Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

वाचने 48519
प्रतिक्रिया 426

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

+१

In reply to by कपिलमुनी

अगदी नेमके प्रश्न आहेत. धन्यवाद जुना दुवा शोधून इथे टाकल्याबद्दल. मिपावरील उजव्या विचारसरणीच्या व भाजपा समर्थकांचे काय म्हणणे आहे?

खरं म्हणजे उजव्या विचाराचे प्रचारक समाजात धर्माचे विष कालवत आहेत आणि सरकार विरोध करताना दिसत नाही. मागे रेल्वे सुरक्षा रक्षकाने रेल्वे प्रवाशांना असेच नावं विचारून गोळ्या घातल्या. तो कोणत्या धर्माचा होता? त्याला असे करण्याचे धैर्य कुठून आले?

In reply to by आग्या१९९०

हिंदू आणि मुस्लिम हिंसेची तुलना म्हणजे सफरचंदाची तुलना गटारात पडलेल्या सडक्या वांग्याची तुलना करण्यासारखे आहे. हे असले प्रतिसाद हाफिज सैदला वाचायला दिले तर हसून हसून मरेल तो. केवळ भाजप सत्तेत आहे आणि आपल्याला विरोधच करायचा आहे ह्यासाठीच हे असले प्रतिसाद पडत आहेत. गांधींच्या जावयालही ह्यावेळी सुद्धा मुस्लिम भावनांची पर्वा आहे.

कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.

In reply to by रात्रीचे चांदणे

कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.
अहो त्यांनी आधीच सांगायला सुरु केलंय. अर्थात ते हिंदू नाहीतच, केवळ हिंदू नावाची आयडी घेऊन इथे वावरतात.

In reply to by रात्रीचे चांदणे

काश्मीरमध्ये पोट भरण्यासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. तिथे सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंची शेती आणि गालिचे तसेच अनंतनाग-श्रीनगर मार्गावर क्रिकेटच्या बॅट बनविणे हे इतर मुख्य उद्योग आहेत. त्यात किती लोकांची पोटे भरतात याची कल्पना नाही. पण बहुतांश लोक पर्यटनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत हे नक्की. कालच्या घटनेमुळे काश्मीरात पर्यटनावर परीणाम होणारच आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या पोटावर पाय येणार आहे. जो काही आक्रोश दिसत आहे तो त्यामुळे आहे. पर्यटकांनी काश्मीरला जाणे बंद केले तर ते लोक भीकेला लागतील. ते त्यांना समजले आहे म्हणून तो आक्रोश आहे असे मला तरी वाटते. त्यावर फार विश्वास ठेवायची गरज नाही. जर का खरोखरच ते लोक इतके माणुसकीचे आणि सद्गुणांचे पुतळे असते तर मुळात काश्मीरी पंडितांना तिथून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागलेच नसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कसं करायचं आता ? काश्मिर पर्यटन कायमचं भारत सरकारने बंद करावे म्हणता काय ? =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील. मी कायमच मोदी सरकार विरुद्ध भूमिका मांडत असतो असं सांगितलं असत तरी त्यांनी मारलंच असत.

In reply to by रात्रीचे चांदणे

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील. +१ आपली सुरक्षा अमित शहा, अजित डोभाल, मोदी अश्या लोकांच्या हातात आहे हे लक्षात आले की काश्मीरकडे जाणारी पावले आपोआप थबकतील!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. नाहीतर ग्राहमंत्र्यांनीच सांगितलं होत फाटत होती म्हणून. तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही पाहिजे. आपल्या पैसे आपल्या विरुद्ध वापरत असतील. ते दहश्तवादी मारले गेले तर परत जणांज्याला गर्दी करतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. छान विनोद! सगळी इभ्रत गेली तरीही अजीन फेल गेलेल्या लोकांच्या आरत्या ओवाळणे चालूच आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही सरळ सांगा ना, ३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही म्हणून. आणि अनेक वर्ष तेथे पर्यटन नव्हते म्हणून त्यांचे खायचे हाल झाले आणि खंगून मेले असे काही झाले नाही.

In reply to by आग्या१९९०

३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही कारण ह्यांचे लक्ष फक्त फोडाफोडी , तोड्यापण्या, सेटलमेंट, इडी सोडून पक्ष भरती, विदेशात पर्यटन, अदाणीसाठी डील करणे, पक्ष फोडणे, गद्दार शोधणे, पैसे चारून आमदार फोडणे, हिंदी लादणे ह्यावरच आहे. देशाची सुरक्षा वगैरे पाहणे असल्या फायदा नसलेल्या गोष्टीत कशाला मोदी शहा लक्ष घालतील?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कश्मीरी हातात दगड घेऊन भारत सरकारचा विरोध करीत होते आता नव्या पिढीला भारत हा आपला वाटतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून कन्याकुमारी पासून पर्यटक आता काश्मीर मधे येतो तेव्हा गेल्या काही वर्षात पर्यटन रोजगार हा वाढलेला दिसतो आत्ता त्यांच्या मनात आपण आणि भारतातील सर्व एकच आहोत असे ते काश्मिरी म्हणत आहेत, तेही भावनिक होत आहेत अशा वेळी म्हणे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते असे म्हणत आहे अशी विकृती आता माध्यमातून पसरवली जात आहे, याचाच दुसरा अर्थ असा आहे की जम्मू काश्मीर हा यांचा राजकीय धंदा आहे, दूसरे काहीही नाही, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडा वेळ राजकीय धंद्या साठी विरोध होते हे खरं मानलं तरीही आपला जीव धोक्यात घालून कशाला काश्मिरात जायला पाहिजे? ५ तर काश्मिरीच दहशतवादी होते म्हणून सांगत आहेत. म्हणजे मारणारे तिथलेच स्थानिक होते. गोव्यातले टॅक्सी वाले लुटतात म्हणून social मीडिया वर ban गोवा म्हणून ट्रेंड चालू होता. हिथे तर थेट जीव जायचीच भीती. बाकी ज्याला जायचंय त्यांनी कलमा पाठ करून जायला हरकत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे तर जोरजोरात गायत्री मंत्रा म्हटला तरी कुणी हू का चू करायला नको, पण कुचकामी लोकांच्या हातात देश असल्याने अतिरेकी येऊन गोळ्या मारून निघूनही जातात.

जर तुम्ही या घटनेत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींबद्दल विचारले, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रॉ (संशोधन आणि विश्लेषण विंग), आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले, तर तुम्हाला देशद्रोही ठरवणार. आपण उंदीर मारण्याचा विभागात असलो तरी आपल्याला एक मत देण्याचा हक्क आहे म्हणजे आपण कुणालाही काहीही विचारायला मोकळे झालो. बढिया है ! जरा सबुरीने आपल्या डोक्यातील द्वेष भावना बाजूला ठेवून विचार करा आणि मग प्रश्न विचारा. पार्श्वभूमी काय? काय कारण झाले असेल? आजतागायत अमरनाथ यात्रा सोडली तर सहजासहजी पर्यटकांवर हल्ला होत नव्हता मग आताच असा का झाला याचा विचार करा? उचलला कळफलक आणि बडवला असे भुजबळांसारखे करू नका. जगभरात एक हल्ला होतो तेंव्हा असे ९९ हल्ले परतवले किंवा थांबवलेले असतात. गुप्तचर यंत्रणांना अपयश का आले असेल याचे विश्लेषण करू द्या. कर्करोगाचा इलाज करताना १०० % लोक बरे होणारच हे गृहीत धरून एखादा दुर्दैवाने दगावला कि लगेच डॉक्टरची अक्कल आणि अनुभव काढून त्याने लोभीपणासाठीच रुग्णाला मारला असे आरोप करणाऱ्या अतिशहाण्यात आणि तुमच्या फार फरक दिसत नाही

केवळ आठवड्यापूर्वी विवाह करून काश्मीरला मधुचंद्रासाठी आलेल्या या तरूण निष्पाप मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या निष्पाप पतीला क्रूर डुकरांनी गोळ्या घालून ठार मारले. पतीच्या मृतदेहाशेजारी बसून अश्रू ढाळणाऱ्या या दुर्दैवी निष्पाप मुलीचे प्रकाशचित्र पाहून मनात कालवाकालव झाली आणि नि:शब्द झालो. प्रभू श्रीरामांनी हा आघात सोसण्याचे धैर्य या निष्पाप तरूणीला व तिच्या आणि तिच्या पतीच्या कुटुंबियांना द्यावे व त्याला विनाकारण ठार मारणाऱ्या या क्रूर डुकरांचा नाश करावा अशी प्रार्थना करतो. या विश्वातील सर्वांनाच सद्बुद्धी मिळो ही सदिच्छा.

In reply to by कपिलमुनी

दहशतवाद्यांना धर्म, राष्ट्रीयत्व इ. सर्व काही असते. विनाकारण त्याकडे डोळेझाक करून फक्त स्वत:चीच फसवणूक होते. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसेच वस्तुस्थिती कितीही नाकारली तरीही वस्तुस्थितीचे परीणाम भोगावेच लागतात.

In reply to by श्रीगुरुजी

दहशतवादाला धर्माशी जोडणे अयोग्य; अमित शहा यांचे प्रतिपादन आपले गृहमंत्री ही भूमिका २०२२ पासून मांडत आहेत. म्हणजे गुरुजींच्या म्हणण्यानुसार ते स्वतःची आणि आपली फसवणूक करत आहेत.

In reply to by कपिलमुनी

काश्मिरात दहशतवाद्यांनी नाव विचारलं असताना नाहीतर कलमा का काय म्हणायला सांगितलं असत म्हणजे समजलं असतं दहशतवादाला कोणता धर्म असतो ते.

In reply to by रात्रीचे चांदणे

तुम्ही सत्य नाकारू शकता, पण सत्याचे परीणाम टाळू शकत नाही. अमित शाहंचे सोयिस्कर शब्द उचलून नाचणाऱ्यांसाठी त्यांचे अजून काही विचार - - The BJP doesn't believe in vote-bank politics. We believe India is above everything. - BJP has never done politics on religion, and no one should do it. It is against the spirit of our Constitution. - Millions of infiltrators have entered our country and are eating the country like termites. Should we not uproot them? - Kejriwal's only mantra is to tell lies and talk forcefully and repeatedly, but Delhi cannot develop with telling lies. - Those who carry out anti-national activities should be put in jail. आशा आहे की अमित शाहंचे हे विचार सुद्धा मान्य असतील.

वादळ येत आहे हे स्पष्ट दिसत असूनही शहामृग वाळूत डोके खुपसून बसतो. तसंच आजवर, अगदी या क्षणापर्यंत, ढोंगी निधर्मांध वागताहेत.

- १२ मार्च १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी मुंबईत दुपारी बरोबर नमाज पढण्याच्या वेळेत बॉम्बस्फोट होईल अशी वेळ लावून १२ बॉम्बस्फोट केले ज्यात सुमारे ३०० जण ठार झाले ज्यात बहुतांशी हिंदू होते. - १४ ऑगस्ट १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी किश्तवाडमध्ये बसमधील १७ हिंदूंना वेगळे काढून ठार मारले. - १ जानेवारी २०२३ या दिवशी राजौरी भागात आधारपत्र तपासून ७ हिंदूंना ठार मारले. - ५ जानेवारी १९९६ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी १६ हिंदूंना ठार मारले. - १९ जून १९९८ डोडा: हिंदू लग्नसोहळ्यात ३ नवरदेवांसहीत २९ हिंदूंची हत्या - २००२: हिंदूंच्या अक्षरधाम मंदिरात ३२ हिंदूंची हत्या - २३ जानेवारी १९९८: वंदहामा गावात २९ काश्मिरी पंडीत ठार मारले. - २७ जुलै १९९८: श्रवण गावात २० हिंदूंची हत्या - १ ऑगस्ट २०००: २९ अमरनाथ यात्रेकरूंना ठार मारले - २३ मार्च २००३: २४ काश्मिरी पंडीत मारले. - ३० एप्रिल २००६: बसंतगड व डोडा: २९ हिंदूंची हत्या ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.

In reply to by श्रीगुरुजी

कसे मारतील आणि काँग्रेसमधील कोण त्याला जोड्याने मारणार? काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना? रॉबर्ट वाड्रा ते बोलला. काँग्रेसमधील इतर लोक जे बोलले नाहीत त्यांना पण तसेच वाटत असणार याची अगदी पूर्ण खात्री आहे. मग कोण ते करणार आणि कसे?

In reply to by श्रीगुरुजी

आदीमातेचे जावई आहेत ते. त्यांना कोण मारणार? कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा.

In reply to by सुक्या

कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा. नुपूर शर्माची हकालपट्टी करणाऱ्या पक्षाने ती खरं की खोटं बोलली म्हणून पक्षाचे प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली होती? की त्या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत?

काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना? आज सर्वपक्षीय बैठक आहे, त्यावेळी काँग्रेसची अधिकृत भूमिका कळेल. कशाला घाई करता?

In reply to by सुक्या

सुक्या, कशाला असल्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांचे महत्व वाढवत आहात?

In reply to by सुक्या

सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका व बाहेर आल्यावर एकदम विरूद्ध भूमिका हे कॉंग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण माहिती नाही का?

हे काश्मिरी पंडित ज्यू लोकांसारखी एखादी संघटना उभी करून लढत का नाहीत? कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय?

In reply to by आग्या१९९०

कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय? अच्छा! असे आहे होय, सर्व सुविधा मिळताहेत वरून सहानुभूतीपण. मज्जा आहे. म्हणूनच परत जात नाहीत, आले लक्षात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नक्कीच! टिकटॉकवर भारतात बंदी केल्यावर चीनच्या अर्थव्यवस्थेने डोळेच मिटले होते.

In reply to by कपिलमुनी

सहमत आहे! परदेशात असे काही घडले तर तिथले गृहमंत्री, पंतप्रधान राजीनामा देतात, भारतात नीतिमत्ता नावाचा प्रकार आहे की नाही?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचा वरील प्रतिसाद वाचून, तुमची "कीव" वाटते... तुमचे विदुषकी प्रतिसाद वाचून निदान करमणूक तरी होत होती. पण आता तुमच्या मानसिकतेची कीव वाटते. असो... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

काहीतरी काय. इतके अभ्यासपूर्ण, विद्वत्ताप्रचुर, माहितीपूर्ण प्रतिसाद इतर कोणी देतात का? ११ सप्टेंबरनंतर धाकट्या बुशनी राजीनामा दिला होता. २६/११ नंतर मनमोहन सिंगांनी राजीनामा दिला होता. १२ मार्चनंतर शरद पवारांनी राजीनामा दिला होता. विलासराव देशमुखांनी तर अनेकदा राजीनामा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

व्यक्ती द्वेष इतका अंगात भिनला आहे की त्यांची बौद्धिक वाटचाल आता "जयचंदी" होत आहे.... "लवकर बरे व्हा." असेही म्हणता येत नाही .... "नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे..." हीच त्यांची मानसिकता... महाभारत आणि रामायण न वाचल्याचे परिणाम आहेत...

In reply to by मुक्त विहारि

बौद्धिक वाटचालीसाठी थोडी तरी बुद्धी असावी लागते. कशातलंच काहीच समजत नाही. मग सर्व काही समजत असल्याचा आव आणून वारंवार हसू होतंय हे कसे समजणार?

In reply to by श्रीगुरुजी

https://www.france24.com/en/20081130-indias-home-minister-national-secu… २००८ हल्ल्यानंतर नीतिमत्ता असलेल्या शिवराजसिंह पाटील आणी रहस्त्रीय सुरक्षा सल्लागार m k narayanan ह्यांनी राजीनामे टेकवले होते, आज अमित शहा आणी अजित डोव्हाल हे राजीनामे टेकवतील का? देशाची अब्रू जेवढी घालवायची तेवढी घालवून झाली आहे, आता तरी ज्या दोघांनी राजीनामे देऊन देशाची उरली सुरली इभ्रत वाचू द्यावी.