Skip to main content

नसूनी तयात

लेखक रोहन जगताप यांनी शुक्रवार, 08/11/2024 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात
लेखनविषय:

वाचने 2284
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by कानडाऊ योगेशु

मनःपूर्वक आभार. हो, अगदी बरोबर. कविता भुजंगप्रयात वृत्तात आहे.

भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली. (रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).

In reply to by चित्रगुप्त

आपण वृत्त ओळखले आणि आपल्याला कविता आवडली हे वाचून चांगले वाटले. आभारी आहे.