Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बाबुराव on Sun, 10/08/2023 - 21:08
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा. वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
Live Cricket Scores
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
TeamsMatWonLostTiedNRPtsNRR
India (Q) 9 9 0 0 0 18 2.57
South Africa (Q) 9 7 2 0 0 14 1.261
Australia (Q) 9 7 2 0 0 14 0.841
New Zealand (Q) 9 5 4 0 0 10 0.743
Pakistan (E) 9 4 5 0 0 8 -0.199
Afghanistan (E) 9 4 5 0 0 8 -0.336
England (E) 9 3 6 0 0 6 -0.572
Bangladesh (E) 9 2 7 0 0 4 -1.087
Sri Lanka (E) 9 2 7 0 0 4 -1.419
Netherlands (E) 9 2 7 0 0 4 -1.825
  • Log in or register to post comments
  • 29945 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on Sun, 10/08/2023 - 21:12

Permalink

भारताचा पहिलाच सामना चुरशीचा

भारताचा पहिलाच सामना चुरशीचा होतोय, चेन्नईच्या मैदानात पडणाऱ्या दवामुळे कांगारूंना फिरक मिळत नाहीये, पिच थोडे सोपे झालेय असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/08/2023 - 21:52

Permalink

उत्तम सुरुवात.

भारताची विजयी सुरुवात. धाग्यावर येत राहीन...भारताला विजेता होण्यासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 10/08/2023 - 21:58

Permalink

क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय

क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय (खरं तर अडाच तीनशे देशातील इन मीन दहा पंधरा देश खेळतात त्याला विश्वचषक म्हणावे का? असो.) ह्यावेळेस हवी तशी क्रेझ पहायला मिळत नाहीये ह्याचा आनंदं आहे. लोकांना स्वतचा वेळ वाया घालवून क्रिकेटरांना पैसे कमावून देण्यापेक्षा स्वत पैसे कमवावे हे कळू लागलेय. हे क्रिकेटर कठीण काळात लोकांना किती मदत करतात हे कोरोना काळात दिसलेच. तथाकथीत देवाने बरीच टीका झाल्यावर नाईलाजाने पन्नास लाख दिले होते. क्रिकेट भक्तांनी क्रिकेट चा आनंदं स्वत पुरता ठेवावा, पण तसं होत नाही, ऊगाच परिसनल मॅसेज पाठवून क्रिकेट न आवडनार्यांना त्रास देणे, सोमीवर क्रिकेट शी संबंध नसलेल्या समुहात ऊगाच वाह्यात सारखे मॅसेज टाकणे, कुणीही दिसलं की स्कोर विचारणे, अमूक अमूक खेळाडून ह्या मैदानात अमूक अमूक काहीतरी फालतू रेकोर्ड केला असं पर्सनला पाठवणे, ह्यामुळे कधी एकदा ही स्पर्धा संपते किंवा भारतीय संघं बाहेर पडतो असे होते. भारतीय संघं बाहेर पडला की शांतता होते असा अनूभव आहे. काहींना क्रिकेट खेळाच्या वेळेस देशप्रेमाच्या ऊबाळ्या येतात. इतर खेळ चालू असतील तर हे देशप्रेम कुठे जाते कळत नाही. ओलींपींक मध्ये पदकं मिळाले नाही तरी अनेक क्रिकेट भक्तांना काहीही फरक पडत नाही. ना त्याचं दुख असतं ना शरम. असो. ह्या धाग्याला शुभेच्छा. ज्यांना आवडतं त्यांनी नक्की आनंदं घ्यावा फक्त इतरांना ऊगाच त्राय देऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 10/09/2023 - 21:37

In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली

Permalink

सहमत. ह्यावेळीला एशियन गेम्स

सहमत. ह्यावेळीला एशियन गेम्स ही सुरु असल्याने नीरज चोप्राचा खेळ पाहत होतो. पारुल चौधरी ची धाव परत परत पाहिली. क्रिकेट च्या कोणत्या मॅचेस सुरु आहेत ह्याबाबत काहीही उत्सुकता नव्हती. ९२ च्या ऑस्ट्रेलियातिल विश्वचषकाच्या वेळी पहाटे उठुन सामना पाहत असायचो पण आता क्रिकेट बद्दल तितकीशी आस्था उरली नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 10/09/2023 - 23:14

In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली

Permalink

क्रीकेट.....

Crickets are orthopteran insects which are related to bush crickets, and, more distantly, to grasshoppers. मला यांना बघायला आवडते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 10/10/2023 - 10:05

In reply to क्रीकेट..... by कर्नलतपस्वी

Permalink

खिक्क.

खिक्क.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 10/08/2023 - 22:23

Permalink

शेवट ...

शानदार, धुवाधार. पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्णिका on Mon, 10/09/2023 - 00:03

Permalink

भारताची मस्त शानदार सुरुवात !

भारताची मस्त शानदार सुरुवात ! के एल राहुलचे शतक झालं असतं तर अजून छान वाटले असते :)
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Mon, 10/09/2023 - 11:12

Permalink

वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ

वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ मोजकेच आहेत आणि त्यांत क्रिकेट वरच्या नंबरवर आहे. क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२. पण क्रिकेट मध्ये अनेक प्रकारचे वर्ल्ड कप आहेत. बेसबॉल मध्ये एकूण १६ टीम्स वर्ल्ड कप मध्ये भाग घेतात. क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे. स्पॉन्सर्स हवे तर खूप लोकांनी तो सामना पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो. मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे. जाणकारांच्या मते बाळ हिप्पो ने BCCI ची बऱ्यापैकी वाट लावली आहे पण लोक त्याबद्दल बोलायला घाबरतात. (राजकीय विषयास बंदी असल्याने इथे नाव घेत नाही). ह्या वर्षाचा वर्ल्ड कप सर्वांत मोठा फ्लॉप ठरेल असे भाकीत ads क्षेत्र बोलून दाखवत आहे. सर्वप्रथम म्हणजे चुकीचा दिवशी आणि चुकीच्या स्थानी सामने खेळवले जात आहेत. ओपनिंग चा सामना सुट्टीच्या दिवशी ठेवला नाही. ओपनिंग सेरेमनी ठेवला नाही. व्यवस्थित संगीत, नृत्य वगैरे ठेवून ओपनिंग केले नाही. (ह्याची कारणे राजकीय मानली जात आहेत). ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांतून भरपूर पर्यटक यावेत ह्यासाठी योग्य पद्धतीने मार्केटिंग केले नाही , विमानसेवा सोबत काम करून चार्टर प्लेन्स , हॉटेल पॅकेजेस वगैरे सर्व काही किमान एक वर्ष आधी केले पाहिजे होते. ह्या सर्व गोष्टींसाठी ह्या कन्सल्टिंग कंपन्या कामाला लावल्या पाहिजे होत्या त्या न लावता आपल्या धंदोमॅक्स मंडळींना पुढे काढण्यात आले. ह्या वर्ल्ड कप चे मास्कोट अत्यंत भिकार आहेत. कुणी तरी शालेय गॅदरिंग मधील पोरांनी विचित्र कपडे घालावेत असले काही. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांना शुभेच्छा, मी ads क्षेत्राशी संबंधित असल्याने भरपूर धन प्राप्ती व्हावी हीच मनीषा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 10/09/2023 - 12:19

In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना

Permalink

वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत

वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत. वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ मोजकेच आहेत आणि त्यांत क्रिकेट वरच्या नंबरवर आहे. >>>>> भारतीय ऊपखंड सोडला तर इतर देशात क्रिकेटला फारसा जनाधार नाही. तथाकथीत देवाला ही मारीया शारापोवा ने “हा कोण?“ असं विचारून दाखवलं होतं क्रिकेटचं महत्व. त्यामुळे वरच्या नंबरवर ह्या शब्दास आक्षेप. क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२. >> क्रिकेट मधल्या दहा टिम्स मध्ये अनेक टिम्स काहीही कामाच्या नसतात. सध्या फक्त द. आफ्रीका, न्यूझीलॅंड, इंडीया, पाक, लंका, इंग्लंड, ओस. ह्या ७ टीम फक्त खेळण्यालायक आहेत. इतर टीम गर्दी वाढवावी म्हणून आणल्या जातात. ह्याऊलट फूटबोलच्या ३२ टीम मध्ये पात्र व्हायला प्रचंड स्पर्धा असते. भारत आजपर्यंत पात्र झाला नाहीये. अमेरीकेच्या बाजूला फक्त ६० हजार लोकसंख्या असलेला देशही पात्र झाला होता. क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे. फुटबाॅलच्या तुलनेत नगण्य खर्चय. परत मध्ये मध्ये प्रत्येक ओवर नंतर, विकेट नंतर जाहीरात दाखवता येते. खरंतर स्पोन्सर्स नाहीत कारण खेळाला भारत सोडला तर इतर देशात कुत्रं विचारत नाही. त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो. चुक. दहाच्या वर टीम्स घ्यायला देशही ऊत्सूक हवेत खेळायला. इतर देशात ह्या खेळाबद्दल जराही ऊत्सूकता नसते. ते संघच पाठवत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाही. त्यामुळे आयर्लंड, अफगानीस्तान असले पांचट संघ आणून मॅचेस भरवल्या जातात. मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे. आजीबात नाही. क्रिकेट ही भारताला लागलेली कीड आहे. क्रीकेटमुळे इतर खेळांना नी खेळाडूंना प्रसिध्दी मिळत नाही. धनराज पिल्लेंना तर घरासाठी वनवन फिरावं लागलं होतं. सरकारने पदक जिंकल्यावर धोषणा केली होती पण घर काही दिलं नाही. त्यांना घर बाळासाहेबांनी मिळवून दिले. त्यामुळे इतर क्षेत्रात खेळाडू करीअर करण्यास धजावत नाही. त्या मुळे चार दोन पदकं मिळाले तरी आपण ऊड्या मारतो. बाकी बाळ हिप्पो तिथे समाजसेवा, देशसेवा,खेळसेवा करायला गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या कडून अपेक्षा ठेऊ नयेत. तसेच पवार बीसीसीआय चे अध्यक्ष झाल्यावर “राजकारणई खेळात नको“ म्हणबन ओरडनारे आता बाळ हिप्पोला पाहून वाळूत मान खुपसून बसलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 10/10/2023 - 10:51

In reply to वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत by अमरेंद्र बाहुबली

Permalink

त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी

त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाही
क्रिकेट चा समावेश अशा स्पर्धांमधे व्हावा अशी आय सीसी चीच इच्छा नाहिय्ये. यात आर्थीक हितसंबंध गुंतलेले आहेत. आयपील च्या स्पर्धा भरवता याव्यात म्हणून या एशियाड मधे २०-२० चा समावेश केला गेला नाही. आयसीसी चे सोडा पण जी बीसीसीआय भारताचे प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 10/10/2023 - 13:22

In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ

Permalink

प्रतिनीधीत्व करते ती खाजगी

प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही हेच. बीबीसीआय चा संघ जिंकला किंवा हरला तर देशप्रेमाच्या ऊबाळ्या येनार्यांना हो लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 10/12/2023 - 06:03

In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ

Permalink

> आयसीसी चे सोडा पण जी

> आयसीसी चे सोडा पण जी बीसीसीआय भारताचे प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही म्हणूनच क्रिकेट हा खेळ भारतांत लोकप्रिय आहे, लक्षावधी लोकांना रोजगार पुरवतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा आहे. मंत्रालयाच्या नादि असता तर कधीच हॉकी प्रमाणे खेळाडू भीक मागताना दिसत आले असते. भारताचे जितके खेळ बजेट नाही त्या पेक्षा जास्त कर BCCI भरते. त्याशिवाय भारत सरकार दूरदर्शन साठी फुकट हक्क घेऊन काही हजार कोटी लुबाडते ते वेगळे.
  • Log in or register to post comments

Submitted by नठ्यारा on Mon, 10/09/2023 - 16:41

In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना

Permalink

संबंधित लेख

साहना, माहितीबद्दल धन्यवाद ! जाल शोधल्यावर हा एक इंग्रजी लेख मिळाला : https://www.aljazeera.com/sports/2023/10/2/fans-frustrated-icc-cricket-world-cup-2023-tickets-india - नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on गुरुवार, 10/12/2023 - 06:10

In reply to संबंधित लेख by नठ्यारा

Permalink

बाळ हिप्पोने बरीच वाट लावली

बाळ हिप्पोने बरीच वाट लावली आहे. मैदाने अत्यंत खराब स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी खुर्च्या पक्ष्यांच्या विष्ठेने भरलेली आहेत. काही ठिकाणी खुर्च्या अश्या जागी आहेत जिथून मैदान ठीक दिसत सुद्धा नाही. पाकिस्तान ने भारतांत येऊच नये अशी काही लोकांची भूमिका होती. बाळ हिप्पो हा तथाकथित राष्ट्रवादी प्रखर देशभक्त पार्टीचा असल्याने त्यांच्यावर बरीच टीका होत होती तेंव्हा बाळ हिप्पोच्या PR तंत्राने अशी अफवा पसरवली होती कि ICC इव्हेंट असल्याने भारत पाकिस्तान संघाला प्रवेश नाकारू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना घ्यावे लागले. पण आता अत्यंत महत्वप्रयासाने भारत पाकिस्तान सामना हा महामानवाच्या नावावर निर्माण केलेल्या मैदानावर ठेवला आहे. त्याशिवाय उद्धघाटनाला काहीही समारोह नसला तरी हाय सामन्याला मोठा अरिजित वगैरे लोकांना बोलावून कोर्क्येष्ट्रा, थोर सनातन संस्कृतीला साजेसा नेहमीचा लेझर शो, अमिताभ, रजनीकांत इत्यादींना बोलावून दिवाळी दसरा असल्या प्रमाणे मॅच साजरी होणार आहे. ह्या मैदानावर पाकिस्तान ने भारतीय संघाचा धुव्वा उडवून विजय मग काश्मीर साठी डेडिकेट नाही केला म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 10/12/2023 - 08:11

In reply to बाळ हिप्पोने बरीच वाट लावली by साहना

Permalink

दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ

दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ फारच उजवा आहे. पण तरीही कोणीही जिंकू शकतो. पाकिस्तानी नी विजय विजय काश्मीर साठी डेडिकेट केला तर वर्ल्ड कपच्या तिकिंसाठी तो turning point ठरेल. त्यांनी श्रीलंके विरुद्धचा विजय गाझा ला डेडिकेट केलाच आहे. आजच्याच टाइम्स मधली बातमी आहे टीव्ही चा खप भरपूर वाढला आहे तोही पितृपक्ष असताना. हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 10/12/2023 - 11:57

In reply to दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ by रात्रीचे चांदणे

Permalink

हिप्पो साठी काहीही सहानुभूती

हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही. हाॅस्पीटलमध्ये पेशंट मेले तर डीन किंवा आरोग्य मंत्रालयाला थोडीच जबाबदार धरायचे असते. ते स्वतः थोडीच येऊन ऊपचार करतात. लोजीक वारले.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 10/12/2023 - 13:54

In reply to हिप्पो साठी काहीही सहानुभूती by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हेच लॉजिक असेल तर रोज

हेच लॉजिक असेल तर रोज राजीनामेच घ्यावे लागतील. पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 10/12/2023 - 15:09

In reply to हेच लॉजिक असेल तर रोज by रात्रीचे चांदणे

Permalink

पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह

पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका. मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला तर निवडणूका घ्याव्या लागतात? विचीत्रच प्रकार म्हणायचा हा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/11/2023 - 09:35

Permalink

पाटा पीच

पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेचे दोन शतक झाल्यानंतर श्रीलंखेचा पराभव शक्य नाही असे वाटले. ३४३ मोठा स्कोर होता. हसन आली आणि समर विक्रा यांची शतकं जबरा होती. पाकिस्तान जिंकणार नाही असे समजून चाललो पण अब्दुल्ला शफिक आणि रिजवान यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने लीलया विजय मिळवला अर्थात श्रीलंकेची सुमार गोलंदाजी आणि सुमारक्षेत्ररक्षणाचा यात फार मोठा हातभार होता यात काही शंका नाही आज आपण अफगाणिस्तान बरोबर भिडणार आहोत आपण त्यांच्या लेव्हलवर जाऊन खेळतो की एकतर्फी विजय मिळवतो हे आज दुपारच्या सामन्यात कळेलच तेव्हा भेटूया दुपारी. -दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/11/2023 - 17:40

In reply to पाटा पीच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हं तर...

आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो हे मला फार्फार आवडे. अफगानिस्थान २३७ वर ०७ आंणि ४५. ५ षटकं झालेली आहेत. आपण जिंकु पण आपला गोलंदाजीचा सराव सुरु असल्यासारखी गोलंदाजी वाटली. सामना जिंकूच असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 10/11/2023 - 17:47

In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

एकदमच पाटा पीच बनवलं तर

एकदमच पाटा पीच बनवलं तर गोलंदाज तरी काय करणार. कदाचित आपण ४० ओवर्स मध्येच मॅच जिंकू. ह्याच स्टेडियमवर आफ्रिकेने ४२८ केले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/11/2023 - 18:15

In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अफगाण संघ जिद्दीचा आहे.

अफगाण संघ जिद्दीचा आहे. ,प्रयत्न करतील पण शेवटी जिंकणार तर भारतच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/11/2023 - 19:25

Permalink

हाणतोय रोहित

हाणतोय रोहित
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 10/12/2023 - 13:22

Permalink

आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध

आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका एकदम उत्कंठावर्धक होईल असे वाटते. दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/12/2023 - 20:59

In reply to आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध by प्रचेतस

Permalink

एकतर्फी सामना.

दक्षिण आफ्रिका एकतर्फी जिंकतेय असे वाटते. ३१७ च्या धावसंखेला लढतांना ऑस्ट्रलिया थकून गेली आहे. ३३ षटकात,१३४ धावसंख्या गाठतांना ६ मोहरे गळाले आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची तिकीट संपूर्ण विकल्या गेली आहेत. आणि मैदाने रिकामे आहेत. विश्वचषकाचं वातावरण अजिबात वाटत नै ये.. -दिलीप बिरुटे (विश्वचषक क्रिकेटमधील मरगळ आलेला रसिक)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 10/13/2023 - 05:40

In reply to एकतर्फी सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

एकेकाळच्या बलाढ्य

एकेकाळच्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाची फारच वाईट स्थिती झालेली दिसते. एकतर्फी हरताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 10/14/2023 - 15:14

Permalink

पाकडे ७५/२

पाकडे ७५/२
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/14/2023 - 16:14

In reply to पाकडे ७५/२ by प्रचेतस

Permalink

बाबर...

बाबरचा खेळ पाहता पाक संघ पाश्शे करतो की काय असे वाटत आहे. पाटा पीचेस आहेत. १५४ धावसंखेवर ०२ बाद आहेत. आपली गोलंदाजी म्हणजे सगळं देवभरोसे आहे. बात करते रहेंगे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/14/2023 - 16:16

In reply to बाबर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

प्रतिसाद पूर्वप्रकाशन

प्रतिसाद पूर्वप्रकाशन मोड़ मधे होता तेव्हाच बाबरची ५० वर दांडी गुल झाली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 10/14/2023 - 17:15

In reply to प्रतिसाद पूर्वप्रकाशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नऊ गेले, पाकड्यांकडे आज

नऊ गेले, पाकड्यांकडे आज टीव्ही फुटतील काय,?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/14/2023 - 18:11

In reply to नऊ गेले, पाकड्यांकडे आज by प्रचेतस

Permalink

जिंदाबाद जिंदाबाद.

१९२ च्या किरकोळ धावसंखेसाठी आपण किती आणि कोणत्या मोहरे डावावर लावतो ते आता कळेलच. प्रतिसाद लिहितांना गील १६ धावांवर, गुलगुले खाण्यासाठी पॅव्हेलियनमधे परतला आहे. उग्रसेन आपल्याला कामाला लावून मस्त मजा पाहात आहे. अवघड आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 10/14/2023 - 18:34

In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

रोहित आणि कोहली चांगले

रोहित आणि कोहली चांगले खेळताहेत, तुम्हाला टीव्ही बघत बघत न जेवता आरामात घरच्यांशी गप्पा मारत जेवण करता येईल असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/14/2023 - 18:47

In reply to रोहित आणि कोहली चांगले by प्रचेतस

Permalink

विराट गेला...

कोली, धावबाद होता होता वाचला होता. मस्त लालीपॉक दिला. ८५/०२ आता श्रेयस... श्रेयसला सुरुवातीलाच अवघड प्रश्न आल्यामुळे गडबड़तोय. श् देहबोली पाहता याचं ग्राउंडवर काही मन लागेल असे दिसत नै. उभा राह आणि धीर धर रे भावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 10/14/2023 - 18:55

In reply to विराट गेला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

श्रेयस कधीच भरवशाचा वाटत नै.

श्रेयस कधीच भरवशाचा वाटत नै. रोहितने लवकर मॅच संपवावी, सॅटर्डे नाइट आउटचा प्लान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 10/14/2023 - 18:35

In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तरीही धागा काढल्याबद्दल

तरीही धागा काढल्याबद्दल उग्रसेन यांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/14/2023 - 19:55

Permalink

विजया समीप.

के एल रावल्या आणि श्रेयस लैच टुकुटुकु खेलू लागले. २० धावा विजयासाठी हव्या आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 10/14/2023 - 20:26

Permalink

जिंकलो

हिंदुस्तान जिंकला पाकडे हरले कप मिळो की न मिळो, आतंकवादी हरले
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:04

Permalink

इतक्या पांचट सामन्याला मुर्ख

इतक्या पांचट सामन्याला मुर्ख मिडीया महायुधदध्द म्हणतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 10/14/2023 - 21:22

In reply to इतक्या पांचट सामन्याला मुर्ख by अमरेंद्र बाहुबली

Permalink

सोडा हो,

तुम्ही नका लक्ष‌ देऊ...
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sat, 10/14/2023 - 21:26

Permalink

तरी बरं !

तरी बरं ! आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडीयम वर झाला म्हणून पाकीस्तान हारले. तोच सामना राजीव गांधी स्टेडीयमवर खेळला असता तर पाकीस्तानी संघ नक्कीच जिंकला असता :) हा प्रतिसाद तिकडे १०१ वा प्रतिसाद म्हणून टाकावा काय :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:29

In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके

Permalink

हसून हसून वाट लागली. बर्याच

हसून हसून वाट लागली. बर्याच दिवसांनी पोटभर हसलो. नक्की टाका तिकडे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 10/14/2023 - 22:35

In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके

Permalink

कुठल्याही ठिकाणी ठेवा

आतंकवादी पाकिस्तान हरल्याशी मतलब..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/19/2023 - 08:08

Permalink

आज

आज होणा-या भारत आणि बांग्लादेश लढतीत आपण जिंकू असे वाटते. आपली विश्वचषक क्रिकेट सामन्यात दिसावी अशी विशेष चुनुक अजुनही दिसत नाही. विश्वचषकाकड़े जायचं तर, स्तर सामनागणिक उंचावला पाहिजे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/19/2023 - 16:09

In reply to आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

स्कोर...

बांग्लादेश १३६ वर ०४ ..अजुन १५० धावा झाल्या तर रंगतदार सामना होईल... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/19/2023 - 16:15

In reply to स्कोर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

३००+ होतील असं वाटत होतं

पहिल्या तेरा चौदा ओव्हर्स.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 10/20/2023 - 10:01

Permalink

लैच एकतर्फ़ी....विजय.

इतिहासातील आठवण म्हणायची तर, भारतीय संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आणलेल्या बांगलादेशाला त्या घटनेला आता सोळा वर्ष झाली. मात्र, किरकोळ वाटणारे संघ जेव्हा असे, मुक्कामार देतो त्याचे व्रण-वळ अनेक वर्ष जात नाहीत. बाय द वे, काल मात्र बांग्लादेशाची वाट लागली. पन्नास षटकात आठ फ़लंदाजाच्या बदल्यात २५६ हा काही फ़ार मोठा स्कोर नव्हता. क्रिकेट अनिश्चिताओ का खेल जरी असला तरी, आपली फ़लंदाजी पाहता हे सहज जमून जाईल म्हणुन आपण निवांत होतो. आणि तसेच झाले. रोहीट ४८, गिल, ५३, कोल्याच्या विराटची शतकी फ़लंदाजी नाबाद १०३, अय्यर १९, आणि लोकेश रावल्या नाबाद ३४ ने आपण सहज जिंकलो. विराट कोल्याने शेवटी शंभरला घेतलेला वेळ आणि तगमगीने आमच्या मिपाकर मित्राने संघ भावना महत्वाची की व्यक्तीगत फलंदाजी रेकॉर्ड महत्वाचे यावर दळण टाकलं पण मी काही लक्ष दिलं नाही. विजय महत्वाचा. तर, चार सामने जिंकून आपण नेट-रनरेटात दुस-या स्थानावर आहोत. न्युझीलंड पहिल्या स्थानावर आहे. इंडिया, न्युझीलंड, द. आफ्रिका, पाकिस्तान, इग्लंड आणि नेदरलँडस हे टॉपवर राहतील असे वाटते. बाकी सविस्तर अधुन मधून बोलत राहूच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 10/20/2023 - 10:14

In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

गुणतालिका आणि इतर.

लिंक. च्यायला, संपादकांनी टेबलं, तक्ते, खेळाडू, छायाचित्रे, असे दलन मुख्य धाग्यात टाकायला पाहिजे. मान्य की लै कामं असतात. आणि मोफतच्या संस्थळावर फार अपेक्षा ठेवू नये वगैरे. पण लाजे काजे काही गोष्टी काही केल्या पाहिजेत असे वाटते. :/ -दिलीप बिरुटे (स्पष्ट)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 10/20/2023 - 10:20

In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

छान आहे प्रतिसाद.

छान आहे प्रतिसाद. या कपच्या आतापर्यंतच्या सामन्यांत चुरशीची किंवा "नेल बायटिंग" असे ज्याला आंग्ल भाषेत म्हणतात तशी मॅच भारताची तरी एकही झाली नाही. सर्व वेळी सहज, निश्चित आणि एकतर्फी मॅच झाली. समोरच्याचा धुव्वा. अर्थात अटीतटीची मनोरंजक मॅच बघायला मिळावी म्हणून पराभवाच्या जवळ जाऊन रिस्क नकोच. त्यापेक्षा आपली पोझिशन अधिकाधिक मजबूत करत जाणारी सध्याची तुफानी खेळी चांगलीच. भारतीय संघ unstoppable म्हणतात तसा घोडदौड करत निघाला आहे. आनंदपूर्वक शुभेच्छा. वैयक्तिक विक्रम विरुद्ध संघाचे हित हा मुद्दा आहेच महत्वाचा. "चक दे इंडिया" मधील कोमल चौताला आणि प्रीती सब्रवाल अशा वेळी नेहमी आठवतात. जेव्हा शेवटी कोमल स्वतःच्या वैयक्तिक गोलसंख्येचा मोह सोडून भारताच्या हितासाठी प्रीतीकडे बॉल पास करते तेव्हा अक्षरशः आनंदाश्रू येतात डोळ्यात. कालच्या मॅचशी थेट तुलना होऊ शकत नाही. पण कोहलीने हा बॅलन्स साधण्याचा काहीसा प्रयत्न केला. एकीकडे व्यक्तिगत शतक हुकते की काय ही अस्वस्थता दिसत होती. असा हुकमी सिक्स दोन्हीपैकी नेमका कोणत्या हेतूने आला ते आता सांगणे कठीण. पण त्याने इतर टीमसोबत मिळून मोठा विजय साध्य केला. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 10/20/2023 - 16:16

Permalink

कांगारुंनी पाकड्यांना चांगलंच

कांगारुंनी पाकड्यांना चांगलंच झोडलेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com