Skip to main content

९९ वर्ष्यानंतर

लेखक आंद्रे वडापाव यांनी बुधवार, 17/05/2023 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार) आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार).. तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%) तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली. ९९ वर्ष्यानंतर ऍसेट् हिं = ५७० रु ऍसेट्स मु = १५७ रु ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील. बाकी तुमचं चालू द्यात... National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml ##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32700
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-comm… हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?

हा धागा आणि काही प्रतिसादांचा मुळ पायाच गंडलेला आहे. त्यामुळे निष्कर्षही वांझोटा आणि व्यवहाराला धरुन नाही. मुळातच हा विषय 'मु' यांचे उपद्रवमुल्यामुळे सुरु झाला आहे. १. प्रत्येक समाज, माणुस आणि त्याची मुल्ये वेगळी असतात. त्यामुळे १ 'हि' घेतला आणि १ 'मु' घेतला त्यांची बरोबरी करुन उत्तराची बेरीज शुन्य केला असा प्रकार दाखवण्याचा उद्योग आहे. व्यवहारात असे होत नसते. २. मालमत्ता (असेट्स) सजीव नसतात, ती स्वत:हुन काही निर्णय घेत नाही. माझ्या माहितीत कोणत्याही मालमत्तेची हानी झाली म्हणुन मानवी हक्काची ओरड होत नाही. ३. 'मु' यांचे उपद्रवमुल्य भरपुर आहे. १० टक्के 'मु' ९० टक्के सभ्य समाजाला भारी पडु शकतात. कारण गुन्हेगाराला फक्त गुन्हा करायचा असतो. संरक्षकांना तो थांबवायचा असतो. ते कुत्र्यांचे शेपुट कितीही वेळ नळीत ठेवले तरी सरळ होत नाही. हे दंगलीच्या वेळी चांगले जाणवता ४. घटना ही भारतीय समाजाने तयार केली आहे. ती जेव्हा भारतीय समाजाला गरज पडेल तेव्हा बदलता येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे घटनेच्या मुळ पायाला धक्का लावता येऊ शकत नाही ह्या युक्तीवादाला फारसा अर्थ नाही. जेव्हा जेव्हा सनदशीर मार्ग बंद होतात तेव्हा त्याची जनतेमध्ये खुप दुरोगामी आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. ५. जेव्हा फाळणी झाली तेव्हाच जर लोकसंख्येची अदलाबदल झाली असती तर भारतीय समाजाचा कितीतरी वेळ, साधनसामुग्री वाचली असती. भारताने एक सुवर्णसंधी गमावली. ६. जर फाळणी ही मालमत्तेचा खटला आणि निकाल म्हणुन पाहीला तर 'मु' समाजाचा भारतावर कोणताही हक्क उरत नाही. त्यामुळे त्यांचे इतर हक्क आणि अधिकार न्याय्य नाहीत. ७. माझ्या अनुभवानुसार 'मु' हा फक्त अल्पसंख्याक असे पर्यंत धर्मनिरपक्ष / पंथनिरपेक्ष असतो. धागाकर्त्याचे जर या विषयी मतभेद असेल तर त्यांचा विदा द्यावा. अगदी मनमिळावु 'मु' त्याच्या पंथावर टिका करत नाही, त्यांचे सहपंथी सोडुन इतरांना साथ देत नाही. जास्तीत जास्त तो गप्प राहतो. ८. काही शहामृगी शाकाहारी माणसांना वाटते की मी शाकाहारी आहे त्यामुळे मी जंगलात गेलो तरी मला कोणी खाणार नाही. पण तसे नसते. खाणारा / मारणारा शाकाहरी किंवा मांसाहरी असा भेद करत नसतो.

In reply to by Trump

६,७,८ सहि रे सहि जगात मु या "आस" ए ट" चे सगळ्यांशी भांडंन "ज्यू" म्हणू नका "खी" म्हणू नका "बु" म्हणू नका ...

वाळुत डोक खूपसुन बसणार्याची काय वाट लागते हे वेळोवेळी ऊदाहरणाने मू समाजाने दाखवून दिलेल आहे. काश्मिरमध्ये पंडीतांचा नरसंहार करणार्या अतिरेक्यांना पंडीत लोकांचा ठाव ठिकाणा त्यांच्यांच शेजार्यांनी /ओळखीच्या लोकांनी दिला होता. अनेक वर्षे हिंदु पंडीतांकडुन ह्या मू शेजार्यांनी पैश्याची मदतही स्विकारलेली होती, पण वेळ येताच पंडीतांच्या मानेवर सुरी फिरवताना त्या सर्व उपकाराची आठवण सुद्धा आली नाही. पगार तयार आहे अस खोट सांगुन गिरीजा टिक्कुला कॉलेज मध्ये बोलावणारी तीची मू मैत्रीणच होती. पुढे गिरीजा टिक्कुचा गँग रेप केला गेला व तिला लाकडाच्या वखारीत नेउन तिचे सॉ मशिनवर जिवंत असताना दोन तूकडे केले !! अशी अनेक उदा आहेत. सर्वच ईथे सांगत बसत नाही. तामिळनाडुतल्या आलाथूर तालूक्यात मू समाजाने आपली लोकसंख्या ६५% पेक्षा जास्त होताच, नारायणमंगलम गावातील मंदिराच्या सर्व कार्यक्रमावर बंदी आणली. ताना सरकारला काहीही फरक पडला नाही, शेवटी न्यायालयाने दखल घेउन बंदी परतवली. ९९ वर्षांची वाट बघत हिंदु समाजाची दिशाभुल करत रहा. एखाद्या गिरीजाचा श्राप आपल्या डोक्यावर घ्या !!

कर्नाटकात कॉंग्रेस सरकार येताच, भारतातुन आपले चंबुगबाळे आवरलेल्या "अँन्मेस्टी ईंडीया" ने कर्नाटक कॉंग्रेस सरकारला पत्र लिहुन तीन गोष्टींची मागणी केलेली आहे. १. भारतीय न्यायलयाने संमत केलेली शाळा कॉलेजातली हिजाब बँदी उठवावी. २. गो मांसावरची बंदी मागे घ्यावी. ३. मु दुकानांवर बहीष्कार घालणार्या हिंदुवर कारवाई करण्यात यावी. भाजपाला मत न दिल्यामूळे हिं समाजावर होणारे परीणाम ईतक्या लवकर दिसु लागतील असे वाटले नव्हते.

धागा काढणाऱ्याला शेअर मार्केटची अलंकारिक भाषा काढून "NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे" इतका सोपा दोनोळी विषय क्लिष्ट जडजांबल का करावा वाटला ते कळत नाही. Keep it simple silly, हे तत्व काथ्याकुट सदरात कम्पल्सरी करून टाकावे चालक मालकांनी. अन् इतकं सिंपल म्हणणं उगाच द्राविडी प्राणायाम करून मांडल्यामुळे नेहमीच्या यशस्वी खेळाडूंना फुल टॉस दिल्यासारखे झाले हे.... बाकी काय आपापले एजेंडा धरून सगळेच "चालू" आहेत. चांगभले.

जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होणार याची उत्सुकता होतीच. कारण विकिपीडिया सारखे मिपा काही नियंत्रित माध्यम नाही. माहितीची खातरजमा करणं, माहितीची सत्यता जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तिला स्वतःच्या तर्काच्या आधारे खरं खोटं समजावं अशी सूचना देणं, खोटी माहिती स्वतःहून काढून टाकणं आणि संबंधित सदस्यांवर लक्ष ठेवणं अशा सुविधांचा अभाव असतांना राजकीय चर्चा होणार नाही हे धोरण सदस्यांच्या सद्सदविवेकबद्धीवर सोडल्यासारखे दिसले. परंतु संपादक मंडळाच्या धोरणाची चिकित्सा करण्याचं कुठलं धागारूपी व्यासपीठ नव्हतं. या राजकीय सदृश्य धाग्यावरील चर्चा सुरु झाल्यामुळे या संधीचा फायदा उठवावा असं ठरविलं. सर्व प्रथम माझा आय डी धारातीर्थी पडण्याचा संभव आहे. परंतु आपण कोणी लोकोत्तर आत्मा आहोत असा काही समज नसल्यामुळे हा प्रतिसाद देत आहे. संपादक मंडळाच्या आक्षेपांमध्ये दोन मुद्दे आहेत. त्यामध्ये इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा. हा मुद्दा खूपच धूसर आहे आणि संपादक मंडळाच्या निष्पक्ष असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सदस्य एकमेकांचा मान ठेवत नाही असं म्हटलं असतं तर वाद घालणाऱ्या दोन्ही सदस्यांना सारखं वागवलं जातंय असं वाटलं असतं. पण नाही. संपादक मंडळाला एक विशिष्ठ विचारसरणी आणि त्या विचारसरणीची माणसं जवळची वाटतात हे त्यांच्याच वाक्याने स्पष्ट झाले. कदाचित तोच संपादक मंडळाचा उद्देश असावा. दुसरा मुद्दा आहे तो राजकीय मंडळींचा मान ठेवण्याचा. खरं तर गेल्या काही वर्षात नोटबंदी आणि लॉकडाऊनचा अतिरेक वगैरे गोष्टी बघितल्या तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ खेळणारे हे निर्णय होते. माणूस करवादून अगदी देवाला देखील शाप देतो आणि इथे राजकीय नेत्यांचा मान राखण्याचा मुद्दा अधोरेखित करावा हे जरा जास्तच झाले. त्यातही महात्मा गांधी, नेहरू, राजीव गांधी, आणि मनमोहन सिंग यांच्यावरील गाळीव रत्ने अजूनही मिपाच्या खजिन्यात असतील. तेव्हा पहिल्या मुद्द्यासारखाच हाही मुद्दा ते ”आदरणीय” नेते कोणते हे न सांगताही समजण्यासारखे आहे. मिपा प्रशासन आजही सरंजामी मानसिकतेत आहे आणि मिपा सदस्य उपकृत असण्याच्या अंमलाखाली. हे दोन्ही जोखड जातील तो सुदिन.

In reply to by सर टोबी

इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा.
चर्चा करणारा सदस्य (कधी कधी) इतर (बाकीच्या काही) सदस्यांचा न ठेवता वैयक्तिक आक्रमण किंवा ताशेरे लिहितात असा अर्थ मला तरी जाणवला. त्यात परस्परांना किंवा अन्य काही रचनेने फार फरक पडला असता असे कल्पूनही वाटत नाहीये. नीलकांत आणि प्रशांत यांना मी अत्यंत दीर्घकाळ जाणत असल्याने ते कोणत्याही बाजूने दूरान्वयानेही बायस्ड नाहीत हे निश्चित माहिती आहे. सरंजामशाही मानसिकता वगैरे फार दूरची गोष्ट. इतका मोठा प्लॅटफॉर्म सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे. बहुतांश सर्व सदस्य अनामिक असताना आणि हे व्यवस्थापक मात्र उघड असताना अनेक निर्णय घेण्यामागे जी विचार प्रक्रिया असते ती आपल्याला, म्हणजे इतर सदस्यांना दिसणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक आरोप होऊ शकतात, होत असतातच. त्याचे प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देणे म्हणजे अधिकच गुंतागुंत होऊ शकते. काही बाबतीत सर्व बाजूंनी सम्यक मोजून मापून समान कारवाई होत नसेलही. पण तसा कोणताही प्लॅन किंवा हेतू असण्याची मला त्या लोकांबाबत काडीचीही शंका नाही. समाजात जे आणि ज्या प्रमाणात (पर्सेंट) आहे ते तत्सम प्रमाणात इथे प्रतिबिंबित होते. त्यात जाणून बुजून घडवलेला बायस नसतो हे नक्की जाणवले आहे. तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल अशा विचाराने आजवर इथे वावर ठेवला आहे.

आंद्रे वडापाव साहेब, तुमची गृहीतके आणि गणित चुकले आहेत. STATISTA चा आलेख "live births per woman " देतोय - म्हणजे प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यभरात किती अपत्ये जन्माला घालते ती संख्या. हे % नाही. ही संख्या विविध धर्मांत १.४ ते २. आहे. UN World Population Prospects चा आलेख दर १००० व्यक्ती (ह्यात जवळपास ५०० स्त्रिया असतील) दर वर्षी किती अपत्ये जन्माला घालतात ती संख्या देतोय. भारतासाठी ही संख्या जवळपास १४ आहे. हे सुद्धा % नाही. ह्या संख्या विविध धर्मांसाठी वेगवेगळ्या दिलेल्या नाहीत. आता हिंदू आणि मुसलमान ह्यांची तुलना करूया. आज जन्मलेला एक मुसलमान मुलगा आणि एक मुसलमान मुलगी मिळून २५ वर्षांनी २.४ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला २.४ मुले होतील. त्यानंतर २५ वर्षांनी ती २.४ मुले त्यांच्या २.४ जोडीदाराबरोबर प्रत्येक जोडप्यामागे २.४ म्हणजे एकूण ५.७६ मुले जन्माला घालतील. म्हणजे दर २.४ व्यक्तींमागे ५.७६/२ = २. ८८ मुले जन्माला घालतील अशा प्रकारे जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर २५ वर्षांनी २ + २.४ ५० वर्षांनी २ + २.४ + २. ८८ ७५ वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२ १०० वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२ + २. ८८ x २.४/२ x २.४ /२ = १४.८८ इतक्या मुसलमान व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन मुसलमान नवजातांमागे ) म्हणजेच १४.८८/२ = ७. ४४ पट आता हिंदूंचा हिशोब करू आज जन्मलेला एक हिंदू मुलगा आणि एक हिंदू मुलगी मिळून २५ वर्षांनी १.९ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला १.९ मुले होतील. जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर २५ वर्षांनी २ + १.९ ५० वर्षांनी २ + १.९+ १.८०५ ७५ वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२ १०० वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२ + १.८०५ x १.९/२ x १.९ /२ = ९.०५ इतक्या हिंदू व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन हिंदू नवजातांमागे ) म्हणजेच ९.०५ /२ = ४.५३ पट आज जर १५ मुसलमान जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे १५ x ७. ४४ = १११.६ होतील आज जर ८० हिंदू जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे ८० x ४.५३ = ३६२. ४ होतील तसेच १०० व्यावर्षी १.८०५ x १.९/२ x १.९ /२ x ८०/२ = ६५.१६ हिंदू मुले जन्मतील आणि २. ८८ x २.४/२ x २.४ /२ x १५/२ = ३१.१ (हिंदूंच्या जवळपास निम्मी) मुसलमान मुले जन्मतील ह्या गणितात अर्थातच अति सुलभीकरण आहे, काही गृहीतके आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री मिळून अपत्ये जन्माला घालतात असे गृहीत धरले आहे. मुसलमानांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर आहे. जर एक पुरुष आणि दोन बायका असे धरले तर तीन व्यक्ती मिळून ४.८ मुले जन्माला घालतात असा हिशोब होईल . त्या हिशोबाने मुसलमानांची संख्या अधिक वाढलेली दिसेल. आता नैसर्गिकरीत्या पुरुष आणि स्त्रिया सारख्याच प्रमाणात जन्माला येतात. तर दर एका मुसलमान पुरुषामागे दोन स्त्रिया कोठून येतील हे विचारू नका. तो गणिताचा प्रांत नाही. ही प्रतिक्रिया फक्त गणित समजावून सांगण्यासाठी दिली आहे. जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर हिंदू मुसलमानांच्या जागी वाघ , सिंह, पांडा , शहामृग वगैरे आपापल्या आवडीप्रमाणे वाचावे.

In reply to by अगम्य

"NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे" (इपित्तर इतिहासकार यांच्या सौजन्याने)

In reply to by आंद्रे वडापाव

१०/१०, पाल्हाळ न लावता म्हणणे मांडण्याची कला लवकर आत्मसात केल्या बद्दल. LoL.

In reply to by आंद्रे वडापाव

मग सरळ तेवढंच म्हणायचं. एक बातमी म्हणून त्या सर्वेची माहिती द्यायची. सर्वे विश्वासार्ह की अविश्वासार्ह हे लोक त्या सर्वेबद्दल बघून घेतील. तुम्ही Data दिला आणि त्याचे चुकीचे interpretation केले. birth rate आणि CAGR ह्यांची गल्लत करून चुकीचा निष्कर्ष काढला म्हणून मी तुमच्या गणिताबद्दल प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिलेल्या data नुसार गणिताप्रमाणे काय ट्रेंड दिसेल ह्याचे back of the envelope calculation मी दिले आहे . इथे लोकांची मते बदलणे शक्य नाही. ह्या गणिताचे उत्तर तुम्हाला आवडत नसल्यास इतर कुठलाही सर्वे, गप्पा, रिपोर्ट , भाषण ह्यांचा आधार घेऊन तुमच्या मनातला निष्कर्ष जो आहे त्याला चिकटून राहण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. फक्त चुकीचे गणित करून त्याचे समर्थन करायची गरज नाही.

In reply to by अगम्य

किंवा तुम्ही तुमच्या समजुतीनुसार गणित केले तेही ठीक. स्वतः विचार करून निष्कर्ष काढणे चांगली गोष्ट आहे. फक्त त्यात जर काही चूक/उणीव असेल तर ती जाणून घ्यायची इच्छा आणि मान्य करण्याचा मोकळेपणा बऱ्याच जणांकडे असतो. तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात. चर्चा वाचणाऱ्या इतर कुणाला प्रतिक्रियेतल्या गणितात रस वाटला तर आनंद आहे.

In reply to by अगम्य

१. Fertility rate मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे गेल्या सर्व्हे नुसार. हिंदू व मुस्लिम रेट मधली दरी कमी होत आहे, सातत्याने, प्रत्येक सर्व्हे मध्ये. जर प्रोजेक्षन करायचे असल्यास ह्या पडणाऱ्या दरीचे पण करा. मनाप्रमाणे ट्रेण्ड निवडून तितकेच प्रोजेक्ट करणे कसे योग्य आहे ? २. बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा जवळपास सारख्या प्रमाणात होतो.

In reply to by कॉमी

हे back of the envelope calculation आहे. Fertility rates सध्या आहेत तसेच स्थिर राहिले तर काय होईल हे प्रोजेक्ट केले आहे. बदलणाऱ्या rates ची आकडेमोड जास्त गुंतागुंतीची होईल. त्याही पुढे जाऊन फर्टिलिटी रेट कमी होण्याचा रेट हा ही अंतर्भूत करू शकता येईल. ह्याला एक प्रकारचा bound म्हणून बघता येईल. बहुपत्नीत्व ह्या बाबतीत हिंदू आणि मुसलमानात कायदेशीर फरक आहे.ह्या बाबतीतला प्रत्यक्ष डेटा मला माहित नाही. त्यामुळे ह्या फॅक्टरमुळे फरक पडू शकतो हे फक्त नमूद केले आहे. पण प्रत्यक्ष आकडेमोडीत बहुपत्नीत्व धरले नाही. मुळात वडापाव ह्यांनी दिलेला डेटा interpret करण्यातच इतका गोंधळ होता की तो डेटा कसा interpret करून calculation मध्ये वापरता येईल हे दाखवणे हा मुख्य उद्देश होता. ह्यात जितके अधिक parameters घालाल, आणि डेटा जितका अचूक असेल, आणि अधिकाधिक गुंतागुंतीचे calculation कराल तसा अधिक चांगला निष्कर्ष निघेल.

In reply to by कॉमी

तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे म्हणून पुन्हा डेटा पाहिला . शेवटच्या तीन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट ३. ४ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे २९% घट. हिंदूंचा २. ६ वरून १.९ वर आला आहे म्हणजे २७% घट . त्यात फारसा फरक नाही. त्याही पुढे जाऊन, शेवटच्या दोन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट २. ६ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे ८% घट. हिंदूंचा २. १ वरून १.९ वर आला आहे म्हणजे ९.५ % घट . म्हणजे हिंदूंचा रेट किंचित जास्त वेगाने घसरतोय. म्हणजे मुसलमानांचा फर्टिलिटी रेट हिंदूंच्या तुलनेत बराच वेगाने घसरत आहे किंवा राहील असे निदान हा डेटा तरी दाखवत नाही.

In reply to by कॉमी

बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा जवळपास सारख्या प्रमाणात होतो.
हा मुद्दा नाही कळला. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की एकाहून अधिक लग्न करण्याचे हिंदू आणि मुसलमानांचे प्रमाण सारखे आहे? असे असेल तर धक्कादायक आहे. मला वाटायचे की हिंदूंसाठी एकाहून अधिक लग्न ही कायद्याविरोधत आहे. तुमचे म्हणणे बरोबर असेल तर कायद्याचा काहीच परिणाम झाला नाही असा अर्थ होतो.

In reply to by टीपीके

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की एकाहून अधिक लग्न करण्याचे हिंदू आणि मुसलमानांचे प्रमाण सारखे आहे?
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये भारतात अत्यंत कमी प्रमाणात बहुविवाह होतात. मुसलमान समाजात हिंदुंपेक्षा किंचित जास्त प्रमाणात बहुविवाह होतात, पण एकूण बहुविवाह अत्यंत विरळ आहे आणि दोन्ही समाजातला फरक खूप कमी आहे. इथे वाचा. कायद्याचा परिणाम फक्त आत्ता काय परिस्थिती आहे पाहून कसे समजणार ? कायद्याआधी काय होते आणि आता काय आहे हे पाहावे लागेल. आज हिंदू समाजात फक्त १.३% लोक बहुविवाहीत आहेत. इतकी कमी संख्या असताना कायदा अयशस्वी म्हणणे योग्य आहे काय ? त्यासाठी कायद्याआधी किती संख्येत बहुविवाह होते हेच पहावे लागेल.

The latest NFHS data from 2019-20 shows the prevalence of polygyny was 1.9% among Muslims, 1.3% among Hindus and 1.6% among other religious groups.

In reply to by सुबोध खरे

Polygamy in India "down" in 45 yrs: Muslims' from 5.7 to 2.55%, Hindus' 5.8 to 1.77%, "common" in SCs, STs According to the NFHS-5 data, only about 1.9 per cent of Muslim women said their husbands had more than one wife, compared to 1.3 per cent of Hindu women who admitted to being in a polygynous marriage in 2019-21.

For instance, Assam — where Chief Minister Himanta Biswa Sarma reportedly said in May last year that a Uniform Civil Code would act as “protection” for “Muslim daughters” — had the widest gap between Hindu and Muslim women who admitted to being in a polygynous relationship in 2019-21. The rate of polygamy among Hindu women in Assam was about 1.8 per cent, according to NFHS-5 data, as against 3.6 per cent among Muslim women.

प्रकांड बुद्धिमत्ता, अलौकिक तेज, गहन गंभीर विचार, सखोल उदार दृष्टी दर्शवणारा विचार आणि धागा. नोबेल, बुकर, गेला बाजार मॅगेसेसे यांचे कसे लक्ष गेले नाही अजून या महान विचारवंताकडे... आश्चर्यच आहे ! पण काय करणार कावळ्यांच्या कलकलाटात राजहंसाचे गाणे कोण ऐकतो !!! कदर नाही लोकांना !!

हा लेख म्हणजे टूल किट चा भाग जगात "खी" आणि "मु" या "फंड मॅनेजर" ना सगळे "मार्केट" काबीज करायाचे ( मर्जर अँड अक्विझिशन )आहे त्या मध्ये भारतातील "हि" , इतर देशातील "बु" हे लक्ष आहेत "मु" हे काम आक्रमक पद्धतीने करतात ( होसटाईल टेकओव्हर ) "खी" हे काम कधी सौम्य तर कधी आक्रमक पद्धतीने करतात ( फ्रेंडली फसाड ) आपण षंढ ( रिटेल ट्रेडर ) ९९ वर्षाची वाट पाहत बसणारे

In reply to by चौकस२१२

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.

In reply to by चौकस२१२

आज काल "ऑ" वैगरे देशात "हि" बसून इतरांना त्यांच्या देशावर राष्ट्रभक्ती कशी करायची ह्याचे सल्ले देतात. बरे हा "ऑ" देश सुद्धा हे ज्या "खी" बद्दल बडबड करतात त्यांनी वसवलेला देश आहे. तिथे राहणे ह्यांना आवडते पण ते कसे दुष्ट हे सतत सांगत राहायचे असे प्रकार काही लोकं हल्ली करतात.

In reply to by कॉमी

मुद्दा नाही सापडला कि लिहणारा कुठे राहतो हे बोलायचे मी कधीही तुम्ही भारतावर राष्ट्रभक्ती कशी करा कि करू नका सांगितलंय ? उलट बहुतेक करता तसे भारताचे कौतुकच केलय जागतिक हिंदू म्हणून जेवहा भारत किंवा भारताबाहेर हिंदू आणि इतर हा विषय येतो तेवहा मत मांडले तर का टोचतंय