Skip to main content

करोना : स्वलालधन्य जाहलो मी

लेखक गामा पैलवान यांनी गुरुवार, 05/05/2022 20:22 या दिवशी प्रकाशित केले.

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन

लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-n… सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान

वाचने 79318
प्रतिक्रिया 238

प्रतिक्रिया

In reply to by रामचंद्र

रामचंद्र, नेमकं हेच म्हणायचं होतं मला. लसबळींची संख्या बरीच आहे. ती 'अचानक मृत्यू' वा तत्सम कारणाखाली दडपलेली आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सगळे नशीबच. या अनुभवातून आता आणखी सावधगिरीने वागले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली आहे. आधी पायात रक्त साकळून गुठळी/गुठळ्या झाल्या, मग त्याचे तुकडे होऊन ते फुफ्फुसात पहुचले असे रिपोर्टात लिहीलेले आहे. -- दुसरे म्हणजे अमेरिकेत मुलासोबत असल्याने ताबडतोब इलाज करता आला. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे 'इमर्जन्सी' सदरात गणल्या जाणार्‍या व्याधींसाठी इन्शुरंस नसला, किंवा अजिबात पैसे नसले, तरी ताबडतोब उत्तम इलाज केला जातो. याउलट भारतात आम्ही दोघेच असल्याने मुळात आधी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रिक्षा वगैरे करून जाणे, इस्पितळ, डॉक्टर वगैरेंबद्दल काहीही माहिती नाही (तशी आवश्यकता कधी पडली नव्हती) अशा परिस्थितीत काय झाले असते कुणास ठाऊक. 'काटेरी प्रथिने' याबद्दल खुलासा करावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

मुळात आधी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रिक्षा वगैरे करून जाणे, इस्पितळ, डॉक्टर वगैरेंबद्दल काहीही माहिती नाही (तशी आवश्यकता कधी पडली नव्हती) अशा परिस्थितीत काय झाले असते कुणास ठाऊक.
सर्व ठीक झाले असते. आधी पैसे घेऊन या वगैरे हिंदी सिनेमात असते फक्त. भारतात इतके वाईट नाहीये वैद्यकीय बाबतीत. किमान शहरी भागात.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त, काटेरी प्रथिने म्हणजे Spike Proteins. त्याविषयी इंग्रजीत इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Spike_protein तर अधिकृत मत काय ते सांगतो. तत्ज्ञांच्या मते करोना विषाणूच्या पृष्ठभागावर काटेरी प्रथिने असतात. तर ही प्रथिने ओळखण्याचे प्रशिक्षण आपल्या रक्षाप्रणालीस ( इम्यून सिस्टीम ) नसते. म्हणून लशीद्वारे काटेरी प्रथिने मुद्दाम टोचण्यात येतात, जेणेकरून रक्षाप्रणालीस त्यांची 'ओळख' व्हावी. मग जेव्हा करोना शरीरात घुसतो तेव्हा त्यास 'ओळखायचं' प्रशिक्षण आधीच पार पडलेलं असतं. मग रक्षाप्रणाली करोनास चटकन हुडकून काढते व त्याचा नाश करते. आता या कथनीत अनेक कच्चे दुवे आहेत. लशीतून किती प्रमाणावर काटेरी प्रथिने सोडवीत, यावर काहीच मार्गदर्शन उपलब्ध नाही. प्रत्येकाचं शरीर निरनिराळं असतं, तदनुसार रक्षाप्रणाली वेगवेगळी असते. सगळ्यांना एकंच लस कितपत प्रभावी ठरेल हे कोणाशी माहीत नाही. शिवाय करोना हा काही गंभीर आजार नाही की ज्यामुळे माणसं मरावीत. सहव्याधी असल्या तरंच करोना घातक आहे. अन्यथा नाही. मग धडधाकट माणसास लस टोचून काय फायदा? शिवाय व्हायरस म्हणजे नेमकं काय हे ही गुलदस्त्यातच आहे. हा विषाणू आजवर विलग केला गेलेला नाहीये. मग अस्तित्वात नसलेल्या विषाणूसाठी लस कशाला हवीये? तसेच लशीतून इतर अनर्थकारी पदार्थ घुसवले जात नाहीय, याचा काय भरवसा? आपला नम्र, -नाठाळ नठ्या

शेवटी ? लशीचे धोके संपलेत का ? हायेत अजून ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, हा घ्या आजूनेक लसबळी ! माजी क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प परलोकवासी. बातमी : https://www.bbc.co.uk/sport/cricket/articles/c06kkkkjmz6o पंचावन्नाव्या वर्षी वारण्यासारखी याची प्रकृती का बिघडली? त्रेपान्नाव्या वर्षी त्रास सुरू होऊन दोनेक वर्षांत चक्क मृत्यू? आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

हा लसबळीच आहे हे कशावरुन ? -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

मी करोनाची लस अनन्यस्थ ( by default ) दोषी धरणार आहे. कारण की मला जिवंत राहायचं आहे. The corona vaccine is poisonous until proven otherwise. स्वत:स जिवंत ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा व सुटसुटीत पर्याय आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, पंचावन्नाव्या वर्षी वारण्यासारखी याची प्रकृती का बिघडली? त्रेपन्नाव्या वर्षी त्रास सुरू होऊन दोनेक वर्षांत चक्क मृत्यू? या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? अस्तित्वात नसलेल्या विषाणूवर लस टोचून घ्यायचीच कशाला? एक संभाषण आठवलं. पावणं : काय हो गाववाले हे लई ड्येंजार वळण हाये. हितं रस्त्याला कसलीशी चिठ्ठीचपाटी लावाया नगं? गाववाले : आवो लावली व्हती की. पन सा म्हैनं आक्षीडंट झालाच नाय. म्हून काढून टाकली. करोना खरंच अस्तित्वात आहे का? म्हणून लशीला चिठ्ठी लावावी म्हणतो. शिर सलामत तो लशी पचास. आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

ऐन करोनाकाळात कितीतरी कुठल्याही सहव्याधी नसलेल्या तरुण व्यक्ती, बहुतांश लस घेतलेल्या पण काही न घेतलेल्याही अगदी तडकाफडकी गेल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकी कित्येकांना खूप प्रयत्न करूनही ऑक्सिजन/व्हेंटिलेटर मिळू शकला नव्हता. तरुण वय आणि बऱ्यापैकी निरोगी असे हे रुग्ण त्या वेळी अगदी तीनचार दिवसांत मृत्युमुखी पडले. यापैकी गा. पैं. च्या म्हणण्यानुसार बहुतांश जर लस घेतल्यामुळे गेले, तर मग न घेतलेले कशामुळे गेले असावेत?

In reply to by रामचंद्र

रामचंद्र, गरज नसतांना उपचार केले तर ते विषासमान असू शकतात. माझ्या माहितीत धडधाकट मृत्यूची एकही घटना नसल्यामुळे अशांच्या मृत्यूचं कारण मी ठामपणे सांगू शकंत नाही. खरंतर ते डॉक्टरांचं काम आहे. पण इथे तर असंख्य डॉक्टरंच डोळे मिटून प्रचारावर विश्वास ठेवताहेत. त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे. आता डॉक्टरांकडे बोटं दाखवून झाल्यावर मी माझा स्वत:चा अनुभव मांडतो. ऑगस्ट २०१९ ची गोष्ट आहे. हृद्रोहिणीत अडथळा आल्याने चिकित्सा ( angiogram ) व संभाव्य विस्फारजाळी बसवण्यासाठी ( possibly angioplasty ) रुग्णालयात हृदयविकार विभागात दाखल होतो. हा विभाग अतिदक्षता ( ICCU ) पातळीच्या एक पायरी खालचा आहे. तेव्हा नेमका मला फ्ल्यूचा ताप आला. तापात छातीत वेदना होऊ लागल्या. बहुतेक हृत्कोषास ( pericardium ) सूज आलेली असावी. पण मला माहीत नव्हतं व विचार करायची शक्तीही अंगी नव्हती. रात्री ०१०० च्या सुमारास परिचारिकेस बोलावून काय होतंय ते सांगितलं. तिने फक्त पराशीतमाल ( paracitamol ) दिली. पण वेदनांना आराम पडला नाही. मी ०१३० च्या सुमारास परत विनंती केली. तरीही तिने ती मानली नाही. कारण बहुधा माझी आरोग्यमापे ( health parameters ) व्यवस्थित होती. ती २४ तास निगराणीखाली होती. त्यांच्यात काही घसरण दिसंत नसल्याने परिचारिकेने फक्त एक जास्तीची पराशीतमाल दिली. इतर काही कार्यवाही केली नाही. पण माझ्या वेदनांना उतार पडंत नव्हता. शेवटी ०२०० च्या आसपास किंचित घाम आला व ताप उतरल्यासारखा वाटला. केव्हातरी वेदना कमी झाल्या. मग झोप आल्याने मी तसाच झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रक्त गोळा करून पृथक्करण केलं गेलं. त्यात बहुधा ट्रोपोनिन सापडलं. रात्रीच्या घटनांची नोंद होतीच. त्यावरून मला खरोखरंच अंजायनाचा झटका आला असावा असं निदान केलं गेलं. मात्र मला याची काहीच कल्पना दिली नव्हती. त्या दिवसापासून रक्तपातळकीचं अतिरिक्त इंजेक्शन पोटावरील चरबीत द्यायला सुरुवात झाली. यथावकाश दोनेक दिवसांनी हृच्चिकित्सा व विस्फारजाळीरोपण यशस्वीपणे पार पडलं. आता हाच प्रसंग जर एक वर्षाने म्हणजे ऑगस्ट २०२० साली घडला असता तर काय झालं असतं माझं, या विचाराने जिवाचा थरकांप उडतो. फ्ल्यूचा ताप असला तरीही त्यावर उपचार करीत बसायचे नसतात. आजार हृदयाचा आहे. हृदयावर आणि हृदयावरंच उपचार झाले पाहिजेत. फ्ल्यूवर कोणी उपचार करीत नसतं. करोना फ्ल्यूसारखा विकार आहे. करोनावर उपचार करायचा नसतो. जर हाच प्रकार २०२० च्या ऑगस्टांत घडता तर डॉक्टर लोकं करोनावर उपचार करीत बसले असते. आणि मी गचकलो असतो. सर्व आरोग्यमापे बेतात असतांनाही मी का बरं गचकलो? उत्तर करोना आहे. तेच उत्तर माझ्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर आलं असतं. हा माझा अनुभव आहे. इतर धडधाकट लोकांचे अनुभव वेगळे असू शकतात. काय ते समजून घ्या. बाकी, श्वासोत्तेजक ( ventilator ) हा उपचार नाही. ही अतिरिक्त मदत आहे. आसन्नमरण मनुष्यास तगावण्याची धडपड आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

आपलं उत्तर वैद्यकीय तज्ज्ञांना बहुतेक पटणार नाहीच. पण अन्य काही विकाराने आजारी रुग्णाला त्यातच करोना झाल्यास फक्त करोनावरच उपचार केंद्रित केल्यामुळे त्या अन्य व्याधी बळावून रुग्ण दगावू शकतो, ही शक्यता आपण चांगली स्पष्ट केली आहे.

In reply to by रामचंद्र

रामचंद्र,
आपलं उत्तर वैद्यकीय तज्ज्ञांना बहुतेक पटणार नाहीच.
नेमका हाच तर मुद्दा आहे. माझं उत्तर डॉक्टरांना न पटणारं असलं तरी चालेल. फक्त मला पटायला हवं जेणेकरून माझा जीव वाचेल. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

घ्या, आजची ताजी खबर : एमारेने लशीपायी बालक व तरुणाचे ( वय वर्षे ५ ते १५ ) हृदय व्रणग्रस्त होते. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.msn.com/en-gb/health/other/covid-19-mrna-vaccine-linked-to-… घ्या, डोंबलं आपटून. -नाठाळ नठ्या

गा.पै. काही नवीन विदा हाती आला आहे काय ? अधुन-मधून लस सुरक्षीत आहे अशा बातम्या येत असतात. तर, अधुन-मधून लशीमुळे असे असे घडले तस तसे घडले अशा बातम्याही दिसून येत असतात. आपण ऐन करोना काळात ह्या विषयाला हात घातला होता म्हणून उत्सूकता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, अहो विदा कसला मागताय ! मी कुठलाही दावा करीत नाहीये. तेव्हाही केला नव्हता. त्यामुळे मी कुठलाही विदा प्रस्तुत केला नाही. ज्यांनी दावे केले त्यांनी विदे द्यावेत. तुम्हाला बहुतेक अद्यतन ( = अपडेट्स ) अपेक्षित असावं. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या ढवळ्याघरातनं वदंता आलीये की एमारेने ( mRNA ) लशी अमेरिकेतनं तडीपार करणारेत म्हणून ( इंग्रजी लेख ) : https://slaynews.com/news/mrna-vaccines-banned-america-white-house-insi… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

>>> तुम्हाला बहुतेक अद्यतन ( = अपडेट्स ) अपेक्षित असावं. होय. वरच्या वर अद्यतन, माहिती देत राहावी. -दिलीप बिरुटे

बरोबर एक वर्षापूर्वी, ८ जुलाई २४ रोजी मला अचानक (अमेरिकेतील) इस्पितळात दाखल व्हावे लागले होते, कारण रक्तात गुठळ्या होऊन त्या फुफ्फुसात पहुचल्या होत्या. त्यावेळी तिथली नर्स म्हणाली होती की कोरोनानंतर या व्याधीचे प्रमाण वाढलेले असून कोरोना आणि त्याची लस घेणे, के दोन्हीही त्याला कारणीभूत (असावे).. गेले वर्षभर औषध घेत असूनही मला अजून अशक्तपणा जाणवतो आहे. चालणे - फिरणे आणि एकंदरित ऊर्जा- उत्साह कमी झाले आहे. ७३ वर्षांचा होईपर्यंत कधी औषध घेतले नव्हते, ते आता घ्यावे लागणे ही पण एक खंत आहे. -- 'रक्त पातळ करण्याचे' औषध (ECOSPRIN AV 75) घेतो, त्याचाही हा परिणाम असावा का ? तसा कुणाला अनुभव आहे का ?

In reply to by चित्रगुप्त

ऐकोणीसशे शहाण्णवला न्युरोजनिक शाॅकमुळे हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून घेत आहे. आता पंचवीस मधे प्लास्टी झाल्यावर डोज एकशे पन्नास केला आहे. तरीपण अशक्तपणा नाही. काही वेगळे कारण असू शकते. ऐकोणतीस वर्ष निरोगी रहाण्याचे श्रेय ' शिस्तबद्ध', जीवनाला जाते. आताही त्याप्रमाणेच शिस्तबद्ध जिवन जगत आहे. एक्काहत्तर चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

अमूक एक चाचणी करवून घेऊन ती ठीक आली, तर औषध बंद करता येण्याची शक्यता आहे का ?

In reply to by चित्रगुप्त

अमूक एक चाचणी करवून घेऊन ती ठीक आली, तर औषध बंद करता येण्याची शक्यता आहे का ?> आपल्याकडे कोणती औषधे कशी काम करतात याबद्दल रुग्णाचे प्रबोधन केलं जात नाही. तसंच दोन औषधांचा तिसराच काहीतरी परिणाम होतो, हे देखील बेदखल केले जाते. चाचणी ठिक आली म्हणजे सगळं ठीक झालं असं म्हणता येत नाही. तो परिणाम तात्पुरता राहतो. अ‍ॅस्पिरीनचे महत्त्वाचा फाय्दा म्हणजे ते काही कॅन्सरपासून उ तार वयात रक्षण करते. प्राणायामातील कुंभकाने - फुप्फुसातील डेड स्पेस कमी होते आणि श्वसन क्षमता सुधारू शकते. आमच्या पुस्तकात याची चर्चा आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त, माझ्या मते फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्याने थकवा येतोय. आयव्हरमेक्टिन ( ivermectin ) ने बघा काही फरक पडतो का ते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. तसा डॉक्टर शोधावा लागू शकतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फुफ्फुसांची क्षमता प्राणायामाने वाढू शकेल असे वाटते. काही वर्षांआधी मी करतही होतो, पण नंतर सवय तुटली. परत सुरु करायला हवा हे रोज जाणवते पण प्रत्यक्षात झाले नाही अजून.

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली नीट चाचणी करून घ्या मिसळपाव हि वैद्यकीय सल्ला देण्याघेण्याची जागा नव्हे. इथे आपल्याला मराठी भाषातज्ज्ञ कडुन "विमान कसे चालवावे" पासून "प्रदूषणामुळे आपल्या नातवाला कर्करोग कसा होणार" आहे पर्यंत सर्व तर्हेचे सल्ले मिळतील. आपल्याला थकवा जाणवतो त्याचे कारण फुफुसाची क्षमता कमी झाली आहे कि स्नायूंची कि हृदयाची हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्राणायाम करण्याबद्दल कोणताही अपवाद असण्याचे कारण नाही. परंतु फुफुसाची क्षमता कमीच झाली आहे असेच मानून चालणे तितके बरोबर नाही आपण घेत असलेले औषध (ECOSPRIN AV 75) यात दोन घटक आहेत (केवळ ऍस्पिरिन नव्हे) ऍस्पिरिन हे रक्त पातळ करते आणि atorvastatin हे आपल्या रक्तातील कोलेस्टिरॉल कमी करते पण atorvastatinयाचा एक दुसरा परिणाम म्हणजे आपले स्नायू दुखतात किंवा लवकर थकतात स्नायूंमध्ये cramp येतात. Atorvastatin, a statin medication used to lower cholesterol, can cause muscle pain or myalgia as a side effect in some individuals. This muscle pain can range from mild aches and soreness to more severe pain, weakness, or cramping. In rare cases, atorvastatin can cause muscle damage (rhabdomyolysis) or liver damage. If you experience muscle pain while taking atorvastatin, it's essential to consult with your doctor to determine the cause and discuss potential adjustments to your treatment plan. यापेक्षा अधिक सल्ला देण्यास मी "असमर्थ" आहे

In reply to by सुबोध खरे

मी सुमारे दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत येण्यापूर्वी परिचयातील डॉ. ने सांगितलेल्या चाचण्या करवून घेऊन (मुख्यतः Homocysteine test) करवून घेऊन त्यांनी सांगितलेली औषधे घेतो आहे. स्नायुंची शक्ती कमी झालेली जाणवते आहे बाकी काही त्रास नाही. आता भारतात परतल्यावर लगेच पुन्हा डॉ. कडे जाईन. त्या दरम्यान त्यांना फोन करून विचारतो. अनेक आभार.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त, अनेक दिवसांनी खरे डॉक्टरांशी सहमत व्हायचा योग आला. माझा मुद्दा जरा व्यवस्थित रीत्या सांगायला हवा होता. त्याचं असं झालं की मला हृत्शूल झटका आल्यानंतर जी औषधं चालू केली होती त्यातली काही कालांतराने बंद करण्यांत आली. परंतु त्यामुळे त्रास वाढू लागला असं माझ्या निदर्शनास आलं. म्हणून डॉक्टरांशी बोलून माझ्त्र परत वाढवली. हे सुमारे तीनेक वर्षांनी झालं. हा दीर्घकालीन परिणाम होता व तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काबूत आणला गेलेला आहे. प्रत्येकाचं प्रकरण वेगळं असतं. त्यानुसार डॉक्टरांशी बोलूनंच पुढील कार्यवाही करावी. आ.न., -गा.पै.