कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात.
नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी
गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली. ना जीया ना लगे, आपकी नझरो ने समझा जा रे उड जारे पन्ची, जाये तो जाये कहान, घडी घडी मोरा दील धडके, अय दिले नादान, आयेगा आनेवाला ई. रफि, किशोर, हेमनदा, शैलेनदर, मन्ना डे यान्ची पन गानी भर्पुर म्हनली गेली.
काय काय गानी तर आमी लोकानी कदीपन एैकलीच नवती. जाम मजा आली. आनी कोनी कोनी तर रस्त्यावर मिलतात ती लता-आशाची गान्याची पुस्तक आनली होती. काय काय लोकानी मराठी, बंगाली, पंजाबी गुजराती आनि सिंदी गानी बी गायली. मग ज्यान्चाकड लग्न होत त्यानी सर्वान्ला चाहा, सरबत, समोसे, वेफर्स आस काय काय दिल. आनी मंग सकाली सर्वी लोक आपल्या आपल्या घराला गेली. कोनाच कोनाशी भान्डन नाय, इगो नाय. कायच नाय.
ओन्ली प्रेम.
वाचने
2372
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
आपलं
In reply to +१ by अवलिया
सोसायटीचे अभिनंदन!!
हायफाय हौसिंग सोसायटी
मुबै त
चुचुताय
तुहि
In reply to चुचुताय by यन्ना _रास्कला
हम्म्म..