Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - मुखपृष्ठ

लेखक गवि यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुखपृष्ठ

वाचने 7881
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

मिपा एअरवेजचे विमान
लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने !

दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ ....

मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे

एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात.

In reply to by प्रचेतस

मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे

प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले.

मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !

चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच!

मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो?

गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !