राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात. चॅट गिपीटीने स्लो लर्नर व्याख्येमध्ये नेमके कुणाला इनक्लुड करायचे, असा प्रश्न विचारत १० ते १५ % अशी आकडेवारी आणि कारणांची विवीधता वर्णन केली.
माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले.
पण बर्याचदा म्हणणे सोपे असते जे ठरवले ते मनात इच्छा असूनही घडत नाही. साधारणतः कोविडच्या काळात आमच्या सोसायटीच्या दुकानांमध्ये एक दुधाचे दुकान होते. त्यांचा मृदू सालस मुलगाही स्लोलर्न आहे. एकदा त्याला खाण्यासाठी काय आवडते विचारल्या नंतर उपमा म्हणाला आणि त्या नंतर प्रत्येक भेटीत काका माझ्यासाठी उपमा आणलात का असे आवर्जून विचारायचा. भूक नसलेल्यांनाही मी काय कमी आग्रहाने खाऊ घालतो? पण मनात इच्छा असूनही या भाबड्यासाठी अद्याप मला उपमा पोचवण्याचा मुहुर्त लागलाच नाही. भाबडीच्याही नशिबी
असो, विषय भाबडीच्या आईच्या जाण्याचा होता. गेले दोन दिवस माझे मन गलबलले होते. कन्फर्मेशनसाठी डॉक्टर अजून यायचेच होते. भाबडी रडायला लागलेली तशी डॉक्टर येऊन बघतील असे अटेंडंट लेडीने तिला सांगितले तशी 'तुम्ही मला बरे वाटावे म्हणून खोटे बोलताय माहितिये मला आईचा श्वास चालत नाहीए" दोन वर्षांपुर्वी बाबा गेले तेव्हाही मी खूप रडले पण आई मुळीच रडली नव्हती म्हणत क्षणार्धात तिने स्वत:ला सावरले देखिल. अटेंडंट लेडीकडे बघत 'आईनी सांगितलय ती तिची मोठी मुलगी आणि मी धाकटी, आता मी या ताईकडेच रहाणार, हो ना ग ताई?' असे म्हणत आमच्या मनातील प्रश्नाला तीने अल्प विराम दिला, अंत्य संस्काराच्या वेळी भाबडीच्या भविष्याबाबत तसाच प्लान असल्याचे आणि खर्च ते स्वतः उचलणार असल्याचे सांगत तिच्या आत्यांच्या यजमानांनी माझ्या मनातल्या प्रश्नांना विराम देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही वय पहाता माझ्या मनातील प्रश्नांच्या रांगेसाठी तो स्वल्पच म्हणावा लागेल.
मी माझ्या मागच्या लेखात माझ्या वयस्कर डॉक्टर मामाचा उल्लेख केला होता. महिनाभरा पुर्वीच्या भेटीत मी त्यांना दिवाळीला पुण्याला येण्याची गळ घातली होती, अपेक्षा ही की हैदराबादेस एकटे रहाण्याचा अट्टाहास सोडून ते त्यांच्या पुण्यातील मुलीजवळ येऊन रहाण्यास त्यांचे मन वळवता येईल. पण भाबडीवरची हि वेळ बघे पर्यंत, सजीव प्रेमी हॅबीटाटचे महत्व सांगतात ते मला कितीकदा ऐकुनही उमजले नव्हते. आता मी मामांना त्यांचे घर सोडून पुण्याला येण्याचा आग्रह पुन्हा नक्कीच करणार नाही.
एनीवेज कुणाच्या मृत्यूने किंवा गेलेल्याच्या आठवणीने गलबलले मन शांत नाही झाले की मी परिसरातल्या महादेव मंदिराचा रस्ता पकडतो तसा आजच्या रामप्रहरी मी महादेवाच्या मंदिराकडे प्रस्थान केले. माझा जीव शिवाचा वेध घेत असताना, मंदिराच्या गेट बाहेर फुटपाथवरच एक कुटूंब लहानग्यांसहीत झोपलेले दिसले, म्हटले जीवा शिवाचे अंतर अद्याप खूपच बाकी आहे.
-अपूर्ण
* १ २
* लेख सदरातील हे लेख लेखन खरे म्हणजे स्वतःसाठीच अधिक आहे, कुठे काही न पटल्यास माफ करा पण ह्या लेखनावर इतरांची ओपीनीयन्स मागवत नाही आहे. त्यामुळे जज करणार्या प्रतिसादांना टाळल्यास त्यापासून वाचवल्यास आणि खासकरून धागा हायजॅक करणार्या विशेषत: अनुषंगिक नसलेल्या आणि आधीच होऊन गेलेल्या चर्चा, शुद्धलेखन चर्चा टाळल्यास अंमळ आभारी असेन.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखन वाचत आहे.
लेखन माझे स्वतःचे कि एआय वापरून केलेले?
Interesting example of Turing
प्राडॉ सर भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत
आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे
नमस्कार...
हा हा..
सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न.
व्यक्तिगत उदाहरणे, संदर्भ
I told you. =))))
आजच्या काळातील ती महिला
बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे
माझे लेखन एआय निर्मित
होय.तुमच्या लेखात कितीतरी
अजून तरी एआयला नैसर्गिक