✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 09/30/2025 - 10:15  ·  लेख
लेख
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले. महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती. देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला. २००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली. २०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली. शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
20953 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

सविस्तर व मुद्देसूद

स्वधर्म
Wed, 10/08/2025 - 15:34 नवीन
सविस्तर व मुद्देसूद उत्तराबद्दल आभार! आपली कार्यकारणमिमांसा अतिशय आवडली. त्यानुसार भारत हिंदू राष्ट्र होणे हे संविधानिक, राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर नुसते अशक्यच नसून अहितकारकही आहे. संदर्भमूल्य असलेले लिखाण आहे यात शंका नाही. खूप धन्यवाद. हे असं असलं तरी संविधान मानतो असं दाखवून आतून ते पूर्णपणे पोखरलं जाईल, ही एक शक्यता आहे. अशा प्रकारची दांभिकता ही भारतात अतिशय सार्वत्रिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

<संविधान मानतो असं दाखवून

रामचंद्र
गुरुवार, 10/09/2025 - 10:21 नवीन
<संविधान मानतो असं दाखवून आतून ते पूर्णपणे पोखरलं जाईल, ही एक शक्यता आहे.> हाही दीर्घकालीन डावपेचांचाच एक भाग म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

डावपेच?

युयुत्सु
गुरुवार, 10/09/2025 - 10:30 नवीन
हाही दीर्घकालीन डावपेचांचाच एक भाग म्हणता येईल.
हा जर डावपेचाचा भाग असेल तर संघ विष पसरवतो या वरंवार केल्या जाणार्‍या आरोपाला बळकटी मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/09/2025 - 13:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मान्य आहे. अखेर तो त्यांच्या

रामचंद्र
गुरुवार, 10/09/2025 - 13:20 नवीन
मान्य आहे. अखेर तो त्यांच्या डावपेचाच भाग आहे. ते याचा प्रतिवाद करत बसत नाहीत, आपले कार्य पुढे चालू ठेवतात आणि त्यादृष्टीने ठोस असं काही साध्य करतात, आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात. विरोधक मात्र टीकेपलिकडे फारसं काही साध्य करू शकत नाहीत. कुठलीही आशा, तशी चिन्हे कुठेही दिसत नसताना कैक पिढ्या जशा संघकार्य करत खपल्या, तसे विरोधक इतक्या मोठ्या प्रमाणावर, सातत्याने, पूर्णपणे निरपेक्ष वृत्तीने करताना दिसतात का, आपणच विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हिंदू कधीच संघटित होणार नाही.

आग्या१९९०
गुरुवार, 10/09/2025 - 13:53 नवीन
हिंदू कधीच संघटित होणार नाही. उच्च नीच वर्गभेद संघाला नष्ट करता येणार नाही. कारण ते त्यांचे मूळ उद्दीष्ट नाही. हिंदू हिंदूला जोडे फेकून मारत असताना संघ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

हिंदू कधीच संघटित होणार नाही.

शाम भागवत
गुरुवार, 10/09/2025 - 16:24 नवीन
हिंदू कधीच संघटित होणार नाही.
वरील वाक्य वास्तवाला धरून नाही आहे. कारण आणिबाणीत सर्व विरोधीपक्ष तुरूंगात असताना घटनेच्या प्रस्तावने दुरूस्ती करून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या दोन शब्दांची भर घातली गेलेली आहे. १९७५ च्या अगोदरच्या घटनेच्या प्रस्तावनेत हे दोन शब्द नाहीत. या शब्दांची योजना बरोबर आहे असे समजून चालणारे जे पक्ष आहेत त्यांची लोकसभेतील मतदान टक्केवारी गेली ५० वर्षे सातत्याने घटत चाललेली आहे. या उलट हे दोन शब्द मंजूर नसलेले व हिंदूहितैषी असलेले जे पक्ष आहेत त्यांची मतदान टक्केवारी वाढत जाताना दिसत आहे. २०२४ च्या लोकसभेत हिंदूहितैषी पक्षांना बऱ्याच जागा गमवायला लागल्या असल्या तरी त्यातील मुख्य़ पक्षाची म्हणजे भाजपाची मतदान टक्केवारी ३७.७ टक्यांवरून ३६.५६ टक्के इतकीच घसरलेली आहे. मात्र बांगला देशातील घटनांनंतर हिंदूहितैषी मतदानात चांगलीच वाढ झालेली असून, त्याचा परिणाम लोकसभेच्या नंतरच्या विधानसभा निवडणूकांत पाहावयास मिळालेला दिसतो. त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमुळे ही प्रक्रीया आणखी जोर पकडून हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी आणखीन वाढायची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज बिहारच्या निवडणूकीत येऊ शकतो. पण हिंदू कधीच संघटित होणार नाही. असा तुमचा आदर्शवाद असेल किंवा, तुमची तशी इच्छा असेल तर त्याला काहीच हरकत नाही. ते तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहेच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हिंदू कधीच संघटित होणार नाही.

आग्या१९९०
गुरुवार, 10/09/2025 - 20:03 नवीन
हिंदू कधीच संघटित होणार नाही. असा तुमचा आदर्शवाद असेल किंवा, तुमची तशी इच्छा असेल तर त्याला काहीच हरकत नाही. ते तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहेच.
कसला आदर्शवाद आणि कसली इच्छा ? वस्तुस्थिती आहे. संघटीत म्हणजे जातपात मानणे, आपल्याच धर्मातील दलितांवर अत्याचार करणे, त्यांच्या जमिनी हडप करणे. ह्यात हिंदुवादी सरकार ,पोलिस सामील असणे. ही तुमची हिंदू संघटितची व्याख्या असेल तर मला व्याख्या तपासून घ्यावी लागेल.
२०२४ च्या लोकसभेत हिंदूहितैषी पक्षांना बऱ्याच जागा गमवायला लागल्या असल्या तरी त्यातील मुख्य़ पक्षाची म्हणजे भाजपाची मतदान टक्केवारी ३७.७ टक्यांवरून ३६.५६ टक्के इतकीच घसरलेली आहे. मात्र बांगला देशातील घटनांनंतर हिंदूहितैषी मतदानात चांगलीच वाढ झालेली असून, त्याचा परिणाम लोकसभेच्या नंतरच्या विधानसभा निवडणूकांत पाहावयास मिळालेला दिसतो. त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमुळे ही प्रक्रीया आणखी जोर पकडून हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी आणखीन वाढायची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज बिहारच्या निवडणूकीत येऊ शकतो.
ह्यात संघाचे योगदान काय? हे हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचे कारस्थान आहे. संघ ही राजकीय संघटना नाही. राजकीय संघटना असती तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असता असे सध्या संघाचे कार्यकर्ते बचाव करताना म्हणू लागले आहेत. राजकीय संघटन आणि सामाजिक संघटन ह्यात गोंधळ करू नका. हिंदूंचे सामाजिक संघटन व्हावे हे संघाचे स्वप्न किंवा उद्दीष्ट नाहीच आहे. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघवाल्यांनी मदतकार्य केले म्हणजे हिंदूंचे संघटन केले असे संघाला वाटते का? आणि जेव्हा हिंदू सवर्ण हिंदू दलितांवर अत्याचार करतो तेव्हा संघवाले तेथे काय आणि कोणाला मदत करतात? तोंड तरी उघडतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

जो व्यक्ति आपल्यादेशला

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:13 नवीन
जो व्यक्ति आपल्यादेशला मातृभूमि मनातों तो हिन्दू (त्यात सर्व धर्मीय येतात) ही संघाची अवधारणा आहे। संघा सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-muslim-children-study-in-vidya-bharti-schools-of-rss-the-number-of-christian-students-is-also-not-less-23502590.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हे पूर्वी ऐकले होते पण तेव्हा

युयुत्सु
Tue, 10/14/2025 - 08:38 नवीन
हे पूर्वी ऐकले होते पण तेव्हा विश्वास बसला नव्हता...अर्थात व्हिक्टीम बॅशिंग ही आपली संस्कृती असल्याने फार वेगळे काही होईल असे वाटत नाही. https://youtu.be/FlwSwf2Z3ts?si=3x0peFXrjTH-fl5G
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

संघाला कुणावर ही नियंत्रण

विवेकपटाईत
Sun, 11/02/2025 - 12:32 नवीन
संघाला कुणावर ही नियंत्रण मिळवायचे नाही आहे. बाकी संघाच्या दृष्टीने जो भारताला मातृभूमी मानतो तो हिंदू. त्या अर्थाने आपला देश हिंदू राष्ट्रच आहे. जगात ही हिंदू राष्ट्र ही भारताची ओळख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

धर्म वाढवला तर राजकारण का करीत नाही म्हणून विचारतात ....

गामा पैलवान
Tue, 10/07/2025 - 23:40 नवीन
कपिलमुनी,
धर्म वाढवायचा टिकवायचा असेल तर आपलाच धर्म सुधारायला हवा ना. दुसरीकडे बोट घालून काय मिळणार ?
तुम्ही संघाशी जोडले गेले होतात हे नव्याने कळलं. तुम्ही संघात असतांना त्याने राजकारण केल्याचं तुम्हांस आढळून आलं का ? तुमचा रोकडा अनुभव काय म्हणतो ? यापूर्वी संघाने राजकारण केल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. संघ राजकारणाच्या बाहेरंच असेल अशी शिस्त आखून दिली होती. तर मग संघावर स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतल्याचा आरोप कितपत उचित वाटतो ? आधी समाज सुधारला पाहिजे अशी टिळकपूर्व मवाळांची धारणा होती. मग तेच धोरण संघाने चालवलं तर काय बिघडलं ? फक्त संघाने इंग्रजांशी सहकार्य वा विरोध काहीही उघडपणे केला नाही. बाकी, इंग्रजांशी सहकार्य म्हणाल तर गांधींनी दोन महायुद्धांसाठी हिंदी सैनिकांची भरती करायचं आवाहन केलेलं होतंच. मग संघावर आगपाखड नेमकी कशासाठी ? याच न्यायाने भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी आंदोलन उभारणं हे राजकीय पाऊल आहे. ते संघाने उचलावं, अशी अपेक्षा का ठेवली जाते ? मनांत आणलं असतं तर भगतसिंगांची फाशी गांधी सहज रद्द करू शकले असते. ते राजकारणी असूनही त्यांनी ती रहित केली नाही. आणि संघ राजकारण करीत नसूनही त्याने राजकीय आंदोलन उभारायला पाहिजे, असं कसं काय ? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

उत्तम !

कपिलमुनी
Wed, 10/08/2025 - 08:13 नवीन
आपण न भांडता मुद्देसूद चर्चा करू. वेळ मिळाला की प्रतिसाद टाकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

धन्यवाद.

गामा पैलवान
गुरुवार, 10/09/2025 - 01:32 नवीन
धन्यवाद. इथे या धाग्यावरच चर्चा करूया. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

संघाचे बाबतीत अनेकांचे

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:10 नवीन
संघाचे बाबतीत अनेकांचे पूर्वग्रह आहेत. जो व्यक्ति आपल्या देशाला मातृभूमी मानतो तो हिंदू (यात मुस्लिम ईसाई सर्व येतात. काही प्रमाणात मुस्लिम ही संघाच्या शाखेत जातात). संघ हिंसावर कधीच विश्वास ठेवत नाही. सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-muslim-children-study-in-vidya-bharti-schools-of-rss-the-number-of-christian-students-is-also-not-less-23502590.html
  • Log in or register to post comments

हे दाखवायचे दात आहेत

कपिलमुनी
गुरुवार, 10/09/2025 - 09:39 नवीन
दात खायचे वेगळे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

जगात आजमितीस किती हिंदू राष्ट्रे आहेत ? आणि किती इतर धर्मीय ?

मारवा
Wed, 10/08/2025 - 16:41 नवीन
एक बेसिक प्रश्न जगात एकूण किती हिंदू राष्ट्रे आहेत ? एकूण किती ख्रिस्ती राष्ट्रे आहेत ? एकूण किती इस्लामिक राष्ट्रे आहेत ? म्हणजे शुद्ध हिंदू शुद्ध इस्लामिक शुद्ध ख्रिस्ती असलेली विचारतोय. अजिबात धर्म निरपेक्ष नसलेली अशी. आणि त्यात म्हणजे अशा धर्मनिरपेक्ष नसलेल्या राष्ट्रात जगण्याचा स्टार ते राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने वाईट झालाय की चांगला झालाय ? तसेच जगातील लोकसंख्या wise सर्वात मोठी पहिले तीन प्रमुख धर्म कुठले ?
  • Log in or register to post comments

त्यांचा स्तर असे वाचावे.

मारवा
Wed, 10/08/2025 - 16:51 नवीन
तसेच मोठी लोकसंख्या असूनही हिंदू राष्ट्र एकही नसेल याचा अर्थ 1 हिंदुलोक हे पुरेसे सहिष्णु आहे असा काढता येऊ शकतो का ? 2 की हिंदुलोक पुरेसे दुबळे आहेत असा काढता येऊ शकतो का ? 3 की हिंदुलोक आणि हिंदू धर्मातील मूलतत्वे पुरेशी आक्रमक नाहीत असा काढता येऊ शकतो का ? 4 की हिंदू लोक हिंदू हा Way of life म्हणुन स्वीकारत असल्याने त्यांना याचे सोयर सुतक नसते का ? 5 आणि समजा भारत इतर देशा प्रमाणे इस्लामिक किंवा ख्रिस्ती प्रमाणे हिंदू राष्ट्र झाला तर याचा परिणाम काय होणार ? 6 सर्वात रोचक बाब already जे एक धर्मीय देश आहेत ते व अधार्मिक किंवा नास्तिक अशी कम्युनिस्ट विचारसरणी असलेले देश वरील सर्व 3 धर्मीय देशा पेक्षा उच्चतम जीवन स्तर असलेली आहेत का ?
  • Log in or register to post comments

श्री० मारवा,

युयुत्सु
गुरुवार, 10/09/2025 - 09:32 नवीन
श्री० मारवा, आपण उपस्थित केलेले प्रश्न कोणत्याही ए०आय्०ला जर विचारलेत तर पुरेशी समर्पक उत्तरे मिळतील अशी खात्री आहे.
  • Log in or register to post comments

संघाची सर्वात complex theme ही समरसता आहे.

मारवा
गुरुवार, 10/09/2025 - 18:50 नवीन
समता नव्हे समरसता असे संघ आवर्जून प्रतिपादन करतो. ही संघाची सर्वात deep खेळी aahe.
  • Log in or register to post comments

Deep deep down

अभ्या..
गुरुवार, 10/09/2025 - 19:11 नवीन
आदिवासी ऐवजी वनवासी ही सगळ्यात डिपेस्ट आहे. . दोन्ही मिळून अडाणीवासी अशी आगामी काळात दिसणारे बघा. . हिंदुहितैशी पक्ष म्हणे आपले गोग्गोड काका. ह्याट.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

:)))

शाम भागवत
Fri, 10/10/2025 - 20:42 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शबरी वनवासी होती ....

गामा पैलवान
Wed, 10/15/2025 - 01:23 नवीन
शबरी वनवासी होती आणि राम नगरवासी होता. दोघेही या भूमीचे आदिवासीच आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग

सुबोध खरे
Fri, 10/10/2025 - 10:43 नवीन
इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग गम चघळण्यासारखे आहे. कितीही चघळा पोटात काही जात नाही. थोड्या वेळाने स्वादही राहत नाही. आलात तर तुमच्या सह नाही आलात तर तुमच्या विना आणि मध्ये आलात तर तुम्हाला आडवे पाडून या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे रा स्व संघ पुढे जातच राहील. बाकी डावे आणि समाजवादी रडत राहतील हि काळ्या दगडावरची र्रेघ आहे. मग त्यांनी त्याच दगडावर कितीही डोके आपटू द्या.
  • Log in or register to post comments

संघ पुढे जातच राहील.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/10/2025 - 11:29 नवीन
संघ पुढे जातच राहील. ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही, फक्त दसरा संचलन करून ट्रॅफिक वाढवून समाजाला उपद्रव द्यायचे काम करते ती संस्था पुढे गेली काय किंवा मागे गेली काय? काय फर के पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री० अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु
Fri, 10/10/2025 - 11:49 नवीन
श्री० अमरेंद्र बाहुबली अशा ठिसूळ पायावर काम करणार्‍या संस्था / संघटना उन्माद वाढला की स्वतःच्या वजनाखाली कोसळून पडतात... तेव्हा निश्चिंत असा. संघाचे तळागाळातले मंदबुद्धी कार्यकर्ते हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांना संघाने निर्माण केलेला भ्रम आणि वास्तव यात ताळमेळ साधायची क्षमता नसते. या मंडळीनी २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी घातलेला गोंधळ आणि त्याचा निवडणूक निकालावर झालेला परिणाम सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ... मूलभूत भेडसावणारे प्रश्न सोडवायची क्षमता आणि इच्छा संघामध्ये नाही. २०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र स्वतःची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे! देशात जसजसा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/10/2025 - 12:25 नवीन
सहमत आहे! देशात जसजसा सुशिक्षित वर्ग वाढतो आहे, संघाचे कुटील डाव ओळखायची क्षमता देखील वाढत आहे. त्यामुळे बहुजन संघ पासून दूर जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मजा की विनाश?

स्वधर्म
Fri, 10/10/2025 - 14:50 नवीन
श्री. युयुत्सु, आपला प्रतिसाद जबरी भेदक आहे. पण '२०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल.' या वाक्याशी अडखळायला झालं. आधीच हाताला काम नसलेली तरूण मुले मुली धर्माच्या नशेत ओढली जात असताना जर अजूनच उन्माद वाढला तर कुणाची मजा? उलट एका पिढीचं प्रचंड नुकसान होईल. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात संघाच्या प्रभावामुळे अनेक बदल झालेत उदा. डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे, बनारस हिंदू विद्यापीठात भुत विद्या व ज्योतिष्य या विशयाचे अभ्यासक्रम सुरू करणे इ. हे बदल ऊगवत्या पिढीसाठी कसे आहेत असे आपल्याला वाटते? त्यात जर अजून धर्माधिष्ठीत प्रतिगामी संघटनांचा प्रभाव वाढला, तर देशाचे जास्तच नुकसान होण्याचा धोका नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

दुसऱ्याच्या विषयात बोलायचे नाही पण आपण आपली रेष लांब वाढवतोय

समाधान राऊत
Fri, 10/10/2025 - 15:12 नवीन
मुस्लिम युनिव्हर्सिटी माहिती आहे का , भरपूर आहेत ... संत फ्रान्सिस्को शाळा माहिती आहे का , भरपूर आहेत ... काय शिकवतात तिथे ते सर्वांना माहितीच असेल ... त्याचे परिणाम काय होत आहेत ते सुद्धा सर्वांना माहिती आहे ... उन्माद कोणाचाच चांगला नाही हे मान्य ... मुग स्वस्त झाले आहेत एवढेच सांगतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अहो पण

स्वधर्म
Fri, 10/10/2025 - 16:50 नवीन
कोणत्याही धर्माची शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात भेसळ करून अवैज्ञानिक गोष्टी करणे हे घटनेत सांगितलेल्या तत्वांच्या विरूध्द आहे. 'दुसरे' (म्हणजेच दुसर्‍या धर्माचे) चुकीचे करतायत म्हणून 'आपण' तसेच चुकीचे केले पाहिजे असे संघाचे तत्वज्ञान आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

श्री० स्वधर्म

युयुत्सु
Fri, 10/10/2025 - 15:25 नवीन
श्री० स्वधर्म अजून चार वर्षात देशाची लोकसंख्या अजून वाढणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या ताणाने, वेगाने ढासळणारे पर्यावरण भारतीयांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विषयक अनेक समस्या आणखी गंभीर करेल. त्यात भरीला भर म्हणून लायकी असून देशाबाहेर जाऊ न शकणारे आणखी वैफल्यग्रस्त बनतील. देश चालवणे आणखी अवघड बनेल. विश्वगुरु, अखंडभारत सारख्या पुड्या सोडल्याने काहीही साध्य झाले नाही. समरसतेच्या गप्पा तोंडी लावायला पण उपयोगी नाहीत. "सनातन धर्म" हा पण एक लवकरच फुसका बार ठरेल. ज्या धर्माचे धर्मगुरु (प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद, रामभद्राचार्य पातळी सोडून एकेमेकांची निंदानालस्ती करतात) तो धर्म आपल्या अनुयायांना कसले स्थैर्य देणार? तेव्हा आपण स्वस्थपणे बघत राहणे हे केव्हाही शहाणपणाचे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तेव्हा आपण स्वस्थपणे बघत

आग्या१९९०
Fri, 10/10/2025 - 15:34 नवीन
तेव्हा आपण स्वस्थपणे बघत राहणे हे केव्हाही शहाणपणाचे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

देश चालवणे आणखी अवघड बनेल

सुबोध खरे
Mon, 10/13/2025 - 12:32 नवीन
देश चालवणे आणखी अवघड बनेल आणखी डोकं आपटा दगडावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

उन्माद अमान्य आहे, पण माहिती नाही म्हणून विचारतोय

समाधान राऊत
Fri, 10/10/2025 - 19:42 नवीन
भूत विद्या चा अभ्यासक्रम काय आहे काही कळू शकेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

हे घ्या संदर्भ

स्वधर्म
Sun, 10/12/2025 - 14:20 नवीन
ही बातमी माझ्या पाहण्यात आली होती: https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-50915414#:~:text=A%20prestigious%20Indian%20university%20is,and%20other%20forms%20of%20exercise. अभ्यासक्रम इथे आहे: https://www.bhu.ac.in/Content/Syllabus/Syllabus_2314320200601051606.pdf आयुर्वेदिक पध्दतीने मानसरोग बरे करणे यांस भूत विद्या म्हणत असावेत. त्यात नेहमीचेच भूत, ग्रह, गृहदोष व मानस यांचा संबंध इ. छद्मविज्ञानही आहेच. आपल्याला हे कितपत पटते ते जरूर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

डार्विनचा सिंध्दांत एन सी इ

सुबोध खरे
Fri, 10/10/2025 - 20:08 नवीन
डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे There is a current controversy claiming that Darwin's Theory of Evolution has been removed from science books by the NCERT and periodic tables have been dropped. I would like to publicly state that nothing of this kind has happened." Dharmendra Pradhan said. ते १० वि ला कशाला काढले आहे हा मुद्दा वादास्पद असू शकतो पण डाव्या पुरोगामी गँगने लगेच रडारड सुरु केली कि हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि त्यांना परत जाती वाद आणायचा आहे. https://www.ndtv.com/india-news/no-changes-minister-on-deletion-of-darwin-theory-from-ncert-textbooks-4138661
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

भूत विद्या किंवा ज्योतिष

सुबोध खरे
Fri, 10/10/2025 - 20:23 नवीन
भूत विद्या किंवा ज्योतिष विद्यापीठात शिकवणे यावर इतकी रडारड करण्यासारखे काय आहे? जोवर या पदव्या इतर पदव्याच्या समकक्ष मानल्या जात नाहीत तोवर त्यावर संशोधन करणे किंवा शिकवणे यात इतके रडारड करण्यासारखे काय आहे? भारतात इस्लामिक स्टडी मध्ये पदव्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पी एच डी करणारे हजारो विद्यार्थी आहेत. आता कुराणात पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती अल्लाच्या इच्छेने फिरतो हे सांगितलेले आहे ते मान्य करून हे लोक एम ए करतात पी एच ड्या घेतात आणि आय ए एस ला सुद्धा जातात त्याबद्दल कोणी डाव्या ने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. ( सर तन से जुडा झालं तर काय या भीतीने असावे) London School of Astrology https://www.londonschoolofastrology.com/ The University of Wales Trinity Saint David offers a master's degree in Cultural Astronomy and Astrology. Other options include the Faculty of Astrological Studies, which offers short courses and summer schools. भारतात २५० च्या यावर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत. आतापर्यंत जितके संशोधन झाले त्यात होमिओपॅथी हि प्लॅसिबोपेक्षा जास्त गुणकारी आहे हे सिद्ध झालेले नाही. मीठ पाण्यात विरघळवल्यावर मीठ हे मीठ रहात नाही किंवा एखादा पदार्थ विरळ केल्यावर त्याची शक्ती कितीतरीपट वाढते हे मूलभूत शास्त्राविरुद्धच्या सिद्धांतावर अवलम्बुन असलेले तत्वज्ञान आहे. त्याला शास्त्र म्हणणे अशक्य आहे. जगभर होमिओपॅथी हे छद्म शास्त्र मानले जाते. त्याबद्दल कुणाला काही आक्षेप नाही इथे मिपावरच किती तरी लोक होमिओपॅथीचे हिरीरीने समर्थन करताना आढळेल. डावे पुरोगामी मुळातूनच दांभिक असतात आणि ते तसं परत परत अट्टहासाने सिद्ध करून दाखवत राहतात हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जोवर या पदव्या इतर पदव्याच्या

टर्मीनेटर
Sat, 10/11/2025 - 16:18 नवीन
जोवर या पदव्या इतर पदव्याच्या समकक्ष मानल्या जात नाहीत तोवर त्यावर संशोधन करणे किंवा शिकवणे यात इतके रडारड करण्यासारखे काय आहे?
१००% सहमत!
भारतात इस्लामिक स्टडी मध्ये पदव्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पी एच डी करणारे हजारो विद्यार्थी आहेत. आता कुराणात पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती अल्लाच्या इच्छेने फिरतो हे सांगितलेले आहे ते मान्य करून हे लोक एम ए करतात पी एच ड्या घेतात आणि आय ए एस ला सुद्धा जातात त्याबद्दल कोणी डाव्या ने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही.
अगदी अगदी... भारतातच नाही तर परदेशांत जाऊन इस्लामिक लिटरेचर मध्ये PhD करणारेही महाभाग अस्तित्वात आहेत, आणि असा एक महाभाग मला कैरो मध्ये भेटल्याचे मी 2018 साली इथे मिपावरच लिहिलेले आहे. एअरपोर्टवर 'अरुण कुमारची बॅग बदली झाल्याचे' मी त्या लेखात लिहिले होते, पण त्ती बॅग गहाळ झाल्याचे सर्वात जास्त दुःख त्या महाभागालाच झाले होते कारण त्या बॅगेत तिथे उपलब्ध नसलेल्या गुटख्याच्या पुड्या अरुण कुमार त्याच्यासाठी लुधियाणाहून घेऊन आला होता 😂 मदरशांमध्ये शिकलेल्या लोकांकडून अजून किती अपेक्षा करायच्या? डाव्यांची आणि धर्मांधांची युती तशी आता नवीन राहिली नाहीये हे आपण सगळे जाणतो, एकाच ईकोसिस्टीमचे हे सध्यातरी भागधारक झाले आहेत. अर्थात धर्मांधांचे हेतू साध्य झाल्यावर पहिले हे लोकं (तथाकथित निधर्मी) डाव्यांचा गळा पहिले कापतील हे त्या निर्बुद्ध डाव्यांच्या अद्याप लक्षात येत नाहीये हा भाग वेगळा 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परस्परविरोधी मते कशी पचवता?

स्वधर्म
Sun, 10/12/2025 - 14:38 नवीन
डॉक्टर, आयुष्यभर विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले ज्ञान वापरून व्यवसाय केलात. त्यातून बर्‍याच रुग्णांना फायदा झाला असेल यात शंकाच नाही. त्याचमुळे आपण होमिओपॅथी हि विज्ञानाधारित नाही म्हणून खिल्ली उडवली आहे. इथपर्यंत सगळे सुसंगत आहे. पण... संपूर्णपणे काल्पनिक गोष्टींवर आधारित भूतविद्या हा अभ्यासक्रम प्रतिष्ठीत विद्यापीठात शिकवला जातोय यावर तुंम्हाला काहीच आक्षेप नाही. इतर भंपक कोर्सेस कसे जगातील तर विद्यापीठात शिकवतात हा तुमचा डिफेन्स! अवघड आहे. शिवाय ज्या डार्विनने विज्ञानाला संपूर्ण कलाटणी दिली, त्याचा सिध्दांत ९ वी १० वीतून काढला. त्यामुळे १० वी नंतर विज्ञान न घेणारे सर्व मुले मुली तो कधीही शिकू शकणार नाहीत व पारंपारिक पुराणांवरच विश्वास ठेवतील याचे तुंम्हाला काहीच वाटत नाही. तुंम्ही दिलेल्या दुव्यातील त्या मंत्र्याचे प्रतिपादन हास्यास्पद आहे. तुंम्ही विज्ञान पूर्णपणे नाकारले तर समजू शकतो पण त्यावरच आधारित व्यवसाय करायचा आणि व्यक्तीगत आयुष्यात संपूर्ण भंपक गोष्टींवर विश्वास ठेवायचा या आंतर्विरोधाचा ताण नाही येत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

होमिओपॅथी हि विज्ञानाधारित

सुबोध खरे
Mon, 10/13/2025 - 12:30 नवीन
होमिओपॅथी हि विज्ञानाधारित नाही म्हणून खिल्ली उडवली आहे. खिल्ली उडवलेली नाही. वस्तुस्थिती विशद केली आहे. विज्ञानाधारित आहे हे कुणीही सिद्ध करून दाखवावे. ज्यांचा विश्वास आहे ते त्या प्र्णालीचा वापर करतात. तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या अनुभवात कितीतरी लोकांचे नुकसान झालेले मी स्वतः पाहत आलो आहे. संपूर्णपणे काल्पनिक गोष्टींवर आधारित भूतविद्या हा अभ्यासक्रम प्रतिष्ठीत विद्यापीठात शिकवला जातोय यावर तुंम्हाला काहीच आक्षेप नाही. माझा त्या गोष्टीवर विश्वास नाहीच पण म्हणून मी सार्वजनिक न्यासावर हिरीरीने त्याबद्दल वाद घालायलाच हवा आहे का? तुंम्ही विज्ञान पूर्णपणे नाकारले तर समजू शकतो पण त्यावरच आधारित व्यवसाय करायचा आणि व्यक्तीगत आयुष्यात संपूर्ण भंपक गोष्टींवर विश्वास ठेवायचा या आंतर्विरोधाचा ताण नाही येत? कोणत्या भंपक गोष्टींवर विश्वास ठेवलाय ते सांगता येईल का? डावे पुरोगामी नेहमी अशा गोष्टींवर सार्वजनिक न्यासावर टाहो फोडत असतात पण होमीओपॅथी, बकर ईद ला प्राण्याचा बळी देणे अशा विरूद्ध मूग गिळून गप्प असतात या दुटप्पी दांभिकपणा वर ताशेरे ओढले आहेत. याचा अर्थ फल ज्योतिष किंवा भूत विद्येवर माझा विश्वास आहे हा शोध आपण कसा काय लावला हे समजत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

दुटप्पी?

स्वधर्म
Mon, 10/13/2025 - 14:24 नवीन
स्वतःच्या भूमिकेबद्दलः >> माझा त्या गोष्टीवर विश्वास नाहीच पण म्हणून मी सार्वजनिक न्यासावर हिरीरीने त्याबद्दल वाद घालायलाच हवा आहे का? दुसर्‍यांच्या भूमिकेबद्दलः >> डावे पुरोगामी नेहमी अशा गोष्टींवर सार्वजनिक न्यासावर टाहो फोडत असतात पण होमीओपॅथी, बकर ईद ला प्राण्याचा बळी देणे अशा विरूद्ध मूग गिळून गप्प असतात त्यावरून काढलेला निष्कर्षः >> दुटप्पी दांभिकपणा (अर्थात इतरांचाच फक्त) >> भूत विद्या किंवा ज्योतिष विद्यापीठात शिकवणे यावर इतकी रडारड करण्यासारखे काय आहे? + >> याचा अर्थ फल ज्योतिष किंवा भूत विद्येवर माझा विश्वास आहे हा शोध आपण कसा काय लावला हे समजत नाही विश्वास नाही हो, होमिओपथीची २५० हून अधिक कॉलेजेस आहेत म्हणून भूतविद्येचे असले तर काय बिघडले असा अजब तर्क लावला आहे आपण. झकास! चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

होमिओपथीची २५० हून अधिक

सुबोध खरे
Mon, 10/13/2025 - 19:47 नवीन
होमिओपथीची २५० हून अधिक कॉलेजेस आहेत म्हणून भूतविद्येचे असले तर काय बिघडले असा अजब तर्क लावला आहे आपण. मी उगाच होमिओपॅथी किंवा फलज्योतिष किंवा तत्सम बाबींवर सार्वजनिक न्यासावर रडारड करताना दिसलो आहे का? मग मी भूतविद्येबद्दलच कशाला उगाच आवाज काढू? अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर माझा विश्वास नाही. याचा अर्थ माझे त्याला समर्थन आहे असा जावईशोध आपल्याला लावायचा असेल तर त्याला काही इलाज नाही. डावे फुरोगामी जिथे तिथे रडारड करताना दिसतात.उदा दिवाळीच्या प्रदूषणाबद्दल टाहो फोडतात पण ख्रिसमसच्या मेणबत्त्यांबद्दल किंवा नववर्षाला फोडले जाणारे फटाके याबद्दल काही बोलत नाहीत किंवा बकर ईदला मारल्या जाणाऱ्या लाखो बकर्यांबद्दल मूग गिळून गप्प असतात या दुटप्पीपणाबद्दल बोललो तर आपल्याला मिरच्या झोंबल्या? आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

डार्विनचा सिद्धांत नाहीये

अप्पा जोगळेकर
Sat, 10/11/2025 - 10:01 नवीन
डार्विनचा सिद्धांत नाहीये डार्विनची थिअरी आहे. थिअरी आपल्या मनाला हवी तशी मांडता येते. सिद्धांत सिद्ध झालेला असतो. एक थिअरी काढली आणि दुसरी थिअरी समाविष्ट केली. गुणात्मक फरक काही नाही. मास्क वापरून कोरोनाला अटकाव होतो किंवा कोविडमध्ये भारतात ४० कोटी माणसे मारतील अशीसुद्धा थिअरी होती ना. त्याचे काय झाले सगळ्यांनी पहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

कोरोना सारखा विषाणू फक्त थंड

Vichar Manus
Sat, 10/11/2025 - 13:47 नवीन
कोरोना सारखा विषाणू फक्त थंड वातावरणात प्रभावी ठरेल, भारतासारख्या उष्ण प्रदेशात अजिबात परिणाम करणार नाही, त्यामुळे घाबरायचे कारण नाही. अशी थिअरी सुध्दा काही विद्वान लोकांनी मांडली होती. पण कोरोना नि कहर केला होता. त्या थियरी चे काय झाले ते सगळ्यांनी पाहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

डार्विनचा सिद्धांत नाहीये

आग्या१९९०
Sun, 10/12/2025 - 08:55 नवीन
डार्विनचा सिद्धांत नाहीये डार्विनची थिअरी आहे.
सिद्धांत आणि थिअरीचा अर्थ एकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

माझ्या मते ....

गामा पैलवान
Sun, 10/12/2025 - 14:20 नवीन
सिद्धान्त = law उदा . : औष्मगतिक सिद्धान्त = Law of Thermodynamics याउलट Theory = उपपत्ती उदा. : प्रस्फोट उपपत्ती = Big Bang Theory चूकभूल देणेघेणे. -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ज्या संस्थेचा (जिची अधिकृत

टर्मीनेटर
Sat, 10/11/2025 - 15:35 नवीन
ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही,
हे वाक्य सोडून बाकीच्या प्रतिसादाशी सहमत आहे! कधीही कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास सर्वात पहिले संघ स्वयंसेवक तिथे मदतकार्यासाठी पोहोचतात हे लहानपणापासून पाहिले असल्याने त्यांचा "समाजाला काडीचा उपयोग नाही" असे म्हणणे काही पटले नाही! बाकी सर्वसामान्य स्वयंसेवकांची (भयंकर विषारी) विचारसरणी कधीच पटली नाही 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

सुबोध खरे
Sat, 10/11/2025 - 19:30 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

अजून डोकं आपटा

सुबोध खरे
Fri, 10/10/2025 - 12:19 नवीन
अजून डोकं आपटा
  • Log in or register to post comments

:))

शाम भागवत
Fri, 10/10/2025 - 20:38 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा