Skip to main content

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 28/08/2023 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? ---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?

वाचने 51572
प्रतिक्रिया 195

प्रतिक्रिया

या युध्दामुळे फक्त श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक झाले. कृष्णाने मुद्दामच हे युध्द पेटवले होते.युध्दामुळे कुरु, मगध, पांचाल अशी बलाढ्य राज्ये खीळखीळी झाली. मात्र द्वारकेची भरभराट झाली. द्वारकेची मगधांच्या आक्रमणाच्या भीतीपासून कायमची सुटका झाली. त्यानंतर युधिश्ठीराने ३६ वर्षे राज्य केले, उत्तम कारभार केला, सर्वत्र आलबेल होते. असे (कदाचित युगंधरमधे) वाचले होते. जाणकारांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@ सौंदाळा:श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक होणे हा मुद्दा नक्कीच विचारणीय आहे. कृष्णाने मुद्दामच हे युद्ध पेटवले असेल तर बरेच प्रश्न निकालात निघतात. या दृष्टीकोणातून लिहीलेले पुस्तक वा लेख कोणते आहेत ? चर्चेत सहभागी होत असल्याबद्दल आभार. अधून मधून नवीन काही सुचेल तसे लिहीत रहावे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले. रस असल्यास वरील धाग्यात याचा थोडासा उहापोह केला आहे

बोये पेड बभूल के आम कहांसे होय.... Lot's of ifs and buts... गंध मछलीचा गेला नसता कृष्णद्वैपायन जन्मला नसता विचीत्रविर्य अकाली मेला नसता अंबिकेला अंधपुत्र झाला नसता अष्ट वसूंनी वसीष्ठांना छेडले नसते गंगेचा पदर ढळला नसता शांतनू प्रेमात फसला नसता, तर भिष्माचाही विवाह झाला असता कसरत कहें चित्रगुप्त को भाई...... महाभारताचा लोचा झालाच नसता.... अशा अनेक चुका होत गेल्या. पहिले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर होनी को कौन टाल सके,चित्रगुप्त तू जपले रघुवीर.....

In reply to by कर्नलतपस्वी

गंध मछलीचा गेला नसता .... महाभारताचा लोचा झालाच नसता.... हे शीघ्रकाव्य भारीच आहे. "पहिले रचा प्रारब्ध" हे इथे आलेल्या अन्य प्रतिसादातूनही ध्वनित होते आहे. कसरत कहें चित्रगुप्त को भाई......हे वाचून लहानणी ऐकलेली एक ग्राम्य चौपाई ( का काय म्हणतात ती) आठवली: "राम राम सब कोई कहे, दसरथ कहे ना कोय, दसरथ न करे कसरत, तो राम कहां से होय" -- तर तुम्ही दिलेला घटनाक्रम बघता भूतकाळात जे जे घडत आले, त्याचाच अटळ परिणाम भविष्यात होत असतो, आणि हे चक्र युगानुयुगे चालतच रहाते, हे निर्विवाद सत्य असल्याचे दिसून येते. "जय जय रघुवीर समर्थ" (चित्रगुप्त तू जपले रघुवीर). अनेक आभार.

पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि यादव सैन्य कौरवांकडे. तर ते नष्ट झालेच. मग निष्कंटक कसे? इतर ठिकाणीही हीच परिस्थिती. पंधरा वर्षांनी नवीन तरूण पिढी येणार ती मांडणार.

In reply to by कंजूस

अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित पाच वंशाचे यादव पांडवांच्या बाजूने लढले. एकदा महाभारत वाचले होते.

In reply to by विवेकपटाईत

महाभारताच्या संदर्भात अंधक - वृष्णी यादवांबद्दल खालील माहिती मिळाली (हिंदीतले चोप्य्पस्ते केले आहे) महाभारत युद्ध से पूर्व उन दोनों राज्यों का संघ था, जो 'अंधक-वृष्णि-संघ' कहलाता था। उस संघ में अंधकों के मुखिया आहुक पुत्र उग्रसेन थे और वृष्णियों के शूर-पुत्र वसुदेव थे। उस संघीय गणराज्य का राष्ट्रपति उग्रसेन था। इस संघ राज्य के केंद्र मन्त्रियों में एक उद्धव भी थे। उग्रसेन की भतीजी देवकी का विवाह वसुदेव के साथ हुआ था, जिनके पुत्र भगवान कृष्ण थे। उग्रसेन के पुत्र कंस का विवाह उस काल के सर्वाधिक शक्तिशाली मगध साम्राज्य के अधिपति जरासंध की दो पुत्रियों के साथ हुआ था। वसुदेव की बहिन कुन्ती का विवाह कुरु प्रदेश के प्रतापी महाराजा पाण्डु के साथ हुआ था, जिनके पुत्र सुप्रसिद्ध पांडव थे। वसुदेव की दूसरी बहिन श्रुतश्रवा हैहयवंशी चेदिराज दमघोष को व्याही थी, जिसका पुत्र शिशुपाल था। इस प्रकार शूरसेन प्रदेश के यादवों का पारिवारिक संबंध भारतवर्ष के कई विख्यात राज्यों के अधिपतियों के साथ था। उग्रसेन का पुत्र कंस बड़ा शूरवीर और महत्त्वाकांक्षी युवक था। फिर उन्हें अपने श्वसुर जरासंध के अपार सैन्य बल का भी अभिमान था। वह गणतंत्र की अपेक्षा राजतंत्र में विश्वास रखता था। उन्होंने अपने साथियों के साथ संघ राज्य के विरुद्ध कर उपद्रव करना आरम्भ किया। अपनी वीरता और अपने श्वसुर की सहायता से उन्होंने अपने पिता उग्रसेन और बहनोई वसुदेव को शासनाधिकार से वंचित कर उन्हें कारागृह में बन्द कर दिया और आप अंधक-वृष्णि संघ का स्वेच्छाचारी राजा बन गया था। वह यादवों से घृणा करता था और अपने को यादव मानने में लज्जित होता था। उसने मदांध होकर प्रजा पर नाना प्रकार के अत्याचार किये थे। अंत में श्रीकृष्ण द्वारा उनका अंत हुआ था। कृष्णाचे आई-वडील (देवकी-वसुदेव) अंधक - वृष्णि असल्याने त्यांनी पांडवांचा पक्ष घेणे सहाजीकच वाटते. या न्यायाने कौरवांचा पक्ष घेणार्‍या यादवांविषयी काय माहिती मिळते ?

In reply to by कंजूस

@ कंजूसः तुमच्या प्रतिसादातील "यादव सैन्य कौरवांकडे" यावरून युद्धात कुणाकडे किती सैन्य होते, अक्षौहिणी म्हणजे नेमके किती? 'याविषयी प्रश्न उद्भवतात. याबद्दल गुगलता मिळालेली माहिती चोप्य्पस्ते: १ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति (पायी सैनिक) ३ पत्ति = १ सेनामुख ३ सेनामुख = १ गुल्म ३ गुल्म = १ गण ३ गण = १ वाहिनी ३ वाहिनी = १ पृतना ३ पृतना = १ चमू ३ चमू = १ अनीकिनी १० अनीकिनी = १ अक्षौहिणी ------------------- अजुन पुढे विश्लेषण केले तर: एका 'पत्ति' मधे: १ रथ, १ योद्धा, १ सारथी, ४ घोडे ---- १ हत्ती १ योद्धा, १ माहुत ----- ३ घोडेस्वार, ३ घोडे --- ५ भूदल सैनिक. एकूण २,६२,४४० मनुष्यबळ, रथ २१८७०, रथाला ८७४८० घोडे, + ६५६१० घोडदळ, म्हणजे एकूण १५३, ०९० घोडे, २१८७० हत्ती, आणि २१८७० रथ असे सर्व सामुग्री सह ४,५९,२७० म्हणजे एक औक्षणी सैन्य होय. पांडव सैन्य : २,६२, ४४०*७= १८,३७,०८० मनुष्यबळ. १,९६, ८३०*७ = १३,७७, ८१० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७० * ७ = ३२, १४, ८९० हत्ती, घोडे, रथ सह कौरव सैन्य : २,६२,४४०*११ = २८,८६,८४० मनुष्यबळ. १,९६,८३९*११= २१,६५,१३० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७०* ११ = ५०,५१, ९७० हत्ती, घोडे, रथ सह

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः। सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते।। कशाबद्दलही आसक्ती, अहंकार न बाळगता ध्येय साध्य करण्यासाठी नित्य प्रयत्न करणारा पण ते ध्येय साध्य होवो अथवा न होवो तरीही निर्विकार राहणारा सात्विक कर्ता असतो. कृष्णाचे आयुष्य हे असं आहे. मुळात दुर्योधनादिकांना त्याला सहज नष्ट करता येणे शक्य होते की नाही हा वादाचा विषय असू शकतो अन्यथा त्यास मथुरा सोडून द्वारकेस स्थलांतर करावे लागते ना. भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता सध्या तरी इतकेच, चर्चेत थोडा थोडा भाग घेत राहीनच पण मुळात विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे की एखादं दुसऱ्या प्रतिसादात उत्तरे देणे अशक्य आहे.

In reply to by प्रचेतस

मूळ विषयाचा आवाका खूप मोठा आहे. सगळ्या प्रश्नांचे दोन शब्दात उत्तर असे आहे - ईश्वरेच्छा बलीयसी :)

In reply to by प्रचेतस

लेखकांस म्हंटले की विषय खुप गहन आहे. मिपावरील काकू प्रेमी (गैरसमज नको काथ्या कूट प्रेमी) नक्कीच यावर गंभीर दखल घेतील. मी वरती लिहीले आहे त्याप्रमाणेच प्रारब्ध, द्वापारयुग संपवायचे होते. कलियुगातील कष्टप्रद परिस्थितीत आधार मिळण्यास भगवद्गीत गीता सारखा ग्रंथ सांगायचा होता. (आणी हो,मिपावर काथ्याकूट करण्या साठी सुद्धा) त्या साठी वर्ण संकर,धर्मावर अधर्माचे वर्चस्व व्हावयास हवा होता. त्या साठी महायुद्ध होणे जरूरी होते. नाहीतर द्रौपदीला अखंड वस्त्र पुरवणाऱ्या मुरलीधराला शिशुपाला सारखे दुर्योधन आणी पार्टीचे मुंडके उडवणे अशक्य नव्हते. दस्तुरखुद्द कृष्ण, याचा मृत्यू सुद्धा पूर्वनियोजित होता. यादव,मुसळाचा जन्म, लोह चुर्णातील एक तुकडा मासा गिळतो,त्या पासून बनलेल्या बाणाने कृष्णाच्या अंगठ्याचा भेद. ही घटना माहीत असेलच. महाभारता मधे घडलेल्या घटनांना सरकारी फाईलीं सारखे स्ट्राँग Forward and Backward references आहेत. उदाहरणार्थ, कुमारी कुंतीला मिळालेले दुर्वास ऋषींचे वरदान, कानीन पुत्र कर्णाची व दुर्योधन मैत्री किंवा अपराजीत भिष्म व शिखंडीचा जन्म व इतर अनेक. तसेच महाभारतातील प्रत्येक घटनांबद्दल कार्यकारणभाव पुढील पिढीसमोर मांडायचा होता. नाहीतर देव आणी हिटलर (तानाशहा) यांत काहीच फरक दिसलाच नसता.

In reply to by प्रचेतस

भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
हा परिच्छेद पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी वर्णन करणारा वाटतो.

In reply to by प्रचेतस

शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
सदर वाक्य हास्यास्पद आहे. जणु काही क्षत्रिय युध्दाला बोलावले की पुर्वैइतिहास, स्वत:च्या राज्यांची तयारी, युध्दानंतरचे परिणाम, नातेसंबध इ. लक्षात न घेता युध्द्दाला बोलावले की घोड्यावर मांड टाकत होते.

In reply to by Trump

क्षत्रियस्यापि यो धर्मस्तं ते वक्ष्यामि भारत | दद्याद्राजा न याचेत यजेत न तु याजयेत् || नाध्यापयेदधीयीत प्रजाश्च परिपालयेत् | नित्योद्युक्तो दस्युवधे रणे कुर्यात्पराक्रमम् || ये च क्रतुभिरीजानाः श्रुतवन्तश्च भूमिपाः | य एवाहवजेतारस्त एषां लोकजित्तमाः || अविक्षतेन देहेन समराद्यो निवर्तते | क्षत्रियो नास्य तत्कर्म प्रशंसन्ति पुराविदः || वधं हि क्षत्रबन्धूनां धर्ममाहुः प्रधानतः | नास्य कृत्यतमं किञ्चिदन्यद्दस्युनिबर्हणात् ||

In reply to by प्रचेतस

बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) वगैरे काही सांगून पुन्हा द्यूतात हारून राज्य गमावले असे काहीतरी आहे ना ?

In reply to by चित्रगुप्त

... महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) ... महत्वाचा मुद्दा. यांच्यासाठी एखादे व्यसन मुक्ती मंडळ नसावे का त्या काळी ?

कृष्णाचे आणि त्याच्या आयुष्याचे मेन हेतू १) स्वतः सामान्य मानव नसून देवाचे अवतार आहोत हे सिध्द करायचे होते. २) मुद्दा क्रमांक १ सिद्ध होत असतानाच सामान्य मानवाचे आयुष्य जगायचे होते त्यायोगे अवताराला प्रयोजनही मिळेल. ३) मराठी/संस्कृत भाषेला भरपूर शब्दप्रयोग आणि म्हणी मिळण्यासाठी. ४) गीता प्रेस गोरखपूर चालावी म्हणून. ५) परदेशी भारतीयांना देशी प्रसाद मिळावा म्हणून. ६) कायदेशीर शपथ घेताना एक साधन मिळावे म्हणून. ७) चित्रकार, कवि, लेखक, नट, गीतकार आणि संगीतकारांना सदाबहार विषय मिळावा म्हणून ८) दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून. ९) प्रेमिकांना आपल्या प्रेमाला उदात्तपणा देऊन घेण्यासाठी उदाहरण मिळावे म्हणून. १०) हॉलिवूडी अवतार पिक्चरसारखी निळी माणसे आधीच भारतात होऊन गेली हे प्रुव्ह करण्यासाठी. ११) पोहे, सुदाम्यासारख्या मध्यमवर्गीयांना भावणार्‍या कन्सेप्टस निर्मीतीसाठी. १२) दहीहंडी सारख्या साहसी खेळाच्या निर्मीतीसाठी. . अजून तशी लै कारणे हैत पण सांगता करतोच... १२) माझ्यासारख्या पामराला असले छपरी प्रतिसाद देण्याची संधी मिळावी म्हणून. . ;)

In reply to by सुरिया

मृत्यूंजय, युगंधर कादंबरींची निर्मीती व्हावी म्हणून. विनोबा भावेंना गिताई लिहीता यावी म्हणून बाळ टिळकांना गीतारहस्य लिहीता यावे म्हणून शाळेत मूलांचे पाच-दहा मिनीटे गीतेचे श्लोक म्हणन्यात वाया जावेत म्हणून ओपनहायमर सिनेमा भारतात चालावा म्हणून. काहीही शोध लागला तर “अरेच्चा हा गीतेत, महाभारतात आधीच होता” असे भक्त संप्रदायातील लोकांना सांगयला मिळावे म्हणून हे माझ्याकडून काही….. जोक अपार्ट पण अर्जूनाने युध्द टाळायचा बेस्टम बेस्ट निर्णय घेतलेला असताना हजारो पोरांचे बाप, हजारो स्त्रियाना विधवा बनवण्याचा निर्णय घ्यायला ऊद्यूक्त केले गेले. तरी ते देव, जय श्री क्रिष्ण. प्रभू श्रीरामांनी शंबूकाचा वध केला तरी ते देव. खरा देव शंकरच, जग वाचवायला विष प्यायला. शैव नी वैष्णवांनी तलवारी काढल्या एकमेकांना मारायला तर शैवांतील सर्वात चमकती तलवार माझी असेन…..:)

१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.

In reply to by राघव

७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याविषयी सभापर्वाच्या सुरुवातीस असलेल्या कश्चिदअध्यायातील नारद युधिष्ठिर संवादात याविषयी पुरेपुर विवेचन आहे. तत्कालीन जनजीवनाची भरपूर माहिती या दीर्घ अध्यायात मिळते.

In reply to by प्रचेतस

प्रतिसादाबद्दल अनेक आभार. जालावर महाभारताचे एक हिंदी भाषांतर मिळाले आहे, त्यातील सभापर्वात 'कश्चिद अध्याय' असे नाव सापडले नाही. मात्र त्यात १-१३ अध्याय दाखवत आहे. त्यापैकी 'कश्चिद अध्याय' कितव्या क्रमांकाचा आहे, हे कळवल्यास वाचता येईल. तुमच्या सर्वच प्रतिसादांची वाट बघत असतो, आणि त्यातून अगदी विश्वसनीय, यथायोग्य माहिती मिळत असते. जालावर महाभारताचे संपूर्ण तपशीलवार मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by चित्रगुप्त

कश्चिद अध्याय असे काही विशेष नाव नाही त्याला, मात्र ह्या अध्यायातील बहुतेक श्लोकांची सुरुवात कश्चिद ह्या शब्दाने होते म्हणून हा कश्चिद अध्याय म्हणूनच ओळखला जातो. सभापर्वातील पाचवा अध्याय. उदा- कच्चिदर्थाश्च कल्पन्ते धर्मे च रमते मनः | सुखानि चानुभूयन्ते मनश्च न विहन्यते || बाकी जालावर तपशीलवार मराठी भाषांतर मिळणे अवघड आहे. कंजूस काकांनी प्रतिसादातच एक लिंक दिली आहे मात्र ते भाषांतर कितपत विश्वसनीय आहे ते ठाऊक नाही. मात्र sacred texts वर इंग्रजी भाषांतर आणि संस्कृत डॉक्युमेंट्स वर भांडारकर संशोधित प्रत, कुंभकोणम प्रत संस्कृतातून उपलब्ध आहेत.

बेट द्वारकेच्या उत्खनात कळले द्वारकेचा किमान तीन वेळा पुन्हा निर्माण झाला होता. एका कृष्णाने द्वारका बसवली. पृथ्वीच्या वाढत्या तापमाना बरोबर समुद्राची पातळी वाढत गेली आणि शेवटी ती समुद्रात बुडाली. द्वारकेच्या हजार दीड हजार वर्षाच्या इतिहासात अनेक कृष्ण झाले असतील. महाभारत मध्ये काही हजार वर्षांचा भारताचा इतिहास जो एका महाकाव्यात पेरला गेला आहे.

विधिलिखित कुणाला टळले नाही या उत्तरात सर्वसमावेशकता आहे. असे विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.
घाटपांडे साहेब, 'विधिलिखित' या विषयावर तुमच्या सारख्या फलज्योतिषादि विषयांचे सखोल ज्ञान असणाराने काही लिहीणे हे फार मोलाचे ठरेल. तस्मात असा काथ्याकूट तुम्हीच सुरु करावा असे सुचवतो.

दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?

In reply to by कॉमी

दुर्योधन, किंवा फॉर दॅट मॅटर रावण, हे राज्यकर्ते किंवा प्रशासक म्हणून त्यांच्या राज्यात जनतेच्या दृष्टीने कितपत चांगले किंवा वाईट होते?

In reply to by कॉमी

दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?
श्री कॉमी तुमचा मुद्दा योग्य आहे. हाच मुद्याला ह्या काळातील उदाहरणे घेउया. १. अमेरीका: अमेरीकेतील बुहुतांशी नागरीक सुखी असतात. तिथे लोक कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. पण तीच अमेरीका इतर देशांत कायदे जुमानत नाही, हवी तेव्हा युध्दे सुरु करते, हुकुमशहांना पाठिंबा देते. २. युरोपिय राष्टे: त्यांनी इतरांवर अन्याय/वसाहती करुन स्वत:ची तुंबडी भरली. राजाचे प्रमथ कर्तव्य स्वता:चे प्रजाजन सुखी ठेवणे असेल तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल???

In reply to by उन्मेष दिक्षीत

श्री ट्रम्प (मिसळपाववाले) यांची खासीयतच आहे ही. =)) सं - दी - प

In reply to by Trump

द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या चुलत भावाला मारून राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे. अगदी भीमाला घातलेले विष अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं.. नाही का?

In reply to by आनन्दा

दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं..
अच्छा. थोडे आताच्या काळातील अजुन एक उदाहरण घेऊ या. श्री मोदी हे भ्रष्टाचारमुक्त असल्याचे भारतातील बहुतेक प्रजा मानते. पण त्यांनी त्याच्या पक्षात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे स्वतः आरोप केले होते असे लोक आयात केले. मग श्री दुर्योधन यांना जो न्याय लावला तोच श्री मोदी यांना लावता येईल का ?

महाभारत का झाले? काकांच्या मुलांमुळे. पेशवाई का बुडाली? काकांच्या मुलांमुळे. पक्ष का फुटला? आपल्या मुळं नाही रे भौ.....

अवतार,चमत्कार यांची फोडणी दिली की त्या कथानकावर चर्चा कशी करणार? महाभारत तसं आहे. काही उत्तरं शोधू म्हटलं की हे स्वर्गात अगोदरच ठरलं होतं यावर वाटेला लावतात. अमक्याला तमूक शाप होता परंतू असं झालं की तू स्वर्गात परत येशील. मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत. महाभारताचा काळ धरून त्यांचे अवशेष कुठे मिळतील तिथे तिथे खोलवर खोदकाम करून एकही मोठी चांगली वस्तू सापडली नाही. प्रयागजवळ पांडव काही काळ राहिले तिथेही काही सापडले नाही. घटोत्कचाने बांधलेला महाल जर भारी होता तर यासारखे दुसरेही नाहीत. एकूण समाज असा का वागतो एवढंच महत्त्व महाभारताला आणि रामायणाचा आहे. इथून अमूक युग संपलं आणि कलियुग,द्वापारयुग सुरू झालं म्हणायला त्या महाइतिहासाततरी काय दिव्य घडलं?

कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? >> ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.

मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत.
-- पुरावा म्हणजे उत्खननात सापडलेल्या वस्तू का ? तश्या वस्तू मधेही मोठाच लोच्या असतो. त्या वस्तुंचे स्पष्टीकरण देणारे जे असतात त्यांच्याही विविध भूमिका (अजेंडा) असतात. इजिप्तच्या एका उत्खननाबद्दल असा एक व्हिडियो बघितला होता, त्याबद्दल नंतर लिहीन. -- कुरूक्षेत्र भागात उत्खननात नेमके काय मिळाले तर तो महाभरताचा ग्राह्य पुरावा मानता येईल ? -- युद्धानंतर काही काळ मानवी आणि हत्ती-घोड्यांचे मृतदेह रणभूमिवर पडलेले असतील. सर्वच शवांचे दहन केले गेले असण्याची शक्यता कितपत आहे ? दहन केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत का ? वगैरेंवर प्रचेतस प्रकाश टाकू शकतील. -- त्याखेरीज तुटके रथ, शस्त्रे, नाणी, धातूची भांडी, ढाली वगैरे सुद्धा तिथे काही काळपर्यंत पडलेले असू शकते. मात्र ते हळूहळू लोकांनी उचलून नेले असण्याचीही शक्यता बरीच आहे. -- युद्धात अमूक इतके (लाखो) सैनिक मृत्युमुखी पडले असले तरी सारथी, शस्त्रनिर्मिती- दुरुस्ती - पुरवठा करणारे, राहुट्या उभारणारे, स्वयंपाक करणारे, रणवाद्ये वाजवणारे, दुरून तमाशा बघणारे, 'बाजारबुणगे', मृत सैनिकांचे नातेवाईक, स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुले असे भरपूर लोक जिवंत राहिलेले असतील. त्यांनी विविध उपयोगासाठी बर्‍याच वस्तू (उदा. लाकडी रथाची चाके वगैरे सरपण म्हणून वापरणे, धातु वितळवून भांडीकुंडी बनवणे) उचलून नेल्या असतील. ------- या दिशेने सुद्धा चर्चा करता येईल. अवांतरः इथे मला एक एक प्रसंग आठवतो. आम्ही रहायचो त्या फरिदाबादला एका पहाटे रेल्वेचा मोठा अपघात होऊन खूप लोक मृत्युमुखी पडले होते. अपघात झाल्यावर ताबडतोब जवळच्या झोपडपट्टीतील लोकांनी मृतदेहांवरचे दागिने काढून घेतले आणि हाती लागतील त्या बॅगा वगैरे सामान उचलून आपल्या झोपड्यात नेऊन ठेवले. (आमच्या घरी काम करणार्या बाईने पण एकदोन बॅगा आणल्याचे सांगितले होते - नंतर पोलिसतपासात त्या वस्तू जप्त केल्या गेल्या, त्यांचे काय झाले देवाक ठाऊक) सकाळी टीव्हीवर बातमी दाखवू लागले तेंव्हा रा. स्व. संघाचे स्वयंसेवक (त्यात माझा एक मित्रही होता) मदतकार्य करत असताना दिसत होते खरे, पण तसा उल्लेख एकाही चॅनेलने केला नव्हता (काँग्रेसचे राज्य होते). -- मुद्दा असा की हाती लागतील त्या वस्तू तबडतोब उचलून नेणारे त्याकाळीही असणारच. उत्खननात काय सापडणार ? असो.

In reply to by चित्रगुप्त

दहन केल्याचे कित्येक उल्लेख महाभारतात आहेत. पांडूच्या दहनाचे तर अगदी तपशीलवार वर्णन महाभारतात येते. माद्री चितेवर झोकून सती गेल्याचेही वर्णन आहे. तं चितागतमाज्ञाय वैश्वानरमुखे हुतम् | प्रविष्टा पावकं माद्री हित्वा जीवितमात्मनः || तर युद्धात मरण पावलेल्यांच्या दहन संस्काराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते. एवमुक्तो महाप्राज्ञः कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः | आदिदेश सुधर्माणं धौम्यं सूतं च सञ्जयम् ||२४|| विदुरं च महाबुद्धिं युयुत्सुं चैव कौरवम् | इन्द्रसेनमुखांश्चैव भृत्यान्सूतांश्च सर्वशः || भवन्तः कारयन्त्वेषां प्रेतकार्याणि सर्वशः | यथा चानाथवत्किञ्चिच्छरीरं न विनश्यति || शासनाद्धर्मराजस्य क्षत्ता सूतश्च सञ्जयः | सुधर्मा धौम्यसहित इन्द्रसेनादयस्तथा || चन्दनागुरुकाष्ठानि तथा कालीयकान्युत | घृतं तैलं च गन्धांश्च क्षौमाणि वसनानि च || समाहृत्य महार्हाणि दारूणां चैव सञ्चयान् | रथांश्च मृदितांस्तत्र नानाप्रहरणानि च || चिताः कृत्वा प्रयत्नेन यथामुख्यान्नराधिपान् | दाहयामासुरव्यग्रा विधिदृष्टेन कर्मणा || धृतराष्ट्राने कुंतीपुत्र युधिष्ठिराला सांगितल्यावर त्यानें दुर्योधनाचा पुरोहित सुधर्मा, धौम्य, सूत, संजय, महाबुद्धि विदुर, कुरुकुलांतील युयुत्सु, तसेंच इंद्रसेनादि सर्वं सेवक आणि सारथी यांस आज्ञा करून सांगितलें कीं, 'या सर्वांचीं प्रेतकार्ये तुम्हीं यथाविधि करावी. अनाथाप्रमाणे कोणी राहून त्याच्या शरीराचा नाश होऊं नये ' राजा, नंतर युधिष्ठिराच्या आज्ञेनुसार विदुर, संजय, सुधर्मा, धौम्य आणि इंद्रसेनप्रमुख सेवक यांनी चंदन, अगुरुंची आणि कालीयक वृक्षाची काष्ठे, घृत, तेल, सुवासिक गंध, रेशमी वस्त्रे, आणि लाकडांचे मोठमोठे संचय तयार करविले, त्याचप्रमाणे मोडकेतोडके रथ, नाना प्रकारचीं आयुधे गोळा केली आणि मोठ्या प्रयत्नानें चिता रचिल्या. नंतर प्रथमतः मोठमोठे राजे, त्यांच्या मागून इतर लोक, अशा क्रमानें त्या सर्वांचे शास्त्रोक्त विधीने दहन केले

In reply to by प्रचेतस

कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे. आपल्या पैकी काही कुरुक्षेत्रावर गेले असतील आजही जोतीसर ही जागा गीता जीथे सांगीतली म्हणूनप्रसिद्ध आहे.,भिष्म कुंड,ब्रह्म सरोवर,विराट नगर,किचक दरा,पांडूपोल, गज गौरी व्रत नैमिष्यारण्य, रामसेतू ,गंधमादन पर्वत, विंध्य एक ना अनेक जागा आजही ऐकीवात, बघण्यात आहेत. रामायण, महाभारतातील अनेक संदर्भ, स्थल, दिसून येतात. भिमबेटका,चित्रकूट,द्वारका मथुरा,वृंदावन, हस्तीनापुर विदर्भ इ. इतक्यावर्षा नंतरही हे संदर्भ टिकून आहेत, याचाच अर्थ हे कपोलकल्पित नसावे. आहो अंत्यसंस्कार करताना तीन पिढ्यांची नावे विचारली तर बरेच लोकांना माहीत नसतात. असे असताना असे कही झालेच नाही,पुरावे दाखवा असे म्हणणे उचित ठरणार नाही. चर्चा छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे.
अंत्यसंस्कार इतरांच्याच बरोबरीने केला. कुमारी भूमीचा उल्लेख नाही, मात्र शाप दिला.

In reply to by चित्रगुप्त

अगदी चोरून नेले तरीही त्यावेळची प्रजाही प्रगतच असणार. तीसुद्धा चांगल्या घरांत राहणारी असून काहीतरी अवशेष (म्हणजे त्या भव्यदिव्य युगाची साक्ष देणारे) सापडायलाच हवेत. मोठे रांजण? घरांच्या तुळया?

In reply to by कंजूस

मूळात काळ खूप लोटला असल्यामुळे उत्खननाचे थर बरेच खाली गेले असावेत, शिवाय तत्कालीन जनपदांच्या ठिकाणीच आजची प्रमुख नगरे वसली असल्यामुळे तिथे उत्खनन अशक्यच आहे. अगदी आजही जुन्नर किंवा पैठण येथे उत्खनन केल्यास सातवाहनांचे पुष्कळ अवशेष मिळतील पण ते शक्य नाही कारण पूर्वीच्या ठिकाणीच आजची ही नगरे वसली आहेत.

कृष्णाच्या IQ वर मला शंका नाही ;) असो,अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली.बाकी गांधारीलाही त्यावर तू युद्ध का थांबवले नाही आरोप करते , तेव्हा कृष्णही तिला प्रश्न करतो "तू आई म्हणून दुर्योधनाला चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त का करू शकली नाही?" उत्तर एकच अधर्माचा नाश धर्माची स्थापना. -१००० वर्षे रचित गेलेले एकमेव महाकाव्य महाभारत

In reply to by Bhakti

अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली. -- महाभारतकाली धर्म आणि अधर्म नेमके कशाला म्हणत होते ? यावर प्रकाश टाकावा ही विनंती. १. धर्म : अमूक अमूक मुद्दे २. अधर्मः अमूक अमूक मुद्दे. (आमच्या लहानपणी 'विटाळ कालवणे' असा एक शब्दप्रयोग -'अधर्म' या सदरात- वापरात होता त्याची आठवण झाली)

In reply to by चित्रगुप्त

Dwapara Yuga – In this age, spirituality continues to decline, virtue and sin show up in equal measure. https://toistudent.timesofindia.indiatimes.com/news/omg/different-yugas…

In reply to by Bhakti

तुम्ही दिलेला दुवा उघडून बघता इंग्रजीतील खालील मजकूर उघडला. यात द्वापारयुग, कलियुग इ.तील'पापे' असे काहीतरी आहे, परंतु त्यातून महाभारतकालीन 'धर्म'- 'अधर्म' याबद्दल मलातरी काहीच समजले नाही. (अधर्म वाढला होता आणि धर्माची पुनर्स्थापना करायची होती म्हणजे नेमके काय ) तो मजकूर असा आहे: Sins and Yugas In the era of Satyuga, the importance of relationship and truthfulness of heart was the topmost priority. The things which are very common in Kaliyuga, was considered as sins in Satyuga. After Satyuga, the era which came was Tretayuga. The time period when Lord Rama took birth. It was the Yuga where first time, the truth and righteous things were overpowered by human relationships. Sins in Dvapara Yuga In the Dvapara Yuga the dignity of relationships and family values declined gradually. Money, power, position overruled the human values. Kaliyuga and Sins As soon as the Kaliyuga arrived, human surpassed every moral value for the sake of money and power. Betrayal, cleverness, shrewdness and many more. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. Violence The first sin done by body is violence. It is the most disgraceful sin among every other. Purposely doing physical violence on some living organism comes under this sin. Lewdness Lewdness is one of the most common sin in Kaliyuga which Bhishma Pitamah told Yudhisthira. It also comes under physical sin. Our language The way we speak to others is the true reflection of our personality. Foul language comes under physical sins. Always speak with kindness and love. The language you use shows your upbringing and thoughts. Speaking without knowledge Speaking without analyzing things is also a kind of sin. The way we speak to others is the true reflection of our personality. So always speak with wisdom. Insulting elders In the Mahabharata, it is mentioned that insulting elders equals to death. But in Kaliyuga, it is very common to disgrace elders for one's benefits. Hurting someone Purposely hurting someone is also a kind of sin. Thinking about someone's bad is also a part of this sin. Mental violence is much more dangerous than physical violence. Simple living high thinking should be your mool mantra. Keeping a luxurious lifestyle is a kind of sin. -- कृपया खुलासा करावा. जमल्यास जालावर शोध घेऊन नेमका विषय हुडकून मराठीतले लिखाण द्यावे ही विनंती.

फुटतील पंख कल्पनेला घेईल विलास भरारी या धाग्याचा आता मालक श्याम मुरारी......

अनेकांचे वेगवेगळ्या परिप्रोक्ष्यातुन आलेले प्रतिसाद पाहुन छान वाटले. मी माझ्या अल्प अभ्यासाने अन आकलनानुसार बनवलेली काही मते मांडतो : कृष्ण देव होता हे गृहीतक क्षणभर बाजुला केलं तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. ५-७ खलनायकांना मारणे अगदीच सहज सोप्पे होते अशातला भाग नाही. मुळात जरासंधाला मारयच्यावेळेस कृष्णाला पुर्ण कल्पना होती की आपण ह्याला एकट्याने संपवू शकत नाही म्हणुनच त्याने भीमार्जुनाला सोबत घेऊन त्याचा नाश करवला. बाकी नरकासुर, कंस, शिशुपाल वगैरे जसे क्लियर इव्हिल होते तसे काही हस्तिनापुरातील लोकं नव्हते. दु:शासन वगैरे ९९ भावांना कृष्ण एकेहाती मारु शकला असता पण दुर्योधन हा अवघड मामला होता, तो काही ऐरागैरा नव्हता , इव्हन भीमाला त्याने घाम फोडला होता. त्याला मारणे , न्य्याय्य पध्दतीने मारणे कृष्णाला अवघडच गेले असते. भीष्म ही तर शतप्रतिशत अजिंक्य होते , त्यांन्ना मारणे कृष्णाला जमले नसते , एकवेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हरवु शकला असता पण मारु शकला नसता . तसेच सेम द्रोणांच्या बाबतीत ही आहे. कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते. अश्वत्थामा द्रोणांचा वध होई पर्यंत जवळपास अलिप्त राहिल्यासारखाच होता उगाच कोणातरी थातुरमातूर लोकांना मार वगैरे करत होता , पण त्याच्या सारखा सनकी माणूस , द्रोणांसारखा चेव खाऊन पहिल्या दिवसापासुन युध्दात उतरला असता तर कौरवांचे पारडे बरेच जड होते . सेम बाब कृतवर्म्याच्या बाबतीतही आहे. त्याला कृष्ण मारु शकला नसता. तस्मात ह्या लोकांना न्यायाने मारणे कृष्णाला शक्यच नव्हते. ज्यांना मारता येणे शक्य होते त्यांना कृष्णाने मारलेच होते . बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे . " बाकी ह्याबाजुचेही बरेच लोकं काही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्च्छ नव्हतेच , द्रुपद , द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न वगैरे तर सरळ सरळ नीच लोकंच होते. घटोत्कच अर्थात भीमाचा हिडिंबेपासुन हा तर सरळ सरळ राक्षसच होता, तो मेल्यावर कृष्णाने आनंदही साजरा केला आहे. ( ते पाहुन अर्जुन चकित झाला अन म्हणाला की अरे काय , आपल्या बाजुची व्यक्ती मेली आहे, तेव्हा कृष्ण सरळ सरळ म्हणाला आहे की बरे झाले कर्णाच्या हातुन मेला नाहीतर नंतर मला ह्याला मारावे लागले असते अन भीमाचा रोष पत्करावा लागला असता. ) थोडक्यात काय तर ही लोकं ही अवघड जागेच्या दुखण्यासारखी होती. तस्मात एक जोरदार युध्द होऊन ह्यांचा नाश होणे हेच ऑप्टिमल सोल्युशन होते. मला कायम वाटतं की माणासं काय जन्माला येत असतात मरत असतात , पण मानवी मुल्ये , तत्वज्ञान, मॉरल फिलॉसॉफी हे चिरंतन असते. अन्यायाच्या समुळ निर्दालना करिता युध्द हे अनिवार्यच होते. आणि तसेही तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) युध्दाने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला हे एक बरेच झाले . त्या निमित्ताने आम्हाला भगवद्गीतेसारखे अमौलिक रत्न लाभले ! मी उपनिषदांचे वरवर वाचन केले आहे , आणि ब्रह्मसुत्रेही वाचायचा प्रयत्न केला आहे, दोन्हीही टोटल बाऊन्सर आहेत , बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही ! अर्थात त्यावर श्रीमदाद्य शंकराचार्यांनी , माऊलींनी आणि आपल्या टिळकांनी इतके सुंदर लिहुन ठेवले आहे की त्यावर आपल्याला काही अजुन लिहायची गरजच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। ________/\________

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रतिसादातील तुमचे सगळे मुद्दे मननीय आहेत.
बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे.
-- याबद्दल जास्त माहिती/संदर्भ देता येईल का ? म्हणजे हा उल्लेख कुठे आहे वगैरे ? श्रीभागवतात आहे का ? अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

महाभारतातील द्रोणपर्वात आहे. जरासन्धश्चेदिराजो महात्मा; महाबलश्चैकलव्यो निषादः | एकैकशो निहताः सर्व एव; योगैस्तैस्तैस्त्वद्धितार्थं मयैव || अथापरे निहता राक्षसेन्द्रा; हिडिम्बकिर्मीरबकप्रधानाः | अलायुधः परसैन्यावमर्दी; घटोत्कचश्चोग्रकर्मा तरस्वी || तुझ्या हिताकरिता मी निरनिराळे उपाय योजून जरासंध, चेदिराज शिशुपाल, महाबलवान निषाद एकलव्य यांना मी एकेक करुन मारुन टाकले आहे. त्याच प्रमाणे हिडिंब किर्मिर, बकासुर वगैरे प्रमुख राक्षस, तसेच अलायुध, उग्रकर्मा घटोत्कच यांनाही मी मारुन टाकले आहे. ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव | धर्मसंस्थापनार्थं हि प्रतिज्ञैषा ममाव्यया || ब्रह्म सत्यं दमः शौचं धर्मो ह्रीः श्रीर्धृतिः क्षमा | यत्र तत्र रमे नित्यमहं सत्येन ते शपे || जे कोणी धर्माचा लोप करणारे असतील ते सर्व मला वध्य होत, धर्मसंस्थापनेसाठीच मी ही प्रतिज्ञा केली आहे. जेथे ब्रह्म, सत्य, दम, शुचिता, धर्म, र्ही, क्षमा हे वसतात तेथेच मी सदैव रममाण होत असतो हे मी सत्यपूर्वक तुला सांगतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

आपण वर लिहिले आहे: कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे." मला खरोखरच खूप उत्सुकता आहे, की एकलव्याने कोणता अधर्म केला होता. आत्तापर्यंत एकलव्य हा केवळ वंश/ वर्ण यामुळे विद्या नाकारला गेलेला एक अन्यायग्रस्त म्हणूनच समोर आलेला आहे. असा कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?

In reply to by स्वधर्म

आपल्या उत्तराची वाट पहात आहे. धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?
मी महाभारतात जे वाचले त्यात केवळ प्रचेतस ह्यांन्नी उधृत केलेला श्लोकच सापडला , अर्थात मी स्वतः एकलव्याला मारले असे कृष्ण स्वतःहुन आनंदाने कबुली देत आहे असे बस्स. बाकी त्याने धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो : धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

महाभारतात एकलव्याविषयी इतकाच उल्लेख आहे, मात्र एकलव्याचा वृत्तांत हरिवंशात विस्ताराने येतो. पौंड्रक वासुदेवाचा साथीदार म्हणजे निषादराज एकलव्य. हा पौंड्रक वासुदेव श्रीकृष्णाचा हाडवैरी होता, पौंड्रकाबरोवर कृष्ण बलरामाशी झालेल्या युद्धात एकलव्याची निषादसेना पौंड्रकासोबत लढली. त्या युद्धाचे विस्तारपूर्वक वर्णन हरिवंशात वाचायला मिळते. भागवतातही एकलव्य आणि कृष्णाच्या युद्धाचा उल्लेख असावा मात्र मी भागवत पुराण वाचलेले नसल्याने ह्याविषयी निश्चयाने सांगू शकत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात अपवाद बहुधा बाजीराव पेशवा (पहिला) आणि स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्कस ओरिलियस, आपण उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! आपली वेगवेगळ्या प्रतिसादातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत: >> कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते.  तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) >> बाकी त्याने (एकलव्याने) धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो :
धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! >> मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. (कर्णाच्या बाबत क्षुद्र लिहिले आहे, पण शूद्र म्हणायचे होते असे मानतो.) कर्णाला शूद्र असल्याने य़कश्चित म्हटले आहे. पण ब्राम्हणांना युध्दाचा अधिकार नसला तरी, त्यांच्या अलौकिक पराक्रमामुळे तो त्यांना मिळणे काहीच गैर नाही. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेणे हे सनातन धर्माच्या दृष्टीने योग्य आणि कृष्णाने त्याला मारले, तेही योग्यच. पण ब्राम्हणांना ते वर्णधर्माप्रमाण वागले नाहीत, सनातन धर्माचे पालन केले नाही म्हणून शासन केले नाही, कारण ते अवध्य होते. आपली वरील वाक्ये पाहता, त्याकाळचा सनातन धर्म व कृष्णाचे वर्तन (जो स्वत:च वर्णधर्माप्रमाणे वागला की नाही ते अलाहिदा) आपल्याला न्याय्य वाटत असावे. आपण ‘चातुर्वण्य व्यवस्था’ चांगली होती असे मानत असाल असे वाटते. विनोबांच्या गीताईतही चातुर्वर्ण्य व्यवस्था मला गोड वाटते असे वाक्य आहे. आश्चर्य याचे वाटते, की आजही असे लोक आहेत, ज्यांना हे जे घडलं, त्यात काही अन्याय दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे राज्य असलेल्या काळात जन्माला आलो, आणि त्यातच मरणार याचा केवढा तरी दिलासा वाटतो.

In reply to by स्वधर्म

मला वाटलंच होतं तुम्ही असा काहीतरी अर्थाचा अनर्थ करणार ते ! आणि हो मला क्षुद्र असेच म्हणायचे होते , पळपुटा विराटापर्वात एकट्या अर्जुनाकडून समस्त कौरवांनी मार खाला त्यात हा चक्क पाठीला पाय लाऊन भर युध्दातुन पळुन गेला होता =)))) बाकी आम्ही काहीही बोलले तरी कोणीही उठुन अर्थाचा अनर्थ करणार ! त्यामुळे आता गप्प बसतो. एकुणच संपुर्ण संवाद अन बोलणेच थांबवले पाहिजे , आम्ही आमच्यापुरते लिहावे हेच उत्तम ! #स्वान्तःसुखाय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

जर माझ्याकडून अर्थाचा अनर्थ झाला असेल तर, तर त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा की. मी केवळ तुंम्ही जे उल्लेख ज्या प्रकारे केले त्यावरून कोणता दृष्टिकोन समोर येतो, ते मांडले आहे. आणि केवळ तुमचाच नव्हे, तर या चर्चेत अनेकांचा तसा दृष्टिकोन समोर आला आहे. न पेक्षा होय, वरील गोष्टी अन्यायकारकच होत्या, पण त्यावेळच्या मूल्यव्यवस्थेनुसार तसे घडत गेले, ती मूल्ये व व्यवस्था (चातुर्वण्य) आज न्याय्य मानता येणार नाही, असे म्हणणेही शक्य आहे. प्रांजळपणे कबूल करायला कसली अडचण आहे? पण ते केवळ समदृष्टी असलेल्या ऑबजेक्टीव्ह माणसाला! कर्णाच्या बाबत तो शूद्र नसून क्षुद्र असेल तर, झाडून सगळ्यांनी त्याला द्रौपदी स्वयंवरातून ‘शुद्र’ असल्यामुळे बाहेर का काढले बरे? द्रौपदीनेही त्याच्या कथित वर्णामुळेच त्याचा सहभाग नाकारला होता ना? क्षुद्र असता तर तो हरला असताच की. तिथेच त्याला दुर्योधनाने राजा बनवले व त्यामुळे पुढे त्याचा पक्ष ठरून गेला. शिवाय युध्दाच्या आधल्या रात्री म्हणे कृष्ण त्याला भेटायला गेला होता व त्याने युध्द करू नये असा त्याचा प्रयत्न होता. जर तो पराक्रमाच्या बाबत क्षुद्र होता, तर हे कशासाठी?

In reply to by प्रसाद गोडबोले

(प्रतिसाद पूर्ण लिहायच्या आधीच प्रकाशित करा वर क्लिक केले गेले.) संपूर्ण प्रतिसाद पुढील प्रमाणे - समस्त महाभारत च काय तर यच्चयावत सनातन वैदिक हिंदु धर्म आणि त्यातील साहित्य हे बामणांचे कारस्थान, कसब आहे, असे महात्मा फुले ह्यांनी सांगून ठेवले आहे. त्यापेक्षा जास्त अजून काही स्पष्टीकरण देण्याची माझी बौद्धिक कुवत नाही. समस्त गट क्रमांक २ मधील जनांनी असा भेदभावाचा धिक्कार करत हिंदु धर्माचा त्याग करावा, बामणी मनुवादी साहित्य भटांच्या मनोरंजन करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौध्द धर्माचा अंगिकार करावा हेच उत्तम ! त्याच त्या गोष्टींवर वाढीव स्पष्टीकरण मागून आणि देऊन काय साध्य होणार ? नकोच ते. इत्यलम तळटीप : ह्या प्रतिसादाचा आणि त्यातील भावार्थाचा शॉर्टhand "२" असा नियोजित करण्यात आलेला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

दा कशाला १ १ प्रतीसाद देता , जरा बघत जावा

In reply to by प्रसाद गोडबोले

ऑरेलियस, मूळ नुद्दा सोडून महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्याबद्दलची मळमळ इथे काढण्याचे प्रयोजन कळले नाही. त्यांनी ग्रंथ वाचून स्वांतसुखाय विचारांचा कापूस पिंजण्यापेक्षा फार मोठी कामं केली आहेत. तुंम्हाला जे महान वाटते, त्यानुसार लोकांना दोन गटात विभाजित करणे आणि दुसर्यांना कोणत्यातरी गटात टाकणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण आहे. चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती हा साधा मुद्दा मान्य करण्याचे औदार्य असायला हरकात नसावी. आता जे तथाकथित उच्च समजल्या जाणार्या वर्णात जन्मले त्यांनी मुळीच अपराधी वाटून घ्यायची गरज नाही कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे.

In reply to by स्वधर्म

'चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. 'कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही' - कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते.

In reply to by अभिजीत

>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. - चातुर्वर्ण्य हीच मुळी समाजव्यवस्था होती. काही समाजगट कायम प्रस्थापित असतील अन काही शोषित असतील अशीच ती रचना होती. असे म्हणायला काय अडचण आहे? >> कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते. - फक्त आजवर ते कोणालाही पडताळता आलेले नाही, त्यामुळे यात सत्य किती ते सांगता येत नाही. या unverifiable समजुतीवरच सगळा वेदांताचा डोलारा उभा आहे. एकदा का आपल्या शोचनीय अवस्थेला पूर्वजन्माचे कर्म कारणीभूत आहे असे शोषिताला पटवता आले, की तो या जगात आत्ता जबाबदार असणार्या शोषणकर्त्यांना प्रश्न विचारायचे बंद करतो.

In reply to by स्वधर्म

बरं केला तुमचा मुद्दा मान्य. ओके ? झालं समाधान ? मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही. तरीही तुम्हाला validation होईल म्हणून फुले, आंबेडकर ह्यांची उदाहरणे दीले. बौध्द धर्मात धर्मांतर करणे हा अत्यंत सहज सोप्पा उपाय आहे ह्या चातुर्वर्ण्य संस्थेला झिडकरण्याचा. बाकी तुम्ही म्हणालात आवर्जून प्रतिसादाची वाट पाहत आहे म्हणून मी बोललो , नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. मला आता संवादी स्वर कोणते अन् विसंवादी कोणते हे कळते. कोणाशी सिरीयसली बोलयाचे अन् कोणाशी थट्टा मस्करी करायची ह्याचे व्यवस्थित १ आणि २ असे वर्गीकरण केलेलं आहे . स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू . मला आता कापूस पिंजन्यात च मजा येत असेल, तर त्याला तुम्ही तरी काय करणार ! इत्यलम २

In reply to by प्रसाद गोडबोले

मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही.
-- हे फक्त इथल्या लेखनाबद्दलच नव्हे, तर जीवतल्या बहुतांश बाबतीत खरे आहे. उदाहरणार्थ, फेसबुकावर काहीतरी फोटो वगैरे टाकायचे, मग त्याच्यावर किती लाईक्स आले ते तपासत बसायचे, कमेंट केलेल्यांना धन्यवाद द्यायचे, घेणं नस्ती देणं नस्ती अश्या कुठल्याकुठल्या तथाकथित फ्रेंडांना ह्याप्पी बड्डे द्यायचे, न दिल्यास त्यांची नाराजी, आपल्याला कोण कोण लाईक मारतो हे लक्षात ठेवत बसून त्यांच्या हागर्‍यापादल्याला 'अहो रूपम अहो ध्वनि' ची दाद द्यायची... हा सगळा फालतूपणा काही काळ केल्यावर वेळीच अक्कल येऊन ती वाटच मी बंद करून टाकली. आता मी जी नवीन चित्रं रंगवतो, त्यांचे फोटो फक्त बालपणीचे मोजके मित्र- ज्यांना खरोखरीच कौतुक आणि आनंद वाटतो - त्यांनाच कायप्पावर पाठवतो. गंमत म्हणजे ते मित्र फेसबुक इन्स्टा वगैरेंच्या वाटेवर मुळातच कधी गेलेले नाहीत.
स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू .
-- हे उत्तम. . .