Skip to main content

अदानी,उर्जा आणि अमेरिका

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 22/11/2024 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत. आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत. अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती. In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump." ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.

वाचने 22706
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदी अगदी. तुमचे प्रतिसाद मनोरंजक असतात, हे तुम्हीच मान्य केले हे उत्तम... बाय द वे, हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?

साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे? प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात

In reply to by संजय खांडेकर

जगभर उर्जा आणि संरक्षण कंत्राटे लाच दिल्याशिवाय मंजूर केली जात नाहीत हे सर्वाना माहित आहे. सहसा ह्या व्यवहारांचे पुरावे ठेवले जात नाहीत. इकडे पुरावे मिळाले आहेत. एन्रॉन प्रकल्पाला मंजूरी देताना मातोश्री आणि पार्टी विथ डिफ्रन्सवाल्यानी हात धुवुन घेतले होते.

In reply to by संजय खांडेकर

साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे? नोटाबंदी काळा पैसा आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी केली होती एका भाबड्या बाळानी , त्याला जाब विचारण्यासाठी आपल्या अंगी बळ येवो. ते आले की या इकडे काय म्हणते ते बाळ हे सांगायला.

In reply to by आग्या१९९०

यासाठीच पुढे लिहिले आहे "प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात" कोणताही व्यवसाय हा लाच दिल्या / घेतल्याशिवाय होऊ शकत नाही हे दुपारच्या सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, जे कोणी भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतात ते स्वतः जास्त भ्रष्टाचार करतात आणि जे गरिबी हटवण्याच्या गप्पा करतात ते फक्त स्वजनांचीच गरिबी हटवतात हे प्रांजळपणे कबूल करण्यास आपली ना नसावी. माझ्या वैम नुसार वरपासून खालपर्यंत प्रत्येक सत्ताकारणी हे शेणातील किडेच आहेत, आणि हे किडे पक्षातीत आहेत , आयते शेण संपल्यावर हे किडे एकमेकांचे शेण देखील आनंदाने खातात.

In reply to by संजय खांडेकर

प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात. वाह ! नंबर एक. -दिलीप बिरुटे

In reply to by अनन्त अवधुत

सकाळ्ची मालकी पवार कुटुंबियांकडे आहे. प्रताप पवार हे जाणत्या राजाचे धाकटे बंधू.निबंध लिहिल्यासारख लेख लिहिला आहे.

अकबर बिरबलाचा एक किस्सा होता आता नीट आठवत नाही पण त्याचे सार असे होते कि बिरबल अकबराला पटवुन देतो कि तू जरी राजा असला तरी खरे राज्य हे व्यापारी चालवतात.सध्याच्या काळात राष्ट्रप्रमुख वा पंतप्रधान त्या त्या राष्ट्राच्या सरकारी संस्थांना एका मर्यादेनंतर प्रमोट करु शकत नाही तेव्हा अदानी अंबानी सारख्या उद्योजकांना पुढे करुन जिथे सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करु शकत नाही तिथे असे प्रकल्प वगैरे घेतले जातात. इवन स्वातंत्र्यपूर्व काळात व त स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टाटा बिर्ला सारख्या उद्योजकांवर त्याकाळच्या नेत्यांचा विश्वास होता. आणि त्यांचा वापर करुनच भारताच्या अनेक आता अभिमानास्पद समजल्या जाणार्या प्रोजेक्टची पायाभरणी झाली होती.प्रत्येक सरकारच्या काळात त्या त्या सरकारशी निष्ठा ठेवणार्या उद्योजकांना नेहेमीच प्राथमिकता मिळाली आहे.प्रताप पवारांना हे नक्कीच माहीती असावे.

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. हे अमेरिकेला हि माहिती आहे. त्यांच्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात अनेक वर्षे आहेत. त्यामुळे हे काय आणि कसे चालते हे त्यांना व्यवस्थित माहिती असते. केवळ भारत सरकारला कात्रित पकडण्यासाठी हे अदानीचे लाच देण्याचे प्रकरण काढलेले आहे. परंतु त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे अडणींचे समभाग परत वर आले यावरून सिद्ध झालेले आहे. राफेल राफेल, चौकीदार चोर आहे सारखे अदानी अदानी घोषणा होतील आणि हवेत विरून जातील. यातील काहीही श्री मोदींना चिकटत नाही आणि त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप काही जनतेला मान्य होत नाहीत त्यामुळे विरोधकांचा कायम पोटशूळ उठलेला असतो. तो काही २०२९ पर्यंत (बहुधा २०३४ पर्यंत) शमणार नाही. तेंव्हा करा जे करायचे ते

In reply to by सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?

In reply to by सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते काय करत आले आहे? घटनेच्या ४४ व्य कलमात लिहिलेले असूनही गेली ७५ वर्षे समान नागरी कायदा का आला नाही? भुजबळ बुवा उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा

In reply to by सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :) उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले. माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती. आयरणीच्या देवा:)

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे नी वरून इतरानी टंकलेले भंपक म्हणायचे. वाव!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा मी भ्रष्टाचाराचे समर्थन कुठे केलेले आहे ते दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. माझ्या प्रतिसादात नसलेला अर्थ काढू नका उगाच फालतू बडबड करण्यापेक्षा हे दाखवून द्या अन्यथा आपली निरर्थक बडबड बंद करा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. हे सत्य आहे यात समर्थन कुठे आहे? वेश्याव्यवसाय जगभर चालतो हे सत्य आहे याचा अर्थ ते समर्थन आहे असा अर्थ तुम्ही काढत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावी लागेल. साधारण पणे मी कुणाची अक्कल काढत नाही परंतु आपण मला तसे करणे भाग पाडता आहात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एखादे सत्य लिहिणे हे त्याचे समर्थन आहे असा अर्थ आपण काढत असाल तर आपल्या अकलेची कीव करावी लागेल.

In reply to by सुबोध खरे

इंदिरा गांधी की राजीव गांधी नी corruption is a global phenomenon ase म्हटले होते . त्यांनी सत्तच सांगितले होते तेव्हा ते भ्रष्टाचराबाबत समर्थन करतात असे म्हटले गेले होते

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो? बहुदा दिल्या / घेतल्या गेलेल्या लाचेतील आपला वाटा गोळा करून आपल्या खात्याच्या मंत्र्याकडे अतिरिक्त (ठरलेल्या तक्त्या / टारगेट व्यतिरिक्त ) रक्कम पोहोचवण्यासाठी असावा. लाचलुचपत विभाग नक्की कधी कारवाई करू शकतो? फक्त संशयावरून करतो / करू शकतो का ज्याच्या कडून लाच मागितली आहे अशा किंवा ज्याला जबरदस्तीने लाच दिली जात आहे अशा व्यक्तीच्या तक्रारीनंतरच कारवाई करता येते? माफ करा पण अज्ञान आणि अभ्यासाचा कंटाळा असल्यामुळे अशा शंका येतात आणि मिपा वर सर्व दीर्घ / लघु शंकाचे निराकरण होते म्हणून विचारले.

In reply to by सुबोध खरे

बोफोर्स मध्येही काही सापडले नाही. विरोधी पक्षांचे कामच आहे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे. त्यामुळे सत्ता येतेच भविष्यात.

In reply to by आग्या१९९०

घाईघाईने क्वात्रोकीमामाला भारतातून बाहेर काढून सुखरूप इटलीला पाठवून दिलं, स्वीडन सरकारला पत्र लिहून बोफोर्स प्रकरणाचा तपास लांबणीवर टाकण्यास सांगितले, मामाच्या गोठविलेल्या खात्यातील ४० लक्ष डॉलर्स आपल्या कळसूत्री बाहुल्याला सांगून मुक्त केले, अर्जेंटिनाने पकडल्यानंतर न्यायालयाला व सर्व देशाला अंधारात ठेवून आपल्या सरकारमधील मंत्री पाठवून त्याला सोडविण्याची व्यवस्था केली. काहीच सापडलं नव्हतं तर इतकी लबाडी का केली होती?

In reply to by श्रीगुरुजी

विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव. टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही. विरोधी पक्षाचे कामच आहे कसेही करून आपले अस्तित्व टिकवून ठेवणे.

In reply to by आग्या१९९०

विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव पुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले. टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही. सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? २००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. २०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या.

In reply to by श्रीगुरुजी

तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ? पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .

In reply to by आग्या१९९०

आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ? याची कारणे आधीच लिहिली आहेत. त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले . कोणी नुकसान शून्य मान्य केले? सिब्बलने की न्यायालयाने? शून्य नुकसान होते तर मग आधीचे खिरापतरूपी वाटप रद्द करून लिलाव करूनच तरंगलहरी द्याव्या हा आदेश न्यायालयाने का दिला? ७,५०० कोटी आणि १,००,०००+ कोटी हे दोन्ही आकडे सारखेच का?

अदानी हिरवी ऊर्जा नावाचा समभाग आज ४८ रुपे पडलाय. आदानीचे अजून नुकसान व्हावे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकदे चोहिकडे :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आदानीचे अजून नुकसान व्हावे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. ---
आज ४८ रुपे
रुपे ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी पेमंट सेवा आहे. मीही तिचा लाभ घेतो. इथे जाहिरात केल्याबद्धल आभार.

भुजबळ बुवा तुमच्या शहरात सी एन जी २ रुपयाने महाग झालाय त्याची चिंता करा. अदानी कुठे? तुम्ही कुठे?

In reply to by सुबोध खरे

आता वसुली सरकार येणार असल्याने, वसुलीदेखील झपाट्याने होणार ते माहित असल्याने असे २ रुपये वाढतीलच. पण आपला मालक १ नंबर श्रीमंत करायचा शेटचा डाव फेल जातोय ते आनंद काय वर्नावा?? :)

देशातील नामवंत उद्योगपती वटवृक्षा सारखे. असंख्य कुटुंबाचे आधार. देशाचा अर्थीक कणा, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. यांच्या चॅरिटेबल संस्थांमुळे कित्येक गरजूंचे मदतनीस. आपल्यासारखे सामान्य लोकांनी कितीही कळफलक बडवला तरी त्यांच्या ढुंगणाला खबर नसते.. केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे. हे म्हणजे अकलेचे तारे तोडण्या सारखे. सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.

In reply to by कर्नलतपस्वी

देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.
देशातील काही नेत्यांपासून ते निरनिराळ्या संस्थळांवर कार्यरत असणारे त्यांचे IT cell हेही, अश्या उद्योगांबद्धल नकारात्मक बोलतात ते अशाच आर्थिक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असतात.

In reply to by वामन देशमुख

"Patriotism is the last refuge of the scoundrel." असं तीन शतकांपूर्वीचं एक वाक्य आहे. भारतात मात्र "देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं" असंच म्हणावं लागेल.

In reply to by वामन देशमुख

देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं +१ आणी असे. लोक स्वतःला देशभक्त म्हणवतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

देशातील नामवंत उद्योगपती हा लाच देणारा उद्योगपती नामवंत कधी झाला? हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही का कर्नल साहेब? की भाजप धार्जिणा म्हणजे नामवंत? अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. धाक जमवून की पत घालवून? जरा टाटा बिर्ला अंबानी ह्यांच्याकडे पाहा. केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे उद्योगपतीबद्दल राजकीय असूया का असेल? सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. बरोबर, पण देशद्रोह्यांबद्दल सामान्य माणसाने बोलणे हे सूर्यावर थुंकणे नसते. देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल. सहमत लाच देऊन देशाची पत घालवणे, एखाद्या राजकीय पक्षाला आपला मिंधा बनवून कर्जमाफी करून घेणे कशात बसते?

विना पुरावा आरोपीस फाशी दिलीत. जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंत म्हणायचे. अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे. हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कोण देशद्रोही, लाखो लोकांचा पोशिंदा? काय पुरावा आहे ते सांगाल काय? भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. अडानी उद्योग समुह १९८८ मधे सुरू झाला. २०१३ पर्यंत दिन दुनी रात चौगुनी अशी प्रगती केली. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत काॅग्रेस सरकार होती. तेंव्हा अडानी यांचे मूल्यांकन कसे कराल.... जाऊ द्यात, मी तरी कशाला तुमच्या नादी लागतोय. हाथी चाले अपनी चाल......

In reply to by कर्नलतपस्वी

जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंतm म्हणायचे. मला म्हणू नकाच मी नेहमी माझ्य नावापुढे कुप्रसिद्ध मिपाकर असे लिहितो. बाकी लाच देणारा फक्त भाजप धार्जिणा आहे म्हणून त्याला नामवंत म्हणावे का? हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कर्नल साहेब आपल्या भ्रष्ट व्यवस्थेने किती गुन्हे दाखल केले नी तपास केला?? मग तुम्ही कोणत्या बेस वर अदानीला क्लीनचिट दिली? काहीं पुरावे द्या. आहेर का? वाट पाहतो. अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे. सर त्यानी पुरावे वगैरे गोळा करुन वॉरंट काढले आहे, ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन. भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. बोला की, पण सोबत एका भ्रष्ट उद्योगपतीचीही बाजू घ्यावी अशी काही भाजपची घटना आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.
"लोकांच्या तावडीत सापडलेला किरकोळ ठक सुटका करून घेण्यासाठी क्षीण युक्तिवाद करण्याचा तावातावाने प्रयत्न करीत आहे" अशी इमोजी कल्पावी.

पुढे निघून गेलात. काॅग्रेस राजवटीचे पंचवीस वर्ष याबद्दल काहीच नाही. अम्रीकेत समन्स आणी वाॅरंट वेगळे. , a warrant and a summons are not the same thing in American law: Summons A letter that requires a person to appear in court for a minor offense. A summons is typically issued by a court clerk and doesn't usually require evidence. If the person doesn't appear in court, the judge may issue an arrest warrant. Warrant A court order that authorizes law enforcement to arrest a person or conduct a search. A warrant is usually issued by a judge or magistrate and requires probable cause to be established. Arrest warrants are typically valid for a specific period of time, but they can remain active indefinitely until the person is arrested or the warrant is recalled. जाऊ द्यात, तुम्ही बसा टिमकी वाजवत.

"अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे." एफ बी आयने तसे आरोप केले आहेत आणि आरोप्पत्र सादर केले होते. १६ ते २३ न्यायमूर्ती(ग्रँड ज्युरी)ना त्या आरोपात तथ्य वाटले आहे. दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. अदानीभक्त हे मान्य करणार नाहीत. अश्या भ्रष्ट माणसाचे अधिकाधिक नुकसान व्हावे. तिथल्या ज्युरींच्या घरी आरत्या होतात का? होत असतील तर खोट्या डिग्रिवाला तिथेही धडकेल. :)

अजून खटला उभा राहीला नाही. त्या आगोदरच उत्साही वीरांनी भ्रष्ट म्हणू लेबल लावले आहे. "एक रूका हुआ फैसला" आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Sagar Adani, executive director of Adani Green and nephew of Gautam Adani, used his mobile phone to track details of the bribes offered to Indian officials, US authorities alleged. In a meeting between some Adani and Azure executives in 2022, Gautam Adani detailed aspects of the bribery scheme including steps he personally took to offer money to government officials, the US authorities said. https://www.deccanherald.com/india/explained-us-findings-related-to-ada… आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण काका माईनी पुरावे दिलेत आता तरी मान्य करा. अदानी भ्रष्ट आहे की तुम्हीही डॉ. खरेंसारखे भ्रष्टाचाराचे समर्थन कराल?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.
मग, अदानींना (किंवा अदानीला) अमेरिकन कोर्टात खटला चालून काय शिक्षा मिळेल ? तुमच्या ह्यांचे ह्या बाबतीत काय मत आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

माहित नाही रे धर्मराजा. तिकडचे कायदे वेगळे,शिक्षा वेगळ्या. पण ह्या प्रकरणातून अदानीना बाहेर काढणे ही ट्रम्प आणि मोदी ह्यांच्यासमोरची मोठी कसोटी असेल. त्यातही भारत सरकारपुढील आव्हाने मोठी असणार आहेत. कारण ह्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अमेरिका/ट्रम्प खूप मोठी किंमत मागतील हे नक्की. हार्ले डेविडसन बाईक्स्,भारतात बंद पडलेल्या फोर्ड कंपनीचे पुनुरुज्जीवन... असे बरेच काही असेल असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई बहुसंख्य वृत्तपत्रातून आलेल्या माहितीप्रमाणे अडाणी यांच्यावरील खटल्याची हि सुरुवात आहे आणि याला अनेक वर्षे जातील. त्यातून श्री अडाणी यांच्यावर वैयक्तिक असे कोणतेही आरोप नाहीत. तेंव्हा अडाणी याना काही होण्याची शक्यता बहुसंख्य कायदेतज्ञांच्या मते शून्य आहे. असे अनेक लेख इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझिनेस स्टॅंडर्ड मध्ये आलेले आहेत जरा वाचून पहा. बाकी भुजबळ आणि इतर फुरोगामी यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे हा शुद्ध कालापव्यय आहे

In reply to by सुबोध खरे

अदानीला शिक्षा होण्याची शक्यता कमी आहे हे मान्य पण दुसर्या देशाने एखाद्या उद्योगपतीवर लाचखोरीचे आरोप करणे, त्याचे पुरावे देणे आणि त्याच्यावर वॉरंट निघणे.. ह्यातून त्या उद्योगपतीची पत काय उरली? आणि देशाची ईमेज? 'अदानीने भारतीय नेते/नोकरशहा ह्यांना लाच दिली आहे" असा आरोप दुसरा देश करतो आणि आपले लोक हे प्रकरण उडवुन लावतात. मोदी/जयशंकर मॅनेज करतील असे म्हणतात..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई तुमचं वय झालाय हे खरं ज्या अमेरिकेचा अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच गुन्हेगार सिद्ध झालाय आणि आताचा अध्यक्ष आपल्या मुलाला अत्यंत गहन गुन्ह्यातून माफी देतो त्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल कशाला चिंता करायची? उद्योगपतीची पत काय उरली? अदानी याना जगभर भरपूर लोक कर्जे देतील त्याची चिंता तुम्ही करू नका? इस्रायलने अगोदरच अदानीला पाठिंबा दिला आहे https://www.reuters.com/world/india/israel-backs-indias-adani-after-us-… ज्या देशाने आपल्या बळावर जगभर सर्वत्र काड्या करून आपली आर्थिक सत्ता कायम ठेवली आहे त्यांना का आणि कशासाठी भीक घालायची? मोदी सरकारने अमेरिकेला तीन वेळेस फाटा मारला आहे. S -४०० विकत घेताना, रशिया कडून तेल घेताना आणि चबहार बंदराचा विकार करताना. अमेरिकेने तुमचे काय वाकडे केले? आणि अगोदर पोखरण १ आणि २ केल्यावर अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध टाकले. तुम्ही कुठे त्यांना भीक घातली? शेवटी बळी तो कान पिळी हेच तत्व सत्य आहे. तुमच्याकडे शक्ती असेल तर तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. सर्वे गुण: कांचनम आश्रयते ! तुम्ही श्रीमंत असलात तर तुमच्याकडे सर्व सद्गुण असतात. गज: नैव व्याघ्र: नैव सिंह: नैवच नैवच अजापुत्रो बालिम दद्यात देव: दुर्बल नाशक: हत्तीचा नाही वाघाचा नाही सिंहाचा तर नाहीच नाही बोकडाचाच बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बळाचा नाशक आहे

In reply to by सुबोध खरे

हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात. वापरलेली भाषा अक्षेपार्ह आहे. जर संबंधितांनी काय गैरऊद्दोग केले त्याचे पुरावे मागीतले तर.... मानहानीचा खटला दाखल केला तर... पळता भुई थोडी होईल. लेखक,वाचक आणी प्रतिसादक यांची याविषयाबद्दल माहीती वृत्तपत्रातील माहीतीवर आधारित आहे. दाखल झालेले आरोपपत्र जरी लेखा बरोबर दिले असले तरी अमेरीका व भारत यांच्या कायद्यांतर्गत असलेल्या बाबींचे ज्ञान कितपत आहे ते बघावे लागेल. आरोपपत्र सादर केले आहे. वृत्तपत्रातील माहीती हा पुरावा कितपत ग्राह्य धरावयाचा आणी विधिज्ञ त्याच्या कश्या चिंधड्या उडवतील हे बघावे लागेल. प्रत्यार्पण संधी हा एक मोठा अडसर आहे का? ब्रिटन आणी भारता मधे सतरा असे मामले प्रलंबित आहेत. अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत. अशा सन्मानित व्यक्ती बद्दल बोलताना संयमित भाषेचा उपयोग करणे अपेक्षित आहे. अर्थात इतर कोणत्याही व्यक्ती बद्दल सुद्धा हाच निकष लागू पडतो. गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे. अजून सिद्ध झाला नाही. अशा परिस्थितीत भ्रष्ट, लाचखोर असे गंभीर आरोप लावणे कितपत योग्य आहे व जर याची दखल संबंधितांनी घेतली तर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सुद्धा प्रतिसादकांनी लक्षात ठेवले पाहीजे. प्रतिसाद देताना भाषेचा वापर अतिशयकाळजीपूर्वक केला पाहीजे.केला पाहीजे असे माझे मत आहे. सर्व मिपाखरे सुज्ञ,सुजाण आहेत हे गृहीत धरतो.

"In March 2023, FBI special agents approached Sagar Adani with details of the grand jury's ongoing investigation into the group and other entities. They took custody of electronic devices in Sagar's possession and served him with a search warrant and served him with a search warrant and grand jury subpoena. https://www.deccanherald.com/india/explained-us-findings-related-to-ada…

अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत. म्हणून त्यांना गैरप्रकार करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो का? नमो नमो नमो.

In reply to by जावा फुल स्टॅक

आणी त्यानी कितीही झोल केले तरी ते गुजराती तसेच मोदींचे हितचिंतक असल्याने त्यांना आपोआप सन्मान प्राप्त होतो. अंधभक्तीला सीमा नाही. मिपावरील एक महात्मा ह्यानी म्हटलेच आहे की असे झोल करावेच लागतात हे आंतरराष्ट्रीय सत्य आहे वगैरे वगैरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदी बरोबर. गुन्हा कोणीही, अगदी कोणीही केला असेल तर त्यावर गुन्हा दाखल करून खटला चालला पाहिजे. न्याय हा सगळ्यांना सारखा पाहिजे. खरं तर ज्यांनी लाच घेतली / मागितली त्यांचीही जाहीरपणे नावं आली पाहिजेत आणि त्यांच्यावरपण त्याच वेळी खटला चालला पाहिजे. तरच न्याय यंत्रणा , सत्ताधारी , विरोधक आणि माध्यमे निःपक्ष आहेत हे सिद्ध होईल. तो पर्यंत हे आरोप फक्त राजकीय राहतील. बरोबर ना?

In reply to by टीपीके

बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या पैशाने मिंधे झाले असतील त्यामुळे अदानीवर गुन्हा नसेल केला दाखल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग त्यानां त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही जे करताय ते स्पृहणीय आहे. तुम्ही खरंच राजकीय कारणासाठी नाही तर न्यायासाठी लढता आहात हे दाखवण्यासाठी ज्यांनी लाच घेतली त्यांची पण नावे का नाही घेत? म्हणजे तुमच्या उद्दिष्टांवर कोणी शंका नाही घेऊ शकणार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकीचे आरोपी कोण आणि त्यांच्या विरुद्ध आपण कसा प्रचार करायचा आणि गुन्हे दाखल करायचा आग्रह करायचा ? तुमचे या विषयावरील मौलिक विचार समजावून घ्यायला आवडेल

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यात गृहमंत्र्यांचा काय संबंध? आणि आपण त्या हलकट बीजेपीवाल्यांसारखा निरपेक्षपणाचा आव तर आणू शकतो ना? इतके उघड उघड पक्षपाती झालो तर जनता काय विचार करील?

तामिळनाडू,आंध्र,ओडिशा आणि छत्तिसगड. ह्या राज्यांच्या उच्च अधिकार्यानी/राजकीय नेत्यानी(तत्कालिन सत्ताधार्यानी) लाच घेतल्याचे आरोप आहेत. अदानीने लाच दिली हे खरे असेल तर ह्या राज्यांतील तत्कालिन सत्ताधार्याना जाब विचारला गेला पाहिजे. पण मुख्य मीडिया ह्याबाबत मूग गिळुन गप्प दिसतोय.आंध्रचे जगन मोहन रेड्डी ह्यांच्या अफाट संपत्तीबद्द्लच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेत. आपले मराठी विद्वान पत्रकारही ह्या प्रकरणावर बोलताना दिसत नाहीत. अदानीचे नाव आल्यावर सुरुवातीला सगळ्यांना हुरुप आला पण ह्यात बिगर-भाजपा नेते गुंतलेले आहेत हे लक्षात आल्यावर पत्रकारांनी आपली लेखणी म्यान केली. !