"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच!
कौतुक :
सर्वप्रथम बकरी ईदनिमित्त होणाऱ्या कत्तलीपासून तब्बल १२४ बोकडांचा जीव वाचवणाऱ्या 'गुरू संजीव, चिराग जैन आणि त्यांच्या चमूचे' हार्दिक अभिनंदन!
मौज :
सदर बातमीतील,
"धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले."वरील वाक्ये वाचून मौज / गंमत वाटली! पवित्र गोमातेचे दर्शन घेणे, धार्मिक विधी / मंगल कार्याच्या प्रसंगी तिला 'गोग्रास' अर्पण करणे, गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र अशा पाच गोष्टींचा समावेश असलेले 'पंचगव्य' प्राशन करणे अशा रूढी / परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. जैन धर्माविषयी मनात आदर आहे आणि जैन धर्मियांचा अवमान् करण्याचा किंचितही हेतु नसला तरी, वरिल प्रमाणे पवित्र 'बकरी दर्शन', गोग्रासाप्रमाणे 'बग्रास', बकरीचे दूध, दही, लेंड्या आणि मूत्र अशा (बकरीच्या दुधापासून तूप तयार करता येत नसल्याने) पाचच्या ऐवजी चार गोष्टींचा समावेश करून तयार केलेले 'चौगव्य' प्राशन करण्याच्या नव्या रूढी / परंपरा जैन धर्मात सुरु होतील कि काय असा एक फाजील विचार मनात येऊन हसूही आले. व्यावहारिक 'चिंता' : बातमीतील पुढची माहिती वाचत असताना सुरुवातीला मनात 'भावनिक' पातळीवर निर्माण झालेल्या कौतुक आणि मौज/गंमत अशा भावना ओसरल्या आणि मेंदूत 'व्यावहारिक' विचारमंथन सुरु झाले. शेळीपालनात एका प्रौढ बोकडासाठी १५ ते २० चौ. फूट जागा बंदिस्त निवाऱ्यासाठी आणि त्याच्या १० पट मोकळी जागा उपलब्ध असणे हि आदर्श परिस्थिती मनाली जाते. त्यावर आधारित १२४ बोकडांसाठी गणित केल्यास किमान अर्धा एकर क्षेत्रफळ आवश्यक असल्याने, लोकवर्गणीतून जमा झालेल्या पंधरा लाखांपैकी जवळपास साडे बारा लाख रुपये खर्चून मंडईतून खरेदी करून आणलेल्या बोकडांना 'मंदिरातील धर्मशाळेचे अंगण आणि विवाहसोहळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्याचे वाचून चमकलो होतो, पण बातमीच्या शेवटी त्यांची रवानगी 'जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये' करण्यात येणार असल्याचे वाचल्यावर हायसे वाटले. “आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती” असे दिल्लीच्या मंडईचे विदारक वर्णन विवेक जैन ह्यांनी बातमीत केले आहे. माझ्या काही मोजक्याच पण अतिशय जवळच्या अशा मुस्लिम मित्रांबरोबर 'हा काय प्रकार असतो' ह्या उत्सुकतेपोटी' बकरी ईदच्या आदल्या दिवशी 'कुर्बानीचे बोकड' खरेदी करण्यासाठी मुंबईतील 'देवनार' आणि कल्याण-भिवंडी रोडवरील 'कोन गाव' अशा दोन 'बकरा मंडी'ना दिलेल्या भेटीत अशी मन विदीर्ण करणारी दृश्ये प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्यांनी केलेले वर्णन अगदी चपखल असल्याचे जाणवले आणि त्यावरून एक गंभीर शंका मनात आली आणि "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी? हा प्रश्न पडला! 'ईद मार्केट' साठी व्यापाऱ्यांनी विक्रीकरीता आणलेले विविध जातींचे, वयाचे आणि हमखास चांगला चांगला भाव मिळवून देतील असे 'खास शारीरिक वैशिष्ठ्यांचे' 'कुर्बानीचे' बोकड हे केवळ त्या त्या तालुका, जिल्हा किंवा राज्यातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणलेले नसून, वेगवेगळ्या राज्यांतील लहानमोठे 'शेळीपालक शेतकरी' आणि व्यावसायिक 'गोट फार्म्स' मधूनही खरेदी केलेले असतात. खरेदी केल्यापासून फारतर आठ-दहा दिवसांत हे बोकड 'हलाल' केले जाणार असल्याने प्राणघातक ठरू शकणाऱ्या काही आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे नियमित 'लसीकरण' झालेले आहे किंवा नाही ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. बकरा मंडीत तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या शेड्समध्ये बांबू आणि शेडनेटचे पार्टीशन्स टाकून शेकड्यांनी तयार केलेल्या चार-पाचशे चौ. फुट आकाराच्या एकेका गाळ्यात, वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून कोंबून आणलेले हे बोकड दाटीवाटीने ठेवलेले असतात. वर म्हंटल्याप्रमाणे हे बोकड आठ-दहा दिवसांत 'हलाल' केले गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. चिराग जैन आणि त्यांच्या टीमने खरेदी केलेले १२४ बोकड हे 'जातिवंत' आणि ज्यांच्या किमती २५ हजारांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असतात असे खास 'ईद मार्केट' साठी तयार केलेले बोकड नसून साधारण एक वर्ष वयाचे, तीस-बत्तीस किलो वजनाचे आणि दोन दातांचे 'रेग्युलर मीट मार्केट' साठी विक्री होणारे 'गावरान' बोकड असल्याचे त्यांच्या 'सरासरी १० हजार रुपये प्रति बोकड' ह्या किमतीवरून सहज लक्षात येतंय. ह्या वाचवलेल्या बोकडांचे नियमित लसीकरण झालेले असेल का? ते झालेले नसल्यास भिन्न वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेल्या असंख्य 'परक्या' बोकडांच्या सहवासात आल्याने त्यांच्यापैकी काहींना किंवा सर्वांना पी.पी.आर. सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगाची लागण/बाधा झाली असेल का? संसर्गजन्य रोग एकवेळ बाजूला ठेऊ, पण बकरा मंडीत बोकड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी त्यांना पसंत पडल्याने बाजूला काढलेल्या अनेक बोकडांमधून एक किंवा त्यापेक्षा जास्तीची निवड करताना त्यांच्या वयाची खात्री पटवण्यासाठी बोकडाचे तोंड धरून दोन बोटे तोंडात खुपसून, जबडा फाकवुन त्याचे दात दाखवले जातात. हि क्रिया वारंवार केली जात असल्याने त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्याच्या बोटांना लागलेली एका बोकडाची लाळ दुसऱ्याच्या जिभेला, दुसऱ्याची तिसऱ्याच्या जिभेला लागणे असे चक्र सुरु राहते आणि त्यातला एक जरी बोकड आजारी/बाधित असेल तर त्याच्या लाळेवाटे अन्य बोकड बाधित होण्याची शक्यताही वाढत जाते. दुर्दैवाने वरीलपैकी काही होऊन त्यांच्यातला एक, अनेक किंवा सर्व बोकड बाधित झाले असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करणे आले नाहीतर "कत्तलीपासून वाचवले, पण आजाराने मेले" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे काही होऊ नये हि सदिच्छा, पण हे पाऊल उचलताना ह्या गोष्टींचा विचार त्यांनी केला होता/असेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या अपडेट्स साठी बातमीचा पाठपुरावा करणे आले! बातमीत म्हंटल्याप्रमाणे ह्या बोकडांची रवानगी गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यांची क्षमता, क्षेत्रफळ, उत्पन्नाचे स्रोत आणि तिथे ह्या बोकडांच्या चारा-पाण्याची काय सोय आहे हे देखील पाहावे लागेल. सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळी/बोकडाच्या आहारासाठी आजघडीला प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. त्याच्या जोडीला त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले मिनरल मिक्श्चर, लिव्हर टॉनिक अशा गोष्टी, जंतांसाठीचे 'डिवर्मिंग', 'नियमित लसीकरण' आणि अन्य पशुवैद्यकीय खर्च, निवाऱ्यासाठी शेड, वीज, पाणी, औषधे आणि देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ ह्यावर होणारा खर्च वेगळा. हे विचारांत घेता ह्या १२४ बोकडांना पोसण्यासाठी, एका बोकडावर प्रतिमाह १००० रुपये असा किमान खर्च गृहीत धरला तर तो जवळपास सव्वा लाख रुपयांच्या घरात भरतो, गणिताच्या सोयीसाठी आपण तो आणखीन कमी करून १ लाख रुपये धरून चालू. ह्या हिशोबाने त्यांच्या एक वर्षाचा खर्च १२ लाख रुपये मात्र. शेळी/बोकडाचा आयुष्यकाल सरासरी १२ ते १५ वर्षांचा असतो, तोही आपण सोयीसाठी कमी करून १० वर्षे गृहीत धरून गणित केल्यास दहा वर्षांत त्यांच्यावर होणारा खर्च १ कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो (ह्यात भविष्यात वरील गोष्टींच्या किमतीत होणारी वाढ धरलेली नाही) हा खर्च भागवण्यासाठी त्या गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांचे स्वतःचे काही उत्पन्नाचे स्रोत असल्यास आनंदच आहे, आणि लोकांकडून देणग्या गोळा करून हा खर्च भागविण्यात येणार असल्यास आनंदी-आनंदच आहे! कोणातरी गुरूच्या सांगण्यावरून आणि आंतरिक उर्मीने लोकवर्गणीतून सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केलेले हे उपयोगशून्य बोकड आणि त्यांना पोसण्यासाठी भविष्यात प्रतिवर्षी खर्च होणाऱ्या जवळपास सव्वा कोटी रुपये अशा एकंदरीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या ह्या अनावश्यक खर्चाचे समर्थन कशाच्या आधारावर करायचे हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. बरे ह्यावर्षी झालाय हा प्रकार इथपर्यंतच मर्यादित राहिला तर एकवेळ ठीक आहे, पण ह्या चिराग जैन आणि मंडळींकडून दरवर्षी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य काही मंडळींनी असे प्रकार सुरु केले तर देशभरात प्रतिवर्षी किती नवीन 'बकरशाळा' उघडतील आणि त्यांवर किती अब्ज रुपये खर्ची पडतील ह्या विचाराने मेंदूला मुंग्या आल्या. असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!
वाचने
29430
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखाद्या विषयाच्या मुळाशी कस
एखाद्या विषयाच्या मुळाशी कस जावं ते टर्मिनेटर यांच्या कडून शिकाव
In reply to एखाद्या विषयाच्या मुळाशी कस by रात्रीचे चांदणे
या लेखामुळे या विषयाची
या विषयाची/प्रश्नाची व्याप्ती
In reply to या लेखामुळे या विषयाची by रामचंद्र
आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे
In reply to या विषयाची/प्रश्नाची व्याप्ती by अथांग आकाश
एक नंबर निर्णय+१
In reply to आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे by टर्मीनेटर
धन्यवाद!
In reply to एक नंबर निर्णय+१ by Bhakti
केवळ दुधासाठी शेळीपालन शक्य
In reply to आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे by टर्मीनेटर
@ diggi12
In reply to केवळ दुधासाठी शेळीपालन शक्य by diggi12
विस्तृत प्रतिसादाबद्दल
In reply to @ diggi12 by टर्मीनेटर
छान प्रतिसाद! आपले
In reply to @ diggi12 by टर्मीनेटर
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to छान प्रतिसाद! आपले by अमरेंद्र बाहुबली
लेख आवडला. पुढे त्या एकेक बकर्याची 'बोली' लावली जाईल.
"श्रीमंता घरचे श्वान, त्यास सर्व देती मान"
In reply to लेख आवडला. पुढे त्या एकेक बकर्याची 'बोली' लावली जाईल. by चित्रगुप्त
मग ते असे करतील.
In reply to "श्रीमंता घरचे श्वान, त्यास सर्व देती मान" by टर्मीनेटर
त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम
In reply to मग ते असे करतील. by चित्रगुप्त
@ टर्मिनेटरः शंकाच आहे त्याबद्दल त्याने कितपत लिहीले असेल
In reply to त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम by टर्मीनेटर
अरेरे... म्हणजे ते रंजक किस्से वाचायला मिळण्याची
In reply to @ टर्मिनेटरः शंकाच आहे त्याबद्दल त्याने कितपत लिहीले असेल by चित्रगुप्त
सामान्य माणसांना इतर माणसांनी
In reply to @ टर्मिनेटरः शंकाच आहे त्याबद्दल त्याने कितपत लिहीले असेल by चित्रगुप्त
नियमाला अपवाद असतात!
In reply to सामान्य माणसांना इतर माणसांनी by सुबोध खरे
उदाहरणार्थ - नको... ते
In reply to नियमाला अपवाद असतात! by टर्मीनेटर
डॉक्टर, तुम्ही सुद्धा? मी ?
In reply to उदाहरणार्थ - नको... ते by वामन देशमुख
नाही नाही
In reply to डॉक्टर, तुम्ही सुद्धा? मी ? by सुबोध खरे
हघ्याहेवेसांन
In reply to नाही नाही by वामन देशमुख
"डॉक्टर, तुम्ही सुद्धा? / टर्मी, तुम्ही सुद्धा?"
In reply to उदाहरणार्थ - नको... ते by वामन देशमुख
@टर्मीनेटर
In reply to "डॉक्टर, तुम्ही सुद्धा? / टर्मी, तुम्ही सुद्धा?" by टर्मीनेटर
मी कुठे टेन्शन घेतोय, मी पण गंमतच करतोय
In reply to @टर्मीनेटर by सुबोध खरे
इकडे अर्थशास्त्र चालत नाही.
@ कंजूसभौ, अर्थ नाही समजला.
In reply to इकडे अर्थशास्त्र चालत नाही. by कंजूस
बकरे खरेदी करून सोडवणे वाचवणे
In reply to @ कंजूसभौ, अर्थ नाही समजला. by चित्रगुप्त
"तुला नाही... मला नाही... फुकटचा भार मात्र धरणीला"
In reply to बकरे खरेदी करून सोडवणे वाचवणे by कंजूस
असो, भूतदया आणि मानवतावादी
लेख आणी प्रतिसाद
चिरणे !
'अॅनीमल कृएल्टी'
In reply to चिरणे ! by चौकस२१२
दोन टर्किश संशोधकांनी शेप
In reply to 'अॅनीमल कृएल्टी' by टर्मीनेटर
वेगळ्या बाजूची ओळख करुन
"धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता..."
In reply to वेगळ्या बाजूची ओळख करुन by प्रचेतस
लेख आवडला
लेख आवडला. मी भूतदयाळू आहे.
म्हणजे जिवंत बोकडाचं भूत
In reply to लेख आवडला. मी भूतदयाळू आहे. by पॅट्रीक जेड
:)
In reply to म्हणजे जिवंत बोकडाचं भूत by रामचंद्र
चला
In reply to लेख आवडला. मी भूतदयाळू आहे. by पॅट्रीक जेड
आमचा एक शालेय वर्गमित्र एका
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा
In reply to आमचा एक शालेय वर्गमित्र एका by कंजूस
कृ फार विचारू नका याबद्दल
In reply to आमचा एक शालेय वर्गमित्र एका by कंजूस
औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या
In reply to कृ फार विचारू नका याबद्दल by टर्मीनेटर
कंजूस काकांनी माहिती देण्यात कंजूसी केली पण
In reply to आमचा एक शालेय वर्गमित्र एका by कंजूस
बोकड बळीवर इतकी साधक बाधक
'लाहौल विला कुव्वत' :)
In reply to बोकड बळीवर इतकी साधक बाधक by Bhakti
हलाल
दोन्ही प्रकारे कत्तल झालेला
In reply to हलाल by सर टोबी
खाली केलेला
In reply to दोन्ही प्रकारे कत्तल झालेला by सुबोध खरे
@सर टोबी
In reply to खाली केलेला by सर टोबी
समझा आपण (म्हणजे वाचक) ह्याना
In reply to हलाल by सर टोबी
बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी
In reply to हलाल by सर टोबी
एक मिपाकर
In reply to बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी by टर्मीनेटर
कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही,
In reply to एक मिपाकर by सर टोबी
माझ्या प्रतिसादात
In reply to कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही, by टर्मीनेटर
ज्यु लोक देखील हलालचे नियम
In reply to माझ्या प्रतिसादात by सर टोबी
उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा
In reply to माझ्या प्रतिसादात by सर टोबी
टर्मिनेटर भाऊ तुम्ही अगदी
In reply to उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा by टर्मीनेटर
धंदेबाजी और फांदेबाजी मैं
सुंदर विवेचन!
In reply to धंदेबाजी और फांदेबाजी मैं by सुबोध खरे
पहिला कुठल्याशा हिंदी डब्ड तेलगू चित्रपटातला
In reply to धंदेबाजी और फांदेबाजी मैं by सुबोध खरे
RATIONALISATION यातील एक
In reply to धंदेबाजी और फांदेबाजी मैं by सुबोध खरे
@ सुबोध खरे: उत्तम विवेचन
बोकडाच्या रक्ताचा एक उपयोग
पुडिंग
In reply to बोकडाच्या रक्ताचा एक उपयोग by नठ्यारा
रक्ती, रत्ती वगैरे