Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Fri, 12/05/2025 - 19:35
' अवधूत साठे, ट्रेडिंग ॲकॅडमी' ही सुरेश वाडकर यांनी गायलेली ओळ अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आणि साठे ॲकॅडमी सुद्धा. आज त्यांच्या वरील सेबीने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीवर परवाना न घेता वित्तीय सल्लागार म्हणून संस्था चालवल्याचा आरोप आहे. सामाजिक प्रसार माध्यमांवर अशीही चर्चा सुरू झाली आहे की एका मराठी माणसाने अगदी अल्पावधीतच मिळवलेल्या यशामुळे अमराठी ट्रेडर्स लॉबीने हे कारस्थान रचले आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
  • 6361 views

प्रतिक्रिया

Submitted by मारवा on गुरुवार, 12/11/2025 - 17:38

In reply to तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण by मारवा

Permalink

मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds

मी मागे एकदा crypto मध्ये कुठला भारतीय अधिकृत mutual fund गुंतवणूक करतो का असा शोध घेतला होता पण मला तरी असा कुठलाही सेबी अधिकृत भारतीय mutual fund सापडलेला नव्हता की जो फंड crypto madhe गुंतवणूक करतो. माझी इच्छा असा एखादा म्युच्युअल फंड शोधून त्यात पैसे गुंतवण्याची इच्छा होती मग दुसरा एक मार्ग थोडा असा बघत होतो की ind money किंवा vertex का काय ते त्यांच्या माध्यमातून जे us stocks trading करू देतात वगैरे पण ते ही जरा किचकट वाटल्या3 सोडून दिलं म्हटलं जाऊ द्या आपली इंडियन इक्विटी ट्रेडिंग देतेय तो रिटर्न छान आहे की पण तुम्ही म्हणाला तसेच मोह के हमाम मे.सब नंगे है.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 12/11/2025 - 17:46

In reply to मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds by मारवा

Permalink

तरीही गवि तुम्हीसुद्धा?

तरीही गवि तुम्हीसुद्धा?
तेच तर म्हणत होतो की. पण लीगल इल्लीगल बद्दल: कॉइन्सविच ही पूर्ण लीगल एंटीटी आहे याची मी खात्री करून घेतली होती. त्यात तुम्हाला कोणतीही क्रिप्टो करन्सी बाहेर काढता येत नाही किंवा जमा करता येत नाही (deposit) केवळ खरेदी विक्री. आणि आपल्या थेट जोडलेल्या बँक खात्यात उघड आवक जावक. सर्व टॅक्स संबंधित कागदपत्रे डाउनलोड. इन्कम टॅक्स नोंदींमध्ये एकूणएक रुपयांची नोंद आणि तीस टक्के कर (फायदा तोटा काही संबंध नाही. Withdrawal= तीस टक्के कर) यात काहीही बेकायदेशीर नव्हते. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणून याला भारतात मान्यता आहे. अन्य परदेशी काही exchanges जी थेट खाजगी वॉलेटमधे कूट चलन ट्रान्स्फर करू शकतात (म्हणजे ते गडप होते) ते आपल्याकडे बेकायदेशीर आहे. कॉइन स्विचमध्ये प्रत्यक्ष क्रिप्टोला हात लावताच येत नाही. सर्वकाही बंदिस्त आणि बँकेद्वारेच शक्य. आवक आणि जावक फक्त रुपये चलनात उघड उघड. तेव्हा बेकायदेशीर काही केले असे म्हणणे जरा अस्वस्थ करणारे आहे. किमान जाणूनबुजून असे काही केलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on गुरुवार, 12/11/2025 - 18:19

In reply to तरीही गवि तुम्हीसुद्धा? by गवि

Permalink

अहो तुम्ही बेकायदेशीर मुद्दाम केले असे अजिबात म्हणण्याचे नव्हते

मला coinswitch विषयी काहीच माहिती नाही. मला binance आदी platforms माहिती होते केवळ. मला असे म्हणायचे होते की ते पूर्णपणे लीगल नसल्याने आपण त्यात जिंकूनही हरू शकतो मी सुद्धा लिगल पर्यायच म्युच्युअल फंडस् च्या माध्यमातून शोधत होतो. Coinswitch माहित असता तर तेव्हाही त्यात गुंतवले नसते कारण नुसता withdrawal वर tax भरा म्हणजे बहोत ही नाइन्साफी है. अब इतने तडपे के प्यास भी (क्रिप्टोकी) ना रही. तुम्ही दुखावले त्यासाठी क्षमस्व
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on गुरुवार, 12/11/2025 - 17:40

In reply to तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण by मारवा

Permalink

मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds

मी मागे एकदा crypto मध्ये कुठला भारतीय अधिकृत mutual fund गुंतवणूक करतो का असा शोध घेतला होता पण मला तरी असा कुठलाही सेबी अधिकृत भारतीय mutual fund सापडलेला नव्हता की जो फंड crypto मध्ये गुंतवणूक करतो. माझी असा एखादा म्युच्युअल फंड शोधून त्यात पैसे गुंतवण्याची इच्छा होती मग दुसरा एक मार्ग थोडा असा बघत होतो की ind money किंवा vertex का काय ते त्यांच्या माध्यमातून जे us stocks trading करू देतात वगैरे पण ते ही ब्रोकर जरा किचकट वाटल्याने सोडून दिलं म्हटलं जाऊ द्या आपली इंडियन इक्विटी ट्रेडिंग देतेय तो रिटर्न छान आहे की पण तुम्ही म्हणाला तसेच मोह के हमाम मे सब नंगे है.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 12/11/2025 - 09:30

Permalink

दुरुस्ती

दुरुस्ती *मिपा सोबत नाही.*>>मिपा सोडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on गुरुवार, 12/11/2025 - 15:11

Permalink

धाग्यावरील अनेकांचे प्रतिसाद

धाग्यावरील अनेकांचे प्रतिसाद वाचून हसू आले. अवधूत साठेंनी सकृतदर्शनी कोणताही फ्रॉड केलेला नाहीय असे दिसते. अब्जावधी रुपये कामविणाऱ्यांना हितशत्रू त्रास देऊ पाहणारच, नाही का? डीएसकेंनाही त्रास झाला होता. अवधूत साठेंच्या जाहिराती मला दिसतात. मी त्यांचे प्रशिक्षण अजून घेतलेले नाही पण ही चर्चा (आणि इतरही माध्यमांतील चर्चा) पाहून त्यांचा कोर्स कदाचित करीन असे वाटते. मी स्वतः बाजारात थोडेबहुत पैसे सातत्याने कमावतो आहे. मिपावर त्याबद्धल यापूर्वीही लिहिले होते. पण दसादशे दहाच्या चक्रवाढीचे कोष्टक नाचवणाऱ्या लोकांमुळे पुढे लिहिणे थांबविले. शेअर बाजारात पैसे कमावणे हे येरागबाळ्याचे काम नाही. (Making money in the stock market is not for beginners).
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on गुरुवार, 12/11/2025 - 15:15

Permalink

शेअर बाजारात पैसे कमावणे हे

शेअर बाजारात पैसे कमावणे हे येरागबाळ्याचे काम नाही. एखाद्या क्षेत्रात पैसे कमावणे हे सकृतदर्शनी जितके सोपे दिसते ते प्रत्यक्षात तितकेच अवघड असते!
  • Log in or register to post comments

Submitted by रीडर on Sat, 12/13/2025 - 03:29

Permalink

नवऱ्याच्या अकाउंट मधून ट्रेडिंग

त्या बायका नवऱ्याच्या अकाउंट मधून ट्रेडिंग करतात असं त्यांनीच सांगितलं का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com