✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दारू आणि गरीबी

य
युयुत्सु यांनी
Wed, 07/30/2025 - 08:56  ·  लेख
लेख
दारू आणि गरीबी ========= आत्ता सकाळी माझ्या प्रात:कालीन बाजाराच्या अभ्यासात एका समभागाने माझे लक्ष वेधले. तो समभाग म्ह० युनायटेड स्पिरीट. जूनपासून हा समभाग बराच गडगडला आहे आणि सध्या त्याची घसरगुंडी थांबली आहे, असे वाटत आहे. मग ग्रोकच्या मदतीने घसरगुंडीची कारणे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा महा० सरकारने मद्यावरील कर वाढविल्याचे कळले. मग मनात पुढचा प्रश्न चमकला - समजा एक दारूची बाटली १००० रु० ला आहे. तेव्हा यातील एकूण किती भाग सरकारला कर म्हणून जातो? हा पण प्रश्न मी ग्रोकलाच विचारला, तेव्हा आश्चर्यकारक आकडेवारी मिळाली. १०००रु किमतीचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य असेल तर ~७६५ रु सरकारला कर म्हणून जातात. थोडक्यात निष्ठेने दारू पिणारे स्वत:च्या स्वास्थ्याची आहूती देऊन देशाची किती महान सेवा करतात हे आता लक्षात येईल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3413 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

दारू पिणाऱ्यांचे

विवेकपटाईत
Wed, 07/30/2025 - 09:25 नवीन
दारू पिणाऱ्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान ओळखून ईमानदार मुख्यमंत्रीने ६०० रु पेक्षा कमी दारूवर कर राज्यसरकारचा कर २ रु पेक्षा कमी केला. दुकानदारांनी एकावर एक फ्री बाटली दारू पिणाऱ्यांना देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड केली. पण चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळत नाही. Ga इतिहास आहे.
  • Log in or register to post comments

दारू पिणाऱ्यांचे

विवेकपटाईत
Wed, 07/30/2025 - 09:26 नवीन
दारू पिणाऱ्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान ओळखून ईमानदार मुख्यमंत्रीने ६०० रु पेक्षा कमी दारूवर कर राज्यसरकारचा कर २ रु पेक्षा कमी केला. दुकानदारांनी एकावर एक फ्री बाटली दारू पिणाऱ्यांना देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड केली. पण चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळत नाही. हा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments

उगाच बेवड्यांचा उदो उदो

सुबोध खरे
Wed, 07/30/2025 - 10:09 नवीन
उगाच बेवड्यांचा उदो उदो करण्याची गरज नाही. पेट्रोलची मूळ किंमत ३४ रुपये आहे त्यावर ५८ रुपये केंद्र आणि राज्य सरकारचे कर आहेत आणि डिलरचे कमिशन मिळून तुम्हाला पेट्रोल १०० रुपया च्या आसपास आहे. तेंव्हा उगाच मी दारू पिऊन करतो तशी पेट्रोल जाळून राष्ट्र सेवा करतो म्हणण्याची गरज नाही
  • Log in or register to post comments

म्हणूनच

प्रसाद गोडबोले
Wed, 07/30/2025 - 15:16 नवीन
म्हणूनच दारू पिऊन विनाकारण गाडी पळवणे ही सर्वात मोठ्ठी देशसेवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ROFL

युयुत्सु
Wed, 07/30/2025 - 15:30 नवीन
ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आजचा सुविचार

युयुत्सु
गुरुवार, 07/31/2025 - 08:59 नवीन
प्रामाणिकपणे कर भरणे ही देशसेवाच आहे - तो कर मग उत्पन्नावरचा असो, पेट्रोलवरील असो किंवा दारू वरील असो...
  • Log in or register to post comments

पेट्रोलवरील असो किंवा दारू

सुबोध खरे
गुरुवार, 07/31/2025 - 11:59 नवीन
पेट्रोलवरील असो किंवा दारू वरील कर हा कर आपल्याला टाळता येतो का? त्यामुळे प्रामाणिकपणे हा कर भरणे यात देशसेवा आहे हे म्हणणे हा भंपकपणा आहे.
  • Log in or register to post comments

कर बुडवणे हा गुन्हा असेल ,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 12:03 नवीन
कर बुडवणे हा गुन्हा असेल , देशद्रोह असेल तर देशाने ठरवलेला कर भरणे ही देशसेवाच आहे. #पी_तू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वेश्या व्यवसायाबद्दल काय मत आहे?

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 07/31/2025 - 14:11 नवीन
म्हणजे त्यातून सरकारला किती महसूल मिळतो वगैरे विदा असेल तर तीही देशसेवाच म्हणावी काय?
  • Log in or register to post comments

श्री० राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु
गुरुवार, 07/31/2025 - 15:22 नवीन
श्री० राजेंद्र मेहेंदळे इथे काही जणांना "उपहास" कळत नाही असे दिसते (जो माझ्या मूळ पोस्ट्मध्ये आहे). लॉजिक तर त्याहून कळत नाही. पण तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे- प्रामाणिकपणे कर भरणे ही देशसेवा आहे!
  • Log in or register to post comments

ओके!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 07/31/2025 - 19:10 नवीन
मला उपहास आणि लॉजिक कळत नसेलही, पण म्हणण्याचा उद्देश ईतकाच होता की प्रत्येक गोष्ट महसूलाच्या चष्यातून बघुन चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

इथे काही जणांना "उपहास" कळत

सुबोध खरे
Fri, 08/01/2025 - 11:13 नवीन
इथे काही जणांना "उपहास" कळत नाही असे दिसते (जो माझ्या मूळ पोस्ट्मध्ये आहे). लॉजिक तर त्याहून कळत नाही. मिपा वरील लोकांना काहीच कळत नाही कारण ते सर्वज्ञ नाहीत दूधा पर्यंत पोचता येत नसलं कि प्रत्येक मांजर हे संत असतं . तद्वत बहुसंख्य लोक हे कर चुकवता येत नाही म्हणून भरतात. पुण्यात सिग्नल तोडून पुढे जाणारे दुचाकीवर नाक्यावर पोलीस उभा असेल तर सिग्नल सुटेपर्यंत गपचूप का थांबतात हे पाहून घ्या. तेंव्हा उत्पन्नावरील कर आणि पेट्रोल किंवा दारू वरील कर यातील मूलभूत फरक समजून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

पुण्यात पोलीस सिग्नलच्या

विजुभाऊ
Fri, 08/01/2025 - 11:34 नवीन
पुण्यात पोलीस सिग्नलच्या सुरवातीला थाम्बत नाहीत. ते नेहमी अगोदर लोकाना चूक करायची संधी देतात आणि मगच पकडतात
  • Log in or register to post comments

Polymathic Aversion Syndrome

युयुत्सु
Fri, 08/01/2025 - 12:07 नवीन
समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही. या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते. मानसिक विकृती निदानाची सहावी आवृत्ती जेव्हा निघेल तेव्हा माझ्यातर्फे ही भर घातली जाईल, यासाठी मी आता जोरदार प्रयत्न करत आहे. एका नॉन-मेडीको भारतीयाचे तेव्हढेच वैद्यक शास्त्रात योगदान... स्वगत - उपहास न कळणे हे **"Polymathic Aversion Syndrome"** चे महत्वाचे लक्षण आहे
  • Log in or register to post comments

Polymathic Aversion Syndrome

सोत्रि
Fri, 08/01/2025 - 12:13 नवीन
Polymathic Aversion Syndrome
ह्याबद्दल सिंड्रोम च्या माहितीबद्दल धन्यवाद! नोंद घेतली आहे! - (आभारी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

वा वा

सुबोध खरे
Sat, 08/02/2025 - 10:11 नवीन
वा वा सर्वज्ञ आता जनुकशास्त्र सोडून मनोविकार तज्ज्ञ सुद्धा होताहेत. मानसिक विकृती निदानाची सहावी आवृत्ती जेव्हा निघेल तेव्हा माझ्यातर्फे ही भर घातली जाईल, यासाठी मी आता जोरदार प्रयत्न करत आहे. एका नॉन-मेडीको भारतीयाचे तेव्हढेच वैद्यक शास्त्रात योगदान... The DSM-6 (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, 6th edition) The DSM is a comprehensive guide used by mental health professionals to diagnose and classify mental disorders. While the exact release date is not yet known, it is anticipated to be released sometime between 2023 and 2028. स्वलाल आत्ममग्नता. चालू द्या
  • Log in or register to post comments

सर्वज्ञ हे बहुतेक महागुरुंना

विजुभाऊ
Fri, 08/08/2025 - 14:38 नवीन
सर्वज्ञ हे बहुतेक महागुरुंना लहानपणी मार्गदर्शन करत असावेत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा