Skip to main content

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 28/08/2023 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? ---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?

वाचने 51572
प्रतिक्रिया 195

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

>> नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. असं म्हणता? पण त्याआधी… >> बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही !  असे म्हणून तुंम्ही इतरांना विश्वास ठेवायला सांगितले. शिवाय त्याच प्रतिसादात एकलव्याला सनातन धर्माला विरोध करणारा म्हणून मारल्याचा उल्लेख होता. मी गीता वाचली आहे (महाभारत नाही) पण या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पहिला प्रतिसाद दिला. - सगळं केवळ बौध्दिक मनोरंजन असेल, आणि खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ नसेल, तर प्रश्न टाळून आपआपल्या समजूती कवटाळून आपण जगू शकतोच.

In reply to by स्वधर्म

तो भगवदगीता संदर्भातील प्रतिसाद १ समजून लिहिला होता , मला २ ला अजिबात तसे काही सांगायचे नाही... तुम्हाला तसे वाटल्यास दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो . अगदी स्पष्टपणे. ह्याबद्दल तुम्ही मला माफीविर म्हणालात तरी माझी हरकत नाही. आणि परत एकदा माझे २ स्पष्ट मत मांडतो की - गीताचं काय तर समस्त सनातन वैदिक हिंदु धर्म हा बामनांचे कसब आहे, बहुजनांना गुलामगिरी मध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे समस्त बहुजनांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समानतेची शिकवण देणाऱ्या बौध्द धर्माचा स्वीकार करावा हे उत्तम. हे सगळे बामणी साहित्य भटूर्ड्यांच्या मनोरंजन साठी सोडून द्यावे. येस, हे सारे भटूर्ड्यांचे बौध्दिक मनोरंजन च आहे. त्यात धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा आला, चलाख कावेबाज रामदास आला, ढेरपोट्या गणू आला, लंपट व्यभिचारी कृष्णाजी आला.... सगळेच आले. तुम्ही कशाला ह्यात वेळ वाया घालवता ! ज्याला खऱ्या सत्यधर्माचा शोध घ्यायचा आहे त्याने महात्मा फुलेंचे समग्र साहित्य वाचावे हे उत्तम. १ वाल्यांना १ मध्ये खेळू द्या . २ वाल्यांना २ मध्ये. हुश्श . आता बास . कंटाळा आला तेच ते लिहून. आता इथे प्रतिसाद बंद. ~

In reply to by प्रसाद गोडबोले

गु्रुदेव, आपण चातुर्वर्ण्याऐवजी आता द्विवर्ण पध्दती आणली आहे आणि मला माझ्या योग्यतेनुसाार गट क्र. २ मध्ये टाकले आहे. तसेच दुसर्या गटातील लोकांनी कोणाच्या शिकवणुकीचा अवलंब करावा, कोणी दाखवलेल्या मार्गावर चालावे, कोणाचे ग्रंथ वाचावेत, तसेच कोणत्या धर्माचा स्विकार करावा इ. बहुमूल्य उपदेश केला आहे. त्याचबरोबर दुसर्या वर्णातील लोकांनी कोणत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये याचेही मार्गदर्शन केले आहे. याबद्दल आपले मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. लोभ असावा.

In reply to by स्वधर्म

कर्ण (जन्माने नव्हे तर अधिरथाच्या घरात वाढला असल्याने) शूद्र नव्हता तर सूत होता. ब्राह्मण स्त्रीपासून क्षत्रियास झालेली संतती म्हणजे सूत. ह्यांचे काम राजांची स्तुती करणे, पुराण कथा सांगणे आणि सारथ्यकर्म करणे. महाभारताची कथा स्वतः लौमहर्षणि सूताने अर्थाने सौतीने सांगितली आहे. महाभारतात कर्णाच्या अवगुणांसोबत कर्णाच्या गुणांचेही वर्णन केले आहे. कर्ण पळपुटा होता हे खरेच. चित्ररथ गंधर्वाने घोषयात्रेच्या प्रसंगी कर्णाचा पराभव केला होता आणि नंतर त्याला पांडवांनी सोडवले, उत्तर गोग्रहण प्रसंगी एकट्या अर्जुनाने सर्व कौरवांना पराभूत करुन त्यांची वस्त्रे उत्तराला फेडण्यास सांगितले. खुद्द भीमाकडून कर्णाचा सलग चार वेळा पराभव झाला होता. कर्णवध करताना कृष्णाने कर्णाचे अपराध वर्णिले आहेत जे मूळातून वाचण्यासारखे आहेत. मात्र कर्ण उदार होता, ज्ञानी होता, वेदांचा घोष करणारा होता. मित्रासाठी जीवन देणारा होता, नव्हे त्याने ते दिलेही. त्या काळातल्या वर्णपद्धतीला तत्कालीन काळाच्या परिप्रे़क्ष्यातूनच पाहिले पाहिजे, आजच्या काळात हे संदर्भ जरी कालबाह्य झालेले असले तरी तेव्हा ते प्रचलित होतेच यात काहीच शंका नाही. तत्कालीन वर्णपद्धती आणि संकर जाती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी अनुशासनपर्वातील ४७ (रिक्थविभागः) आणि ४८ (वर्णसंकरः)हे अध्याय वाचून काढावेत. येथे उपलब्ध आहेत.

In reply to by स्वधर्म

ब्राह्मणांमधे ब्रह्मक्षत्रीय होते, क्षत्रीयांमधे सूत होते. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार चालत. प्रसंगी ते युद्धात देखील भाग घेत. शूद्रांमधे देखील categories होत्या. अगदी रावणापासुन उदाहरणं सापडतील. महाभारतात कीचक वगैरे मंडळी सूत होती. एकलव्याचे वडील सेनापती होते. दुर्योधनाकडुन लढणारा अलंबुष राक्षसराज होता. मद्रराजाला आपण एका सूताचे सारथी झाल्याचं शल्य, तर कर्णाला त्याच मद्रदेशातल्या कुळांवर हीन आक्षेप होते. यादवांना तर सगळेच हीन समजायचे, आणि त्यांच्याशीच सोयरीक पण करायचे वर्णपटावरच्या या मंडळींचे अधिकार, कर्तव्य, सामाजीक स्थान, ते govern करणार्‍या संहीता, त्यावर काळानुरुप घेण्यात येणारे आक्षेप आणि त्यांच्या तत्कालीन court cases.. हा फार complex मामला होता. त्यापैकी कोण कोणाला कुठल्या कारणाने हीन समजायचा, आणि ते किती न्याय्य होतं, हे आज कळणं कठीण आहे. यंत्रयुगापूर्वी हजारो वर्षे मनुष्य समाज श्रमाधारीत व्यवस्थेत जगत आला आहे. कुठल्या न कुठल्या प्रकारे division of labor ची एक व्यवस्था असायचीच. यंत्रशक्तीने तिला पर्याय निर्माण झाला आणि श्रमजीवीकांना मोकळा श्वास घेता आला. त्यांचं बुद्धीजीवी वर्गात transition शक्य झालं. पण तत्पूर्वी चातुर्वण्याप्रमाणे मानवी व्यवहारांना represent करणारे blocks असलेली व्यवस्था, किंवा मालक आणि गुलाम असे blocks असलेली व्यवस्था अशीच comparison होती. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. आज जसं आपण म्हणतो कि लोकशाही आदर्श व्यवस्था नाहि, पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे.. तसंच काहिसं...

In reply to by अर्धवटराव

श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद बर्‍यापैकी व्यवहाराला धरुन आहेत. कोठेही जन्माधारीत वर्णव्यवस्थेचा / जातीव्यवस्थेचे समर्थन नाही. ओव्याचा आणि श्लोकांचा आधार घेऊन, आपण कसे निरपराध असुन, त्यात कोणतेच कसब नाही असे रडगाणे गाणार्‍या लोकांबद्दल काय बोलायचे!!!

In reply to by अर्धवटराव

अरा छान प्रतिसाद. लकी इट इज कलियुग. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. हे जरा विस्ताराने सांगाल काय?

In reply to by Bhakti

गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींच्या मनाला अध्यात्माची बैठक होती, भगवद्गीतेचा अभ्यास होता. प्राप्त कर्तव्य निष्काम वृत्तीने करुन आत्मोन्नती साधावी हि तर गीतेची एक प्रमुख शिकवण. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गुण-कर्माधारीत चार वर्णांचे विभाग रचले, तर त्यावर आधारीत system समाजाच्या कल्याणाची आहे, असा विचार त्यांनी केला असल्यास ते स्वाभावीक आहे. आता या system मध्ये जे loop holes निर्माण झाले, व त्यातुन जी बजबजपूरी माजली, त्याकडे या मंडळींनी डोळेझाक मात्र केली नाहि. आपापल्या परिने त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न केला. पण तत्वतः त्यांना हि system पटत असेल तर त्यात नवल नाहि.

In reply to by अर्धवटराव

नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही कोणत्याही काळात समाज विभागण्याची बेस्ट अवेलेबल पद्धत होती हे बिलकुल नाही पटलं.

In reply to by कॉमी

श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद समजुन घेण्याची इच्छा आहे. -- समाजाचे विभागीकरण जरी अपेक्षित नसले तरी होतेच. त्यामुळे कर्माधारीत, जेथे रोटी-बेटी व्यवहार चालतो अशी वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था एक निरुपद्रवी अंग म्हणुन स्वीकारायला काय हरकत आहे???

In reply to by Trump

व्यवसाय बदलणे अवघड होते. का करावे ? केंद्रीकरण - ज्ञानाचे केंद्रीकरण अमुक लोकांकडे, व्यवसायाचे तमुक लोकांकडे, शक्तीचे ढमुक लोकांकडे. असे का ? मुक्त का ठेऊ नये ? तुम्ही ज्याला निरुपद्रवी म्हणता ते वर दिल्या प्रमाणे अत्यंत उपद्रवी आहे.

In reply to by कॉमी

आधुनिक जगात व्यवसाय मुक्त झालेत पण बर्याचदा कल चाचणी घेतली जाते आणि त्यावरुन जसा कल असेल त्यानुसार शिक्षण-व्यवसाय करावा असेही आहेच.

In reply to by कॉमी

काळ कुठलाही असो, समाजात उतरंड हि राहाणारच. त्यातल्या प्रत्येक पायरीला खालच्या पायर्‍यांबाबत आपल्या कर्तव्याची जाणीव आहे का, त्यांच्या कल्याणाची तत्परता आहे का, उतरंडीमधे चढ-उतार न्याय्य पद्धतीने होतात का, हे सर्व नियमन करणारी एखादी नि:पक्ष यंत्रणा आहे का, या सर्व बाबींवर त्या व्यवस्थेचं स्वाथ्य अवलंबुन असतं. चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब व्यवहारात मात्र जन्माच्या आधारावर घसरली. आणि ति बंदीस्त झाली. त्याची सुरुवात कधी झाली असेल कल्पना नाहि. पण डोळसपणे त्यात सुधारणा झाली नाहि हे खरं. त्या व्यवस्थेची शुद्धी करण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. या सगळ्या गुणावगुणांना सांभाळत हि व्यवस्था राबत आलि. वैदिकेतर जीवन पद्धतीत हे सगळे गुणावगुण कसे सांभाळले गेले याचा तौलनीक अभ्यास असेल तर हि पद्धत बेस्ट अवेलेबल होती किंवा कसे हे बघता येईल. जैन, बुद्ध, चार्वाक दर्शन वगैरे जीवन पद्धतीतले गुणविषेश हजाराने दाखवता येईल. पण व्यवहारात त्यात देखील चातुर्वण्य व्यवस्थेप्रमाणे दोष निर्माण झालेच नाहित, किंवा त्यांचं नियमन खरच नि:पक्ष होतं याला काय आधार? आज जसं चीन मधला साम्यवाद, दुबई मधली राजेशाही हि फार सुखकारक वगैरे वाटते. लोकशाही त्यांच्यापेक्षा दुय्यम आहे असंही दावा करतात काहि जण. पण त्या व्यवस्थांमधे दोष निर्माण व्हायचा scope नाहि, किंवा झाले तरी त्यावर नि:पक्ष उतारा त्या व्यवस्थांगर्तच आहे याची हमी काय? इथे लोकशाहीला चतुर्वण व्यवस्थेशी तुलना करण्याचा हेतु नाहि. आपण व्यवस्था compare करायला काय criteria वापरतो हाच प्रश्न आहे.

In reply to by अर्धवटराव

पूर्णतः कर्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था सुद्धा मला मूल्यवर्धल वाटत नाही. इतके रिजिड वर्गीकरण करून वेगवेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे ठेवण्याचे काय प्रयोजन आहे, किंवा कोणत्याही काळी काय प्रयोजन होते ? एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची मोबिलीटी नाकारण्याचे काय प्रयोजन आहे किंवा कोणत्याही काळात काय प्रयोजन होते ? कोणत्याही काळी उतरंड होती आणि असते हे ठीकच. पण ती उतरंड काही सर्व समाज कल्याणासाठी बसवलेली असे नव्हे आणि त्या उतरंडीला धर्माने अधिष्ठान द्यावे हे ही ठीक नव्हे. युरोपात सामंतशाही होती ती त्या काळाची बेस्ट अवेलेबल पद्धत होती असे कोणीही म्हणणार नाही. कारण सामंतशाही पूर्णतः बळी तो कान पिळी ह्या तत्वाने अस्तित्वात आली होती. त्यात समग्र समाजाच्या भल्याचा कोणताही विषय नव्हता.

In reply to by कॉमी

धर्माने मनुष्य स्वभावाचं वर्गीकरण सांगीतलं. व्यवसायांचं वर्गीकरण इव्हॉल्व्ह झालं. एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे स्कील सेट शिकवणं सोपं असल्यामुळे असेल, किंवा एकदा गावगाडा वसला कि तिथेच पिढ्यानपिढ्या रहायची मानसीकता असेल... कारणं अनेक असतील, पण स्नो बॉल इफेक्ट प्रमाणे हे वर्गीकरण रिजीड होत गेलं असावं. एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस. समजा महाभारत युद्धात बाकी सर्व राजपरिवार नष्ट झाले असते आणि एक कर्णाचंच कुटुंब उरलं असतं तर पुढे मागे ते फॉर्मल क्षत्रीय झाले असते... कर्णाचं कुंतीपूत्र असणं लपवुन सुद्धा. व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.

In reply to by अर्धवटराव

धर्माने केवळ वर्गीकरण सांगितले हे कितपत खरे आहे ? जग कसे आहे हे सांगणे वेगळे, आणि जग कसे असावे हे सांगणे वेगळे. (Objective आणि normative) धर्माने वर्णव्यवस्था हा नॉर्म म्हणून सांगितला आहे असे माझे अत्यल्पवाचनातून बनलेले मत आहे. (महाभारतात, उदा, चांगले राज्य म्हणजे सगळे लोक आपापल्या वर्णाचे काम करत आहेत असे वर्णन असते. म्हणजे, हे केवळ सामाजिक उतरंडी चे तटस्थ निरीक्षण वाटत नाही. तर ही उतरंड असावी ती तशीच ठेवावी असे प्रयत्न दिसतात.)
एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस.
पण इथे तर ही जन्माधारित वर्णव्यवस्था झाली. हे माणसाला पूर्णपणे त्याच्या वंशाचा वाहक म्हणून बघणे नाही का ? त्याच्या पुढच्या पिढ्या एका वर्णातून दुसऱ्या वर्णात काही टेक्निकल मुद्दा काढून जातील, पण खुद्द त्या माणसाचे काय ?
व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.
हितसंबंधांची जपणूक नक्कीच. म्हणूनच, मला वर्णव्यवस्था जनरल समाजाच्या हितासाठी बेस्ट उपलब्ध पर्याय होता हे मान्य नाही. पुढे, तुम्ही म्हणता की आजही ही हितसंबंधांची साखळी मोडणे कठीण आहे - शंभर टक्के खरे आहे. तुम्ही नोंदवले आहे ते तुम्ही निरीक्षण म्हणून मांडले आहे. वर्णव्यवस्था ही हितसंबंधांची साखळी एक नॉर्म म्हणून, एक जपण्याचे सामाजिक अंग म्हणून देते. इथे प्रॉब्लेम आहे.

In reply to by कॉमी

धर्माची तत्व आणि तत्वानुसार राबवलेली व्यवस्था म्हटलं तर वेगवेगळ्या म्हटलं तर एकच. धर्माने वर्ण वर्गवारी एक नॉर्म म्हणून सांगितली. त्याला गुण-कर्माचा आधार सांगितला. पण हे गुण कर्म जोखणारी एक नि:पक्स फॉर्मल व्यवस्था का घडली नाही याचं उत्तर नाही. कदाचित त्याकाळी जीवन फारच डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम ने ऑपरेट होत असावे म्हणून असेल. जसं, आज सर्टिफिकेत देणारी विद्यापीठं आहेत. ते जन्माचा आधार मानत नाहीत. परीक्षा पास, तर सर्टिफिकेट हातात. वर्ण ठरवायला अशी व्यवस्था का निर्माण झाली नसेल ? कल्पना नाही. गुण ठरवायला 'कोणाचं रक्त' हा एक आधार होता. कर्म ठरवायला पण मायबापाकडून कुठली विद्या शिकली याचा आधार होता. वरचे तीन वर्ण जास्त अधिकार बाळगून होते पण ते संख्येने कमी असणार. ते तर आपले अधिकार परत परत सिद्ध करायला प्रत्येक पिढीला परीक्षा द्यायला लावणार नाही. चौथ्या वर्णाने तशी डिमांड केली तर त्याला वरच्या तिघांशी एकत्रित लढा द्यावा लागेल. शिवाय त्याची गरज वाटायला हवी. जन्माधारित व्यवस्था का स्थिरावली याची अनेक मार्गाने उपपत्ती देता येईल. शिवाय मुख्य मुद्दा असा की या व्यवस्थेला कुठला पर्याय निर्माण झाला होता, जेणेकरून ती दुसरी व्यवस्था वर्ण व्यवस्थेपेक्षा उजवी होती ?

In reply to by अर्धवटराव

धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात असलेल्या समाजरचनेतून वगळले तरी त्यापेक्षा चांगली सिस्टीम बनवू आपण. वरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी बनवलेली ही पद्धत आहे. तीस सामंतशाही सारखे बळी तो कान पिळी ह्याच नजरेने बघितले पाहिजे, ज्यास बहुदा आपण सहमत आहोतच.

In reply to by कॉमी

आजघडीला माणसाचे स्वतःची उन्नती करण्याचे स्वातंत्र्य त्याच्या वर्णावर अवलंबुन नाहिच. त्यादृष्टीने धर्माधिष्टीत वर्ण at least आर्थीक प्रगतीच्या रचनेतुन वगळले गेले आहेत, निदान technically. राहिला मुद्दा हितसंबंधांचा.. व्यवस्थाच मुळी हितसंबंध जपायला उभारली गेली, कि व्यवस्थेचा उपयोग हितसंबंध जोपासायला केला गेला, हा सनातन प्रश्न आहे. मला तरी हि एक सरमिसळ वाटते. आणि कुठल्याही व्यवस्थेत हि सरमिसळ असतेच. ५०० वर्षाने माणसाने अगदी मंगळावर जरी वसाहत केली तरी तिथेही हि सरमिसळ राहिलच. कुठल्याही व्यवस्थेत समष्टीचं कल्याण साधणं हे तत्व म्हणुनच बघितल्या जातं. व्यवहारात ते किती practice केल्या जातं हा फार subjective विषय आहे.

In reply to by अर्धवटराव

चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब...
होय, हे बरोबर आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। मूळ श्लोक कोणत्या आधारावर चातुर्वर्ण्य समाज निर्मिलेला आहे ते सांगतो. "गुण आणि कर्म यावर आधारित सर्व चातुर्वर्ण्य व्यवस्था ही माझीच निर्मिती आहे". सोबत पुढची ओळ खूप विचार करण्याजोगी आहे! "पण हे सर्व निर्माण करणारा कर्ता जरी मी असलो तरीही कर्मफलात न बांधल्यामुळे मी अकर्ता राहतो. त्याप्रमाणेच जो मला जाणतो तोही कर्मफलाच्या बंधनात अडकत नाही."

In reply to by राघव

चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित होता हे दाखवणारी सुद्धा अनेक वचनं उद्धृत करता येतील, अनेक रामायण महाभारतातल्या पात्रांच्या कृती उद्धृत करता येतील. पण सध्या गीतेकडे बघू. १. वर्ण संकर ही अर्जुनाची प्रमुख चिंता होती. जर कोणत्याही वंशातून कोणताही वर्ण असलेला माणूस निपजू शकतो तर वर्ण संकर इतका भीतीदायक विषय ठरला नसता. ही भीती जन्मानुसार लोकांचे गट पडलेल्या समाजातच येऊ शकते. आज शेतकऱ्याने शिक्षकाशी विवाह केला, तर कोणालाही वर्ण संकर म्हणून भीती वाटणार नाही, कारण आजचा समाज जन्मानुसार लोकांना विशिष्ठ काम करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे वर्ण संकर इत्यादी भीती आजच्या समाजात अस्तित्वात (फारशा) नाहीत. पण, रेशियल लाईन वर विभागलेल्या समाजात बघा, अजूनही रेस संकर हा बागुलबोवा दाखवणारे रेसिस्ट लोक अस्तित्वात आहेत. अर्जुन त्याच प्रकारातला म्हणावा. २. गुण कर्मावरून ठरणारा वर्ण - ह्यातले गुण म्हणजे काय माहीत नाही. पण कर्म - हा कर्म मागील जन्माचा आहे. मागील जन्माचा कर्म ह्या जन्मीचा वर्ण ठरवतो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: | स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् || ह्यावर आदी शंकर काय भाष्य करतात ?
मां हि यस्मात् व्यपाश्रित्य माम् आश्रयत्वेन गृहित्वा ये अपि स्यु: भवेयु: पापयोनय: पापा योनि: येषां ते पापयोन: पापजन्मान: । के ते इति आह स्त्रियो वैश्या: तथा शूद्रा: ते अपि यान्ति गच्छन्ति परां गतिं प्रकृष्टां गतिम् ।
अर्थ - कारण, हे पार्था, जे पापयोनीचे आहेत, अर्थात ज्यांचा जन्म पापामुळे होतो - हे असे कोण आहेत ? ते आहेत - स्त्री, वैश्य आणि शूद्र. ते सुध्दा माझ्याकडे शरण येऊन, माझ्यावर अवलंबून परम गति - उत्कृष्ट गति प्राप्त करू शकतात. त्याच्याच पुढील श्लोकात ब्राम्हणांना पुण्ययोनी म्हणले आहे. आदी शंकराचार्यांचे भाष्य आज उपलब्ध असलेल्या भाष्यांपैकी गीतेवरील सर्वात जुने भाष्य आहे असा माझा समज आहे. त्यामुळे इथे मागील जन्माचे कर्म - या जनमीचा वर्ण हे गीतेत पुरेसे स्पष्ट आहे. तरीही गुण - ह्या जन्मीचे कर्म हेच वर्णाचे कारण असे कसे म्हणले जाते ?

In reply to by कॉमी

इथे दोन गोष्टी एकत्र होऊन उपयोगाचे नाही. हेतू बघीतला पाहिजे. कोणतीही चिंता भगवंत कशाला करेल? जीवाच्या समूळ उत्थानाची इच्छा भगवंताची. त्यासाठी काय करायला हवं या दृष्टीकोनातून या भाष्यांकडे बघायला हवे. आपण सृष्टीला कसं बघू हा आपला दृष्टीकोन झाला. वर्णसंकराची चिंता आपण करतो, भगवंत नाही. त्यातून पुढचे भेद तयार होतात. ते किती चूक/बरोबर हा वेगळा विषय झाला. अगदी दुष्टांचं निर्दालन हे सुद्धा सुष्टांना जीवन नीट जगता यावं यासाठी आहे. दुष्टांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा देणे हा बायप्रॉडक्ट आहे.

In reply to by कॉमी

नाही. गोरक्ष्य अर्थात गुर पाळणे हा नंदराजाचा व्यवसाय होता, यादवांचा नव्हे , कृष्ण योगायोगाने त्यांचा घरी पोहचला म्हणुन गुरे राखत होता. शिशुपालाने कृष्णाचे जे अपमान केले आहेत त्यातील हाही एक होता - तो कृष्णाला हेच म्हणाला होता की हां तर गवळी , गायींचे शेण गोमुत्र वगैरे साफ करणे ह्याचे काम ह्याला कसले प्रथम पुजेचा मान देताय ? तेव्हां कृष्णाने दाखवुन दिले होते की तो किती क्षत्रिय आहे ते.

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। >> आणखी एक पोपटपंची आली ज्याचा दुसर्याला घंटा उपयोग नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षी! तुम्ही म्हणता की तुम्ही संक्षी नाही पण तुमची वृत्ती तर एक्झॅक्टली सेम आहे =)))) त्यामुळे आम्ही तुम्हाला संक्षी म्हणुनच संबोधु. त्याने तुम्हाला फार कौतुक केल्यासारखे वाटते असे तुम्ही म्हणता , चला काहीतरी उपयोग आहे . शिवाय मिपाकरांनाही तुम्ही काय आहात हे कळते , हाही उपयोग काही कमी नाही =)))) आताअजुन जास्त काही लिहित नाही , आमच्याच एका जुन्या लेखनाची लिन्क देतो , आणि हीं , उगाच हे तुमच्या उपयोगासाठी वगैरे लिहिलेल आहे असला गैरसमज करुन घेऊ नका. =))))
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? http://www.misalpav.com/node/47033

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? एक हिंट देतो, पोपटपंची नव्हे.

In reply to by उन्मेष दिक्षीत

तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? >> हे काय विचारणं झालं का ? अख्ख्या तमाम दुनियेला ठाऊक आहे : मिसळपाव वर एकमेव अद्वितीय सर्वज्ञ म्हणजे साक्षात गुर्देव निराकार गाढव UD बाकी तुमच्या पुनरागमनाने मजा आली राव =))))

In reply to by अर्धवटराव

तेच तर ! अख्ख्या मिपाला माहीत आहे कि निराकार गाढव म्हणजे कोण ते! ते वर प्रतिसादात , मी उल्लेख केलेले नाव , तो टिपिकल गाढ्वाचा फोटो कोणालाही उद्देशुन बोलले तर सदर व्यक्ती कन्फ्युज झाली असती की हे काय आहे , पण त्यांन्नी लगेच प्रत्युत्तर दिले ह्यावर सिध्दच झाले की सदर आय डी दुसरे तिसरे कोणी नसुन साक्षात गुर्देव निराकार गाढव च आहेत =)))) पण असुदे , आलेच आहेत तर चार दिवस बागडतील इथे परत, प्रत्येक धाग्यावर जाऊन ढाँन्चु ढाँन्चु करत लाथाडतील इतर मिपाकरांना. मग लोकांन्ना वात आणातील सर्वत्र प्रतिसादात घाण करुन अन फायनली संपादक त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणुन त्यांचे विसर्जन करतील .... फक्त मोजकेच काही दिवस ! शेवटी कसे आहे की काळ हा एक भास आहे #बेशर्त_स्वीकृती =))))

In reply to by उन्मेष दिक्षीत

सदर ३ ही आय डी
तुम्हाला अत्ता कळालं होय =)))) मी तर हे कधी पासुन सांगतोय पण तुम्ही तर तार स्वरात ढॉंन्चु ढाँन्चु करत सर्वत्र लाथा झाडत फिरत असता , तुम्हाला कसे ऐकु येईल ! अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नतमेकांशेन स्थितो जगत् ॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ह्या चराचरातील प्रत्येक गोष्ट मीच एकांशाने व्यापुन राहिलो आहे. ह्या मिसळपाव वरील सर्व आयडी माझेच आहेत. जोवर "मीच काय तो एक सर्वज्ञ" हा अहंकार झटकुन , ही सर्व अहमंन्यता बाजुला सारुन विचार करता येत नाही तोवर तुला ह्या सत्याचे आकलन होणार नाही. शांत चित्ताने विचार कर, लगेच ढॉंन्चु ढाँन्चु करत प्रतिसाद टाईपू नकोस. तुझ्या पोकळ प्रतिसादांनी फक्त मिपाकरांचे (म्हणजे माझेच) मनोरंजन होणार आहे दुसरे काही नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

छान व्यक्तिगत मारामार्‍या चालु आहे. कृपया ह्या मारामारीत गाढवाला घेउन गाढवाचा अपमान करु नये. उपलब्ध माहितीनुसार गाढव हुशार, कष्टाळु आणि प्रामाणिक प्राणी आहे. https://www.thedonkeysanctuary.org.uk/all-about-donkeys/behaviour/chara… https://www.thehindu.com/opinion/open-page/the-intelligent-donkey/artic… https://today.tamu.edu/2008/01/14/donkeys-are-the-ones-with-real-horse-… बाकी चालु द्या. मस्त करमणुक होते आहे.

In reply to by Trump

सदर ओवीतज्ञांनी गाढव हे निराकार असते असा शोध लावला आहे, काय टॅलेंट आहे बघा ! गांजा मारला की काहीही दिसू शकते.

In reply to by उन्मेष दिक्षीत

निराकार गाढव
तुम्हाला आजही निराकार गाढव ह्या शब्दाची व्युतपत्ती माहीत नाही म्हणजे आश्चर्यच आहे ! पहिल्यांदा तुम्ही चांगले लेखन करायचा म्हणुन मिपाच्या नेहमीच्याच हसत्या खेळत्या वातावरणात तुम्हाला लोकं "निराकार गुर्देव" असं संबोधायचे. पण ननंतर तुम्ही सर्वत्रच , सर्वच लेखनांवर जाऊन मीच एकटा सर्वज्ञ कसा , बाकी सगळेच निर्बुध्द कसे ह्याचे प्रदर्शन केले , तेही अतिषय कॉन्डिसेंडिंग भाषेत. सर्वत्र लाथाडी करायला लागलात गाढवासारखी . ढाँन्चु ढाँन्चु तर चालुच होते आधी पासुन . त्यामुळे तुम्हाला गाढव हे नामाभिधान प्राप्त झाले. आणि मग मिपास्टाईल मजेशीर काँबिनेशन म्हणुन लोकं तुम्हाला निराकार गाढव असे संबोधु लागली. गाढव निराकार असतं असं कोणी कुठेही म्हणलेलें नाहीये की लिहिलेलं ही नाहीये =)))) आता नवीन आयडी काढुन आल्यावर तुम्ही वेगळ्या पध्दतीने वागु शकला असतात, पण तुम्ही परत तेच केलेत , चित्रगुप्त ह्यांच्या धाग्यावर अहंमन्यतेचे प्रदर्शन , अर्धवटरावांशी जाणुन बुजुन भांडण काढणे , मी कोठेही तुमचा उल्लेखही केलेला नसताना माझ्या प्रतिसदांवर सर्वज्ञतेची गरळ ओकणे वगैरे. आधी तुम्ही साधुसंतांचा अवमान करायचात , ह्या वेळेला फ्रेडरिक नीचा ला देखील सोडले नाहीत. तुम्हाला कोणीही सांगितले अथवा विचारले नसताना भगवद्गीतेचा पोपटपंची , ज्ञानेश्वरीचा उल्लेख ओवी तज्ञ वगैरे करायला सुरुवात केलीत. कोणी तुम्हाला सांगायला आले होते का ? पण तुम्ही डूख धरलाय , स्कोअर सेटलिंग करताय हे कळतंय सर्व्वांन्नच ! आणि ह्यावेळेस तर पुढे जाऊन कहर केलात ते म्हणजे नावाचे विद्र्पीकरण - मार कश काय , मार्कस वॉटेवर काय =)))) अरे काय बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी , काय ए हे =)))) # जिनके घर शीशे के होते है वो दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते, उनम्त्त मेष डीपशीट =)))) तुम्हाला कितीही समजाऊन सांगितले तरी - "हां , बरोबर आहे तुमचं , माझं थोडसं चुकलेच ." हे शब्द काही तुमच्या तोंडी येत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. त्या मुळे ह्या प्रतिसादवर तुमचा काय रीप्लाय येणार आहे हे देखील आम्ही जाणतो, सर्व मिपाकर जाणतात =)))) पण तुम्ही असलात की मजा येते मिपावर !!! लिहित रहा . ... आयडी उडे पर्यंत =))))) इत्यलम __________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

हे तुमचे खरे नाव आहे ? नाही ना ? मग त्याचे काहीही वर्जन केले तरी तुम्ही का चिडता ? माझे खरे नाव हाच माझा आयडी आहे ! तुम्हाला कितीही काहीही सांगा तुमच्या बुद्धीला पटणारच नाही मी संक्षी नाही ! त्यासाठी कमाल ऑब्सर्वेशन आणि किमान बुद्धीमता लागते, जी पोपटपंची करून येत नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

मी काही तुम्हाला कोणतीही ओवी ऐका , श्लोक ऐका असे सांगायला आलो नव्हतो पहिल्यांदा. बाकी हे असं नावाचे मार कश वॉटेवर वगैरे विद्रुपीकरण करणे , किंवा ओवीतज्ञ वगैरे नावे ठेवणे फारच बालीश आहे असं नाही का वाटत तुम्हाला ? तुम्ही स्पष्टपणे एकदा मान्यच करा ना की - होय , मार्कस , मी केवळ तुमच्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिंग करायला आलोय =))))

नंबर ६ बद्द्ल जे मी लिहिले काय मत आहे ? नसेल तर एक रिप्लाय देत नाही परत या धाग्यावर. तुम्हाला उत्तरे नको आहेत ! फक्त प्रश्न हवेत.

@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे. माझ्या काही मर्यादांमुळे असे आहे. मला सर्वच मिपाकर आदरणीय आणि प्रिय आहेत. क्वचित प्रसंगी एकमेकांची मते पटत नसली, तरी हल्ली प्रत्यक्ष ओळखीची, नात्यातली माणसे दुरावलेली वाटू लागलेली असण्याच्या काळात मिपाकरांशी चर्चा हा केवढा मोठा मानसिक आधार आहे. -- खरेतर मला हा लेख प्रत्यक्ष लिहीण्यापूर्वी फक्त हा एकच प्रश्न (क्र. ६) विचारायचा होता. हा प्रश्न मला शाळकरी वयापासून पडलेला होता आणि मला स्पष्टपणे वाटत होते की कृष्णाने सुदर्शानचक्राने त्यांचा वध आधीच करून टाकायला हवा होता. तसे न करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते. इथे विविध विषयांचे उत्तम जाणकार, विचारी मिपाकर अनेक असल्याने मला ठाऊक नसलेले किंवा माझ्या कल्पनेपलिकडले जे काही उत्तर वा उत्तरे असतील, ती मिळावीत आणि फार वर्षापासून कुतूहल असलेल्या कोड्याचे उत्तर मिळावे म्हणून हा लेख लिहायला घेतल्यावर आणखीही प्रश्न सुचत गेले, आणि तेही लिहीले. -- इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार. आता तुमच्या प्रतिसादाकडे वळतो:
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.
यापैकी "महादेव की सौगंध" म्हणजे काय हे मला समजले नाही (कृपया खुलासा करावा) तसेच "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असावे, हेही मला सांगता येत नसले, तरी तुम्ही तसे लिहीले असल्याने कृपया त्याचाही खुलासा करावा. ('विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ?)
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता
-- हे पटण्यासारखे असले, तरी इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात. गीता, महाभारत, गीताई वगैरेत 'विश्वरूप दर्शन' बद्दल काय सांगितले आहे ते बघून नंतर लिहीन. (आज इतनाही.)

पाहीले नाही का तुम्ही ? "महादेव की सौगंध" हे गमतीने लिहीले होते कारण जर तुम्ही महाभारत पाहीले तर प्रत्येक जण प्रतिज्ञा घेताना अशीच घ्यायचा ! द्युतावेळी भीम आणि अर्जुनाने प्रतिज्ञा घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला आधीच तसे करता येत नव्हते. शिवाय श्रीकृष्णाला युद्धात भाग घ्यायचाच नव्हता , त्याला शस्त्र उचलायचे नव्हते. >> "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असा ... जेव्हा दुर्योधन त्याला पकडायला गेला, तेव्हा त्याने विराटरुप दाखवले. श्रीकृष्णाला कळले की आता युद्ध अटळ आहे, आणि पुढे काय होणार आहे ते, त्याला काही करायची गरजच नव्हती. याच्यासाठी हा एपिसोड बघावा - https://www.youtube.com/watch?v=YJGT_tyE5ZQ&t=178s >> श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? >> 'विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ? मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ? धन्यवाद !

महाभारत पाहीले नाही का तुम्ही ?
नाही. रामायण (१९८७-८८) आणि महाभारत (१९८८-९०) या काळात बहुतेक घरात टीव्ही नसावा. किंवा असला तरी त्यात स्वारस्थ्य नव्हते. त्याकाळी दिल्लीतल्या दाट वस्तीत रहायचो, आणि या धारावाहिकांचे वेळी सगळ्या सडका अगदी निर्मनुष्य होत असल्याने आम्ही मुलांना घेऊन मस्त फिरायला निघायचो. या सिरीयली अजूनही बघितलेल्या नाहीत, मात्र महाभारतावरील जेवढी मिळाली तेवढी सगळी पुस्तके वाचलेली आहेत. मिपावर काही वर्षांपूर्वी महाभारतासंबंधी काही लिखाणही केलेले आहे, त्यापैकी सगळ्यात आधी (माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात) 'चित्रगुप्त' या भूमिकेतून केलेले एक विनोदी लेखन : थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा नंतरच्या काळात लिहीलेल्या आठ लेखांचे दुवे खालील लेखात दिलेले आहेतः अजब महाभारत श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते.... कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? -- असा निष्कर्श मी काढलेला नसून फक्त "इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात." असे लिहीलेले आहे. (अगदी पहिला, सौंदाळा यांचा प्रतिसाद बघावा)
मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ?
याचे उत्तर माझ्या खालील विधानात आहे: ----"इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार." --- थोडक्यात म्हणजे अनेकांप्रमाणे मलाही द्रौपदीस वस्त्रपुरवठा, विश्वरूपदर्शन वगैरे महाभारतातले अनेक चमत्कार कपोलकल्पित वाटतात. याच विषयावर पूर्वी एक पुस्तकही वाचलेले आहे त्याचा मतितार्थ असा होता की माहाभारतात जे जे 'चमत्कार' म्हणून प्रसंग वर्णित केलेले आहेत, ते सगळे काही ना काही (अप्रिय, लज्जास्पद, थोरांच्या कीर्तीला काळिमा लावणारे वगैरे..) सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत. मलाही असेच वाटते.

In reply to by चित्रगुप्त

महाभारताला केवळ एक महाकाव्य म्हणून जरी धरलं तरी, त्याकाळचे संदर्भ, त्यावेळच्या मान्यता आणि समाजमत हे लक्षात घेऊन मग या महाकाव्याकडे बघीतलं पाहिजे. आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल.. त्यामुळे आज एखादी गोष्ट चूक धरली तरी तेव्हा ती बरोबर असू शकते. बाकी वाचतोय.

आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल
-- अगदी खरे . आणि हे सर्वच काळांविषयी लागू होते. आज अगदी लक्तरे लोंबणारे कपडे फॅशन म्हणून घालून स्त्रिया खुशाल हिंडतात, तशी पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसती (असे कपडे मी तरी स्त्रियांनीच घातलेले बघितेले आहे, म्हणून तसे लिहीले आहे पुरुषही घालत असल्यास 'लोक' असे वाचावे)

महाभारत किंवा रामायण मालिका पाहून मत बनवणे चुकीचे आहे. महाभारताच्या शेकडो( अक्षरशः) प्रती आज मितीस उपलब्ध आहेत आणि अनेक जण आपल्या आपल्या परीने त्यात भर टाकत आहे. त्यात बौध्द, जैन रामायण महाभारत असे सुद्धा विविध प्रकार आहे. (मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात. ) भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाने खुप मेहनत घेऊन, विविध स्रोतांचा आढावा घेऊन, प्रक्षिप्त श्लोक आणि संदर्भ यांचे ससंदर्भ विलगीकरण करुन चिकित्स्क आवृत्ती तयार केली आहे. ती बरीचशी मुळ महाभारताच्या आसपास आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण ते मान्य करतात. (अर्थात अनेक ते अमान्य सुद्धा करतात) अधिक माहिती : https://bori.ac.in/department/mahabharata/ बाकी, मुळातून वाचलेले आणि आजच्या काळातले विचार, संदर्भ बाजुला ठेवून केलेले तटस्थ वाचन वेगळा आनंद देते. आणि काही जणांना आपल्या पुर्वजांबद्द्ल आदर वाढल्याचा आनंद सुद्धा देते. (काहींना हे लाभत नाही, त्यांचे नशीव) बाकी चर्चा उत्तम चालू आहे.

तुमचा प्रतिसाद, विशेषतः. -- "मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात."-- हे भारीच रोचक आहे. सदर पुस्तक जालावर वाचता येईल का? -- सध्या आपण ज्याला 'भारत'देश म्हणतो, त्यापलीकडील दूरदूरच्या प्रदेशांमधेही महाभारतविषयक/हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती, भित्तिचित्रे, मंदिरे आणि अन्य पुरावशेष सापडतात त्यावरून कधिकाळी भारतीय संस्कृती केवढ्या विराट भूभागावर नांदत होती, हे समजते. तुम्ही दिलेला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा दुवा उघडून बघता सगळे इंग्रजीत लिहीलेले आहे. मराठीतही आहे का ? आणि त्यांची 'महाभारताची संशोधित आवृत्ती' (मराठी) कुठे उपलब्ध आहे ? (जालावर किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी)

In reply to by चित्रगुप्त

जालावर उपलब्ध असलेले जैन महाभारत (लेखक प्रकाशचंद्र जैन ) https://www.jainfoundation.in/JAINLIBRARY/books/sankshipta_jain_mahabha… इथे उपलब्ध आहे. या नुसार युद्ध झाल्यानंतर पांडव नेमिनाथाला शरण गेले व त्यानंतर वैराग्य वगैरे. मी वर उल्लेखलेले युद्धाच्या आधीच वैराग्य असे महाभारत मी तीस एक वर्षांपूर्वी एका जैन स्थानकातील मुनीशी चर्चा करतांना त्याने त्याच्याकडील प्रत मला दाखवली होती. तिचा संदर्भ (लेखक. प्रकाशक इत्यादी) मला आता गवसत नाहीत. पण कुठल्यातरी डायरीत मी नोंद केलेले आहे. शोधून कळवतो. भांडारकरांची मराठी आवृत्ती बहुधा नसावी. खुप थोर काम आहे ते आणि ते मराठीत आणण्याइतके संयमी आणि परखड व्यक्तिमत्व हल्ली निपजत नाहीत.

In reply to by अहिरावण

@ अहिरावणः तुम्ही दिलेला दुवा उघडून जैन महाभारत थोडेसे वाचले. ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. (देवकीला अनेक पुत्र झाले होते, त्यांचा सांभाळही यशोदेने केला होता वगैरे बरीच वेगळी माहिती दिसते आहे) सावकाशीने वाचून त्याबद्दल लिहीन. किंबहुना तुम्हाला शक्य झाल्यास जैन महाभारतावर एक स्वतंत्र लेख लिहून त्यातील वेगळेपण वगैरे स्पष्ट केल्यास अतिउत्तम होईल. नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. युद्धाच्या आधीच वैराग्यवाल्या पुस्तकाविषयीपण उत्सुकता आहे. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

>>>ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. अहो जैन महाभारतच काय, हिंदूंचे मानलेल्या महाभारतातील विविध प्रांतांमधील विविध प्रतींमधे विविध विचारधारा मिळतात. त्यांचा समग्र अभ्यास करणे आणि वेगळेपण शोधणे हे मज पामराकडून कसे होणार? >>नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. प्रत्येक पंथ, संप्रदाय आपले प्रवर्तक आणि पुर्वसुरी, समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर टाकणार्या प्रत्येक कालखंडात आहेत, होते असे मानतो.

In reply to by चित्रगुप्त

भांडारकर आवृत्ती संस्कृतात आहे आणि मला वाटते तिचे बहुधा इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात मूळचे जगडव्याळ ग्रंथ पाहिले आहेत. मराठी भाषांतर मात्र उपलब्ध नाही. महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.

In reply to by प्रचेतस

@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.
-- कुंभकोणम प्रत, नीलकंठी टीका वगैरे संदर्भ तुम्ही लीलया सांगून जाता याचे लईच कौतुक वाटते. हे शब्द फारा दिवसांनी वाचायला मिळाल्याने बहुत समाधान वाटते आहे. तरूणपणात मोठमोठे जुने ग्रंथ (एकसमयावच्छेदेकरून, जेणेकरून, पराकाष्ठेचा विस्मय, लंडी, तथापि, चर्येवरील हावभाव, लज्जेने गाल आरक्त होणे, वगैरे शब्द असलेले) वाचायचो त्याची आठवण होऊन नोस्त्याल्जिक का काय म्हणतात तसे झाले. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
येथे व्यासकृत महाभारत असे म्हणणे थोडे चुकीचे ठरेल, मुळात खुद्द महाभारताचीच रचना अशी आहे की ऋषीमुनी बसलेल्या बैठकीत सौती सर्वांना महाभारत कथा ऐकवतो जी जनमेजयाच्या सर्पसत्रातून सुरू होते, आणि जनमेजयाला त्याच्या पूर्वजांची व्यासांनी रचलेली कहाणी वैशंपायन सांगतात. त्यामुळे व्यासांनी रचलेला जय ग्रंथ ज्याचे सुमारे २५००० श्लोक आहेत त्यात वैशंपायन आणि सौतीचे मिळून एक लक्षांचे महाभारत बनते, व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा कारण ग्रीक प्रवासी डायनक्रॅस्टोसोम ह्याच्या एका शिलालेखात भरतखंडात एक लक्ष श्लोकांचे इलियड प्रचलित आहे याचा अगदी सुस्पष्ट उल्लेख आहे. एक लक्ष श्लोकी इलियड म्हणजे इकडलील महाभारतच हे अगदी उघड आहे कारण इतका मोठा ग्रंथ दुसरा कुठला झालाच नाही. याचाच अर्थ म्हणजे मूळच्या व्यासप्रणित श्लोकांत बौद्ध, जैन मतांचा उल्लेख अजिबात नाही, काही ठिकाणी बौद्ध मतांचा निर्देश आणि खंडन आले आहे पण ते नंतरचे मानता यावे कारण गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे. महाभारतात बौद्धमताचे खंडन जरी आले असले तरी जैन मतांचा निर्देश जवळपास नाही, मात्र एका ठिकाणी जैनांचा उल्लेख क्षपणक असा आलेला आढळतो. महाभारतात हे उल्लेख अगदी कमी असल्याचे कारण म्हणजे मूळची व्यासप्रणित कथा अत्यंत प्राचीन असणे. शिवाय जैन महाभारतही त्यांच्यात प्रचलित असलेल्या महाभारत कथेवरूनही हेच सिद्ध करते की मूळचे व्यासांचे भारत अगदी प्राचीन आहे.

In reply to by प्रचेतस

व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा
गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे.
हे लिहीताना नजरचुकीने काही घोळ झालेला आहे किंवा कसे ? म्हणजे 'महाभारत युद्ध घडण्याचा काळ' आणि 'महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ' वगैरेतले अंतर वगैरे ? नीटसे समजले नाही. १. महाभारत युद्ध घडण्याचा काळ २. महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ - व्यास, सौती, वैशंपायन ( याच क्रमाने आहेत का?) ३. जैन तीर्थंकरांचा काळ (आदिनाथ ते नेमिनाथ या मध्यात खूप काळ असावा) ४. जैन महाभारत, जैन पांडवपुराण इ. ग्रंथ लेखनाचा काळ.. -- हे जरा स्पष्ट केल्यास बरे होईल.

In reply to by चित्रगुप्त

नाही, घोळ नाही, सांगायचा उद्देश म्हणजे जो इतिहास घडला म्हणजे भारतीय युद्ध (महाभारतात जरी अतिशयोक्ती आहे असे मानले तरी भारती युद्ध ही घटना मी सत्य मानतो) साधारणपणे ३२५० ख्रिस्तपूर्व मानावे लागते, हा काळ अर्थातच निर्विवाद नाही, काही संशोधक ख्रिस्तपूर्व ९०० मानतात. प्राचीनतेचा काळ सर्वसाधारणपणे काढणे म्हणजेच ज्या ग्रंथांचा काळ निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे त्या ग्रंथात जर उपरोक्त घटनांचा उल्लेख असला तर तो उपरोक्त ग्रंथ अधिक प्राचीन होय. उदा बादरायण सूत्र, पातंजल योगसुत्रे ह्यांचा काळ निर्विवादपणे सिद्ध आहे, ह्या सूत्रांत महाभारताचा उल्लेख आहे मात्र महाभारतात ह्यां सूत्रांचा अजिबात उल्लेख नाही यावरून निश्चयाने महाभारत ह्या सूत्रांपेक्षा प्राचीन असे म्हणता यावे. गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ आणि महाभारत रचना (म्हणजे सौतीकडून पडत गेलेली भर) ह्याचा काळ काहीसा समान येतो. मात्र वैशंपायन, सौती ह्यांनी घातलेली भर म्हणजे कुणी एकाच व्यक्तीने घातलेली असे नसून त्यांनी निर्माण केलेल्या शिष्यपरंपरेने घातलेली भर असे समजावे. सुलभीकरणासाठी ती फक्त व्यक्तिनामे आहेत वास्तविक ही भर हजार दीड हजार वर्षे पडतच होती. भार्गवी संस्करण हे देखील एक प्रमुख अंग आहे. भृगुकुल आणि क्षत्रियांचे वैराकडे हे संस्करण निर्देश करते, जिथे जिथे परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व भार्गवी संस्करण समजावे, सौतीने मात्र सर्व मतांना एकत्रित केले उदा शिवाने केलेली विष्णुस्तुती किंवा कृष्णाने केलेली शिवस्तुती, अर्जुनाने युद्धारंभी केलेले दुर्गास्तवन. जैन तीर्थंकरांबाबत म्हणायचे तर शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर होते, त्यांनी जैन परंपरा सुरू केली असे मानले जाते, मात्र त्याआधीचे २३ तीर्थंकर प्रत्यक्षात होते की नाही ते सांगू शकत नाही, शिवाय जैन महाभारत, जैन पांडवपुराण ह्यांचा काळ कोणता तेही सांगता येणार नाही, त्याबाबतीत माझा बिलकुल अभ्यास नाही.

आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ? खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे ! जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ? त्यापेक्षा त्याचा मोठेपणा मान्य केला तर झाला तर फायदाच होईल. पंगा घेऊन फायदा नाही. टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.

In reply to by धर्मराजमुटके

जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ?
-- श्रीकृष्णाच्या थोरवीबद्दल, अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका अजिबात नाही (पंगा घेण्याचा तर प्रश्नच नाही) उलट अतिशय आदर आणि कमालीचा जिव्हाळाच आहे. त्याच्यासारखी अन्य व्यक्ती जगात कुणीही नाही याची मला खात्री आहे. मी उपस्थित करत असलेले प्रश्न 'पुराणे' म्हणजे प्राचीन साहित्याविषयीच्या जिज्ञासेतून जन्मलेले आहेत. आत्ताच जैन साहित्यातही 'पांडव पुराण' असल्याचे समजले, त्याविषयीही उत्सुकता आहे.
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ?
उलट आता सत्तरीतच आपली ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता, आरोग्य वगैरे जपण्यासाठी, एकटेपण घालवण्यासाठी, अशा गोष्टींमधे चित्त रमवणे, 'कुतूहल' जागृत ठेवणे हे शक्य आणि आवश्यक आहे. यातून खूप आनंद, समाधान लाभते आहे. जालावर का होईना, नवनवीन जाणकार लोकांशी ओळखी होत आहेत, हा काय कमी फायदा आहे ?
खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे !
-- हा एक मोठाच विषय आहे, त्यावर चर्चा होण्यासारखी आहे. जमल्यास त्यावर तुम्ही एक धागा काढा. रोचक विचार मंथन होईल. 'या वयात' सुद्धा "प्रौढत्वी निज शैशवास जपणे " हा 'बाणा' ठेवणे आल्हाददायक, आरोग्यदायक असतो. तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।
टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.
-- असे जरी असले तरी ते सर्वच 'पैलतिरी नेत्र' लागलेल्यांसाठी मननीय आहे. अनेक आभार.

याला एक उत्तर म्हणजे शक्तीचा निचरा व्हावा म्हणुन. शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते. काहि कारणाने शक्ती निर्माण आणि संचयाचा वेग हा शक्ती उधळणीपेक्षा जास्त असेल तर योग्य परिस्थीती येताच शक्ती विस्फोट रुपाने dissipate होते. जगात सतत युद्धे होत असताना २० व्या शतकात दोन महायुद्धे का झाली ? कारण तेच. श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? -- पांडवांना, त्यातल्या त्यात युधीष्ठीराला राज्य मिळाले. भीमार्जुनाला सूड उगवल्याचं आणि द्रौपदीच्या डोळ्याला डोळा भिडवून जगण्याचं समाधान मिळालं. नकुल-सहदेव तसेही आपल्या जेष्ठ भावंडांच्या समाधानात आपलं समाधान शोधत असत. २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? -- कालप्रवाहाचा विचार करता हा प्रश्न गौण आहे. धर्म, सत्य वगैरे मूल्यांची भरती ओहोटी सतत होत असते. ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? -- श्रीकृष्णाला हा अंदाज नक्कीच होता. त्याने पांडवांच्या राज्याचा आधार घेऊन एक राजकीय व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. कधी पांडवांच्या गफलतीमुळे तर कधी कौरवांच्या पांडवांप्रती असलेल्या दुष्टपणामुळे हि व्यवस्था आकाराला येऊ शकली नाहि. निर्णायक युद्ध टळत नाहि म्हटल्यावर श्रीकृष्ण पांडवांना विजयी करण्याच्या एकमेव उद्देशाने रणांगणात उतरला. पांडवांकडे officially इंद्रप्रस्थाचं सैन्य नव्हतं. त्यांना द्रुपद आणि मित्रराजांच्या सैन्याचा आधार होता. कौरव तसे well established राजे होते. दोन्ही parties ना आपापली बाजु जास्तीत जास्त बळकट करायची होती. हा इकडे आला म्हणुन तो तिकडे गेला असं करत करत संपूर्ण आर्यावर्त युद्धभूमीवर हजर झाला. ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? -- भीमाला ते चाललं असतं, कारण त्याला दुर्योधन-दु:शासनाचा संहार हवा होता. पण दुर्योधनाला असं personal द्वंद्व नको होतं. त्याच्या दृष्टीने ही लढाई वैयक्तीक स्वरुपाची कमी आणि राजकीय स्वरुपाची जास्त होती. किंबहुना पांडवांना त्रास द्यायला दुर्योधनाचं सर्वात हुकमी हत्यार म्हणजे त्याचं राजकीय वजन. ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? -- for that matter त्यांचा शिरच्छेद करण्याची आवष्यकता देखील नव्हती. कुठलासा शाप देणे, बेशुद्ध करणे, हतबल करणे, द्रोणांनी युधीष्ठीराला युद्धबंदी करण्याचा प्रयत्न केला तसं काहि दुर्योधनाच्या बाबतीत करणे.. असे अनेक पर्याय होते दुर्योधनाला neutralize करायला. कर्णाला पांडवांच्या बाजुने वळवायचा प्रयत्न करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग होता. श्रीकृष्णाला दुर्योधन नामक व्यक्तीला संपवायचे नव्हते, तर तत्कालीन राजकारणाच्या निती-नियमांना पायदळी तुडविणारी एक राजकीय महत्वाकांक्षा संपवायची होती. ति देखील दुर्योधनाच्या official शत्रुच्या हस्ते. जर पांडव, आणि त्यातल्या त्यात अर्जुन, मारला गेला असता तर मात्र श्रीकृष्णाने मित्राच्या वधाचा प्रतिशोध घ्यायच्या भुमीकेतुन सुदर्शन चक्र फेकलं असतं. ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? -- कल्पना नाहि. पण युधीष्ठीराला विधवा बहुल राज्य मिळालं असा उल्लेख आहे. युद्धापूर्वी अर्जुनाने ज्या अनेक शंका उपस्थीत केल्या होत्या, जसे वर्णसंकर होणे, कुळाचार damage होणे वगैरे प्रकार झालेच असतील. युधीष्ठीराने एक राजा म्हणुन हि दाहकता शांत करायला काय प्रयत्न केले व त्याचे काय परिणाम झाले याची कल्पना नाहि. एक आश्चर्य मात्र वाटतं... भागवत कथेची पार्श्वभूमी वाचताना असं जाणवतं कि पांडवांच्या वंशजांना या सगळ्या घडामोडींचा detailed अभ्यास नव्हता. असं का व्हावं ? हे युद्ध आणि त्यामागची कारणं, सगळंच भयंकर होतं.. एका राजवंशाचा १०० वर्षांंचा इतीहास या युद्धाला कारणीभूत होता. व्यासांनी युधीष्ठीराच्या काळातच जय कथा रचली होती. मग परिक्षीत आणि जनमेजय यांना आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातल्या गोष्टी अगदी प्रकर्शाने माहित असायला हव्या होत्या. त्या त्यांना माहित असतीलही.. भागवत पुराण श्रीकृष्णाचं ईशत्व, विभूतीमत्व explain करायला रचलं गेलं. हे बहुदा पांडव-वंशीयांना नव्याने उमगलं असेल.

In reply to by अर्धवटराव

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'शक्तीचा निचरा' ची उदाहरणे जगभराच्या इतिहासात विपुल सापडतील. एका अर्थी इतिहासातली सगळी युद्धे 'जास्त शक्ती'वाल्यांनी त्यांच्या मते 'कमी शक्ती' वाल्यांवर लादली असेही म्हणता येईल. फ्रेंच राज्यक्रांतीत शेकडो वर्षांच्या Burbon घराण्याच्या राजशक्तीविरुद्ध सर्वसाथारण प्रजेची शक्ती हळूहळू वाढत जाऊन तिचा स्फोट झाला. बळवंतराव (लोकमान्य टिळक) म्हणायचेच की राजकारण हा 'शक्तीचा खेळ' आहे. (असे गंगाधर गाडगिळांच्या 'दुर्दम्य' मधे वाचले होते, ख.खो.दे.जा.)
श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.
-- हा विचार मननीय आहे. बाकी तुम्ही दिलेली सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण उचित वाटली. शतशः आभार.

In reply to by चित्रगुप्त

अरांनी दिलेले पहिलेच स्टेटमेंट चूक आहे ! >> शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते Law of conservation of Energy काय सांगतो ? - energy is neither created nor destroyed. When people use energy, it doesn't disappear. Energy changes from one form of energy into another form of energy. मागे अश्याच काहीतरी अद्भूत थिअर्या त्यांनी इंजीन, इन्पुट वगैरे शब्द वापरून मांडलेल्या आहेत. यावेळी, शक्ती.

In reply to by उन्मेष दिक्षीत

भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसे तीच असली, तरी ती जेंव्हा एकाद्या कल्पनेने, भावनेने, विचाराने, उद्दिष्टाने भारून जातात तेंव्हा त्यांची शक्ती कैकपटीने वाढून, एकत्रित (फोकस) होऊन ती अचाट कर्मे करायला सक्षम होतात. (छत्रपतींनी मावळ्यांना हाताशी धरून बलाढ्य साम्राज्याला जेरीस आणणे, मिशेलँजेलोचे सिस्टीन चॅपेलचे चित्र, अशी शेकडो उदाहरणे मिळतील) -- याउलटही घडते. अतिशय सक्षम व्यक्ती हताश, वैफल्यग्रस्त झाल्यास अगदी साध्या गोष्टीही करण्यास असमर्थ होत असते. -- अर्थात याबद्दल माझा अभ्यास नसल्याने या विषयाला मी इथेच विराम देतो आहे. Will to power हा नित्शेचा ग्रंथ आणूनसुद्धा वाचायचा राहून गेला. आता वाचणे होणार नाही. .

In reply to by चित्रगुप्त

विज्ञान ज्याला energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power म्हणतो, त्यांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे त्यांना कळत नाहि असं नाहि. पण आपल्या व्यतिरीक्त इतर कोणाचाही विचार मननीय असु शकतो हि कल्पनाच त्यांना करवत नाहि. जुनी खोड आहे ति...

In reply to by अर्धवटराव

मागच्यावेळी Silence आणि Peace घोळ यावेळी Energy आणि Power एव्हढाच फरक

In reply to by उन्मेष दिक्षीत

तुम्हाला तुमचा घोळ लक्शात आला हे महत्वाचं.

In reply to by अर्धवटराव

शक्तीपतन शक्तीसंचय असले अघाध शब्द लिहून , सत्तेला [ power ] पर्यायी शब्द शक्ती [ energy ] असा अर्धवटासारखा वापरून आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याचा घोळ फक्त तुम्ही करु शकता !

In reply to by उन्मेष दिक्षीत

शक्ती, सामर्थ्य, बळ वगैरे शब्दप्रयोग करणं हा मराठी भाषेचा घोळ आहे. निर्बुद्ध आत्ममग्नता नाहि ना तिच्याकडे... तिला क्षमा करा.