Skip to main content

भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?

लेखक स्वरुपसुमित यांनी शनिवार, 10/05/2025 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली. • पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले • अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला. • सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल. • अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती. आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल

वाचने 24172
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by सौन्दर्य

पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच पण त्याबरोबर रडारही उडीवले. आणि शेवटच्या दिवशी एअर बेसेस वर मिसाईल टाकले. म्हणजेच पाकिस्तानी एअर फोर्स वरचं हल्ला केला होता. पण तरीही ही कारवाई पाकिस्तानच्या ड्रोन हल्लाच्या उत्तर म्हणूनच केलेली दिसतेय. मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की हिथुन पुढचे दहशतवादी हल्ल्यांकडे युद्धाची कृती म्हणूनच बघितले जाईल. ह्या वेळी पाकडे घाबरले पण पाकिस्तानी सेने वरचा हल्ला म्हणजे जवळ जवळ युद्धच. म्हणजे त्या दृष्टीनेच आपल्याला तयारी करावी लागेल. प्रत्येक वेळी प्रत्येक मिसाईल इंटरसेप्ट केलेच जाईल याची शाश्वती नसेल. सैनिक शाहिद होतील, सामान्य नागरिकांचाही जीव जाईल. युद्धात काहीतरी उद्धीष्ट असावं लागतंय. ह्यावेळी दहशतवादी तळ उद्वस्थ करणे हे आपले उद्धीष्ट होते.आणी ते साध्यही झाले. पण युद्ध चालूच करायचं तर उद्धीष्ट कांय असेल आपलं.मला तरी वाटत नाही की POK ताब्यात घेण्याचा आपला विचार आहे किंवा ते व्यावहारिकाही आहे. त्यात POK ताब्यात घेणं म्हणजे CPEC ला धोका, म्हणजे चीनच्या गुंतवणूकीला धोका. उदा समजा चीन ने नुसत्या त्यांच्या फौजा सीमेवर जमवल्या तर आपल्यालाही त्यांना match करावे लागेल. पाकड्यांसाठी काश्मीर हे फक्त सांगायचं कारण आहे खरं तर त्यांना हिंदू शेजार नकोच आहे.

In reply to by सौन्दर्य

भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या विविध धार्मिक तोंडावळ्याच्या दहशतवादी संघटना, तालिबान या पाकिस्तान सरकार, सैनादल आणि आयएसआय यांनीच खतपाणी घालून वाढवल्यात हे सर्वांनाच माहीत आहे. मग फांद्यांवर घाव घालत बसण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे थोरल्या बाजीरावाचे धोरण आपण अवलंबत आहोत काय?

आपल्या पैकी किती लोकांचो मुंबई वर किंवा दिल्लीवर अणू बॉम्ब टाकला जाईल हि शक्यता स्वीकारण्याची तयारी आहे? युद्धखोरी सोपी असते. मुळा वर घाव घालायचा म्हणजे काय? सर्वनकष युद्ध करून पाकिस्तानची सर्वचं सर्व लष्करी ठाणी उध्वस्त करायची? असे केल्यास पाकिस्तान नक्कीच तुमच्या वर अण्वस्त्र हल्ला करेल. पाकिस्तान संपूर्ण बेचिराख होईल पण तुमची तीन चार शहरे नष्ट होऊन दोन चार कोटी लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. हि तयारी आहे का? आज लोकांना दोन महिने अर्धाच पगार मिळेल म्हणून सांगितले तर बाप मेल्यासारखे सुतकी चेहरे होतील. मग एवढे सर्वंकष युद्ध तयारी किती लोकांची असेल. आपण पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या. मुळात याचा अर्थ असा आहे कि पाकिस्तान उघडा पडला आहे आणि आता भारताने लगेच प्रतिहल्ला केला तर त्याविरुद्ध त्यांच्याकडे सक्षम अशी हवाई संरक्षण प्रणालीच अस्तित्वात नाही. हि प्रणाली आणि नष्ट झालेली विमाने परत उभी करण्यासाठी पाकिस्तानला तीन ते चार सकल उत्पन्न ( जीडीपी) खर्च करावे लागणार आहे. म्हणजेच पुढच्या चार वर्षाचे सकल उत्पन्न यात खर्च होणार आहे. या खर्चासाठी पैसे/ कर्ज कोण पुरवणार? अर्थात चीन. पण त्याबदल्यात पाकिस्तानला चीनचीच हत्यारे विकत घ्यावी लागणार. मुळात आपण आपल्या अचूक क्षेपणास्त्रे प्रणाली ने चिनी शस्त्रास्त्रे कुचकामी ठरवली आहेत. त्यामुळे हि शस्त्रे विकत घेतल्यावर पाकिस्तानी लष्करशहा कायमच भीतीखाली राहणार कि परत भारताने हल्ला केला तर हि शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाहीत. हा मानसिक आघात प्रत्यक्ष विध्वंसापेक्षा जास्त भीतीदायक असेल. एवढे असले तरी पाकिस्तान यातून फार काही सुधारेल हि आशा नाहीच. शांती मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पुढच्या युद्धाची तयारी हाच आहे. तेंव्हा आपल्याला पाकिस्तान भविष्यात काय करेल हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तजवीज करावी लागेल. इथे केवळ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला सांगितले कि आपले डावे लोक कलेवर घाला म्हणून आई मेल्यासारखे रडायला लागतात. तुर्की आणि अझरबैजान वर संपूर्ण बहिष्कार टाका म्हटले तर ५० % लोकच तयार होतात. बाकी १५ ऑगस्ट / २६ जानेवारीला गाडीवर झेंडा फडकावला कि आपली देशभक्ती सिद्ध होतेच.

In reply to by सुबोध खरे

युद्धाबाबत आपण व्यक्त केलेल्या मतांशी सहमत. >> नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या. दावे तर दोन्ही बाजूंनी केले जातात पण दोन्ही देशातील नागरिकांना त्यांचे सरकार सांगेल त्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते. अशा परिस्थितीत वरील माहिती पडताळून पाहण्याबाबत त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा मिळू शकेल का?

In reply to by स्वधर्म

भरतीय सेनेच्या पत्रकार परिषदेत वेळोवेळी त्यांणी satelite फोटो दाखवलेलेच आहेत. पण त्यावर विश्वास नसेल तर पाकिस्तानच्या वायुदलाच्या तळांचे before-and-after फोटो newyork times आणि washington post ने फोटो पब्लिश केले आहेत. ते बघू शकता. HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रानेच हल्ला चढवला ह्याचे मात्र पुरावे कुणाकडे नसतील. म्हणजे भारतीय सेनाआणि पाकिस्तानी सेना सोडून सोडून.

In reply to by रात्रीचे चांदणे

आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहेतः https://www.nytimes.com/interactive/2025/05/14/world/asia/india-pakista… त्यापैकी दोन ठिकाणे भोलारी आणि नूर खान एअर बेस असून तिथे दोन इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे. मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे. But satellite imagery indicates that while the attacks were widespread, the damage was far more contained than claimed पाकचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले असे म्हटले आहे. त्यामुळे पाकला हादरा तर नक्कीच बसला असणार. परंतु हा ११ वायुदलाच्या तळावर *जबर* हल्ला आहे किंवा नाही ते तज्ञच सांगू शकतील. तसेच आपण म्हणता तसे 'HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत.' त्यामुळे 'पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.' या दाव्याला त्रयस्थ स्त्रोताकडून आधार अपेक्षित आहे.

In reply to by स्वधर्म

मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे New york times ने कदाचित आज तक सारखे चॅनेल्स बघितले असतील. ती त्यांची चूक आहे. भारतीय सेनेची ११ में ला झालेली प्रेस ब्रिफींग परत बघा. त्यांनी कुठेही म्हंटलेल नाही की पाकी एअर बेसेस उध्वस्थ केलेत म्हणून. हल्ला केलेला आहे एवढंच सांगितलेले आहे. त्याच प्रेस मध्ये रडार साईट्स चे before -and -after satelite फोटोही दाखवले आहेत.पण त्यावर विश्वास नसेल तर ते सोडून द्या. तर washington post मध्ये त्यांणी स्पष्ट लिहिलाय की भारताने पाकिस्तानी एअर बेसेस च्या तीन हँगर्स वरती हल्ला केला. त्या वेळी किती विमाने तिथं असतील हे पाकीच सांगू शकतील. बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे. आपत्कालीन परिस्तिथी मध्ये रन वे वरती मिसाईल टाकणे आणि तो रन वे वापरता न येण्यासारखा करणे हे गंभीर कसं नसेल?

In reply to by स्वधर्म

उरी आणि बालाकोटच्या वेळी भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाया पाकिस्तानने मान्यच केल्या नव्हत्या. उरीच्या वेळी "कुत्री मारली" आणि बालाकोटमध्ये "कावळे आणि झाडं मारली" असा उपहास केला गेला. आपल्याकडूनच काही विरोधकांनीही "साबूत दिखावो" अशी मागणी केली होती. कदाचित त्या वेळी आपल्याला पुरावे गोळा करण्याची संधी नव्हती किंवा लोकं पुरावे मागतील ही कल्पना नसल्यामुळे फोटो, विडिओ काढले नसतील किंवा असलेच तरीही काही करणामुळे जाहीर केले नसतील. पण यावेळी चित्र वेगळं होतं. एक तर पाकिस्तानने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या हल्ला झाल्याचं मान्य केलं. ७ मेच्या रात्री भारताने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर त्याचं चित्रीकरण ड्रोन किंवा तत्सम माध्यमांद्वारे मुद्दामहून केलं. काही दिवसांतच त्याचे सॅटेलाईट प्रतिमा आणि before-after फोटोही सार्वजनिक केले गेले. यावेळी कारवाई इतकी मोठी आणि अचूक होती की पाकिस्तानकडून नकाराची शक्यताच उरली नाही. तर १० मेच्या हल्ल्यांचे बिफोर एन आफ्टर सॅटॅलाइट इमेजेसही दाखवल्या. मग आत्ता हे एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आलं पाहिजेची मागणी चालू केली. त्रयस्थ संस्थेने दाखवलं तर हा हल्ला जबरीच आहे हे एखाद्या expert कडूनच आलं पाहिजे आणि समजा उद्या एखाद्या भारतीय expert ने सांगितलंच तर तो त्रयस्थ असला पाहिजे ही मागणी होईल.

In reply to by रात्रीचे चांदणे

आपले समर्थन करण्याच्या फंदात पडू नका. ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे ते पुरावा मागणार नाहीत आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवायचाच नाही ते आलेला पुरावा सुद्धा सबळ नाही किंवा संदिग्ध आहे म्हणून नाकारतील. भारतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि मोदींना त्याचे श्रेय मिळेल म्हणून कित्येक मोदी द्वेष्टे लष्कराने केलेल्या मर्दुमकीबद्दल सुद्धा संशय व्यक्त करत राहतात.

In reply to by सुबोध खरे

>> 'पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.' या दाव्याला त्रयस्थ स्त्रोताकडून आधार काही आहे का ते सांगा. हे असा आधार मागावा लागतोय कारण रफालबाबत लष्कराने व संरक्षण मंत्रालयाने घेतलेली नरो वा कुंजरो ही भूमिका. बाकी मोदींच्या पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात तुम्ही डुंबत राहिलात तर आमची काही हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

https://idrw.org/satellite-images-reveals-destruction-of-american-an-tp… https://www.ssbcrack.com/2025/05/indian-air-force-dismantled-three-paki… मी तुम्हाला खरं तर एकही दुवा देणार नव्हतो कारण लष्करात एक तत्व पाळले जाते. ज्याला आवश्यकता आहे आणि त्याचंही संबंध आहे असलाच माहिती पुरवावी. (नीड टू नो बेसिस). बाकी मोदींच्या पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात तुम्ही डुंबत राहिलात याची आवश्यकता नव्हती असो

In reply to by सुबोध खरे

डॉ. तुंम्ही दिलेले दोन्ही दुवे भारतातीलच संस्थांचे आहेत. त्यातील www.ssbcrack.com ही तर सैन्यात जाण्यासाठी परिक्षांची तयारी करून घेणारी कोचिंग संस्था आहे. ती कितपत बातम्या देणारी संस्था आहे? की नुसती परिक्षार्थींना काय माहित असावे यादृष्टीने बातम्यांचे संकलन करणारी संस्था आहे? दुसरी संस्था: https://idrw.org/about-us/ ही कोणाच्या मालकीची आहे किंवा ए एफ आय हा कोणता स्त्रोत आहे, इ. काही माहिती दिसली नाही. ज्या प्रकारे ती वेबसाईट चालते किंवा तुंम्ही दिलेल्या दुव्यावरील बातमी उघडते, ते पाहता... अधिक न बोललेलेच बरे. दोन्ही स्त्रोत हे संपूर्णपणे भारतातील आहेत पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत का? जसे आपल्या सीडीएस यांनी भारतातील कोणत्याच संस्थेला मुलाखत न देता रफालबाबत ब्लूमबर्ग या आंतरराष्ट्रीय संस्थेला मुलाखत दिली, तसा काही स्त्रोत आहे का हे विचारत होतो. असो. बाकी तुंम्ही... >> कित्येक मोदी द्वेष्टे लष्कराने केलेल्या... असे लिहिल्यामुळे... >> पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात - हे आले ...

In reply to by स्वधर्म

कदाचित ह्या मुळेच आपल्या सेनेने ह्या वेळेस जास्त काळजी घेतली होती. पहिल्या दिवशी फक्त हल्लाच केला नाही तर त्याच चित्रीकरण ही केलं. पुरावे दाखवावे लागतील म्हणूनच हे केलं असण्याची शक्यता आहे.

In reply to by स्वधर्म

ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवायचाच नाही ते आलेला पुरावा सुद्धा सबळ नाही किंवा संदिग्ध आहे म्हणून नाकारतील. तेंव्हा तुम्ही हे स्वीकारा किंवा नाकारा. Pakistan's deployment of the AN/TPS-77 Multi-Role Radar (MRR) near the border with India is a strategic move to enhance air surveillance and situational awareness. This US-made radar system, capable of detecting targets up to 470 km away, is part of a broader effort by Pakistan to bolster its defense capabilities along the border, particularly in the wake of recent cross-border tensions. The TPS-77 is known for its portability and ultra-low power consumption, making it suitable for deployment in various locations. पण ज्याचा लष्करी संरक्षणाच्या डावपेचांचा अभ्यास आहे त्याला हि रडार नादुरुस्त केल्याशिवाय पाकिस्तानवर हवाई हल्ला करणे किती धोक्याचे आहे ते समजते. बाकिच्यांसाठी उत्तरदायित्वास नकार तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

https://defence.in/threads/satellite-imagery-reveals-iaf-completely-des… न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट ने दुजोरा दिल्यावरच विश्वास बसणार असेल तर तुमचं दुर्दैव.

कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व टंचाईने नागरिक हवालदिल झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तपत्रांत गेली चारपाच वर्षं येत होत्या. करोनाकाळात सरकारजवळ पुरेसा निधी नसल्याने जनतेनेच आपली स्वतःची काळजी घ्यावी, जमावबंदी वगैरे प्रकार लागू केले तर आमची आधीच कमकुवत अर्थव्यवस्था मोडूनच पडेल असं तिथल्या सरकारने जाहीर केलं होतं. बलुचिस्तान आणि अन्य दोन प्रांतातल्या सरकार वा सेनाविरोधी हल्ल्यांच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळतात. बलुचिस्तानात तर १९४८ पासूनच दडपशाही सुरू आहे. सिंध तर मधल्या काळात हातातून गेल्यातच जमा होता. जगातून येणारा बहुतेक सर्व निधी पाक सैन्य बांडगुळासारखा खाऊन बसते हे जनतेलाही समजते. आता तर भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकची हवाईदल ताकद बऱ्यापैकी ठेचली गेली आहे. इतकं होऊनही जनता सरकार/सेनादलांविरुद्ध उठाव करत नाही याचं नवल वाटतं.

In reply to by रामचंद्र

पाकिस्तानी लोकांच्या मते ही लढाई ते जिंकलेले आहेत. पाकिस्तानी फौजने त्यांना भरता पासून वाचवलेले आहे. त्यांनी आपली तीन/चार/पाच / सहा विमाने पाडली आहेत. एक S-400 उध्वस्थ केल आहे, ब्रह्मस्त्र चा स्टोरेज डेपो उडीवला आहे. उधमपूर आणि इतर दोन, तीन हवाई अड्डे बेचीरख केलेलं आहेत. आणखी एक महत्वाचा दावा म्हणजे त्यांनी आपले एक ब्रिग्रेड headquarter सुद्धा बेचीरख केलेलं आहे. Chatgpt नुसार एका ब्रिग्रेड headquarter मध्ये कमीत कमी ३००० सैनिक असतात. त्यामुळे उठाव करण्याचा प्रश्नच नाही.त्यात आपण भारतीय म्हणजे हिंदू. हिंदूंना मारणाऱ्या सेने विरुद्ध उठाव शक्यच नाही. एक वेळ उपाशी राहतील पण काफीरांना मारणाऱ्याना समर्थन करतील. पाकिस्तान चे जुने दावे कसाब सुरवातीला भारतीय होता तर कारगिल मध्ये मुजाहीद्दीनच होते. पण नंतर पाकी सैनिक होते हे मुशर्रफ ने मान्य केलेलं.

बलूच वगैरे मुक्त होऊन आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात येईल का कसे ? काही रणनिती ? -दिलीप बिरुटॅ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बलुचिस्तानला लागून पश्चिमेला इराणची सीमा आहे तर पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात अन्य प्रांत आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरशी त्याचा थेट काही संबंध येत नाही. पण पाकिस्तानातील बहुतेक सर्वच महत्त्वाचे खनिजसाठे तिथं असल्याने तो महत्त्वाचा आहे. आणि १९४८ मध्ये तिथल्या जनमताच्या विरोधात प्रचंड दडपशाही करून तो पाकिस्तानात सामील करून घेतला गेला. तेव्हापासून आजतागायत दडपशाही, विरोधक रातोरात गायब करणे इ. प्रकारच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळत असतात.

मात्र सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवण्याची भारत सरकारची अभूतपूर्व कृती चांगलीच परिणामकारक ठरताना दिसते.

शोधण्यासाठी दिवसा कंदिल घेऊन फिरावे लागेल. कितीही मान्यताप्राप्त संस्था असली तरी प्रत्यक्षात प्रत्येक संस्था आपले हित ,हितसंबंध जपते. असल्या परिस्थितीत कुठलाही देश,सरकार आपल्या त्रुटी उजागर न करता जे यश संपादन केले आहे त्याची तुतारी वाजवते. पाकिस्तान कधीच खरे चित्र जगापुढे मांडणार नाही तर तसेच भारत सुद्धा. तरीसुद्धा लोक पुरावे मागतात म्हणून सैन्याने पर्यायाने सरकार ने बरीच खबरदारी घेतली. शत्रू कितीही कमजोर असला तरी प्रतिपक्षाला थोडेफार नुकसान पोहचवतो. हे त्रिवार सत्य आहे. प्रपोगंडा हे एक प्रभावी अस्त्र सर्वच वापरतात. जसे ऋषीचे कुळ आणी नदीचे मुळ शोधू नये म्हणतात तसेच इथे पण आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही. चकमकी चालू असताना सांगितलं गेलं नाही ते एक वेळ ठीक आहे, कारण पाकिस्तान ला अजून मोठा धडा शिकवायला पाहिजे चा दबाव वाढला असता किंवा अजून काही कारण असतील. पण अजून ६ दिवसात शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या मीडियाने दिलेल्या खोट्या बातम्या. ड्रोन पाडलं असताना विमान पाडलं समजून एखादी बातमी दिली असेल तर एक वेळ समजू शकतो. पण कराची पोर्ट बेचिराख, इस्लामबाद वर तिरंगा, मुनीरला अटक सारख्या खोट्या बातम्या देऊन आपण आपलंच हंस करून घेतलंय.त्यामुळे कोणाला युद्धच्या बातम्या एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आल्या पाहिजेत असं वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही.ह्याला जबाबदार आपणच म्हणजे आपलं सरकारच आहे. आपल्याला विश्वगुरू का कांय ते व्हयचं असेल तर खोट्या बातम्या देऊन होता येणार नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

आपल्या खालील मतांशी १००% सहमत. >>शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. >>>> त्यामुळे कोणाला युद्धच्या बातम्या एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आल्या पाहिजेत असं वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही.ह्याला जबाबदार आपणच म्हणजे आपलं सरकारच आहे. परंतु त्रयस्थ संस्थांकडून माहिती विचारली, तर तुंम्ही मोदीद्वेष्टे असा दृष्टीकोन असेल तर अवघड आहे.

दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर यायला लागले आहेत. त्याकडे लक्ष द्या. https://timesofindia.indiatimes.com/india/operation-sindoor-pakistan-do… From Jyoti Malhotra to Devender Singh: 11 'Pak spies' caught in India over 3 days https://www.indiatoday.in/india/story/india-espionage-crackdown-pakista… जोवर सरकार ऑपरेशन सिंदूर संपले असे जाहीर करत नाही नाही तोवर लष्कर आपली माहिती जाहीर करणारच नाही. आपली विमाने किती आणि का पडली हे सांगून शत्रूला त्यांचे डावपेच कसे आणि कुठे बरोबर आले हे सांगण्याची काय आवश्यकता आहे? शत्रूला अधिक सबळ करण्याची आवश्यकता कशासाठी ? ताज वरील हल्ल्याचे थेट प्रक्षेपण पाहून दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील नेते त्यांना येथे मार्गदर्शन करत होते हा इतिहास बरेच लोक विसरतात ज्याला काही आवश्यकता नाही त्याला उगाच माहिती कशासाठी हवी आहे? आणि हि माहिती घेऊन आपण काय क्रांती करणार आहोत याची विरोधकानी नक्की माहिती द्यावी. चीनचे PL -१५ हे क्षेपणास्त्र पडल्यावर आपलयाला जवळजवळ सुस्थितीत हाती लागले आहे. याची विस्तृत माहिती घेऊन आपण काय करणार? त्याचे सखोल परीक्षण लष्करी तज्ज्ञ करतील उगाच सामान्य माणसाला त्याची माहिती देण्याची काय गरज आहे? युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही युद्धात झालेलं नुकसान ताबडतोब जाहीर करून शत्रूचा फायदा करून देण्यात काय हशील आहे ? कालौघात हि सर्व माहिती आपल्यालाच काय जगातील सर्व लोकांना उपलब्ध होईलच.

आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे फक्त लषकरी कार्यवाही वाटते का? पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अनेक कर्मचारयांची हकालपट्टी कशासाठी केली असावी? India expels Pakistani official, asked to leave country in 24 hours https://indianexpress.com/article/india/india-expels-pakistani-diplomat… https://timesofindia.indiatimes.com/india/india-expels-pakistani-offici… India expels another official of Pakistan High Commission The Ministry of External Affairs (MEA) said the official has been given 24 hours to leave the country. Read more at: https://www.deccanherald.com/india/india-expels-another-pakistani-offic… Pakistani spy held in Punjab for sharing sensitive information during Operation Sindoor. https://economictimes.indiatimes.com/news/india/man-held-in-punjab-for-… पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हाकलून दिलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्कात आलेल्या लोकांची कसून तपासणी चालू आहे. त्यातील कोण कोण दहशतवाद्यांच्या संपर्कात आले? पहलगाम मध्ये त्यांचा हात आहे का? आणि स्लीपर सेल्स कुठे आणि कसे कार्यरत आहेत? यात लश्कराचे लोक सामील आहेत का हि सर्व माहिती आताच लोकांना सांगायची आहे का? ज्यामुळे असे लोक अधिक सावध होतील? आपलेच उपराष्ट्रपती अन्सारी यांनी एके काळी इराण मध्ये असताना आपल्या रॉ संघटनेची माहिती तेथल्या सरकारला देऊन आपले गुप्तहेर यमसदनी पाठवले होते आणि वर भारतात मुसलमान लोकांना असुरक्षित वाटते हि हि टिप्पणी केली होती हे विसरून चालणार नाही. माहिती उघड केली कि ती कुणाच्या हाती लागेल यावर आपले कोणतेही नियंत्रण राहत नाही हे स्वीकारा

डाॅ खरे यांच्याशी सहमत. सर्व खरी परिस्थिती सांगीतली तर शत्रूपक्षाला याचा फायदा होतो. युक्रेन रशियन युद्धात परस्परांवर असेच दावे होत आहे. त्या ठिकाणी खास करून युक्रेनच्या भुमीवरून भारतीय रिपोर्टर ग्राऊंड रिपोर्टींग करत आहेत. पाकिस्तान मधे कोणी भारतीय पत्रकार गेले होते का?आणी व्हाईस अ वर्सा. विदेशी पत्रकार कशावरून निष्पक्ष आसतील असे मानायचे? परंतु त्रयस्थ संस्थांकडून माहिती विचारली, तर तुंम्ही मोदीद्वेष्टे असा दृष्टीकोन असेल तर अवघड आहे. कुठली मिडीया तटस्थ राहून रिपोर्टींग करते? कुणावर विश्वास ठेवायचा? शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. दुसरा देश हरिश्चंद्र आहे आणी कशावरून खरे बोलतोय? स्क्वाड्रन लिडर अभिनंदन पकडला नसता गेला तर पाकिस्तानने सुद्धा आमचे एफ 16 विमान पाडलेच नाही असेच दावे केले असते. संसद हल्ल्यात संसदेतील विज गेली नसती तर वेगळे चित्र दिसले असते. ट्वीन टाॅवर हल्ल्या बद्दल सुद्धा वेगळेच नॅरेटिव्ह ऐकायला मिळाले. ब्ल्यू स्टार मधे किंवा पवन सारख्या ऑपरेशन मधे किती नुकसान झाले हे सांगीतले ते खरे मानायचे का? प्रपोगंडा सामरिक नीतीचा एक भाग आहे. देशांतर्गत देश विरोधी ताकते व प्रतीपक्ष यांना सुद्धा फावते. युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही. सांगून फायदा काय? लष्करी तज्ञ आणी सरकारी यंत्रणा आपले काम करणार. निड टो नो हा गोपनीयतेचा मुलमंत्र आहे. झालेले नुकसान सांगण्यात सामान्य जनतेच्या,सैन्याच्या मनोबलावर होणारा परिणाम, देशविघातक, विरोधी तत्त्वांना होणारा फायदा लक्षात घेता बंद मुठ्ठी सवा लाख की खुल गयी तो खाक की असेच म्हणावे लागेल. युद्धात दोन्ही बाजुचे नुकसान होणारच. कुणाचे कमी कुणाचे जास्त यात शंकाच नाही तरीही प्रस्थापित सरकार ते थोडेच सांगणार आहे? झालेले नुकसान जरी सांगीतले तरी ते देशहिता साठी कसे अनिवार्य होते त्याचे जस्टिफिकेशन पण बरोबर देणार. सरकार समर्थक ते मानणार व विरोधक विरोध करणार. या चर्चा अशाच चालू राहाणार. सरकार कुणाचे ही असो अशा परिस्थितीत त्याच्यावर विश्वास ठेवणे हेच खरे.

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत. जनता ईतकी सुजाण / प्रगल्भ झाली तो दिन सोनियाचा (आज सोनियाचा दिनु) समजावा. बाकी सगळे आपापले पत्ते लपवुनच खेळतात. आपण काय , पाक काय किंवा अमेरिका काय.