महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?
वाचने
51572
प्रतिक्रिया
195
मिसळपाव
प्रतिक्रिया
या युध्दामुळे फक्त
@ सौंदाळा:कृष्णाने मुद्दामच हे युद्ध पेटवले असेल तर बरेच प्रश्न
In reply to या युध्दामुळे फक्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आणि एक वर्तुळ पुर्ण झाले. रस
In reply to या युध्दामुळे फक्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बोये पेड बभूल के......
@ कर्नलभौ, तुमचे शीघ्रकाव्य भारीच आहे
In reply to बोये पेड बभूल के...... by कर्नलतपस्वी
पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि
अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित
In reply to पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि by कंजूस
@ विवेक पटाईत-अंधक -वृष्णि यादवांबद्दल बद्दल माहिती
In reply to अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित by विवेकपटाईत
@ कंजूसः अक्षौहिणी म्हणजे किती ? वगैरे
In reply to पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि by कंजूस
मुक्तसङ्गोऽनहंवादी
सहमत
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
म्हणूनच मी...
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
सदर वाक्य हास्यास्पद आहे.
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
अधिक काय लिहिणे
In reply to सदर वाक्य हास्यास्पद आहे. by Trump
श्लोकात काहीही लिहीले तरी
In reply to अधिक काय लिहिणे by प्रचेतस
बोलावले असता न येणे हा 'अधर्म' हे 'द्यूत' याविषयीपण होते ना ?
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
...
In reply to बोलावले असता न येणे हा 'अधर्म' हे 'द्यूत' याविषयीपण होते ना ? by चित्रगुप्त
सगळ्या पॉईंटशी
हायला
मृत्यूंजय, युगंधर कादंबरींची
In reply to हायला by सुरिया
१. एवढे सगळे झाले त्यातून
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.७. महाभारत युद्धानंतच्या
In reply to १. एवढे सगळे झाले त्यातून by राघव
@ प्रचेतसः कश्चिदअध्याय सभापर्वात कोणत्या क्रमांकाचा आहे ?
In reply to ७. महाभारत युद्धानंतच्या by प्रचेतस
कश्चिद अध्याय असे काही विशेष
In reply to @ प्रचेतसः कश्चिदअध्याय सभापर्वात कोणत्या क्रमांकाचा आहे ? by चित्रगुप्त
बेट द्वारकेच्या उत्खनात कळले
विधिलिखित कुणाला टळले नाही या
@घाटपांडे: विधिलिखित, फलज्योतिषादि विषयांचे सखोल ज्ञान असणाराने
In reply to विधिलिखित कुणाला टळले नाही या by प्रकाश घाटपांडे
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि
तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे......
In reply to दुर्योधनाला अखिल भारतावर आणि by कॉमी
तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल???
In reply to दुर्योधनाला अखिल भारतावर आणि by कॉमी
श्री दुर्योधन
In reply to तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल??? by Trump
=))
In reply to श्री दुर्योधन by उन्मेष दिक्षीत
द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या
In reply to तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल??? by Trump
दुसरे असे, की तत्कालीन
In reply to द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या by आनन्दा
महाभारत काल आणी आज.
अवतार,चमत्कार यांची फोडणी
नंबर ६
उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल?
दहन केल्याचे कित्येक उल्लेख
In reply to उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल? by चित्रगुप्त
कुमारी भुमी
In reply to दहन केल्याचे कित्येक उल्लेख by प्रचेतस
कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी
In reply to कुमारी भुमी by कर्नलतपस्वी
अगदी चोरून नेले तरीही
In reply to उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल? by चित्रगुप्त
मूळात काळ खूप लोटला
In reply to अगदी चोरून नेले तरीही by कंजूस
माझे दोन पैसे..
@ भक्ती: अधर्म वाढणे आणि धर्माची पुनर्स्थापना म्हणजे नेमके काय ?
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
Dwapara Yuga – In this age,
In reply to @ भक्ती: अधर्म वाढणे आणि धर्माची पुनर्स्थापना म्हणजे नेमके काय ? by चित्रगुप्त
हे कृष्ण...
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
@ bhakti: त्या दुव्यात 'SIN' विषयी इंग्रजीत मजकूर आहे.
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
फुटले पंख....
अनेकांचे वेगवेगळ्या
@ मार्कस ऑरेलियसः प्रतिसाद आवडला आणि पटला. एक प्रश्न.
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
महाभारतातील द्रोणपर्वात आहे.
In reply to @ मार्कस ऑरेलियसः प्रतिसाद आवडला आणि पटला. एक प्रश्न. by चित्रगुप्त
एकलव्य
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
मार्कस
In reply to एकलव्य by स्वधर्म
कोणता अधर्म त्याने केला होता,
In reply to एकलव्य by स्वधर्म
महाभारतात एकलव्याविषयी इतकाच
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
>>>अर्थात तरीही जे जे
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
आश्चर्यकारक!
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
मला वाटलंच होतं तुम्ही असा
In reply to आश्चर्यकारक! by स्वधर्म
त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा
In reply to मला वाटलंच होतं तुम्ही असा by प्रसाद गोडबोले
२
In reply to त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा by स्वधर्म
२
In reply to २ by प्रसाद गोडबोले
अहो २ २
In reply to २ by प्रसाद गोडबोले
मुद्दा मान्य करण्याचे औदार्य
In reply to २ by प्रसाद गोडबोले
चातुर्वर्ण्य
In reply to मुद्दा मान्य करण्याचे औदार्य by स्वधर्म
>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत
In reply to चातुर्वर्ण्य by अभिजीत
+१
In reply to >>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत by स्वधर्म
बरं
In reply to मुद्दा मान्य करण्याचे औदार्य by स्वधर्म
@ मार्कस, हे अनेक बाबतीत खरे आहे.
In reply to बरं by प्रसाद गोडबोले