✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

किडकी प्रजा!

य
युयुत्सु यांनी
Sat, 06/21/2025 - 07:34  ·  लेख
लेख
मंडळी, साधारण ७ वर्षांपूर्वी माझा अधिजनुक शास्त्राशी परिचय झाला. अधिजनुकशास्त्राचे मला जे आकलन झाले त्यावर आधारित एक लेख समाजमाध्यमावर लिहीला होता (https://www.misalpav.com/node/42260) या लेखात मी माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त मांडला होता. ज्यांना अधिजनुकशास्त्राचे महत्त्व कळते त्या सर्वाना "किडकी प्रजा" ही संकल्पना पटली आणि तसे कबूल ही अनेक जण करतात. त्यानंतर संकल्पनेला पुष्टी देणारे संशोधन वाढतच गेले. अलिकडेच मी "मेंदूचे आरोग्य आणि विवेक" या विषयावर एक लेख इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता (https://www.misalpav.com/node/52557). अलिकडेच काही दिवसापूर्वी लॅन्सेट या अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रदूषणाने मेंदूच्या जडणघडणीवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध असल्याचे सदर स्पष्ट लिहीले आहे. https://www.thelancet.com/journals/lanplh/article/PIIS2542-5196(25)00093-2/fulltext या अभ्यासातील पुढील मजकूर फार महत्त्वाचा आहे - "Air pollution has various adverse effects on human health, including impairing fetal growth and development. The placenta, serving as the interface between maternal and fetal circulation, plays a vital role in supporting and regulating fetal development. Air pollutants might either directly penetrate the placenta into fetal circulation and the brain,4 or indirectly disrupt the placental function and overactivate the maternal immune system.5,6 " प्रदूषण हे मस्तिष्कदाहाचे मुख्य कारण आहे, आणि या दाहामुळे मेंदूच्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो, हा त्याचा मथितार्थ आहे. सदर अभ्यासाठी वापरलेले संदर्भ या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत. सध्याच्या परिस्थितीत याचा रेलेव्हन्स काय? असा प्रश्न बर्‍याच जणाना पडेल. माझे उत्तर अनेकांना आवडणार नाही, पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात. टीप - कर्नल तपस्वी, सुबोध खरे आणि तत्सम लोकांच्या प्रतिसादांना अजिबात उत्तरे दिली जाणार नाहीत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13039 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

तुमच्या वरील दोन लेखांचा

विवेकपटाईत
Sat, 06/21/2025 - 12:28 नवीन
तुमच्या वरील दोन लेखांचा हिन्दी भाषेच्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही. तिसरा धागा उघडला नाही. स्वत: आजु बाजूच्या मुलांचे अध्ययन करून किंवा त्यांना प्रश्न विचारून तिसरी भाषा विशेषकरून हिन्दी शिकण्याणे किडकी प्रजा कशी तैयार होते याचे विस्तृत वर्णन करायला हवे होते. बाकी तुम्ही प्रतिसाद देऊ नका. मानसिक त्रास घेऊन नका.
  • Log in or register to post comments

मूळ लेखात काही गोष्टी स्पष्ट

युयुत्सु
Sat, 06/21/2025 - 13:35 नवीन
मूळ लेखात काही गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत हे मान्य आहे, पण ज्यांना मूळ विषय समजतो त्यांना हे सर्व एकमेकांवर कसे प्रभाव टाकतात हे व्यवस्थित समजते. हटवादी राजकारण्यांना मात्र हे विज्ञान समजाऊन घ्यायची क्षमता नसते. ज्यांना समजाऊन घ्यायचे असते ते नम्रतेने शंका विचारतात. बाल्यावस्थेतच कमकुवत बनलेला मेंदू शिक्षणाचा भार किती पेलणार हा मुद्दा आहे. प्रदूषणाने मानवी मेंदूचे (आणि इतर शरीराचे) नुकसान गर्भावस्थेपासूनच चालू होते. त्याचा ग्रहणक्षमतेवर मोठा परिणाम होतो. याचा पुरावा म्ह० समाजातल्या मोठ्या वर्गाची ग्रहणक्षमता आज सुमार आहे. शाळांच्या आचरट वेळा आणि त्यामुळे न मिळणारी पुरेशी झोप पण ग्रहणक्षमतेवर परिणाम करते. त्यात शैक्षणिक भार वाढल्याने मानसिक गोंधळ वाढून तणाव वाढतो आणि परत त्याचे ग्रहणक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतात- त्यात भरमसाठ अभ्यास (दप्तराचे ओझे हा खूप जुना विषय आहे) ताण निर्माण करतो. ताणाने शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. भाषांची सरमिसळ झाल्याने आज मराठीची इंग्रजी आणि हिंदी मुळे जी दयनीय अवस्था झाली आहे, ती आणखी भयानक होईल. कदाचित कोणतीच भाषा व्यवस्थित शिकली जाणार नाही.
  • Log in or register to post comments

कदाचित कोणतीच भाषा व्यवस्थित

आग्या१९९०
Sat, 06/21/2025 - 15:00 नवीन
कदाचित कोणतीच भाषा व्यवस्थित शिकली जाणार नाही. दूरदृष्टी नसल्याने हेच होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मूळ समस्या

मूकवाचक
Sat, 06/21/2025 - 14:39 नवीन
एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता, कुवत न पाहता सगळ्या विद्यार्थ्यांवर तो लादणे ही खरी मूळ समस्या आहे. या विषयी चर्चा होत नाही. तुलनेने तिसरी भारतीय भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हा विषय नगण्य आहे. तदनुषंगिक चर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याने मोठ्या प्रमाणावर होत राहील. असो.
  • Log in or register to post comments

एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता,

युयुत्सु
Sat, 06/21/2025 - 18:15 नवीन
एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता, कुवत न पाहता सगळ्या विद्यार्थ्यांवर तो लादणे ही खरी मूळ समस्या आहे. या विषयी चर्चा होत नाही. अगदी बरोबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता,

युयुत्सु
Sat, 06/21/2025 - 18:42 नवीन
एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता, कुवत न पाहता सगळ्या विद्यार्थ्यांवर तो लादणे ही खरी मूळ समस्या आहे. या विषयी चर्चा होत नाही. अगदी बरोबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

नागपूर, वर्धा इकडचे लोक सहजच

कंजूस
Sat, 06/21/2025 - 16:53 नवीन
नागपूर, वर्धा इकडचे लोक सहजच हिंदी बोलतात. त्यात आपले मामुही येतात.
  • Log in or register to post comments

अनुषंगिक प्रश्न

माहितगार
Sat, 06/21/2025 - 18:29 नवीन
.... मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात. ...
--- तुमच्या मजकुरातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून, तो अधिक स्पष्ट आणि व्याकरणदृष्ट्या योग्य असा खालीलप्रमाणे दिला आहे: --- **दुरुस्त केलेला मजकूर:** १) माझ्या **अज्ञानमूलकतेबद्दल** पुन्हा एकदा **माफ करा**. २) माझा प्रश्न **अनुवंशशास्त्राशी** संबंधित भाग सोडला तर, राजकीय नाही. ३) मला माझ्या प्रश्नातून कोणत्याही **मा. मु.** (माननीय मुख्यमंत्री) किंवा जगातील कोणत्याही राजकारण्याची बाजू घ्यायची नाही आहे. ४) माझा प्रश्न केवळ **अनुषंगिक** आहे. ५) प्रश्न अंशतः व्यक्तिगत वाटू शकला तरी, प्रश्न विचारण्याचा **उद्देश** व्यक्तिगत लक्ष्य करणे नाही, तर लेख विषयाचे अधिक **व्यवस्थित आकलन करून घेण्याचा** प्रयत्न आहे. अ) ज्यांना विज्ञान कळते, ते (उर्वरीत किडक्या?) प्रजेत जनुकीय आणि **अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या** श्रेष्ठ म्हणावेत आणि ज्यांचा **प्रतिवाद** करता येत नाही, ते अधिक श्रेष्ठ म्हणावेत का? आ) जर ते जनुकीय आणि **अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या** अधिक श्रेष्ठ म्हणावेत, तर तेच अखिल विश्वातील मानवजातीचे अध्यक्ष/राजे म्हणून का यशस्वी होत नाहीत? इ) असे समजून चालू की, सध्याच्या जागतिक सत्ताधीशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यातल्या त्यात अधिक शक्तिशाली दिसतात. जो **सर्वशक्तिमान** आहे, तो जनुकीयदृष्ट्या **किडका** आणि विज्ञान न समजणारा असू शकणार नाही. त्या अर्थाने डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वाधिक चांगले विज्ञान समजणारे म्हणावेत का? की विज्ञान न समजणारे म्हणून **किडके** म्हणावे? विरुद्ध बाजूच्या तर्काने ट्रम्प जर जनुकीय आणि **अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या किडके** असतील, तर त्यांच्याऐवजी तुमच्यासारखा एखादा प्रतिभावंत प्रगल्भ वैज्ञानिक जनुकीय आणि **अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या** अधिक शक्तिशाली ठरून जगाचे राज्य का करत नाही आहे? ---
  • Log in or register to post comments

अनुषंगिक प्रश्न

माहितगार
Sat, 06/21/2025 - 18:33 नवीन
१) माझ्या अज्ञानमूलकतेबद्दल पुन्हा एकदा माफ करा. २) माझा प्रश्न अनुवंशशास्त्राशी संबंधित भाग सोडला तर, राजकीय नाही. ३) मला माझ्या प्रश्नातून कोणत्याही मा. मु. (माननीय मुख्यमंत्री) किंवा जगातील कोणत्याही राजकारण्याची बाजू घ्यायची नाही आहे. ४) माझा प्रश्न केवळ अनुषंगिक आहे. ५) प्रश्न अंशतः व्यक्तिगत वाटू शकला तरी, प्रश्न विचारण्याचा उद्देश व्यक्तिगत लक्ष्य करणे नाही, तर लेख विषयाचे अधिक व्यवस्थित आकलन करून घेण्याचा प्रयत्न आहे. अ) ज्यांना विज्ञान कळते, ते प्रजेत जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या श्रेष्ठ म्हणावेत आणि ज्यांचा प्रतिवाद करता येत नाही, ते अधिक श्रेष्ठ म्हणावेत का? आ) जर ते जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या अधिक श्रेष्ठ म्हणावेत, तर तेच अखिल विश्वातील मानवजातीचे अध्यक्ष/राजे म्हणून का यशस्वी होत नाहीत? इ) असे समजून चालू की, सध्याच्या जागतिक सत्ताधीशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यातल्या त्यात अधिक शक्तिशाली दिसतात. जो सर्वशक्तिमान आहे, तो जनुकीयदृष्ट्या किडका आणि विज्ञान न समजणारा असू शकणार नाही. त्या अर्थाने डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वाधिक चांगले विज्ञान समजणारे म्हणावेत का? की विज्ञान न समजणारे म्हणून किडके म्हणावे? विरुद्ध बाजूच्या तर्काने ट्रम्प जर जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या किडके असतील, तर त्यांच्याऐवजी तुमच्यासारखा एखादा प्रतिभावंत प्रगल्भ वैज्ञानिक जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या अधिक शक्तिशाली ठरून जगाचे राज्य का करत नाही आहे? ---
  • Log in or register to post comments

या खेपेस तुमच्या प्रश्नांनी

युयुत्सु
Sat, 06/21/2025 - 19:27 नवीन
या खेपेस तुमच्या प्रश्नांनी पुरता गोंधळून गेलो आहे, आणि त्यामुळे माझ्याकडून समाधानकारक उत्तरे मिळतीलच असे नाही प्र० अ - ज्याना विज्ञान कळते ,यापेक्षा जे विज्ञानात भर टाकत आहेत ते जनुकीय श्रेष्ठ मानता येतील. पण त्यातही एक उतरंड तयार करता येईल. ज्यांनी विज्ञानात (आणि तंत्रज्ञानात) टाकलेली भर "लोकोत्तर" (फ्रण्ट्लाईन वरील संशोधक) आहे ते नक्कीच जनुकीयदृष्टया श्रेष्ठ मानता येतील. जे नव्याचा कल्पकतेने शोध घेतात, ज्यांची निर्मिती लोकोत्तर आहे (यात कला आलीच), ते पण जनुकीयदृष्टया श्रेष्ठ मानता येतील. < तर तेच अखिल विश्वातील मानवजातीचे अध्यक्ष/राजे म्हणून का यशस्वी होत नाहीत?> हा प्रश्न थोडाफार माझ्या आवाक्यात असल्याने त्याचे उत्तर देऊ शकेन - सिंथेटिक बॉयॉलॉजी या विषयात चीनने ए० आय० इतकीच प्रचंड ताकदीने मुसंडी मारली असल्याने अखिल विश्वातील मानवजातीचे अध्यक्ष/राजे पदाची माळ चीनच्या गळ्यात येत्या ५-१० नक्कीच पडेल. आपल्याकडे सिंथेटिक बॉयॉलॉजी या विषयाबद्दल कुणी बोलणे सोडा, डिक्शनरी उघडी ठेऊन स्पेलींग सांगता आले तरी पुष्कळ आहे असे म्हणता येईल. मी वापरलेला "किडका" हा शब्द डिफेक्टीव्ह/माल फंक्शनिंग अशा अर्थाने वापरला आहे. धान्य जसे किडके असते तसे जीव पण किडके असतात. <तर त्यांच्याऐवजी तुमच्यासारखा एखादा प्रतिभावंत प्रगल्भ वैज्ञानिक जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या अधिक शक्तिशाली ठरून जगाचे राज्य का करत नाही आहे?> मला जवळून ओळखणारे मी चुकीच्या देशात आणि चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो असे अनेकवेळा म्हणतात. जास्त लिहीत नाही. इथे मूर्खासारखी विडंबने करणारे आणखी चेकाळतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ट्रंप बद्दलच्या प्रश्नाला

माहितगार
Sun, 06/22/2025 - 18:06 नवीन
ट्रंप बद्दलच्या प्रश्नाला उत्तर राहीलय द्यायच अजून, तुमच्यासारख्या विद्वदजनांना गोंधळण्यासारखे खूप काही माझ्या प्रश्नांमध्ये गहन असावे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ट्रंपची महानता आणि मला उपलब्ध

युयुत्सु
Sun, 06/22/2025 - 20:11 नवीन
ट्रंपची महानता आणि मला उपलब्ध असलेला वेळ व्यस्त प्रमाणात असल्याने सदर प्रश्न सोडवला नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

<तर त्यांच्याऐवजी

माहितगार
Mon, 06/23/2025 - 09:01 नवीन
<तर त्यांच्याऐवजी तुमच्यासारखा एखादा प्रतिभावंत प्रगल्भ वैज्ञानिक जनुकीय आणि अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या अधिक शक्तिशाली ठरून जगाचे राज्य का करत नाही आहे?> मला जवळून ओळखणारे मी चुकीच्या देशात आणि चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो असे अनेकवेळा म्हणतात. जास्त लिहीत नाही. इथे मूर्खासारखी विडंबने करणारे आणखी चेकाळतील... हे बघा तुमच्यासारखे कमळ पुष्प चिखलातच जन्माला येतात. लोक काय तुमच्यासारख्या राजहंसालाही नावे ठेवतात इतर बाबतीत त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचे मन मोकळे करता तसेच याही बाबतीत करून मोकळे व्हा कारण त्या शिवाय तुमच्या जनुकीय मताचे सर्व बाजू लक्षात येणार नाहीत. एक तर ट्रंप वाल्या प्रश्नाचे उत्तर तरी द्यावे किंवा या प्रश्नाचे तरी आणि माझे भाबडे कुतुहल शमवावे अशी भाबडी विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

चुकीच्या देशात, चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये ...

मूकवाचक
Mon, 06/23/2025 - 10:27 नवीन
चुकीच्या देशात आणि चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला अशी भावना कधी ना कधी प्रत्येकाला येत असावी. बुद्ध्यांक (आय क्यु), भावनिक प्रगल्भता (इमोशनल कोशंट - ई क्यु) यांच्या जोडीला परिस्थितीचा स्वीकार आणि तिच्याशी जुळवून घेण्याची क्षमता (Adaptability Quotient ) अंगी बाणवणे अशा बाबतीत महत्वाचे ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुम्ही मला एकदा कमळ म्हणता

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 10:56 नवीन
तुम्ही मला एकदा कमळ म्हणता आणि एकदा पुरोगामी म्हणता. म्हणजे केव्हढा हा वैचारिक गोंधळ? एकदा नक्की काय ते ठरवा. स्वगत - भगवंताकडे सर्व "पुरोगामी कमळांच्यावतीने" गीतेत एका श्लोकाची भर टाकण्याचा ठराव पाठविण्यात येत आहे. वामेष्वस्मि दक्षिणोहं दक्षिणोस्मि वामेषु च| टीप - उरलेला श्लोकार्ध भगवंत रचतील किंवा इतर पुरोगामी कमळे पूर्ण करतीलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

ओजस्वी कमळ

माहितगार
Mon, 06/23/2025 - 11:25 नवीन
युयुत्सु तुमच्या सारख्या महानुभावांचे डावे उजवे पुरोगामी असे वर्गीकरणाचा मनोदय नाही कारण त्या बाबत माहिती नाही. पुरोगामी हे वचन माईसाहेब आणि मिपावरील इतर पुरोगामीत्वाचे अभिमान असलेल्यांसाठी आहे. ते आपले डावे उजवे भेद करून पॉपकॉर्न खाण्यासाठी. बाकी माईसाहेबांनी त्या पुरोगामी गटातील असूनही तुमच्या थेअरीचे समर्थन केले आहे. कमळ हे अभिधान संघ भाजप वाले वगैरे अशा अर्थाने दिलेले नाही. चिखलासारख्या किडक्या प्रजेतील तुम्ही ओजस्वी कमळ आहात या अर्थाने दिलेले आहे. तुम्ही विचारलेल्या शंकांची पुर्तता केलीत तर तुमची मांडणी नेमकी काय या बाबत गैरसमज टळण्यास मदत होऊ शकेल. हे पॉपकॉर्न खाण्यासाठी नाही हे ज्ञानात भर पडावी म्हणून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ट्रंपसारख्या मर्कटमानवांना

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 11:12 नवीन
ट्रंपसारख्या मर्कटमानवांना आत्ताच जनुकीय श्रेष्ठत्व बहाल करणे ही माझ्यामते घाई होईल. त्यांच्या वल्गना त्यांनी जर खर्‍या केल्य़ा (मेक अमेरीका ग्रेट अगेन इ० इ०) तर तरच त्यांना जनुकीय श्रेष्ठत्व बहाल करणे शहाणपणाचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित

माहितगार
Mon, 06/23/2025 - 11:33 नवीन
जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित कल्पना नसलेल्या व्यक्ती राष्ट्रप्रमुख पदी कशा पोहोचतात? जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित कल्पना असलेल्या तुमच्या सारख्या व्यक्ती का नाही? असा तो माझा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

<जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 11:53 नवीन
<जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित कल्पना असलेल्या तुमच्या सारख्या व्यक्ती का नाही? असा तो माझा प्रश्न आहे.> थोडं वळसा घालून या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल - माझ्यामते सर्वात महत्त्वाचा श्लोक "कर्मण्येवा इ० " नसून १८व्या अध्यायातला "अधिष्ठानं तथा कर्ता इ०" हा आहे. हे भारतीयांना जेव्हा कळेल तेव्हा हिंदूंचा खरा उत्कर्ष होईल. हा श्लोक सांगण्याचे कारण असे की जर एखाद्या व्यक्तीच्या निर्णयशक्तीवर नकारात्मक प्रभाव टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर प्रयत्नांना, आलेल्या संधींचा लाभ घेण्यास किंवा जोखीम पत्करण्यास मर्यादा पडतात. मी अमुक ठिकाणी आज का नाही याची मला जाहिर चर्चा अजिबात करायची नाही. पण एक सांगतो मला आज आयुष्यातल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च

माहितगार
Mon, 06/23/2025 - 13:27 नवीन
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥ कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे. ॥ १८-१४ ॥
यात तुमचे जनुकीय श्रेष्ठत्व नेमके कुठे बसते आणि तुमच्या जनुकीय श्रेष्ठत्वास उपरोक्त पैकी नेमक्या कोण कोणत्या कारणांनी अडथळा येऊन तुम्ही सर्वोत्तम ठिकाणी पोहोचू शकला नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री० माहितगार,

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 14:35 नवीन
श्री० माहितगार, मला एक कळत नाही, वर सौम्य शब्दात खुलासा केला असताना तुम्ही ज्याअर्थी तेचतेच विचारत आहात त्याअर्थी मला तुमच्या हेतूची शंका येते. मी कुठेही जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचे म्हटलेले नाही आणि तुमचा अन माझा परिचय नसताना मी माझ्या व्यक्तीगत यशापयशाची किंवा त्याच्या कारणांची चर्चा अनोळखी व्यक्तीशी करू इच्छित नाही. आपण आता थांबला नाहीत तर मला सुबोध खरे या व्यक्तीबाबत स्वीकारलेले धोरण तुमच्याबाबत अमलात आणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

प्र० अ - ज्याना विज्ञान कळते

माहितगार
Mon, 06/23/2025 - 14:53 नवीन
प्र० अ - ज्याना विज्ञान कळते ,यापेक्षा जे विज्ञानात भर टाकत आहेत ते जनुकीय श्रेष्ठ मानता येतील. पण त्यातही एक उतरंड तयार करता येईल. ज्यांनी विज्ञानात (आणि तंत्रज्ञानात) टाकलेली भर "लोकोत्तर" (फ्रण्ट्लाईन वरील संशोधक) आहे ते नक्कीच जनुकीयदृष्टया श्रेष्ठ मानता येतील. जे नव्याचा कल्पकतेने शोध घेतात, ज्यांची निर्मिती लोकोत्तर आहे (यात कला आलीच), ते पण जनुकीयदृष्टया श्रेष्ठ मानता येतील.
रागवू नका रागवू नका. आता या तुम्हीच सांगितलेल्या जनुकीय उतरंडीत तुम्ही कोणत्यातरी चांगल्याच स्थानावर बसणार ना? आणि श्रीमदभगवत गीतेतील अर्जूना प्रमाणे तुमच्यासारख्या लोकांच्या अनुभवातून शिकणे इतरेजनांनी जमेल तसे करावे तसेच तुमच्या लेखातील मतां बद्दल आमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आदराने केलेली पृच्छा आहे. काय नाही सांगाय्चे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

माझ्यामते गीतेमधला सर्वात

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 11:54 नवीन
माझ्यामते गीतेमधला सर्वात महत्त्वाचा श्लोक, असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अवांतर

युयुत्सु
Sun, 06/22/2025 - 10:11 नवीन
१. ही पोस्ट माझ्या इतर काही मित्रांना पाठवली होती. त्यातल्या एकानी गंगाधर गाडगीळ यांनी "किडकी माणसे" असा लेख लिहीला असल्याची आठवण सांगितली. मी हा लेख वाचलेला नाही. कुणाला किडका हा शब्द खटकला असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. २. संस्कृत आणि मराठीच्या साधर्म्याचा परिणाम माझ्या बाबतीत कसा झाला यावरून हिंदीच्या आक्रमणामुळे काय दूर्दशा ओढवेल याचा अंदाज बांधता येतो. संस्कृतचे व्याकरण मराठीपेक्षा सुघटित असल्याने माझं संस्कृतचे शुध्दलेखन नेहेमीच चांगले होते आणि मराठीचे नियम तूलनेने (प्रवाहीपणामुळे?) विस्कळीत असल्यामुळे माझं मराठीचे शुद्धलेखन आज ही कच्चंच राहिलं आहे. हा आणि असे प्रकार हिंदी लादल्याने अ‍ॅम्प्लिफाय होणार हे निश्चित...
  • Log in or register to post comments

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 06/23/2025 - 08:33 नवीन
हिंदी/तिसर्या भाषेची सक्ती चुकीची आहे. अगदे अजुबाजुला असलेले युरोपियन देश स्व्तःची मातृभाषा अजिबात सोडत नाहीत. जपानमध्येही तेच. आणि इकडे आमचे तज्ञ मुलांना लहानपणी अनेक भाषा शिकवाव्यात.. मोठेपणी त्याचा खूप फायदा होतो.. असे अजागळपणे सांगत होते. तामिळनाडुचे उदाहरण घ्या. फक्त तामिळ आणि इंग्रजी. काय अडले त्यांचे हिंदीवाचुन ?सरकारी उच्चपदांवर/खाजगी कंपन्यांमध्ये पुर्वी हेच लोक दिसायचे आणि सिलिकॉन व्हॅलीतही हेच लोक. आणि आमच्या घरचे पुरुष मधुबालाचे सौंदर्य आणि साहिर/शैलेंद्रची गाणी पाठ करता करता एल.आय.सी.मधुन निव्रुत्त कधी झाले हे त्यांनाही कळले नाही.
  • Log in or register to post comments

माई काही अपवाद वगळता केवळ

माहितगार
Mon, 06/23/2025 - 09:08 नवीन
माई काही अपवाद वगळता केवळ मिपावर नव्हे सबंध महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची गरज नाही याबद्दल सर्वसाधारण मत ऐक्य असावे. पण महाराष्ट्रीय जनतेची बहुतांश संतती प्रदुषण आणि तत्सम कारणाने जनुकीय दृष्ट्या किडकी आहे आणि म्हणून विशीष्ट प्रकारच्या शिक्षणांस अपात्र आहे आणि म्हणून कोणत्याही विशीष्ट उपयूक्त शिक्षणापासून वंचित ठेवावयास हरकत नाही असा या लेखातून दावा होत आहे का याचे युयुत्सु आणि त्या बद्दल तुमचे आणि इतर पुरोगामी मिपाकरांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अभ्यास

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 06/23/2025 - 09:57 नवीन
ईकडे तज्ञांचा जसा (दांडगा) अभ्यास असतो तसा आमचा नाही. पण कर्नाटक्,आंध्र,केरळ आणि वर पंजाब्,हरयाणा येथील राज्यांचा फेरफटका केल्यावर जाणवले की आपण मराठी ह्या राज्यांतील लोकांच्या तुलनेत अधिक कृश दिसतो.लोकसंक्येत आपण दुसर्या क्रमांकावर असलो तरी मैदानी खेळ्,स्पर्धा परीक्षा येथे बाजी मारण्याचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे. ह्या उलट जेथे प्रदुषण कमी आहे अशा ठिकाणाहुन मुले अनेकवेळा बाजी मारताना दिसतात.(विदा वगैरे विचारू नका..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

रोचक निरीक्षण, कुणि साद पडसाद देणार?

माहितगार
Mon, 06/23/2025 - 11:02 नवीन
तुमचे निरीक्षण रोचक आहे. कुणाला काही म्हणायचे आहे का या बाबत? कुणि साद पडसाद देणार? माझ्याकडे मी पॉपकॉर्न मागवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बहुभाषिक होण्यात काहीच गैर नाही

मारवा
Mon, 06/23/2025 - 16:16 नवीन
किमान तीन भाषा येत असतील तर त्या व्यक्तीसाठी हा एक विकासच आहे ना. त्याचा संवाद वाढतो, मेंदूचा विकास होतो, आनंद वगैरे बोनस किमान 3 भाषा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि प्रादेशिक शिकायला आत्मसात करायला काय हरकत आहे. मी स्वतः मराठी शिकलो तर मला किती मोठा आनंद मिळाला.संवाद साधता येतो त्या त्या भाषेतील उत्तम साहित्य कला संस्कृतीचा आनंद घेता येतो तर काय हरकत आहे ?
  • Log in or register to post comments

धागा लेखक युयुत्सु धागा

माहितगार
Mon, 06/23/2025 - 18:49 नवीन
धागा लेखक युयुत्सु धागा लेखाच्या शेवटी म्हणतात
.... पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात...
उपरोक्त मत उपरोक्त धागा लेखात धागा लेखक युयुत्सुंचे आहे. माझा उत्तरदायित्वास नकार लागू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

श्री० मारवा,

युयुत्सु
Mon, 06/23/2025 - 19:11 नवीन
श्री० मारवा, आपल्याला कॉग्निटीव्ह ओव्हरलोड आणि त्याचे दुष्परिणाम माहित नाहीत असे दिसते. यासाठी आपण खालील प्रश्न आपल्या आवडीच्या ए०आय० ला विचारावा. मात्र डीपसर्च हा पर्याय स्वीकारूनच उत्तर देण्यास सांगावे. What are the effects of cognitive overload in children? मग आपल्या कल्पना ("त्याचा संवाद वाढतो, मेंदूचा विकास होतो, आनंद वगैरे बोनस") निरर्थक असल्याचे जाणवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

युयूत्सुजी

मारवा
Mon, 06/23/2025 - 21:30 नवीन
तुम्ही What are the effects of cognitive overload in children? हा सर्च माझ्यामते अपूर्ण आहे त्याऐवजी अधिक neutral अधिक सत्यान्वेषी माझ्या मते Multilingual Education and Its Impact on Cognitive Development हा सर्च आहे. म्हणजे benefits of multilinguism हा मला अनुकूल सर्च मी टाळतो याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

Cognitive Impact

मारवा
Mon, 06/23/2025 - 21:39 नवीन
Cognitive Impact of multilinguism हा तुम्हाला अगत्याचा वाटतो व तो तपासून बघायचा आहे असे मी गृहीत धरतोय. एकांगी असे दोन प्रमुख प्रकारे शोधता येईल Benefits of multilinguism Disadvantages of multilinguism. तटस्थ शोध cognitive impact of multilinguism असा करता येईल. दारू चे दुष्परिणाम. एकांगी शोध दारू चे सुपरिणाम. एकांगी शोध पेक्षा दारू चे आरोग्यावर शरीरावर एकूण परिणाम प्रामाणिक सत्यशोधन मग त्यातून त्या मंथनातून जे नवनीत येईल ते आपण प्रश्न करू. माझं ते बरोबर पेक्षा बरोबर तेच माझं या न्यायाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

ते नवनीत आपण प्राशन करू

मारवा
Mon, 06/23/2025 - 21:42 नवीन
ते नवनीत आपण प्राशन करू असे टाकायचे होते मिसळपाववर edit करण्याची सुविधा का देत नाही काय माहिती. माणसाला आपल्या चुका सुधारायची एक संधी तरी दिली पाहिजे असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

श्री० मारवा,

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 07:49 नवीन
श्री० मारवा, निसर्ग सर्वाना समान ग्रहणक्षमता देत नाही (आपल्याला बेल कर्व्ह चा परिणाम माहित असेल अशी अपेक्षा आहे) आणि या ग्रहणक्षमतेवर जन्मपूर्व काळात, गर्भावस्थेत आई-वडीलांवर असलेला जगण्याचा ताण, प्रदूषण परिणाम करतात. त्याचे दृष्य परिणाम मेंदूच्या विकासावर आणि स्वास्थ्यावर होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जी बालके जन्माला येत आहेत त्यांच्यावर बहुभाषिकत्व लादण्याने फायद्यांपेक्षा तोटे जास्त होणार आहेत, हे स्वीकारायची तुमची तयारी नाही, हे मी समजू शकतो. दुसरा मुद्दा अनेकांना पटणार नाही, पण श्रमसंस्कृती मल्टीटास्कींगचे उदात्तीकरण करते. पण ते आरोग्यास घातक असते, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे. नैसर्गिक क्षमतांकडे कानाडोळा करून एकाचवेळेस अनेक गोष्टी शिकायला लावणे हे एक प्रकारचे मल्टीटास्कींगचे आहे, आणि ते अंतिमतः घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

Multilingualism चे अनेक फायदे आहेत हे सिद्ध करणारे

मारवा
Tue, 06/24/2025 - 10:29 नवीन
Multilingualism चे अनेक फायदे आहेत हे सिद्ध करणारे अनेक रिसर्च पेपर्स उपलब्ध आहेत. परंतु ते एकांगी असल्याने ते देण्याच्या मोहाला मी आवर घालतो. कारण facts finding हवा असलेला विदा घेऊन नको असलेला विदा टाळून करणे निरर्थक आहे.असे माझे मत आहे. विदा ग्रहण तटस्थ व्हावे हा मुळ आग्रह . त्याचप्रमाणे ego आणि truth मध्ये मी नेहमी truth निवडण्याचा प्रयत्न करतो. माझं तेचं बरोबर पेक्षा बरोबर तेच माझं हे तत्व मला प्रिय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 06/23/2025 - 18:32 नवीन
मग जपानी/जर्मन/रशियन/डच्/फ्रेंच मुलांच्या मेंदुचा विकास तुलनेने कमी झालेला असतो का? कारण ह्या देशांतील शाळांमध्ये शिक्षण प्रामुख्याने त्यांच्या मातृभाषेतच दिले जाते. आणी पदवी मिळेपर्यण्त ते सहसा त्यांच्याच भाषेत शुकतात. ह्या देशातील नागरिक बहुभाषिक असणार्या भारतातील नागरिकांपेक्षा कमी सरस असतात ? वाटत तरी नाही. कारण ज्या प्रमाणात हे देश पेटंट्स्,साहित्य्, संशोधन वगैरे निर्माण करतात त्यामानाने आपण किंवा ईतर बहुभाषिक देश निर्माण करत असतील का? आपण तर ह्या बाबतीत खूप मागे आहोत. जागतिक दर्जावर घेतल्या जाणार्या गणित्,भौतिक ऑलिंपियाड स्पर्धांचे गेल्या ३० वर्षातील निकाल पाहिलेत तर लक्षात येते की हंगरी,बल्गेरिया,रोमेनिया सारखे जेमतेम १.५ ते दोन कोटी लोकसंख्या असलेले देश १२५ कोटी भारताच्या अनेक मैल पुढे आहेत. ऑलिंपिक स्पर्धांचे तर विचारायलाच नको. (ह्या लहान युरोपियन देशांमध्ये प्रदुषण तुलनेने बरेच कमी असते का? बहुतेक असणार). https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_medal_count_at_International_Mathematical_Olympiad
  • Log in or register to post comments

आखीर केहना क्या चाहते है?

माहितगार
Mon, 06/23/2025 - 20:22 नवीन
आखीर आप केहना क्या चाहते है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पण अशा कीडक्या प्रजेवर ३

सुबोध खरे
Mon, 06/23/2025 - 18:58 नवीन
पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात. या दोन्हीचा आपसात काही संबंध असला तर तो अमेरिका आणि इराण युद्धाशी असावा तितकाच संबंध असावा. तीन भाषांचा निर्णय हा संपूर्ण महाराष्टाला लागू झालाय म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राची प्रजा किडकी आहे. त्यात आपलं मिपा पण आलंच कि आता या किडक्या प्रजेच्या किडक्या संस्थळावरील किडलेल्या लोकांना सर्वज्ञ हुशार करण्यासाठी आपले अधिजनुकशास्त्राचे हुच्च ज्ञान देणार आहेत. प्रदूषणामुळे मानवी शरीरा वर वाईट परिणाम होतो यात सामान्य माणसालाही कोणतीच शंका नाही तर तसा परिणाम जन्माला न आलेल्या बाळावरही होईल हे सांगण्यासाठी लॅन्सेटची गरज नाही. पण हुच्च लोकांना पाश्चिमात्य लोकांनो सांगितले तर च त्यांचा विश्वास बसतो पण मूळ मुद्दा हा कि हे सर्व माहिती असून सामान्य माणूस काय करू शकतो. सामान्यच कशाला असामान्य माणसांना सुद्धा यात फारसं काही करता येईल असं वाटत नाही. कोट्यवधी लोकांना शहरातून खेड्यात जायचं तर उपाशीच मरावं लागेल. एवढा द्राविडी प्राणायाम करून नक्की काय निष्पन्न होईल हे सर्वज्ञ काही सांगत नाहीत.
  • Log in or register to post comments

किडकी प्रजा निर्माण होण्यास

धर्मराजमुटके
Tue, 06/24/2025 - 08:14 नवीन
थोडक्यात वरील लेखावरुन आणि त्यावर मिळणार्‍या प्रतिसादावरुन असे जाणवते की चांगली प्रजा निर्माण न होणे यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्यावर मानवी उपाय होण्यासारखे दिसत नाहीत. त्यामुळे यापुढे वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीप्रमाणे जास्त किडके की कमी किडके यातूनच निवड करावी लागेल असे दिसते. आपण या विषयावर चर्चेखेरीज जास्त काही करु शकतो असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

<चांगली प्रजा निर्माण न होणे

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 08:54 नवीन
<चांगली प्रजा निर्माण न होणे यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्यावर मानवी उपाय होण्यासारखे दिसत नाहीत. त्यामुळे यापुढे वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीप्रमाणे जास्त किडके की कमी किडके यातूनच निवड करावी लागेल असे दिसते.> अगदी बरोबर. उत्पादकतेच्या व्यस्त प्रमाणात अस्मिता जाग्या झाल्या की अशा समस्या हाताबाहेर जातात.
  • Log in or register to post comments

जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा?

माहितगार
Tue, 06/24/2025 - 10:21 नवीन
जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा हा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आणि सामाजिकदृष्ट्या हानिकारक आहे, कारण तो भेदभाव आणि पूर्वग्रहांना प्रोत्साहन देतो. मी लेखक युयुत्सु यांनी त्यांच्या तिन्ही लेखांचे दुवे आणि त्यांनी नंतर केलेल्या चर्चेतून केलेले दावे यांचे गूगल जेमिनीस गूगल स्कॉलरच्या मदतीने आणि स्कॉलरली लिटरेचरच्या मदतीने तपासण्यास सांगितले असता जेमिनीने त्यांच्या दाव्यांबाबत खालील मर्यादा स्पष्ट केल्या युयुत्सु यांच्या जनुकीय श्रेष्ठत्वाच्या दाव्यांचे आणि 'लोकोत्तर' संशोधक जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचे मत वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी केल्यास त्यांच्या मर्यांदा स्पष्ट होतात. युयुत्सु यांच्या जनुकीय श्रेष्ठत्वाच्या दाव्यांची वैज्ञानिक मर्यादा युयुत्सु यांनी मांडलेला 'किडकी प्रजा' (Defective/Damaged Progeny/Population) आणि जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा आधुनिक विज्ञानात स्वीकारार्ह नाही आणि त्याला अनेक गंभीर मर्यादा आहेत. * जनुकीय आवश्यकत्ववाद, निर्धारणवाद आणि लघुकरणवाद (Genetic Essentialism, Determinism, and Reductionism - GEDR): युयुत्सु यांचे दावे जनुकीय आवश्यकत्ववाद, निर्धारणवाद आणि लघुकरणवादाच्या (GEDR) श्रेणीत मोडतात, जे विज्ञानात गंभीरपणे नाकारले गेले आहेत. या संकल्पना जनुकीय भूमिकेला अतिरंजित करतात. व्यक्तीची जडणघडण केवळ जनुकीय घटकांमुळे होत नाही, तर जनुकीय आणि गैर-जनुकीय (उदा. पर्यावरण, सामाजिक संदर्भ) घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परक्रियेतून होते. जनुकीय आवश्यकत्ववादामुळे लैंगिक भेद (उदा. STEM क्षेत्रातील पुरुषांचे जास्त प्रमाण) आणि वर्णद्वेष (उदा. विविध वंशीय गटांच्या बुद्धिमत्तेतील फरक) यांसारख्या भेदभावाला खतपाणी मिळते. (The Problems with Genetic Essentialism, Determinism, and Reductionism) * वंशाची सामाजिक रचना: मानवी वंश वैज्ञानिकदृष्ट्या जनुकीय भिन्न नाहीत, तर ते मुख्यतः सामाजिक रचना आहेत. सामाजिकदृष्ट्या परिभाषित वंशांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण जनुकीय फरक नाहीत. (Genes, Culture, and Scientific Racism - PNAS) * यूजेनिक्स (Eugenics) आणि वैज्ञानिक गैरसमज: युयुत्सु यांचे 'जनुकीय श्रेष्ठत्व' किंवा 'उत्तम प्रजेची' कल्पना यूजेनिक्सच्या (सुप्रजननशास्त्र) विचारधारेसारखी आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला यूजेनिक्स लोकप्रिय असले तरी, ते पूर्वग्रहदूषित आणि चुकीच्या मेंडेलियन जनुकीय आकलनावर आधारित होते. यात बुद्धिमत्ता किंवा सामाजिक वर्तन यांसारखे अमूर्त मानवी गुणधर्म सरळपणे अनुवांशिक असतात असे मानले जात होते. या विचारधारेमुळे मोठ्या प्रमाणावर भेदभाव आणि अत्याचार झाले, विशेषतः दुर्बळ घटकांवर. नाझी जर्मनीच्या कृत्यांमुळे यूजेनिक्सची वैज्ञानिक आणि नैतिक मर्यादा उघड झाली. (Eugenics and Scientific Racism - NHGRI; Eugenics - Wikipedia) * गुंतागुंतीच्या लक्षणांची अनुवांशिकता: बुद्धिमत्ता, प्रतिभा किंवा इतर कोणत्याही गुंतागुंतीच्या मानवी गुणांवर केवळ काही विशिष्ट जनुकांऐवजी अनेक जनुकीय आणि पर्यावरणीय घटकांचा परिणाम होतो. त्यांची अनुवांशिकता सरळ साध्या पद्धतीने नसते. (Intelligence, Genetics of: Heritability and Causation - UBC Zoology) ...'ज्याना विज्ञान कळते, यापेक्षा जे विज्ञानात भर टाकत आहेत ते जनुकीय श्रेष्ठ मानता येतील... लोकोत्तर (फ्रण्टलाईनवरील संशोधक) जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ मानता येतील' या दाव्याच्या मर्यादा: युयुत्सु यांचा हा दावा, विशेषतः 'लोकोत्तर' संशोधक जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ असतात, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही आणि त्याला अनेक मर्यादा आहेत: * बुद्धिमत्तेची अनुवांशिकता आणि गटभेद: बुद्धिमत्तेला (IQ) मोठा आनुवंशिक घटक (सुमारे ५०%) असला तरी, याचा अर्थ असा नाही की विविध गटांमधील बुद्धिमत्तेच्या फरकांना जनुकीय आधार आहे. वंश किंवा सामाजिक गट यांमधील बुद्धिमत्तेच्या सरासरी फरकांना जनुकीय कारण नाही, यावर वैज्ञानिक सहमती आहे. (Heritability of IQ - Wikipedia) * प्रतिभा आणि अनुवांशिकता - पर्यावरण आणि परिश्रमाचे महत्त्व: प्रतिभा आणि जनुके यांचा संबंध असला तरी, ते एकमेकांवर अवलंबून आहेत. काही व्यक्तींना जनुकीयदृष्ट्या अधिक क्षमता मिळू शकते, परंतु कठोर परिश्रम आणि सरावाशिवाय ती क्षमता विकसित होऊ शकत नाही. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पर्यावरणीय घटक आणि जाणीवपूर्वक केलेला सराव (deliberate practice) प्रतिभेच्या विकासासाठी आणि वैज्ञानिक यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. (Are talents genetic or learnt? - BBC Science Focus Magazine) * वैज्ञानिक प्रतिभेच्या अनुवांशिकतेचा प्रत्यक्ष पुरावा नाही: नोबेल विजेत्यांमध्ये वैज्ञानिक प्रतिभेच्या सरळ अनुवांशिकतेचा कोणताही थेट पुरावा (उदा. जुळ्यांवरील अभ्यास) उपलब्ध नाही. यामुळे मानक वर्तन जनुकीय पद्धती वापरून अशी श्रेष्ठता सिद्ध करणे कठीण होते. (Scientific Talent, Training, and Performance: Intellect, Personality, and Genetic Endowment) * पर्यावरणीय घटकांचा प्रभाव: वैज्ञानिक यश मिळवण्यासाठी सामाजिक-आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, शाळेची गुणवत्ता, परिसरातील वातावरण, शाळेचे वातावरण, सुरक्षितता आणि सामाजिक संबंध यांसारख्या पर्यावरणीय घटकांचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. पूरक घरगुती वातावरण आणि चांगल्या शैक्षणिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळण्यास मदत होते. (Effect of Environmental Factors for Teaching of Science on Academic Achievement and Interest of Students and on Their Teachers' Job Statisfaction; Impact of Environmental Factors on Student's Educational Background and Their Future Performance) थोडक्यात, आधुनिक विज्ञान मानवी क्षमता आणि यशाला केवळ जनुकीय घटकांशी जोडत नाही. तर, जनुकीय प्रवृत्ती, पर्यावरण, शिक्षण, सामाजिक संधी आणि वैयक्तिक प्रयत्न यांचा हा गुंतागुंतीचा मिलाफ आहे. जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा हा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आणि सामाजिकदृष्ट्या हानिकारक आहे, कारण तो भेदभाव आणि पूर्वग्रहांना प्रोत्साहन देतो.
  • Log in or register to post comments

श्री० माहितगार

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 10:32 नवीन
श्री० माहितगार तुमचे सगळे विवेचन ठिक आहे. पण "उत्तम वाण" किंवा "जनुकिय श्रेष्ठत्व" ही कल्पना माणसाने लबाडीने फक्त माणसापुरतीच नाकरली आहे. मनुष्येतर सर्व जीवांसाठी जिथे-जिथे फायदा आहे, तिथे-तिथे तो उत्तम बीजासाठी आग्रह धरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

दुट्टपी माणूस

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 10:53 नवीन
श्री० माहितगार तुम्ही मानवी दुट्प्पीपणाकडे कानाडोळा कराल याची मला खात्री आहे. पण चीनने जेव्हा पेटंट्चा हिमालय उभा केला तेव्हा इतिहासात रमणार्‍या भारतीयांनी फक्त एक देऊळ आणि एक पुतळा उभा केला. यापेक्षा जनुकीय श्रेष्ठत्वाचे माझ्यामते दूसरे समर्पक उदा० देता येत नाही. हे जनुकीय श्रेष्ठत्व जिनेटीक एडीटिंग सारख्या तंत्रज्ञानाने जेव्हा चीनला अनफेअर अ‍ॅडव्हाण्टेज देईल तेव्हा जनुकीय श्रेठत्वाची कल्पना लोक स्वीकारायला तयार होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

शिकणे म्हणजे काय?

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 10:26 नवीन
मंडळी, जैविक पातळीवर शिकणे म्ह० काय असते हे जर समजाउन घ्यायचे असेल तर युट्युबवर काही व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यातील एक क्लिप पुढे देत आहे. https://youtube.com/shorts/ztPKM0nryY8?si=sK2y-d-K6EHqmTPO शिकणे या प्रक्रियेत चेतापेशींच्या एकमेकींमध्ये जोडण्या निर्माण होतात. वरील क्लिपमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली दोन चेतापेशींमध्ये ही जोडण्यांची निर्मिती कशी होते हे स्पष्ट दिसत आहे. कोणतेही नवे कौशल्य आपण शिकतो तेव्हा या जोडण्या मोठ्याप्रमाणावर मेंदूमध्ये त्या कौशल्याशी संबंधित भागामध्ये घडून येतात. या प्रक्रियेवर (म्ह० शिकण्यावर) प्रभाव कशाकशाचा पडतो? तर १. जन्मजात देणगी किंवा जनुकीय भाग्य - मेंदूच्या ज्या भागात या जोडण्या पट्कन गरजेनुसार आणि पटकन निर्माण होतात, त्या गोष्टी आपण पटकन शिकतो. २. पोषक वातावरण - ज्यांना घरातच किंवा आजुबाजूला एखादे कोशल्य शिकण्यासाठी पोषक वातावरण मिळाले तर व्यक्ती पटकन शिकते. ३. कुपोषण, ताण आणि विषद्रव्यांचा मारा या जोडण्यांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण करतात. आपल्या शिक्षणपध्द्तीमध्ये लर्निंग पेसचा आदर केला जात नसल्याने, तसेच वरील जीवशास्त्र राजकारण्यांना समजत नसल्याने अनाठायी अभ्यासाचे ओझे वाढवून ठेवले आहे. साहजिकच किडक्या प्रजेची निर्मिती होते!! ८वी-९वी मधली मुले जर हृदयविकाराने जागेवर कोसळत असतील तर त्यांच्यावरचा ताण किती धोकादायक बनला आहे, हे समजणे फारसे अवघड नाही. वास्तविक हे जीवशास्त्र वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीनी संबंधिताना समजाऊन सांगितले जाणे अपेक्षित आहे, पण ते एका आय ० आय० टी० च्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे लागते, याला दूर्दैव म्हणायचे का असा प्रश्न पडतो... अवांतर - आज मी ~२.५ मि०मध्ये ~९% नफा कमावल्याने विशेष खुषीत आहे.
  • Log in or register to post comments

हे जीवशास्त्र वैद्यकीय

सुबोध खरे
Tue, 06/24/2025 - 12:07 नवीन
हे जीवशास्त्र वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीनी संबंधिताना समजाऊन सांगितले जाणे अपेक्षित आहे, पण ते एका आय ० आय० टी० च्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे लागते, याला दूर्दैव म्हणायचे का असा प्रश्न पडतो... इथं मिसळपाव वर समजावून सांगितल्याने स्वतःचीच आत्मप्रौढी मिरवण्याशिवाय तुम्ही काय गवत उपटलंय? एका आय ० आय० टी० च्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे लागते, ते इथल्या लोकांना समजावून काय उपयोग. चला तुमच्या समाधानासाठी मान्य करू तुमचीच लाल. त्याने काय होणार आहे? ज्यांच्या हातात सत्ता आहे जे काही यात ठोस करू श़़कतात त्यांना समजावून सांगा कि. तिथे कशाला शेपूट घालताय आणि उगाच इथे कशाला शेखी मिरवताय? अरण्य रुदन सोडलं तर काय मिळवताय? आज मी ~२.५ मि०मध्ये ~९% नफा कमावल्याने विशेष खुषीत आहे.. मग पुढे? साधा सलग सतत दरमहा १० % फायदा मिळवता येतो हि शेखी मिरवली. यावर मी तुम्हाला साधा सरळ सांगितलं कि माझे पैसे १० % दरमहा दराने चक्रवाढ दराने पाच वर्षे वाढवून दाखवा अर्धा फायदा तुमचा अर्धा माझा, तर आपण शेपूट घातली. नैसर्गिक निवड आणि उत्क्रांती च्या बेसिकस मध्येच राडा आहे तुमचा उगाच इथे किडकी प्रजा नावाने भंपक दावे कशाला करताय?
  • Log in or register to post comments

तार्किक दोषांचे एआय विश्लेषण

माहितगार
Tue, 06/24/2025 - 15:02 नवीन
युयुत्सुंच्या लेखातील तार्किक दोषांचे जेमिनी एआय विश्लेषण (लांबीमुळे स्वतंत्र धागा लेख)
  • Log in or register to post comments

सर्व काही तार्किक आहे ते वैज्ञानिक आहे का, आणि सर्व काही वैज्ञान

युयुत्सु
Tue, 06/24/2025 - 17:43 नवीन
सर्व काही तार्किक आहे ते वैज्ञानिक आहे का, आणि सर्व काही वैज्ञानिक आहे ते तार्किक आहे का? उत्तर: पूर्णपणे नाही. सर्व काही तार्किक आहे ते वैज्ञानिक असणे आवश्यक नाही, परंतु सर्व काही वैज्ञानिक आहे ते साधारणपणे तार्किक असणे अपेक्षित आहे. तर्कशास्त्र ही एक व्यापक विचारपद्धती आहे, जी सुसंगत आणि वैध युक्तिवादांना नियंत्रित करते. ती गणित, तत्त्वज्ञान किंवा अगदी दैनंदिन निर्णय घेण्यासारख्या क्षेत्रांमध्ये लागू होते, ज्यासाठी प्रत्यक्ष पुराव्याची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, "सर्व माणसे मरणार आहेत; सॉक्रेटिस हा माणूस आहे; म्हणून, सॉक्रेटिस मरणार आहे" हा एक पूर्णपणे तार्किक युक्तिवाद आहे, परंतु तो वैज्ञानिक नाही, कारण तो निरीक्षण किंवा प्रयोगावर अवलंबून नाही. विज्ञान, मात्र, ही जग समजून घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी प्रत्यक्ष पुरावे, चाचणी करण्यायोग्य गृहीतके आणि पुनरावृत्ती करण्यायोग्य प्रयोग यांवर आधारित आहे. ती तर्कशास्त्राचा उपयोग युक्तिवाद सुसंगत असल्याची खात्री करण्यासाठी करते, परंतु त्यापेक्षा अधिक मागते: डेटा, खंडनक्षमता आणि वस्तुनिष्ठता. एक वैज्ञानिक दावा, जसे की "गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू 9.8 मी/से² वेगाने खाली पडतात," हा तार्किक (सुसंगत आणि सातत्यपूर्ण) आणि पुराव्यांद्वारे समर्थित असणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये, जे तार्किक आहे ते वैज्ञानिक नसू शकते. सट्टात्मक तर्क, जसे की समांतर विश्वांबद्दलचा तार्किकदृष्ट्या सुसंगत सिद्धांत, त्याला प्रत्यक्ष आधार नसल्यास तो वैज्ञानिक नसतो जोपर्यंत तो चाचणीयोग्य होत नाही. याउलट, वैज्ञानिक निष्कर्ष तार्किक असणे अपेक्षित आहे; एक अतार्किक वैज्ञानिक दावा (उदा., पुराव्यांशी विसंगत असणे आणि त्याचे निराकरण न होणे) त्याची विश्वासार्हता कमी करेल.
  • Log in or register to post comments

MIT just completed the first

सुबोध खरे
Wed, 06/25/2025 - 13:33 नवीन
MIT just completed the first brain scan study of ChatGPT users & the results are terrifying. Turns out, AI isn't making us more productive. It's making us cognitively bankrupt. 83.3% of ChatGPT users couldn't quote from essays they wrote minutes earlier. Let that sink in. You write something, hit save, and your brain has already forgotten it because ChatGPT did the thinking. Brain scans revealed the damage: neural connections collapsed from 79 to just 42. That's a 47% reduction in brain connectivity. If your computer lost half its processing power, you'd call it broken. That's what's happening to ChatGPT users' brains. Teachers didn't know which essays used AI, but they could feel something was wrong. "Soulless." "Empty with regard to content." "Close to perfect language while failing to give personal insights." The human brain can detect cognitive debt even when it can't name it. Here's the terrifying part: When researchers forced ChatGPT users to write without AI, they performed worse than people who never used AI at all. It's not just dependency. It's cognitive atrophy. Like a muscle that's forgotten how to work. The MIT team used EEG brain scans on 54 participants for 4 months. They tracked alpha waves (creative processing), beta waves (active thinking), and neural connectivity patterns. This isn't opinion. It's measurable brain damage from AI overuse. The productivity paradox nobody talks about: Yes, ChatGPT makes you 60% faster at completing tasks. But it reduces the "germane cognitive load" needed for actual learning by 32%. You're trading long-term brain capacity for short-term speed. MIT researchers call this "cognitive debt" - like technical debt, but for your brain. Every shortcut you take with AI creates interest payments in lost thinking ability. And just like financial debt, the bill comes due eventually.
  • Log in or register to post comments

83.3% of ChatGPT users couldn

कानडाऊ योगेशु
Wed, 06/25/2025 - 13:43 नवीन
83.3% of ChatGPT users couldn't quote from essays they wrote minutes earlier.
हे वाचुन आश्चर्य वाटले नाही. मोबाईल नव्हते त्या काळात म्हणजे लँडलाईन असण्याच्या काळात साधारण दहा बारा फोन नंबर लक्षात ठेवायची गरज भासत असे त्यामुळे तसे करताना नंबर मधील पॅटर्न शोधणे वा तत्सम क्लृप्त्या केल्या जात असत जेणे करुन नंबर लक्षात राहण्यास मदत होईल.परंतु मोबाईल आणि त्यातुनही स्मार्ट फोन आल्यामुळे व मोबाईल शरीराचाच एक अवयव किंवा मेंदुचे एक्स्टेंशन झाल्यामुळे नंबर लक्षात ठेवायची गरजच पडत नाही. त्यामुळे एखाद्या दुसर्या फोन नंबर व्यतिरिक्त जास्त नंबर लक्षात राहत नाहीत वा तसे प्रयत्न ही केले जात नाहीत. हीच गोष्ट जी.पी.एस ची. आधी एखाद्या भागात दुचाकी वा चारचाकीने गेल्यानंतर पुन्हा तिथे जाण्यास अडचण येत नसे.रस्ते /वळणे वगैरे लक्षात राहीले जायचे पण आता अनेक वेळा एखाद्या भागात गेल्यानंतरही जी.पी.एस ची मदत घ्यावी लागेत. दुसरे पाहिलेले उदाहरण म्हणजे दुकानदार हिशोब करताना सर्रास कॅलक्युलेटर वापरतात अगदी किरकोळ बेरजा असल्या तरी. चॅट जीपीटी मुळे तर विचार करण्याची एकुणच प्रक्रियाच आऊट सोर्स केली गेलेली आहे. एकुणच भविष्यकाळात मानवजातच रिडंडट होते कि काय अशी शक्यता वाटु लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा