Skip to main content

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०२३

लेखक बाबुराव यांनी रविवार, 08/10/2023 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा. वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा. गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
TeamsMatWonLostTiedNRPtsNRR
India (Q) 9 9 0 0 0 18 2.57
South Africa (Q) 9 7 2 0 0 14 1.261
Australia (Q) 9 7 2 0 0 14 0.841
New Zealand (Q) 9 5 4 0 0 10 0.743
Pakistan (E) 9 4 5 0 0 8 -0.199
Afghanistan (E) 9 4 5 0 0 8 -0.336
England (E) 9 3 6 0 0 6 -0.572
Bangladesh (E) 9 2 7 0 0 4 -1.087
Sri Lanka (E) 9 2 7 0 0 4 -1.419
Netherlands (E) 9 2 7 0 0 4 -1.825

वाचने 30276
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

कोली है तो मुमकीन है. ६६ चेंडुर ५२ धावा हव्यात विजयासाठी. कोहली ७० तर, जडू १६ धावांवर खेळत आहेत. धावसंख्या २२३. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

खेळु दे....टुकूटुकू...मागं कोणी नै ये. मागं बुमरा आहे. २८ मधे २४ लागतात. चांगला सांभाळला डाव. आणि विजयाच्या जवळ जडू आणि कोहली घेवून जात आहेत. -दिलीप बिरुटे

कोहली आणि जड़ू यांची अतिशय सूजबुझ की बारी. कोहलीचं शतक हुकलं. मोठा फटका मारण्याच्या नादात झेल गेला पण विजयाचं श्रेय कोहलीचं. चला सामना मस्त झाला. भारत जिंकला तरी मनं न्यूझीलंडनेही जिंकली. न्यूझीलंडने मस्त झुंजवलं. शिस्तबद्ध संघ, उत्तम गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि उत्तम संघ. -दिलीप बिरुटे

वर्ल्ड कप क्रिकेट धागा काढ़लेला परंतु कामामुळे सहभागी होता येत नाही. माफ़ी असावी.धागा काढून टाकला तरी चालेल.

In reply to by Bhakti

अशी त्याची फलंदाजी पाहतांना वाटते. जुने कोणते रेकॉर्ड मोडेल हे इतकं करेक्ट माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकच्या २८३ ला अफगानने चांगली सुरुवात केलीय. ०७ षटकात ३८ धावा. आजचा धक्कादाय विजय होतो का ते बघावे लागेल. -दिलीप बिरुटे

पाकिस्तान हरतंय वाटतं आज. १२८ वर ० वीस षटकं संपली आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असाच एक दोन धक्कादायक निकाल आणि एक दोन लकी बहिष्कार यांच्या बळावर केनियाचा संघ २००३ वर्ल्डकप मध्ये उपांत्य फेरीत पोहचला होता!

अफगानी संघाने पाकिस्तानचा गड़ी राखून धुव्वा उडवला. जब्राट सामना. विश्वचषकातला धक्का देणारा सामना. अफगानी संघाने चिवट फलंदाजी करुन विजय मिळवला -दिलीप बिरुटे

बीसीसीआय चा संघ ( ज्याला अनअधिकृत रित्या भारतीय संघ संबोधलं जातं) सर्व मॅच जिंकलाय वगैरे असं कलीग्स सोबत जेवायला बसल्यावर त्यांच्या क्रिकेटचा चर्चातून कळलंय. नी ते फार खुश होत होते. असे अनेक लोक असतील. मुळात भारतीय संघं सेमीफायनल पर्यंत पोहोचला नाही तर किती कोटींचं नूकसान होईल ह्याचा अंदाज लावनं अनेकांच्या कुवतीबाहेर आहे, भारतीय संघं हरनं हे आर्थीकदृष्ट्या स्पर्धेला परवडनारं नाहीये, त्यामुळे भारतीय संघं सुरवातीच्या मॅच जिंकनारच हे गृहीत धरूनच चालायला हवं, जर बाहेर पडला तर ही स्पर्धा आर्थीकदृष्ट्या तिथेच संपेल ना मैदानात कूत्रं येईल ना जाहीरातदार ढूंकून पाहतील. क्रिकेट हा खेळ आहे असं समजनार्यांनी नोकरीच करावी, धंद्यात काही यश येत नाही लेकाहो तुम्हाला. :) भारतीय संघं जिंकतोय हे पाहून आनंदं वाटनार्यांबद्दल मला आश्चर्य नी कौतूक वाटतंय. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

क्रिकेटचे आम्ही लोक पंख्या कल्बात मोडतो. कधी काळी क्रिकेटच्या सामना फिक्सींगच्या काळातल्या घटना ऐकून निराश झालो होतो. आपण जीवतोडून त्या खेळाचा आनंद घेतो आणि आपल्या भावनांचा चुराडा झालेला पाहुन क्रिकेट पाहु वाटत नव्हते, कितीतरी दिवस कोण खेळाडु येतो कोण खेळतो हे बघत पण नव्हतो. पण, पुढे आयपीएलच्या सामन्याने ती मरगळ झटकली. आता ती पूर्वीची उत्कंठा नसली तरी क्रिकेट वेड मात्र कमी झालं नाही. क्रिकेट, क्रिकेटचं राजकारण, खेळाडुंचं राजकारण, निवड समित्या, त्याचबरोबर येणारा सट्टा बाजार, आर्थिक उलाढाली, भारतीय क्रिकेटचा धंदेवाईकपणा हा सगळं क्रिकेटमधे असेलही पण खेळ म्हटला की त्यातली हारजीत उत्कंठा असते तेव्हा क्रिकेटचं जे काय असेल ते मान्य करुनही क्रिकेटचा आनंद सोडता येत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व काही आपल्याला माहीत असते पण तरी ऊत्कंठा असते. कारण एक्टर्स ची एक्टींग, स्क्रिप्ट रायटरचा जबरजस्त स्क्रिप्ट ह्या सर्वाला आपण भूलतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे... अजून एक गोष्ट म्हणजे, कुणाला तरी एकाला हीरो बनवायचे.. सध्या विराट हीरो आहे. कुठल्याही संघाची मॅच असो... समालोचक ,विराट बद्दल काही ना काही बोलणारच... आजची मॅच, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका, यांच्यात असून देखिल, विराट बद्दल बोलत होतेच.. तेच कालच्या मॅच बाबतीत... उद्या जर, टिंबक्टू आणि मालदीव, यांच्यात मॅच झाली तरी, येन केन प्रकारेण, विराटचे नाव घेतील... व्यक्ती पूजा भारताला नेहमीच घातक ठरत आली आहे...

In reply to by मुक्त विहारि

एकंदरीत भारतीयांना ऐनकेन प्रकारे क्रिकेटशी बांधुनच ठेवतात लेकाचे. मुळात भारतीय संघ जिंकवायचा तर कुणाला तरी चांगलॅ खेळावंच लागनार. (खेळवावंच लागनार) मग भारतीय खुश होनार नी विराट विराट करत सुटनार. भारतीय क्रिकेट फॅन्स फारच भोळे असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे... आधी कपिलदेवचा उदो केला मग सचिन आणि आता विराट... शिवाय, उदारमतवादी क्रिकेटर असेल तर मग सोन्याहून पिवळे... मग रिटायरमेंट नंतर, समालोचक म्हणुन वर्णी लागायची शक्यता जास्त.. बेदी पण कमी न्हवता... ड्रॉ होत असलेली मॅच, पाकिस्तानला जिंकायला दिली... आधी मी पण ह्याला भुललो होतो... सध्या दूरच राहतो... गुंतत नाही...

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार, सत्तरच्या दशकात फ़िरकी गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा महान फ़िरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं काल ७७ व्या वर्षी निधन झालं. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डशी त्यांचे कायम मतभेद राहीले आपली ठाम मतं मांडत राहीले. अनेक नवोदित खेळाडु त्यांनी तयार केले. इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग बेदी ही चार नावं भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग या चौघांनी सुरू केलं. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारतानं विजय साकारला होता. (लोकसत्ता) क्रिकेट जगतातील महान खेळाडुस. आदरांजली. -दिलीप बिरुटे

हिंदू धर्म के खिलाफ अभद्र टिप्पणी पड़ी भारी, भारत से भगाई गई ये पाकिस्तान महिला एंकर https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news… ----- मोहम्मद रिजवान के खिलाफ मैदान पर नमाज पढ़ने के लिए शिकायत दर्ज, मुश्किल में पड़ सकते हैं पाकिस्तानी कीपर https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news… -------

पाकच्या २७० धावांचा पाठलाग करीत दमछाक झालेल्या आफ्रिकेने शेवटपर्यन्त झुंज देत एक विकेट राखून पाकचा पराभव केला. -दिलीप

In reply to by प्रचेतस

पाकिस्तानचे अजून तीन सामने बाकी आहेत. या तीन्ही सामन्यांमध्ये जर पाकिस्तानने विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होतील. सध्या दक्षिण आफ्रिका रनरेटच्या जोरावर टॉपवर आहे, भारत अनुक्रमांक दोनवर आहे. दोघाचे १० गुण झालेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अजूनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे,असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे राम आहे का चान्स अजून, घरांच्याना सांगावं लागलं.काल भारताच्या सामान्यपेक्षा जास्त टेन्शन पाक हरावा म्हणून घेतलं होतं ;)

ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांचा पाठलाग करत ३८३ धावा न्यूझीलंडने केल्या. रोमांचकारी सामना. असे सामने झाले तर विश्वचषक सामने रंगत जातील. न्यूझीलंडने दिल जीत लिया... -दिलीप बिरुटे

आजच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली आहे. १५६ धावांवर ०४ फलंदाज परतले आहेत ३५ .४ ओव्हर्स संपल्या आहेत. रोहिट ८७ तर, सूर्यकुमार २३ धावांवर खेळत आहेत. २७० तरी व्हावेत असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

२०५-२१० होतील. पण आपले बॉलर्स वचपा काढतील. दीडशेच्या आत इंग्लंड घरात. खेळपट्टी अशीच असणार त्यांना पण.

In reply to by प्रचेतस

आपले अंदाज योग्य ठरत आहेत. स्कोरचा अंदाज दहानेच चुकला आणि बॉलर्स वचपा काढतील हा अगदी अचूक ठरला.

In reply to by प्रचेतस

हो. अर्थात याबद्दल काही नशिबाचा भाग मानण्याची गरज नाही. इंग्लंडने पहिली बॅटिंग घेतली नाही. त्यांना चॉईस होता. आपल्याला देखील काही प्रमाणात तो फटका बसलाय. आपल्या बॉलर्सना श्रेय आहेच.

शेवटच्या धा ओव्हर्समधे ८० तरी धावा व्हाव्यात. -दिलीप बिरुटे

इंग्लंड ३३/३(८) आता स्टोक जसा आऊट झाला, त्यावरून इंग्लंड कदाचित २०० पर्यंत जाऊ शकणार नाही.

तर, अशा त-हेने श्रीलंकेच्या 241/10 (49.3 Overs) या धावसंखेचा पाठलाग करीत अफगान संघाने (45.2 Overs) मधे सात गडी राखून निर्वीवाद धडाकेबाज विजय मिळवला. गुणतालिकेत इंडिया १२ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे तर, दुस-या क्रमांकावर १० गुण घेऊन द. अफ्रिका रनरेटाने अग्रक्रमावर आहे. न्युझिलंड आष्ट्रेलिया अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर आहेत. मला वाटतं, या चार संघात अजून काही क्रमांक बदलतील का ते येत्या राहीलेल्या प्रत्येकाच्या तीन सामन्यांमधील निकालांनी कळेलच. काळात कळेलच. -दिलीप बिरुटे

आज भारत आणि द. अफ्रिका यांच्यातील सामन्यातील पहिल्या पन्नास षटकातला खेळ संपला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पन्नास षटकात ३२६ धावा ०५ गड्यांच्या मोबदल्यात केल्या आहेत. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्ये म्हणजे विराट कोहलीचं शतक आणि सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी झाली. विराटच्या १०१ संयमी फलंदाजी. सोबत रोहीटच्या वेगवान ४० धावा, गील, अय्यर, राहुल आणि शेवटी जडेजाच्या सोबत आणि गतीमुळे ३२६ धावांवर भारताची धावसंख्या पोहचली. पीच स्लो असले आणि वाढदिवसाचं गीफ्ट चांगलं असलं तरी, स्वार्थी फलंदाजीच आज पुन्हा दिसली,असे वाटून गेले. मैदानावर तग धरणे आणि संयमाने फलंदाजी महत्वाची असली तरी. मागील काही सामन्यात जाणवावा अशी ती व्यक्तीगत फलंदाजी दिसत आहे, असे मला वाटते. अर्थात, विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतकी फलंदाजीबद्दलही अभिनंदन. अफ्रिकेला आपले गोलंदाज कसे गुंडाळतात त्यावर विजय अवलंबून आहे. अफ्रिकेची फलंदाजी बहरलेली आहे. विश्वचषक क्रिकेट २०२३ मधे डीकॉक फलंदाजीत अग्रक्रमावर आहे, त्यामुळे भारताचा विजय इतका सोपा नाही असे वाटते. देखेंगे आगे आगे होता है क्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट घालवली नाही आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूने श्रेयस, सूर्या आणि जडेजाला मुक्तपणे फलंदाजी करता आली, ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे.

In reply to by प्रचेतस

आपलं म्हणनं खरं असलं तरी संघाच्या चाळीस धावा त्याच्यामुळे कमी झाल्या आहेत असे वाटते. एकही षटकार नाही आजच्या शतकी १०१ धावांसाठी १२१ चेंडु घेतले हे अजिबात झेपलं नाही. >>> ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे. अफ्रिकेची फलंदाजीही भक्कम आहे. बुमरा-बीमरा, शमी, सिराज, कुलदीप कसे चालतात त्यावर आपला विजय अवलंबून आहे. अधुन-मधुन धाग्यावर येत राहु. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंपायर का विनाकारण व्हिलनसारखे वागत आहेत ;) १०० च्या आत गुंडाळतो वाटतं अफ्रिकेला.आपले बोलर कमालीची गोलंदाजी करत आहेत.

In reply to by गवि

आपल्या संघाचा खेळ पाहता आता विश्वचषक २०२३ दूर नाही असे वाटायला लागले आहे. काल अफ्रिकेचीही गोलंदाजांनी वाताहात केली. फलंदाजांची उत्तम सुरुवात, मधल्या फळीची जवाबदारीची फलंदाजी आणि मग गोलंदाजीत कमाल होऊन जाते आणि विजय सहज दृष्टीक्षेपास येतो. अर्थात, एखाद्या दिवशी ही सर्व एखाद्या संघाविरुद्ध मोडतोड व्हायला वेळ लागत नाही, अर्थात एक भारतीय क्रिकेट प्रेमी म्हणून असे होऊ नये इतकीच अपेक्षा आपण करुया. -दिलीप बिरुटे

काल बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यात विश्वचषकीय वेगळ्याच घटनेची नोंद झाली. खेळ भावना आणि नियमांच्या बाबती कोणी नियमांच्या बाजूने असेल तर कोणी खेळभावनेच्या बाजूने. बांग्डाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची टीम काय तशीही नीट खेळत नै ये. पंचवीसाव्या षटकाट समरविक्रमाने शकीब अल हसनला एक चौकार मारला आनि त्यानंतरच्याच चेंडूवर शकीबच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानम्तर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला होता मॅथ्यूजच्या हेल्मटची पट्टी तुटली होती तो दुस-या हेल्मेटची वाट पाहात थांबला. बांग्लाच्या कर्णधार शकीबने उशिर झाल्यामुळे टाइम-आउटच्या नियमांचा आधार घेत पंच एरास्मूस आणि रीचर्ड इलिंगवर्थन यांच्याकडे दाद मागितली त्यांनीही त्याबद्दल मॅथ्यूजला विचारणा केली, पण त्याला बाद दिले. एकही चेंडू न खेळता मॅथ्यूज तंबूत परतला. श्रीलंकेने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या प्रत्युतरात बांगलाने ४१.१ षटकात ७ बाद २८२ धावा करीत विजय संपादन केला आणि श्रीलंकेचं आव्हानही संपूष्टात आणलं. -दिलीप बिरुटे

बांगला देश ही खेळी रडकी खेळले आहेत. आता अफगाणीस्तान ने ऑस्ट्रेलिया ला हरवले आणि न्यूझिलंड ने श्रीलंकेला हरवले तर आपले आशाळभूत शेजारी गप्प बसु शकतील

भारतानं सर्व सामने जिंकल्यामुळे आणि २-३ अगदीच एकतर्फी जिंकल्यामुळे सध्या मीम्स ना ऊत आला आहे! कल्पनाभराऱ्या जोरदार चालू आहेत! खास करून वेलकम सिनेमातील सिक्वेन्स चा वापर करून तयार केलेले २ मीम्स अगदी धुमाकूळ घालताहेत! :-)

अफगाणिस्तान आणि ऑष्ट्रेलिया सामन्यात अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करीत २९२ धावा केल्या प्रत्युतरात ऑष्ट्रेलियाचा संघ गडगडला होता पण मॅक्सवेल तीन जीवदानाच्या बळावर १२६ धावांवर खेळतोय २१६ धावांवर ७ बाद आहेत. मॅक्सवेल सामना जिंकून देईल अशी परिस्थिती आहे, ७३ मधे ७६ धावा हव्या आहेत, सामन्याचा नूर थोड्याच वेळात कळेल पण मॅक्सवेलने गेलेला सामना ओढला अशी तरी आत्ता स्थिती आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

मॅक्सवेल २०१ धावा. अद्भूत खेळला. ९१ धावांवर ७ विकेट्स पडलेल्या होत्या आणि १८ षटक चालू होतं तेव्हापासून तो खेळत होता. अद्भूत फटकेबाजी केली. पाय आखडून गेलेला होता. तीन झेल सोडले अफगाण्यांनी एक तर हातातला सोड्ला त्या मूझीबने. आणि अफगाणि संघाची गोलंदाजीच्या मर्यादा उघड पडल्या. बरं असं म्हणावं तर, सुरुवातीला विकेट्स काढल्या त्यांनी. पण, त्यानंतर मॅक्सवेल पुढे हतबल झाले सर्व गोलंदाजी नंतर सुमार झाली आणि क्षेत्ररक्षणही सुमार झालं. अफगानी जिंकावे वाटत होते. :/ असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अफगाणांनी सामना गमावला, जखमी मॅक्सवेल नुसता जागेववर उभं राहून टोलवत होता. अफगाण अगदी केविलवाणे झाले होते. झेल तर सोडलेच अफगाणांनी पण स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडले, मोहम्मद नबीला खूप उशिरा बॉलिंगला आणले, फिल्डिंग चेंजेस, बॉलिंग चेंजेस त्यांना नीट जमले नाही.

अफगाणीस्तानकडे स्पिन अ‍ॅटॅक असता किंवा त्यानी ऑफस्टंपबाहेर गोलंदाजी केली असती तर बराच फरक पडता. पण हे आपण मैदानाबाहेर उभे राहून बोलतोय. काही म्हणा अफगाणी पोरांची जिगर मानायला हवी. नवे आहेत. डावपेचात जर्रा कमी पडले इतकेच.

इंडियाचा फार्म बघता आपण न्युझीलंडला हरवतो. जिंकण्याची शक्यता. ८५ -१५ अशी आहे. अफ्रिका ऑष्ट्रेलियात ऑष्ट्रेलिया फार्मात आलाय त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता ६०-४० अशी वाटते. भारतीय संघाच्या उपांत्यफेरीच्या सामन्याला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फायनल भारत दक्षिण आफ्रिका व्हावी असे वाटते. ऑस्ट्रेलियन एकदम त्वेषाने खेळतात. मात्र सध्याचा आपला फॉर्म बघता कोणत्याही संघाला आपण हरवू शकतो ह्याची खात्री वाटते.

In reply to by प्रचेतस

यंदा तरी ते बाद फेरीत चांगला खेळ करतील का? ते जेव्हा चांगला खेळ खेळतात, तेव्हा त्यांना नशीब दगा देते. आणि नशीब चांगले असेल तर ते ऐनवेळी कच खातात.

भारत विश्वविजेता होईल. शुभेच्छा. ड्यूटीमुळे धाग्यावर येऊ शकलो नाही. सर्वांचे आभारी आसे. दिवाळीच्या सगल्यांना शुभेच्छा.

मग एकीकडे बॉल ओला होऊन फिरकी गोलंदाजी अवघड होणार, दुसरीकडे बॉल व्यवस्थित बॅट वर न येणं आणि सीमापार जाताना हळू जाणं हे प्रकार झाल्याने ३५० कदाचित चांगले टार्गेट असेल. ३०० पेक्षा कमी म्हणजे खूपच कमी होईल. (मॅक्सवेलचा चमत्कार झाला नसता तर ऑस्ट्रेलियाला देखील येथे पाठलाग अवघड गेला होता)

In reply to by तुषार काळभोर

वानखेडेवर पाठलाग करताना पहिल्या 15/20 ,ओव्हर्स खूपच अवघड जाणार किवींना. बॉल वेड्यासारखा मूव्ह होत असतो.