Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वरुपसुमित on Sat, 05/10/2025 - 19:32
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली. • पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले • अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला. • सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल. • अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती. आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
  • Log in or register to post comments
  • 23945 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वरुपसुमित on Sat, 05/10/2025 - 19:33

Permalink

सुत्र

सुत्र https://www.newsdrum.in/national/what-went-behind-the-peace-deal-between-india-pakistan-and-what-next-9055479 मिपा संपादक पैकी कोणी हे मुळ लेखात टंकु शकेल?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 05/10/2025 - 20:07

In reply to सुत्र by स्वरुपसुमित

Permalink

कॉपीराइट मजकूर आहे तो. पण

कॉपीराइट मजकूर आहे तो. पण मराठीत मिळू शकतो. साईटवर दिसल्यावर >> ब्राउझर सेटिंग्ज>> translate> Marathi करून. ............ तर आता शांता परत. भारतीय कारवाईचा दणका परिणामकारक आणि अभिमानास्पद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वरुपसुमित on Sat, 05/10/2025 - 20:33

Permalink

पुर्ण मजकुर नाही

पुर्ण मजकुर नाही फक्त मुळ दुवा टंकावा
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Sun, 05/11/2025 - 10:42

Permalink

भारताने काय साध्य केले ?

दहशत्वाद्यानी २६ निरपराध हिंदू बांधवांची हत्या केली. पाकिस्तानला १.१ बिलियनची मदत मिळाली . भारताला काय मिळाले ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Sun, 05/11/2025 - 20:26

In reply to भारताने काय साध्य केले ? by सौन्दर्य

Permalink

महत्वाचे प्रश्न

आहेत हे. शिवाय राफेल विमान नक्की पडलं की नाही याचाही खुलासा व्हावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sun, 05/11/2025 - 20:32

In reply to महत्वाचे प्रश्न by स्वधर्म

Permalink

एखाद पडलं असावं कदाचित.

एखाद पडलं असावं कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/11/2025 - 18:41

Permalink

झी-न्यूज

झी-न्यूजवाले भारतात परत आल्याशिवाय युद्धबंदी होत नाही. ;) च्यायला, आपण पाकड्यांच्या अतिरेकी तळावर हल्ले केले आणि पाकिस्तानचे ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट केले त्या दिवशी या झी-न्युजवाल्याने रात्रभर डोळ्याला डोळा लागू दिला नाही. क्रिकेट समालोचनाच्या पुढे उत्कंठावर्धक युद्धाचं वर्णन. महिला अँकरचा तर सायरनच्या आवाज आणि तिचा आवाज एक होऊन तिचा घसा बसलेला पाहिला. नौदलाने विक्रांतच्या मदतीने कराची बंदर उद्ध्वस्त केलं. तिकडून बलुचीस्तानकडून बलूचने हल्ला करुन कंबरडे मोडले. इकडे भूदलाने आणि वायूदलाने त्यांची पाकड्यांची त्रिधातिरपीट उडवून लाहोर, इस्लामाबाद आज रात्रीचआपण काबीज करतो की काय असे वाटले. सकाळी काय स्थिती राहील याचा अंदाजच करता येईना. आपलं मिडिया कधी सुधारेल ते देव जाणे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 05/20/2025 - 12:21

In reply to झी-न्यूज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

महिला अँकरचा तर सायरनच्या

महिला अँकरचा तर सायरनच्या आवाज आणि तिचा आवाज एक होऊन तिचा घसा बसलेला पाहिला.
म्हणजे पुढंमागं अँकरच्या कोर्स मध्ये सायरनचा आवाज परिणामकारक काढायचा प्रकार / कला सिलॅबस मध्ये समाविष्ट करणार तर !
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sun, 05/11/2025 - 20:37

Permalink

सुरवातीपासूनच आपला मीडिया

सुरवातीपासूनच आपला मीडिया फारच बेजबाबदार वागला. चकमकी चालू झाल्या वर तर त्यात आणखीनच भर पडली. ८ तरखेच्या रात्री तर कहरच केला. ह्या मूर्खपणा वर कारवाई व्हायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by nutanm on Mon, 05/12/2025 - 06:18

Permalink

भारताने पाकला चान्ग्ला धडा

भारताने पाकला चान्ग्ला धडा शिकवावा... बलुचिस्तान स्वतन्त्र करावे व कायम आपला होल्ड त्यावर ठेवावा पाकचे ७१ सारखे परत तुकडे करावेत pok परत मिळवावाच.. आपले आहे आपलयाकडेच राहिल. बलोच लोक आपले मराठेच आहेत आपलया मराठयान्चे वन्शज.. पानिपतचया युद्धातील.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Mon, 05/12/2025 - 09:11

Permalink

आपण शस्त्रसंधी केलीच का ?

सर्व आघाड्यांवर आपण जिकंत होतो, हे जर खरे असेल तर, आपण शस्त्रसंधी केलीच का ? गेल्या कित्येक दशकांचा इतिहास हेच सांगतो की पाकिस्तानचे दहशवादी हल्ले थांबतच नाहीत. त्यांनी भारतात येऊन आपले नागरिक मारावेत , आपण त्यांच्या दोनचार ठिकाणांवर हल्ला करायचा व म्हणायचे आम्ही त्यांचे कंबरडे मोडले आत ते परत आगळीक करणार नाहीत, परंतु कसचे काय ! त्यांच्या आगळिका थांबताच नाहीत व थांबणार ही नाहीत. ही सुवर्णसंधी दवडायला नको होती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/12/2025 - 09:24

In reply to आपण शस्त्रसंधी केलीच का ? by सौन्दर्य

Permalink

भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या

भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही इथे लिहिलं होतं की इतकं होऊ शकतं. पण हे खरं आहे, एक संधी नक्की होती की आपलं पाकव्यापत काश्मीर मिळवायला हवं होतं. बलुचलाही बळ द्यायला हवं होतं. अर्थात, ते आज न उद्या होईल यात शंका नाही. भारताच्या हल्ल्यांचा धसका घेऊन शस्त्रसंधीसाठी पाकने अमेरिकेला विनवले असेल पण आज अमेरिकेला विनाकारण संधी मिळाली की दोनही देशातील नेतृत्व कणखर आहे वगैरे. आणि विनाकारण पाकिस्तानची हिम्मतही वाढली आहे, असे वाटले. आपण पाकिस्तानचं प्रचंड नुकसानही केलं असेल पण काहीतरी वेगळं घडेल ही जी आपण आस लावून बसलो तसं झालं नाही. एक जबर हल्ला ज्यामुळे पाक मोडायला पाहिजे होतं. आता काश्मीर मुद्यावर मध्यस्ती करु वगैरे बोलायची संधी अमेरिकेस मिळाली. अर्थात आपण काश्मिर प्रश्नी त्रयस्थ भूमिका कायम नाकारली आहे. भारतीय सैन्याने नागरीवस्त्यांवर हल्ला न करता अतिरेकी तळांचा जो खात्मा केला त्याचा एक भारतीय म्हणून खुप आनंद झाला आणि अभिमानही वाटला. आता अशी पुन्हा हिम्मत केली तर, त्याची जबर किंमत पाकला मोजावी लागेल हा धडाही ऑपरशेन सिंदुरच्या माध्यमातून सध्या तरी भारतीय सैन्याने दिला आहे, पण पाक शांत बसणार नाही, त्यांच्या नापाक हरकती काही दिवस थांबतील आणि पुन्हा हळुहळु सुरु होतील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Mon, 05/12/2025 - 09:51

In reply to भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सहमत

भारताने जी कारवाई केली त्याबद्दल एक भारतिय म्हणून आनंद झाला पण पाकिस्तानच्या भूमिकेत तसूभरही फरक पडलेला नाही/पडणार नाही असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसते. Responding to a question about who first requested for the ceasefire, the DG ISPR said: “Put it on record that Pakistan never requested for a ceasefire.” Indian military officers, meanwhile, said that the objectives of ‘Operation Sindoor’ were achieved, with ‘high-value terrorists’ being eliminated, but dodged a question whether they had lost a bunch of warplanes in the operation. "https://www.dawn.com/news/1910381/deterrence-re-established-say-armed-forces
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/12/2025 - 11:06

In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आपण..

आपण संरक्षण आणि शस्त्रसज्जतेत मजबूत आहोत राजीव नारायणन यांना ऐकत होतो. आपण मजबूत आहोत पण मग... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/12/2025 - 20:00

Permalink

ठीक 8 बजे...

प,मोदी यांचा देशाला संदेश ठीक आठ वाजता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 05/12/2025 - 20:06

Permalink

हुतात्म्यांचे राजकारण..

देशभर में बीजेपी तिरंगा यात्रा निकालने जा रही है। 13 मई से 23 मई तक बीजेपी तिरंगा यात्रा निकालेगी। इस तिरंगा यात्रा उद्देश्य ऑपरेशन सिंदूर की उपलब्धियों को लोगों तक पहुंचाना है। तरुण चुघ, संबित पात्रा, विनोद तावड़े और अन्य वरिष्ठ नेता अभियान के लिए समन्वय करेंगे। साथ ही बीजेपी नेता और मंत्री यात्राओं का नेतृत्व करेंगे।
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Mon, 05/12/2025 - 23:40

In reply to हुतात्म्यांचे राजकारण.. by कपिलमुनी

Permalink

कशासाठी ?

संपूर्ण देशातील जनता युद्धाच्या बातम्या ऐकत, वाचीत होती. सत्राशे पन्नास सोशल प्लॅटफॉर्म्सवर माहिती मिळत होती, असं असताना ही यात्रा कशासाठी ? जनतेपर्यंत सत्य बातमी पोहोचविण्यासाठी की लक्ष दुसरीकडेच भरकटवण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी ? दुसरीच शक्यता जास्त दिसतेय. देशाला एका साध्या प्रश्नाचे उत्तर हवंय. आपण जर वरचढ होतो तर शस्त्रसंधी करायची गरजच काय ? बरं केली तर केली , भारताच्या पदरात काय पडलं ? तिकडे पाकिस्तान आम्हीच जिंकलोय असा घोष करतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 05/12/2025 - 20:27

Permalink

अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य

अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य केली नाही. आणि POK ताब्यात घेणे प्रॅक्टकल वाटतं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/12/2025 - 21:26

In reply to अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य by रात्रीचे चांदणे

Permalink

ट्रंप यांचा दावा...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी असा दावा केला की त्यांनी आठवड्याच्या शेवटी दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानवर युद्धबंदी स्वीकारण्यासाठी दबाव आणला. ( बातमी ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 05/13/2025 - 11:18

In reply to ट्रंप यांचा दावा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

ट्रम्प आणि उतावीळपणा

माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल, तर जो बायडेन यांच्याविरूद्ध निवडणूक लढवल्यानंतर शेवटचा निकाल हाती येण्याआधीच ट्रंप यांनी निवडणूक जिंकल्याचे जाहिर केले होते. योग्य निवड केल्याबद्दल अमेरिकन जनतेचे आभार देखील मानले होते. त्यामुळे ट्रंप यांचा पराभव पचवणे त्यांच्या समर्थकांना अवघड गेले होते. ते सातत्याने उतावीळपणे घोषणा करत असल्याची/ धोरणे जाहीर करत असल्याची बरीच उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 05/12/2025 - 21:47

Permalink

https://youtu.be/R09jQmt-6GI

https://youtu.be/R09jQmt-6GI?feature=shared किती निर्लज्ज माणूस आहे हा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/13/2025 - 14:47

Permalink

काल दुपारी भारताचे पंतप्रधान

काल दुपारी भारताचे पंतप्रधान देशाला आठवाजता संबोधीत करणारच्या बातमीने पोटात गोळा आला. आठ वाजेच्या आठवणी भयंकर आहेत. नोटबंदी, जीएसटी, करोनाच्य काळातल्या टाळ्या, थाळ्या, दिवाबत्ती जांभळ्या रंगातील थाळी वाजवणारी ती महिला. अजूनही सर्व डोळ्यासमोर येतं. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या-औषधे, किराणा सामान भरून घ्यावे की काय असा विचार मनात येऊन गेला. तर, आठवाजता आदरणीय माननिय भारत देशाचे पंतप्रधानांच्या संबोधनाला सुरुवात झाली. 'प्रिय देशवासियो, नमस्कार. मग देश, सामर्थ्य हे सर्वांनी पाहिलं. सर्वप्रथम पराक्रमी सेना, सशस्त्र दल, गुप्तचर संस्था , वैज्ञानिक, वीर सैनिक सर्वांना ऑपरेशन सिंदुरच्या पराक्रमास भारतीयांच्या वतीने सॅल्यूट केले. आपल्या सैनिकांनी अफाट शौर्य दाखवले. हे शौर्य, धाडस, प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला, समर्पीत करतो. एकता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. आतंकवाद्यांनी जे केलं त्याला एक धडा भारतीय सैनिकांनी दिला. आम्ही ऑपरेशन सिंदूर तुर्तास स्थगीत केले असून पाकने कुरापती केल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. शस्त्रसंधीची विनंती पाकिस्तानने केली आणि ती विनंती आम्ही मान्य केली. दहशतवादीस आणि आणि त्यांना पाठबळ देणारे सरकार दोन्ही सारखेच आहेत. सध्याचा काळ युद्धाचा नाही तसाच तो दहशतवाद्यांचाही नाही. पाकिस्तानने आता पुन्हा असे काही धाडस केले तर, आम्ही कोणत्याही मोहीमेसाठी सज्ज आहोत असा संदेश दिला. आपण सडेतोड हल्ले केले वगैरे. आज बुद्ध पोर्णिमा भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. पण शांतीचा मार्गदेखील शक्तीतूनच जातो हे त्यांनी स्पष्ट केले. मानवतेला शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला शांततेत जगता यावे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे, गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणे गरजेचे आहे. एकूण भाषण संबोधन त्वेषपूर्ण करण्याचा, आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न उत्तम होता. पण लक्षात आलं अनपेक्षित शस्त्रसंधीमुळे बॅकफुटवर गेलेल्या भारतीयांचे मनोबल वाढवणे आवश्यक होते पण संधी होती ती घालवली यात शंका नाही असे वाटते -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 05/13/2025 - 18:40

Permalink

हायला

हायला मोदी भक्तांपेक्षा मोदी रुग्णच त्यांची भाषणं जास्त सविस्तर पणे पाहत आणि चर्चित असतात. बहुधा रोज मोदींचं स्मरण केल्याशिवाय त्यांना जेवण पचत नसावं
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Tue, 05/13/2025 - 22:08

In reply to हायला by सुबोध खरे

Permalink

नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके

नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके खोल आहेत की त्यांचा विषय निघाला की दुखायला लागतात. मग करोना / टाळ्या वगेरे वगेरे . . . बाकी करोना च्या काळात २ वर्षे सलग घरी बसुन पगार घेतला तेव्हा बाकी काही आठवत नव्हते ... असो .. कही रोगांवर अजुन औषध सापडलेले नाही ...
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 05/13/2025 - 22:43

Permalink

एक प्रश्न

शस्त्रसंधी परकीय दबावामुळे करावी लागली की पाकिस्तानने विनंती केली व आपण ती मान्य केली? ज्यावेळी युद्धातील एक देश शस्त्रसंधीसाठी विनंती करतो त्यावेळी दुसरा देश काही अटी लादतो. जर आपण जिंकत होतो तर आपण ह्या शास्त्रसंधीच्या वेळेस कोणत्या अटी लादल्या? "पुन्हा असे घडले तर प्रत्युत्तर देऊ" ही काही अट होऊ शकत नाही, तसे करणे अध्याहृतच आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती .
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Tue, 05/13/2025 - 23:24

In reply to एक प्रश्न by सौन्दर्य

Permalink

मी काही जाणकार नाही पण

मी काही जाणकार नाही पण भारताने सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली होती — आमची कारवाई ही अतिरेक्यांविरोधात measured,targeted आणि परिस्थिती न चिघळवणारी (non-escalatory) असेल. ७ मेच्या रात्री भारताने अतिरेकी तळांवर कारवाई करत त्यांना यशस्वीपणे उध्वस्त केलं. याला उत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. भारताने याला उत्तर दिलं ते — लाहोरजवळील त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला करून. ८ मेच्या रात्री पुन्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला झाला. मात्र भारताने संयम राखत, प्रतिहल्ला न करता केवळ त्यांच्या ड्रोनना निष्प्रभ केलं. पण नऊ मेच्या रात्री पाकिस्तानने आणखी एक पाऊल पुढे टाकत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. यावेळी भारताने ठाम पवित्रा घेत, त्यांच्या ८ ते ९ एअर बेसच नुकसान केले. कदाचित याच क्षणी पाकिस्तानला त्यांच्या मर्यादा लक्षात आल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी तातडीने अमेरिका व इतर जागतिक शक्तींना मध्यस्थीसाठी साकडे घातले. भारताचं मूळ उद्दिष्ट अतिरेकी तळ नष्ट करणं हेच होतं — त्यामुळे पाकिस्तानकडून एकमेकांविरोधातील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्याला नकार देण्याचं कारणच नव्हतं. दरम्यान, रेडिएशन लीक संदर्भातील चर्चा सध्या माध्यमांमध्ये होत आहे. त्यामागे तथ्य किती आहे हे अद्याप स्पष्ट नाही — याचा खरा खुलासा येणारा काळच करेल. खरं कारण अजून दुसरंही असू शकत.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 05/14/2025 - 20:25

In reply to एक प्रश्न by सौन्दर्य

Permalink

माननीय पंतप्रधानांचे भाषण

माननीय पंतप्रधानांचे भाषण मिलिटरीमधल्या एका जबाबदार अधिकार्यांकडुन करवता आले नसते का? जिथे तिथे स्वतःच पुढे यायची काय गरज होती असे वाटुन गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 05/14/2025 - 20:31

In reply to माननीय पंतप्रधानांचे भाषण by कानडाऊ योगेशु

Permalink

भाषण देण हे मिलिटरी च काम

भाषण देण हे मिलिटरी च काम नाही. पाक मध्ये हे होत.एवढ्या मोठ्या संघर्षानंतर पंतप्रधानांचे भाषण देणे योग्यच होते.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 05/14/2025 - 23:05

In reply to एक प्रश्न by सौन्दर्य

Permalink

व्हान्स

"शस्त्रसंधी परकीय दबावामुळे करावी लागली की पाकिस्तानने विनंती केली व आपण ती मान्य केली?" अजुन पर्यंत तब्बल चारवेळा डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी "शस्त्रसंधी माझ्यामुळे/माझ्या सरकारने केली" असे सांगितले आहे. काल सौदी अरेबियातही त्यांनी ह्याचा पुनुरुच्चार केला. पंतप्रधान ट्रम्प ह्यांना मित्र मानत असले तरी ट्रम्प्-अमेरिका भारत-पाकिस्तानला एकाच तराजुत तोलतात असे त्यांच्या विधानावरुन दिसते. "त्या दोघांना मी व्यापार करूया,युद्ध नको असे सांगितले आहे' / ' "United States President Donald Trump on Tuesday, May 13, said that maybe India and Pakistan can have a "nice dinner together" while stating that his administration brokered the "historic ceasefire" between the two countries through trade." नाईस डिनर? हे विधान तर भारताची खिल्ली उडवणारे आहे. जगाला भारत ईतके वर्षे सांगतोय की पाकिस्तान दहशतवादी निर्यात करणारा देश आहे. ट्रम्प ह्यांना ते ठाउकही आहे पण भारताच्या भावनांना अजिबात न जुमानता ट्रम्प हे विधान करतात. "दोन्ही देशांचे प्रमुख प्रबळ आहेत" हे दुसरे विधान. २६ भारतियांची हत्या झाली त्याबद्दल पाकिस्तानला अमेरिका ऐकवेल अशी अपेक्षा होती. पण तेही नाही.थोडक्यात सरकारचे समर्थक अमेरिकेला जेवढे जवळचे मानतात तेवढी अमेरिका/ट्रम्प मानत नाही. ८ मे रोजी जे.डी.व्हान्स म्हणतात-भारत-पाकिस्तान समस्येत अमेरिकेला मधे पडायचे कारण नाही. " fighting between the two nuclear powers “fundamentally none of our business”. दोन दिवसांनी ट्रम्प 'आमच्यामुळे शस्त्रसंधी झाली" असे सांगतात. https://www.cnbctv18.com/world/us-president-donald-trump-india-pakistan-conflict-ceasefire-understanding-says-maybe-have-dinner-together-saudi-arabia-visit-19604295.htm
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on गुरुवार, 05/15/2025 - 03:19

In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

'२६ भारतियांची हत्या झाली'

२६ भारतियांची हत्या झाली हे विधान अपूर्ण आहे. माझ्या मते २६ निरपराध हिंदूंची हत्या झाली आहे. आत्तापर्यंत जे काही व जितके काही हल्ले झाले ते सर्व भारतीय नागरिकांवर झाले, त्यात हिंदू , मुस्लिम , शीख, पारशी, ख्रिश्चन सर्व आले. हा पहिलाच असा हल्ला झाला जो फक्त हिंदूंवर झाला व आपण हवा तसा प्रतिहल्ला केला नाही. हे फारच लांच्छनास्पद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 05/15/2025 - 08:34

In reply to '२६ भारतियांची हत्या झाली' by सौन्दर्य

Permalink

२६

मारले गेलेल्यात एक मुस्लिमही होता. धर्म मुद्दामून विचारला गेला जेणेकरुन भारतातील हिंदू चिडुन मुस्लिमांवर हल्ले करतील आणि 'भारतात मुस्लिमांना कसे वागवले जाते' ह्याचे पुन्हा जगभर भांडवल करता येइल हा उद्देश होता. हिंदुनाच मारायचे होते तर एखाद्या मंदिराच्या आसपास हल्ला करता आला असता. ज्या देशात ८०% हिंदु आहेत, अशावेळी जे कश्मीर फिरायला येणार, त्यातही ८०% च्या आसपास हिंदु असणार हे साहजिक आहे. एकडे मूळ मुद्दा हा आहे की अमेरिकेला भारताच्या मैत्रीची काडीचीही किंमत नाही. "भारत पाकिस्तानने एकत्र जेवायला बसावे" " मी त्यांना म्हणलय- आपण व्यापार वाढवुया" असली विधाने म्हण्जे जखमेवर मीठ चोळणारी आहेत. ह्याची प्रतिक्रिया भारतात काय येइल ह्याचा अंदाज करता न करता येण्याजोगे ट्रम्प मूर्ख नाहीत. भारत-पाकिस्तानला ते एकाच तराजूत तोलतात. आणि भारताची त्यावर प्रतिकिया यायला हवी तेवढी येत नाही. तुर्कस्तान्,अझरबेजान ह्या देशांनी पाकिस्ताची बाजु घेतली म्हणून त्या दोन्ही देशांच्या विरोधात भक्त्/समर्थक आघाडी उघडतात पण ट्रम्प अपमानास्पद बडबडले तरी 'पास' म्हणतात. ह्यापुढे अमेरिकेच्या/जगाच्या ईतिहासात अमेरिकेने मध्यस्थी करून/दम देउन 'ऑपरेशन सिंदूर थांबवले' अशी नोंद होणार आहे. कारण जेतेच ईतिहास लिहितात.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 05/15/2025 - 09:01

In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मारले गेलेल्यात एक मुस्लिमही

मारले गेलेल्यात एक मुस्लिमही होता २८ पैकी एक मुस्लिम म्हणजे फारच मोठी गोष्ट की. बरं तुम्हला नक्की माहिती आहे का तो एकतरी कसा मेला असेल. म्हणजे चुकून मध्ये आला असेल का आपल्या गिर्हाईकला वाचवायला मध्ये पडला आणि मेला? पाकिस्तान ही म्हणतंय की भारताने जो पहिला स्ट्राइक केला त्यात एक आठ वर्षाचा लहान मुलगा मेला. मग ह्याच न्यायाने भारताने लहान मुलांवर हल्ला केला असं समजणार का? पाकिस्तान तर म्हणतच आहे आणि तुम्ही पण भाजपाला विरोध करण्यासाठी म्हणाल याची खात्री आहे. बरं त्यांना फक्त हिंदूंनाच मारायचे नव्हते तर नाव का विचारली? धर्म का विचारला? कलमे का म्हणायला लावले? एका असामी हिंदू प्राध्यापकाने कलमा म्हटला तर त्याला का सोडून देण्यात आला? अतिरेक्यांना हिंदूंनाच मारायचं असतं फक्त ह्यावेळी त्यांच्याकडे वेळ होता म्हणून त्यांनी धर्म विचारलं. मोदी विरोधकांना मोदींना विरोध करता करता नक्की कुठे थांबायचे आहे समजत नाही. Op सिंदूर मध्येही मोदींना अडचणीत टाकणारे कितीतरी प्रश्न आहेत. जसे की राफेल बाबत लपवाछपवी का? अतिरेकी भारतात कसे आले त्यांना हत्यार कोणी दिली अजून का सापडत नाहीत? पण हे विचारायचं सोडून अतिरेकी कसे धर्मनिरपेक्ष होते हे सिद्ध करून काय होणार आहे? माईसाहेब, मोदींविरुद्ध तुम्हाला अजून एक मुद्दा देतो मोदींच्या भाषणात त्यांनी एकदाही पाक प्रधानमंत्री शरीफ चा उल्लेख केला नाही म्हणजे मोदी शरीफ ला घाबरले म्हणू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 05/15/2025 - 10:24

In reply to मारले गेलेल्यात एक मुस्लिमही by रात्रीचे चांदणे

Permalink

हम्म

"अतिरेकी कसे धर्मनिरपेक्ष होते हे सिद्ध करून काय होणार आहे?" असे कोण म्हणतय? ते कट्टर मुस्लिमही असतील. पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता. मूळ मुद्दा आपण ज्या अमेरिकेला मित्र मानतो त्याचे काय करायचे. ?ट्रम्प-अमेरिका भारत अमेरिकेला एकाच तराजून तोलतात हा आहे. अमेरिकेबाबत जयशंकर गप्प का? अमेरिकेला मित्र म्हणणे, नमस्ते ट्रम्प, ट्रम्प सत्तेवर आल्याने अनेकांना दु:ख झाले पण आम्ही त्यात नाही. आम्हाला आनंद झाला आहे" असे जयशंकर म्हणाले होते. ह्याच्या बदल्यात भारताला काय मिळतय? ट्रम्प शहाबाझ शरीफ ह्यांनाही 'ग्रेट लीडर' म्हणतात."युद्ध मी थांबवले" असे ट्रम्प चारवेळा म्हणतात. म्हणजे ऑपरेशन सिंदूर अमेरिकेने थांववले आणि भारताने ते मान्य केले? पाकिस्तानचे आपण निश्चित नुकसान केले पण शेवटी पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीने वरचढ ठरला असे म्हणावे लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/15/2025 - 11:11

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही

ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही असतील. पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.
त्या अतिरेक्यांच्या मुस्लिम असण्याबद्धल ठामपणा नाही पण त्यांच्या उद्देशाबद्धल भलताच ठामपणा आहे! अतिरेक्यांचा उद्देश जमेल तितके काफिर लोक भूतलावरुन नष्ट करणे होता आणि त्यांनी तो साध्य केला. यात मध्येच दंगली कुठून आल्या?
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on गुरुवार, 05/15/2025 - 11:50

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

पण त्यांचा उद्देश भारतात

पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता. ज्जे बात !! मोदी उगाच ऑपरेशन सिंदुर करत बसले. बरं त्या घटने नंतर भारतात दंगली झाल्या नाहीत याचा तुम्हाला बराच खेद झाला असेल नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 05/15/2025 - 12:27

In reply to पण त्यांचा उद्देश भारतात by सुक्या

Permalink

दंगली व्हाव्यात

दन्गली घडाव्यात म्हणून सरकार समर्थकच प्रयत्न करत होते. "मुस्लिम दुकानदारांकडुन माल विकत घेउ नका" असे उघडपणे समर्थक बोलत होते. २६ हिंदु ऐवजी १५ हिंदु आणि ११ मुस्लिम असते तर मोदींनी ऑपरेशन सिंदूर केले नसते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 05/15/2025 - 10:28

In reply to २६ by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

रशिया, चीन आणि भारतावर वचक

रशिया, चीन आणि भारतावर वचक ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. त्यामुळे त्यांनी एवढे दहशतवादी हल्ले केले तरी अमेरिका त्याकडे काना डोळा करते. पाकिस्तान ने अण्वस्त्रे मिळवली, अमेरिकेने काय केले? एवढेच कशाला ओसामा बिन लादेनला इतकी वर्षे त्यांनी आश्रय दिला त्याबद्दल अमेरिकेने काय केले? तेंव्हा अमेरिका तुमच्यासाठी काहीतरी करेल हि अपेक्षाच चूक आहे. अमेरिकेइतका स्वार्थी आणि पाताळयंत्री देश जगात दुसरा नसेल. जगभरात एकही प्रांत असा नसेल जिथे अमेरिकेने काड्या केलेल्या नाहीत. युरोपीय देश (फ्रान्स सोडून) अमेरिकेचे मांडलिक आहेत. ब्रिटन तर अमेरिकेचे ५१ राज्य असल्यासारखे आहे. हे देश आपली बाजू घेतील किंवा आपल्याला संकटात मदत करतील हि अपेक्षाच चूक आहे. आपण केवळ त्यांच्याशी व्यापारी संबंध ठेवून आहोत. दोघांना फायदा होईल असे. बस
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 05/15/2025 - 11:07

In reply to रशिया, चीन आणि भारतावर वचक by सुबोध खरे

Permalink

आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश

आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश नाही मानता येणार का? सध्याच्या foreigh पॉलिसीवर मीपवार कोणीतरी निपक्ष लिहायला पाहिजे.मीडिया सध्या उदो उदो करण्यात मग्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/15/2025 - 08:42

In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

पहलगाम येथे अतिरेक्यांनी

पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला. सुरक्षेयंत्रणात चूक झाली आणि गुप्तचरसंस्थांच्या अपयशात त्यात २६ निरपराध पर्यटक भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. आपण त्या नंतर अतिरेकी तळांवर हल्ले केले त्यात सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कार्यवाही नक्कीच होती. पण त्या नंतर पाकड्यांनी ड्रोन टाकले ते आपण निष्क्रीय केले त्याचा आनंद आहे, पण त्या बदल्यात तेव्हाच पाकिस्तानला मुहतोड करारा जवाब द्यायलाच पाहिजे होता कारण त्यांनी सीमेवर गोळीबार करुन सेल बाँम्ब टाकून आपल्या पुन्हा पंधरा सोळा भारतीयांना जीवाला मुकावे लागले. त्यात माध्यमांवर दिसणा-या दोन जुळ्या लहान मुलीची छायाचित्रे पाहुन अजून वाईट वाटलं दु;ख झालं आणि आपण त्याचा जो कडक बदला घ्यायला पाहिजे होता तो न घेता आपण शस्त्रबंधी करतो हे तितकेच दु:खद आहे. आणि नव्या सरकारकडून काही ज्या अपेक्षा होत्या त्या फोल ठरवणा-या आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि एकता अखंडतेबाबत आपण कोणाच्या तरी सांगण्यावरुन आणि व्यापाराच्या कारणांमुळे शस्त्रसंधी करतो, हा जो दावा आहे, ते अपमानास्पद वाटते. ऑपरेशन सिंदूर आपण सुरु केलं आणि थांबवण्याची घोषणा अमेरिका करते, असे कळते याचा संताप येतो. माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत. आपण भले ही तात्पूरती स्थगीती म्हणत असलो तरी, पाकिस्तानला नागडं करायची एक मोठी संधी आपण गमावली असे वाटते. आपण म्हणता ते खरं आहे. सरकार कायम अमेरिकेपुढे लोटांगन घालते ते आपल्याला आपला मित्र मानत नाही. पाकिस्तानला हल्ल्याबाबत त्यांनी सुनवायला पाहिजे होतं. काही मदत बंद करायला पाहिजे होती. आंतरराष्ट्रीय दडपण टाकायल पाहिजे होतं पण ते दिसत नाही. आपण जगभर विदेशात अनेक देशांशी संपर्क दौरे केले. पण या लहानशा युद्धात आपल्या बाजूने कोणते आणि किती देश उभे राहिले तेही या निमित्ताने दिसले. आपली आंतरराष्ट्रीय पॉलीसी, आपला व्यापार आपली प्रतिमा अजून उघडी पडली असे वाटले. आपल्या दबदब्यापेक्षा गीरे भी तो टांग उपर अशी प्रतिमा पाकिस्तानची झाली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 05/15/2025 - 09:10

In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आपण जगभर विदेशात अनेक देशांशी

आपण जगभर विदेशात अनेक देशांशी संपर्क दौरे केले. पण या लहानशा युद्धात आपल्या बाजूने कोणते आणि किती देश उभे राहिले तेही या निमित्ताने दिसले. हे जाणवले ह्या वेळी, असं वाटल की जगात आपण एकटेच आहोत. पाक च्या बाजूने चीन, अझरबैझान आणि तुर्की उभे राहिले. नक्की हे कशामुळं झालं असावं? ट्रम्प च सोडून द्या, पण युरोपीय देशांनी आपल्या बाजूने स्टेटमेंट दिल्याचे वाचले नाही. उक्रेन युद्धात आपण रशियाची बाजू घेतल्यामुळे झालं असेल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 05/15/2025 - 10:21

In reply to पहलगाम येथे अतिरेक्यांनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली,

माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत काश्मीर प्रश्न १००० वर्षे जून आहे म्हणून ट्रम्प साहेब म्हणत आहेत. कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय? "भुजबळ" लोक सर्वत्र असतातच
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/15/2025 - 11:39

In reply to माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, by सुबोध खरे

Permalink

खरंय...

कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय?
कोणी किती आत्ममग्न आणि आपल्याच आनंदात असले पाहिजे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण अचानक आपल्याला शस्त्रबंदी करावी लागली आणि त्याचं श्रेय अमेरिकेस जातंय हे सद्य विद्यमान सरकार आणि नेतृत्व सोडून सर्व जग म्हणतय. अशावेळी आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. आपण कोणासमोर झुकणार नाही झुकत नाही. आपली डॅशींग प्रतिमा होती ती घरातल्या घरात. तीचं बाहेर पितळ उघडं पडलं. भारताचा अमेरिकेशी असणारा व्यापार सुमारे एक हजार ९०० कोटी डॉलर्स इतका आहे (माहिती सौजन्य गुगल) अशा वेळी स्वाभाविकच त्याचा परिणाम दबाव दिसणारच आहे. आता आपल्या पाठीशी राहणा-शी संबंध उभे करणे, व्यापार वाढवणे, नवे मित्र बनवणे हे नवे आव्हाने असतील. काल बिहार मधील भाषणात पंतप्रधान म्हणाले की ''दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांचा पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठलाग करतील. भारताने आधीच काही सुरुवातीची पावले उचलली आहेत, जसे की पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना परत येण्यास सांगणे'' वगैरे आता हे सर्व निरुपयोगी वाटायला लागलं आहे. काल पीफोर युट्यूब वाहिन्यांवरील बंदी सरकारने मागे घेतली. आता फक्त, भारताने भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचे जे पाऊल उचलले होते ज्यात १९६० मध्ये अंतिम आणि स्वाक्षरी झालेल्या दोन्ही देशांमधील पाणीवाटपासाठी सिंधू पाणी कराराला स्थगिती दिलेली होती. आंतरराष्ट्रीय दडपणाखाली ही स्थगिती उठवतो की काय इतकंच पाहणं बाकी आहे. आणि उठवली तर तो जगप्रसिद्ध असलेल्या खयालीपुलावाचा 'माष्टरष्ट्रोक' ठरु नये एवढीच देवाधिशाला प्रार्थना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 05/15/2025 - 19:57

In reply to खरंय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काल बिहार मधील भाषणात

काल बिहार मधील भाषणात पंतप्रधान म्हणाले मी म्हटलं ना मोदी रुग्णच त्यांची भाषणं जास्त सविस्तरपणे पाहत असतात. अशावेळी आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. हायला बिरुटे सर तुम्ही राजकारणावर दुसरी पी एच डी घ्यायला सुरवात केली का? ट्रम्प एक बडबडतो आणि तम्ही डायरेक्ट आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर म्हणून विशेष टिप्पणी सुद्धा करायला लागलात. पुलं ना चपराशी अणुयुद्ध टाळण्याचा उपाय सांगतो जो अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मताशी जुळत असतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 05/16/2025 - 03:33

In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे

Permalink

खरे साहेब,

माझ्या मनात एक प्रश्न आहे. चला, ट्रम्पचे वक्त्यव्य एकवेळ बाजूला ठेऊ. पण आपण BRICKS, quad, G-20 चे खंदे पुरस्कर्ते असून सुद्धा, एकही देश आपल्याबाजूने का नाही उभा राहिला ? इस्राएल व फ्रान्सचा अपवाद वगळता. आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये का घालू शकलो नाही, त्यांचे बिलियन डॉलरचे बेल आउट पॅकेज का लांबवू (प्रलंबित ?) शकलो नाही. कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे हे सगळे बघून वाटायला लागते .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 05/16/2025 - 09:50

In reply to खरे साहेब, by सौन्दर्य

Permalink

आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट

आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये का घालू शकलो नाही, त्यांचे बिलियन डॉलरचे बेल आउट पॅकेज का लांबवू (प्रलंबित ?) शकलो नाही. अमेरिका किंवा युरोपीय देश जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पैसे पुरवतात त्याना रशियावर आणि चीनवर वर्चस्व ठेवण्यासाठी पाकिस्तान प्यादं म्हणून वापरता येतं. तेंव्हा ते भारतासारख्या देशाचं का ऐकतील? आपण आज मोठे होत असलो तरी इतके मोठे झालेलो नाही की आपल्याला नाराज ठेवणे जगाला परवडणार नाही. फ्रान्स सुद्धा आपल्या बाजूने उभा राहिला कारण आपण अमेरिकेला फाटा मारून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि इतर उत्पादने विकत घेत आहोत म्हणून. ते सुद्धा रोख पैसे मोजून. हा शुद्ध व्यवहार आहे. केवळ इस्रायल हा एक देश आपल्या बाजूने कायम उभा राहत आला आहे. याचे एकमेव कारण हे दोन्ही देश दहशवादामुळे पोळले गेलेले देश आहेत, त्यांचा शत्रू समान आहे आणि जगाच्या इतिहासात भारत हा एकमेव देश असा आहे कि जेथे ज्यू लोकांचा छळ झालेला नाही. आणि याबद्दल इस्रायल भारताबद्दल कृतज्ञ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 05/16/2025 - 18:28

In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद

शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद खरे साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Fri, 05/16/2025 - 18:59

In reply to आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट by सुबोध खरे

Permalink

तेंव्हा ते भारतासारख्या

तेंव्हा ते भारतासारख्या देशाचं का ऐकतील? युरोप आणि अमेरिकेत दहशतवादी हल्ले झाले तरच त्यांच्या लक्षात येईल. तो पर्यंत भारताच्या मदतीला दुसरा देश येईल वाटत नाही. पाकच्या मदतीला मात्र चीन, turkey असेल. शत्रूचा शत्रू म्हणून चीन पाक ला मदत करतोय तर धर्मा मुळे turkey.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/16/2025 - 06:56

In reply to काल बिहार मधील भाषणात by सुबोध खरे

Permalink

शुभेच्छा.

डॉक्टर, वाढदिवसाच्या शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 05/20/2025 - 09:33

In reply to व्हान्स by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

भारताने पाकिस्तान विरोधात

भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते. युद्धासाठी कारण ही नव्हते. भारताने फक्त पाकिस्तान येथील आतंकी मुख्यालये नष्ट केली. त्यात मसूद आजहरच्या परिवारा समेत अनेक प्रमुख आतंकी मेले. किती मेले याचे प्रमाण पाक मीडिया ने दिले त्यामुळे हा प्रश्न यावेळी कोणी विचारणार नाही. आपले मिशन पूर्ण झाले. या शिवाय अज्ञात दर महिन्यात किमान एक तरी आतंकी मारतात, ते सत्र सुरूच राहणार. पाकिस्तान ने द्रोण आणि मिसाईल हल्ला केला नसता तर पुढे युद्ध झालेच नसते. पण आपण पाक हल्ल्याचा लाभ घेऊन आपण त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केली. या शिवाय त्यांची विमान तळांवर उभी 30-50 विमाने किंवा जास्तीही नष्ट झाली असेल. आपल्या तिन्ही सैन्याने बॉर्डर क्रॉस केली नाही. त्यामुळे विमान इत्यादि पडण्याचा प्रश्नच येत नाही. युद्ध विराम हा प्रश्न भारतासाठी कधीच नव्हता. बाकी कुणाला ही माहीत नाही आपले वेगवेगळ्या ठिकान्यांचे मिसाईल हल्ले कोणत्या सैन्याने केले. एकदा बलुचिस्तान वेगळा झाला की सिंधु देश ही वेगळा होईल, पख्तून भाग अफगाणिस्तान घेईल. उरलेला पंजाब फक्त पाकिस्तान मध्ये उरेल. पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/14/2025 - 11:07

Permalink

ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय

ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय? १) एकतर पाकिस्तानला धडा शिकवणे . तो बऱ्यापैकी सध्या झाला असे म्हणता येईल. २) दुसरी गोष्ट पाकिस्तान ने दहशतवाद हा भारताचा सूड घेण्यासाठी शोधलेला स्वस्त पर्याय होता. आता पर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवून आपल्याला त्रास देत असे. पण ऑपरेशन सिंदूर मुळे हा पर्याय आता इतका महागडा झाला आहे कि पाकिस्तानला दुसरा एखादा स्वस्त उपाय शोधणे आवश्यक आहे. एक हि मारा लेकिन इतना सॉलिड मारा कि जीवनभर याद रहेगा अशी स्थिती आहे. पाकिस्तान आपल्याकडे असलेली दहशतवाद्यांची फौज मोडीत काढेल हि शक्यता नगण्य आहे कारण इतके जिहादी तरुण त्यानी निर्माण केले आहेत त्यांना कुठे तरी कामाला लावणे आवश्यक आहे. हा भस्मासुर दुसरीकडे वळवला नाही तर त्यांनाच जाळून भस्म करणार यात शंका नाही. पण आता भारतात असे दहशतवादी घुसवण्याअगोदर त्यांना नक्कीच विचार करावा लागेल. भारताने स्पष्ट सांगितले आहे कि दहशतवादी हल्ला म्हणजे भारताशी युद्ध समजले जाईल. आणि आता त्यांची हवाई संरक्षण प्रणाली इतकी खिळखिळी झाली आहे कि चीनकडे भीक मागून ती मुळापासून सुधारावी लागणार आहे. तोवर भारताला त्यांच्यावर हल्ला करणे अतिशय सोपे आहे. आणि नवीन संरक्षण प्रणाली इतकी महाग आहे कि काही लाख कोटी रुपये लागतील जे पाकिस्तानला उभे करणे अशक्य आहे. पाकिस्तान ला त्यांची बटीक होण्याशिवाय पर्याय नाही. साधी S ४०० हि प्रणाली भारताने रशिया कडून ३५ हजार कोटी रुपयात २०१६ मध्ये विकत घेतली होती. यात आकाश आकाशतीर, त्यांचे रडार इ घेऊन उभे करण्यात काही लाख कोटी रुपये लागतील. ३) पाकिस्तानने आम्ही अणुबॉम्ब टाकू अशी धमकी देणे चालवले होते . भारताने त्यांची अणवस्त्रवाहक प्रणाली सध्यातरी पार खिळखिळी केलेली आहे त्यामुळे पुढची एक दोन वर्षे तरी पाकिस्तान काही अणुबॉम्ब टाकु शकेल हि शक्यता नगण्य आहे. अर्थात असीम मुनीर सारखे त्यांचे नेते जिहादी मनोवृत्तीचे आहेत . आम्ही साफ बेचिराख झालो तरी बेहत्तर भारताला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे काही वर्षांनी हि कटकट परत उपटणार आहेच परंतु सध्या तरी त्यांना धडा शिकवलेला आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com