मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांज

कुमार जावडेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर

वाचने 1471 वाचनखूण प्रतिक्रिया 2

राघव गुरुवार, 02/29/2024 - 22:37
खूप दिवसांनी सुंदर कविता/गझल वाचण्यात आली! :-)
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते
न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते
दोन्ही द्विपदी अप्रतीम! :-)