Skip to main content

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

लेखक उनाड यांनी शुक्रवार, 12/05/2023 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा. या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे. महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला. नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले. स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला. या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे. केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?

वाचने 36772
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

कोणत्याही दोन भिन्न धर्मियांनी विवाह केल्यास त्यांना धर्मांतर करण्यापूर्वी २ वर्षे थांबावे लागेल(cooling period) असा कायदा आणल्यास निदान लव्ह जिहादला बऱ्यापैकी आळा बसेल असे वाटते. जसे घटस्फोटासाठी ६ महिने थांबणे आवश्यक असते तसे किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याच खात्याशी संबंधित खाजगी नोकरी स्विकारण्याच्या अगोदर २ ते ५ वर्षे वाट पाहणे आवश्यक असते. असा कायदा आणणे सहज शक्य आहे. अर्थात शांतताप्रेमी त्याला जोरदार विरोध करतीलच.

धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात.

In reply to by उनाड

माझ्याबद्दल छटाकाची माहिती नसतानाही तुम्ही ज्या खात्रीने विधाने करीत आहात ते वाचून मौज वाटली.

In reply to by उनाड

काहीही... धर्मांतर झालेल्या स्त्रियांनी मरण यातना सहन कराव्यात आम्ही आपलं चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत नाही. Shame Shame

In reply to by Bhakti

तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू ) , किती टक्के विवाहित स्त्रियांना, लग्नानंतर मरण यातना सहन कराव्यात लागत नाही ? काही विदा आहे की नुसतं तुणतुणं....

In reply to by आंद्रे वडापाव

माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये. हट्.. परत वड्याचं तेल वांग्यावर बाई. (बोलण्यात काही अर्थ नाही)

In reply to by Bhakti

माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये.
बरं मग दुसऱ्या धर्मितील स्त्रियांना लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिली नसते का ? बोल्याण्यात अर्थ हा, विदा देवून मुद्दा सांगणारा असेल तर असतो. डोक्यावर पडलेली कोणतीही व्यक्ती , सरसकट काहीही ठोsकुन मोकळी होते..

In reply to by Bhakti

भक्तीताई you too? Shame Shame एकतरी सन्माननीय मिपा लेखक या फालतु धाग्यावर व्यक्त झाला आहे का? याचा थोडा विचार करा! 0

In reply to by उनाड

एकाही मुद्याला कुणी स्पर्श केला नाही
आणि कोणी करणार ही नाही. इथे.. कारण व्हॉटसअप वरील वाचन करून , विचार कक्षा रुंदावल्या जाण्याला एक लिमिट आहे... त्यात मुद्देसूद प्रतिवाद सोडा... सायबर पाठशाळेतुन जे आणि जेवढ पढवले जाते.. ते आणि तेवढाच गाळ इथ तरंगनार..

In reply to by आंद्रे वडापाव

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।। शहाणे करून सोडावे । सकल जन ।। या उक्तीप्रमाणे मी इथे लिहिले आहे

In reply to by आंद्रे वडापाव

या धाग्यात कोणता मुद्दा किंवा कोणते मुद्दे आहेत ते सांगावे. ते सांगितल्यानंतर प्रतिवाद करता येईल. समजा या धाग्यात एखादा मुद्दा सापडला तर त्या मुद्द्यासमर्थनार्थ पुरावे आणि विदा आहे का ते तपासावे. नसल्यास इतरांना विदा मागत फिरण्याऐवजी धागाकर्त्याला विदा मागावा.

In reply to by श्रीगुरुजी

१ केंद्र सरकार ने लव्ह जिहाद नावाचे काही नाही असे लेखी उत्तर दिले आहे. २ मोठा गाजावाजा करून महाराश्ट्र सरकार ने आंतर धर्मीय ( आधी आंतर जातीय ही होते) विवाहाच्या तक्रारीसाठी समीती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही.

In reply to by उनाड

धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे". या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.

In reply to by उनाड

फँटसी काहीही असू शकते.. त्याला पुरावे लागत नाही.. अच्चे दिन आयेंगे... १५ लाख अकाऊंट वर देऊ..शेवटी कल्पनाविलासच तो आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो. आणि त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही, पण ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं... असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे...

In reply to by आंद्रे वडापाव

१५ लाख देणार असे पसरविणे हीच एक फँटसी होती कारण देणार असे सांगितल्याचा शष्प पुरावा नव्हता. म्हणजेच १५ लाख देणार असे विरोधकांनी सांगणे हाच कल्पनाविलास होता. श्रीराममंदिर निर्माण, ३७० कलम कचऱ्यात फेकणे, तोंडी घटस्फोट बंदी, पाकिस्तानात घुसून हल्ले, चीनला तोडीस तोड उत्तर इ. अच्छे दिन आहेत. म्हणजेच ही फँटसी नसून वस्तुस्थिती आहे. आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो. बरोब्बर. मोदींच्या नावाने विरोधकांनी पसरविलेले खोटे आरोप खरे आहेत असे कॉंग्रेस भक्त चाहता वर्ग डोळे मिटून मानतो, कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला आहे. ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं... असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे. आपण धागा नीट न वाचताच उड्या मारीत आहात. मुळात या धाग्यात कोणताही मुद्दा नसून, "लव्ह जिहाद ही फक्त एक उच्चवर्णीय फँटसी आहे" हा पूर्ण असत्य व एकमेव दावा आहे. याव्यतिरिक्त धाग्यात काहीही नाही. धागाकर्त्याने या एकमेव दाव्यासमर्थनार्थ शष्प पुरावा आणि विदा दिला नाही आणि इतरांना विदा मागत सुटलाय कारण हा दावाच मुळात बोगस आहे. मला एका प्रतिसादासंदर्भात विदा मागण्यात आला आणि माझ्यावर उपरोधिक लिहिले गेले. मी तातडीने विदा दिल्यानंतर विदा मागणारा परत या धाग्यावर फिरकलाच नाही. लव्ह जिहाद ही कटु वस्तुस्थिती अनेकांनी पुराव्यासहीत समोर आणली आहे. परंतु धागाकर्त्याचा मूळ उद्देश ब्राह्मणद्वेष ओकणे एवढाच आहे व तो शेवटी उघडही झाला आहे. आपण धागा पुनश्च वाचावा व धागाकर्त्याने केलेल्या एकमेव असत्य दाव्याचे पुरावे व विदा मागावा आणि नंतर इतरांवर आगपाखड करीत त्यांच्याकडे विदा मागावा.

In reply to by आंद्रे वडापाव

इंग्रजीत सांगाअयचे तर The burden of proof lies with someone who is making a claim, and is not upon anyone else to disprove. 'लव्ह जिहाद' आहे , असा दावा जे करतात त्यांच्यावरच ते सिद्ध करायची जबाबदारी असते.

In reply to by उनाड

लव्ह जिहाद ही एक एक उच्चवर्णीय फँटसी आहे. असे काही अस्तित्वात नाही. हा आपलाच दावा आहे की अजून कोणाचा आहे? Then the burden of proof lies with you because you made this claim, and is not upon anyone else to disprove. तस्मात् आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.

In reply to by श्रीगुरुजी

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही. २ तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात.

In reply to by उनाड

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही. भारत सरकारने लव्ह जिहादची एकही केस नोंदवली गेली नाही असे संसदेत सांगितले आहे. त्यामुळे केरळमध्ये असा प्रकार झाला हे खोटे ठरते.

In reply to by आग्या१९९०

This story is from February 05, 2020 INDIA ‘Love jihad’ not defined under laws, no case reported: Government TNN | Feb 5, 2020, 03:01 IST NEW DELHI: The home ministry on Tuesday said the term ‘love jihad’ — popularly used to describe cases of allegedly forced inter-faith marriages — was not defined under existing laws and no such case had been reported by any central agencies. In reply to a question by LS MP Behanan Benny asking if the government was aware of Kerala HC’s observation that there was no case of ‘love jihad’ in the state, junior home minister G Kishan Reddy referred to Article 25 of the Constitution, which provides for freedom to profess, practice and propagate religion subject to public order, morality and health.

In reply to by आंद्रे वडापाव

सायबर कायदा येण्यापूर्वी आंतरजाल, सामाजिक माध्यमे यांचा वापर करून केलेले गुन्हे फसवणूक, कलम ४२० या कलमांखाली नोंदले जायचे. कालांतराने सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकृत सायबर कायदा अस्तित्वात आला. लव्ह जिहाद या प्रकारचे गुन्हे पूर्वी बहुतांशी बाहेर येतच नव्हते कारण लग्नात झालेल्या फसवणुकीविरूद्ध क्वचितच मुलगी तक्रार करायची. एखादीने तक्रार केली तरी मुस्लिमाने हिंदू असल्याचे नाटक करून हिंदू मुलीचे धर्मांतर करून लग्न करणे याविरूद्ध कायदाच नव्हता. मुस्लिमाचे आधीच लग्न झाले असले तरी मुस्लिमांना चार लग्ने करण्याची अनुमती असल्याने हा याविरूद्ध सुद्धा गुन्हा नोंदविणे शक्य नव्हते. तस्मात् २०१९ पर्यंत या गुन्ह्याविरूद्ध तक्रार आढळणे अवघड आहे. सुदैवाने मागील २-३ वर्षात हरयाणा, हिमालय प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश अश्या काही राज्यांमध्ये लव्ह जिहाद या विशिष्ट गुन्ह्याविरूद्ध कायदा केलेला आहे व त्या कायद्यानुसार शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. कालांतराने या गुन्ह्याविरूद्ध सर्व राज्यात व केंद्रात कायदा येईल.

In reply to by श्रीगुरुजी

लव्ह जिहादच्या नोंदलेल्या २९१ केसेस मध्य प्रदेश, हरयाणा या राज्यातही लव्ह जिहाद कायद्यांतर्गत अनेक गुन्हे नोंदलेले आहेत.

In reply to by उनाड

कोणतेही पुरावे आणि विदा न देता परत परत तेच तुणतुणं. आधी पुरावे आणि विदा दाखवा. नाहीतर खोटे आरोप मागे घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

आणि सर्वात मोठा मुद्दा हा फक्त लव्ह जिहाद नाही तर एकूणच अमिश दाखवून धर्मांतर हा आहे प्रत्येक वेळी ते सिद्ध करणे हि अवघड असते त्यामुळे या लिबरल नंदूचे फावते

In reply to by उनाड

तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात. हो ना हिंदू उच्चरवर्णीय हलकटच हो उगाचच पानिपतला जाऊन युद्ध करा बसलाय पुड्या सोडतात आणि १ लाख बागंडी फुटायला कारणीभूत होतात ... असो पण मग मग तालिबान ने अफगाणिस्तानांत बामियान चे बुद्ध पाडले तेवहा केले ते काय , उरसाचा प्रसाद वाटला होता बुद्ध धर्मावरील प्रेम म्हणून ? https://www.youtube.com/watch?v=dBk5-zRUuNQ https://www.youtube.com/watch?v=r_1kQXeaOk4 https://www.youtube.com/watch?v=1Xkfwqkw_YE

In reply to by उनाड

आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.

In reply to by श्रीगुरुजी

आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.
+१ त्या माणसाने सगळ्या सुशिक्षित आणि हिंदु लोकांवर गरळ ओकली आहे.

मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी मी सदस्य झालो त्यावेळी मी सेक्युलर विचारसरणीचा होतो‌. अंगात किडा म्हणून म्हणा किंवा सेक्युलर पणाची हद्द म्हणा पण मी कुराण वाचलं. त्यानंतर मला दहशतवाद (याला खरंतर कुराणवाद म्हणायला हवं - तुम्ही नुसते देवाला मानणारे असला तरी माझ्या पुस्तकातल्या देवाला का मानत नाही म्हणून जीव घ्यायचा अधिकार देणाराला दुसरं काय म्हणणार), लव जिहाद, सक्तीची धर्मांतरे, काश्मीर किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या धार्मिक हकालपट्टीची मुळे कुराणातच आढळून आली. त्यानंतर मी इस्लाम पुरता माझा पुरोगामी विचार सोडून दिला. हिंदू धर्मात लाख त्रुटी असतील पण एक गोष्ट चांगली आहे, हिंदू धर्म प्रवाही आहे. इथं नवा विचार मान्य आहे, धर्म सुधारणा मान्य आहे, धर्मावर, देवावर प्रश्नचिन्ह मान्य आहे. तुमचं नास्तिक असनं मान्य आहे, एकेश्वरवाद अनेकेश्वरवाद, सगळं मान्य आहे. तुम्हाला हिंदू व्हायला वेगळा विधी नाही, तुम्ही ज्या दिवशी स्वतःला हिंदू समजायला सुरू करावं, हिंदू पद्धतीने (कोणत्याही- शैव वैष्णव, वारकरी, दत्त, शाक्त, मराठी, उत्तर भारतीय, अगदी कोणत्याही) त्या दिवसापासून तुम्ही हिंदू (कर्नाटक राज्यात हिंदू सिद्दी आहेत). उद्या तुम्ही स्वतः एखाद्या पंथाची स्थापना करु शकता. तुम्ही मुसलमान झाला तर त्या धर्मात राहुन दुसरा पंथ काढला तर मान कापुन टाकतील. लव जिहाद चं असं आहे, मुसलमानांची कुराण आणि हदिस आदेशानुसार पद्धत आहे की तुम्ही ज्या देशात राहता तो देश मुसलमान करने हि तुमची नैतीक जबाबदारी समजावी, तुम्ही अल्पसंख्याक असाल तर लोकसंख्या वाढवावी (शक्य त्या प्रत्येक पद्धतीने) आणि बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा आणि इस्लाम ची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी मग लव जिहाद करा, किंवा कापाकापी करा.

In reply to by भीमराव

भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत. जे लोक धर्मासाठी आपल्या आणि अन्य धर्मीयांचा जीव घेऊ शकतात त्यांच्यासाठी लव जिहाद म्हणजे फारच किरकोळ आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत.
सहमत. मुस्लीम हा एकाच वेळी सेक्युलर / सर्वधर्मप्रेमी / सर्वधर्मसमानता वाला असुच शकत नाही - असे एका तबलिगी जमातमधील अनुयायाने सांगितले होते.

In reply to by भीमराव

अगदी सहमत भीमराव... अनेक विचारी व्यक्ती इस्लाम सोडत आहेत (एक्स-मुस्लिम) त्यातला एक एक्स मुस्लिम साहिल अनेक लिब्रान्डु आणी स्युडो शेखूलर लोकांच्या अध्ययना साठी खाली लिंक देतोय ) https://www.youtube.com/channel/UCjk7V7Rw2jJSflLXYxBOY0g (आता माझा स्वतः चा अनुभव , २००७ साली मी सौदी अरेबियात , अल-जुबेल सिटी , एक केरळी , एक कोकणी आणी एक पेशावरी अश्या तीन लोकांनी ईस्लाम मध्ये ओढण्याचा दोन मार्गानी प्रयत्न केला होता- अतिशय मिठास वाणी आणी हिंदू धर्मा बद्दल बुद्दिभेद , त्यातल्या कोकणी इसमाने मला कुराणाची मराठी प्रत दिली होती , समग्र वाचन केलं, सुराः अत-तौबा श्लोक -५ अनेक वेळा वाचून काढला )[मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज रहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे.]   

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही... त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली....

In reply to by आंद्रे वडापाव

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही... त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली.... bhoot

In reply to by आंद्रे वडापाव

महाराष्ट्र आणि मध्या प्रदेश रडीचा डाव खेळून सत्ता मिळवली आहे. ते काढल्यास हाती कटोरा राहतो

"बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा " जी लोक स्वतःला पुरोगामी म्हणत सतत " हे आणि ते बामणांचे कारस्थान असा कंठशोष करीत असतात " त्यांना हे समाजत नाही कि जिहादी हातात तलवार घेऊन आले तर ते हे बघणार कि समोरचा जोशी आहे पाटील आहे कि काम्बळे ? त्यांच्या दृष्टीने हे सर्व काफीरच कि

In reply to by चौकस२१२

अखिला प्रकरणात हेच झाले. आईवडील पुरोगामी साम्यवादी विचारांचे. त्यामुळे मुलीला धर्म, देव, अध्यात्म यापासून कटाक्षाने दूर ठेवले. मेंदूत कदाचित अध्यात्मासाठी एखादा कोपरा ठेवलेला असावा जो या मुलीच्या मेंदूत रिकामाच राहिला. शिक्षणासाठी वसतिगृहात गेल्यानंतर बरोबर कट्टर धार्मिक मुस्लिम मुलगी होती. तिचा भाऊ वारंवार भेटायला यायचा. बहीणभावाने योजनापूर्वक मेंदूच्या रिकाम्या जागेत मुस्लिम तत्वज्ञान भरले. मुलीने धर्मांतर करून बरोबर राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भावाशी लग्न केले आणि पुरोगामी नास्तिक साम्यवादी आईवडीलांचे डोळे खाडकन उघडले. मग लग्नाविरूद्ध न्यायालयात गेले. पण उपयोग झाला नाही. काय मिळविले यापुरोगामी आईवडीलांनी नास्तिक तत्वज्ञान मुलीच्या मेंदूत भरून?

हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. एकाद्या व्यक्तीने सर्व विचार करून स्वखुषीने धर्म सोडायचा निर्णय घेतला तर प्रोब्लेम काय आहे ? जे बरे वाईट परिणाम असतील ते ती भोगेल ना ? या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का?

In reply to by उनाड

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.

In reply to by उनाड

या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का? उनाड महोदय , आंबेडकरांचा विषयच काढला आहेत तर हे घ्या १) आंबेडकरणसारख्या विचारवंताने स्वतः काही सामाजिक बदल घडावा म्हणून केलेले धर्मांतर आणि वेगवेगळ्या आमिषाने केले गेलेलं धर्मांतर यांची कशी बरोबरी करता? २) आंबेडकरांना पाहिजे असते तर त्यांनीं ख्रिस्ती किंवा इस्लाम चा स्वीकार सहज केला असता .. त्यांनी तसे केले नाही! का ? कधी विचार केलाय ?

In reply to by चौकस२१२

+१ त्याबरोबरच धागाकर्त्याने श्री आंबेडकर यांचे ईसाई आणि मुस्लीम रिलीजनबद्दलचे विचार वाचले तर बरे होईल.

In reply to by उनाड

या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का? >>> फॉर लार्ज पार्ट ऑफ हिज लाईफ आंबेडकर हिंदू होते. त्यांनी हिंदूंमध्ये सुधारणा व्हावी, दलितांना माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून अफाट प्रयत्न केले. त्यानंतरही जेव्हा मंदिर प्रवेशासारख्या गोष्टींसाठी दलित बांधवांची अडवणूक होताना दिसली तेव्हा त्यांनी धर्म बदलणार असे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. त्यात त्यांना जो करुणामयी धर्म वाटला तो त्यांनी जाहीररित्या स्वीकारला. त्यासाठी त्यांनी काही नियम बनवले. या दरम्यान कित्येक व्यक्ती व संस्थांनी पुर्नविचार करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांना ते भेटले व त्यांचे विचार त्यांनी ऐकून घेतले. आंबेडकरांसारख्या सुविद्य, काही तपे समाजकारण केलेल्या व्यक्तीने स्वेच्छेने केलेले धर्मांतर व अब्राहमीक धर्मात नॉन-अब्राहमीक जोडीदार मान्य नाही म्हणून सक्तीने करावे लागलेले धर्मांतर यातला फरक समजत नसेल तर कठीण आहे.

"लव्ह जिहाद" या शब्दांची व्युत्पत्ती कोणी केली, हे तपासून पाहिलं तर केरळ मधील क्रिश्चन धर्मगुरूंनी केली ( क्रिश्चन मुली आणि मुस्लिम मुलगा) संदर्भाने.... पण चाणाक्ष वाचकांना माहिती असेलच, सर्वोच्च नेते आणि त्यांचे भक्त चाहते यांनी नेहमीपरमाणेच , दुसऱ्याचे ढापून चोरण्याचे पिढ्यानपिढ्या ची परंपरागत जन्मजात सवय दाखवून दिली...

In reply to by आंद्रे वडापाव

वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त. पण तुम्ही ही व्युत्पत्ती सांगितली, त्यावरून हे लक्षात येतं की भारतातले क्रिश्चन जागे झाले पण अजून हिंदू(?) जागे झाले नाहीत तर उच्च नीच वर्णीय कांगावे हेच खेळण्यात मग्न आहेत

In reply to by सुखी

उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु, मोदींचे समर्थक यापैकी नक्की कोणाचा हा कल्पनाविलास आहे हे समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंना आपले बकरे इतर धर्मात जाऊ नये असे वाटत असतेच. हा कल्पना विलास ख्रिस्ती धर्मगुरूंनी सुरू केला व मग (काही) हिंदुनी उचलला असे म्हणता येइल. लव्ह जिहाद विरोधी मोर्चे कोणत्या संघटना काधत आहेत हे पाहिले तरी पुरे.

In reply to by उनाड

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.

In reply to by सुखी

वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त. धादांत खोटंच आहे ते. उच्चवर्णीय (म्हणजे ब्राह्मण) द्वेष हे यामागील प्रमुख कारण आहे।

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे ...चला हे तर मान्य केलंत कि ख्रिस्ती लोकांना सुद्धा इस्लामी धर्मांतरबद्दल नाराजी होती .. मग ती हिंदूंना असली तर काय चुकलं? आणि हिंदूंना म्हणजे सर्व हिंदूंना जातीचा संबंध नाही

आमच्या घरी एक मावशी होत्या कामाला. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. त्यांची सून आलेली एक-दोन वेळा. तीची पण सेम केस. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. दोघीही घरकाम करायच्या. लव जिहाद चा सिन होता का ते माहीत नाही.

बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू आहे का? शंकराचार्य म्हणाल तर त्यांना कोणी धर्मप्रमुख मानत नाही. पंथप्रमुख किंवा संप्रदाय प्रमुख खुप आहेत. इथं आहेत त्यांच्या कडे निट लक्ष नाही त्यामुळे आपले बकरे कमी होतात म्हणून धर्मगुरू नि कांगावा सुरू केला हा युक्तिवाद काही पटत नाही बुवा. धर्मावर नंतर येऊ आधी मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे ते समजून घेतलं तरी तुम्हाला पडलेल्या निम्म्या कोड्याचं उत्तर तिथंच सापडतंय बघा.

In reply to by भीमराव

याच माणसाने खालील तारे तोडले आहेत. - धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात. - आफले बकरे कमी होतील म्हणून धर्मगुरूंनी कांगावा सुरू केला, धर्मांतर झाले तर आपले तूप कमी होईल म्हणून ब्राह्मणांनी विरोध व कल्पनाविलास सुरू केला असले तारे तोडलेत. बरं, याविषयीचे पुरावे व विदा शून्य. अनेकदा मागूनही पुरावे व विदा देत नाही कारण मुळातच सर्व खोटारडेपणा आहे. हा खोटारडा व ब्राह्मणद्वेषी आहे हे अनेकदा चघड होऊनही काही जण याची हिरिरीने पाठराखण करताहेत. धन्य आहे.

सुरा : अल-निसा , आयत :२५ आणि तुमच्यापैकी जर एखाद्याची इतकी ऐपत नसेल की त्यांचा सद्वर्तनी मुसलमान स्त्रियांशी विवाह होईल तर त्याने तुमच्या त्या दासींपैकी एखादीशी विवाह करावा ज्या युद्धामध्ये तुमच्या ताब्यात आल्या असतील व त्या श्रद्धावंत असतील. परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि अल्लाह क्षमा करणारा व परम कृपाळू आहे.

उनाड, लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा. याविषयी अनेकदा विचारले आहे, परंतु कोणतेही पुरावे आणि विदा न देता ब्राह्मणमत्सरी पिचकाऱ्या का सुरू आहेत? वारंवार ब्राह्मणद्वेषाची गुळणी थुंकण्याऐवजी पुरावे आणि विदा दिला पाहिजे.

अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे. ज्याची जळती त्याला कळती . माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली. दिल्ली गेट ला जिथे मी पहाटे रोज चहा पितो त्याची बायकोही पळाली. हे खूप systematic चालले आहे.

In reply to by नगरी

१)
माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली.
एखाद्या पुरुषाची बायको परपुरुषासोबत पळून गेली दी दु:खाची बाब आहे. पण तो परपुरुष मुस्लिम असल्याने दु:खं होतंय का ? तो हिंदू असता तर आनंद झाला असता का तुमच्या मित्राला ? २)
हे खूप systematic चालले आहे.
हं... केरळ स्टोरी चित्रपट आधी आला असता तर या बायका पळून गेल्या नसत्या. नाही का ? पण "लव्ह जिहाद" या संकल्पनेबद्दल तर गेले किमान २-३ वर्षांपासून लिहिलं / चर्चिलं जात आहे विविध ठिकाणी , या बायकांच्या वाचनात आलं नसेल का ? की या घटना जास्त जुन्या आहेत ? जास्त जुन्या असतील तर पुढे या बायकांचं आपापल्या प्रियकरासोबत सहजीवन (लग्न करुन वा न करता.. जे काही असेल ते) कसं होतं/आहे ? आतापर्यंत तलाक झालेत की फ्रीजमध्ये गेल्यात या बायका ?

बायका सांभाळायला त्या काय मेंढरं आहेत का ? :) बाकी काही प्रतिसाद वाचून असं वाटलं की "आपल्याला कोणी फसवतोय भुलवतोय याची बायकांना काही म्हणजे काssही आयडिया नसते ... जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"...

लव जिहाद सुधा जाऊद्या .. जे मुसलमान साधारण पणे फार धार्मिकते कडे झुकणार नाहीत त्यांना आणि त्यातील तरुणांना "धार्मिकशिक्षणात जास्त गुंतवणूक करून जास्त कडवे बनवण्याचा पण कार्यक्रम असतो मी स्वतः बघितले आहे निम शहरी आणि छोट्या गावातून पूर्वी तरी तसा एकोपा असायचा , म्हणजे दिवाळीत गावातील अब्दुल चाचा हि पण उद्योग म्हणून फटाके विकण्याचे काम करणार, पशिचम महाराष्ट्रात जसे खाटीक कुरेशी तसेच मुसलमान बागवान .. मग ते हिंदू संस्थंना पण भाजी पुरवणार , हिंदू संस्था पण डोळे झाकून त्याच्या कडून घेणार इत्यादी .. असच एका निमशहरी वातवरणात एक चाचा यांची ३ तरुण मुले गाड्या भाड्याने देण्याचा वयवसाय करायाचे, अर्थातच त्यांचे बहुतेक गिर्हाईक हिंदू, शिवाय ३-४ दिवसांची सहल असली कि हिंदू कुटुंबांबरोबर राहावे ला गे .. लहानपणी चाचांचा एक मुलगा नेहमी आमच्या सहलीत ड्राइवर म्हणून असायचा.. तो अगदी टापटीप ऱ्हायचा , त्याचे टोपण नाव राजकुमार, धर्म कोणता हे कळणार पण नाही त्याचं पेहरावावरून ... बरेच वर्षांनी गावी गेलो आणि दुपारी त्याला फोन करून बोलवले म्हणले उद्या आपल्याला फिरायला दोन दिवस जायचे आहे,, दुसर्या दिवशी मी वेळेवर बाहेर अंगनात वाट बघत होतो .... बराच वेळ झाला राजकुमार काही दिसला नाही ... बाबानं विचारला तर ते म्हनाले कि असेल आलेला , टपरी वर गेला असेल .. म्हणून मी फिरत टपरी वर गेलो...; तर एक पूर्ण पठाणी वेष धारण केलेला , लांब दाढी वैगरे "राजकुमार" समोर.... मला आश्चर्य वाटलं.. .. दोन दिवसाच्या सहलीत त्याने बरेच काही भोळे पणा ने सांगून टाकले .. म्हणाला आमच्या समाजातील काही लोक आले त्यांनी मला मलेशियात धार्मिक शिक्षणासाठी पाठवले ३ महिने राहिलो ... माझ्या बरोबरीच्या काहींनी तिकडे लग्न पण जुळवली ... इत्यादी .. नंतर जवळचं दोन तीन गावामधून त्याने काही समाजाची नवीन झालेली वसतिगृहे / मशिदी दाखवल्या. एवढे पैसे आले कुठून? हा भाग काह केरळ किंवा गोवा नाही कि जेथून बरेच लोक गल्फ ला जाऊन गावी पॆसे पाठवतात ... मुद्दा काय कि हा वहाबी पणा नेण्याचा एक व्यस्थित कार्यक्रम आहे .. या आधी पूर्व आशिया तील देश कसे अरबी पद्धती स्वीकारू लागले आहेत ते लिहिले आहेच.. एकूण काय पण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणाऱ्या हिंदू "ब्लीडींग हार्ट " वाल्यांना हे काही मुद्डमून लक्षात घ्यायचं नाहीये ....

सदर धागा हा हिंदुना दुखवण्यासाठी आणि आगपाखड करण्यासाठी तयार केला आहे. धागाकर्त्याचे बरेचसे प्रतिसाद विनाकारण वादविवाद सुरु करणे आणि मुळ मुद्याला उत्तर न देणे, अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे ह्या धाग्यातुन काहीही भरीव साध्य होणार नाही. -- सबब हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती. (हा धागा हटवल्यास धागाकर्त्याला उत्तरांसाठ्याची प्रतिसादांना इतर अभ्यासु लोक मुकतील, त्यामुळे हा धागा तसाच ठेवावा)

In reply to by Trump

जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"... शंकाच नाही. साम्यवादी संस्कार केलेल्या आपल्या मुलीच्या मेंदूतील अध्यात्माचा कोपरा रिकामा राहिल्याने इस्लामिक तत्वज्ञान घुसवायला सोपे जाते. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन,आयसिस प्रवास सुरळीत होतो. मुलाच्या मेंदूच्या धार्मिकतेचा कोपरा रिकामा रहात नसावा,त्यामुळे त्याचे इस्लामीकरण करता येत नाही. सहज ओळखीतील लोकांना, लव्ह जिहाद ह्या थापा आहेत असे म्हटले तर काहीजण खवळून उठले. खवळलेले १००% उच्चवर्णीय होते. विदा मागू नये.

In reply to by आग्या१९९०

विदा मागू नये. कारण आम्ही बिनबुडाच्या थापा मारतो. विदा असलाच तर आम्ही देणार ना? ना आमच्याकडे विदा ना पुरावे, पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.

चित्रपटातील हिरोईन देवोलिना भट्टाचार्जी ने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. दोघांचाही संसार आनंदी चाललेला दिसतोय. db