✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

उ
उनाड यांनी
Fri, 05/12/2023 - 06:12  ·  लेख
लेख
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा. या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे. महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला. नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले. स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला. या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे. केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36120 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

धर्मांतरण

कपिलमुनी
Fri, 05/12/2023 - 14:13 नवीन
उद्या भारतीय मूळ हिंदू असलेल्या पण पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ? मग त्यांची जात कोणती लावायची ? चातुर्वर्ण्यात कुठल्या वर्णात स्थान द्यायचे ? आपले असलेले दलीत बौद्ध झाले तरी यांचे सोवळे सुटेना . असल्या संकुचित वृत्तीमुळे हिंदू धर्माची अधोगती झाली आहे. इतर धर्म जर प्रसार करत असतील तर कालानुरूप बदल घडवून हिंदू धर्म कसा प्रसार करायचं हे बाजूला .. अरण्यरुदन करण्यात फक्त पुढे असे धर्म पंडितांचे झाले आहे
  • Log in or register to post comments

चुकीची तुलना

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 17:47 नवीन
बौद्ध धर्म हा भारतीय आहे. इस्लाम non indic आहे. मूळ वर्णव्यवस्था ही जन्माधारित अजिबात नव्हती. सध्याची जातिव्यवस्था हा सनातन धर्मातील वर्णाश्रमाचा पूर्ण विपर्यास आहे. हिंदु धर्माने कधीही धर्मपरिवर्तन मोहिमा काढलेल्या नाहीत, उलट विविध जनसमूहांना त्यांच्या धार्मिक विश्वासांसह सामावून घेतलेले आहे. शिवपूजक आणि विष्णुपूजक हे शेकडों वर्षांपूर्वी सरळसरळ वेगळे धर्म होते. आता एकाच कुटुंबात एक व्यक्ती शिवपूजक, दुसरी विष्णुपूजक, तिसरी उभयपूजक व चौथी नास्तिक असू शकते. इस्लामला (सध्या तरी) हे असले काही मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मूळ वर्णव्यवस्था ही

कॉमी
Fri, 05/12/2023 - 17:50 नवीन
मूळ वर्णव्यवस्था ही जन्माधारित अजिबात नव्हती.
पुरावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

आहेत

चलत मुसाफिर
Fri, 05/12/2023 - 17:59 नवीन
ऋषी विश्वामित्र ते ऋषी वाल्मीकि, भरपूर पुरावे आहेत. सवडीने वाचा, घाई नाही. मूळ मुद्दा वेगळा आहे. चर्चा भलतीकडे नेण्याचे हे डाव आता लोक ओळखतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

विश्वामित्र ऋषींनी काय लिहिले

कॉमी
Fri, 05/12/2023 - 18:13 नवीन
विश्वामित्र ऋषींनी काय लिहिले ? शंबुक वध लिहिणारे वाल्मिकी का ? मुद्दा वेगळा कसा ? कपिल मुनींच्या प्रश्नावर तुम्ही उत्तर दिले त्यातला सेंट्रल मुद्दा आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

पिढ्यान् पिढ्या मुसलमान

सुबोध खरे
Sat, 05/13/2023 - 10:37 नवीन
पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ? आर्य समाज त्यांना हिंदू करून घेतो. बाकी जात लावणे हे भारतीय कायद्यात आवश्यक नाही. "केवळ हिंदू, जात नाही" असे लिहिलेले चालते. आमच्या वर्गातील ९६ कुळीने आपल्या पुणे विद्यापीठाच्या अर्जात तसे लिहिलेले मी स्वतः पाहिलेले आहे. ( अर्थात आपल्याला जातीवर आधारित आरक्षण हवे असले तर कठीण आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

"केवळ हिंदू, जात नाही" असे

कानडाऊ योगेशु
Sat, 05/13/2023 - 15:47 नवीन
"केवळ हिंदू, जात नाही" असे लिहिलेले चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अजमेर स्टोरी ही वाचा

विवेकपटाईत
Fri, 05/12/2023 - 22:09 नवीन
अजमेर स्टोरी ही वाचा https://www.facebook.com/100002436224833/posts/pfbid0LW8UjR9gR1N2Z12nAHwFNWhuNfDXGrYZADfd1bEYg2Fdrxe1szPAHU4UxuNBKU39l/?mibextid=Nif5oz
  • Log in or register to post comments

?

उनाड
Fri, 05/12/2023 - 22:18 नवीन
त्याचा इथे काय संबंध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ज्याला इस्लाम, इस्लाममधील

श्रीगुरुजी
Fri, 05/12/2023 - 22:22 नवीन
ज्याला इस्लाम, इस्लाममधील विविध जाती व पंथ, इस्लामी कट्टरतावाद, लव्ह जिहाद इ. विषयी शष्प ज्ञान नाही त्याला हे अजमेर प्रकरण वाचायला सांगून उपयोग काय? त्याला ते समजणार नाही आणि त्यात काही चूकही वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

क्लेशदायक

उनाड
Fri, 05/12/2023 - 23:41 नवीन
इस्लाम बद्दल इतके ऑब्सेसिव्ह होण्यापेक्षा वेद, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, षडदर्शने , मीमांस वगैरेंचा अभ्यास केला अस्ता तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी इस्लाम किंवा इतल कोणत्याही

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 00:17 नवीन
मी इस्लाम किंवा इतल कोणत्याही धर्माबद्दल ऑब्सेसिव्ह नाही. माझा हिंदू व इतर धर्मांचा थोडाफार अभ्यास आहे. लव्ह जिहाद वगैरे अस्तित्वात नाही असे असत्य दावे करणाऱ्यांविरूद्ध मी लिहितो. हिंदू धर्माला घातक असणाऱ्या गोष्टींचे जे समर्थन करतात त्यांचा मी विरोध करतो. ज्याला मुस्लिम धर्माची, त्यातील जातींची व पंथाची, विचारसरणीची कणभरही माहिती नाही त्याने असे असत्य दावे केले तर मी खोडून काढतो. असो. आपण मुस्लिमातील सर्व जाती-पंथ, चालीरीती, प्रपोगंडा, ब्रेनवॉशिंग, क्रोर्य, फसवणूक इ. विषयी माहिती मिळवावी असे सुचवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

मी काय म्हणतो .. मी मिपावरी

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 06:57 नवीन
मी काय म्हणतो .. मी मिपावरी या विषयी अनेक तावातावाने पाडलेले लेख. प्रतिसाद पाहतो. शक्यतो मी दूर राहतो. पण आज एक शंका विचारतो.. या विषयातील तज्ञाने विदा पूर्वक माहिती द्यावी. लव जिहाद हा फक्त भिन्न लिंगी व्यक्ती मध्ये होतो. का. समजा दोन स्त्रिया आहेत (एक हिंदू एक मुस्लिम) त्यांनी लग्न केले, नंतर हिंदू स्त्री ने इस्लाम स्वीकारला तर हे प्रकरण लव जिहाद प्रकरणात गणले जाईल का ?
  • Log in or register to post comments

इस्लामला समलिंगी विवाह मान्य

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 08:16 नवीन
इस्लामला समलिंगी विवाह मान्य नाही. तस्मात् असला प्रकार होणे अशक्य. मुळात खूप लहान वयात मुलीचे लग्न लावून देत असल्याने व धर्माचा मुलींवर सुद्धा प्रचंड पगडा असल्याने अशी जोडी जमणे अत्यंत दुर्मिळ. अजून एक म्हणजे सर्व इस्लामी देशात समलैंगिक विवाहास कायदेशीर बंदी आहे. अर्थात समलैंगिक संबंध असणाऱ्यांची संख्या (म्हणजे गे किंवा बायसेक्शुअल)) सौदी अरेबियात खूप मोठी आहे. विशेषतः अगदी लहान मुलांबरोबर गे प्रकारचे संबंध ठेवणाऱ्या अरबांची संख्या मोठा आहे. टर्की तर गे लोकांची राजधानी म्हणता येईल. एकीकडे आपण कट्टर धार्मिक आहोत याचे सतत जाहीर प्रदर्शन करायचे, इस्लामला समलैंगिक संबंध मान्य नाहीत म्हणून याविरुद्ध अत्यंत कठोर शिक्षा द्यायची पण त्याचवेळी लहान मुलांशी अनैसर्गिक संबंध ठेवायचे असा ढोंगीपणा येथे दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

अरेच्चा मला वाटलेले की हा

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 09:57 नवीन
अरेच्चा मला वाटलेले की हा धागा भारताविषयी (भारताच्या काँटेक्ष्ट मध्ये) आहे.. इथ तर सौदी तुर्क आणि इस्लामिक जग असा गोल्पोस्त शिफ्ट झाला.. असो विदा पूर्वक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

छे विदा बिदा काय विचारायचं

कॉमी
Sat, 05/13/2023 - 10:40 नवीन
छे विदा बिदा काय विचारायचं नाय इथे. विदा विचारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं उलट, कारण विदा विचरण्यामागे त्यांचा अजेंडा असतो. बिना विदा श्रद्धापूर्वक आमचे मत मानले पाहिजे नाहीतर तुम्ही अजेंडा वाले आहात. पुरावे द्या असे ओरडणारे लोकं ओरडतील ओरडतील आणि नंतर गप्प बसतील. आपण आपली श्रद्धा सोडायची नाई, चील मारायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

अनेकांनी विदा देऊनही त्याचा

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 11:11 नवीन
अनेकांनी विदा देऊनही त्याचा येथे काय संबंध असे धागाकर्ता विचारतोय. हे वाचावे. १ २ ३ थोडा शोध घेतला तर टर्की गे लोकांबद्दल हजारो संकेतस्थळे दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

(No subject)

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 10:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/13/2023 - 08:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

उच्चभ्रू , आपल्याला दिसणारे

Bhakti
Sat, 05/13/2023 - 10:35 नवीन
उच्चभ्रू , आपल्याला दिसणारे सिनेस्टार बिनधास्त आंतरधर्मीय विवाह करतातच की.लव्ह जिहाद म्हणजे धर्मांतर करण्यासाठी आटापिटा,ब्रेन वॉश हे सरळसरळ आहे की.
  • Log in or register to post comments

कोणत्याही दोन भिन्न

सुबोध खरे
Sat, 05/13/2023 - 10:42 नवीन
कोणत्याही दोन भिन्न धर्मियांनी विवाह केल्यास त्यांना धर्मांतर करण्यापूर्वी २ वर्षे थांबावे लागेल(cooling period) असा कायदा आणल्यास निदान लव्ह जिहादला बऱ्यापैकी आळा बसेल असे वाटते. जसे घटस्फोटासाठी ६ महिने थांबणे आवश्यक असते तसे किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याच खात्याशी संबंधित खाजगी नोकरी स्विकारण्याच्या अगोदर २ ते ५ वर्षे वाट पाहणे आवश्यक असते. असा कायदा आणणे सहज शक्य आहे. अर्थात शांतताप्रेमी त्याला जोरदार विरोध करतीलच.
  • Log in or register to post comments

धर्मांतर

उनाड
Sat, 05/13/2023 - 12:43 नवीन
धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात.
  • Log in or register to post comments

छान

चलत मुसाफिर
Sat, 05/13/2023 - 13:16 नवीन
माझ्याबद्दल छटाकाची माहिती नसतानाही तुम्ही ज्या खात्रीने विधाने करीत आहात ते वाचून मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

काहीही...

Bhakti
Sat, 05/13/2023 - 13:25 नवीन
काहीही... धर्मांतर झालेल्या स्त्रियांनी मरण यातना सहन कराव्यात आम्ही आपलं चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत नाही. Shame Shame
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

*चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत

Bhakti
Sat, 05/13/2023 - 13:26 नवीन
*चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत राहू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 13:48 नवीन
तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू ) , किती टक्के विवाहित स्त्रियांना, लग्नानंतर मरण यातना सहन कराव्यात लागत नाही ? काही विदा आहे की नुसतं तुणतुणं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

माझ्या धर्माने अशा

Bhakti
Sat, 05/13/2023 - 13:53 नवीन
माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये. हट्.. परत वड्याचं तेल वांग्यावर बाई. (बोलण्यात काही अर्थ नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

माझ्या धर्माने अशा

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 17:51 नवीन
माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये.
बरं मग दुसऱ्या धर्मितील स्त्रियांना लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिली नसते का ? बोल्याण्यात अर्थ हा, विदा देवून मुद्दा सांगणारा असेल तर असतो. डोक्यावर पडलेली कोणतीही व्यक्ती , सरसकट काहीही ठोsकुन मोकळी होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

भक्तीताई you too?

अथांग आकाश
Sat, 05/13/2023 - 15:14 नवीन
भक्तीताई you too? Shame Shame एकतरी सन्माननीय मिपा लेखक या फालतु धाग्यावर व्यक्त झाला आहे का? याचा थोडा विचार करा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हम्म्म!

Bhakti
Sat, 05/13/2023 - 15:50 नवीन
हम्म्म!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

सन्माननीय लेखक बहुदा निरुत्तर झाले असावेत. असो, मूळ लेखातील

उनाड
Sat, 05/13/2023 - 17:51 नवीन
एकाही मुद्याला कुणी स्पर्श केला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

एकाही मुद्याला कुणी स्पर्श

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 17:57 नवीन
एकाही मुद्याला कुणी स्पर्श केला नाही
आणि कोणी करणार ही नाही. इथे.. कारण व्हॉटसअप वरील वाचन करून , विचार कक्षा रुंदावल्या जाण्याला एक लिमिट आहे... त्यात मुद्देसूद प्रतिवाद सोडा... सायबर पाठशाळेतुन जे आणि जेवढ पढवले जाते.. ते आणि तेवढाच गाळ इथ तरंगनार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

तरीही

उनाड
Sat, 05/13/2023 - 18:44 नवीन
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।। शहाणे करून सोडावे । सकल जन ।। या उक्तीप्रमाणे मी इथे लिहिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

या धाग्यात कोणता मुद्दा किंवा

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 19:23 नवीन
या धाग्यात कोणता मुद्दा किंवा कोणते मुद्दे आहेत ते सांगावे. ते सांगितल्यानंतर प्रतिवाद करता येईल. समजा या धाग्यात एखादा मुद्दा सापडला तर त्या मुद्द्यासमर्थनार्थ पुरावे आणि विदा आहे का ते तपासावे. नसल्यास इतरांना विदा मागत फिरण्याऐवजी धागाकर्त्याला विदा मागावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

विदा

उनाड
Sat, 05/13/2023 - 19:48 नवीन
१ केंद्र सरकार ने लव्ह जिहाद नावाचे काही नाही असे लेखी उत्तर दिले आहे. २ मोठा गाजावाजा करून महाराश्ट्र सरकार ने आंतर धर्मीय ( आधी आंतर जातीय ही होते) विवाहाच्या तक्रारीसाठी समीती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

धाग्यात लिहिलंय की "लव्ह

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 19:56 नवीन
धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे". या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 22:25 नवीन
आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ पुराव्यांची व विदाची प्रतीक्षा करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

फँटसी काहीही असू शकते..

आंद्रे वडापाव
Sat, 05/13/2023 - 21:51 नवीन
फँटसी काहीही असू शकते.. त्याला पुरावे लागत नाही.. अच्चे दिन आयेंगे... १५ लाख अकाऊंट वर देऊ..शेवटी कल्पनाविलासच तो आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो. आणि त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही, पण ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं... असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

१५ लाख देणार असे पसरविणे हीच

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 22:13 नवीन
१५ लाख देणार असे पसरविणे हीच एक फँटसी होती कारण देणार असे सांगितल्याचा शष्प पुरावा नव्हता. म्हणजेच १५ लाख देणार असे विरोधकांनी सांगणे हाच कल्पनाविलास होता. श्रीराममंदिर निर्माण, ३७० कलम कचऱ्यात फेकणे, तोंडी घटस्फोट बंदी, पाकिस्तानात घुसून हल्ले, चीनला तोडीस तोड उत्तर इ. अच्छे दिन आहेत. म्हणजेच ही फँटसी नसून वस्तुस्थिती आहे. आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो. बरोब्बर. मोदींच्या नावाने विरोधकांनी पसरविलेले खोटे आरोप खरे आहेत असे कॉंग्रेस भक्त चाहता वर्ग डोळे मिटून मानतो, कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला आहे. ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं... असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे. आपण धागा नीट न वाचताच उड्या मारीत आहात. मुळात या धाग्यात कोणताही मुद्दा नसून, "लव्ह जिहाद ही फक्त एक उच्चवर्णीय फँटसी आहे" हा पूर्ण असत्य व एकमेव दावा आहे. याव्यतिरिक्त धाग्यात काहीही नाही. धागाकर्त्याने या एकमेव दाव्यासमर्थनार्थ शष्प पुरावा आणि विदा दिला नाही आणि इतरांना विदा मागत सुटलाय कारण हा दावाच मुळात बोगस आहे. मला एका प्रतिसादासंदर्भात विदा मागण्यात आला आणि माझ्यावर उपरोधिक लिहिले गेले. मी तातडीने विदा दिल्यानंतर विदा मागणारा परत या धाग्यावर फिरकलाच नाही. लव्ह जिहाद ही कटु वस्तुस्थिती अनेकांनी पुराव्यासहीत समोर आणली आहे. परंतु धागाकर्त्याचा मूळ उद्देश ब्राह्मणद्वेष ओकणे एवढाच आहे व तो शेवटी उघडही झाला आहे. आपण धागा पुनश्च वाचावा व धागाकर्त्याने केलेल्या एकमेव असत्य दाव्याचे पुरावे व विदा मागावा आणि नंतर इतरांवर आगपाखड करीत त्यांच्याकडे विदा मागावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

हो

उनाड
Sat, 05/13/2023 - 22:13 नवीन
इंग्रजीत सांगाअयचे तर The burden of proof lies with someone who is making a claim, and is not upon anyone else to disprove. 'लव्ह जिहाद' आहे , असा दावा जे करतात त्यांच्यावरच ते सिद्ध करायची जबाबदारी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

लव्ह जिहाद ही एक एक

श्रीगुरुजी
Sat, 05/13/2023 - 22:21 नवीन
लव्ह जिहाद ही एक एक उच्चवर्णीय फँटसी आहे. असे काही अस्तित्वात नाही. हा आपलाच दावा आहे की अजून कोणाचा आहे? Then the burden of proof lies with you because you made this claim, and is not upon anyone else to disprove. तस्मात् आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

ओके

उनाड
Sun, 05/14/2023 - 15:52 नवीन
१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही. २ तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१ लव्ह जिहाद नावाचे काही

आग्या१९९०
Sun, 05/14/2023 - 16:24 नवीन
१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही. भारत सरकारने लव्ह जिहादची एकही केस नोंदवली गेली नाही असे संसदेत सांगितले आहे. त्यामुळे केरळमध्ये असा प्रकार झाला हे खोटे ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

This story is from February

आंद्रे वडापाव
Sun, 05/14/2023 - 19:18 नवीन
This story is from February 05, 2020 INDIA ‘Love jihad’ not defined under laws, no case reported: Government TNN | Feb 5, 2020, 03:01 IST NEW DELHI: The home ministry on Tuesday said the term ‘love jihad’ — popularly used to describe cases of allegedly forced inter-faith marriages — was not defined under existing laws and no such case had been reported by any central agencies. In reply to a question by LS MP Behanan Benny asking if the government was aware of Kerala HC’s observation that there was no case of ‘love jihad’ in the state, junior home minister G Kishan Reddy referred to Article 25 of the Constitution, which provides for freedom to profess, practice and propagate religion subject to public order, morality and health.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सायबर कायदा येण्यापूर्वी

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 19:39 नवीन
सायबर कायदा येण्यापूर्वी आंतरजाल, सामाजिक माध्यमे यांचा वापर करून केलेले गुन्हे फसवणूक, कलम ४२० या कलमांखाली नोंदले जायचे. कालांतराने सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकृत सायबर कायदा अस्तित्वात आला. लव्ह जिहाद या प्रकारचे गुन्हे पूर्वी बहुतांशी बाहेर येतच नव्हते कारण लग्नात झालेल्या फसवणुकीविरूद्ध क्वचितच मुलगी तक्रार करायची. एखादीने तक्रार केली तरी मुस्लिमाने हिंदू असल्याचे नाटक करून हिंदू मुलीचे धर्मांतर करून लग्न करणे याविरूद्ध कायदाच नव्हता. मुस्लिमाचे आधीच लग्न झाले असले तरी मुस्लिमांना चार लग्ने करण्याची अनुमती असल्याने हा याविरूद्ध सुद्धा गुन्हा नोंदविणे शक्य नव्हते. तस्मात् २०१९ पर्यंत या गुन्ह्याविरूद्ध तक्रार आढळणे अवघड आहे. सुदैवाने मागील २-३ वर्षात हरयाणा, हिमालय प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश अश्या काही राज्यांमध्ये लव्ह जिहाद या विशिष्ट गुन्ह्याविरूद्ध कायदा केलेला आहे व त्या कायद्यानुसार शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. कालांतराने या गुन्ह्याविरूद्ध सर्व राज्यात व केंद्रात कायदा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

लव्ह जिहादच्या नोंदलेल्या २९१

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 19:50 नवीन
लव्ह जिहादच्या नोंदलेल्या २९१ केसेस मध्य प्रदेश, हरयाणा या राज्यातही लव्ह जिहाद कायद्यांतर्गत अनेक गुन्हे नोंदलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

चला नाही ना असे काही

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 04:24 नवीन
चला नाही ना असे काही अस्तित्वात .. मग चला दुपारच्या नमाजाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कोणतेही पुरावे आणि विदा न

श्रीगुरुजी
Sun, 05/14/2023 - 17:46 नवीन
कोणतेही पुरावे आणि विदा न देता परत परत तेच तुणतुणं. आधी पुरावे आणि विदा दाखवा. नाहीतर खोटे आरोप मागे घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड

आणि सर्वात मोठा मुद्दा हा

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 05:03 नवीन
आणि सर्वात मोठा मुद्दा हा फक्त लव्ह जिहाद नाही तर एकूणच अमिश दाखवून धर्मांतर हा आहे प्रत्येक वेळी ते सिद्ध करणे हि अवघड असते त्यामुळे या लिबरल नंदूचे फावते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बुद्ध धर्मावरील प्रेम म्हणून

चौकस२१२
Mon, 05/15/2023 - 05:13 नवीन
तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात. हो ना हिंदू उच्चरवर्णीय हलकटच हो उगाचच पानिपतला जाऊन युद्ध करा बसलाय पुड्या सोडतात आणि १ लाख बागंडी फुटायला कारणीभूत होतात ... असो पण मग मग तालिबान ने अफगाणिस्तानांत बामियान चे बुद्ध पाडले तेवहा केले ते काय , उरसाचा प्रसाद वाटला होता बुद्ध धर्मावरील प्रेम म्हणून ? https://www.youtube.com/watch?v=dBk5-zRUuNQ https://www.youtube.com/watch?v=r_1kQXeaOk4 https://www.youtube.com/watch?v=1Xkfwqkw_YE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा