक लक्षात आले आहे की मोदींइतका पेशन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत मोदी आपल्याला कळू शकणार नाहीत. निदान आपला पेशन्स सतत वाढवत नेला तर तसतसे मोदी आपल्याला कळू शकतील व विरोधकांचा उपयोग मोदी कसा करून घेतात ते कळू शकेल. विरोधकांनी मला दगड मारले. पण मी त्या दगडांचाच वापर करून इमारत बांधली हे मोदींचे वाक्य आहे. वरवर ते अलंकारिक वाटेल. प्रत्यक्षात मोदींचा यशाचा तो राजरस्ता आहे. जबरदस्त पेशन्स असलेला माणूसच या वाक्याचा अर्थ लावू शकेल.

In reply to by शाम भागवत

स्वधर्म गुरुवार, 01/15/2026 - 20:33
>> मोदींइतका पेशन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत मोदी आपल्याला कळू शकणार नाहीत. निदान आपला पेशन्स सतत वाढवत नेला तर तसतसे मोदी आपल्याला कळू शकतील तुमचे विशफुल थिंकींग चांगले आहे पण जर तुंम्ही बायोलॉजिकल असाल तर त्यांची बरोबरी कशी करणार?

In reply to by स्वधर्म

शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 21:31
मी सामान्य माणूस असल्याने, फक्त समारात्मक विशफुल थिंकिंग करू शकतो व मला जे येतं तेवढंच मी करतो. :) ते थिंकिंग लोकांना पटावे अशी इच्छा असली तरी त्यात माझी अपेक्षा घालत नाही. आग्रह तर अजिबातच नाही. त्यामुळे विरोधात येणाऱ्या कोणत्याही प्रतिक्रियांना अगदी शांतपणे सामोरे जाऊ शकतो. बरेच जण मला म्हणतात की तुझी अपेक्षाच नसेल तर लिहितोच कशाला? :) पण बऱ्याच वेळेस सोमीवर लिहिल्याने चांगले मुद्दे लक्षात येतात. उदा. कंकाकांमुळे मी आणखी सविस्तर लिहिले. कपीलमुनींमुळे झालेली चूक दुरूस्त करू शकलो. टर्मिनेटरसाहेबांमुळे माझा मुद्दा आणखीन स्पष्ट करू शकलो. मदनबाण वगैरेंमुळे मोदींबाबत विचार मांडू शकलो. मायबोलीवर भरत यांनी प्रचंड विरोध केला तरीही त्यातून एक मुद्दा मिळालाच. मुद्रा लोनची रिकव्हरी नीट होत नाही असं त्यांनी कॉटेक्स सोडून दिलेले संदर्भ दिले. पण त्यामुळेच मी आरबीआय स्त्रोताद्वारे २०२१ ते २०२५ ची आकडेवारी देऊन मुद्रा लोन एनपीए कसा कमी होत चाललाय हे दाखवून देऊ शकलो. शिवाय हे सर्व करताना या सर्वांची मदत झालेली असल्याने सर्वांबद्दल मनांत एक कृतज्ञतेची भावना जन्माला आलेली असते. विरोधकांचा शांतपणे उपयोग करता यायला लागला की, पेशन्स वाढवायची खुबी साधते असं मला वाटतं. :) पण काही झालं तरी “विरोधकांच्या विरोधाला” विरोधकांनी दगड मारले असं मात्र मी म्हणणार नाही. कारण त्याचा उपयोग करण्यासाठी माझ्याकडे अदानी अडाणी कुठे आहेत? :) :) :) असो.

In reply to by शाम भागवत

टर्मीनेटर Fri, 01/16/2026 - 09:24
"माझा मुद्दा आणखीन स्पष्ट करू शकलो."
त्यात अजून स्पष्टता येणे 'अपेक्षित' आहे. माझा मुद्दा (अजूनही) "निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय." ह्या वाक्याशी निगडित आहे.
"As of September 2025, 6.82 crore MSMEs, with an employment of 29.77 crore are registered on Udyam Registration Portal and Udyam Assist Platform (UAP)."
कुठल्याही सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाला विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज मिळणे तर खूप लांब पण त्या आधी आपल्या उद्योगाची नोंदणी करणे हि सर्वात पहिली पायरी आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत अशा एकूण नोंदणीकृत सु.ल.म. उद्योगांची संख्या ६ कोटी ८२ लाख एवढी आहे (हा आकडाही छोटा नक्कीच नाही).
"Progressive Lending: From Shishu to Tarun Over the past ten years, Mudra has facilitated the opening of over 52 crore loan accounts, marking a steady rise in entrepreneurial activity."
असे ७ एप्रिल २०२५ रोजीच्या अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटलेले आहे. आणि
"As of 2026, over 52 crore loans have been sanctioned through various MSME-focused schemes in India, primarily driven by the Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY). Despite this high volume of individual loans, only approximately 2.5 crore MSME units have successfully availed formal credit to date."
असे वित्तीय संस्थेच्या अहवालात म्हंटलेले आहे. वरील माहिती पब्लिक डोमेनवर (ज्यात सरकारी संस्थळांचाही समावेश आहे) सहज उपलब्ध असल्याने तिची खातरजमा करण्यास काही अडचण येणार नाही. अर्थात AI च्या हवाल्याने अबा म्हणतात त्याप्रमाणे लेख 'प्रचारकी' असेल तर त्यात कुठली स्पष्टता यावी असा माझा 'दुराग्रह नाही' 😀 (बाकी 'डिजिटल इंडिया' ह्या उपक्रमाचा कितीही बोजवारा उडाला असला तरी 'MSME' साठी नोंदणी करण्याची ऑनलाईन सुविधा मात्र खरोखर दृष्ट लागण्यासारखी सुलभ आणि जलद आहे ह्याविषयी दुमत नाही.)

In reply to by टर्मीनेटर

शाम भागवत Fri, 01/16/2026 - 11:13
त्यात अजून स्पष्टता येणे 'अपेक्षित' आहे.
अहो मग ते स्पष्ट करा ना. तेच तर तुमच्याकडून अपेक्षीत आहे. मी सर्वज्ञानी नाही म्हणून तर काथ्याकूट भागात लेख टाकलाय. तोही एका व्हिडिओवर आधारित. त्याबाबत साधक बाधक चर्चा व्हावी म्हणूनच प्रयत्न करतोय. वादे वादे जायते तत्वबोधा या उक्तिनुसार मी प्रयत्न करतोय. सत्य समोर येण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी काही तास टंकतोय. वाचतोय. जालावरून अधिक माहिती घेतोय. व्हिडिओत लिहिलंय त्याच्या फॅक्ट्स चेक करतोय. चूक सापडली तर दुरूस्त करतोय. पण अबा तुम्हाला माझ्या पेक्षा जवळचे वाटणे मी समजू शकतो. तुम्ही दोघे भेटलेले आहात. तुमच्या आवडी निवडी सवयी यांत साम्य असंणंही शक्य आहे. उलट माझा तुमचा वैयक्तिक परिचय नाही. मला कुठलंच व्यसन नाही. मी दारू व सामीष अन्न खात नाही. हॉटेलमधलं खाण्याचेही टाळतो. त्यात परत नामस्मरण करणारा. सत्तरीतला बहिरा म्हातारा. त्यामुळे मी कोणी परग्रहावरचा असल्यासारखे तुम्हाला वाटणे शक्य आहे. किंबहुना ते अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे अबांवर विश्वासून “मी प्रचार करतोय” अस तुम्ही तुमचं मत बनवलं असेल तर ते अगदी मनुष्य स्वभावानुसारच आहे असं मला वाटतं असो. तर ते वाक्य असं पाहिजे होते. आत्ता पर्यंत मुद्रा लोनचं वितरण ५२ कोटीवेळा झालेलं आहे. तुमची हुषारी वादातीत आहे. तुम्ही ही दुरूस्ती सहज सुचवू शकला असता. कपीलमुनिंनी अशीच चूक लक्षात आणून दुरूस्तीही सुचवली होती. थोडक्यांत उद्योग या चुकीच्या शब्दाऐवजी वितरण हा शब्द वापरायला पाहिजे होता. :) शेवटी वादे वादे जायचे शब्दबोधाला यश आलं म्हणायचं. मला तरी तसं वाटतंय. :)

खिलजि गुरुवार, 01/15/2026 - 23:49
अनागोंदी आधीच माजलेली आहे ... आजची गोष्ट , मी मतदानासाठी वणवण भटकलो .. आधी आम्हाला ठाऊक असायचे कि मतदान केंद्र कुठे आहे ते .. आज मतदान होते आणि कसलाच थांगपत्ता नाही .. सर्वप्रथम पूर्वीच्या केंद्रावर गेलो . तिथे नाव नव्हते त्यांनी दुसरीकडे पाठवले . तिथेही नाव नव्हते मग संताप व्यक्त केला .. नशीब माझ्याकडे मतदार पत्र होते , त्यावरील नंबर टाकून एका अधिकाऱ्याने मला तिसरीकडे पाठवले .. मग कुठे जाऊन मतदान झाले .. घरी आल्यावर ते शाई पुसली जातेय म्हणून आरोप बघितले .. म्हंटल आपण रिऍलिटी चेक करून बघूया .. बघतो तर काय , लोकशाहीची डायरेक्ट हत्या .. शाई गायब . आता आजच फडणवीस म्हणत होते कि सर्व पालिकात महायुतीचा महापौर बसेल म्हणून .. मला आता ते खरे वाटतेय .. बघू आता उद्या काय होतंय .. लोकशाहीला श्रद्धांजली आताच वाहून ठेवतो .. कदाचित पुन्हा बघायला मिळणार नाही ...उषकाल होता होता ...

In reply to by खिलजि

Bhakti Fri, 01/16/2026 - 10:54
आज मतदान होते आणि कसलाच थांगपत्ता नाही .. सर्वप्रथम पूर्वीच्या केंद्रावर गेलो . तिथे नाव नव्हते त्यांनी दुसरीकडे पाठवले .
ते ओनलाईनही शोधता येत,मीही दोन दिवसापुर्वी ओनलाईन माझ नाव्,मतदान केन्द्र शोधल होत.लोक ते ओनलाईन का शोधत नाही हे मला समजत नाही.
शाई पुसली जातेय म्हणून आरोप बघितले
मला मतदान केन्द्रातच तो permanent मार्कर पाहुन धक्काच बसला.पुर्वी निवड्णुकीसाठी वापरल्या जाणार्‍या शाईचा फोर्म्युला गोपनीय असायचा हे वाचल होत.इतका विकासनिधी कमी पडत आहे का??की गावभर कुठेही मिळणारा मार्कर लोकशाहीच्या मुख्य प्रसन्गी मतदानासाठी तुम्ही वापरणार ??

कंजूस Fri, 01/16/2026 - 05:48
भारताचे माहीत नाही पण कालच्या मुंबई महापालिका निवडणूकीचे मतदानपश्चात वर्तवलेले अंदाज पाहता संध्याकाळपासून खळफट्याक सुरू होऊ शकतं. हा सुद्धा अंदाजच आहे.

In reply to by कंजूस

शाम भागवत Fri, 01/16/2026 - 10:30
ती शक्यता नाकारता येत नाही. पण आता २०२९ पर्यंत कोणत्याच निवडणुका नसल्याने देवाभाऊ गृहमंत्री म्हणून किती उत्तम काम करू शकतात हे पहायला मिळणे शक्य आहे. माझ्यामते आत्तापर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत होते. :) तसेच मदनबाण, कांदालिंबू वगैरेंना सांगावेसे वाटते की देवाभाऊंना योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बहुमत मिळवून द्या. मग त्याच्याकडून काही कठोर कारवाईबाबत अपेक्षा करा. मोदींनी चीन सारखी कठोर कारवाई केली व त्या विरोधात ५६ मुस्लिन देशांनी एकत्र येऊन भारताला तेल विक्री न करण्याची शैली अवलंबली तर त्यामुळे जी महागाई वाढेल व असंतोष वाढेल त्यातून मोदींना सत्तेवरून खाली खेचायची आंदोलने सुरू होतील हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. व त्या प्रक्रियेत मोदींना बोल लावणारे जे कोण आहेत ते सर्वात पुढे असतील कारण ते शॉर्ट टेम्पर लोक आहेत. ट्रंप भारतावर ५०० टक्के टॅरिफ लावणार असतील तर इराणकडून तेल घेणाऱ्यांवर आणखीन २५ टक्के टॅरीफला मोदी भीक घालतील व इराणकडून तेल घ्यायचे बंद करतील हे मलातरी अशक्य वाटते. मला तरी असे वाटत राहिले आहे की भारताची अर्थव्यवस्था खालावल्याशिवाय भारतात अनागोंदी माजणार नाही व मोदींना सत्तेवरून खाली खेचता येणार नाही याबाबत पेंटॉगॉन व डीप स्टेट ठाम आहेत व त्यासाठी तेल, डेअरी प्रॉक्टक्स व मका वगैरे शेतमाल ह्या मुद्यांवर भर देत आहेत. युरोपिअन युनियन आत्तापर्यंत या मुंद्याबाबत अमेरिकेबरोबर बरोबर होती. पण त्यांचा आता धीर सुटत चालला आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे त्यांच्यापैकी काही जणांवर दिवाळखोरीची पाळी आलीय तर काही देशांची अर्थव्यवस्था संकूचित व्हायला लागली आहे. त्यामुळे युयु अमेरिकेची साथ सोडून भारताबरोबर १९ वर्षे प्रलंबीत असलेले फ्री ट्रेड भारताच्या मर्जीनुसार करू इच्छीत आहे. २७ जानेवारीपर्यंत चित्र बरचसं स्पष्ट झालेलं असेल व ट्रंप यांचं टॅरिफचं भूत कायमचं बाटलीत बंद होईल. मी तरी आशावादी आहे.

मदनबाण Fri, 01/16/2026 - 13:06
तसेच मदनबाण, कांदालिंबू वगैरेंना सांगावेसे वाटते की देवाभाऊंना योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बहुमत मिळवून द्या. सगळ्या सोशल मिडियावर आता भाजपाच्या विरोधात सूर दिसत आहे. इथे कोण कोणाचा भाऊ वगरै नाही, ते ७२ हजार कोटींचा सिंचन घोटाळ्यावर हाच देवाभाऊ अख्या महाराष्ट्रात बोंबलत फिरत होता, चक्की पिसिंग पिसिंग ओरडत होता, नंतर काय झाले ते सगळ्या जगाला माहित आहे. जनरल कॅटॅगरी मधील जे मोदी समर्थक आहेत त्यांचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालेला आहे! तुमचा प्रधानमंत्री काय करतोय व त्याचे परिणाम काय होतील ते या स्वतःला बुद्धीवादी समजणार्‍या वर्गाला कळेनासे झालेले दिसते आहे. मोदी करतात ते सर्व आपल्यालाच कळते असा त्यांचा ग्रह झालेला असतो. मोदी है तो मुमकिन है ,हे मोदींचे प्रोपगेंडा गाणं युटुबवर अपलोड झालं आणि लोकांनी इतक्या शिव्या दिल्या इतक्या शिव्या दिल्या की मोदींच्या टिम ने कमेंट सेक्शन लपवले आणि डिसलाईक करायचा पर्याय डिसेबल केला. :))) आपल्या नेत्याला जनतेने कचकुन शिव्या दिल्या आहेत हे त्यांचे समर्थक सोशल मिडियावर कसे सांगतील? :))) मोदी हिसाब चुकता करण्यासाठी बसलेले आहेत अशी धारणा सवर्ण समाजात दृढ झाली आहे. #BJPAgainstGC हा हॅशटॅग सध्या ट्रेन्डिंग मध्ये आहे.भाजपा दुसरी कॉग्रेस झाली आहे हे ब्रेनवॉश झालेल्या लोकांना कळतं नाही, बरं पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष सवर्ण जातीच्या मुळावर उठलेले असताना सवर्ण जातीच्या लोकां मध्येच अश्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.मोदी जे करतात ते योग्यच असते अशी त्यांची मानसिक अवस्था असते. जे जनरल कॅटॅगरी मधील वकिल मंडळी विरोध करत आहेत ते मूर्ख आणि भक्त फार हुशार ! :))) सगळे राजकारणी आणि पक्ष एकाच माळेचे मणी असतात हे वारंवार सिद्ध होऊन देखील लोक विवेक शून्य होऊन तेच तेच मोदी प्रेम मिरवातत! मिरवा, माझी कशाला हरकत असेल? :) मोदींनी चीन सारखी कठोर कारवाई केली व त्या विरोधात ५६ मुस्लिन देशांनी एकत्र येऊन भारताला तेल विक्री न करण्याची शैली अवलंबली तर त्यामुळे जी महागाई वाढेल व असंतोष वाढेल त्यातून मोदींना सत्तेवरून खाली खेचायची आंदोलने सुरू होतील हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. व त्या प्रक्रियेत मोदींना बोल लावणारे जे कोण आहेत ते सर्वात पुढे असतील कारण ते शॉर्ट टेम्पर लोक आहेत. नूपुर शर्मा काहीही चुकीचे बोलली नसताना ५६ इंची छाती फोल्ड करुन नतमस्तक होणारा व्यक्ती माझ्या लेखी नालायक आहे. तेल जसे आपण खरेदी करतो तसे विक्री करणार्‍या लोकांना देखील आपली खरीददार म्हणुन तितकीच गरज असते,ही व्यवहारातील अत्यंत साधी गोष्ट आहे. बाकी मोदींच्या रेकॉर्ड मुस्लिम तुष्टीकरणावर अंध मोदी समर्थक चकार शब्द बोलत नाहीत, ही एक सोपी टेस्ट आहे अंधभक्त ओळखण्याची! मुस्लिम लोकांना गुजरात मध्ये ओबीसी मध्ये मोदींनीच समाविष्ट केले यावर देखील ते चकार शब्द बोलत नाहीत. पूर्वी लोक बापु बापु करायचे आणि आता मोदी मोदी करतात हाच काय तो फरक! मी देखील प्रचंड आशावादी आहे, पण डोळस आशावादी! :) समोरचा काय बोलतो आणि कृतीत काय करतो व त्या कृतीचे काय परिणाम होतील याकडे पाहतो. मोदींच्या आधी देखील जग होते आणि नंतर देखील जग असेल, त्यांना महाविचारी पुरुष बनवण्याची घोडचूक करु नये, ते अजैविक असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. जाता जाता: सवर्ण समाज / ओपन कॅटेगरी मधील लोग मोदी विरोध विनाकरण करत आहे असे देखील मोदी समर्थकांना वाटत असेल कारण जगातील सगळी बुद्धीमत्ता, डावपेच, चाणक्यनिती सगळं मोदी आत्मसात करुन बसलेले आहेत. :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Makeba... : Jain

In reply to by मदनबाण

कांदा लिंबू Fri, 01/16/2026 - 13:44
पूर्वी लोक बापु बापु करायचे आणि आता मोदी मोदी करतात हाच काय तो फरक! संपूर्ण प्रतिसादाशी व विशेषतः या वाक्याशी शतशः सहमत!

In reply to by शाम भागवत

मदनबाण Fri, 01/16/2026 - 16:24
मतभेद असले तरी तुमच्या मताचा आदर आहे. भागवत साहेब, मी देखील अगदी हेच म्हणतो. प्रतिसाद जरी आपणास दिला असला तरी तो सर्व मोदी समर्थकांसाठीच आहे. मी देखील कट्टर मोदी समर्थक होतो पण त्यांची १० वर्ष झाल्यावर वर्तन बदलले दिसले त्या बरोबर माझे समर्थन देखील गेले. २०१४ ला अबकी बार मोदी सरकार असे हिंदीत घोषणा देणार्‍या कृष्ण वर्णीय लोकांचा व्हिडियो मी इथे दिल्याचे स्मरते. आपला नेता जर काही चूकीचे धोरण राबवत असेल तर त्यावर बोलले गेले पाहिजे आणि त्याचा "उघड" विरोध देखील केला गेला पाहिजे इतकाच माझा दृष्टीकोन आहे, तसेच मुस्लिम तुष्टीकरणाचा परिणाम हा हिंदू स्त्रियांनाच बलात्कारच्या माध्यमातुन भोगावा लागतो! दिल्लीतील बहुधा उत्तर भारतीत ब्राह्मण संघ कार्यकर्त्याच्या मुलीला तीच्या आई समोरच घरातुन जिहादी फरफट घेऊन गेलेले आहेत. ही घटना शकूरपुर गावातील / भागातील. दिल्लीतील शाहाबाद डेअरी भागात १६ वर्षीय मुलीची चाकुने भोसकुन भोसकुन नंतर डोक्यात दगड घालुन अत्यंत क्रूरपणे हत्या केली गेली. तसेच दिल्लीतील जहांगीरपुरी मध्ये हिंदू मुलाचे अपहरण करुन त्याला मुस्लिम जिहादी तरुणांनी चामड्याच्या बेल्ट ने जबर मारहाण केली आणि या प्रत्येक तरुणाने त्याला विचारले बोल तुझा बाप कोण? आणि त्यांचे लिंग त्याच्या तोंडात कोंबले. कुठेही तोंड दाखवण्याची परिस्थीती न राहिल्याने त्या मुलाच्या कुटुंबाने तिथुन नंतर पलायन केले. देशाच्या राजधानीत जिहादी असा क्रूर नंगा नाच करतात आणि मोदी-शहा सबका साथ सबका विकास चे तुणतुणे वाजवत राहतात, कोण देईल यांना आपले समर्थन? साधारण मागच्या आठवड्यात मोदी-शहांच्या गुजरात मधला व्हिडियो पाहण्यात आला होता, त्यात गुजराती स्त्रिया मुस्लिम जिहादी युवक आपले लिंग काढुन दाखवता व त्यांच्या टॉयलेट / बाथरुमच्या दरवाज्यांना मोठी भगदाडे जिहाद्यानी पाडली असल्याचे दाखवले होते. अमित शहा यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत होत्या बिचार्‍या! असो... लोकांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असे वाटते हल्ल्ली! जाता जाता: आनंद रंगनाथन यांनी मोदींच्या या तुष्टीकरणा बाबत एकदा म्हंटले होते, हे वेलफेअर नसुन वॉरफेअर आहे आणि हिंदुंच्या येणार्‍या पुढच्या पिढ्या याचे परिणाम भोगतील!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Makeba... : Jain

कांदा लिंबू Fri, 01/16/2026 - 21:57
तसेच मदनबाण, कांदालिंबू वगैरेंना सांगावेसे वाटते की देवाभाऊंना योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बहुमत मिळवून द्या. मग त्याच्याकडून काही कठोर कारवाईबाबत अपेक्षा करा. ज्याला खरोखरच काही करायचं असतं त्याला बहुमत नसले तरी चालतं. स्वतःचा पक्ष अल्पमतात असलेले पंतप्रधान सुद्धा, "देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" असं छाती ठोकून सांगतात आणि तशी प्रत्यक्ष कृतीही करतात. (उदाहरणार्थ सच्चर आयोग, जातीय हिंसाचार प्रतिबंधक बिल २००५, २००७, २०१३) त्या मोगलाई सत्तेला कंटाळून हिंदूंनी मोदींना प्रचंड बहुमत दिले. पुन्हा पुन्हा दिले. ‌‌ हिंदूंच्या अपेक्षा काय होत्या? - हिंदूंची मंदिरे सरकारी तावडीतून सोडवा, - सिनेमा साहित्य माध्यमे यातून होणारी हिंदू धर्म श्रद्धेची विटंबना थांबवा - प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली बांगलादेश मुस्लिम यांची घुसखोरी थांबवा - शिक्षण हक्क कायद्यातील हिंदूंवर अन्याय करणाऱ्या जिझिया तरतुदी काढून टाका - हिंदू समाजातील सरकारद्वारे जातीजातींमध्ये होणारी विभागणी थांबवा - हलाल मांसाचा प्रसार रोखून झटका मांसाचा प्रसार करा - वक्फ बोर्डासारखे जिझिया कायदे रद्द करा - नुपूर शर्मांचा बळी देऊ नका - तिच्या पाठी कन्हैयालाल सारख्या असंख्य हिंदूंचा बळी देऊ नका - हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग हजार वर्षापासून सतत आक्रसत आहे, ते थांबवा - इत्यादी - यातली कोणती गोष्ट करायला पुरेसे बहुमत नव्हते? प्रश्न बहुमताचा, पुरेशा आमदार-खासदारांचा नाही, प्रश्न आहे इच्छाशक्तीचा. खरंतर प्रश्न आहे मोदींच्या खऱ्या हेतूचा. ‌ यातली कोणतीही गोष्ट मोदींनी केली नाही. करणे काही फारसे अवघड नव्हते, पण केले नाही, कारण त्यांचा तो हेतूच नव्हता. त्यांचा हेतू केवळ मुस्लिम तुष्टिकरण होता व आहे. --- माध्यम जगतात एक विनोद सांगितला जातो.‌ पश्चिम महाराष्ट्रातील एका सत्तालोलुप पक्षाचे मंत्री, सकाळी दहा वाजता शपथविधी झाल्यानंतर किमान शे-पाचशे कोटींचा एखादा घोटाळा केल्याशिवाय लंच ब्रेक घेत नाहीत असे म्हणतात! त्यांचे उद्दिष्ट भ्रष्टाचार करून पैसा कमावणे आहे आणि सत्ता हाती आल्यावर पहिल्या तासापासून ते कामाला लागतात. त्यांच्या उद्दिष्टा बाबतीत तरी ते किमान प्रामाणिक व सतत प्रयत्नशील असतात. बारा वर्षांपासून मोदींनी हिंदू हिताचा एकतर नवीन कायदा केला आहे का? किंवा हिंदूंचे अहित थांबविणारा एक तरी जुना कायदा रद्द केला आहे का? एकही नाही.‌ मोदींनी आपले मतदार समर्थक पाठीराखे यांना दिलेली व्यक्त -अव्यकत वचने कधीही पाळली नाहीत.‌ ज्या तडफेने काँग्रेसी, ओबीसी, समाजवादी, डावे वगैरे लोक आपले मतदार समर्थक पाठीराखे यांच्या मागे ठामपणे उभे राहतात तितक्याच तडफेने संघ भाजपचे लोक आपले मतदार समर्थक पाठीराखे यांना सरळ वाऱ्यावर सोडून देतात, नव्हे त्यांचा बळीच देतात. या सगळ्या गोष्टींची असंख्य उदाहरणे मी व इतरांनीही जागोजागी दिलेली आहेतच. --- तुमच्या वयाचा आदर आहेच पण सहमती मात्र अजिबात नाही.

शाम भागवत Sat, 01/17/2026 - 10:24
@मदनबाण, @कांदालिंबू १. गजानन मेहेंदळे यांची भाषणे मी ऐकलेली आहेत. जालावरचे व्हिडीओ पाहिलेले आहेत. त्यांचे दोन्ही मोठे खंड मी विकत घेतलेले आहेत. मेंहेंदळेंचे सगळे विचार पटलेले आहेत. २. निनाद गंगाधर बेडेकर यांचेही अनेक व्हिडीओ मी पाहिलेले आहेत. पटलेले आहेत. ३. बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे तर मी १९७० सालापासून ऐकलेली आहेत. पटलेली आहेत. राजा शिवछत्रपती मी १९७१ सालीच वाचलंय. ४. सावरकांची पुस्तके वाचलेली आहेत. माझी जन्मठेप, ५५ कोटींचे बळी वगैरे पुस्तके मी ७०-८० या कालखंडामधे वाचलेली आहेत. प्रत्येक वेळेसआतून पेटून उठलेलो आहे. ५. अलिकडचे काळातील आवडते म्हणजे डॉ. रंगनाथन. त्यांचेही व्हिडीओ मी पाहतो. त्यामुळे झोपलेल्या हिंदूंची अवस्था पाहून गलबलून येत. ६. डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे व्हिडीओ तर हिंदू जागृतीसाठी अफलातून असतात. डावे चळवळीतील लोकांनी इतिहासातील अनेक गोष्टी लपवून इतिहास लिहीला. त्या डाव्या इतिहासकारांचा प्रचंड राग येतो. हा राग येण्याची सुरवात निनाद बेडेकरांच्यामुळे फार पूर्वीच झाली. त्यामुळे भारताची फाळणी होऊन मुस्लिमांना पाकिस्तान मिळाले तर हिंदूंना हिंदूराष्ट्र का नाही? हा मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे. २०१४ नंतर हा प्रश्न सुटू शकेल अशी आशा वाटायला लागली आहे. तरीही हिंदू अजून पुरेसा जागा झाला नाही आहे असेच माझे मत आहे. बहुसंख्य हिंदूंना अजून आपला गौरवशाली इतिहास माहीत नाही आहे.माहीत करून घ्यायची इच्छाही नाहीये. त्याचा अभिमान वाटणे तर लांबची गोष्ट. पण जेन जी पर्यंत खरा इतिहास इंटरनेटमुळे पोहोचायला लागलाय. हिंदूस्थानच्या गौरवशाली शूरवीरांच्या कथा पोहोचायला लागल्या आहेत. हिंदू जागा होतोय. तरीही आसाम सोडता ५० टक्के हिंदूसमाज जागा झालेला नाही. त्यामुळे अजून उघड लढाईची वेळ आलेली नाही असे मला वाटते. ही युध्दाची नाही तर युध्दतयारीची वेळ आहे. इथे युध्दतयारी म्हणजे हिंदू संघटन ५० टक्केपर्यंत नेणे. ते होत नाही तोपर्यंत आर्थिक, तांत्रिक व लष्करी प्रगती वेगाने करत राहणे असा असायला पाहिजे आहे. तसेच खरी लढाई जेन जी करणार असल्यामुळे त्यांच्यापर्यंत इतिहास पोहोचायला लागलाय तरी आवाका वाढवायला पाहिजे. थोडक्यांत> आर्थिक स्थिती व हिंसक आंदोलने यांचा थेट संबंघ असतो हा माझा लेखाचा गाभा आहे. पण तात्रीक व लष्करी प्रगती शिवाय निव्वळ आर्थिक प्रगतीला फारसा अर्थ नसल्याने मी आर्थिक, तांत्रिक व लष्करी असे शबदप्रयोग करतोय. आपली आर्थिक स्थितीवरची आघाडी अजून भक्कम व्हायला पाहिजे असं मला वाटत. तोपर्यंत ज्यातून हिंसक आंदोलने होऊ शकतील अशा सर्व गोष्टी प्रयत्नपूर्वक पुढे ढकलल्या पाहिजेत हा माझा प्रतिपादनाचा मुद्दा आहे. त्यासोबत गझवा ए हिंद हाणून पाडण्यासाठीच्या उपाययोजना करत राहिलं पाहिजे. मोदी त्या करताहेत अस माझ मत आहे. मतभेद फक्त या उपाययोजनाचा वेग किती असावा एवढाच असू शकतो.

In reply to by शाम भागवत

मदनबाण Sat, 01/17/2026 - 11:12
मोदींच्या भाजपाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जेव्हा शक्य झाले तेव्हा आणि जसा हवा तसा केवळ वापर करुन घेतला! एक दशकाहुन अधिक काळ सत्तेत असलेल्या ढोंगी हिंदुत्ववादी सरकारला अजुन त्यांना भारत रत्न पुरस्कार देता आलेला नाही! गझवा ए हिंद हाणून पाडण्यासाठीच्या उपाययोजना करत राहिलं पाहिजे. मोदी त्या करताहेत अस माझ मत आहे. हजारो कोट्यावधी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च करुन आणि मदरशांवर करोडो खर्च करुन कुठले संत समाजात निर्माण होणार आहेत? हिंदुंना शत्रुबोध अजुनही होत नाही?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Espresso (Lyrics) | Sabrina Carpenter |

In reply to by शाम भागवत

आग्या१९९० Sat, 01/17/2026 - 11:30
त्यामुळे भारताची फाळणी होऊन मुस्लिमांना पाकिस्तान मिळाले तर हिंदूंना हिंदूराष्ट्र का नाही? हा मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे. आता मोठे झाला तरी हा प्रश्न कायम आहे का ? ह्या फाळणीला विरोध असणाऱ्या हिंदू संघटनांनी त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यात भाग का घेतला नाही ? असे प्रश्न पडत नाही का तुम्हाला ? आयत्या पिठावर रेघोट्या मारणे सोपे असते.

मदनबाण Sat, 01/17/2026 - 10:54

In reply to by मदनबाण

कांदा लिंबू Sat, 01/17/2026 - 11:33
अनागोंदी / अराजकतेची काही उदाहरणे औरंगजेबाची कायदे पद्धती नेमकी अशीच होती. काँग्रेस सरकारने २००५, २००७, २०१३ साली केलेला जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा प्रस्ताव मोदींनी विद्यापीठीय शिक्षण संस्था आणला आहे. काँग्रेसच्या प्रस्तावात मुस्लिम विरुद्ध काफिर अशी रचना होती, या प्रस्तावात मागासवर्गीय विरुद्ध सवर्ण अशी रचना आहे.‌ UGC ‘equity’ Regulation: Explicit bias against ‘general caste’, uncanny similarities with Congress’ Communal Violence Bill, no safeguard for false SC/ST complaints and more संघ भाजप प्रणित मोदींचे गजवा-ए-हिंद च्या दिशेने टाकलेले हे अजून एक ठाम पाऊल आहे.‌ @मदनबाण- मोदी भागवत वगैरे मंडळी अंसार-अल-इस्लाम आहेत असे तुम्हाला पण वाटते का?

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Sat, 01/17/2026 - 13:06
मोदी भागवत वगैरे मंडळी अंसार-अल-इस्लाम आहेत असे तुम्हाला पण वाटते का? ते काय आहेत ते मला माहित नाहीत, पण ते काय बोलत आहेत आणि करत आहेत ते आपल्या समोरच आहे. मोदींचे स्वतःचे एक वक्तव्य देऊन जातो: मी बोहरा परिवारातीलच एक सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुस्लिम समाजा सोबत गेल्यात. :))) जाता जाता: अजित पवारांना भाजपा मध्ये स्थान नाही ! :))) Day after returning as deputy CM, Ajit Pawar’s assets worth Rs 1,000 crore cleared in benami case Ajit Pawar's properties worth ₹1,000 crore cleared by I-T dept in benami case: Report

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Espresso (Lyrics) | Sabrina Carpenter |

विवेकपटाईत Sat, 01/17/2026 - 11:49
२०१४ नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये हजारो प्रकरणांची चौकशी सुरू केली असून सुमारे साडेसहा हजारांच्या आसपास ECIR नोंदवण्यात आल्या आहेत. या कालावधीत सुमारे अडीच हजारांहून अधिक खटल्यांत आरोपपत्र दाखल झाली आणि हजारो व्यक्ती व संस्थांचा त्यात समावेश आहे. न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालत असल्याने अंतिम निकाल लागलेल्या प्रकरणांची संख्या तुलनेने कमी असून आतापर्यंत सुमारे शंभर ते सव्वाशे आरोपींना शिक्षा झाली आहे. आर्थिक बाबतीत पाहता, ईडीने २०१४ नंतर अंदाजे दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त, अटॅच किंवा फ्रीझ केली असून त्यातील सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची मालमत्ता न्यायालयीन आदेशानंतर सरकारी खात्यात जमा झाली आहे; उर्वरित रक्कम प्रकरणांच्या अंतिम निकालावर अवलंबून आहे

In reply to by विवेकपटाईत

शाम भागवत Sat, 01/17/2026 - 12:56
हीच पध्दत योग्य आहे. मोदींकडून माझी अशीच अपेक्षा आहे व ती सफल होतानाही दिसतीय. त्यामागे मी एक तत्व असावे, एक विचार असावा असं गृहीत धरलेले आहे. तो म्हणजे शत्रुवर मात करण्यासाठी प्रथम त्याचं दाणापाणी बंद करायला लागतं. रसद तोडायला लागते. १. वक्फ बील पास करून त्याची सुरवात झालीय. २.आता पुढच्या दोन तीन वर्षात लाखो एकर जमीन परत मिळवायच्या प्रक्रियेला सुरवात होईल. ३. अवैध बांधकामे मदरसे कायदेशीर मार्गाने पाडली जातील. ४ २०२९ पर्यंत, सनदशीर मार्गाने करावयाच्या या कामांसाठी वेगळी जलद न्यायालयांची उभारणी करता येईल. ५. भारतभर हलालावर कायदेशीर बंदी आणली पाहिजे. थोडक्यात हिंदूजागृतीचे प्रमाण आसाम एवढे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी, संविधानाच्या कक्षेत राहून गजवा ए हिंदची आर्थिक कोंडी करत राहीलं पाहिजे. त्यानुसार मला तरी या पध्दतीचेच उपाय सुचतात. काश्मीरमधेही ३७० हटवून प्रथम आर्थिक रसदच तोडली होती. कोर्ट आदेशामुळे निवडणूक घ्यायला लागली. असो. इश्वरेच्छा बलियसि _/\_

In reply to by शाम भागवत

मदनबाण Sat, 01/17/2026 - 13:22
थोडक्यात हिंदूजागृतीचे प्रमाण आसाम एवढे जोपर्यंत होत नाही भागवत साहेबा वा! म्हणजे प्रत्येक राज्य ४०% मुस्लिम झाले पाहिजे! [ आसाम मध्ये आजच्या घडीला जवळपास ४०% लोकसंख्या मुस्लिम आहे. ] त्याशिवाय हिंदू जागृती होणार नही? इतके दुवे मी दिले त्यावर तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत, एससी-एसटी कायद्याला मोदींनी अधिक शक्तीशाली बनवुन कोणते हिंदू हित साधले ते जर सांगाल का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Espresso (Lyrics) | Sabrina Carpenter |

In reply to by शाम भागवत

मदनबाण Sat, 01/17/2026 - 13:32
तुम्ही करा ना हिंदू जागृती. :) आम्ही पहिल्या पासुनच तेच करत आलो आहोत पण तुम्ही डोळ्यावर झापडे लावली आहेत, ती कधी काढणार ते सांगा बरं ? :) माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मोदीच रोखत आहेत ना तुम्हाला? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Espresso (Lyrics) | Sabrina Carpenter |

In reply to by शाम भागवत

कांदा लिंबू Sat, 01/17/2026 - 14:05
हिंदू तोपर्यंत जागेच होणार नसतील तर काय करणार? तुम्ही करा ना हिंदू जागृती. :) कोणताही समूह एक समाज म्हणून जागा किंवा झोपलेला नसतो. त्या समूहातील सदस्यांचे एक समाज म्हणून वर्तन व प्रतिक्रिया त्या समाजाच्या नेत्यावर अवलंबून असते. नेता जर आपल्या व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टांशी प्रामाणिक असेल, आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असेल आणि उक्ती-कृतीतून हे समाजाला दाखवून देत असेल तर त्या समाजातील सदस्य झोपण्याची तिळमात्र शक्यता राहत नाही. हिंदूंचे नेते नुपूर शर्मा सारख्या (असंख्य) प्रकरणात अवसानघातकी पणा करतात, असंख्य हिंदूंच्या नाशाला कारणीभूत असलेल्याला चिश्तीला दरवर्षी हिरवी चादर पाठवत राहतात, बंगालात हिंसाचारात आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडून देतात, "डीएनए एकच आहे" असे म्हणून दिशाभूल करतात, निरनिराळे कायदे करून हिंदूंची नाशाची बीजे रोवतात त्यांच्या राज्यात हिंदू जागे आहेत किंवा झोपलेले आहेत त्याने काय फरक पडतो?

In reply to by मदनबाण

शाम भागवत Sat, 01/17/2026 - 13:31
मी नुसते दुवे देत नाही. जो दुवा द्यायचा त्याचा अभ्यास करतो, त्यावर लेख लिहितो. मग चर्चा करायला सुरवात करतो. तुम्ही तसं काही केलं तर मी तुमचे दुवे उघडून वाचेन. मी ही पध्दत मागेही सुचवली होती. असो

In reply to by शाम भागवत

मदनबाण Sat, 01/17/2026 - 13:38
साहेब,तुमच्या याच धाग्यात मी दुवे दिलेले आहेत आणि इथे सुद्धा दिले आहेतः https://misalpav.com/node/53396 मी दुवे दिले आहेत ते चुकीचे असल्यास मला नक्की सांगा, मी माझ्यात सुधारणा करीन. बाकी तुमचे प्रतिसाद वाचुन मला देव काकांची [ प्रमोद देव ] आठवण आली, त्यांची विचारसरणी जवळपास तुमच्यासारखीच आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Espresso (Lyrics) | Sabrina Carpenter |

कांदा लिंबू Sat, 01/17/2026 - 13:52
इतके दुवे मी दिले त्यावर तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत, एससी-एसटी कायद्याला मोदींनी अधिक शक्तीशाली बनवुन कोणते हिंदू हित साधले ते जर सांगाल का? ते त्याबद्दल चकार शब्द काढणार नाहीत. मी देखील वर त्यांना साध्या साध्या करता येण्याजोग्या बाबी (ज्या मोदींनी केल्या नाहीत) त्यांची यादी दिली आहे. त्या सगळ्यांना फाट्यावर मारून ते दुसरेच काहीतरी सांगत आहेत. १. वक्फ बील पास करून त्याची सुरवात झालीय. २. ३. या विधानासारखा दुसरा विनोद नाही! वक्फ बिलामध्ये मोदींनी हिंदूंच्या हिताची तर सोडाच, सामान्य भारतीय नागरिकांचे हिताची कोणती तरतूद केली आहे? ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट अधिक क्रूर करून ठेवलाय त्याचप्रमाणे हे वक्फ बिलही अधिकच मुस्लिम हितवादी करून ठेवले आहे. ५. भारतभर हलालावर कायदेशीर बंदी आणली पाहिजे. याचा हिंदू एकीकरणाशी काय संबंध आहे? आणि ही इस्लामच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ नाही का? भारतामध्ये मुस्लिमांना त्यांच्या प्रार्थना पद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यांच्यात हलाला योग्य असेल तर ती चालू द्यावी त्यात बदल करण्याचा प्रयत्न करण्याचा हिंदूंना काय अधिकार आहे? त्यांच्या दुर्दैवाची बाब म्हणजे म्हणजे, आता ज्या संघ-भाजप-मोदींचे ते जीव तोडून समर्थन (खरंतर केविलवाणे समर्थन) करण्याचा प्रयत्न करत आहेत तोच संघ त्यांना वेळ आल्यावर सरळ वाऱ्यावर सोडून देणार आहे (, नाही त्यांच्यासारख्या समर्थकांचा बळी देणार आहे). खोटं वाटतंय? १ - २०२१ सालच्या बंगालातील दंगलीत सामान्य हिंदू नागरिक तर सोडाच (, त्यांना तशीही मोदींच्या राज्यात काही किंमत नाही) भाजपच्या लोकप्रतिनिधींवरही हत्या, जाळपोळ, बलात्कार, लुटालूट असे प्रकार झाले. प्रचंड बहुमतातील सरकार असून सुद्धा मोदींनी त्यांना वाचविण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. त्यांना वाचवायचे नव्हतेच. २ - नुपूर शर्मा व तिच्यापाठी कन्हैया लालसारख्या असंख्य हिंदूंचा मोदींनी बळी जाऊ दिला. त्यांना वाचविण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. त्यांना वाचवायचे नव्हतेच. ३ - इतरही असंख्य उदाहरणे आहेत. त्यांना वाचविण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. त्यांना वाचवायचे नव्हतेच. मोदींचा मुळात उद्देशच देशाला गजवा-ए-हिंद-२०४७ कडे नेणे हा आहे; आपण हिंदूहितवादी आहोत असे दाखवणे हा केवळ मूर्ख हिंदू मते मिळविण्याचा निवडणुकीपुरता जुमला आहे.