Skip to main content

एक किस्सा: अब की बार सौ पार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 08/10/2023 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन. बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून, बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार. खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. (लक्ष्य निर्धारित करून, योजना बनविणे आणि त्यासाठी सर्व लॉजिस्टि्स पुरविणे ही प्रधानमंत्रींची कार्य करण्याची पद्धत). किती तरी वेळ तो हसत राहिला आणि म्हणाला, देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच. या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ बघितले. दिवसभर टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो. काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरणाल घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच तैयार ठेव. चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे. निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते. शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे. मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते. हे मात्र त्याला कळले नाही.

वाचने 28250
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

आताच guardians of the galaxy v3 हिंदी डबा मध्ये पाहिला . त्यात एक वाक्य होते. दुसरा मौका सभीको मिलना चाहिए. मुद्दा असा की बजरंग पुनिया चांगला पैलवान आहे. राजकारण सोडून एका लढाऊ पैलवानाप्रमाणे भिडला तर अजुनही रास लाऊ शकतो तो.

In reply to by भीमराव

त्याने ट्रायल दिली असती आणि पराजित झाला असता तर कुणीही काहीही म्हंटले नसते. पण बहुतेक त्याला विशाल कालीरमण या ट्रायल विजेतची भीती वाटली असावी असे हरियाणात बोलले जाते. ( मी जिथे राहतो ते जाटांचे गाव आहे). पराजित झाल्याने अब्रू धुळीस मिळाली.

इतके दिवस टीव्हीसमोर बसुन राहिलात आणि खेळ पाहीले. वाटले होते एक झकास माहितीपूर्ण लेख येईल. पण काय ... भ्रमनिरास. तेच ते पालुपद तीच ती आरती वाजवा हो ढोल वाजवा पण काही तारतम्य? ढोलाचा आवाज आता किरटा होत होत टीमकीचा यायला लागलाय.... अजुनही वेळ गेलेली नाही... संभाळा स्वतःला

In reply to by अहिरावण

मी सत्याची टिमकी वाजवली. तुम्हाला आवडली नाही त्यात माझा दोष नाही. बाकी ज्या नेत्याच्या नेतृत्वात सर्व क्षेत्रांत प्रगती होत आहे. त्याची तारीफ करण्यात काही गैर आहे का?

In reply to by विवेकपटाईत

>>>त्याची तारीफ करण्यात काही गैर आहे का? बिलकुल गैर नाही.. पण एकाचे गोडवे गायचे आणि इतरांना शिव्या घालायचा हा दळभद्री करंटेपणा निदान आता तरी सोडा !!

In reply to by अहिरावण

माझ्या लेखात कुणालाही शिवी दिलेली नाही. बाकी जो ट्रायलला घाबरला, राजनीती केली, सरकारला ब्लॅकमेल केले. त्याची अब्रू जाणारच होती.

ओलींपीक मध्ये किती पदके मिळाली? त्यावेळी कुठे गेले होते पंतप्रधानांचे प्लानिंग वगैरे? आपल्या देशातील लोकही दिव्य आहेत. खेळाडूंच्या मेहनतीला शाबासकी न देता पंतप्रधानांची आरती ओवळताहेत. काय तर म्हणे प्लानींग केली. पदकं जिंकायला कसली असते प्लानींग? म्हणजे लोक वाचतात म्हणून काहीबाही काहीच्या काही लिहायचं?? मालकांनी राजकीय धागे बंदं केल्याने अशाप्रकारे वेगवेगळ्या मार्गाने दाबलेली ऊर्मी बाहेर निघतेय.

२०१४ -पंतप्रधानांची आरती सुरू झाली. २०१८-मिशन खेलो इंडिया ची स्थापना झाली. ले क राज्यवर्धन राठोड ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळमंत्री झाले. गाव,शाळा,जिल्हा,राज्य व देश स्तरावर मिशन राबवले. खेळ,कला यांना राजाश्रय हवा असतो. आताच्या काळात सरकारकडून तो मिळाला तर खेळाडू, कलाकार चमकतात. एसीयन खेळ १९५१ मधे सुरू झाले. २०१४ च्या आगोदर व नंतर ची मेडल यादी बरेच काही सांगून जाते. भारताला सन १९०० ते २०१२ ,११२ वर्षात २४ मेडल्स तर २०१६ ते २०२० ,६ वर्षामधे ९ मेडल्स मिळाले. याचाच अर्थ तत्कालीन सरकार खेळ,खेळाडू आणी पर्यायाने देश या बद्दल किती संवेदनशील आहे हे वेगळे लिहावयास नको. पी टी उषा,अदिल सुमारील,नरेंद्र बत्रा,,नारायण रामचंद्र सारखे ऑलिम्पिक मेडलिस्ट, अनुभवी IOCचे प्रेसिडेंट तर २०१४ पुर्वी,कलमाडी,विद्याचरण शुक्ला,चौटाला सारखे राजकारणी प्रेसिडेंट होते. आमच्या घरात एक अंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू व जज्ज आहे. या वर्षी एशियन खेळाडूंना घेऊन गेला व जज्ज सुद्धा होता. त्याचा प्रवास जवळून बघीतला आहे. जर एखादे सरकार चांगले काम करत असेल तर सामान्य जनता जरूर त्याची दखल घेते पण कार्यकर्ते मात्र त्यांच्या आकां ची मर्जी राखण्यासाठी काहीबाही बोलत राहातात. खेळाडूंची मेहनत कुणीच नाकारत नाही पण सरकार ने खेळाडूंवर घेतलेली मेहनत मात्र सोईस्कर पणे विसरतात. Year Gold Silver Bronz Total 1951 - 15, 16, 20, 51. 1954 - 5 4 8 17 1958 - 5 4 4 13 1962 - 10 13 10 33 1966 - 7 3 11 21 1970 - 6 9 10 25 1974 - 4 12 12 28 1978 - 11 11 6 28 1982 - 13 19 25 57 1986 - 5 9 23 37 1990 - 1 8 14 23 1994 - 4 3 16 23 1998 - 7 11 17 35 2002 - 11 12 13 36 2006 - 10 17 26 53 2010 - 14 17 34 65 ________________________________________ 2014 - 11 10 36 57 2018 - 16 23 31 70 2023 - 28 38 41 107 पॅरिस मधे नक्कीच भारतीय खेळाडू अपेक्षे पेक्षा भरीव कामगीरी करणार यात शंकाच नाही. हर,हर,.......

In reply to by कर्नलतपस्वी

खेळाडूंच यशाचं श्रेय द्यायचं झालं की प्रधानमंत्र्यांची वाहवा, त्यांच्या योग्य नीतीचं यश आणि धोरण आणि प्रशासन यासाठी राजकारणी IOC च्या प्रेसिडेंट पदावर बसला तर ती आपल्या चमच्यांची सोय! जरा बघा एशियन गेम्सचं नियोजन, त्या निमित्ताने कायमस्वरुपी झालेलं रंगीत प्रसारण. कोणी ऊठसूठ इंदिरा गांधींना त्याचं श्रेय देत बसला नाही.

In reply to by सर टोबी

गणेश चतुर्थीला बाप्पा मोरया,नवरात्रात अंबाबाई चा उदो उदो... थोडक्यात म्हणण्याचा उद्देश ज्या त्या वेळेस त्या त्या सरकारला श्रेय द्या. जर एखादे सरकार, (मग ते कुठलेही असो),चांगले काम करत असेल तर सामान्य जनता जरूर त्याची दखल घेते

In reply to by अहिरावण

थोडक्यात म्हणण्याचा उद्देश ज्या त्या वेळेस त्या त्या सरकारला श्रेय द्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नेहरूंनी इस्त्रोची स्थापना केली, पण पाळण्याची शक्ती या सरकारने दिली. ( सर्वच क्षेत्रांत). हे सत्य स्वीकार करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आजोबांनी बांधलेल्या कौलारू घराच्या जागेवर नातवाने बंगला बांधला. त्या बंगल्याचे श्रेय आजोबांना द्यायचे असे म्हणायचे आहे का?

In reply to by सर टोबी

>>> कोणी ऊठसूठ इंदिरा गांधींना त्याचं श्रेय देत बसला नाही. पण न्युयॉर्क टाईम्सचा ५ डिसेंबर १९८२ चा लेख वेगळेच सांगतोय https://www.nytimes.com/1982/12/05/world/asian-games-give-mrs-gandhi-a-…

In reply to by अहिरावण

एक सॉफ्ट पॉवर म्हणून एशियन गेम्सच्या आयोजनाचा निवडणुकीत लाभ होणं आणि कशाही प्रकारे मोदींची आरती ओवाळायचीच हा अट्टाहास असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना? साध्या एशियाड बसेसचं उदाहरण घ्या. अल्युमिनियमच्या पत्र्यापासून बनविलेल्या, वजनाला हलक्या, सुखद रंगसंगतीच्या, रुंद खिडक्या असणाऱ्या बसेसनी सार्वजनिक प्रवासाची कल्पना बदलून टाकली. अंतराष्ट्रीय स्पेसिफिकेशन्स चे तरण तलाव, रेसिंग ट्रॅक, अशा पायाभूत सुविधा देशातच तयार झाल्या. या धाग्याचं जे शीर्षक आहे ते साध्य करणाऱ्या पायाभूत सुविधांची ती पायाभरणी होती. आणि हे सर्व करतांना कुठेही इंदिरा गांधींची छबी नव्हती.

In reply to by सर टोबी

सध्या प्रत्येक ठिकाणी असलेली श्री मोदी यांची छबी आणि नावाचा उदो उदो अगदी डोक्यात जाणारा आहे. श्री मोदी आणि त्यांचे सहचारी श्री नेहरु यांना याचमुळे नावे ठेवतात, पण श्री मोदी तेथेच जाऊन पोचले आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

मोठं आंदोलन करूनही त्याच्या विरूध्द साधा गुन्हा दाखल केला जात नव्हता. लोकलज्जेस्तव दाखल केला. त्यामुळे पुढे तपास काय होणार हो माहीतच आहे. भाजपचा लाडका खासदार असल्याने खेळाडूंचे लैंगीक शोषण झालेही असेल तरी काय फरक पडतोय?

जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. (लक्ष्य निर्धारित करून, योजना बनविणे आणि त्यासाठी सर्व लॉजिस्टि्स पुरविणे ही प्रधानमंत्रींची कार्य करण्याची पद्धत). काहीसा सहमत आहे. काही बाबतीत कार्य करण्याची पद्धत नक्कीच दिसून येते आहे.

In reply to by रंगीला रतन

हीही. एखाद्या राजकीय व्यक्तिमागे वहात गेलेले लोक भारत सोडला तर कुठेही नसावेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परमपूज्य गांधी यांनी, पाकिस्तानच्या निर्मितीला कळत नकळत हातभार लावला , तरी जनता शांतच होती परमपूज्य नेहरू यांनी, चीनला जमीन दिली, तरी जनता शांतच ----- आम्ही आपले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी मागे, बहालोल खानाला ठेचून मारा ... एका प्रकारे ही पण , व्यक्ती पूजा ... -----+

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परमपूज्य नेहरू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे, उभ्या राहणाऱ्या जनतेची आहे ... आम्ही , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे, एक प्रकारची व्यक्ती पूजा ...

In reply to by मुक्त विहारि

गांधी नेहरूंची नावं घेतलीत. सध्या मोदींच्या काळात चीन किती भूमी गिळतोय ते पहा. चीनचं नाव घ्यायचीही हिंमत होत नाहीये विश्वगुरूंची. असो. राजकीय चर्चा नको आहेत. तरीही तुम्हाला चर्चा करायचीच असेल तर स्वतःच स्वतशी करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हिंदूंचे राष्ट्र स्थापन करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले... बाय द वे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा, कुठला पक्ष होता?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चीन किती भूमी गिळतोय याला काही आधार कि नेहमी प्रमाणे पप्पूच्या गफ्फा लष्करप्रमुखानी ग्वाही दिली आहे कि एक इंच सुद्धा जमीन चीनला दिलेली नाही. कि आता लष्करप्रमुख सुद्धा मोदीभक्त झाले असे म्हणणार? https://timesofindia.indiatimes.com/india/not-an-inch-of-land-has-been-…

In reply to by सुबोध खरे

सुब्रम्हण्यम स्वामी हो नाव ऐकलंय का?? विशेष म्हणजे तथाकथीत देशभक्त पक्षाचेच खासदार आहेत. पण ते देशद्रोही असावेत. गुगल वर असंख्य वृत्तपत्रांच्या बातम्या आहेत पण एक पान्श्चजन्य सोडलं तर अख्खा मिडीया देशद्रोहा असावा.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे वृत्तपत्रांच्या बातम्या/सुब्रम्हण्यम स्वामींनी दिलेले पुरावे खोटे होते का?? की मोदी खोटं बोलले?? खोटं बोलण्याचा इतिहास कुणाचा आहे हे माहीत करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वृत्तपत्रांच्या बातम्या/सुब्रम्हण्यम स्वामींनी दिलेले पुरावे तेच द्या म्हटलंय हो. ऐकीव बातमी नको

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला सापडत नाहीये ना? मला तरी सापडलं नाही. सोडून द्या. मी तरी कोणत्याही राजकारणी किंवा पत्रकारापेक्षा लष्करप्रमुखांवर जास्त विश्वास ठेवतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी देशाच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकारींच्यांसोबत अनेक वर्ष काम केले आहे. २०१४ पूर्वी काय परिस्थिती होती त्याबाबत विधान मी करत नाही.तुम्हाला आवडणार नाही. पण २०१४ नंतर एक इंच जमीन ही चीन ने बळकावली नाही आहे. गळवान मध्ये आपण वरचढ होतो. गेल्या दहा वर्षांत सैन्य शक्तीही अनेक पट वाढली आहे.

In reply to by विवेकपटाईत

पुरावे असले म्हणून काय झालं?? आपण “ एक इंच जमीन ही चीन ने बळकावली नाही आहे.” बोलतच राहू.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणते पुरावे? खाली डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाचे तर उत्तर दिसत नाही कि आपले सरकार नाही म्हणून सतत "चीनने जमीन बळकावली" असे सतत खोटे बोलतच राहायचे? आत्ताचे सरकार खड्ड्यात जाऊ द्या पण लष्करावरही अविश्वास?

In reply to by टीपीके

सुब्रम्हण्यम स्वामी ते वेगवेगळ्या मिडीयाने सतत पुरावे दिलेत. साधं गुगलही करायला नको. बाकी सैन्य प्रमुख, इडी प्रमुख, सीबीआय प्रमुख, निवडणूक आयोग प्रमुख, संघ प्रमुख, सर्वोच्च न्यायालये ह्यांच्यावरील माझा विश्वास २०१४ नंतर दुप्पट झालाय. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सैन्य प्रमुख, सर्वोच्च न्यायालय यांच्यावरही विश्वास नसेल तर मग बोलणेच खुंटले. म्हणजे तुमच्या बोलण्याची री ओढणाराच खरा बाकी सगळे खोटे. आणि सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या म्हणण्याप्रमाणे तर आत्ता राहुल आणि सोनिया तुरुंगात पाहिजेत, की आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने इनोसंट अनलेस प्रोव्हन गिलटी? बाकी ते दोघे सध्या जामीनावर बाहेर आहेत ना? म्हणजे सकृतदर्शीनी कोणतातरी गुन्हा घडला आहे आणि या दोघांचा त्यात सहभाग असल्याची शक्यता दिसते आहे , बरोबर ना?

In reply to by टीपीके

म्हणजे इडी पारमूख, सीबीआय प्रमुख, निवडणूक आयोग प्रमूख ह्यांच्यावर विश्वास नसावा का? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कशाला शब्दच्छल करून विषय बदलायचा प्रयत्न करत आहात? तुम्हालाही माहीत आहे मुद्दा काय आहे. उत्तर नसेल तुमच्याकडे तर मी गप्प राहतो. पण या पुढे राहुल सारख्या कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. हे फार देश विघातक आहे. कृपया या पासून लांब राहा. अर्थात तोच तुमचा अजेंडा असेल तर चालू द्या खोटे. अहो या सरकारच्या पण खूप चुका आहेत ज्या विरोधक पण का कोण जाणे सांगत नाहीत, त्या शोधा आणि लोकांना सांगा, पण नीट माहिती काढून. चुकीच्या गोष्टींचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू नका

In reply to by टीपीके

असो, सुब्रम्हण्यम स्वामी ते वेगवेगळ्या मिडीयाने सतत पुरावे दिलेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जाऊ द्या. बहुतेक तुम्हीही कोणताही पुरावा बघितलेला दिसत नाही, नाहीतर तुम्ही इकडे काहीतरी पुरावा सादर केला असता. कळला तुमचा अजेंडा. हा माझ्याकडून शेवटचा प्रतिसाद. आता तुम्ही सेनेला (शिवसेना नाही, भारतीय सेना) पण इग्नोर मारून कितीही वेळा तुम्हाला पाहिजे असलेलं खोट लिहू शकता. एन्जॉय माडी

जर इतर देश २०३५ साठी भारताची आर्थिक रणनीती वगैरे अहवाल बनवत असतील, आणि त्यात खेळाचा वाटा महत्त्वाचा मानत असतील तर भारतीय सरकार नक्कीच धोरणात्मक प्रयत्न करते आहे असे दिसते. श्री पीटर एन वर्गीस एओ यांनी ऑस्ट्रेलियन सरकारला दिलेला अहवाल पाहिला तर त्यात खेळासाठी बाजारपेठ म्हणून एक विभागच ठेवलेला दिसतो. येथे स्पष्ट म्हंटलेच आहे की हा भारताच्या आर्थिक धोरणाला ऑस्ट्रेलियन सरकारचा प्रतिसाद आहे. येथे प्रकरण ११ हे क्रिडा सेवांसाठी ठेवलेले दिसते. जर सरकारने प्रयत्ने केले असतील तर त्याचे कौतुक केले पाहिजे. प्रयत्न केले नसतील तर पदके किंवा आंतररास्ग्ट्रीय स्तरावर प्रतिसाद दिसला नसता. आणि सरकार मध्ये धोरण राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर त्यांचेच नाव घेतले जाणार. अगदी अहवालातही म्हंटले आहे की क्रिडा क्षेत्रात भारताची कामगिरी चांगली व्हावी यासाठी मोदी सरकार धोरणात्मक रित्या प्रयत्न करते आहे आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक रस आहे. अधिक रस असल्यास: २०३५ भारताच्या आर्थिक धोरणाला ऑस्ट्रेलियन सरकारचा प्रतिसाद

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शेत जमीन घ्या आणी बटाटा लागवडीचे नियोजन करा. मी पण शेत जमीन घेतली आहे आणि योग्य सरकार आले की बटाटे काढणार आहे. बाय द वे, इटली मध्ये पण, बटाटे पिक येते का?

In reply to by निनाद

याचा अर्थ जागतिक भूक निर्देशांक, लोकशाही निर्देशांक यात मोदींना अजिबात रस नाहीय. आमच्या मोदींबद्दल असलेल्या रोषाचं हेच कारण आहे. पण काय करणार? पसंद अपनी अपनी. सुस्थितीतील समाजाचं हेच तर विशेष असतं - आपलं सोडून त्यांना दुसरं काही जाणवत नाही. वंदे भारत साठी सामान्यांच्या साध्या गाड्या बंद झाल्या? काळजी नको. झुणका भाकरीच्या टपऱ्या आताशा दिसत नाहीत. मॅक्डोनाल्ड आहे ना! माझा भारत बदलतोय कारण माझा नेता महान आहे असं आजकाल ऐकायला मिळतंय.

In reply to by निनाद

गालवानच्या चौक्यांवरचा ताबा सोडला त्यामुळे नेहरूंनी चीनला जमीन दिली याबद्दल बोलू नये, उरी, पठाणकोट, श्रीनगर, पुलवामा येथे हल्ले झाले त्यामुळे मुंबई हल्ल्याबद्दल कोणी बोलू नये असा वाद असता तर समजू शकलो असतो. इथे प्रश्नांची प्राथमिकताच हुकली आहे.

In reply to by सर टोबी

गालवानच्या चौक्यांवरचा ताबा सोडला याचा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का? बेफाट आरोप करणे अति झाले सरकारचे सोडा निदान लष्करावर तरी असे बेफाट आणि बिनबुडाचे आरोप करणे सोडा

In reply to by सर टोबी

वंदे भारत साठी सामान्यांच्या साध्या गाड्या बंद झाल्या किती आणि कोणत्या गाड्या सांगता येईल का? आणि त्या वंदे भारतसाठीच बंद झाल्या आहेत कि प्रवासीच फार कमी होते म्हणून? याबद्दल काही माहिती? कालच संभाजीनगर जवळ डेमू ला आग लागली त्यात १० सुद्धा प्रवासी नव्हते. आता यासाठी अक्खी गाडी चालवायची का? आणि ती बंद केली तर आपल्यासारखे बोम्ब मारणार कि वंदे भारत साठी गाडी रद्द केली. A fire broke out in five coaches of a DEMU train in Chhatrapati ... . Luckily, there were less than 10 passengers on board Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/104481404.cms?from=mdr&u….

In reply to by सर टोबी

असल्या फेक निदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळली आहे का. हे निदेशांक UNO किंवा भारत सरकारचे नाही. जर्मनीतल्या एका निजी संस्थेने बनविले आहे. त्यांनी एका संथे कडून तीन हजार लोकांचा डाटा घेतला असे त्या संस्थेचे विधान आहे. त्यात ५ वर्षांच्या वय खालील मुलांचे वजन,उंची हाडांची मजबूती इत्यादी आहे. हा डाटा कुठून कसा घेतला. हे ही गोपनीय आहे. मोदी सरकारला पाडण्यासाठी ८००० कोटींचे बजेट कुठे खर्च होत आहे. फक्त हे कळते.

मोदींनी, भारत २०३६ chya ऑलिम्पिक प्रयत्न करेल म्हंटले आणि ऑलिम्पिक म्हणजे कसा नुकसानीचा व्यवहार आहे यावर लगेच लोकसत्ता ने जळजळीत अग्रलेख ही लिहिला. ही लिंक. Lokstta नुसार केंद्र सरकार अहमदाबाद साठी प्रयत्न करणार आहे. हे मात्र चिंताजनक आहे. देशातील सर्व महत्वाच्या गोष्टी गुजरात मध्येच पाहिजे ह्या साठी हे सरकार नेहमी प्रयत्नशील असतय. मग त्या क्रिकेट वर्ल्ड कप च्य महत्वाच्या मॅचेस अहमदाबाद लाच असो की आणखी काहीही. खेलो इंडिया चा सर्वात जास्त निधी ही गुजरातलाच. गुजरात प्रगत राज्य आहे तर राज्य सरकार ने वाटा उचलावा की.