Skip to main content

२०२४ लोकसभा निवडणूक.

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 22/04/2024 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

वाचने 35072
प्रतिक्रिया 396

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निवडणुक आयोगाने घेतलेला निर्णय आहे... आणि संविधानात लिहिल्या प्रमाणे ते स्वायत्त आहे. आता तुमचा, संविधानावरच विश्वास नसेल तर गोष्ट वेगळी...

In reply to by मुक्त विहारि

आणि संविधानात लिहिल्या प्रमाणे ते स्वायत्त आहे. आहे नाही होता. आहात कुठल्या जगात? खो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्याम रंगीलासह ३८ जणांचे उमेदवारी अर्ज नाकारले; काय आहेत नियम? https://www.loksatta.com/explained/varanasi-pm-modi-shyam-rangeela-nomi… मी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असल्याने याची प्रक्रिया मला माहीत नव्हती. मी शपथ घ्यायला हवी असे मला कोणी सांगितले नाही. आता ते म्हणत आहेत शपथेती पूर्तता झाली नाही, त्यामुळे अर्ज नाकारला गेला आहे, खालील नियम पण वाचून बघा.... Loksatta logo APP Sign in ट्रेंडिंग IPL Quiz Election Quiz प्रीमियम Exam Alert Plus नरेंद्र मोदी शरद पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आढावा मतदारसंघांचा २०२४ Header Banner Marathi News Explained Varanasi Pm Modi Shyam Rangeela Nomination Cancelled Rac पंतप्रधान मोदींविरुद्ध उभा असलेल्या श्याम रंगीलासह ३८ जणांचे उमेदवारी अर्ज नाकारले; काय आहेत नियम? उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. Written by एक्स्प्लेण्ड डेस्क May 16, 2024 17:30 IST Follow Us कॉमेंट लिहा shyam rangeela nomination पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. (छायाचित्र-एक्स/श्याम रंगीला) Lok Sabha Election 2024 उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याने मंगळवारी (१४ मे) उत्तर प्रदेशमधील प्रतिष्ठित जागा असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, ३८ नामांकनं फेटाळण्यात आली, तर पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अजय राय यांच्या प्रतिज्ञापत्रांसह १७ प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यात आली. रंगीला यांचे नामांकन निवडणूक आयोगाने का फेटाळले? उमेदवारी नाकारण्याचे काय नियम आहेत? याबद्दल जाणून घेऊ या. श्याम रंगीला याचा अर्ज फेटाळला “माझी उमेदवारी नाकारण्यात आली आहे, कारण मी येथून निवडणूक लढवू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी एकटा असूनही त्यांनी मंगळवारी दुपारी ३ नंतर माझा उमेदवारी अर्ज घेतला. मी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असल्याने याची प्रक्रिया मला माहीत नव्हती. मी शपथ घ्यायला हवी असे मला कोणी सांगितले नाही. आता ते म्हणत आहेत शपथेती पूर्तता झाली नाही, त्यामुळे अर्ज नाकारला गेला आहे,” असे त्याने बुधवारी (१५) ‘ द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. आणखी वाचा arvind kejriwal ‘मोकळय़ा’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज! Ajit Pawar, mother, Ajit Pawar latest news, माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले? Baramati lok sabha seat, ajit pawar, sharad pawar, sunetra pawar, supriya sule, sunetra pawar vs supriya sule, ajit pawar vs sharad pawar, khadakwasla, purandar, daund, indapur, Baramati, bhor, मतदारसंघाचा आढावा : बारामती, काका-पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार ? Shyam Rangeela vs PM Narendra Modi in Varanasi मोदींची नक्कल करणारा श्याम रंगीला वाराणसीतून निवडणूक का लढतोय? PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “देशाला लुटण्याची योजना…” Ajit pawar निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news, पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले… Ranjitsinh Mohite patil, Madha Lok Sabha, माढ्यात आमदार रणजितसिंह मोहिते भाजपकडून अघोषित बहिष्कृत हेही वाचा : वकिलाने खटला नीट न चालविल्यास गुन्हा दाखल करता येतो का?सर्वोच्च न्यायालय काय म्हणते? रंगीलाने मंगळवारी आरोप केला होता की, वाराणसीमधून पंतप्रधान मोदींच्या विरोधात उमेदवारी दाखल करू दिली जात नाही. मोदींची नक्कल केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेला रंगीला म्हणाला की, मी १० मे पासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी, त्याने असाही दावा केला होता की, १४ मेलाही रंगीला याला वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. वाराणसीसाठी उमेदवारी दाखल करण्याची ही शेवटची तारीख होती. याच दिवशी पंतप्रधान मोदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. १४ मे ला पंतप्रधान मोदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. (छायाचित्र-पीटीआय) “माझ्याकडे सर्व प्रस्तावक आणि कागदपत्रे आहेत, पण ते माझे नामांकन घेत नाहीत. तुम्ही माझे नामांकन नाकारू शकता, हा वेगळा मुद्दा आहे. पण, किमान माझे नामांकन स्वीकारा तरी,” असे रंगीला याने मंगळवारी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर सांगितले. त्यानंतर मंगळवारी रंगीला याने श्याम सुंदर या अधिकृत नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्याने ‘एक्स’वर पोस्ट केली, “माझे निवडणूक भविष्य सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात आहे, जे आपल्या लोकशाहीचे रक्षक आहेत.” उमेदवारी नाकारल्यानंतर पुन्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये रंगीला याने आरोप केला आहे की, “निवडणूक आयोगाने वाराणसीमधील निवडणुकांना एक खेळ केले आहे. आज माझा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. मी सर्व कागदपत्रे जमा केली. आज जिल्हा दंडाधिकार्‍यांनी मला सांगितले की, माझ्या कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत आणि मी शपथ घेतलेली नाही. त्यांनी वकिलांना माझ्याबरोबर येऊ दिले नाही आणि मला एकटे बोलावले.” “दुसरी गोष्ट म्हणजे माझा अर्ज १४ मे रोजी दुपारी २.५८ वाजता स्वीकारण्यात आला. मी १० मेपासून इतर अनेकांसह अर्जासाठी प्रयत्न करत होतो, माझ्या मित्रालाही मारहाण करण्यात आली”, असा आरोप रंगीलाने केला. वाराणसीमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यापूर्वी फेटाळण्यात आलेले अर्ज एप्रिलमध्ये आयोगाने सूरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. २१ एप्रिल रोजी सूरतच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सौरभ पारधी यांना प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तीन प्रस्तावकांनी फॉर्मवरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नसल्याचा दावा केला होता; ज्यानंतर त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले. सूरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज याच कारणावरून फेटाळण्यात आला. उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर २२ एप्रिल रोजी भाजपाचे सूरतचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या महिन्यात बिहारमधील बांका लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जवाहर कुमार झा यांनी रिटर्निंग ऑफिसर विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ३६(४) मध्ये असे नमूद केले आहे की, रिटर्निंग ऑफिसर नामांकन अर्ज कोणत्याही दोषाच्या आधारावर नाकारू शकत नाहीत. याचिकेत असेदेखील सांगण्यात आले की, निदर्शनास आणून दिले की उमेदवारी अर्ज नाकरण्यासाठी निकष परिभाषित केले गेलेले नाहीत. निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान एक दिवसाची संधी प्रदान करावी, असेही या याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले. उमेदवारी अर्ज नाकारण्याचे नियम निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर, निवडणूक अधिकारी त्यांच्या कागदपत्रांची छाननी करतात, ज्यांचे अर्ज रिटर्निंग ऑफिसरने मंजूर केले तेच उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरतात. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम ३६ निवडणुकीतील रिटर्निंग ऑफिसरद्वारे उमेदवारी अर्जाच्या छाननीशी संबंधित आहे. उमेदवारी नाकारण्याची कारणे काय? -जर उमेदवार भारताचा नागरिक नसेल किंवा त्याचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल (सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत) -उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रस्तावकांनी रिटर्निंग ऑफिसर किंवा सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर यांच्यासमोर अर्ज सादर केला नसेल. -उमेदवारी अर्ज अंतिम मुदतीनंतर, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा नामांकन भरण्याच्या कालावधीत दुपारी ३ नंतर सादर केल्यास. -स्वाक्षरीशी संबंधित विसंगती असल्यास किंवा फॉर्ममधील तपशील पूर्ण नसल्यास. उमेदवाराने शपथपत्र घेतले नसेल तरीही त्याला बाद केले जाऊ शकते. -शासकीय सेवेतून काढून टाकलेला उमेदवार निवडणुकीत उभा असल्यास, त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलेले नाही, याचा पुरावा सादर करावा लागतो. पुरावा सादर केला नाही, तर त्याचा उमेदवारी अर्ज नाकरला जातो.

In reply to by मुक्त विहारि

उमेदवारी नाकारण्याची कारणे काय? -जर उमेदवार भारताचा नागरिक नसेल किंवा त्याचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल (सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत) -उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रस्तावकांनी रिटर्निंग ऑफिसर किंवा सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर यांच्यासमोर अर्ज सादर केला नसेल. -उमेदवारी अर्ज अंतिम मुदतीनंतर, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा नामांकन भरण्याच्या कालावधीत दुपारी ३ नंतर सादर केल्यास. -स्वाक्षरीशी संबंधित विसंगती असल्यास किंवा फॉर्ममधील तपशील पूर्ण नसल्यास. उमेदवाराने शपथपत्र घेतले नसेल तरीही त्याला बाद केले जाऊ शकते. -शासकीय सेवेतून काढून टाकलेला उमेदवार निवडणुकीत उभा असल्यास, त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलेले नाही, याचा पुरावा सादर करावा लागतो. पुरावा सादर केला नाही, तर त्याचा उमेदवारी अर्ज नाकरला जातो.

मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य ------- "1977 साली मोरारजी देसाई यांना जी मान्यता होती, त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे” ------ मान्य आहे..... राहुल गांधी हे परमपूज्य व्यक्तिमत्त्व आहे, हे बरेच लोक मान्य करतात. ते लीटर मध्ये पीठ मोजू शकतात...

In reply to by मुक्त विहारि

ते लीटर मध्ये पीठ मोजू शकतात... काही लोक जिल्ह्याना राजधान्या असतात सांगतात.( इंग्रजी येत नसल्याने कॅपिटल म्हणजे काय हे त्या महात्म्याला माहित नसावे) ढगाद्वारे रडार थांबतात, आणि बाय रोड हेलिकॉप्टर ने येतात. (टीप- मुविकाकांचा हा प्रतिसाद जिथे जिथे येईल तिथे माझा हा प्रतिसाद असेलच. विधवा विलाप करणाऱ्या अंधभक्तानी आधी आपल्या गोटातील मुविकाकना समज द्यावी.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचे प्रतिसाद वाचले की, माझे मत अजून पक्के होत जाते...

In reply to by मुक्त विहारि

भुखे नंगे रहेंगे ! राहुलजी को जिताएंगे !! हमारा नेता कैसा हो ... राहुल गांधी जैसा हो !!

In reply to by मुक्त विहारि

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

In reply to by सुबोध खरे

माझ्या मते ते त्यांना नादाला लावतायत... खुळखुळा देत... =))

In reply to by अहिरावण

मुविकाका नादाला लावत आहेत ... असे वाचावे. उगाच टण टण उड्या मारु नये... त्रास होईल.. =))

In reply to by अहिरावण

उगाच टण टण उड्या मारु नये... त्रास होईल.. =)) डॉक्टरना असा प्रतिसाद?

In reply to by मुक्त विहारि

हॅ हॅ हॅ बालकांना शब्दार्थ, ध्वन्यार्थ, लक्षणार्थ, हेत्वार्थ, उपरोध, उपहास यातले फरक कळत नसातात. त्यांना फक्त एकच माहिती खुळखुळा.... उलुलुललुलुलु =)) आपण अशांना खुळखुळा देऊन नादी लावून द्यायचं =))

In reply to by सुबोध खरे

केजरीवाल यांची अवस्था सध्या तरी , घी देखा लेकीन, बडगा नहीं देखा, अशी झाली आहे... दारू घोटाळ्या बाबतीत, घी, ह्या शब्दाला चांगलाच अर्थ आहे....

मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकरांचे हाल - मेट्रो बंद, रस्ते ठप्प, विरोधक भडकले. https://www.msn.com/mr-in/news/other/%E0%A4%AE-%E0%A4%A6-%E0%A4%82%E0%A…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वतःची आरती ओवाळून घेण्यासाठी लोकांचे हाल करायचे??

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पुढे आलं आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. https://www.loksatta.com/maharashtra/rohit-pawar-criticized-pm-narendra…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खलिस्तानी नाहि घोषित करता येणार हे अंधभक्तांच दुःख मी समजू शकतो.

*"भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी* https://shorturl.at/clIR7 https://www.lokmat.com/national/arvind-kejriwal-says-bjp-will-remove-yo…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

केजरीवालांची भविष्यवाणी
आपल्याच पक्षाच्या महिला खासदाराला आपल्या हस्तकाकरवी मारहाण करविणारे?

In reply to by कांदा लिंबू

हे कुणी ठरवलं? ठरकी ईडी ने की?? जज मोदीने? की जज शहाने??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्याला इडी कशाला लागते? बाईसाहेबांनी तक्रार केली म्हणजे झालं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्याचंच बोलतोय.
पण तुमचे साहेब तर गुद्द्यांचच बोलत आहेत. बाई माणसावर हात उचलण्याची पाळी आली! अरेरे किती ते अधःपतन!

In reply to by कांदा लिंबू

या फुरोगाम्यांवर देखील काय पाळी आलीये! कुणाचं समर्थन करावं लागतं आहे!

In reply to by कांदा लिंबू

माणसावर हात उचलण्याची पाळी आली! ब्रिजभुषण, रेवण्णा ह्यांनीं केलेले बलात्कार त्याचं काय?? मोदी साहेब मेट मागत फिरतात ह्यांच्यासाठी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विषय भरकटवणे, तुम्हाला अजिबात जमत नाही....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग जज मोदीने निर्णय सुनावला का?
ते जज कुठे होते? ते तर बिहारची माजी उपमुख्यमंत्री होते. परवाच निवर्तले. त्यांना श्रद्धांजली.

In reply to by कांदा लिंबू

गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं ठीक नाही.

दरम्यान परवा न्या. अभय ओक यांनी ईडीची अक्राळविक्राळ वाढलेली आणि सतत विरोधकांना भोसकण्यासाठी वापरली जाणारी, खूपच लांब वाढलेली घाणेरडी नखं काढून फेकून दिली. ईडीला पार शेळी करून टाकली. Prevention of Money Laundering Act अर्थात पीएमएलए मध्ये मोदी शहांनी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर २०१९ मध्ये घातक बदल केले आणि वाॅरंटशिवाय ईडी कोणालाही कधीही अटक करू शकते अशी तरतूद केली. ती तरतूद विरोधकांचा छळ करण्यासाठी होती हे गेली पाच वर्ष दररोज दिसत होतं. याच आधारे भ्रजपानं पाच वर्ष देशात अनैतिक आणि घृणास्पद धुमाकूळ घातला, विरोधी पक्षात दहशत माजवली. परवा न्या. ओक यांनी नि:संदिग्धपणे सांगितलं की अटकेचे आदेश देण्याचे अधिकार फक्त कोर्टाकडे आहेत, ईडीकडे नाहीत. हा फार महत्वाचा निर्णय आहे. ईडीच्या दहशतीचं जे मुख्य कारण होतं- कधीही अटक करणं आणि जमानत मिळू न देणं- त्यालाच सर्वोच्च न्यायालयानं सुरूंग लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. - विश्वंभर चौधरी ह्यांच्या चेपू भिंती वरुन. आता खुनशी जोडगोळीचं कसं होणार?? सेटलमेंट, तोड्यापाण्या, भाजपभरती, पक्षफोडी, गद्दार तयार करणे ह्या गोष्टी कश्या करणार?? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा त्या विश्वभार चौधरीचा काय ऐकताय ? अटक करणे हा पोलिसांचा मूलभूत अधिकार आहे. त्यानी नाहीतर कुणी अटक करायची? Supreme Court on Thursday ruled that Enforcement Directorate officials have no power to arrest an accused if he had not been arrested before the special court took cognisance of the complaint. Once cognisance is taken ED officials cannot exercise the power of arrest of the accuused Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/110187365.cms?utm_source… एकदा मामला न्यायालयात गेला कि त्यानंतर इ डी ला संशयिताला अटक करण्याचा अधिकार नाही. एक तर त्या विश्वभार चौधरीने काही तरी खोडसाळ पणे लिहिलेले असेल. किंवा आपण नीट न वाचताच (किंवा आपली कायद्याची समाज तितपतच आहे) कळफलक बडवलाय -जे आपण कायमच करत आला आहात.

In reply to by सुबोध खरे

किंवा आपली कायद्याची समाज तितपतच आहे हो. कायद्याची समज कमी आहे माझी, मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही. पण आली ऑर्डर की सूट करा तोड्यापण्या हे ईडीच बंद होईल ना? जर केस कोर्टात गेली तर?? तास झाल तर मग खुनशी जोडगोळी तोड्यापाण्या, भाजपभरती, सेटलमेंट कशी करणार अशी चिंता मला लागून आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अशी चिंता मला लागून आहे. हायला भाजप ची चिंता तुम्हाला लागली आहे? प्रकृती तपासुन घ्या बरं काही तरी गंभीर आजार झाला कि काय?

In reply to by सुबोध खरे

भाजपची नाय हो. खुनशी जोडगोळीची, कारण सत्तापिपासू आहेत दोघे, पुलवामा खर्च घडला की घडवला हेच कळत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुलवामा खर्च घडला की घडवला हेच कळत नाहीये. ज्या अर्थी, काँग्रेसचा ह्या गोष्टी वर विश्वास नाही, त्याअर्थी, ही गोष्ट नक्कीच पाकिस्तानने घडवलेली असावी ... काँग्रेस पक्ष, नेहमीच, चीन आणि पाकिस्तानची तळी उचलत असतो...

भाजपला आर येस येस ची गरज नाही. :) https://indianexpress.com/article/political-pulse/nadda-on-bjp-rss-ties… संघाच्या लोकानी आता सतरंज्य उचलायला नी फुकट जेवायला भाजपच्या कार्यालयात जाऊ नये नाहीतर थोबाडावर चप्पल हाणतील :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजपा आयटी सेल च्या माध्यामातुन येणारी अनागोंदी आणि उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस अशा ताब्यात असलेल्या मीडियाच्या पुढे जाऊन 'ध्रुव राठी' एकटा सरकारला पुरला बघा. जय-पराजय निवडणुकीत होत राहतील. पण या निवडणुकीत विरोधी पक्षाला माध्यमांचा वापर करुन जे जमले नाही ते ध्रुव राठीने सरकारचे भांडाफोड़ करणारे व्हीडीयो टाकून केले आणि विरोधी पक्षाला ताकद दिली असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी ठीक आहे पण एका बुणग्याच्या शक्तीवर विरोधी पक्ष उभा असेल तर त्यांचा पाया किती भुसभुशीत आहे हे समजून येते. हाच ध्रुव राठी "रुस्तुमेजमान" हा शिवाजीमहाराजांच्या सैन्यात सैनीक होता म्हणून म्हणतो त्याचा इतिहास किती पक्का असावा?

“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य! https://www.loksatta.com/elections/sharad-pawar-claims-narendra-modi-wi… ------- “महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. एकतर इथलं गुंतवणुकीसंदर्भातलं सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण करावं लागेल. जर कुणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पूर्वी त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रासाठी होती. पण आता ते घडताना दिसत नाहीये. हे राज्यातल्या नेतृत्वामुळे घडत आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले. ------ एन्रॉन प्रकरण, कोकणातील रिफायनरी प्रकरण, मेट्रो प्रकल्पाला झालेला विलंब, बुलेट ट्रेनला झालेला विलंब, बघीतला तर , कशाला कोण उगाच गाजरे हुंगत बसेल?

In reply to by मुक्त विहारि

“महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. +१ महाराष्ट्रतील प्रकल्प गुणरातला पाठवणाऱ्या नी महाराष्ट्र बकाल करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भाजप पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवे. पवार साहेबांमागे महाराष्ट्रातील तरुण नी महाराष्ट्रप्रेमी नागरिक उभे आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पवार साहेब काहीतरी संदिग्ध विधान करतात. ज्याला शेंडा किंवा बुडखा नसतो आणि "चहा बिस्कीट" पत्रकार त्यांचा उदो उदो करताना साहेब किती हुशार म्हणून गुणगान गात असतात पवार साहेबांमागे महाराष्ट्रातील तरुण नी महाराष्ट्रप्रेमी नागरिक उभे आहेत. असं होतं तर साहेबाना आजतागायत मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत कि कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. आता तर काय, पक्ष आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) सुद्धा हातात राहिलं नाही. आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली. काळ सूड उगवतो तो असा.

In reply to by सुबोध खरे

आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या ते तर सनातन्यना पुरून उरून पुरोगामी विचार महाराष्ट्रात रुजवते झाले. मग विद्वेषाचे राजकारण आले कुठून?? संघात तर ते कधीच गेले नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली. वाताहत कुणाची झाली ते कळेलच काही दिवसांनी. शिवाजी महारजानीही संभाजी महाराजना दिलेरखानाकडे पाठवले होते. काही वर्षांनी औरंग्या महाराष्ट्रातच खपला. तसा हा औरंग्याही खपेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संघात तर ते कधीच गेले नाहीत... ह्यात , संघाचा काय संबंध?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आवरा!

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, आपल्या इतका जालावर कोणत्याच विषयाचा कोणाचाच आपल्या इतका जगात अभ्यास कोणाचाच नाही, हे मला जवळ जवळ मान्य झालं आहे. शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचं चार-पाच वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं, केंद्रात संरक्षण मंत्री राहीले, कृषीमंत्री राहीले, महाराष्ट्राच्या राजकारणात याही वयात दबदबा राहिला. भले आपल्या दृष्टीने त्यांचं राजकारण द्वेषाचं राहीलं असेल पण महाराष्ट्रभर शरद पवारांची आजही वय वर्ष ८५ असतांना ते बोलले की त्यांचं बोलणं एक राष्ट्रीय बातमी असते, राजकारणातली एक महत्वाची घडामोड असते, याचं नेमकं काय कारण असेल हे आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो. उत्तर विषयानुरुप दिलेच पाहिजे अशी अपेक्षा नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तीन उदाहरणे देतो... १. पुलोद स्थापन केली आणि शेकाप संपला.. हा योगायोग.. २. मागच्या निवडणुकीत, मनसेला पाठिंबा दिला आणि मनसे जवळपास संपुष्टात आली... ३. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती केली आणि शिवसेना फुटली... ----- बाय द वे, मी तर, जेमतेम दहावी पास शेतकरी आहे. मला तरी, इतकेच समजले की, माननीय शरद पवार यांच्या हातात जोर आहे. ज्या, पक्षाच्या खांद्यावर किंवा व्यक्तीवर हा हात पडतो, त्या व्यक्तीला कुणीच विसरू शकत नाही....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचं चार-पाच वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं एकदाही ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याचे उत्तर देता येईल का? केंद्रात संरक्षण मंत्री राहीले, तेंव्हा लष्कराचे कॅन्टोन्मेंट खाजगी करण्याचा आणि भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा कुटील डाव रचला होता. सुदैवाने केंद्रातील नोकरशाही आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हा हेतू हाणून पाडला अन्यथा आज पुण्यातील लष्कर भाग हा एकमेव हिरवा असलेला पट्टा काँक्रीट जंगल झाले असते. कृषीमंत्री राहीले शेतकऱ्यांचा एक तरी प्रश्न तडीस लावला का? सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्याच काळात झाल्या आहेत आणि पुण्याच्या इतर भागातील पाणी त्यांनी बारामतीला वळवून घेतले. सत्तेचा गैरवापर करून आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचा हा प्रकार अत्यंत निम्न दर्जाचा आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/maharashtra-bid-to-en… त्यांचं बोलणं एक राष्ट्रीय बातमी असते. याच्या इतका ताजा विनोद मी बऱ्याच दिवसात ऐकलं नव्हता. बिरुटे सर चहा बिस्कीट पत्रकारांच्या रांगेत तुम्ही सुद्धा उभे असावे यासारखी नामुष्कीची गोष्ट दुसरी नसावी. साहेबाना आजतागायत मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत कि कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. आता तर काय, पक्ष आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) सुद्धा हातात राहिलं नाही. आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली. यातील एक तरी मुद्दा खोडून काढता येतो आहे का हे विषयाला फाटे न फोडता सांगा बरं.

In reply to by सुबोध खरे

डॉ.साहेब, आपल्या इतका जाणकार अभ्यासु माणूस जगात नाही अशी पहिलीच ओळ लिहिली आहे. त्यामुळे सगळी उत्तरं तुम्हालाच माहिती आहेत. आम्ही येरे गबाळ्यांनी आपल्या समोर काय लिहावे ? महाराष्ट्राचे राजकारण आणि घड़ामोडीच अशा घडत होत्या की ते चार वेळा मुख्यमंत्री राहुनही कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही, त्यामुळे त्यांच्या राजकीय कर्तुत्वाला नाकारायचं काहीही कारण नाही. बाकी, कृषिमंत्री असतांना स्वामिनाथन आयोग नेमला, शेतक-यांची कर्ज माफी केली, शेतमालाला भाव दिला, नव्या योजना दिल्या. अधिक इथे वाचावे. सरंक्षण मंत्री असतांना काय केलं. थोडंसं गुगलं असतं तरी बरीच माहिती मिळेल. आपण संरक्षण विभागात होता तर अधिकची माहिती आपणच सांगितली पाहिजे. पण, काय आहे, आपल्या विचारात अंधभक्तीमुळे आपले विचार इतके संकुचित होत चालले आहे की रातांधळेपणासारखं तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. काळजी घ्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्वांटीटीपेक्षा क्वालिटी बघायची असते. नाहीतर विश्वगुरू दहावर्ष राहून गटारातून गॅस काढत बसले. गॅस निघाला नाही पण फुगे उत्साहाने उडवले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख वाचले. आवडले. पवारांसारख्या द्रष्ट्या पुरोगामी विचारांच्या नेत्याकडे महाराष्ट्र होता म्हणूनच आज आपण प्रगत होऊ शकलो नाहितर शेणपट्टा असता महाराष्ट्र. भाजप्यांनी वाट लावलीय शेणपट्ट्याची.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पवारांसारख्या द्रष्ट्या पुरोगामी विचारांच्या नेत्याकडे महाराष्ट्र होता म्हणूनच आज आपण प्रगत होऊ शकलो .... ------ मग, बुलेट ट्रेन बाबतीत आणि मेट्रो कार शेड बाबतीतली दिरंगाई, का रोखली नाही? ते पण सोडा, राजन नायर आणि टेल्को मधील संपा बाबतीत, संप लांबू नये, म्हणुन का प्रयत्न केले नाहीत? ते पण सोडा, गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी, गिरणी कामगारांच्या बाजूने मैदानात का उतरले नाहीत? -----