✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 04/30/2024 - 17:03  ·  लेख
लेख
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49811 वाचन

💬 प्रतिसाद (250)

प्रतिक्रिया

प्रचार...

बाबुराव
Wed, 05/01/2024 - 15:34 नवीन
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही " देशाच्या विकासाची फळं एकसमान पद्धतीने अल्पसंख्यकांना, विशेषत: मुस्लिमांनाही मिळावीत यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या संसाधनावर त्यांचा पहिला अधिकार असायला हवा'' असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. विद्यमान पंतप्रधान सत्ता निसटून जाते की काय भितीने वाटेल तसं बोलत आहेत. भक्तांनी तरी विवेक बाळगला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे

वामन देशमुख
Wed, 05/01/2024 - 16:24 नवीन
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही
असे नाही. मोदी काय प्रचार करत आहेत याच्याशी संबंध नाही. यावर मिपावर आधीही चर्चा झालेली आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने केलेले वक्तव्य - "I believe our collective priorities are clear: agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure, and the essential public investment needs of general infrastructure, along with programmes for the upliftment of SC/STs, other backward classes, minorities and women and children. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. The Centre has a myriad other responsibilities whose demands will have to be fitted within the over-all resource availability." "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे त्याचे सार आहे. अर्थात काँग्रेस त्यांच्या घोषित / अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे आणि त्यांची प्रत्यक्ष कृतीही तशीच आहे. संघप्रणीत भाजप मात्र हिंदूहितवादी असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात मात्र नेमके उलटे वागते! --- अवांतर: जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २०११ प्रस्ताव पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

https://thewirehindi.com

भागो
Wed, 05/01/2024 - 17:28 नवीन
https://thewirehindi.com/272820/loksabha-polls-manmohan-singh-modi-muslims/ वाचा. जेव्हा ट्रंप अशाच प्रकारच्या फेका फेकी करत होता तेव्हा अमेरिकेत एकाने एक वेबसाईट उघडली होती. रोजच्या फेका काऊंट मोजण्यासाठी. मला वाटतंय आता इकडे पण अशी वेबसाईटची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

फेकाफेकी करू नका.

बाबुराव
Wed, 05/01/2024 - 18:37 नवीन
प. मोदींनाच अर्थ कळला नाही. भक्त तरी काय करतील बिचारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

मतदान न करणे ?????

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 17:36 नवीन
मतदान न करणे हा काही उपयाय नाही मग तो श्रीमंत असो वा मध्यम वर्गीय कि गरीब काही देशात मतदान ना केलं तर दंड आहे ( खरंच हे पहा https://www.aec.gov.au/Elections/non-voters.htm अनि भाजप ने तुमच्या सर्व पेक्षा पूर्ण केली नाहीत म्हणून मग काय काँग्रेस वर्षूनवर्षे सत्ता द्यायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदनबाण +१, तुमच मतपरिवर्तन

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/01/2024 - 21:25 नवीन
मदनबाण +१, तुमच मतपरिवर्तन झाल ही आनंदाची गोष्ट आहे. मीपावरील अंधभक्तांचे डोळे उघडतील तो सुदीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार

कर्नलतपस्वी
Wed, 05/01/2024 - 12:00 नवीन
लोक मूर्ख आहेत का मतदान करायला? मला तर वाटतं जे लोक मतदानाच्या सुटी वर मस्त चील मारायला शहराबाहेर जातात ते खरे हुशार. शहरात थांबून उन्हात मतदान करनारे नी स्वतःला लोकशाहीचा आधारस्तंभ समजणारे पारकोटिचे मूर्ख आहेत. अबा भाषा सांभाळा. या देशात साठ सत्तर टक्के लोक मतदान करतात. एव्हढ्या लोकांना मुर्ख म्हणणे कितपत शहाणपणाचे आहे.....
  • Log in or register to post comments

कर्नल साहेब, मी देखील त्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/01/2024 - 14:44 नवीन
कर्नल साहेब, मी देखील त्या सत्तर टक्क्यात होतो. पण आताची परिस्थिती पाहा. देशात लोकशाही राहिली आहे का?? निवडणूक आयोग उघडपणे मोदीसाठी काम करतोय. मग अश्या वेळी मतदान घेण्याची तरी औपचारिकता निवडणूक आयोग का करतोय?? अश्या वेळी मतदान करणारे मूर्ख नाहीतर आणखी काय ठरतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

ठीक आहे, मोदींविरोधात योग्य

रामचंद्र
Wed, 05/01/2024 - 15:00 नवीन
ठीक आहे, मोदींविरोधात योग्य वाटेल त्या उमेदवाराला आपले मत देऊन कर्तव्य पार पाडा आणि मग छानपैकी पिकनिकला जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अबा रामचंद्र यांच्याशी....

कर्नलतपस्वी
Wed, 05/01/2024 - 16:06 नवीन
सहमत. मतदान टक्का वाढेल तर काही फरक पडू शकेल. जशी सत्ताधाऱ्यांची संख्या वाढेल तशीच विरोधकांची पण वाढेल. कदाचित Law of Satiety च्या अनुसार केवळ विरोधकांच्या सदस्य संख्येत वाढ होईल व सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवता येईल. पण इथे "सब घोडे बाराटक्के ", कौनसे घोडेपर दांव लगाये. तरीसुद्धा मतदान टक्का वाढायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

त्या उमेदवारामागे ईडी लावुंक

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/01/2024 - 21:46 नवीन
त्या उमेदवारामागे ईडी लावुंक त्रास देऊन त्याला त्याच्या मनाविरुद्ध भाजपात घेतलं तर? त्यापेक्षा नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

अशा परिस्थितीत नोटाचा पर्याय

रामचंद्र
Wed, 05/01/2024 - 22:36 नवीन
अशा परिस्थितीत नोटाचा पर्याय आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

देशात लोकशाही राहिली आहे का??

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 17:39 नवीन
देशात लोकशाही राहिली आहे का?? तुम्ही कोणत्या ग्रहावरून बोलताय? ९७० का काय मिलियन लोक मतदानास पात्र आहेत आणि त्याप्रमाणे मतदान होत आहे आणि म्हणे लोकशाही उरली आहे का जा मतदान करा आणि हाकलून द्या चड्डीवाल्यांना हाय काय आणि नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मतदार उत्तर कोरियातही आहेत.

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/01/2024 - 21:50 नवीन
मतदार उत्तर कोरियातही आहेत. पण त्याला लोकशाही नाही म्हणू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

यांचा नवीन शोध

चौकस२१२
गुरुवार, 05/02/2024 - 07:50 नवीन
ओके सर भारतात उत्तर कोरिया सारखीच परिस्थितीत आहे ! चला रे सगळे पाय धरा यांचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी केंव्हा पासून सांगतोय

सुबोध खरे
गुरुवार, 05/02/2024 - 10:20 नवीन
मी केंव्हा पासून सांगतोय कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सहमत आहे

अहिरावण
गुरुवार, 05/02/2024 - 13:21 नवीन
सहमत आहे बिनडोक अक्कलशून्यांच्या नादी लागू नये. ४ जुनला त्यांचे थोबाड फूटणारच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त

भागो
Wed, 05/01/2024 - 17:35 नवीन
समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त असणे ह्यात काही नवल नाही. काटजुन्च्या मते ९० टक्के. ऐसा है म्हणून तर दुनिया झुकती है. आणि वर बहुमताची लोकशाही. म्हणजे ६० टक्यातले ३५ टक्के मिळाले तरी पंतप्रधान होऊ शकतो. First person to touch the pole! राग माणू नका. ही सत्य परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

First person to touch the pole!

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 17:44 नवीन
मग त्यावर उत्तर काय? अशी पद्धत अनेक देशात आहे फक्त भारतीय पद्धत चुकीची आहे असे का? हे म्हणजे काहीसे असे झाले कि जर २०१६ साली ऑलिम्पिक मध्ये ज्याने १०० मीटर धावण्याचं शर्यतीत १० सेकंदात पळून सुवर्ण पदक मिळवले तर ते सुवर्ण पदक नाही कारण २०१२ साली सुवर्ण पदक ९ सेकंदात पळून मिळवले गेले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

ज्या पक्षाला जितकी मते मिळाली

भागो
Wed, 05/01/2024 - 18:50 नवीन
ज्या पक्षाला जितकी मते मिळाली आहेत त्या प्रमाणात त्या पक्षाने आपले सुयोग्य प्रतिनिधी लोकसभेत पाठवावे. ती लोकसभा देशाची खरीखुरी प्रतिनिधिक लोकसभा असेल. मला वाटत ही पद्धत ही काही देशात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

भागो आपण म्हणता ते बरोबर आहे

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 19:01 नवीन
भागो आपण म्हणता ते बरोबर आहे , बहुतेक नु झीलंड मध्ये आहे तसे ( पण तिथे २ संसद सभागृहे नाहीत ) पण त्याही पद्धतीत काहीतरी दोष आहेतच असो प्रश्न येथे हा कि नाआवड्ता पक्ष जिकायला लागलं कीच मग लोकांना "निवडणूक पद्धत" का आठवते आवडत पाकसह आलं जिकून तर विचारला जातो का हा प्रश्न ? दुसरो पद्धत म्हणजे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडलं जाणे पण त्यात हि धोके आहेत भारत , कानडा , ऑस्ट्रेल्या, बहुतेक पाकिस्तान पण येथे ब्रिटीश पद्धतीचे वेस्टमिनिस्टर पद्धत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

https://en.wikipedia.org/wiki

भागो
Wed, 05/01/2024 - 19:16 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Proportional_representation हे पहा विकीचे पान. सखोल चर्चा आहे इथे. आणि ही पहा देशांची यादी. थोड्या जास्त प्रमाणात हीच पद्धत फालो करत आहेत. https://worldpopulationreview.com/country-rankings/countries-with-proportional-representation सर, तुम्ही ओपन माइंड ठेवून लिहित आहात म्हणून मी रीस्पोंस देत आहे. ८०% हिंदू समाजाला १४% मुस्लीम समाजाची भीति वाटावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान

अहिरावण
Wed, 05/01/2024 - 19:22 नवीन
८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान करतात. - ४० टक्के १४ टक्के मुस्लिम १०० टक्के मतदान करतात - १४ टक्के एकूण ५४ टक्के. (आकडेवारी कमी जास्त) साधारण तीस टक्के मते मिळतात तो उमेदवार विजयी होतो ५४ च्या तीस टक्के १५-१८ टक्के म्हणजेच काही भागात मुस्लिम येनकेन प्रकारेण कोण निवडून यावा हे ठरवतात आणि मग तिथे हिंदूंची ससेहोलपट आणि मुस्लिमांचा वरचष्मा.. मुस्लिम मतदान करतात पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास नाही हिंदू मतदान करत नाहीत पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास त्रांगडं मोठं कठिण आहे.. आता कॉंगेस सत्तेवर आली तर हिंदूंची अवस्था जर्मनीतील ज्युंसारखी होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात

भागो
Wed, 05/01/2024 - 19:27 नवीन
आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात हा सगळ्यात LOL प्रतिसाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

हरकत नाही.

अहिरावण
Wed, 05/01/2024 - 19:31 नवीन
तुम्हाला मनसोक्त हसण्याची मुभा आहे. तेवढेच आमच्यामुळे तुमच्या चेह-यावर हास्य आले हे काय कमी आहे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

नाहीतर काय.

कॉमी
Tue, 05/07/2024 - 10:19 नवीन
नाहीतर काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

I hate Votebank Democracy

NiluMP
Mon, 05/06/2024 - 17:54 नवीन
I hate Votebank Democracy I would love to live in Shri Ram's RamRajya or Chhatrapati Swaraj
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

म्हणजे वो??

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 17:59 नवीन
म्हणजे वो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

Democracy without voting

NiluMP
Wed, 05/08/2024 - 16:48 नवीन
Democracy without voting system.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाबडंय

सुरिया
Tue, 05/14/2024 - 17:18 नवीन
भाबडंय गं. म्हणे दत्त दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

मतदान पद्धतीमुळे वोटबँक

NiluMP
Wed, 05/15/2024 - 00:46 नवीन
मतदान पद्धतीमुळे वोटबँक निर्माण झाली वोटबँक मुळे त्याचे लाड पुरविणे सुरु झाले, खैराती वाटणे सुरु झाले शहराशहरात अनधिकृत झोपडपट्या निमार्ण झाल्या, अनधिकृत घुसखोर वसवून वोटबँक निर्माण केल्या प्रत्येक धर्मासाठी इथं एक राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षात प्रत्येक जातीचा नेता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

साठ मधले पस्तीस

कर्नलतपस्वी
Wed, 05/01/2024 - 19:19 नवीन
बाकीच्या चाळीस ना कोणी घरात बसायला सांगीतल. बाहेर पडा सत्तर वाला प्रधान मंत्री निवडा. नाही तर पस्तीस वाला झेलावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

असं कसं ... बायकोला कबुल केलं

अहिरावण
Wed, 05/01/2024 - 19:24 नवीन
असं कसं ... बायकोला कबुल केलं आहे मतदानाच्या दिवशी पिकनिकला जायचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते?

वामन देशमुख
Wed, 05/01/2024 - 14:44 नवीन
संघप्रणीत भाजपला मोदींना पुन्हा पुन्हा सत्तेत बसविण्यामागे काय उद्देश आहे हे खरंच कळत नाही. म्हणजे सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? उदा. एका भ्रष्टवादी पक्षाला सत्ता हवी असते ती लहानमोठे घोटाळे, भ्रष्टाचार करून आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांना पैसे मिळवून देणे यासाठी. येनकेनप्रकारेण ते बऱ्याचदा त्यात यशस्वी ठरत आलेले आहेत. त्या पक्षाचे ते उघड ध्येय आहे आणि ते त्या ध्येयाशी प्रामाणिक आहेत. काळ्या विनोदाची झालर चढवून असे म्हणता येईल की त्या पक्षाच्या मंत्र्यांचा सकाळी दहा वाजता शपथविधी झाला तर मंत्रालयात जाऊन किमान काही कोटींचा एखादा घोटाळा करूनच ते दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतील. सत्ता कधीही जाऊ शकते हे समजून घेऊन ते लोक पहिल्या दिवसापासून कामाला लागतात! याउलट, केंद्रात व अनेक राज्यांत भाजप वर्षानुवर्षे सत्तेत आहे. पण अजून त्यांना हिंदूंचे शिर्डी साईबाबा मंदिर (आणि देशभरातील इतरही अनेक श्रीमंत मंदिरे) सरकारी तावडीतून सोडवून हिंदूंच्या स्वाधीन करता आलेली नाहीत. --- सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे लव जिहादला आळा घालणे शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे परदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे ... यादी मोठी आहे. अशा करण्यासारख्या असंख्य बाबी होत्या. संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार? हिंदू नागरिकांच्या मतदानाप्रती अनास्थेमागील मुख्य कारण हे असेल.
  • Log in or register to post comments

आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे

रामचंद्र
Wed, 05/01/2024 - 15:03 नवीन
आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचणं, आपल्याच समर्थकांना तोंडघशी पाडणं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हायला पन्नास वर्ष

कर्नलतपस्वी
Wed, 05/01/2024 - 22:46 नवीन
एकच वंश गादीवर, ते काय सरळ मार्गाने आलेत, अशा भ्रमात नका राहू. बाजपेयी सरकार एक मताने तडकाफडकी पाडले. तेव्हां कुणाला नाही पान्हा फुटला. घड्याळ रितसर फुटले धनुष्यातून बाण रितसर सुटले त्यात कुणाचे काय चुकले आता फक्त लक्षप्राप्ती कडे लक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 17:28 नवीन
संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार? भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ... अहो जरा परस्थिती समजवून घ्या कि -एक तर पहिली काही वर्षे प्रथम मिळालेली निर्विवाद द सत्ता स्थापित करण्यात गेली -फक्त हिंदूंचं हितासाठी असे उघडपणे करण्यापेक्षा देशाचे हित ज्यात हिंदूंचे हित आहे असे काही कायदे करणे जास्त योग्य भाजप ला वाटले आणि ते योग्य वाटते - देशा ची प्रतिमां जगात उभी करणे ( पाठीला कणा आहे हे दाखवून देणे या अर्थी ) , आर्थिक उलढाल वाढवणे, रस्ते रेल्वे सारखे उपक्रम आधुनिक करणे, बुडीत असलेली सरकारी संस्था सुधरवणे काश्मीर प्रश्न मिटवण्यासातिची काही पावले सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे आधीच भाजप ला शत्रू काही कमी आहेत का त्यात हिंदू हिंदू करणारेच जर भाजपचं जीवावर उठले तर असे होणार विचार करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

भाजप / संघ सत्ते वर आले कि

वामन देशमुख
Wed, 05/01/2024 - 17:55 नवीन
भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ...
१. "जादूची कांडी फिरवून हिंदूराष्ट्र केले कसे नाही" असे इथे कुणी म्हटले आहे? मी जे लिहिले आहे ते अगदी व्यावहारिक आहे. २. तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश, शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र आणि इतर श्रीमंत हिंदू मंदिरे सरकारी कचाट्यातून सोडवण्यासाठी जादूची कांडी लागते का? हे पहा - आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

व्यावहारिक

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 18:48 नवीन
सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे, तसे काही उघड केले तर "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकारांना व्यक्त होण्यावर बंदी आणली" म्हणून तुम्ही पण ओरडणार आणि डावखुरे पण त्यापेक्सह ज्या विषयांवर आता पर्यंत कलाकृती निर्माण करणे हे "टाबू / निषेधार्थ" समजले जायचे( किस कुर्सी का , आधी ) त्यावर चित्रपट तरी निघाले ( काश्मीर फाईल , स्वरकार इत्यादी ) हे हि नसे थोडके प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे ... नाहीये का? उलट विरोधक तरबोंबलतात कि गोदी मीडिया म्हणून परत चाणक्य नीती हि कि एकीकडे एन डी ती व्ही सारख्यांचा चेहरा बदलायचा आणि दुसरी कडे बरखा ते वागळेंना तुरंगात वैगरे टाकण्याकॅरीकेच १९७५ सारखा मुर्ख ना करणे ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे कसे करणार ? त्यासाठी हुकुमशाही यावी लागेल खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे काहीच प्रयत्न नाही केले? बार यात केवॉक भारतातील हुकेलेल शीख नाहीत तर त्यात पाकिस्तान आणि इतर देशातील हुकले शीख ( स्वात येथे ऑस्ट्रेल्यात याची उघड प्रचिती घेऊन हे बोलतोय ) आणि भारतविरोधी डावे आहेत .. दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे परत तेच जादूची कांडी कुठून अण्णांर हो? प्रयत्न नाही का चालू? तामिळनाडू, केरळ आणि नुसतेच दक्षिण नाही तर बंगाल आणि पूर्वे कंडील ७ राज्ये अहो अगदी "काऊ बेल्ट " असलेल्या उतार आणि मध्य भारतात भाजप ला सत्तेत यायला ४० हुन अधिक वर्षे लागली! लांबे रेस की घोडा ... लव जिहादला आळा घालणे तसा कायदा आहे ना ? आणि लव्ह जिहाद होते हे तरी उघडपणे बाहेर आलं पुर्वी "ठरविक समाजाच्या भावना दुखावतील" म्हणून सगळं गुपचूप शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे फक्त हिंदुहिता पेक्षा "जे सत्य आहे ते जास्त ठाम पाने मांडणे योग्य नाही का : खोटे हिंदू हित जर उर बडवून केले तर तालिबान आणि संघात फरक तो काय लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे हे काही कळले नाही नक्की काय ? हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे तसा कायदा आहे ना ? इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे हे थोडेफार पटले पण परत अप्रत्यक्ष रित्या आणि प्रत्यक्ष रित्या ( अंदमान विमानतळाला सावरकरांचे नाव देणं) यातून चालू आह ए, औरंगजेब मार्गाचे नाव बदलणे इत्यादी अगदीच काही नाही असे कसे? परदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे सी ए ए आहे ना? का माझी काहीतरी गैरसमजूत होतीय ? ... यादी मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

@ चौकस२१२

वामन देशमुख
Wed, 05/01/2024 - 19:41 नवीन
प्रतिसादाचा आशय समजला. मोदींनी त्यांच्या समर्थकांवर खरंच जादू केलीय! --- आज जसे मोदी करतात नेमके तसेच १०० वर्षांपूर्वी गांधी करायचे.
  • गांधींनी शहीद सुऱ्हावर्दीला माझा भाऊ म्हणून गौरविले, मोदींनी मुलायम सिंघांना पद्मश्री देऊन गौरविले.
  • गांधींनी भारतीयांपुढे स्वतंत्र भारताचे स्वप्न ठेवले, मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले.
  • गांधींनी भगतसिंगांना वाचविले नाही, मोदींनी राजा सिंहांना वाचविले नाही.
  • १९२१ मध्ये केरळात मोपल्यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले,
  • २०२० मध्ये बंगाली मुस्लिमांनी शेकडो हिंदूंवर अत्याचार केले मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
  • गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला.
  • शंभर वर्षांपूर्वी मुस्लिमांनी पाकिस्तानची तयारी सुरु केली आणि १९४७ मध्ये पाकिस्तान घेतला.
  • आज मुस्लिमांनी गझवा-ए-हिंद ची तयारी सुरु आहे आणि २०४७ मध्ये ते पूर्णच हिंदुस्थान घेणार आहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी गांधींनी हिंदूंना गुंगीत ठेवले आज मोदी ठेवताहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे,
  • नेमके तसेच ते आज मोदींचा उदोउदो करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

आज जग गांधींना महान म्हणत आहे

अहिरावण
Wed, 05/01/2024 - 19:52 नवीन
आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे. काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

उद्या मोदींना म्हणेल असे

अहिरावण
Wed, 05/01/2024 - 19:52 नवीन
उद्या मोदींना म्हणेल असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

आज जग गांधींना महान म्हणत आहे

कांदा लिंबू
Wed, 05/01/2024 - 21:39 नवीन
आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे. काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहे
LOL --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

इथे सुद्धा

कर्नलतपस्वी
Wed, 05/01/2024 - 22:49 नवीन
हिन्दूच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

मोदींनी हिंदूंपुढे विकसित

चौकस२१२
गुरुवार, 05/02/2024 - 06:17 नवीन
मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले. हे काही फक्त हिंदूंसाठी नाही ठेवले सगळ्या नागरिकांसाठी ठेवले.. आहे का असा नवीन कायदा कि ज्यात "फक्त हिंदूंसाठी विकास" अशी सोयाआहे ? गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला. दोन्हीत एक महत्वाचाच फरक आहे, खिलाफत चळवल हि भारताबाहेर होती भारतातील मुस्लिमांपैकी ९९ काय ९९. ९% टक्के हे मूळ भारतीय हिंदू आहेत आणि आज १४% + अधिक आहेत त्यामुळे संघाला त्यांना पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाहीच संघाची मूळ भावनाच अशी आहे कि देश आधी मग ते काँग्रेस ने केले तरी त्याला संघ पॅथीमबा देईल , कडवे हिंदुत्वचाय पेक्सह स्वरकरवाडी हिंदू व्याख्या संघाला साधय तरी अपेक्षित दिसतीय , या शिवाय वर्षानुवर्षे संघ म्हणजे मुस्लिम विरोधी हे चित्र बदलले तर बिघडले कुठे? परत एकदा इथंही स्वरकरांची हिंदू कोण हि व्याख्या डोळ्यसमोर ठेवता येईल आणि मग विचार करता त येईल कि संघ असे का करीत आहे शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे, असो पण तुम्ही म्हणत आहात तसे समाज फक्त व्यक्तिपूजा करीत असेल तर गांधी काय मोदी काय गावस्कर काय कि तेंडुलकर काय .. व्यक्तिपूजा हा आपल्या समाजचा डी एन या आहे असे समजूयात मग तक्रार का? चुपचाप भोगने भाग आहे , गांधींची व्यक्तिपूजा चालते पण मोदींची नाही ! हा कुठला न्याय ( अर्थात व्यक्तिपूजेचा समर्थक नाही, हे विधान फक्त जशास तसे हे दाखवण्यासारखे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

यासाठी सर्व हिंदू संघटना आणि

NiluMP
Mon, 05/06/2024 - 17:59 नवीन
यासाठी सर्व हिंदू संघटना आणि नेत्यांनी एकत्र येणे गरजचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

+१ आणी भाजपा सारख्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 18:04 नवीन
+१ आणी भाजपा सारख्या हिंदूद्रोही पक्षास सत्तेतून हाकलने गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! =

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 18:51 नवीन
स्टालिन च्या राज्यात झालाय ना तिथे भाजप आहे का सत्तेत ? मग त्यांची कशी चूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

सामाजिक उन्नती साठी ट्रिपल

वामन देशमुख
Wed, 05/01/2024 - 18:03 नवीन
सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे
कसली सामाजिक उन्नती? इस्लाममध्ये ट्रिपल तलाकला, हलाला निकाह, मुत्ताह निकाह यांना मान्यता आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे हा इस्लामच्या धार्मिक बाबीत सरकारी हस्तक्षेप आहे. त्याऐवजी जन्माने मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकच्या भीतीपोटी इस्लाम त्यागून सेक्युलर बनण्यासाठी प्रवृत्त करणे हे खरी सामाजिक उन्नती ठरली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

१) काँग्रेस ने शाहबानो

चौकस२१२
Wed, 05/01/2024 - 18:54 नवीन
१) काँग्रेस ने शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांवर मुल्ला लोकांचं दबावामुळे शेपूट घालून अन्याय केला २) भाजप ने ट्रिपल तलाक रद्द केला एक भारतीय नागरिक म्हणून ( हिंदू म्हणून नव्हे ) तुम्हीच सांगा समाजहिताच झाले नहि का हे काम? ( २)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा