"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच!
कौतुक :
सर्वप्रथम बकरी ईदनिमित्त होणाऱ्या कत्तलीपासून तब्बल १२४ बोकडांचा जीव वाचवणाऱ्या 'गुरू संजीव, चिराग जैन आणि त्यांच्या चमूचे' हार्दिक अभिनंदन!
मौज :
सदर बातमीतील,
"धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले."वरील वाक्ये वाचून मौज / गंमत वाटली! पवित्र गोमातेचे दर्शन घेणे, धार्मिक विधी / मंगल कार्याच्या प्रसंगी तिला 'गोग्रास' अर्पण करणे, गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र अशा पाच गोष्टींचा समावेश असलेले 'पंचगव्य' प्राशन करणे अशा रूढी / परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. जैन धर्माविषयी मनात आदर आहे आणि जैन धर्मियांचा अवमान् करण्याचा किंचितही हेतु नसला तरी, वरिल प्रमाणे पवित्र 'बकरी दर्शन', गोग्रासाप्रमाणे 'बग्रास', बकरीचे दूध, दही, लेंड्या आणि मूत्र अशा (बकरीच्या दुधापासून तूप तयार करता येत नसल्याने) पाचच्या ऐवजी चार गोष्टींचा समावेश करून तयार केलेले 'चौगव्य' प्राशन करण्याच्या नव्या रूढी / परंपरा जैन धर्मात सुरु होतील कि काय असा एक फाजील विचार मनात येऊन हसूही आले. व्यावहारिक 'चिंता' : बातमीतील पुढची माहिती वाचत असताना सुरुवातीला मनात 'भावनिक' पातळीवर निर्माण झालेल्या कौतुक आणि मौज/गंमत अशा भावना ओसरल्या आणि मेंदूत 'व्यावहारिक' विचारमंथन सुरु झाले. शेळीपालनात एका प्रौढ बोकडासाठी १५ ते २० चौ. फूट जागा बंदिस्त निवाऱ्यासाठी आणि त्याच्या १० पट मोकळी जागा उपलब्ध असणे हि आदर्श परिस्थिती मनाली जाते. त्यावर आधारित १२४ बोकडांसाठी गणित केल्यास किमान अर्धा एकर क्षेत्रफळ आवश्यक असल्याने, लोकवर्गणीतून जमा झालेल्या पंधरा लाखांपैकी जवळपास साडे बारा लाख रुपये खर्चून मंडईतून खरेदी करून आणलेल्या बोकडांना 'मंदिरातील धर्मशाळेचे अंगण आणि विवाहसोहळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्याचे वाचून चमकलो होतो, पण बातमीच्या शेवटी त्यांची रवानगी 'जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये' करण्यात येणार असल्याचे वाचल्यावर हायसे वाटले. “आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती” असे दिल्लीच्या मंडईचे विदारक वर्णन विवेक जैन ह्यांनी बातमीत केले आहे. माझ्या काही मोजक्याच पण अतिशय जवळच्या अशा मुस्लिम मित्रांबरोबर 'हा काय प्रकार असतो' ह्या उत्सुकतेपोटी' बकरी ईदच्या आदल्या दिवशी 'कुर्बानीचे बोकड' खरेदी करण्यासाठी मुंबईतील 'देवनार' आणि कल्याण-भिवंडी रोडवरील 'कोन गाव' अशा दोन 'बकरा मंडी'ना दिलेल्या भेटीत अशी मन विदीर्ण करणारी दृश्ये प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्यांनी केलेले वर्णन अगदी चपखल असल्याचे जाणवले आणि त्यावरून एक गंभीर शंका मनात आली आणि "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी? हा प्रश्न पडला! 'ईद मार्केट' साठी व्यापाऱ्यांनी विक्रीकरीता आणलेले विविध जातींचे, वयाचे आणि हमखास चांगला चांगला भाव मिळवून देतील असे 'खास शारीरिक वैशिष्ठ्यांचे' 'कुर्बानीचे' बोकड हे केवळ त्या त्या तालुका, जिल्हा किंवा राज्यातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणलेले नसून, वेगवेगळ्या राज्यांतील लहानमोठे 'शेळीपालक शेतकरी' आणि व्यावसायिक 'गोट फार्म्स' मधूनही खरेदी केलेले असतात. खरेदी केल्यापासून फारतर आठ-दहा दिवसांत हे बोकड 'हलाल' केले जाणार असल्याने प्राणघातक ठरू शकणाऱ्या काही आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे नियमित 'लसीकरण' झालेले आहे किंवा नाही ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. बकरा मंडीत तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या शेड्समध्ये बांबू आणि शेडनेटचे पार्टीशन्स टाकून शेकड्यांनी तयार केलेल्या चार-पाचशे चौ. फुट आकाराच्या एकेका गाळ्यात, वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून कोंबून आणलेले हे बोकड दाटीवाटीने ठेवलेले असतात. वर म्हंटल्याप्रमाणे हे बोकड आठ-दहा दिवसांत 'हलाल' केले गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. चिराग जैन आणि त्यांच्या टीमने खरेदी केलेले १२४ बोकड हे 'जातिवंत' आणि ज्यांच्या किमती २५ हजारांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असतात असे खास 'ईद मार्केट' साठी तयार केलेले बोकड नसून साधारण एक वर्ष वयाचे, तीस-बत्तीस किलो वजनाचे आणि दोन दातांचे 'रेग्युलर मीट मार्केट' साठी विक्री होणारे 'गावरान' बोकड असल्याचे त्यांच्या 'सरासरी १० हजार रुपये प्रति बोकड' ह्या किमतीवरून सहज लक्षात येतंय. ह्या वाचवलेल्या बोकडांचे नियमित लसीकरण झालेले असेल का? ते झालेले नसल्यास भिन्न वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेल्या असंख्य 'परक्या' बोकडांच्या सहवासात आल्याने त्यांच्यापैकी काहींना किंवा सर्वांना पी.पी.आर. सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगाची लागण/बाधा झाली असेल का? संसर्गजन्य रोग एकवेळ बाजूला ठेऊ, पण बकरा मंडीत बोकड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी त्यांना पसंत पडल्याने बाजूला काढलेल्या अनेक बोकडांमधून एक किंवा त्यापेक्षा जास्तीची निवड करताना त्यांच्या वयाची खात्री पटवण्यासाठी बोकडाचे तोंड धरून दोन बोटे तोंडात खुपसून, जबडा फाकवुन त्याचे दात दाखवले जातात. हि क्रिया वारंवार केली जात असल्याने त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्याच्या बोटांना लागलेली एका बोकडाची लाळ दुसऱ्याच्या जिभेला, दुसऱ्याची तिसऱ्याच्या जिभेला लागणे असे चक्र सुरु राहते आणि त्यातला एक जरी बोकड आजारी/बाधित असेल तर त्याच्या लाळेवाटे अन्य बोकड बाधित होण्याची शक्यताही वाढत जाते. दुर्दैवाने वरीलपैकी काही होऊन त्यांच्यातला एक, अनेक किंवा सर्व बोकड बाधित झाले असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करणे आले नाहीतर "कत्तलीपासून वाचवले, पण आजाराने मेले" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे काही होऊ नये हि सदिच्छा, पण हे पाऊल उचलताना ह्या गोष्टींचा विचार त्यांनी केला होता/असेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या अपडेट्स साठी बातमीचा पाठपुरावा करणे आले! बातमीत म्हंटल्याप्रमाणे ह्या बोकडांची रवानगी गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यांची क्षमता, क्षेत्रफळ, उत्पन्नाचे स्रोत आणि तिथे ह्या बोकडांच्या चारा-पाण्याची काय सोय आहे हे देखील पाहावे लागेल. सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळी/बोकडाच्या आहारासाठी आजघडीला प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. त्याच्या जोडीला त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले मिनरल मिक्श्चर, लिव्हर टॉनिक अशा गोष्टी, जंतांसाठीचे 'डिवर्मिंग', 'नियमित लसीकरण' आणि अन्य पशुवैद्यकीय खर्च, निवाऱ्यासाठी शेड, वीज, पाणी, औषधे आणि देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ ह्यावर होणारा खर्च वेगळा. हे विचारांत घेता ह्या १२४ बोकडांना पोसण्यासाठी, एका बोकडावर प्रतिमाह १००० रुपये असा किमान खर्च गृहीत धरला तर तो जवळपास सव्वा लाख रुपयांच्या घरात भरतो, गणिताच्या सोयीसाठी आपण तो आणखीन कमी करून १ लाख रुपये धरून चालू. ह्या हिशोबाने त्यांच्या एक वर्षाचा खर्च १२ लाख रुपये मात्र. शेळी/बोकडाचा आयुष्यकाल सरासरी १२ ते १५ वर्षांचा असतो, तोही आपण सोयीसाठी कमी करून १० वर्षे गृहीत धरून गणित केल्यास दहा वर्षांत त्यांच्यावर होणारा खर्च १ कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो (ह्यात भविष्यात वरील गोष्टींच्या किमतीत होणारी वाढ धरलेली नाही) हा खर्च भागवण्यासाठी त्या गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांचे स्वतःचे काही उत्पन्नाचे स्रोत असल्यास आनंदच आहे, आणि लोकांकडून देणग्या गोळा करून हा खर्च भागविण्यात येणार असल्यास आनंदी-आनंदच आहे! कोणातरी गुरूच्या सांगण्यावरून आणि आंतरिक उर्मीने लोकवर्गणीतून सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केलेले हे उपयोगशून्य बोकड आणि त्यांना पोसण्यासाठी भविष्यात प्रतिवर्षी खर्च होणाऱ्या जवळपास सव्वा कोटी रुपये अशा एकंदरीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या ह्या अनावश्यक खर्चाचे समर्थन कशाच्या आधारावर करायचे हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. बरे ह्यावर्षी झालाय हा प्रकार इथपर्यंतच मर्यादित राहिला तर एकवेळ ठीक आहे, पण ह्या चिराग जैन आणि मंडळींकडून दरवर्षी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य काही मंडळींनी असे प्रकार सुरु केले तर देशभरात प्रतिवर्षी किती नवीन 'बकरशाळा' उघडतील आणि त्यांवर किती अब्ज रुपये खर्ची पडतील ह्या विचाराने मेंदूला मुंग्या आल्या. असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!
वाचने
29430
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित
In reply to रक्ती, रत्ती वगैरे by नठ्यारा
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित
गरिबी हा एक शाप आहे आणि
In reply to अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित by सुबोध खरे
वाचुन अंगावर काटा आला!
In reply to अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित by सुबोध खरे
या पेक्षा हि पुढचे म्हणजे
In reply to अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित by सुबोध खरे
लेख ...
मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे
In reply to लेख ... by कर्नलतपस्वी
हा हा हा......परिमार्जनाचीही तयारी.
अवांतर : living well in arebia
हा हा हा... Good Joke!
In reply to अवांतर : living well in arebia by नठ्यारा
तु.वे.ते.रा.
In reply to हा हा हा... Good Joke! by टर्मीनेटर
मी तुम्हांस नेहमी व्हाईट नजरेनेच बघतो! ;-)
In reply to तु.वे.ते.रा. by नठ्यारा
थांबून थांबून लिहिता पण आपण
हं
"त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे
In reply to हं by सुरिया
कुछ तो गडबड है
गडबड रेहनेकी संभावना तो हैं...
In reply to कुछ तो गडबड है by चित्रगुप्त
अर्थात आपल्याला काय करायच्या
In reply to गडबड रेहनेकी संभावना तो हैं... by टर्मीनेटर
अवांतर : खाबियादीदी व तलवारनाना
In reply to कुछ तो गडबड है by चित्रगुप्त
दुनिया की निगाहों में भला
In reply to अवांतर : खाबियादीदी व तलवारनाना by नठ्यारा
माझ्या एका मित्राने गावाकडे
मस्त! गेल्या १० वर्षांत त्यांची झालेली प्रगती
In reply to माझ्या एका मित्राने गावाकडे by पॅट्रीक जेड
तो कंपनीत कालीग होता. तो
In reply to मस्त! गेल्या १० वर्षांत त्यांची झालेली प्रगती by टर्मीनेटर
मार्केटमध्ये मांसासाठी विकला
"बरेच आश्चर्य वाटले. त्यात
In reply to मार्केटमध्ये मांसासाठी विकला by गवि
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to "बरेच आश्चर्य वाटले. त्यात by टर्मीनेटर
बोलाई (मेंढा) च्या मटणाचा
In reply to "बरेच आश्चर्य वाटले. त्यात by टर्मीनेटर
बोलाईचे मटण मिळेल असे काही
In reply to बोलाई (मेंढा) च्या मटणाचा by सुरिया
पण आपण खातो ते बोकडाचे मांस
In reply to बोलाईचे मटण मिळेल असे काही by गवि
मी गावातील बोकड, पोल्ट्री
In reply to पण आपण खातो ते बोकडाचे मांस by Bhakti
इकडे मावळ भागात ज्यांची देवी
In reply to बोलाई (मेंढा) च्या मटणाचा by सुरिया
ऑ....
In reply to "बरेच आश्चर्य वाटले. त्यात by टर्मीनेटर
सरजी, "झोल हिसाब में नहीं, बल्की अपने
In reply to ऑ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला. गटारी
In reply to सरजी, "झोल हिसाब में नहीं, बल्की अपने by टर्मीनेटर
बाहेर खाऊ नये म्हणा .... !
In reply to प्रतिसाद आवडला. गटारी by पॅट्रीक जेड
नमस्कार !
प्रत्येक प्राण्याच्या मनात
In reply to नमस्कार ! by धर्मराजमुटके
प्रत्येक प्राण्याच्या मनात काही बरे वाईट विचार चाललेले असतात, इच्छा आकांक्षा वसत असतात. एखाद्याला एका झटक्यात मरण आले तर त्याचे विचार, भावना, इच्छा आकांक्षा त्याच्या जीवातकैच्यकाई. हलाल/कोशर करण्यामागे कारण आहेकी अर्धा गळा चिरल्यावर हृदय पंपिंग करुन भकाभक रक्त बाहेर फेकते. त्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त रक्त बाहेर फेकल्या जाते नी मांस धुवायला जास्त पाणी लागत नाही. तसेच मांस जास्त दिवस टिकते. वाळवंटी टेक्निक. अतिकृरपणा आहे. जनावराचाग गळा चिरणारे त्याचा आत्मा वगैरेचा विचार करत असतील?कैच्यकाई.
In reply to प्रत्येक प्राण्याच्या मनात by पॅट्रीक जेड
मुळातच त्या विषयात अजिबात रस नाही पण,
In reply to नमस्कार ! by धर्मराजमुटके
जो पर्यंत शास्त्र हे सिद्ध
फरिदाबादमधले खाटिक मराठी आहेत.
आपल्या अवांतर माहितीमुळे
In reply to फरिदाबादमधले खाटिक मराठी आहेत. by चित्रगुप्त
रोचक माहिती आहे!
In reply to फरिदाबादमधले खाटिक मराठी आहेत. by चित्रगुप्त
हलाल करणे == हालहाल करून मारणे
टर्मी भौ,
छान चर्चा. मी लहान असताना
काय मजा आली वाचून!
In reply to छान चर्चा. मी लहान असताना by अमरेंद्र बाहुबली
आपल्या फडात बराच माल दिसतोय!
In reply to काय मजा आली वाचून! by हणमंतअण्णा शंक…
छान लिहिते राहा.
In reply to छान चर्चा. मी लहान असताना by अमरेंद्र बाहुबली
चिंबोऱ्यांचं आजूनंच वेगळं ....
In reply to छान लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जीव आणि प्राण हे वेगवेगळे असतात का ? आधी जीव जातो की प्राण ?
In reply to चिंबोऱ्यांचं आजूनंच वेगळं .... by नठ्यारा
"यंग गोट"