हिंदुत्ववादी आणि उजवे
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात.
आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय?
१) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात.
२) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात.
३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत. उलट त्यातल्या बर्याचशा परंपरा आजच्या काळातही कशा उपयोगाच्या आहेत हे सांगतात.
४) ते हिंदू धर्म हा महान आहेच यावर शंभर टक्के श्रद्धा ठेवतात ते हिंदू धर्माचे तुलना अन्य धर्माची करत बसत नाहीत. हिंदू धर्मासाठी लढलेल्या ऐतिहासिक लोकांबद्दल यांना अभिमान असतो.
५) प्रत्येक हिंदूंने हिंदू धर्माबद्दल अतीव अभिमान बाळगावाच अशी त्यांची अपेक्षा असते.
६) अफगाणिस्तानपासून ते बांग्लादेशपर्यंत हा सर्व भाग एक हिंदूराष्ट्र बनावे ही त्यांची इच्छा असते. या हिंदुराष्ट्रात मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्माचे लोक असता कामा नयेत अशी त्यांची इच्छा असते. हिंदुराष्ट्रात केवळ हिंदू हा एकच धर्म असला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते.
आता उजवे म्हणजे काय बघा.
१) यांना डेव्हलपमेंटमधे सर्वाधिक स्वारस्य असते. आर्थिक उन्नती , चांगले रस्ते , चांगल्या पगाराच्या पुरेशा नोकऱ्या , व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षणाच्या पुरेशा सुविधा या यांच्या मुख्य मागण्या/अपेक्षा असतात.
२) इस्लाममध्ये विज्ञानवादी विचारांना फारसा थारा नाही. तसेच बऱ्याचशा परंपरा या सातव्या शतकातल्या आहेत. शिवाय इस्लाम हाच एकमेव धर्म या जगात असता पाहिजे वगैरे विचारसरणी बहुतांश मुस्लिमांची आहे. त्यामुळे हा धर्म विकासासाठी फारसा अनुकूल नाही असे भारतातील उजव्यांचे ठाम मत असते. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात इस्लामचे पालन करणारे कोणीही नको असे यांचे ठाम मत असते. यांच्या दृष्टीने भारतातली ख्रिश्चन हे भारतातल्या मुस्लिमांइतके त्रासदायक नसले तरीही या जगातले बलवान देश हे मुख्यत्वे ख्रिश्चन बहुसंख्याक लोकांचे आहेत. त्यामुळे भारतातल्या ख्रिश्चन धर्मियांचा वापर करून डेमोग्राफी बदलून भारताला या ख्रिश्चनबहुल देशांच्या मतानुसार वागायला भाग पाडण्यास या देशातले ख्रिश्चन मदत करू शकतात असाही संशय उजवे विचारांच्या लोकांना असतो. म्हणूनच ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मप्रसाराला उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध असतो.
३) उजव्या विचारसरणीच्या लोकांना विकासाला प्राधान्य देणारा कोणताही पक्ष सत्तेत आला तरी खरंतर चालणार असतो. पण त्यातल्या त्यात भाजप हा विकासाला चालना देणारा या देशाचे हित पाहणारा त्यासोबतच हिंदूंचे हित पाहणारा पक्ष आहे असे यांचे मत असल्याने कोणत्यातरी पक्षाला मतदान करायचंच आहे तर आपल्या धर्माच्या बाजूने उभ्या राहणार्या पक्षाला मतदान का करू नये? असे यांना वाटते. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजप यांना बरा पर्याय वाटत असतो. त्यामुळे ते भाजप समर्थक असू शकतात. यांना सर्वाधिक तिटकारा काँग्रेसचा असतो.
४) उजव्या विचारांचे लोक हे हिंदू धर्माचे देव मानणारे किंवा अन्य कोणत्यातरी धर्माचे दैवत मानणारे असतीलच असे नाही. उजव्या विचारांचे लोक हे निरीश्वरवादीसुद्धा असू शकतात. धर्माची चिकित्सा करणारे असू शकतात. भारत हा हिंदुत्ववादी झाला नाही तरी देखील तो एक विकसित देश , राहण्यालायक देश व्हायला हवा ही यांची मनापासून इच्छा असते. कारण अमेरिका कितीही प्रगतिशील देश असला तरी देखील भारताइतकं मोकळं वातावरण अमेरिकेत नाही. त्यामुळे भारतातलं मोकळं वातावरण , कुटुंबाला प्राधान्य या गोष्टींसोबतच विकासाला प्राधान्य देणारा देश असा आपला भारत व्हावा असे यांना वाटत असते.
या दोन टोकांच्या मध्ये 'टोकाचे हिंदुत्ववादी' , 'मध्यम हिंदुत्ववादी' , 'हिंदुत्ववादाची किनार असलेले उजव्या विचारसरणीचे' असे उपभेद देखील आहेत.
वाचने
4738
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
मी पयला!!
In reply to मी पयला!! by राजेंद्र मेहेंदळे
हायला
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन.कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.In reply to हायला by अभ्या..
अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द
In reply to अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द by अमरेंद्र बाहुबली
भारत छोडो २.०!
In reply to भारत छोडो २.०! by नावातकायआहे
अडाणचोट नेत्याला अशिक्षित
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले.नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!In reply to अडाणचोट नेत्याला अशिक्षित by अमरेंद्र बाहुबली
तेच की
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले.ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)In reply to तेच की by अभ्या..
: )
In reply to अडाणचोट नेत्याला अशिक्षित by अमरेंद्र बाहुबली
अरे बाप रे! मोदीळ!!
In reply to अरे बाप रे! मोदीळ!! by नावातकायआहे
जितेंद्र आव्हाडांच्या मतदार
In reply to जितेंद्र आव्हाडांच्या मतदार by अमरेंद्र बाहुबली
पुण्यातल्या सदाशिव पेठेत बुथ
In reply to भारत छोडो २.०! by नावातकायआहे
शिक्षित नेत्याला अडाणी
In reply to हायला by अभ्या..
खेचली कीनै
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ
In reply to तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ by स्वधर्म
स्वधर्म
In reply to स्वधर्म by उपयोजक
जय श्रीराम
In reply to जय श्रीराम by स्वधर्म
अरेच्चा इथेच पुरावा सापडला - लालबागच्या राजावरील चर्चा
In reply to तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ by स्वधर्म
उजवे समजाच्या खालच्या
In reply to उजवे समजाच्या खालच्या by विवेकपटाईत
ह्या.... काहिही. :-) २४..
In reply to ह्या.... काहिही. :-) २४.. by नावातकायआहे
काहीही नाही
शेतकर्यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा.लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त.ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त.50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळालेह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने.जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झालीगोल्ड लोन घेणार्या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?स्वधर्म
काही वर्षांपुर्वी
In reply to काही वर्षांपुर्वी by शेखर काळे
शेखर काळे
कम्युनिस्टांचे
In reply to कम्युनिस्टांचे by उपयोजक
नेपाळ
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र