Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

वाचने 48534
प्रतिक्रिया 426

प्रतिक्रिया

वक्फ बिल जेंव्हा JPC कडे refer केलं होत त्यावेळीही विरोधकांनी भाजपने ऐनवेळी शेपूट घातलं म्हणून टीका केली होती. आता मंजूर झालं तर एकतर पुचाट आहे म्हणून टीका करत आहेत आणि त्याचवेळी त्याला विरोधही करत आहेत. काश्मिरच्या ३७० कलमावेळीही तेच झालं. कधी हटवणार आणि हटवूच शकणार नाही म्हणणाऱ्यांना समजलं ही नाही. तीच गोष्ट राम मंदिराची, तारीख नाही बातेयेंगे म्हणणारे मंदिराच्या उद्घाटनालाही नाही आले. वक्फ बिलाचा प्रवासही योग्य दिशेनेच चालू आहे अस समजायला वाव आहे.महत्त्वाचं म्हणजे पाक मधूनही ह्यावर टीका होते म्हणजे चमलच असणार. २०१४ नंतर हळू हळू का होईना भारतातील दहशतवादी हल्ले कमी झालेत, काश्मीरही कधी नाही ते शांत झालंय. खुद्द राहुल गांधीची तिरंगा यात्रा काश्मिरात गेली, नाहीतर काँग्रेसच्या गृहमंत्र्यांची काश्मिरात जायला फाटत होती हे त्यांनी स्वत कबूल केलंय. याच श्रेय भाजपा बरोबर अजित दोवाल यांनाही द्यायला पाहिजे. बाकी पन्नुन केस मध्ये समजा अपयश आलं आहे अस समजलं तरी हरकत नाही.देशात विविध ठिकाणी होणाऱ्या बॉम्बस्फोटापेक्षा आणि आपल्याच देशातील शहरात जाण्यास घाबरणाऱ्या कालखंडापेक्षा हे पन्नून च्या केस मधले तथाकथित अपयश कधीही चांगले.

In reply to by रात्रीचे चांदणे

निज्जर प्रकरणातही भारताची मान खाली गेली असे काहीतरी येथले नेहमीचेच कलाकार बरळत होते. पण त्या प्रकरणात भारताचा हात नाही हे कॅनडाच्याच गुप्तचर खात्याने मान्य केले आणि विनाकारण भारताशी वाकड्यात गेलेल्या ट्रुडोला धोपटी गुंडाळून निघून जावे लागले.

खुद्द राहुल गांधीची तिरंगा यात्रा काश्मिरात गेली राहूल गांधी देशात कुठेही जायला घाबरत नाही अगदी मणिपूरलासुद्धा ! ३७० कलम काढल्यावर पळून गेलेले काश्मिरी पंडित परतले का?

मणिपूरची परिस्थिती नक्कीच चांगली नाही,केंद्र सरकार तिथे अपयशीच ठरले आहे. काश्मिरची परिस्थिती सुधारली आहे हे विरोधकही मान्य करत आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

काश्मिरची परिस्थिती सुधारली आहे हे विरोधकही मान्य करत आहेत. मग काश्मिरी पंडित का परत जात नाहीत?

In reply to by आग्या१९९०

कशाला जातील. मुस्लिम शेजार कोणाला पाहिजे? प्रत्येक शुक्रवारी घाबरून रहावे लागेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

मुस्लिम शेजार कोणाला पाहिजे? प्रत्येक शुक्रवारी घाबरून रहावे लागेल एकीकडे काश्मिरात परिस्थिती नॉर्मल झाली म्हणता आणि दुसरीकडे शेजाऱ्यांची भीती वाटते म्हणता. नक्की काय?

In reply to by आग्या१९९०

काश्मीर मधील परिस्थिती सुधारली ही मी काश्मीर मधीलच पहिल्या परिस्थिती बरोबर तुलना करून म्हटलेले आहे.काश्मिरची तुलना इतर भागाशी करणे शक्य नाही. तरीही गुरुजींनी दिलेल्या लिंक नुसार तरी काही पंडित तरी परत काश्मिरात जात आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

केंद्र सरकार तिथे अपयशीच ठरले आहे राज्य सरकारने काय दिवे लावले हे जगजाहीर असल्याने केंद्राने घाबरून राष्ट्रपती राजवट लावली. डबल इंजिन फेल गेले मणिपूरमध्ये.

बांगलादेशात हिंदू-ख्रिश्चनांचा पद्धतशीर छळ: हिंदू नेत्याच्या हत्येवर भारताची तीव्र प्रतिक्रिया बांगलादेशमध्ये एका हिंदू नेत्याच्या अपहरण आणि हत्येवर भारताने शनिवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला 'हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे' आवाहन केले. भारतातील केंद्र सरकार, जे पश्चिम बंगालातील हिंदूंना वाचवू शकत नाही, (२०२१ साली सुद्धा वाचवू शकले नव्हते) ते बांगलादेशाचा निषेध करतंय! बेशरमपणाची हद्द आहे!

In reply to by वामन देशमुख

भारतातील केंद्र सरकार, जे पश्चिम बंगालातील हिंदूंना वाचवू शकत नाही इथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे हे काम नोव्हे!

In reply to by वामन देशमुख

हिंदूंना वाचवण्यासाठी सरकार आहे हा भ्रम आहे, देशाची मालमत्ता मित्रांना विकण्यासाठी आहे हे सरकार.

In reply to by आग्या१९९०

हिंदूंना वाचवण्यासाठी सरकार आहे हा भ्रम आहे,
सहमत
देशाची मालमत्ता मित्रांना विकण्यासाठी आहे हे सरकार.
इतर सरकारांच्या तुलनेत खुप कमीच

In reply to by वामन देशमुख

इतर सरकारांच्या तुलनेत खुप कमीच खरंय. गेल्या १० वर्षात सरकारी उद्योगांची निर्गुंतवणूक करताना दमछाक होताना दिसत आहे. विकायलाही अक्कल लागते.

जज लोया यांचा मृत्यू आठवतच असेल. कारवान नावाच्या एका भिकार चोपड्यातुन एक टुकार कथा मांडली गेली. जज लोया यांची बहीण हा त्या कथेचा स्रोत सांगितला गेला. निरंजन टकले नावाच्या कोणा इसमाने जज लोया यांचा खून झाल्यासारखे निष्कर्ष मानले. तसंच लोया यांना रिक्षेतून इस्पितळात नेलं गेलं आणि ज्या इस्पितळात नेलं गेलं तिकडे अद्ययावत सुविधाही नव्हत्या वगैरे वगैरे काय काय त्यात आलं. पुढे टाईम्स असेल व इंडियन एक्सप्रेस यांनी हा सगळ्या आरोपांची चिरफाड केली आणि असं काही झालं नसल्याचे पुरावे मांडले. तरीही कारवान नावाच्या एका भिकार चोपड्यातल्या टुकार कथेला प्रमाण मानत लिब्रान्डू जमात सुप्रीम कोर्टाच्या दारात हजर झाली. एक तर ज्या व्यक्तीच्या हवाल्याने तो अहवाल आला होता ती व्यक्ती नॉट रिचेबल झाली होती. आणि कॅराव्हॅन असो वा अगदी बीबीसी आणि न्ययॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट, मीडियातील रिपोर्ट हा संपूर्णपणे 'ऐकीव पुरावा' मानला जातो, म्हणजे पेपरात खून झाल्याचं छापून आलं म्हणून कोणी कोर्टात जायचं नसतं. तरीही या ऐकीव माहितीवर आधारित लिब्रान्डू पब्लिक कोर्टात गोळा झालं. टाहो फोडून त्यांनी अमित शहांनी लोयांचा खून केलाय आणि या प्रकरणाचा तपास व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. भारतीय माध्यमांच्या इतिहासातलं ते एक अत्यंत अभूतपूर्व पान होतं. सुप्रीम कोर्टाने ते टराटरा फाडलं. कोर्टाने निव्वळ या मूर्ख बातमीवर विश्वास ठेवायला नकार तर दिलाच, पण शिवाय हा पुरावा ऐकीव असेल तर प्रत्यक्ष त्या प्रसंगांच्या साक्षीदार व्यक्ती कोर्टात साक्ष देण्यास हजर होत्या. लोया एकटेच नव्हते तर ते ज्या लग्नसमारंभात गेले होते त्यात बरोबर सात की आठ न्यायाधीश आणि न्यायमूर्ती होते. त्यातल्या एका न्यायमूर्तींनी सगळा वृत्तांत सांगितला. संपूर्ण प्रकरणात ते लोयांच्या बरोबर होते. लोयांना गाडीतून हॉस्पिटलात तेच घेऊन गेले होते आणि तिकडे सुविधा होत्या. तेंव्हा ऐकीव माहितीवर आधारित याचिका विरुद्ध आपल्याच क्षेत्रातल्या प्रत्यक्षदर्शींची मतं यात अर्थातच कोर्टाने न्यायमूर्तींचं म्हणणं उचलून धरलं. आपल्याच गाडीतून आपण घेऊन गेलो आणि ऍडमिट केलं हा आणि पुढचा समग्र इतिवृत्तांत घडला तसा सांगणारे न्यायमूर्ती होते न्या. भूषण गवई. आज त्यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली. - adv सौरभ गणपत्ये

In reply to by सुबोध खरे

द वीक नावाच्या साप्ताहिकाने टकल्याचा सावरकरांना शिव्या देणारा लेख प्रसिद्ध केल्यासाठी जाहीर माफी मागितली होती. याच टकल्याने लोयांचा खून झाला असा आरोप करणारे पुस्तक लिहून कॉंग्रेसच्या अधिवेशनात विकायला ठेवले होते. परंतु एकही प्रत विकली न गेल्याने एक चित्रफीत प्रसिद्ध करून कॉंग्रेसींना शिव्या हासडल्या होत्या.

In reply to by सुबोध खरे

डाव्या वाळवीची इकोसिस्टम अशी काम करते.‌ दुर्दैवाने वर्षानुवर्ष सत्तेत राहूनही उजव्यांना स्वतःची इकोसिस्टम अजूनही तयार करता आलेली नाहीये.‌

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा सगळा टपस ह्या गणपत्या ने केला का? काहीही काल्पनिक कथा लिहितोय! भुजबळ बुवा टंकन करण्याच्या पूर्वी वाचत आणि विचार करत चला. न्या. लोया केस मध्ये आपण ठिकठिकाणी किती भंपक मुक्ताफळे उधळली आहेत ते मिपा वर अजूनही शाबूत आहे. तसंही लोक आपल्याला सिरियसली घेतच नाहीत. पण तरीही विचार करून पहा

In reply to by सुबोध खरे

माझ सोडा हो! ह्या गणपत्या सारख्या हवेत लाथा तर नाहीना झाडल्या मी? काल्पनिक कथा रचून? काही पुरावे आहे का ह्याच्याकडे? तसेही व्हॉट्सअपवर काहीही लिहायला नी ढकलायला पुरावे लागत नाहीत. पण तुम्ही त्याची ती ढकलगाडी इथे आणून ओतलीत! काही पुरावे आहेत का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तसंही लोक आपल्याला सिरियसली घेतच नाहीत. मी तर नाहीच नाही तेंव्हा तुमचं वैचारिक मैथुन चालू द्या

In reply to by सुबोध खरे

Judge B.H. Loya died of natural causes three years ago and there is "absolutely no merit" in the public interest litigation (PIL) petitions alleging foul play in his death, the Supreme Court concluded on Thursday. The Supreme Court foreclosed any future questions on Judge Loya's demise , saying its verdict spelt the end of any further litigation on the circumstances surrounding his death. A Bench of Chief Justice of India (CJI) Dipak Misra and Justices A.M. Khanwilkar and D.Y. Chandrachud based its conclusion on three aspects: One, the "indisputable" written statements given by the four judges and colleagues of Judge Loya to the Maharashtra police; two, there is nothing wrong when friends and colleagues share the same room at the guest house, Ravi Bhawan; and three, Judge Loya had called his wife on November 30, 2014, telling her he was staying at Ravi Bhawan. The statements by the judges were made to the police, which launched a "discreet enquiry" in 2017 after articles appeared in a magazine raising suspicions about Judge Loya's death in Nagpur in November 2014. https://www.thehindu.com/news/national/judge-loya-death-no-foul-play-sa… भुजबळ बुवा हे तुमच्या साठी नाहीच हे सारासार विचार करु शकणाऱ्या लोकांसाठी आहे. तेंव्हा तुमचं चालू द्या !

In reply to by सुबोध खरे

इथे त्या गणपत्याची अंधभक्तांसाठी असलेली पुचाट कथेची ढकलगाडी येऊन रीती केली नी आता प्रश्न विचारल्यावर काढता पाय घेताय? मिपा म्हणजे अंधभक्तांचा व्हॉट्सअप समूह समजलात का? बाकी तुमी काढता पे घेणार वाटले नव्हते. जा जा सुखी रहा पुढल्या वेळी ढकलगाडी ओतण्याआधी सावध रहा असा सल्ला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इथे त्या गणपत्याची अंधभक्तांसाठी असलेली पुचाट कथेची ढकलगाडी येऊन रीती केली... ...मिपा म्हणजे अंधभक्तांचा व्हॉट्सअप समूह समजलात का?
कोणती ढकलगाडी? कसलं व्हॉट्सअप? काहीतरी तारतम्य ठेवून बोला. तुम्हाला लोक नाहीतरी सिरियअली घेतच नाहीत. आतातर तुमची कीवही करत नाहीत, सरळ दुर्लक्ष करतात.

In reply to by वामन देशमुख

वर काय लिहिलय ते तरी पूर्ण वाचा! इतकी काय घाई लगेच टंकायची, बाकी दोन चार अंधभक्तानी पळ काढला, “म्हणजे सिरियस घेत नाहीत ब्वा” असे डायलॉग तुमच्या कडेच ठेवा.

इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने परवा एक निकाल दिला- जी व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला येते तिलाच स्त्री असे स्वतःला म्हणवून घेता येईल- अर्थात पुरूषांची स्त्री झालेल्या ट्रान्सजेंडरांना आपण स्त्री असल्याचा दावा करता येणार नाही. त्याविरोधात लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/trans-rights-now-londons-p… मला वाटते सगळीकडे पुढील नियम अंमलात आणावेत- १. प्रत्येकाला आपण किती टक्के स्त्री आणि किती टक्के पुरूष आहोत हे ठरवायचे स्वातंत्र्य द्यावे- म्हणजे ७८%-२२% अशाप्रकारचे. २. या टक्केवारीत कधीही बदल करायची परवानगी देण्यात यावी. म्हणजे जिथेजिथे स्त्री म्हणवून घेणे फायदेशीर असेल तिथे तिथे प्रत्येकाला स्त्री म्हणवून घ्यायचा अधिकार असला पाहिजे. ३. सरकारने यासाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित करावे. त्यावर एक स्क्रोल बार असावा आणि तो पाहिजे तिकडे आणि पाहिजे तसा हलवून ही टक्केवारी बदलायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे. ४. कोणीही आपण अमुक इतके टक्के स्त्री आणि अमुक इतके टक्के पुरूष आहोत असा दावा केला तर त्याला कोणताही प्रश्न विचारायची परवानगी कोणालाही नसायला हवी. एखाद्याने १२%-८८% असे आकडे दिले तर कशावरून १२%-८८%? मला तर तू साडे-अकरा टक्के आणि साडे सत्यांशी टक्के वाटत आहेस असे म्हटले तर ती व्यक्तीस्वातंत्र्याची सगळ्यात मोठी पायमल्ली धरली जाऊन अशी पायमल्ली करणार्‍याला ताबडतोब फासावर लटकविण्यात यावे. बाकी आता गोर्‍यांमधील डापु गँगचे लोक 'every man has a right to call himself a woman and every woman has a right to call herself a man' असल्या फुकाच्या गोष्टींवरून उड्या मारत आहेत त्यांनी फार तर २५-३० वर्षे थांबावे. एकदा इंग्लंडमध्ये शरीयाचे राज्य आले की मग कोणाला किती आणि कोणते अधिकार आहेत ते त्यांना लगेच समजून येईल. असो.

काश्मीर राज्यातील पहलगाम येथे (बहुदा इस्लामिस्ट) दहशतवाद्यांनी, पर्यटकांची ओळखपत्रे पाहून व इतर प्रकारे ओळख पटवून फक्त गैर-मुस्लिम पर्यटकांना ठार मारले आहे. पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री इतर राजकीय पुढार्‍यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.‌ संदर्भ: https://www.opindia.com/2025/04/pants-pulled-down-id-cards-checked-hind…

In reply to by वामन देशमुख

भारतीय प्रजासत्ताक नामक जमिनीच्या तुकड्याची वेगाने काफिरमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे. --- खोटं वाटतंय? अहो या हल्ल्यातच पाच-सात काफिर संपले की!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

घडवून मुस्लिमविरोधी वातावरण निवडणूक जिंकायचा गावठी चाणक्याची सुपिक आयडिया? पुलवामाही
संपादक महोदय, असले प्रतिसाद वारंवार देऊनही हा आय.डी मिपावर अजून का ठेवला का जात आहे? सदर सदस्याचे म्हणणे दिसत आहे की हा हल्ला सरकारने घडवून आणला आहे. असले काही या संकेतस्थळावर राहून देऊन आपण स्वतःही कदाचित अडचणीत येऊ शकाल याचे भान तुम्हाला असावे इतकीच माफक अपेक्षा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माफ करा चानसुकू साहेब, पण असे हल्ले देशात घडतातच कसे? नी ह्याबाबतीत सरकारवर टीका केली तर आयडी उडवा अशी मागणी करणे मला योग्य वाटत नाही? म्हणजे तुमचे म्हणणे आहे की सरकार हल्ले रोखायला अयशस्वी ठरले तर सरकारवर टीकाही करू नये का? तुमचे भाजपप्रेम समजू शकतो पण पर्यटकांचा जीव गेला त्याचे काय? की मरुद्या पर्यटक पण भाजप सरकारला जाब विचारू नाक किंवा टीका करू नका असे तुमचे म्हणणे आहे? दरवर्षी काश्मीरवर ३५-४० हजार करोड खर्च होतात, आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की पंचस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी २००km आत आले! हे शक्य वाटत नाही, पुलवामाचे सत्य अजून बाहेर आले नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ बा या भीषण हल्ल्यानंतर ही मोदी द्वेषाची गरळ ओकणं तुला जास्त महत्वाचे वाटते .. तुझ्यासारखी ****** मिपावर नकोच

In reply to by अमर विश्वास

अमर विश्वास! ह्या भीषण हल्ल्यानंतर मोदीप्रेमची उबळ सुटणे तुला जास्त महत्वाचे वाटते? अमर विश्वास! ह्या भीषण हल्ल्यानंतर मोदीप्रेमची उबळ सुटणे तुला जास्त महत्वाचे वाटते? हल्ला कसा झाला? ह्याबद्दल खुर्च्या उबवणाऱ्या सरकारला जाबही विचारू नये? अंधभक्तांचा कसा तिळपापड होतोय बघा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जाब विचार ना ... पण हे सरकारने घडवून आणले असा सूर का ? आणि मी कधी मोदींची बाजू घेतली ? या हल्यानंतर मोदींचा बचाव करणारी एकतरी कमेंट दाखव ... उगाच स्वतःचा द्वेष लपविण्यासाठी इतरांना दोष देऊ नकोस ..

In reply to by अमर विश्वास

पण हे सरकारने घडवून आणले असा सूर का ?>>>> असा सूर कुठे आहे? प्रश्न विचारूच नये का? असे प्रश्न प्रत्येक हल्ल्यानंतर विचारले जातात, सरकारवर टीका करणे प्रश्न विचारणे चूक कसे? लोकशाही आहे की हुकूमशाही? सरकार अपयशी ठरले तर आम्ही काही लिहू किंवा बोलूही नये? का तर तुमचे भाजप सरकार आहे म्हणून?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

का तर तुमचे भाजप सरकार आहे म्हणून? >>>>>> तर हे भारताचे सरकार नाही ... तर आमच्या भाजपाचे सरकार आहे .. Get well soon

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सरकारवर टीका केली म्हणून? वर काय लिहिले आहे ते जरा वाचायचे कष्ट घ्या- हा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे असा तो म्हणण्याचा रोख आहे. सरकारवर टीका म्हणजे काय? हा हल्ला होऊच कसा शकला, कोणतेच इंटेलिजेन्स इनपुट्स नव्हते का, कुठे चूक झाली, त्यावर सरकार काय करणार आहे असे प्रश्न विचारणे. असे प्रश्न विचारायला कोणाचीच ना नाही. मला पण ते सगळे प्रश्न पडले होते. मात्र तुम्ही वर जे काही लिहिले आहे ती सरकारवर टीका नाही तर सरकारनेच तो हल्ला मुद्दामून घडवून आणला असे सूचित करणे झाले. तो आरोप झाला. टीका आणि आरोप या दोन्ही गोष्टी सारख्याच का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चानसुकू साहेब मी प्रश्नचिन्ह दिले आहेत. असेही होऊ शकते का? किंवा कसे? मी कुठेही हा हल्ला सरकारनेच घडवला असे ठामपणे म्हटलेले नाही. तसेच आता सरकारला प्रश्न विचारणेही तुम्हाला चालत नसेल तर मग तुमचा आदर ठेवून मी इथे काहीही लिहीत नाही. धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सरकारवर टीका म्हणजे काय? हा हल्ला होऊच कसा शकला, कोणतेच इंटेलिजेन्स इनपुट्स नव्हते का, कुठे चूक झाली, त्यावर सरकार काय करणार आहे असे प्रश्न विचारणे. असे प्रश्न विचारायला कोणाचीच ना नाही. मला पण ते सगळे प्रश्न पडले होते. मात्र तुम्ही वर जे काही लिहिले आहे ती सरकारवर टीका नाही तर सरकारनेच तो हल्ला मुद्दामून घडवून आणला असे सूचित करणे झाले. तो आरोप झाला. टीका आणि आरोप या दोन्ही गोष्टी सारख्याच का?
दुर्दैवाने सहमत. सरकारच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे, सरकार हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरले आहे हे म्हणणे अगदी योग्य आहे आणि त्याला कुणाची ना असणार नाही. पण हा हल्ला या सरकारनेच घडवून आणला आहे, आधीचाही असा हल्ला या सरकारनेच घडवून आणला होता असे म्हणणे हे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्याही पलीकडचे आहे. दुर्दैवाने, तणकट वेळीच उपटून न टाकल्याने ही जमात मिपावरही फोफावत आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जैशेमहम्मद संघटनेने दहशतवादी हल्ला करून ४० सैनिक मारल्यानंतर, हौ इज द जैश (हौ इज द जोश या वाक्याची टिंगल) असे ट्विट कुत्सित हसणारा चेहराचित्र टाकून मुग्धा कर्णिक व अनेक मोदीद्वेषींनी केले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे मोदींना शिव्या द्यायची संधी मिळाली याचा अपार आनंद त्यांना झाला होता. नंतर प्रचंड टीका झाल्याने घाबरगुंडी उडून ट्विट डिलीट करून धूम ठोकली होती. त्या सर्वांना कालच्या दहशतवादी हल्ल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. हा सदस्य त्याच नालायक जातकुळीतला आहे. गलिच्छ लेखनामुळे अनेकदा हकालपट्टी होऊनही याला परत परत आणले जाते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुंबई हल्ल्या नंतरही अशाच प्रवृत्ती बाहेर आल्या होत्या. मुंबई हल्ला हा हिंदूंनीच केला होता असं पाकडे म्हणतं होते तर भारतातील काही लोक त्याला दुजोराही देत होते. नशीब कसाब जिवंत पकडला गेलेला.

In reply to by रात्रीचे चांदणे

मुंबई हल्ला संघाने केला अश्या टाइपचे पुस्तक प्रकाशित करणारा कृपाशंकर आज भाजपात आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संपादक महोदय, असले प्रतिसाद वारंवार देऊनही हा आय.डी मिपावर अजून का ठेवला का जात आहे? हा विकृत प्रतिसाद आता दिसत नाही. पुन्हा वेगळ्या शब्दात येईलच. विकृती मरत नसते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

३५-४० हजार करोड वार्षीक खर्च काश्मीर सुरक्षेवर होतो तरीही अतिरेकी येतातच कसे? भुजबळ बुवा एकदा काश्मीर मध्ये जाऊन पहा. तेथे लष्कर कसे गोट्या खेळतंय किंवा दारूच्या पार्ट्या करतंय ते. त्यांना काय पडलं आहे? काही पर्यटक मेले तर मेले. नाही तरी गुप्तचर खातं, लष्कर, काश्मीरचे राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याच्यानं काही होण्यातलं नाही आता तुम्ही स्वतः च जाऊन काही केलं तर शक्य आहे. आमची कळकळीची विनंती आहे तुम्हीच आता हे मनावर घ्या आणि थेट पहलगामला जाऊन त्या अतिरेक्यांची लंबे करून या!

In reply to by सुबोध खरे

डॉक साहेब, लष्कराला कुणी दोष दिलाच नाहिये, लष्कर आहे म्हणून काश्मीर आज माझ्या भारतात आहे नाहीतर नालायक राजकारण्यांनी काश्मीरही पाकिस्तानला दिले असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असं कसं ? साडे तीन लाख लष्करी आणि निमलष्करी सैनिक काश्मीर मध्ये तैनात असताना दहशतवादी येतातच कसे? सगळे युसलेस आहेत बघा आता तुम्हीच प्रकरण हाती घ्या आणि काही तरी करा हि कळकळीची वनंती

In reply to by सुबोध खरे

डबल ढोलकी प्रकार आहे हा. मुळात असली ब्याद काही झाले तरी माझेच म्हणणे खरे, बघा मी सांगितलेच होते असल्या बाता करत असतात. हेच लोक जेव्हा जास्त मिलीटरी असते तेव्हा "कश्मिर ला तुरुंग बनवले आहे. सगळ्यावर संशयाने पाहिले जात आहे. मिलिटरी राहीली तर लोकशाही कशी रुजणार" वगेरे वगेरे बोंबलत असतात. आता मिलिटरी कमी केली तर "हे झालेच कसे? ईतकी सुरक्षा होती तर हे भारतीय ईंटेलिजन्स चे अपयश आहे." वगेरे वगेरे बोंबलताहेत. भारतीय मिलिटरी आपले काम चोख करत आहे. वेळ आली की बरोबर फैसला करते. त्यावर काहीही शंका नाही. अबा मागेच कुठल्यातरी धाग्यावर पादत्राणे / फोन ठेवायला मोठा राऊंड मारावा लागला तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली कुरकुर करत होते. कश्मिरात सैनिक कुठे कुठे व कशा कशा परीस्थीतीत राऊंड मारते हे त्यांना ठाऊकही नसेल. तस्मात. फाट्यावर मारा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कुठल्या राज्यात निवडणुका येताहेत सध्या? अतिरेकी येउन गोळ्या मारून निघून जातात, ३५-४० हजार करोड वार्षीक खर्च काश्मीर सुरक्षेवर होतो तरीही अतिरेकी येतातच कसे? की अतिरेकी हल्ला घडवून मुस्लिमविरोधी वातावरण निवडणूक जिंकायचा गावठी चाणक्याची सुपिक आयडिया? पुलवामाही निवडणूक तोंडावरच घडला (की घडवला? ) गेला होता.
संपादक मंडळ, शत्रूला मदत करणारी असली विधाने करणारी प्रवृत्ती मिपावर असणे हे योग्य नाही. तात्काळ कायमची कारवाई करावी ही विनंती. --- कुण्या हिंदू राजाने घौरी कि कुणा एका दरोडेखोराला अनेक वेळा माफी क्षमा केली होती, घौरीने मात्र संधी मिळाल्यावर त्या राजाला एकदाही क्षमा केली नाही. सादर आयडीला मिपाने अनेकदा क्षमा केली आहे. यापुढेही करायची आहे का हे ठरवावे. --- हिंदूंचे लष्कर या हल्ल्याचा बदल घेईल यात शंका नाही.

In reply to by वामन देशमुख

सरकारवर टीका केली किनलहेच अंधभक्ताना मिरची लागते, संपादक मंडळाला विनंती की मिपा हा असल्या मनुवाद्यांचा अड्डा बनवण्याचा डाव उधळून लावावा व मनुवादी विचारसरणीच्या वामन देशमख ह्या आयडीला कडक समाज द्यावा.

In reply to by वामन देशमुख

सरकारवर टीका केली कि लगेच अंधभक्ताना मिरची लागते, संपादक मंडळाला विनंती की मिपा हा असल्या मनुवाद्यांचा अड्डा बनवण्याचा डाव उधळून लावावा व मनुवादी विचारसरणीच्या वामन देशमख ह्या आयडीला कडक समाज द्यावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अतिरेक्यांनी उपस्थित पर्यटकांची ओळखपत्रे पाहून, लिंगनिदान करून, व्यवस्थित ओळख पटवून केवळ काफिर लोकांना निवडून, त्यांना कुराणाच्या आयती म्हणायला लावून ठार मारले आहे. दुर्दैवाने तुम्ही तिथे असता तुम्ही तुमची काय ओळख सांगितली असती? मनुवादी? जय बीम जय मीम? ततफफ? फुरोगामी? आणि त्याने तुमची सुटका झाली असती?

फारच वाईट घटना. ह्यानंतर पर्यटक कशाला काश्मिरात जातील. खरं तर काश्मिरात फिरायला गेलंच नाही पाहिजे.

धोंडा मारून घेत आहेत. पर्यटक नाही तर उपाशी मरतील. पर्यटकांनी फक्त अमरनाथ यात्रेवर संपुर्ण बहिष्कार टाकला तर यांचे डोके ठिकाणावर येईल. नाही आले तर उपाशी मरतील. २०२२ मधे आठ लाख यात्रेकरू व तिन हजार कोटींची अर्थिक उलाढाल. प्रती यात्री साधारण साठ ते सत्तर हजार रूपये. बाकी खरेदी अलग.

दहशतवाद्यांनी २७ हिंदूंना ठार मारले आहे. अत्यंत वाईट व संतापजनक हल्ला आहे. भारताने लवकरात लवकर प्रतिहल्ला करून व्याजासहीत सूड घ्यावा, तोयबाच्या मसूद अझर आणि इतरांना ठार मारावे, पाकव्याप्त काश्मीरमधील मोक्याची शिखरे भारतात सामील करावी.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, सूड घ्यायला आपण १९७५ सालात नाही तर २०२५ सालात आहोत, जास्तीत जास्त आपण कडी निंदास्त्र वापरू शकतो.

सुसुने कालच्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला न म्हणता गोळीबाराची घटना म्हटले आहे. साहजिकच आहे. नवल वाटत नाही.

असा दहशतवादी हल्ला झाला की नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना मनापासून आनंद होतो. मोदींना, भाजपला झोडपायला मस्त संधी मिळाल्याने त्यांचे भान हरपते. अश्या हल्यांमागे एक समान सूत्र दिसते. जानेवारी २००० मध्ये क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना श्रीनगरमध्ये ३५ शिखांना दहशतवाद्यांनी मारले होते. २०२० मध्ये ट्रंप भारत दौऱ्यावर असताना दिल्लीत सीएए कायदाविरोधात शाहीनबाग येथे दंगल करून त्यात ५५ नागरिक गेले होते. २०२५ अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स भारत दौऱ्यावर असताना हा दहशतवादी हल्ला केला आहे. प्रत्येक वेळी हल्यानंतर पाकिस्तानप्रेमींना प्रचंड आनंद होतो व लगेच भाजपला आणि पंतप्रधानांना सामूहिक प्रारंभ होतो. मिपावर प्रारंभ झालाच आहे. राऊतच्या डोक्यातली विकृती बाहेर आली आहे. आता टोमणेबाई, पेंग्विन, सुसु तयारीत असतीलच. वागळे, चौधरी, परूळेकर, सरोदे इ. पार्टी करीत असणार. विकृतीचा महापूर येणार. मिपावरील ठराविक सदस्य आता बिळातून बाहेर येऊन भान हरपून नाचणार. सुरूवात झाली आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरूजी आम्हाला आनंद झालेला नाही तर संताप आलाय, सरकारला प्रश्न विचारणे ह्यात काहीही चूक नाही. हा हल्ला रोखायला सरकार अपयशी ठरले हे खोटे का? लोकांनी प्रश्नही विचारू नये का? काँग्रेस काळात हल्ले झाले तेव्हाही सरकारवर टीका झाली होती काहिनी राजीनामेही दिले होते. ( आज राऊतनी राजीनामा मागितला तर ती विकृती ठरवली तुम्ही) पण पूर्वी सरकार नी जनतेत अंधभक्त नावाची ढाल नव्हती जी आता दिसू लागलीय. एकाच गोष्ट नम्रपणे सांगेन आपण आदरणीय आहात देशप्रेमी बना अंधभक्त नको.

दहशतवाद्यांनी भारताची सीमा अवैधरित्या ओलांडली आणि देशात घुसखोरी केली. त्यांनी बंदुकी आणि शस्त्रास्त्रांसह एका लोकप्रिय आणि अतिशय गर्दीच्या पर्यटनस्थळावर प्रवेश केला, ते पोलिस आणि मिलिटरी च्या वेशात आले होते. जिथे त्यांनी निष्पाप लोकांना धर्माच्या आधारावर लक्ष्य केले आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली. या भयंकर कृत्यानंतरही ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पळून जाण्यात यशस्वी झाले, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना पकडण्यात कोणालाही यश आले नाही. त्या ठिकाणी मदत उशिरा पोचली..अशा गंभीर घटनेनंतरही कोणीही सरकारवर प्रश्न उपस्थित करू नये, असे का अपेक्षित आहे? त्याऐवजी, आपण सर्वांनी ‘सरकार करारा जबाब देईल’ या भविष्यातील कृतीवर आधारित सरकारचे आणि त्याच्या नेत्यांचे गुणगान करत बसायचे .जर तुम्ही या घटनेत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींबद्दल विचारले, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रॉ (संशोधन आणि विश्लेषण विंग), आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले, तर तुम्हाला देशद्रोही ठरवणार. कारण, सरकार आणि त्यांच्या यंत्रणांवर प्रश्न विचारणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समर्पणावर शंका घेणे आहे अशी लोकांची समजूत करून दिली आहे. एक भारतीय म्हणून , हिंदू म्हणून आपण दहशतवादाविरुद्ध एकत्र आहोतच पण हा हल्ला सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि नेतृत्व यांचे अपयश आहे . हे सत्य स्वीकारण्यात कमीपणा नसावा. इतर पक्ष सत्तेत असताना ते त्यांचे अपयश होते हे यांचे अपयश आहे. एक भारतीय म्हणून मला या हल्ल्याचे दुःख वाटते आणि अतिरेक्यांवर व त्यांच्या मालकांवर तशीच कारवाई व्हावी अशी इच्छा आहे

In reply to by कपिलमुनी

सहमत आहे. मीपावरील अंधभक्ताना सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते आधीच तयारीने बसले होते आता मैदानात उतरलेत.

मिपावरील ठराविक सदस्य आता बिळातून बाहेर येऊन भान हरपून नाचणार. हे वर लिहिले आहे. अजून काही नेहमीच्याच यशस्वी कलाकारांची प्रतीक्षा आहे.